अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 53

In Marathi

शौर्य : तु रागात बोलतेयस का??

समीरा मानेनेच नाही बोलत शांत बसते..

शौर्य फोन तसाच सायलेंटवर ठेवतो.. ज्योसलीनचा फोन रिंग होऊन आपणच कट होतो..

समीरा : तु फोन का नाही उचललास..??

शौर्य : असच..

पुन्हा शौर्यला ज्योसलीनचा व्हिडीओ कॉल येतो..

समीरा : उचल..

शौर्य : नाही नको राहू दे.. मी नंतर बोलतो तिच्याशी..

समीरा : शौर्य फोन उचल..

शौर्य : नक्की??

समीरा : हो नक्की.. मला पण कळु दे काय काम असत ते..

शौर्य समीराकडे बघतच फोन उचलतो..

ज्योसलीन : ए शौर्य किती वेळ यार फोन उचलायला.. 

शौर्य : ते मी थोडा बिजी होतो.. तु फोन का करत होतीस??

ज्योसलीन : नको करू का???

शौर्य : अग तस नाही.. काही काम आहे का??

रॉबिन : ए हाय शौर्य... कसा आहेस??

शौर्य : हाय.. तु पण आहेस ज्यो सोबत.. ग्रेट..

(रॉबिनला व्हिडीओ कॉलवर बघुन शौर्यला थोडं बर वाटत)

ज्योसलीन : फक्त हाच नाही आम्ही सगळेच आहोत इथे.. आर्यन, रेवा, रोहन, महेश, रिंकु, नैतिक, प्रतीक, प्रांजल...शौर्यच्या सगळ्या मित्रांकडे मोबाईलमधील कॅमेरा फिरवत ज्योसलीन दाखवु लागली..

हॅलो SD... कसा आहेस...(सगळे एक एक करून त्याला बोलता)

शौर्य : मी मस्त.. तुम्ही सगळे कसे आहात.. 

नैतिक : आम्ही पण मस्त.. काय रे SD.. तु मुंबईला येऊन आम्हांला न भेटता कस काय तु जाऊ शकतोस..

शौर्य : सॉरी यार.. थोडं घाईत होतो मी..

रिंकु : बाय दि वे.. तु परत मुंबईत येतोयसना.. नेक्स्ट मंथ..??

शौर्य : तुम्हांला कोण बोललं..??

नैतिक : अजुन कोण ही ज्यो..

रॉबिन : म्हणून तर आम्ही गोव्याला जायचा प्लॅन करतोय.. तुला फक्त कन्फर्म करायसाठी फोन केलाय..

शौर्य : मला काय कन्फर्म करायचं त्यात??

रॉबिन : तु येतोयस ना..??

शौर्य : मी... ????

रॉबिन : प्लिज आत्ता नाही नको बोलूस...

शौर्य : बघु..

ज्योसलीन : ए शौर्य हे बघु काय असत?? तुझ्यासाठीच तर प्लॅन करतोय आम्ही.. तु पुन्हा मुंबईला येतोयस म्हणुन..

शौर्य : बघु बोललो ना.. घरी पण विचारावं लागेल ना.. अस कस सांगु मी लगेच..

ज्योसलीन : मी लगेच जाऊन विचारून येते आंटीला.. 

शौर्य : ए ज्यो नको हा.. माझं मी विचारतो नि सांगतो..

रॉबिन : शौर्य प्लिज यार.. आम्हांला तस बुकिंग करायचय.. आणि तु येणार तरच आम्ही गोव्याला जातोय.. काय गाईज..

येस... (सगळेच ऐकत्र बोलतात)

ज्योसलीन : प्लिज शौर्य..

सगळेच शौर्यला मस्का पोलिश करू लागले..

शौर्य : ओके.. मी नाईटला कॉल करून कन्फर्म काय ते सांगतो.. तस नाही बोलणार नाहीत.. पण तरीही एकदा विचारून बघतो..

रॉबिन : म्हणजे तुझ्याकडुन येस आहे..

शौर्य : हा म्हणजे सध्या तरी..

येहहह.. त्याची सगळी मित्र मंडळी एकत्रच बोलतात..

शौर्य : गाईज..ते मी थोडा बिजी आहे.. आपण नंतर बोलूयात?? प्लिज..

रॉबिन : ओके..

शौर्य : बाय गाईज.. विल मिट यु सून...

शौर्यचे मित्र मंडळी पण त्याला बाय करतात.. फोन ठेवुन शौर्य समीराकडे बघतो..

समीरा : तुझे सगळे मित्र मंडळी तिथे आहेत.. म्हणुन मुंबईला जायचय ना तुला?? 

शौर्य : अस नाही ग.. आणि प्लिज नको ना तो टॉपिक..आपण उद्या शांत बसुन बोलुयात.. आत्ता प्लिज नको.

समीरा : तुला SD बोलतात.. 

शौर्य : हा म्हणजे कॉलेजमध्ये...

समीरा : आणि घरी..

शौर्य : घरी शौर्यच बोलतात.. मम्मा प्रेमाने कधी तरी शरू बोलते.. जर मम्मा शौर्य बोलली की समजुन जायच ती रागात आहे...

समीरा : ओहहहह... शरू....छान आहे..

शौर्य : हम्मम्म

समीरा : तुझी मैत्री छान आहे ज्योसलीन सोबतची.. काल तु डिसीजन घेतलंस मुंबईला जायच आणि तु ज्योसलीनला लगेच कळवलंस पण तु मुंबईला येतोयस ते.

शौर्य : नाही ग.. मी मुंबईवरून आल्यापासुन तिला फोनच नाही केला आणि इव्हन तिने पण नाही..

समीरा : मग तिला कस कळलं..?

शौर्य : विर बोलला असेल.. 

समीरा : ती तुझी मैत्रीण आहे की विरची..

शौर्य : आम्हां दोघांची पण.. मे बी सकाळी मॉर्निंग वॉक करताना भेटली असेल विरला.. तेव्हा विर बोलला असेल तिला. 

समीरा : ओके.. मग मज्जा आहे तुझी.. गोव्याला जातोयस वेकेशनमध्ये.. ते ही तुझ्या फ्रेंडसोबत..

शौर्य : तुझ काय प्लॅनिंग आहे??

समीरा : नाही माहीत...

शौर्य : मग चल तु पण आमच्यासोबत..

समीरा : ज्योसलीनला चालेल मी आलेलं तुझ्यासोबत..?

शौर्य : समीरा तिला काय प्रॉब्लेम असणार..?? मी तिला सांगतो तुझ्यासाठी पण बुकिंग करायला थांब..

समीरा : नाही नको.. यु एन्जॉय.. मी फेमिली सोबत टाईम स्पेन्ड करेल.. तस पण दादाच लग्न झाल्यापासुन माझ्या वहिनीला मी नीट भेटलीच नाही.. वेकेशनमध्ये निदान दोन महिने तिच्यासोबत थोडा टाईम स्पेन्ड करेल..

शौर्य : मला तर नीट बघायलाच नाही मिळाली तुझी वहिनी..

समीरा : थांब माझ्याकडे पिक्स आहे..

समीरा मोबाईलमध्ये तिच्या दादा आणि वहिनीचे फोटो शौर्यला दाखवु लागली..

शौर्य : छान आहे दोघांची जोडी...आणि तु पण खुप छान दिसत होतीस त्यादिवशी.. पण मला तुला त्यादिवशी सांगायची संधीच भेटली नाही.. 

समीरा : पण मज्जा आली ना.. हळदीला दादाच्या..

शौर्य : हम्मम.. मी तर खुप एन्जॉय केलं.. म्हणजे मी कधी अस काही अटेंड नाही केलं... मला खुप आवडलं.. 

दोघांच्याही गप्पा गोष्टी अगदी रंगु लागल्या.. थोडासा अंधार आत्ता पडु लागला.. तस तसे दोघे तिथुन निघायला लागले...

शौर्य : आपण इथुन शॉपिंगला जाऊयात.. म्हणजे वृषभ बोलत होता खान मार्केट.. इथेच आहे कुठे तरी जवळ.. 

समीरा : मला चालेल..

दोघेही एकमेकांचा हात पकडतच गार्डन मधुन बाहेर पडले..

बाहेरच चॅट सेंटर होत..

समीरा : शौर्य पाणीपुरी...

शौर्य : चल..

दोघेही पाणीपुरी खायला पाणीपुरीच्या गाडीजवळ आले..

शौर्यने दोघांसाठी पाणीपुरी ऑर्डर केली..

पहिली पुरी शौर्यच्या प्लॅटमध्ये पडताच शौर्यने समीराच्या तोंडासमोर धरली..

समीरा : शौर्य अस काय करतोस.. सगळे बघतायत..

शौर्य : ही पुरी तुझ्यासाठीच आहे.. त्यांना नाही मिळणार.. त्यांना तो पाणीपुरी वाला देईलना..

शौर्य अस बोलताच समीराला हसु आलं...

समीराने आपलं तोंस उघडताच शौर्य तिला आपल्या हाताने पाणीपुरी भरवतो.. समीराच्या प्लॅटमध्ये पुरी पडताच ती शौर्यला आपल्या हाताने भरवते.. दोघांच नवीन नवीन प्रेम अजुन नव्याने फुलत होतं...

पाणीपुरी खाऊन होताच दोघे टेक्सिने खान मार्केटच्या दिशेने रवाना झाले..

समीरा : काय शॉपिंग करायची..

शौर्य : तुला आवडेल ते.. इथे खुप दुकान आहेत..

समीराच लक्ष एका मोठ्या अश्या काचेच्या दुकानात एका स्टेचुला लावलेल्या इयररिंगकडे जात... 

शौर्यचा हात पकडतच ती त्याला घेऊन त्या दुकानात जाते.. दुकानदाराला ती ते इयररिंग काढुन दाखवायला सांगते..  दुकानदार इयररिंग काढुन तिच्या हातात देताच.. समीरा आपल्या कानाला लावत ती शौर्यकडे बघते...आणि मान हलकेच अशी वर करत तिला ती कशी दिसतेय म्हणून शौर्यला विचारते... शौर्य आपल्या उजव्या हाताची चाफेकळी अंगठ्यावर टेकवत उरलेली तिनी बोट तिला दाखवत...खूप छान..अस बोलतो...

समीरा : नक्की??

शौर्य : हो.. अजुन काही तरी घे ना..

समीरा तिला अजुन काही आवडत का बघु लागली.... एक एक वस्तु ती दुकानदाराला काढुन दाखवायला सांगत होतु.. शौर्य हाताची घडी घालुन तिला बघण्यात गुंतून गेलेला.. मध्येच एखादी वस्तु शौर्यला दाखवत ती त्याची प्रतिक्रिया विचारत होती.. शौर्य ही अगदी न कंटाळता तिला आपल्या प्रतिक्रिया देत होता..

समीरा : निघुयात??

शौर्य : अजुन काही तरी घे ना.

समीरा : बस.. ह्याचच बिल बघुयात किती येतंय..

शौर्य : आवडत असेल तर घे ना. बिलची काळजी नको करुस..

समीरा : तरीही बस.. नऊ वाजत आलेत.. 

शौर्य हातातील घड्याळ बघतो तर खरच.. समीराच्या शॉपिंगमध्ये एवढा वेळ कधी निघुन गेला ते कळलंच नाही त्याला...

दोघेही काऊंटरवर येऊन समीराने घेतलेल्या समानाच बिल करू लागले..

दुकानदार : नाईन थाउसंड..

दुकानदार अस बोलताच समीरा शौर्यकडे बघु लागली..

समीरा : जास्तच शॉपिंग झाली का??

शौर्य : नाही ग.. तुला अजून काही घ्यायचय???

(शौर्य खिश्यातुन डेबिट कार्ड काऊंटरवर देतच बोलला)

समीरा : नाही.. नको...

शौर्य : मग निघुयात डिनरला...

समीरा : हम्मम्म..चालेल

दोघेही तिथुन डिनरसाठी जायला निघतात..

शौर्यने दोघांसाठी केंडल लाईट डिनर अरेंज केला असतो.. मेणबत्तीच्या मंद अश्या प्रकाशात फुलांनी सजवलेला तो डायनिंग टेबल अतिशय सुंदर असा दिसत असतो..

समीरा : शौर्य... हे काय आहे.. म्हणजे.. मी इमेजीन पण नाही करू शकत.. तु इतकं छान प्लॅन केलय.. आणि केंडल लाईट डिनर बद्दल काही बोललास नाही मला..

शौर्य : तुझ्यासाठी छोटस सरप्राईज.. आणि जर तुला आधी सांगितलं असत तर तुझ्या चेहऱ्यावरील हे एक्सप्रेशन बघायला नसते ना ग मिळाले मला..

समीरा : मला खुप आवडलं शौर्य.. थेंक्स फॉर दिस...

शौर्य चेअर थोडीशी मागे घेत समीराला बसायला सांगतो.. समीरा चेअरवर बसताच शौर्य तिच्या समोर जाऊन बसतो...

समीरा : तु अस बघतच बसणार की काही ऑर्डर पण करणार..

समीरा अस बोलताच... एक वेटर दोघांसाठी सुप घेऊन येतो..

शौर्य आपली एक भुवई उडवतच समीराकडे बघु लागतो...

समीरा : म्हणजे तु मेनु पण आधीच ठरवलायस??

शौर्य : येस...

समीरा : ग्रेट..तसही एवढ्या थंडीत मी पण सुपच ऑर्डर केलं असत..

शौर्य : आय नो... म्हणुन मी आधीच ऑर्डर करून ठेवल..

किती प्रेम करतोस शौर्य तु.. माझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टी ओळखायला लागलास...

(समीरा शौर्यचा हात पकडतच बोलते)

शौर्य : एकमेकांची मन ओळखणे..एकमेकांना समजून घेणं.. ह्यालाच प्रेम म्हणतात ना.. आणि आत्ता सुप पी... नाही तर थंड होईल...

दिव्यांच्या प्रकाशमयी वातावरणाला रेस्टोरेन्टमध्ये वाजणाऱ्या सौलफुल अश्या म्युसिकची साथ मिळत होती.. सोबतच गुलाबांच्या पाकळ्यांचा दरवळणारा हलकाच असा सुगंध तिकडचे वातावरण देखील सुगधंमयी करत होता... दोघेही एकमेकांच्या प्रेमभऱ्या अश्या नजरेत बघत डिनर करत होते... ही वेळ कधी संपूच नये असं दोघांनाही वाटत असत..

समीरा : ह्या एवढ्या रोमँटिक वातावरणात तुझं गाणं मिस करते मी...

तुझ्यासाठी काही पण... अस बोलत शौर्य तिथुन उठुन जाऊ लागला..

समीरा : कुठे चाललास??

शौर्य : सरप्राईज...

शौर्य तिथुन उठुन रेस्टोरेन्टच्या मॅनेजरसोबत काही तरी बोलत असतो.. समीरा लांबुनच तो काय करतो ते बघतो..

शौर्य : ladies and gentlement... Sorry to all off you.. for some distubrnce.. actually I want to sing song for my fiyancy.. if you don't mind can may I.. 

रेस्टोरेन्ट मध्ये असलेले इतर कपल्स टाळ्या वाजवतच त्याला सपोर्ट करू लागले...

शौर्य :  Thanks to all of you.. Hey Samira this song for you ..

(शौर्य समीराकडे हात करतच बोलला)

शौर्य अस समीराकडे हात करताच सगळेच समीराकडे बघु लागतात..

समीरा लाजुन अगदी चुररर झालेली असते...

बुलावे तुझे यार अज्ज मेरी गलियां
बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया
बुलावे तुझे यार अज्ज मेरी गलियां
बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया

ना आयें कभी दोनों में ज़रा भी फासले
बस एक तू हो, एक मैं हूँ और कोई ना
है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले
तू चाहे मेरे हक़ की जमीन रख ले
तू साँसों पे भी नाम तेरा लिख दे
मैं जियूं जब जब तेरा दिल धड़के

जिसे मेरा ये जी नहीं भरता
कुछ भी नहीं असर अब करता
मेरी राह तुझसे मेरी, मेरी चाह तुझसे
मुझे बस यहीं रह जाना

है तू ही दिल जान है मेरी अब से
ना जिक्र तेरा ना जाए मेरे लब से
बुलावे तुझे यार अज्ज मेरी गलियां
बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया

जो होवे तू दस मुझे देखे हस दे
तू चाहे मेरे हक़ की जमीन रख ले
तू साँसों पे भी नाम तेरा लिख दे
मैं जियूं जब जब तेरा दिल धड़के

प्यार दी रावां उत्ते
यार तू ले आया
मेनू जीने दा मतलब
आज समझ आया

सगळेच अगदी टाळ्या वाजवत त्याला चिअरअप करू लागले...

गाणं होताच शौर्य सगळयांना थेंक्स बोलत आपल्या जागेवर येऊन बसतो..

समीरा : शौर्य काय आहे हे.. तु इथे बसून बोलु शकत होतास ना...

शौर्य : त्यात काय झालं.. प्रेम करतो तुझ्यावर.. सगळ्यांना कळायला नको... आणि तु फक्त गाणं नको ना ऐकूस.. गाण्यातले बोल समजुन घे ग... तुझ्यासाठी ह्या माझ्या हृदयातून गातो मी अगदी मनापासुन...

समीरा : लव्ह यु... सो मच शौर्य.. शेवटपर्यंत असाच रहा.. बदलु नकोस..

शौर्य : मी नाही ग बदलणार.. फक्त तु मला समजुन घे.. 

समीरा : हिंदी गाणी खुप ऐकतोस वाटत..

शौर्य : हम्मम.. आवडतात मला गाणी ऐकायला..

समीरा : मराठी गाणी नाही ऐकत??

शौर्य : अस नाही.. बट माझं थोडं वेगळं आहे ग.. 

समीरा : म्हणजे???

शौर्य : तुला नाही कळणार..

समीरा : सांगशील तर कळेल ना..

शौर्य : मला मराठी नाटक बघायला आवडत.. टोलिवुडचे मूव्ही बघायला आवडतात.. हॉलिवुडचे हॉरर मूव्ही बघायला आवडतात आणि बॉलिवुडच बोलशील तर फक्त गाणी ऐकायला आवडतात...

शौर्य अस बोलताच समीराला हसु येत..

शौर्य : बघ मला माहित होतं तु हसणार म्हणुन नव्हतो सांगत.. 

समीरा : सॉरी.. बट तु अस कॉकटेल कस काय करतोस..

शौर्य : मी असाच आहे ग.. आणि प्रत्येकाची आवड असते.. हा आत्ता माझी आवड थोडी वेगळी आहे.. बाय दि वे आपण निघुयात.. खुप उशीर झालाय..

समीरा : हम्मम्म...

शौर्य समीराला हॉस्टेलच्या गेट पर्यंत सोडतो..

समीरा त्याला बाय करतच हॉस्टेलच्या मागच्या गेटने आत जायला निघते... तोच शौर्य तिचा हात घट्ट पकडत तिला आवाज देतो...

समीरा : काय झालं???

शौर्य : हे तु विसरून जातेस..

समीराने शॉपिंग केलेली बेग तिला दाखवतच शौर्य बोलतो

समीरा : अरे हो विसरलेच.. प्लिज मी जाऊ आत्ता आत.. नाही तर पुन्हा वॉचमन बघेल आपल्याला इथे.. दोघांनाही रात्रभर मग बाहेरच रहावं लागेल..

शौर्य : हम्मम बाय.. गुड नाईट... लव्ह यु...

समीरा : लव्ह यु टु बाय.. 

शौर्यला बाय करतच समीरा हॉस्टेलमध्ये घुसते...

समीरा रूममध्ये येताच बेडवर झोपते..

सीमा : वाजले किती समीरा.. अलमोस्ट बारा वाजत आले.. हा काय टाईम आहे का?? एवढा वेळ काय करत होतीस..

समीरा : सीमा आजचा दिवस खुप छान होता ग.. अस संपूच नये असं वाटत होतं.. 

सीमा : कुठे गेलेलात तुम्ही दोघ??? आणि हे काय आहे???

समीरा : शौर्य ने दिलय मला... आम्ही थोडी शॉपिंग पण केली..

समीरा सीमाला तिच्या डेट बद्दलचे एक एक किस्से सांगु लागली.. आणि सोबतच तिने घेतलेले मोबाईलमधले क्लिक दाखवु लागली..

सीमा : मस्त एन्जॉय केलेलं दिसतंय मॅडमने...

समीरा : हम्मम खुप... फक्त त्या ज्योसलीनने मध्येच फोन केला.. नाही तर सगळंच छान होत..

सीमा : जाऊ दे न.. बाकी सगळं छान होत ना.. तु ते बघ ना.. बाय दि वे.. मी झोपते.. मला झोप आलीय खुप..

समीरा : हम्मम बाय गुड नाईट...

सीमा झोपली.. पण समीरा मात्र वेगळ्याच विचारात हरवुन गेली.. 

तिला ज्योसलीनला तिने पाहिलेला पहिला दिवस आठवतो.. ती ज्याप्रकारे शौर्यला मिठी मारत भेटली.. ज्या प्रकारे ती शौर्यची ओळख करून देत होती.. आणि आज सुद्धा एकदम हक्काने ती शौर्यसोबत बोलत होती.. समीरा कुठेतरी तीच वागणं खटकत होत... तिला अस वाटत होतं की ज्योसलीनला एक फोन करून सांगाव की शौर्य माझा आहे.. पण तोच तिला काही तरी सुचत. मी हिला माझा आणि शौर्यचा आज काढलेला फोटो पाठवला तर..???

ती व्हाट्सएप ओपन करत.. ज्योसलीनच नाव बघते.. ज्योसलीनच्या नावावर क्लिक करत ती तिला तिचा आणि शौर्यचा फोटो पाठवणार तोच तिच लक्ष ज्योसलीनने ठेवलेल्या पिक्सवर जात.. ज्योसलीनने डीपीमध्ये शौर्य आणि रॉबिन सोबत काढलेला तिचा पिक ठेवला असतो.. तिघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवुन काढलेला पिक बघुन समीरा रागातच मोबाईल खाली टाकते.. 

सीमा : काय झालं?? नुकताच डोळा लागलेला यार समीरा माझा...

समीरा : काही नाही झोप...

सीमा डोळ्यावरची झोप उडवतच समीराच्या बेडवर येऊन बसते..

सीमा : काय झालं?? चिडलीस का??

समीरा : सीमा मला शौर्यने त्या ज्योसलीन सोबत बोललेलं नाही ग आवडत..

सीमा : का??

समीरा : ती नुसत जवळ जवळ करत असते ग त्याच्या.. मला नाही आवडत ते.. हा पिक बघ.. (खाली पडलेला मोबाईल उचकून सीमाला ती ज्योसलीनचा डीपी दाखवु लागली).. हिला हा डीपी ठेवायची काय गरज आहे.. आणि बघ कस चिकटुन आहे ती शौर्यला..

0सीमा : बघु..(सीमा समीरा दाखवत असलेला फोटो झुम करतच बोलली).. ह्यात तर शौर्यने पण तिच्या खांद्यावर हात ठेवलाय.. तु फक्त ज्योसलीनलाच कस काय बोलु शकतेस.. आणि तुझा तर विश्वास आहे ना शौर्यवर मग आत्ता अचानक काय झालं..

समीरा : नाही माहीत काय झालं.. पण थोडं अनसिक्युर वाटत ग ज्योसलीनमुळे..

सीमा : एक बोलु.. उद्या कॉलेजला जाऊ ना आपण.. मग सरळ जाऊन शौर्यसोबत बोल.. उगाच नको ते गैरसमज नको करुस आणि प्लिज आदळा आपट नको करुस..जर करायचीच असेल तर उद्या उठल्यावर काय ते कर..मला खरच झोप येतेय.. 

समीरा : सॉरी.. झोप तु... गुड नाईट

समीराला मात्र झोप लागत नसते.. ती वारंवार ज्योसलीनचा व्हाट्सएप वरचा डीपी अगदी झुम वैगेरे करून बघत असते.. रात्री कधी झोप लागते ते तिलाच कळत नाही..

सकाळ सकाळी सीमाच्या आवाजाने तिला जाग येते..

सीमा : उठ लेक्चरला नाही यायच का??

समीरा डोळे चोळतच उठते.. डोळ्यांवर अजुनही झोप असते.. डोळ्यांवरची झोप उडवतच पटकन फ्रेश होत ती सीमा सोबत कॉलेजमध्ये जायला निघते...

समीरा : सीमा मी काय बोलते..जर मी अस शौर्यला बोलली की तु त्या ज्योसलीन सोबत नको बोलत जाऊस तर तो माझ्याबद्दल काही वेगळा विचार तर नाही ना करणार..

सीमा : ते तु त्याच्याशी बोलल्यावरच तुला कळेलना.. आणि तुझ्यासाठी तो हे सहज करू शकतो..

दोघीही एकमेकांशी गप्पा मारत कॉलेजमध्ये येऊन बसतात..

समीरा आल्या आल्या शौर्यकडे बघते.. शौर्य दोन्ही डोळे बंद करत तिला एक गोड स्माईल देतो.. समीरा पण हलकेच हसु ओठांवर आणत शौर्यला स्माईल देत त्याच्या बाजुच्या बेंचवर बसते..

रोहनपण क्लासरूमध्ये येतो.. शौर्यच लक्ष मात्र समीराकडेच असत..

रोहन इशाऱ्यानेच वृषभला मागे बस म्हणुन सांगतो..

शौर्यच लक्ष नाही हे बघुन वृषभपण गप्प राज आणि टॉनीच्या बाजुला जाऊन बसतो..

रोहन : शौर्य...

शौर्य बाजुला वळुन बघतो तर रोहन... पाठी बसलेल्या वृषभकडे नजर फिरवत तो बेगेतुन बुक काढत ती वाचायला घेतो..

रोहन : शौर्य किती दिवस रागावणार यार.. मी मुद्दामुन नाही ना रे केलं.. हवं तर सगळ्यांसमोर तुझी माफी मागतो.. अजून काय करू सांग..

(शौर्य डोक्याला हात लावुन शांत बसुन बुकमध्ये बघत असतो..)

प्लिज ना शौर्य.. शौर्य समोरील बुक घेतच तो बोलतो..

शौर्य रागातच एक नजर रोहनकडे फिरवतो आणि बेगेतुन दुसरी बुक काढतो..

रोहन ती पण बुक त्याच्याकडून काढुन घेतो..

रोहन : प्लिज ना शौर्य..

वृषभ : शौर्य सोड ना यार राग.. त्याने मुद्दामुन नाही ना केलं..

राज : हा ना.. प्लिज..  

तोच फैयाज आपल्या मित्रमंडळींसोबत क्लासरूमध्ये येतो..

फैयाज : रोहन कैसा हे यार.. ??

(लांबुनच रोहनला मोठ्याने विचारतो)

रोहन : तु आज लेक्चर में बेठेगा..?? 

फैयाज : में तो लेक्चर लेने आया हुं.. ए हाय समीरा.. How are you my love??

समीरा शौर्यकडे बघते.. शौर्य शांतपणे कुठे तरी बघत असतो..

रोहन : ए फैयाज तेरा प्रॉब्लेम क्या हे?? कैसे बात कर रहा हे तु.. 

रोहन जागेवरून उठतच बोलला..

फैयाज : हाय मनवी गुड मॉर्निंग माय लव्ह.. 

फैयाज... रोहन जोरातच फैयाजच्या नावाने ओरडतो.. आणि त्याच्याकडे जातो..

फैयाज : पुरी बात तो सून..हाय मनवी गुड मॉर्निंग माय लव्ह...ऐसे तो मेने नही कहा.. मेने समीरा का नाम लिया.. मनवी का नही.. तो तु क्यु भडक रहा हे यार..

रोहन : तु मनवी का नाम ले या फिर समीरा का?? लडकी को क्यु तंग कर रहा हे..?? चल निकल यहासे.. वरना

फैयाज : वरना क्या करेगा??

रोहन : वृषभ व्हिडीओ इज रेडी???

वृषभ : येस बोस... 

रोहन : गुड... समीरा लेट्स गो टु प्रिंसिपल??

समीरा : आय एम रेडी.. एन्ड आफ्टर देट विल गो टु पुलिस स्टेशन...(समीरा उभी रहातच बोलली)

रोहन फैयाजकडे रागात बघत रहातो..

रोहन : अभि भी तुझे रुककर इधर किसको तंग करणा हे?? या...

फैयाज : याद रखना रोहन.. तुझे भी देखलुंगा.. और ए शौर्य.. शादी की तैयारी कैसे चल रही हे.. 

शौर्य फैयजच्या बोलण्यावर काहीच रिएक्ट होत नव्हता...

फैयाज मिश्किलपणे हसत रोहनकडे बघतच क्लासरूम मधुन बाहेर पडला..

वृषभ : शौर्य कुल डाऊन... इग्नोर हिम.. तो जाणुन बुजून तुला भडकवतोय..

रोहन : शौर्य..  आय एम सॉरी.. तु नको ना घाबरूस त्या फैयाजला.. मी आहे ना.. मी बघतो त्याला.. हवं तर प्रिंसिपलशी बोलूयात..

शौर्य : प्लॅन चांगला होता...

(शौर्य हसतच रोहनकडे बघत बोलतो)

रोहन : ए वृषभ हा माझ्याशी बोलला यार....

(शौर्यला मिठी मारतच रोहन वृषभला सांगु लागला)

वृषभ : बोललो ना मी तुला शौर्य जास्त वेळ नाही रागवु शकत कोणावर...

रोहन : शौर्य मी तुला तो त्रास द्यावा म्हणुन नाहीरे बोललो.. आणि मला नाही माहीत तो एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलेल ते.

शौर्य : सॉरी.. मी पण थोडं जास्तच बोललो तुला....

रोहन आणि शौर्यला पुन्हा एकत्र आलेलं बघुन सगळेच खुप खुश होतात..

मनवी मात्र तोंड पाडुन बसलेली असते..

सीमा : तुला आनंद नाही झाला का??

मनवी : कसला??

सीमा : ते दोघ पुन्हा एकत्र आले ह्याचा.. 

मनवी : त्या दोघांच रोजचच आहे.. मला टेन्शन आलंय??

समीरा : कसलं ग???

मनवी : नोटीस बोर्ड नाही बघितली का??

समीरा : कसली??

मनवी : तुम्हीच जाऊन बघा..

सीमा : सांगना..

मनवी : मी नाही.. तुम्हीच जाऊन बघा..

समीरा : तुमच्या पैकी कोणी नोटिसबोर्डवर काय नोटीस लावलीय ते बघितलं का??

(समीरा वृषभ आणि इतर मंडळींकडे बघत बोलली)

सगळेच एकमेकांकडे बघुन नकारार्थी मान हलवु लागतात.. 

आणि पळतच नोटिसबोर्डच्या दिशेने जाऊ लागतात..

समीरा : एन्युअल डे बाबत आहे.. ज्यांना डान्स आणि इतर गोष्टीत पार्टीसिपेंट करायच असेल त्यांनी नाव द्यायची.. 

सीमा : ही मनवी अस तोंड पाडुन का बसली..

शौर्य : कारण तिने ही वाली नोटिफिकेशन बघितली..

शौर्य अस बोलताच सगळे शौर्य दाखवत असलेल्या नोटिफिकेशनकडे बघु लागले..

ओहह नो... सगळ्यांची रिएक्शन एकच असते...

(कश्या बाबत नोटिफिकेशन लावली असेल नोटिसबोर्डवर..?? गेस करू शकता... आपण भेटुया पुढील भागात.. आणि हा भाग कसा वाटला ते कळवा.. )

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all