अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 52

In marathi

राज : आज शौर्य नॉर्मल वाटला का तुम्हांला??

वृषभ : नाहीना..

टॉनी : मला पण नाही..

वृषभ : अस का बोलला असेल तो राजला "मिस करेल तुला.. "

राज : तु विचारून बघ ना त्याला.. तस पण तुला तो सगळ्या गोष्टी सांगतो ना..

टॉनी : मला अस वाटत की तु आत्ताच जाऊन त्याला विचार.. जास्त स्ट्रेसमध्ये वाटत होता तो..

वृषभ : झोपला असेल तर??

टॉनी : उठव आणि विचार.. त्यात काय एवढं??

वृषभ शौर्यच्या रूममध्ये येतो.. शौर्य लॅपटॉपमध्ये काही तरी करत असतो.. शौर्य वृषभच्या दिशेने पाठ करून समोर लॅपटॉप घेऊन बसलेला असल्याने त्याला तो लॅपटॉप मध्ये काय करतो हे दिसत नव्हतं.. पण त्याला त्याला अस लॅपटॉप मध्ये घुसलेल बघुन वृषभला खुप राग येतो.. तो काहीही न विचार करता रागातच शौर्यजवळ जातो..

वृषभ : शौर्य तु सरळ सांगितलं असतस तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा तरी आम्ही गेलो असतो यार.. अस खोटं का सांगितलंस डोकं दुखतंय म्हणुन..

हॅलो वृषभ बेटा.. How are you..??

वृषभच लक्ष शौर्यच्या लॅपटॉपमध्ये जात.. शौर्य त्याच्या मम्मासोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असतो..

वृषभ : आय एम गुड आंटी.. तुम्ही कश्या आहात..??

मम्मा : मी पण मस्त.. अभ्यास कसा चाललाय तुम्हा सगळ्यांचा..

वृषभ : छान.. सॉरी मला माहित नव्हतं तुम्ही दोघ बोलत होते ते.. बाय आंटी... नंतर बोलूयात.. 

(शौर्य नंतर माझ्या रूमवर ये.. शौर्यला हळुच बोलत वृषभ तिथुन निघुन आपल्या रूममध्ये येतो..)

इथे शौर्य त्याच्या मम्माकडे एकटक बघत रहातो..

मम्मा : शरु काय होतंय तुला.. शांत शांत का आहेस??

शौर्य : मम्मा मी खुप त्रास देतो ना तुला??

मम्मा : खुप नाही पण देतोस.. तु ना तुझ्या बाबावर गेलायस शरु.. तो सुद्धा त्याच्या कॉलेज लाईफमध्ये असाच असायचा.. तुझं दिसणं, तुझं वागणं.. तुझा स्वभाव.. सगळ्यातच मला शेखर आत्ता दिसतो.. तुला सांगु एखादं दिवस असा जायांचा की शेखरने कॉलेजमध्ये काही गोंधळ घातला नाही.. तु पण सेम तुझ्या बाबाची कार्बन कॉपी आहेस.. 

त्याची मम्मा अस बोलताच शौर्यच्या चेहऱ्यावर हलकेच अस हसु येत..

शौर्य : मम्मा बाबा का लवकर गेला आपल्याला सोडुन??

मम्मा : काहींची उत्तर आपल्याकडे नसतात ना शरू.. 

शौर्य : मम्मा जर बाबा असता तर मला विर भेटला असता का.??

मम्मा : ह्याच उत्तर तुला पण माहीत असेल ना... आणि कस असताना एक गोष्ट आपल्याकडून दूर गेली तर दुसरी त्याहुन सुंदर गोष्ट देव आपल्याला आपल्या नकळत देऊन जातो.. पण आपण काय करतो माहिती.. जी गोष्ट आपल्या पासुन दूर गेली तीच्या विषयी दुःख करण्यात आपलं आयुष्य घालवतो आणि आपण नवीन मिळालेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.. त्यामुळे नकळत का होईना नवीन मिळालेली गोष्ट पण आपल्यापासून दूर जावु लागते..

शौर्य : हम्मम..यु नो व्हॉट मम्मा.. विरच्या डॅडसोबत लग्न करून तु करेक्ट डिसीजन घेतलंस.  नाही तर आपल्याला विर भेटलाच नसताना.. डॅड असता तर तो विर सारखाच असता.. मी ठरवलंय मम्मा.. त्याला आणि तुला त्रास होईल अस नाही वागायचं आत्ता.. म्हणजे तस मी ठरवुन त्रास नाही देत पण... कधी कधी चुकतो मी..

मम्मा : आज तु वेगळाच वाटतोयस मला.. काही टेन्शन आहे का?? एक्सामच टेन्शन आहे का???

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

शौर्य : तु बिजी असशील ना.. तुला वेळ मिळाला की मला फोन करत जा..  मी वाट बघत असतो तुझ्या फोनची.. आणि विरला सांग त्याला विचारत होतो..

मम्मा : हम्मम.. बाय.. लव्ह यु.. आणि मिस यु..

शौर्य : मिस यु 2 मम्मा.. आणि लव्ह यु सो मच मम्मा.

शौर्य त्याच्या मम्माला बाय करतच फोन ठेवुन देतो.. मम्माशी बोलून त्याला खरच बर वाटत होतं.. 

लॅपटॉप ठेवत तो वृषभ का आलेला हे बघायला वृषभच्या रूममध्ये जातो..

वृषभ : तुझीच वाट बघत होतो.. बस बघु इथे आणि काय झालं सांग..

शौर्य : ते... मी.. काही तरी डिसीजन घेतलंय..

वृषभ : काय??

शौर्य : म्हणजे लास्ट पेपर होताच मी मुंबईला जातोय..

वृषभ : त्यात काय एवढं.. मी पण जातोय माझ्या घरी.. आणि तसही इथे कोणीच नसणार.. डायरेक्ट कॉलेज चालु झाल्यावर... ए शौर्य पण लगेच नकोना जाऊस.. आपण एक दोन विक मस्त एन्जॉय करू आणि मग जाऊयात घरी..

शौर्य : वृषभ मी परत न येण्यासाठी जातोय रे.. म्हणजे मी मुंबईतच एडमिशन घेईल.. माझं ते पण कन्फर्म नाही.. USA पण जाईल..

वृषभ : काय?? 

शौर्य : म्हणजे तुम्हा लोकांची आठवण आली की येत जाईल भेटायला.. 

वृषभ : प्लिज स्टॉप किडींग मी शौर्य..

शौर्य : नो वृषभ आय एम सिरीयस.. 

वृषभ : तु रोहनमुळे आम्हां सगळ्यांनाच शिक्षा देतोय यार.. इथे आम्हां सगळ्यांना सवय झाली रे तुझी.. आम्ही आमच्या रूममध्ये कमी पण तुझ्या रूममध्येचजास्त असतो.. त्यात आपली रात्रभर चालु असलेली मस्ती.. मूव्ही टाईम.. एकमेकांना त्रास देन.. प्लिज शौर्य नको ना जाऊस यार.. नाही जमणार तुझ्याशिवाय इथे रहायला..

शौर्य : मला पण सवय झालीय रे तुम्हां लोकांची.. पण मी नव्हतो तेव्हा तुम्ही रहायचे ना.. थोडे दिवस त्रास होईल मग होऊन जाईल सवय.. आणि जास्त आठवण आली की एक फोन केलात दुसऱ्या क्षणाला हजर राहील इथे मी तुमच्यासाठी.. एवढं पण मुंबईपासून काही लांब नाही रे दिल्ली..

वृषभ : तु माझी समजुत काढतोयस का स्वतःची..

शौर्य : दोघांचीपण.. 

वृषभ : रोहनने हर्ट केलय ना खुप.. त्यामुळे अस बोलतोया ना.

शौर्य : हर्ट करण्यापेक्षा ना घाबरवलय रे खुप त्याने.. अंधार आणि शांतता दोन्ही एकत्र सहन नाही होत मला.. आणि स्वतःच अस्तित्व जाणवु न देणाऱ्या अंधाराला तर खुप घाबरतो मी.. अगदी लहानपणापासुनच.. तरी मी त्याला माफ केल.. आणि तो फैयाज पण येतोय मंडे पासुन त्रास द्यायला.. त्यात रोहन ने त्याला तर सगळंच सांगुन टाकलय म्हटलं तर रोजच त्याच्या तोंडुन माझ्यासाठी एक एक नवीन शब्द ऐकायला मिळतील.. त्या रोहनला तर मी कधी माफ नाही करणार वृषभ..

वृषभ : अस नको ना करुस.. एक शेवटची संधी दे ना त्याला.. परत नाही होणार तो अस..

शौर्य : सोड तो रोहन टॉपिक आणि मी काय बोलतो ते ऐक.. मला तुझी हेल्प हवीय..

वृषभ : बोलणं काय करू??

शौर्य : ते मी उद्या समीराला डेटला घेऊन जातोय. पण कळत नाही कुठे घेऊन जाऊ.. म्हणजे मुंबईला असतो ना तर मस्त पैकी बाईकवरून लॉंग ड्राईव्ह ला गेलो असतो तिला घेऊन.. इथे तर बाईक पण नाही माझी.. आणि मुळात इकडच काहीच नाही माहीतरे.. 

वृषभ : फिरण्यासारखं तर खुप आहे इथे.. 

वृषभ एका एका छान छान जागेबद्दल त्याला सांगू लागला..

शौर्य : आणि अजुन एक.. प्लिज राज आणि टॉनीला सांग मला लास्ट टाईम सारख त्रास देऊन इरिटेट नको करायला..

वृषभ : ते माझं ऐकतात अस तुला वाटत.. त्या पेक्षा उद्यासाठी दोघांचा नंबर ब्लॉकवर टाक..

शौर्य : गुड आयडिया यार.

शौर्यची डेट खुप छान व्हावी ह्यासाठी वृषभ शौर्यला एक एक आयडिया देत होता..

शौर्य : तुला मी आत्तापर्यंत कधी विचारलं नाही.. पण तु ज्या प्रकारे मला एक एक आयडिया देतोयस त्यावरून मला अस कन्फर्म वाटत की तुला गर्लफ्रेंड असेलच.. 

वृषभ : नाही रे बाबा.. अस असत तर तुला खरच सांगितलं असत.. मुव्ही वैगेरे मध्ये दाखवतात ना.. त्यावरून तुला सांगतोय रे मी..

शौर्य : तु कधी कुणाच्या प्रेमात पडलासच नाही काय..??

वृषभ : प्रेमात तर रोज पडतो यार.. म्हणजे कोणी नवीन दिसली की आवडते.. पण अशी मनापासून आवडणारी कोणी भेटलीच नाही ना.. आणि नाही भेटली तेच बर..तुझ्या एवढी पॉकेटमनी नाही रे बाबा माझी.. आत्ता तुलाच बघ उद्या किती खर्च येतोय ते.. त्यापेक्षा सिंगल लाईफ बरी.. सगळा खर्च आपल्यावर.. आणि त्यात टेन्शन पण नाही.. ती सोडून जाण्याच..

शौर्य : तरी किती खर्च येईल रे मला उद्या??

वृषभ : पंधरा हजार आरामात लागतील..

शौर्य : एवढे??? 

(वृषभ अस बोलताच शौर्य विचार करु लागतो..)

वृषभ : एवढं टेन्शन काय घ्यायच त्यात?? 

शौर्य : क्रेडिट कार्ड मम्माने काढुन घेतलंय रे.. विर ने डेबिट कार्ड दिलंय.. त्यात किती केश आहेत काय माहिती..?

वृषभ : त्याच्याकडुन मागुन घे ना..

शौर्य : आणि काय सांगु त्याला मी समीराला घेऊन डेट वर जातोय..

वृषभ : मग काय झालं??

शौर्य : पागल आहे का तु.. भावाला अस कस सांगु यार??

वृषभ : तस पण काय लपवतोस त्याच्यापासुन??

शौर्य : ते पण आहेच म्हणा.. 

वृषभ : एक विचारू का? खर सांगायच??

शौर्य : मी खोट बोलतच नाही..

वृषभ : तुला खरच समीरा आवडते ना?? म्हणजे फ्युचर पण तिच्यासोबतच बघतोस का?? आय मिन नवरा बायको..

शौर्य : ऑफ कोर्स येस.. 

इथे सीमा पण समीराला सेम प्रश्न विचारते.. आणि तिच्याकडुन येणाऱ्या उत्तराची ती वाट बघत तिच्याकडे बघत रहाते..

समीरा : मला नाही माहीत... म्हणेज जर घरच्यांचा होकार असेल तरच मी पुढे जाईल.

सीमा : आली मोठी घरच्यांचा होकार असेल तर.. आणि जर नाही बोलले घरचे तर??

समीरा : मग बघु.. काही दुसरा मार्ग निघतोय का?? 

सीमा : आणि जर समज तुला नंतर अस कळलं कि शौर्य अजुन दुसऱ्या कोणाच्या प्रेमात आहे तर??

समीरा : गप्प ग.. काहीही नको ना बोलुस.. 

सीमा : जर कळलं तर बोलतेय ग मी..

समीरा : तुला माहिती ना मी कळलेल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत.. जे डोळ्यांनी दिसत त्यावर विश्वास ठेवते.. आणि शौर्य कसा आहे हे मला चांगलं माहिती.. देव न करो पण अस कधी झालं.. माझ्या नजरेसमोर तो दुसऱ्या मुलीसोबत चिट करत असेल तर मे बी तो लास्ट दिवस असेल आमच्या रिलेशनशिपचा..

सीमा : बट मला पण अस वाटत की शौर्य इतर मुलांसारखा नाही..

समीरा : मग.. माझी चॉईज चांगलीच असते.. आणि शौर्य शिवाय नाही जमणार मला रहायला.. 

इथे शौर्य रात्री विरला फोन लावतो..

विराज : तुला मी फोन लावणारच होतो आत्ता..

शौर्य : ग्रेट.. मग मी बरोबर टायमिंगवर फोन लावला ना..

विराज : हम्मम.. जेवलास??

शौर्य : हम्ममम तु..??

विराज : थोड्या वेळाने जेवेल.. तुझी तब्येत कशी आहे??

शौर्य : तब्येत सोड.. माझं तुझ्याकडे काम आहे...

विराज : माझ्याकडे काय काम काढलस??

शौर्य : मला पैसे हवेत..

विराज : डेबिटकार्ड मध्ये आहेत ना.. पिन तर मी तुला त्यादिवशीच व्हाट्सए केलाय..

शौर्य : किती आहे त्यात??

विराज : असतीलरे.. 4 ते 5 लाख.. तुला किती हवेत??

शौर्य : जास्त नाही फक्त दहा पंधरा हजार

विराज : एवढे काय करणार तु..??

शौर्य : ते.. मी.. आणि समीरा उद्या बाहेर जातोय.. 

विराज : ओहह.. मग ठिक आहे.. एन्जॉय.. 

शौर्य : विर मग ते उद्या.. म्हणजे... तु ते 9 वाजता.. फोन

विराज : कळत मला..  पण जास्त लेट नको करूस.. ओके?? उद्या नाही करत तुला मी फोन.. तुला बोलावस वाटल की तूच कर फोन..

शौर्य : थेंक्स विर..

विराज : आणि तुला पण थेंक्स.. मम्माला फोन केलास त्याबाबद्दल.. असच थोडं शहाण्या सारख वाग.. मला बर वाटत..

शौर्य : हम्मम्म..

विराजशी बोलुन होताच शौर्य समीरला फोन करतो..

समीरा : तुझ्याच फोनची वाट बघत होती.. किती वेळ लावलास फोन करायला..

शौर्य : उद्याच्या प्लॅन बद्दलच थोडं विचार करत होतो ग.. 

समीरा : काही ठरलं का कुठे जायच ते..??

शौर्य : येस.. बट मला अस वाटत ना.. आपण जास्त लांब नको जायला..

समीरा : मला ही तेच वाटत पण जायच कुठे??

(शौर्य समीराला त्याने प्लॅन केलेल्या ठिकाणाबद्दल सांगतो..)

शौर्य : तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण रात्री डिनर करूनच येऊ..

समीरा : तु सोबत असताना मला काय प्रॉब्लेम असणार.. मला चालेल..

शौर्य : ग्रेट.. मग डन.. तु उद्या ईव्हीनिगला ४ वाजता छान अशी तैयार होऊन हॉस्टेलजवळ ये.. मी तिथेच भेटेल तुला..

समीरा : शौर्य.. मला तर अस वाटतंय कधी ही रात्र संपतेय आणि कधी  उद्याच्या दिवसाची सकाळ अशी वाऱ्यासारखी पटकन उडुन जात संध्याकाळ होतेय... आणि मी तुला भेटते..

शौर्य : माझ्या पण फिलींग अश्याच काहीश्या आहेत...

समीरा : ऐकणं, तु उद्या मी तुला दिलेला शर्ट घालुन येशील..?? प्लिज.. 

शौर्य : तस पण मी उद्या तु दिलेलाच शर्ट घालणार होतो… 

समीरा : सिरीयसली..?

शौर्य : हम्मम्म..म्हणजे तुझ्या फिलींगस समजायला लागलोय मी.. 

समीरा : खरच?? मग सांग बघु आत्ता मी काय विचार करतेय..

शौर्य : विचार करत असशील अस बोलण्यापेक्षा थोडं टेन्शनमध्ये असशील उद्याच्या डेटला धरुन अस बोललीस तरी चालेल

समीरा : कस ओळखु शकतोस शौर्य तु..

शौर्य : बोललो ना तुला.. तुझ्या फिलींग ओळखु लागलोय.. थोड्या थोड्या.. भेटूया उद्या..

समीरा : हम्म बाय..

शौर्य : बाय लव्ह यु.. टेक केअर..

समीरा : हम्मम.. लव्ह यू 2.. बाय.. आणि गुड नाईट..

शौर्य फोन कट करतच मागे वळतो... तस राज आणि टॉनी जोरातच भो... करून त्याच्या अंगावर ओरडतात..

अचानकच असे मागे आल्यामुळे शौर्य घाबरतो.. त्याचा फोनच त्याच्या हातातुन खाली पडणार असतो.. पण तो कस बस सावरत कॅच पकडतो...

शौर्य : हे काय आहे यार.. घाबरलो मी..

राज : तुला हसवण्यासाठी थोडी ना आम्ही अस भो... केलं.. तु घाबरावा म्हणुनच तर केलंल...

(राज आणि टॉनी एकमेकांना टाळी देतच बोलले)

वृषभ : काय यार शौर्य तु पण.. मला वाटलं तु नाही घाबरणार.. 100 रूपीस ची पैज लावलेली मी तुझ्यावर.. पण तु घाबरा निघालास यार..

राज : ए वृषभ आत्ता रडायच नाही. चल काढ 100 रूपीस.. 

वृषभ : देतो ना.. पळुन थोडी ना जातोय..

(खिश्यातुन 100 रूपीस काढतच तो बोलला)

दे ते पैसे इथे.. अस बोलत शौर्य मोबाईल बेडवर ठेवत वृषभच्या हातातुन 100 रूपीसची नॉट खेचून घेतो.. 

राज : ए शौर्य पैसे दे हा आमचे.. तु घाबरावा म्हणुन मेहनत घेतलीय यार आम्ही.. अस कस तु आमच्या मेहनतीचे पैसे घेऊ शकतोस..

शौर्य : जसे तुम्ही वृषभ कडुन घेणार होतात तसे..

राज : तुला पचणार नाहीत बघ तु..

शौर्य : नको पचू दे... तस पण मी पैसे खात नाही.. 

(नोट खिश्यात ठेवतच तो बोलला)

टॉनी : शौर्य आम्ही लास्ट बोलतोय आमचे पैसे दे हा.. नाही तर..

शौर्य : नाही तर काय रे...हा काय करशील..

(शौर्य मस्तीतच हातावरील शर्ट वर करतच त्यांना घाबरवत बोलला)

टॉनी : बघ मी लास्ट सांगतोय शौर्य..

शौर्य : नाही देणार..

तु बघच आत्ता.. अस बोलत टॉनी राजला काही तरी इशारा करत गेलरीत जाऊ लागला.. शौर्य त्याच्याकडे बघतच राहिला..

वृषभ : जीव वैगेरे देतो का काय गेलरीत जाऊन.. 

टॉनी : शौर्यकडून 100 रुपये घ्यायला चाललोय..

वृषभ : अस गेलरीत?? तो इथे आणि तु गेलरीत जाऊन कसले 100 रूपीस घेतोस.. तुला मी वेडा दिसतोय का?? आणि विसर आत्ता 100 रुपये..

टॉनी : आणि घेऊन दाखवले तर.. लावतोस परत पैज 100 रूपीसची??

वृषभ शौर्यकडे बघतो..

शौर्य : तु माझ्याकडे काय बघतोस..

वृषभ : तु ह्यांना त्यांचे घेतलेले 100 रूपीस देणार का परत??

शौर्य : अजिबात नाही..

वृषभ : ए टॉनी चल लावतो 100 रूपीसची.. घेऊन दाखवच तु..

टॉनी : ए शौर्य जस्ट लुक एट हियर.. राज आर यु रेडी.

राज : येस..ड्युड.. आय एम..

शौर्य आणि वृषभ दोघांच काय चाललंय ते बघत असतात..

टॉनी गेलेरीच्या दिशेने जातच जोरात ओरडतो..

टॉनी : राज लेट्स सेट गो.. उचल ह्याचा फोन..

शौर्य धावतच आपला बेडवरचा फोन उचलायला जातो.. पण त्याच्या आधी राजच बेडवर पडलेला शौर्यचा फोन उचलतो..

राज : काय बोलतोस टॉनी... हा मोबाईल विकुन 100 पेक्षा तरी जास्त मिळतील ना..

टॉनी : आय फोन आहे यार.. तीस चाळीस हजार तर सहज मिळतील.. काय शौर्य बरोबर ना.

शौर्य : 100 रूपीससाठी तुम्ही माझा फोन विकणार.. किती चिप आहे यार तुम्ही.. हे घे तुझे 100 रूपीस.. आणि फोन दे इथे..

वृषभ : ए शौर्य पागल झालायस का.. तु मला बोललास की त्यांना पैसे नाही देणार म्हणुन..

(शौर्यचा हात पकडतच वृषभ बोलतो)

शौर्य : आता मी माईंड चेंज करतोय.. तुझ्या 100 रूपीस पेक्षा मला माझा मोबाईल महत्वाचा आहे..

वृषभ : आजीबात नाही हा.. आणि ते लोक नाही रे विकणार.. घाबरवतायत तुला?? आपण दरवाजाच लावुन घेऊयात..

राज :  टॉनी काय बोलतोस काय करूयात..

टॉनी : तु इथे दे फोन जरा.. 

टॉनी अस बोलताच राज त्याच्याकडे फोन फेकतो.. टॉनी हातात फोन झेलतो..

टॉनी : राज मी आत्ता माईंड चेंज केलय.. मी काय बोलतो.. फोन विकण्यापेक्षा आपण ह्याची आणि समीराची चॅटिंग वाचुयात.. तस पण शौर्यचा फोन बघ अनलॉक आहे..

राज : क्या दिमाग बॉस.. वाच बघु..

टॉनी : सुरुवातीपासुन वाचतो.. थांब.. 

शौर्य : ए टॉनी नाही हा.. आण बघु फोन इथे.. हे धर तुमचे शंभर रुपये.. जुगारी कुठले..

(खिश्यातुन शंभर रुपये काढत राजच्या हातात देतच शौर्य बोलला)

राज : ए टॉनी हा जुगारी बोलला आपल्याला..

टॉनी : बोलू दे यार.. ए वृषभ 100 रुपये दे चल..

वृषभ : शौर्य.. धोकेबाज निघालास यार..

(पॉकेटमधुन शंभर रुपये काढत टॉनीला देत रागातच शौर्यला बोलला)

शौर्य : सॉरी यार..

वृषभ : तु मोबाईल लॉक करून का नाही ठेवत.. जर लॉक करून ठेवला असतास तर निदान माझे 100 रूपीस तरी वाचले असते.. ह्या पुढे लॉक करून ठेवत जा..

शौर्य : मला नाही आवडत.. 

टॉनी : चलो आईस्क्रीम पार्टी करूयात..

वृषभ : एवढ्या थंडीत.. तूच खा...

राज : थंडीत आईस्क्रीम खाने की बात ही कुछ और हे.. चल ना.

शौर्य : ए वृषभ चल ना.. खुप दिवस मी पण नाही खाल्ली..

वृषभ : उद्या खाशीलच ना.. समीरासोबत..

राज : ओहह हो.. उद्या कुठे बाहेर फिरायला चाललास??

शौर्य : येस.. 

टॉनी : एन्जॉय.. युअर डे.. तसही आम्ही आत्ता तुला त्रास न देण्याचा निर्णय घेतलाय..

शौर्य : प्लिज मला काही तरी पटेल अस बोलत जा यार.

राज : खरच रे.. पण मला काही डाउट असतील ना तर करेल मी फोन.. म्हणजे उद्या मी मेथ्सचा अभ्यास करायचा ठरवलंय..

शौर्य : बस काय राज.. तु फक्त फोन करच.. एका रिंगमध्ये तुझा फोन उचलतो.. आणि तुला असलेले सगळे डाऊट पण क्लीअर करतो.. आत्ता आपण जाऊयात आईस्क्रीम खायला..

टॉनी : वृषभ चलना.. तसे पण तुझेच पैसे आहेत..

राज : हो ना. नाही तर श्राप देशील उगाच तुला सोडून तुझ्याच पैस्याने आईस्क्रीम खाल्ली म्हणुन.. आणि आम्हाला सर्दी व्हायची..

वृषभ : काहीही काय बोलताय यार.. चला जाऊयात..

सगळे नेहमीप्रमाणे हॉस्टेलच्या गेटवरून उड्या मारतच बाहेर पडले.. आणि आईस्क्रीम खायला गेले.. 

आईस्क्रीम पार्लर मध्ये पण मज्जा मस्ती चालु होती..मज्जा मस्ती करतच सगळे आईस्क्रीम खाऊ लागले.. शौर्य सगळे क्षण मोबाईलमध्ये टिपण्यात व्यस्त असतो...

वृषभ : ए शौर्य ठेव की तो फोन.. आईस्क्रिम मेल्ट होतेय रे तुझी..

शौर्य : होऊ दे रे... मिस करेल रे हे दिवस मी.. निदान फोटो तरी बघत राहील.. तुमची आठवण आली तर..

टॉनी : ए शौर्य नको ना जाऊस यार.. 

राज : आम्ही पण खुप त्रास देतो ना तुला.. म्हणुन जातोस ना..

शौर्य : ए राज काहीही काय.. मला नाही झाला कधी त्रास तुमचा.. उलट मी एन्जॉय केलं खुप.. आणि अस इमोशनल बोलुन आयस्क्रिमची मज्जा नका ना घालवू.. चला एक स्माईल द्या बघु आत्ता.. (शौर्य आपल्या पुढे मोबाईल धरतच बोलला)

शौर्य आपला मोबाईल पुढे धरताच सगळेच वेगवेगळ्या पॉजमध्ये सेल्फी घेऊ लागले.. आणि आयस्क्रिमची मज्जा घेऊ लागले..

इथे समीरा उद्याची तैयारी करण्यात गुंतून गेलेली असते..

समीरा : सीमा ठेव ना ग तो फोन.. आणि मला सांग ना ना कोणता ड्रेस घालु..

सीमा : समीरा जवळपास गेल्या दोन तासांपासून तु माझं डोकं खातेयस हा.. आत्ता बस.. मी शौर्यलाच व्हिडीओ कॉल लावते तोच सांगेल तुला कोणता ड्रेस छान दिसतो ते.. 

समीरा : काय ग तु पण.. जाऊ दे नको सांगुस.. पण शौर्यला फोन वैगेरे नाही हा करायचास तु.. माझं मीच बघते..

सीमा : नक्की??

समीरा : हो नक्की..

(समीरा थोडा नकट्या रागातच सीमाला बोलते)

रात्रभर ती उद्याच्या दिवसाची स्वप्न रंगवत असते..

★★★★★

अश्यातच दुसरा दिवस उजाडतो.. आणि बोलता बोलता चारही वाजतात.. 

शौर्य ठरल्याप्रमाणे गेटजवळच समीराची वाट बघत असतो.. त्याने दोघांसाठी बुक केलेली कार पण दोघांना त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी घेऊन जायला सज्ज असते.. ही समीरा राहिली कुठे?? शौर्य स्वतःच्याच मनाला प्रश्न करू लागला.. तोच समीरा लांबुनच येताना त्याला दिसते.. तस त्याच्या हृदयाची धडधड अगदी वेगाने होऊ लागते.. एखाद्या अप्सरेपेक्षा ही खुप सुंदर अशी ती दिसत असते.. सिंपल पण तिला साजेल अशी तिने तिच्या केसांची केलेली हेअर स्टाईल.. त्यात तिने एका बाजुने सोडलेले केसांचे फ्लिक्स तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच जादु करत होते.. तिने घातलेला ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पिस आणि त्यावर तिने घातलेलं ब्लॅक कलरचेच ट्रान्सपरेंट अस जाळीदार जॅकेट तिच्या गोऱ्या अश्या रंगाला अतिशय उठून दिसत होत.. ती जस जशी जवळ येत होती तस तशी ती अजुन सुंदर दिसत होती.. ती शौर्यच्या अगदी समोर येऊन उभी राहिली... तरी शौर्य तिच्या डोळ्यांत बघण्यातच हरवुन गेलेला.. डोळ्यांच्या पापण्यांवर लावलेल्या आय लायनरमुळे तिचे सुंदर असे डोळे अजुनच आकर्षित दिसत होते.. त्याहुन अधिक आकर्षित तिचे ते गुलाबीसर ओठ.. शौर्य पुन्हा नव्याने तिच्यावर फिदाच झालेला..

समीरा : तु बघतच बसणार की निघुयात..

शौर्य तरीही तिच्याकडे बघण्यात हरवुन गेलेला..

तु अस काय बघतोयस.... (शौर्यच्या डोळ्यांसमोरून आपले हात फिरवत त्याला लागलेली तंद्री दूर करतच ती बोलली)

शौर्य  : आज तु खुप म्हणजे खुप म्हणजे खुपच छान दिसतेयस.. तुझ्यावरून नजर हटवुच नये असं वाटतंय..

समीरा : थेंक यु.. तु पण खुप छान दिसतोयस.. आणि शर्ट तर खुपच छान वाटतोय तुला..

शौर्य : थेंक्स... बट आपण गाडीत बसुन बोलूयात??

शौर्य कारचा दरवाजा ऑपन करतच तिला आत बसायला सांगतो..

दोघेही दिल्लीतील फेमस अश्या फाईव्ह सेन्स गार्डनच्या दिशेने जाऊ लागले..

गाडी तर शौर्यने बुक केल्याप्रमाणे तिच्या डेस्टिनेशनला निघाली.. पण गाडीत बसल्यावर दोघांनाही एकमेकांशी काय बोलावे ते कळत नव्हतं..

शौर्य मात्र समीराला मन भरून बघत होता..

समीरा : तु बघतच बसणार की काही बोलशील.

शौर्य : मला विश्वासच नाही बसत की आपण फायनली डेटवर जातोय..

समीरा : माझं पण असच काहीस झालंय.. 

शौर्य : थेंक्स टु वृषभ.. त्याने मला दोन तीन प्लेस सजेस्ट केले.. 

समीरा : वृषभला दिल्लीबद्दल कशी माहिती??

शौर्य : नाही माहीत.. मे बी तो फिरला असेल.. त्याचे वडील इथेच असतात ना म्हणुन.. 

समीरा : ओहह हा.. 

शौर्य : मुंबईत असतो तर आपण मस्त बाईकने फिरलो असतो.. 

समीरा : तुझ्याकडे बाईक पण आहे..??

शौर्य : हो.. मग काय??

समीरा हलकेच अस गालात हसु लागते...

शौर्य : तुला हसायला काय झालं?? खरच आहे..

समीरा : सुरुवातीला तु बोललेलास की मी पार्ट टाईम जॉब करतो एन्ड ऑल.. तेव्हा खुप वेगळा विचार केलेला रे तुझ्याबद्दल.. वेगळीच स्वप्न रंगवलेली आपल्या दोघांबद्दल...  म्हणजे मुंबईतून अगदी छोट्याश्या घरातुन तु आला असशील.. तुझ्याकडे गाडी वैगेरे काही नसेल.. माझी स्वप्न काही मोठी नाहीत.. पण मला अस तेव्हा वाटायच की.. तु खुप मेहनत करावी.. मी पण तुला थोडं फार सपोर्ट करेल.. मग आपण दोघे मिळुन घर घेऊ.. आणि एक बाईक.. फॉर विलर थोडी महाग असते ना. मग कामावर जाताना तु मला आधी ड्रॉप करशील मग तु तुझ्या कामावर निघुन जाशील.. एन्ड ऑल.. हसु येतंय त्या वेडेपणावर माझ्या.

शौर्य : पण तुझ्या ह्याच वेडेपणाच्या मी प्रेमात पडलो.. कारण पैसा प्रॉपर्टी बघुन कोणीही प्रेमात पडेल ग.. पण ते सगळं नसताना प्रेमात पडणारी तुझ्यासारखी मुलगी नाही मिळणार मला शोधुन कुठे.. आणि सॉरी मी खोट बोललो तुला..

समीरा : त्यासाठी तु आधीच सॉरी बोललास शौर्य.. सारख सारख नको ना सॉरी.. पण आत्ता खूप विश्वास ठेवते मी शौर्य तुझ्यावर कधी विश्वास नको तोडुस माझा.. 

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

दोघेही फाईव्ह सेन्स गार्डनमध्ये पोहचले पण..

कार मधुन बाहेर पडतच दोघे समोर दिसणाऱ्या गार्डनमध्ये जाऊ लागले..

शौर्यने दोघांसाठी गार्डनच्या एन्ट्री गेटजवळ तिकीट घेत समीराला घेऊन आत प्रवेश केला..

दोघांसाठी तस नवीन जागा होती.. दोघेही हळूहळू पुढे जात त्यांना दिसणाऱ्या नवीन नवीन गोष्टी बघत होते..

शौर्य ते बघ स्टेचुस किती सुंदर आहे.. समीरा शौर्यचा हात घट्ट पकडत त्याला दाखवतच बोलली.. 

शौर्य : छान आहे.. 

समीरा : एक क्लिक घेऊयात.. प्लिज...

समीरा अस बोलताच दोघेही त्या स्टेचुस जवळ जाऊन उभे राहिले..

शौर्य : तु त्याच्याजवळ जाऊन उभी रहा मी फोटो काढतो तुझा..

समीरा : अस काय करतोस.. तु ये इथे.. आपण कुणाला तरी सांगूयात अस बोलतच..

समीरा त्यांच्या बाजूने जाणाऱ्या एकाला कपलला रिक्वेस्ट करतच दोघांचा एक फोटो काढायला सांगते.. आणि शौर्यचा हात पकडतच त्याला घेऊन ती स्टेचुस जवळ जाऊन उभी राहते.. 

फोटो क्लिक करणारे कपल शौर्यला समीराच्या खांद्यावर हात ठेवायला सांगत असतात.. शौर्य समीराकडे बघतो.. 

समीरा शौर्यचा हात आपल्या खांद्यावर ठेवत एक पॉज देते.. 

नाईस.. अस बोलत त्यांचे फोटो क्लिक करणारे कपल त्यांचा मोबाईल त्यांच्या हातात देतात..

समीरा : can I take one selfie with you... If you don't mind..

कपल लोकांनी परमिशन देताच समीरा आणि शौर्य त्या दोघांसोबत सेल्फी काढतात.. त्यांना थेंक्स बोलुन अजुन नवीन काय दिसतंय ते बघायला जातात..

शौर्य : इकडच आर्किटेक्चर खुप छान आहेना..

समीरा : हो ना.. बघ किती छान आहे दिल्ली आणि तुला मात्र मुंबईला जायचय..

समीरा अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघु लागतो..

समीरा : काय झालंय शौर्य.. इथे बस बघु... 

बाजुलाच असलेला एका कठड्यावर बसत ती शौर्यला बोलते..

शौर्य : तुला नाही यायच का मुंबईला??

समीरा : मला नाही कळत शौर्य.. बट तु का जायच बोलतोयस मुंबईला..

शौर्य : विर घाबरतोय ग मला इथे सोडायला.. टेन्शनमध्ये असतो तो.. त्याच्यासाठी.. आणि मुळात मला पण नाही जास्त रहायच..

समीरा : आणि जर मी तुला अस बोलली की मला इथेच रहायच असेल तर??

शौर्य समीराकडे बघतच राहतो..

शौर्य : मी नाही फोर्स करणार तुला.. तुला तुझे डिसीजन घ्यायचा पूर्ण अधिकार आहे समीरा.. पण मी इथून जातोय हे कन्फर्म आहे.. 

समीरा : राहुयात ना इथे शौर्य प्लिज... फक्त अजून दोन वर्षे... मग तर जावंच लागेल आपल्याला मुंबईत.. प्लिज माझ्यासाठी.. प्लिज

शौर्य : आपण नको ना हा टॉपिक काढुयात. थोडं रोमँटिक ठिकाणी आल्यावर रोमँटिक अस बोलण.. उद्या बोलूयात ह्या टॉपिकवर कॉलेज सुटल्यावर.. चालेल??

समीरा : हम्म..

(समीरा थोडं नाराज होतच बोलते)

शौर्य : नको ना नाराज होऊस.. मी सेल्फी काढतोय बघ माझ्या मोबाईलमध्ये... स्माईल दे बघु..

समीरा शौर्यच्या मोबाईलमध्ये बघतच नाही..

शौर्य आपला डावा हात तिच्या खांद्यावर टाकत उजव्या हातात आपला मोबाईल धरतो...

तस समीरा शौर्यकडे बघते.. आणि शौर्य लगेच एक क्लिक आपल्या मोबाईलमध्ये घेतो..

आत्ता एक स्माईल तर देऊच शकतेस ना तु.. शौर्य अस बोलताच समीरा एक हलकेच स्माईल त्याला देते.. 

माझ्या पण फिलींग थोड्या समजुन घे ना ग.. तु रहा दिल्लीत.. तुला रहावस वाटत ना इथे.. मी येत जाईल तुला भेटायला.. पण अस अस नाराज होऊन नको बसुस मला नाही आवडत तु अस नाराज असलेली..समीराच्या डोळ्यांत बघतच शौर्य तिला बोलला..

दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत बघण्यात हरवुन गेलेले असतात.. शौर्यसुद्धा आज थोडं जास्त समीराकडे आकर्षित होत असतो.. तिच्या ओठांकडे बघतच तो समीराच्या आणखीन जवळ येऊ लागला.. समीरासुद्धा त्याला थांबवत नव्हती.. शौर्यने हलकेच आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.. दोघांच्या हृदयात एक प्रकारे धडधड होऊ लागली.. एकमेकांपासुन वेगळे होऊच नये असे दोघांना वाटत असते..

अचानक शौर्यचा खिशातला फोन वाजला. तस दोघेही त्यांना लागलेल्या धुंदीतून बाहेर आले..

समीरा आपले फ्लिक्स आपल्या कानामागे करतच आजूबाजूला आपली नजर फिरवु लागली...आपल्याला अस काही करताना कोणी बघितलं तर नाही ना हे पाहु लागली..

समीरा : कोणाचा फोन आहे??

शौर्य : ज्योचा.. व्हिडीओ कॉल का करतेय ही..

ज्यो च नाव ऐकुन समीरा थोडं नर्वस होते.. पण ती शौर्यला व्हिडिओ कॉल करतेय बोलल्यावर थोडं रागातच शौर्यकडे बघते..

समीरा : हि तुला व्हिडीओ फोन पण करते..

शौर्य : हो म्हणजे कधी तरी करायची .. उचलू का??

समीरा : उचल.. मला पण कळेल ती का फोन करते ते...

समीरा अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघु लागतो..

(ज्योसलीन का करत असेल फोन?? पाहूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला तेही कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all