Jul 16, 2020
प्रेम

अतरंगीरे एक प्रेमकथा 51

Read Later
अतरंगीरे एक प्रेमकथा 51

इथे केंटींगमध्ये रोहन डोक्याला हात लावुन शांत बसुन असतो..

वृषभ : तुला काय गरज होती त्या फैयाजला शौर्यबद्दल सगळ्या गोष्टी सांगायची?? 

रोहन : मुद्दामुन नाही केलं यार आणि मी फक्त तो दिल्लीला अचानक का आला ते सांगितलं.. मला काय माहीत फैयाज एवढ इस्यु क्रिएट करेल..

वृषभ : पण त्याने सांगितलेल ना ही गोष्ट सांगु नकोस कुणाला..

मनवी : पण आत्ता झाली ना चुक.. एवढं का ओव्हर रिएक्ट होताय तुम्ही लोक..

वृषभ : तो काय बोलला ते तु ऐकल नसशील म्हणुन अस बोलतेस तु..

मनवी : एक मिनिट मी ऐकलं सगळं. आणि शौर्य पण त्या फैयाजला काय बोलला ते पण ऐकलं..

रोहन रागातच मनवीकडे बघतो..

रोहन : तु शांत बस ना जरा.. ज्या गोष्टी माहीत नाहीत किंवा कळत नाही तिथे नको बोलुस..

समीरा : रोहन तु खुपच चुकीच वागलास त्याच्यासोबत.. शौर्यला मी एवढं रागात कधीच बघितलं नव्हतं जेवढा तो आज होता आणि मुळात त्या फैयाज सोबत फुटबॉल खेळायची गरजच काय होती तुम्हांला??

वृषभ : आम्ही तिघेच खेळत होतो.. पण तो फैयाज आला खेळायला..  तरी शौर्य नाही बोलत तिथुन निघत होता.. पण मी आणि रोहननेच त्याला जबरदस्ती करत तिथे थांबवल..

राज : पण शौर्यने फोन अजुन स्विच ऑफ का ठेवलाय??

समीरा : मी पण ट्राय करतेय स्विच ऑफ येतोय फोन त्याचा..

रोहन : शौर्य माझ्याशी बोलेल ना परत??

वृषभ : त्याचा राग माहिती ना तुला..?? मुळात तो जास्त वेळ कोणावर रागवुच शकत नाही.. त्याला येऊ दे आधी मग आपण समजवु त्याला..

मनवी : रोहन मी निघतेय.. तु पण इथुन निघावं अस मला वाटत..

बाय गाईज अस बोलत मनवी तिथुन निघुन जाते.. ती अशी जाते बघुन रोहन पण तिच्यासोबत जातो..

सीमा : किती सेल्फीश आहे ही.  हिला एवढी हेल्प केली शौर्यने तरी हिला काही फरकच नाही..

समीरा : शौर्य बरोबर बोलतो.. आपण समोरच्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही ठेवायची.. 

सीमा : पण असल्या लोकांना हेल्प पण नाही करायची.

(सीमा केंटींग बाहेर पडणाऱ्या मनवीकडे रागात बघतच बोलली)

अजुन पण फोन स्विच ऑफ आहे यार.. वृषभ रागातच फोन टेबलवर ठेवत बोलतो..

इथे विराज शौर्यच्या गालावर मारतच त्याला आवाज देत उठवण्याचा प्रयत्न करत असतो.. पण शौर्य त्याच्या बोलण्यावर काहीच रिस्पॉन्स देत नव्हता.. कदाचीत विराजचा आवाज त्याच्यापर्यंत पोहचतच नव्हता.. विराज अधुन मधुन रूम बाहेर येत कोणी मदतीला भेटत का ते बघत होता.. 

तोच हॉटेलचे मॅनेजर सोबत डॉक्टरांना घेऊन त्याच्या रूममध्ये येतात..

Viraj : Doctor please check what happened to my brother . He was speaking with me and I don’t no what happened suddenly he became unconscious. Dr is he alright ?

(डॉक्टर येताच विराज डॉक्टरांना बोलु लागला.)

Doctor: let me check first?

डॉक्टर बेगेतुन स्टेटोस्कोप काढतच शौर्यला तपासु लागतात..

डॉक्टर : Did he had something in the morning?

विराज : I don’t know but Every day he has his breakfast from his hostel than he goes to his college.. कोई सिरीयस बात हे क्या??

डॉक्टर : सिरीयस बात तो नही है.. बट अगर पेशन्ट डिप्रेशन में हे तो सिरीयस बात है।

विराज : मतलब..?? क्या हुआ हे इसे??

डॉक्टर : उसे क्या हुआ येह तो में नही अभि बता सकता.. क्युकी रिजन कुछ भी हो सकता हे.. उसने मॉर्निंग से कुछ खाया पिया नही रहेगा फिर भी ऐसा हो सकता हे. या फिर हो सकता हे की वो डिप्रेशन में हो.. किसीं चीज का टेन्शन.. या फिर कुछ बात ज्यादा देर तक मनमें रखने से भी ऐसा होता हे.. या फिर किसीं चीज से डर जाने की वझसे.. रिजन बहोत सारे हे.. बट असली रिजन तो पेशंट से बात करणे पर ही पता चलेगा..

विराज : येह होश में कब आयेगा??

डॉक्टर : फिलाल तो मेने इसे इंजेक्शन दे तो दिया हे. थोडी देर में पेशंटको होश आ जायेगा. 

विराज : ओके..

डॉक्टर आणि हॉटेलचे मॅनेजर तिथुन निघून जातात..

विराज शौर्यच्या केसांवरून हात फिरवत त्याच्याकडे बघतच रहातो.. 

जवळपास दोन अडीच तासाने शौर्यची हालचाल विराजला जाणवते..

विराज : शौर्य.. कसं वाटतंय तुला..

(डोक धरतच उठायला बघतो)

शौर्य : मला काय झालं?? तु रडतोयस??

विराज त्याला हात देतच उठुन बसवतो.. 

विराज : रडु नाही तर काय करू.. शौर्य हे काय आहे यार.. किती घाबरवलस तु मला.. तुला काही झालं असंत तर.. 

शौर्य : मला काय झालंय आणि बर झालं असत जर काही झालं असत तर... तुला आणि मम्माला थोडं रिलीफ वाटलं असतना..

विराज :  शौर्य तु तोंडाला येईल ते बोलतोयस यार.. मुळात तु अस का बोलतोयस??.. हे बघ तुला माझी भीती वाटते ना तर मी निघुन जातो तुझ्यापासून कुठे तरी दूर.. तु तुला हवं ते कर.. मी नसेल तर मम्मा पण तुझी आणि फक्त तुझीच असेल.. मी नाही येणार परत तुम्हां दोघांच्या आयुष्यात.. तु आणि मम्मा खुश रहा.. मला काही नको.. जे आहे ते तुझंच आहे शौर्य आणि मला सुरुवातीपासूनच प्रॉपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे हे तुला पण चांगलंच माहिती.. आणि डोन्ट वरी मी जातो तुझ्या आयुष्यातून निघुन.. पण तु माझ्यामुळे अस स्वतःला त्रास नको करून घेऊस. 

शौर्य : विर आय एम सॉरी.. मला तु हवा आहेस यार.. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय.. मला नव्हतं कळत मी काय बोलतोय ते आणि अजुन पण नाही कळत मी कसा वागतोय ते. दोन दिवस मी पण नीट झोपलो नाही .. त्यादिवशी तुला मी फोन केलाना तेव्हा मला खरच तुझी आठवण येत होती रे.. खुप घाबरलेलो मी.. सगळं सोडुन मुंबईला यावं अस वाटत होतं.. पण तु काही ऐकुन न घेताच मला त्रास होईल अस बोललास. तु अस बोलत होतास ना.. ते ऐकुन मला खरच अस वाटत होतं तुला पण मी नकोय.. मी तुझं सगळं ऐकतो विर.. तुला पण वाटत ना मी USA ला जावं.. ठिक आहे मी जाईल.. तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे मी विर आणि मला जायच पण नाही..  तुझ्या प्रत्येक शब्दाची रिस्पेक्ट ठेवतो रे मी.. फक्त मला समजुन घे. बाकी मला काही नकोय.. तु बोललास तर मला खुप हर्ट होत.. म्हणजे ना सहनच नाही होत रे. माझं स्वतःवर कंट्रोल रहात नाही.. मी खरच वेडा होऊन जाईलरे. तुझ्यात मी माझी मम्मा आणि माझा बाबा बघतो यार..  तु मला सोडुन गेलास तर मी स्वतःला संपवुन टाकीन विर.. मी नाही जगु शकणार तुझ्याशिवाय..

विराज : ए शौर्य प्लिज.. शांत हो. तुला त्रास होतोय.. मी नाही जात तुला सोडुन कुठे.. ओके.. आय एम सॉरी..

(विराज शौर्यला मिठी मारतच बोलतो..)

शौर्य : विर तु नको ना सॉरी बोलुस मला.. मीच जास्त बोललो तुला.. पण मला कळत नव्हतं मी काय बोलतोय ते.. 

विराज : एक ऐकशील माझं.. प्लिज चल इथुन.. मला भीती वाटते तुला एकट इथे सोडायची.. तु डिप्रेशनमध्ये असू शकतोस अस मगाशी डॉक्टर बोलून गेले.. पण तुझ्याशी बोलून मला अस वाटतंय की तु खरच डिप्रेशन मध्ये जातोयस. मी नाही तुला अस बघु शकत.. मी हवं तर नाईटला ऑफिसला जातो.. पूर्ण दिवस तुझ्यासोबत थांबतो... तु बोलशील ते करतो. तुला मी लॅपटॉप घेतलेला नाही ना आवडत मग नाही घेत.. पण तु चल इथुन.. तो मुलगा काहीपण करेल रे तुला.. मला भीती वाटते शौर्य.. 

शौर्य : विर.. दीड महिना राहिलाय रे एक्सामला.. एक्साम देऊन येतो ना मी प्लिज.. विर.. प्लिज..  माझं इयर वेस्ट होतंय रे.. 

विराज : शौर्य तुला काही झालं तर मी पण नाही जगु शकणार यार.. तु का नाही समजत.. आत्ता दोन तासंपूर्वी तुला अस बेडवर पडलेलं बघुन माझी काय हालत झाली मी तुला नाही सांगु शकत. समजुन घे यार.. आणि इयर वेस्ट होतय तर होऊ दे.. मी तुला इथे नाही ठेवु शकत.. 

शौर्य : विर.. प्लिज.. सगळी माझ्या पुढे निघुन जातील रे.. आणि मी परत FYBCOM चा अभ्यास करत बसु.. प्लिज विर फक्त हा दीड महिना.. जसा लास्ट पेपर होईल ना तसा पेपर होताच मी मुंबईला तुझ्यासमोर हजर राहील.. प्लिज विर..

(विराज डोक्याला हात लावुन शांत बसुन विचार करू लागतो)

विराज : शौर्य I don't know पण का माहीत का मला पण अस आतुन फील होतय की मी तुला इथे ठेवुन खुप मोठी चुक करतोय.. पण तुला पुन्हा तुझं इयर वेस्ट गेलं त्याच टेन्शन येईल म्हणुन त्या एकाच कारणासाठी मी तुला इथे ठेवतोय... पण ह्यापुढे त्या मुलापासून लांब रहायच.. तो जे बोलतो ते ऐकायला तिथे थांबायचं नाही.. त्याच बोलणं आपल्यासाठी नाहीच हे समजुन तिथुन निघुन जायच.. ओके..? आणि जर त्याने जास्त त्रास दिला तर मला फोन कर.. मी तुझी एक्साम होईपर्यंत तुझ्यासोबत इथे येऊन राहील.. पण तु मारामारी करायची नाही..मुळात तु एकट रहायच नाहीस.. ओके.. आणि तुझ्या एक दोन मित्रांचे नंबर मला नंतर व्हाट्सएप करून ठेव.. तु असा फोन बंद करून ठेवतोस.. मग निदान नि त्यांना फोन करून विचारेल.

शौर्य : तु उगाच टेन्शन घेतोयस विर.. मला काही नाही होणार रे. 

विराज : काळजी वाटते रे तुझी.. तु नाही समजणार माझ्या फिलींग.. बाय दि वे तु का घाबरलेलास त्यादिवशी??

शौर्य : ते.. विर मला भुक लागलीय.. आपण जेवुन घेऊयात??

( टॉपिक चेंज करावा म्हणुन शौर्य बोलतो)

विराज : अरे हो मला पण भुक लागलीय मी इथेच जेवण मागवतो दोघांसाठी..

विराज दोघांसाठी रूमवरच जेवण मागवतो.. दोघेही जेवुन घेतात..

विराज : माझा भाऊ एवढं छान फुटबॉल खेळतो मला आजच कळलं.. 

शौर्य : थेंक्स.. ए विर सॉरी हा मला वाटलं की तो राज मस्ती करतोय. कारण तो कधी सिरियसली नसतोच ना.. नुसतं तुझ्या नाही तर त्या समीराच्या नावाने घाबरवत असतो.. मला वाटलं आज पण तेच करतोय तो म्हणुनच मी तुला ते भेटायला नाही आलो.. आणि तु तुझी ट्रिप सोडुन का आलास माझ्यासाठी..??

विराज : तुझा फोन लागतच नव्हता ना शौर्य.. त्यात तु अस रडत होतास फोन वर.. माझं नव्हतं लक्ष लागत ट्रिपमध्ये..आणि बर झालं ना मी आलो इथे.. मला मॅच बघायला भेटली तुझी.. बाय दि वे तुला बर वाटतंय आत्ता?.

शौर्य : हो.. मला काय झालंय?? 

विराज : तुला काय झालेलं हे मलाच माहिती.. जाऊ दे.. मी तिकीट बुक करतो.. 

शौर्य : तु चाललास पण.. उद्या जा ना.. तस पण सँडे आहे ना उद्या.

विराज : मम्मा एकटीच आहे ना घरी.. 

शौर्य : हम्मम.. आहे बरी ती...

विराज : शौर्य फोन करत जा रे तिला.. एक बीजीनेस संभाळने ते ही एक सिंगल लेडी ने इट्स नॉट जॉक.. S.S.ltd ही खुप मोठी कंपनी आहे मार्केटमध्ये.. टर्न ओव्हर बघ कंपणीचा जरा.. संपुर्ण कंपनी सांभाळणं, कंपनीच्या वेगवेगळ्या क्लाइन्ट सोबत असणाऱ्या मिटिंग, कंपनीच्या इतर ब्रांचेसमध्ये जाऊन व्हिसीटिंग करणं.. कंपनीत काम करणारे एम्प्लॉयीस त्यांचे पगार.. त्यांचे कंपनीकडुन असणारे एक्सेपटेशन.. मार्केट मध्ये वाढत असणारी कोंपिटीशन.. अजुन खुप काही आहे ह्यात.. हे सगळं ती एकटी सांभाळते. जेव्हा तु तिच्या जागी येऊन काम करशील ना तेव्हा कळेल तुला.. आणि त्यात तु नीट शिकुन तिच्या कामाचा अर्धा भार तरी स्वतःवर घ्यावा अस तिला वाटत. पण तुझ्या कम्प्लेन्टि ऐकायला मिळतात फक्त तिला.. ह्या सगळ्या कामाच्या व्यापात तुझं अस काही ऐकायला मिळाल की चिडचिड होते मग तिची.. थोडं तु पण समजून घे तिला.. 

शौर्य शांत राहुन विराजच बोलणं ऐकत असतो.. 

शौर्य : काळजी घे तिची.. मी रात्री करेल तिला फोन..

विराज : गुड बॉय.. निघुयात आपण..

शौर्य : तु नको विर दिल्लीला येत जाऊस.. मला खुप त्रास होतो तुला परत माझ्यापासुन लांब जाताना बघुन..

विराज : ए शौर्य थोडं स्ट्रॉंग हो.. आत्ता तु एवढं इमोशनल होतोस.. USA ला जाताना कस होईल तुझं..

शौर्य : तु खरच तुझ्यापासुन एवढ्या लांब पाठवणार मला..??

विराज : दिड महिना आहे अजून.. जास्त विचार नको करुस.. आणि मी जे सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या??? आणि अजुन एक.. कसलच टेन्शन घेऊ नकोस.. आणि माझ्यापासुन काहीही लपवु नकोस..

शौर्य : हम्मम.. 

शौर्य विराजला एअरपोर्ट वर सोडुन पुन्हा आपल्या हॉस्टेलवर यायला निघतो..

पण हॉस्टेलवर जाण्याआधी बेगेतुन फोन काढत स्विच ऑन करत तो समीराला फोन लावतो..

इथे समीरापण त्याच्याच फोनची वाट बघत असते..

समीरा : कुठेस शौर्य तु??

शौर्य : प्ले हाऊसजवळ वाट बघतोय तुझी.. लवकर ये..

शौर्य तिथेच उभं राहुन समीराची वाट बघु लागला..

शौर्य आलाय म्हटलं तस समीरा पळतच हॉस्टेलमधुन बाहेर पडत तडक प्ले हाऊसच्या दिशेने जात शौर्यच्या समोर जाऊन उभी रहाते..

शौर्य समोर आहे ह्यावर तिचा विश्वास बसत नव्हता..

शौर्य दोन्ही हात थोडे लांब करत तिला स्वतःजवळ यायला बोलतो.. तस ती पळतच त्याच्याजवळ जात एक घट्ट मिठी त्याला मारते..

समीरा : कधीपासून तुला फोन लावते मी शौर्य.. खुप घाबरून गेली.. मला वाटलं परत तु मुंबईला गेलास मला सोडून..

शौर्य : अस कस जाईल मी तुला सोडून.. आणि समीरा आय एम सॉरी.. (समीरा आपल्या मिठीतुन सोडवतच तो बोलला).. ते मगाशी मी तुझ्यावर थोड जास्तच ओरडलो.. मला राग कंट्रोल होत नव्हता ग.. तुला हर्ट झालं असेल ना मी अस तुझ्यावर भडकलो ते..

समीरा : मला नाही काही वाटलं शौर्य आणि नको ना तो विषय.. विर गेला मुंबईला??

शौर्य : हम्म.. 

समीरा : ओरडला का तुला??

शौर्य : भाऊ आहे ग.. जेवढं ओरडतो त्याच्या दुप्पट प्रेम करतो तो.. ऐकना एक बोलायच होतं तुझ्याशी बोलु..??

समीरा : बोल ना.. 

शौर्य : मला ना इथे नाही रहावस वाटत आहे ग.. मला मुंबईला जावस वाटत.. तु येशील माझ्यासोबत मुंबईला..

समीरा शौर्यकडे बघतच रहाते..

समीरा : मला मुंबईला नाही आवडत शौर्य..

शौर्य : माझ्यासाठी.. प्लिज..

शौर्य समीराच्या डोळ्यांत बघत रहातो.. आणि समीरा त्याच्या डोळ्यांत..

समीरा शौर्यच्या गालावर प्रेमाने हात फिरवतच मानेने हो बोलते त्याला.. 

थेंक्स समीरा.. अँड आय लव्ह यु समीरा सो मच.. शौर्य घट्ट मिठी मारतच तिला बोलतो..

समीरा : आज आपण कुठे तरी जाणार होतो शौर्य..

शौर्य : ओहह हा.. मी विसरलोच... उद्या सँडे.. आपण उद्या जाऊयात.. पूर्ण दिवस फक्त तु आणि मी..

समीरा : पक्का??

शौर्य : एकदम पक्का...

तोच शौर्यला राजचा फोन येतो.. 

शौर्य : हे लोक आपल्याला भेटायलाच नाही देत.. राज चा फोन आहे..

समीरा : अस नको ना बोलुस.. तु विरसोबत गेल्यापासून आम्ही सगळेच तुला फोन लावत होतो.. काळजी करत होते ती लोक पण.. उचलुन सांग त्यांना आहेस ठिक म्हणुन..

राज : ए शौर्य आहेस कुठे??

शौर्य : प्ले हाउसमध्ये..

राज : काय??

शौर्य : अरे जस्ट प्ले हाऊसमध्ये आलोय..

वृषभ : आम्ही पण आलो तिथेच.. 

शौर्य : नाही..नको.. म्हणजे मी रूमवर येतोच आहे.. 

टॉनी : बर ये लवकर आम्ही वाट बघतोय..

शौर्य : हा... बाय..

शौर्य फोन कट करतच खिश्यात ठेवुन देतो..

समीरा : उद्या जायच कुठे..??

शौर्य : बघतो थोडं गुगल करून काही छान आहे का फिरायला ह्या दिल्लीत.. तुला रात्री कॉल करून मी डिटेल सांगतो.. चालेल?? 

समीरा : हम्म चालेल..

शौर्य : ती लोक खाली यायच्या आत मी जाऊ रूमवर..

समीरा : हम्मम बाय...

समीरा तिथुन जाऊ लागली..

तस शौर्य तिचा हात पकडत तिला थांबवतो.. एक बोट आपल्या गालावर दाखवत.. उजवा डोळा मिटतच तिला इशारा करू लागतो..

समीरा पण त्याच्याजवळ येते.. हलकेच ओठ त्याच्या गालावर टेकवत तिथुन पळून जाते..

बाय... लव्ह यु.. उद्या भेटु.. लांबुनच मोठ्याने ओरडत ती तिथुन त्याला मागे बघत बाय करतच जाऊ लागली.. शौर्य ती दिसेनाशी होईपर्यंत तिथेच उभं राहुन तिला बघत रहतो... आपल्या केसांवरून हात फिरवत प्ले हाउसच्या पायरीवर ठेवलेली आपली बेग खांद्याला लावत रूममध्ये येतो.. रूममध्ये आल्या आल्या मिररमध्ये आपल्या गालावर काही लागल का बघतो.. 

थोड्याच वेळात त्याच्या रूममध्ये मित्र मंडळीपण येतात..

राज आल्या आल्या शौर्यच्या गालावर काही दिसत का ते बघतो..

शौर्य : ए राज.. अस काय बघतोय??

राज : कुठे कुठे मार खाऊन आलायस ते बघतो..

शौर्य : वेडा आहेस का तु?? सोड बघु..

(शौर्य राजला लांब ढकलतच बोलला)

वृषभ : नाही मारलं ना??

शौर्य : वृषभ तु पण?? तुम्हा लोकांना झालं काय आहे??

टॉनी : एवढ्या रागात नेलं. आम्हाला वाटलं तुला दिल्या असतील एक दोन लावून.. जस समीराच्या भावाच्या लग्नात दिलेली तशी.. 

शौर्य : तुम्ही लोक त्याचीच वाट बघत होतात वाटत.. 

राज : हात लागतो कारे त्याचा..??

शौर्य : नेक्स्ट टाईम विर येणार असेल ना तर तुला आधी सांगेल मी.. तैयार होऊन बस..

राज : कश्यासाठी..??

शौर्य : एक दोन द्यायला सांगतो तुला... मग कळेल हात लागतो का नाही ते..

राज : नाही नको.. ते मी तुला डेमो देताना बघितलंय.. अजुन एक दोन डेमो तुला देताना बघायला आवडेल मला..

(टॉनीला टाळी देतच बोलला)

शौर्य : राज.. कधी तरी चांगलं बोल यार माझ्याबद्दल..

वृषभ : तुझा भाऊ गेला का मुंबईला??

शौर्य : हम्म..

वृषभ : भडकलेला ना खुप..

शौर्य : हम्म..

टॉनी : जेवलास दुपारी??

शौर्य : हम्मम..

शौर्य बेडवर डोकं धरून बसतो..

वृषभ : काय झालं?? 

शौर्य : काही नाही रे..थोडं डोकं दुखतंय..

राज : OMG.. तुला डोकं आहे??

(शौर्य ने हसावं किंवा मस्तीत पुन्हा काही तरी बोलावं ह्या उद्देशाने राज बोलतो.. पण शौर्य त्याच्याकडे बघतो..)

शौर्य : राज.. तुला मिस करेल रे मी खुप..

राज : म्हणजे?? तु कुठे चाललास??

वृषभ : ए शौर्य सगळं ठिक आहे ना??

शौर्य : डोकं खुप दुखतंय.. थोडं झोपल्यावर बर वाटेल मला.. मी झोपु का??

तिघेही एकमेकांकडे बघत बसतात..

वृषभ : बर तु झोप आम्ही नंतर येतो..

इथे समीरा उशीवर तोंड ठेवत कसल्यातरी विचारात हरवुन जाते...

सीमा : काय झालं?? मगासपासून बघतेय तुला.. एवढा कसला विचार करतेयस..??

समीरा : मुंबईला जायचा??

काय?? अस सीमा स्वतःच्या बेडवरची उठुन समीराच्या बेडवर जाऊन बसते..

समीरा : मी आणि शौर्य एक्साम झाल्यावर मुंबईला जायच विचार करतोय.. म्हणजे मुंबईतल्या कॉलेजमध्ये शिकूयात अस शौर्यच म्हणणं आहे..

सीमा : आणि तुझ??

समीरा : त्याला नाही बोलायला मला नाही जमलं..

सीमा : समीरा तु खरच जाणार मुंबईत??

समीरा : मला नाही कळत.. पण जर मी शौर्यला आत्ता नाही बोलली असती तर त्याला वाईट वाटलं असत.. मे बी एकदा समजवुन बघते त्याला.. मला मुंबई नको वाटत ग.. 

सीमा : पण शौर्यला अचानक काय झालं?? 

समीरा : ते तर मला उद्या त्याच्याशी नीट बोलल्यावर कळेल.. त्याला काय प्रॉब्लेम आहे इथे दिल्लीत रहायला.. तस पण उद्या आम्ही दोघे फिरायला जातोय..

सीमा : ओहह हो.. (सीमा समीराला चिडवतच बोलली) कुठे चाललात मग??

समीरा : प्लेस अजुन ठरायच बाकी आहे.. पण मी खुप एक्साईट आहे उद्यासाठी...

(कशी असेल दोघांची डेट.. त्यासाठी भेटूया पुढील भागात आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा?)

क्रमशः

©भावना विनेश भुतल