अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 55

In marathi

मित्रांची समजुत काढायला म्हणुन शौर्य वृषभच्या रूममध्ये जातो.. राज आणि टॉनी पण वृषभच्याच रूममध्ये असतात..

शौर्य : गाईज सॉरी ना.. प्लिज नका ना अस रागवु...

तिघेही पुस्तकात तोंड घालुन बसतात..

शौर्य : वृषभ प्लिज ना यार... तु पण अस वागतोस..

शौर्यच्या बोलण्यावर कोणी काहीच रिएक्ट करत नाही..

शौर्य : इथे आल्यापासुन त्या लोकांना भेटलोच नाही रे.. जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो ना तेव्हा पण त्यांना न भेटताच आलो मी.. काल खुप फोर्स करत होते रे.. त्यांना नकार द्यायला नाही जमलं मला.. प्लिज... समजुन घ्या ना.. ते पण फ्रेंड्स आहेत यार माझे..

राज : आपण एक्साम झाल्यावर कुठे जातोय वृषभ.?

टॉनी : मला वाटत काश्मीरला जाऊयात?? मला तिथे जावस वाटतय..

वृषभ : मला चालेल.. बाय दि वे एक्साम कधी संपतेय आपली..

राज : 23rd ला..

टॉनी : त्याच रात्री निघालो तर.. थांब मी रोहनला विचारतो..

वृषभ : अस काय करतोस उद्या कॉलेजमध्ये जाऊ तेव्हाच विचारू. बाय दि वे शौर्य तु काही तरी बोलत होतास.. सॉरी आमच लक्ष नव्हतं...

शौर्य : कुठे काय.. तुमच चालु द्या.. बाय.. गुड नाईट.. उद्या भेटुयात कॉलेजमध्ये...

शौर्य तिघांना बाय करत आपल्या रूममध्ये जातो..

राज : त्याला वाईट वाटलं वाटत..

वृषभ : वाईट वाटलं तर वाटु दे... आपल्याला नाही वाटल का वाईट.. त्यादिवशी मी आधीच त्याला बोललेलो की आपण मस्त पैकी पंधरा दिवस कुठे तरी फिरून मग आपापल्या घरी जातोय.. मग अचानक तो कस काय केन्सल करू शकतो..

टॉनी : जर शौर्य नाहीच आला तर..

राज : जबरदस्ती उचलुन नेऊयात त्याला.. आपण उद्या रोहन सोबत बोलुन बघुयात तो काय बोलतो ते..

वृषभ : त्याला तर माहिती पण नाही शौर्य दिली सोडुन जातोय ते.. आजचा दिवस सोडला तर मोजुन 29 डे उरलेत..

टॉनी : बघुयात उद्या काय ठरतंय आपलं..

★★★★★★

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे क्लासरूममध्ये सगळे आपापल्या जागेवर बसले असतात..  

वृषभ : ए समीरा.. डान्स प्रॅक्टिस 3rd फ्लॉरवर आहे ना..??

समीरा : हो... का रे??

वृषभ : गाईज लेक्चर संपल्यावर आपण 3rd फ्लॉरवर भेटतोय.. 

रोहन : कश्याला??

राज : अरे एक्साम नंतर कुठे जायच त्याबद्दल डिस्कशन करायला नको का?? इथे लोकांच्या एडवांन्समध्ये तिकिटी पण बुक झाल्यात.. काय शौर्य बरोबर ना..

(शौर्य आपलं लक्ष पुस्तकात ठेवुन आपल्या मित्र मंडळींच काय चालू आहे ते फक्त ऐकत असतो.. पण काहीच रिएक्ट होत नसतो..)

सीमा : पण आपण कुठे जातोय??

राज : आपण ना सध्यातरी 3rd फ्लॉरवर जातोय..

(राज हसतच बोलला)

सीमा : वेरी फनी.. मी ट्रिपबद्दल बोलतेय..

राज : मगाशी मी मराठीतच बोललो ना.. लेक्चर संपल्यावर 3rd फ्लॉरवर भेटुन ट्रिपबद्दल डिस्कशन करूयात म्हणुन..

समीरा : मला लायब्ररीत पण जायचय.. माझी इकोची टेक्सबुक हरवलीय.. मी आधी लायब्ररीत जाईल.. इकॉची टेक्सबुक घेईल आणि मग 3rd फ्लॉरवर येईल चालेलना.??

टॉनी : नाही चालणार..

समीरा : का??

राज : इकॉच्या टेक्सबुकला पाय कुठे असतात चालायला..

(राज अस बोलताच सगळे हसु लागतात.. समीरा सुद्धा...)

तेवढ्यात इकॉचे सर येतात.. सुरुवातीचे फक्त दोन लेक्चर होतात.. आणि नंतर काही लेक्चर होतच नाहीत हे बघुन सगळे उठून क्लासरूम मधुन बाहेर जाऊ लागतात.. शौर्य उठुन जाणार तोच मनवी आपल अकाऊंटच टेक्सबुक घेऊन शौर्यच्या डेक्सवर येते..

मनवी : हाय शौर्य... मला एक डाऊट आहे प्लिज हेल्प करशील...

मनवी अस बोलताच शौर्य आपली बेग खाली ठेवत पुन्हा डेस्क वर बसतो.. 

वृषभ : आम्ही 3rd फ्लॉरवर आहोत.. तुम्ही दोघे या तिथेच..

शौर्य : ए वृषभ थांब ना थोडा वेळ.. हिला एकच डाऊट आहे रे.. मग एकत्रच जाऊयात..

वृषभ : थांबलो असतो रे.. पण आम्हाला पण ट्रिप बद्दल डिस्कशन करायचय.. तिकीट बुक करायला नको का...?

शौर्य : रोहन.. तु तरी थांब..

राज : रोहन तुझ्यासोबत आम्हांला महत्वाच बोलायचंय.. तु आधी तिथे असण गरजेच आहे..

वृषभ : मनवी तुला रोहन सांगेल नंतर.. तस पण तु येशीलच ना 3rd फ्लॉरवर..

मनवी : हो.. येते..

वृषभ दोघांना बाय करत तिथुन जाऊ लागला..

शौर्य मनवीच्या टेक्स्टबुक मध्ये बघु लागतो... आणि तिला असलेला डाउट तो तिला एक्सप्लॅन करू लागतो... 

शौर्य : तु तुझी नॉटबुक दे मी त्यात तुला सोल्व्ह करून दाखवतो... म्हणजे तुला कळेल..

शौर्य मनवीला तिच्या नॉटबुक मध्येच सम सोल्व्ह करत तिला एक्सप्लॅन करू लागला..

पण ती एकटक शौर्यकडे बघण्यात हरवुन गेलेली..

शौर्य : समजलं??

मनवी : शौर्य मला तुझ्याशी थोडं बोलायच होत.. रोहनबद्दल..

शौर्य : काय झालं??

मनवी : मला रोहन नाही आवडत.. मला दुसर कोणी तरी आवडत.. पण मी हे सगळं रोहनला नाही सांगु शकत.. 

शौर्य : काय?? काल पर्यंत तर तु तो सोडुन जात होता म्हणुन रडत होतीस.. आज अचानक काय झालं तुला?? 

मनवी : मला कोणी तरी दुसर आवडतय शौर्य.. 

शौर्य : पण तु हे रोहनसोबत प्रेम करण्याआधी ठरवायला हवं होतंस ना तुला तो आवडतो की नाही ते.. आणि तुला रोहन नाही ना आवडत.. मग तु त्याला सरळ जाऊन सांग.. मला नको सांगुस...

शौर्य आपली बेग घेऊन तिथुन जाऊ लागला.. 

ज्याच्यावर माझं प्रेम आहे त्याला सांगायला हवं ना.. मनवी शौर्यचा हात पकडत त्याला थांबवतच बोलते..

शौर्य : तुला बोलायच काय आहे ते नीट बोल आणि माझा हात सोड आधी..

(शौर्य रागातच तिला बोलतो)

मनवी : मला तु आवडतोस शौर्य.. अगदी तु कॉलेजला आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच.. तु त्या समीराच्या जवळ गेलास की मला त्रास होतो शौर्य.. मी तुझ्यापासुन लांब रहाण्याचा प्रयत्न करते तेवढंच तुझ्या जास्त जवळ येतेय मी.. 

शौर्य : मनवी मला तु नाही आवडत.. एक फ्रेंड म्हणुन पण तु मला कधी आवडली नाही.. मला फक्त नि फक्त समीराच आवडते..

मनवी : अस नको ना बोलुस शौर्य.. सुरुवातीला तर तु नीट बोलायचास माझ्यासोबत.. आपण चॅटिंग पण करायचो ना.. दिवस रात्र आपण बोलत रहायचो शौर्य.. ते प्रेम नव्हतं तर काय होत. समीराच्या भावाच्या लग्नात मला तु ती चैन गिफ्ट दिलेलीस शौर्य.. एवढं सगळं असताना तु अचानक कस काय समीराच्या प्रेमात पडु शकतोस..

शौर्य : मी कधी तुला चैन गिफ्ट केली मनवी..?? काहीही काय बोलतेस तु आणि चॅटिंगच बोलशील तर सादा मेसेज पण नाही मी केला तुला कधी. 

मनवी : प्लिज शौर्य खोटं बोलु नकोस.. तुला पण चांगल माहिती माझा मोबाईल फॉरमॅट झालाय.. नाही तर मी तुला आपण रात्रभर केलेली चॅटिंग दाखवली असती..

शौर्य : तुझा मोबाईल फॉरमॅट झालाय ना.. माझा तर नाही ना झालाय.. आणि मी माझ्या मोबाईलमधुन कधीच काहीही डिलीट करत नाही. माझ्या मोबाईलमध्ये तरी चॅटिंग हवी ना.?? माझं फक्त नि फक्त समीरावर प्रेम आहे.. आणि मला अस वाटत ना कि तुला डॉक्टर ट्रिटमेंटची गरज आहे...

मनवी : डॉक्टर ट्रीटमेंटची गरज तुला आहे शौर्य.. कारण तु विसरतोयस सगळं..

शौर्य : जस्ट शट आप मनवी..आणि तुला जे काही बोलायच ते तिथे सगळ्यांच्या पुढ्यात बोल.. अस इथे बोलु नकोस.. बाकीच्यांना पण कळु दे ना तु काय बोलतेस ते..

शौर्य आपली बेग घेत तिथुन जाऊ लागला..

मनवी : माझं बोलणं कम्प्लिट नाही झालंय शौर्य.. जो पर्यंत माझं बोलणं पूर्ण नाही होत तोपर्यंत तु इथुन नाही जाऊ शकत समजलं तुला.. मला तु आवडतोस.. माझं प्रेम आहे तुझ्यावर.. मी नीट बोललेलं कळत नाही का तुला..

(शौर्यच्या शर्टाची कॉलर पकडतच मनवी त्याला बोलते)

शौर्य : मनवी तु वेडी झालीयस.. मला सोड.. 

(शौर्य तिचा हात सोडवतच बोलु लागला..)

मनवी : का सोडु मी.. मला जी वस्तु आवडते तीला मी सोडत नाही.. आणि मला तु आवडतोस.. आणि सगळ्यात जास्त तर तुझ्या गालावरची ही डिंपल.. 

शौर्य :  मनवी मला इरिटेट होतय आत्ता. माझी कॉलर सोड..

मनवी : नाही सोडणार

मनवी... शौर्य रागातच ओरडतो आणि मनवीच्या गालावर एक कानाखाली देतो..मनवीकडे बघत तिथुन निघुन जातो.. मनवी थरथरतच आपल्या गालावर हात लावत क्लासरूम बाहेर पडणाऱ्या शौर्यकडे बघु लागली..

इथे वृषभ आणि इतर मित्र मंडळी ट्रिप बद्दल डिस्कशन करत असतात..

वृषभ : आपण काश्मीर जाऊयात?? म्हणजे मी, राज आणि टॉनी.. आम्हां तिघांच अस म्हणणं आहे की आपण काश्मीरला जाऊयात..

रोहन : मला पण चालेल..

सीमा : मला पण

वृषभ : समीरा तुझ काय मत आहे??

समीरा : ट्रिप कधी असणार??

वृषभ : आम्ही विचार करतोय की एक्साम झाल्यावर लगेच निघुयात..

समीरा : शौर्य नसणार ना पण..

रोहन : तो कुठे चाललाय??

राज : मुंबईला ते ही कायमचा..

रोहन : राज तु सिरियसली बोलत जा ना यार.. निदान सगळे सिरियसली असताना तरी..

समीरा : शौर्य गोव्याला जातोय त्याच्या मुंबईतल्या मित्रांसोबत व्हेकेशन एन्जॉय करायला.. आणि राज बोलतोय ते पण खरं आहे. तो कायमचा मुंबईला जातोय.. 

रोहन : व्हॉट?? अस का करतोय तो.. मुळात तो आपल्याला सोडुन जाऊच कस शकतो.. थांब येऊ दे त्याला मी बघतो..

राज : काय बघणार त्याला.. कालपासुन आम्ही पण त्याच्यावर रागावलोय.. त्याला माहिती होत आपण पण ट्रीपला जातोय तरी त्याने त्याच्या मुंबईच्या फ्रेंड्ससोबत ट्रिप प्लॅन केलं.. आणि आत्ता केन्सल पण नाही करत.. 

समीरा : अस कस केन्सल नाही करत तो.. आपण काश्मीर जातोय.. आणि ते ही शौर्यला घेऊनच.. मी बघते शौर्यशी बोलून...

थोड्याच वेळात शौर्य तिथे येतो..

रोहन : मनवी कुठेय??

शौर्य : समीरा मला तुझ्यासोबत बोलायचंय.. महत्वाच आहे.. प्लिज दोन मिनिट बाहेर येशील..

समीरा : आम्ही पण महत्वाच्या टॉपिकवर बोलतोय ना शौर्य.. थोडं थांब ना.. प्लिज

शौर्य : समीरा हे जरा जास्त इम्पोर्टानंट आहे.. प्लिज...

तेवढ्यात मनवी पण तिथे येते..

रोहन : कुठे होतीस तु..??

मनवी : इथेच तर होती.. का काय झालं..??

शौर्य : समीरा प्लिज..

रोहन : ए शौर्य थांब ना जरा.. आपण ट्रिपबद्दल बोलतोय ना.. तुम्ही नंतर पण बोलु शकता ना यार.

समीरा : तुम्ही दोघ आत्ता आलात म्हणुन मी परत सांगते.. आपण काश्मीरला जायच प्लॅन करतोय..

मनवी : ओहहह वॉव ग्रेट... कधी??

समीरा : 23rd लाच.. एक्साम होताच लगेच..आणि मेन म्हणजे शौर्य तु पण आमच्यासोबत येतोयस.. एक्साम झाली की आपण त्याच दिवशी निघतोय..

शौर्य डोळे बंद करत खोल श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो..

वृषभ : शौर्य येतोयस ना तु..?

राज : आत्ता समीरा बोललीय म्हणजे येईलच..

रोहन : येतोय तो.. त्यात काय विचारायचं त्याला..

शौर्य आपल्या हाताची मुठ करत जोरातच भिंतीवर आपटत समीराकडे रागात बघतच तिथुन जाऊ लागला..

समीरा : शौर्य काय झालं?? एवढा भडकलास का???

शौर्य : तुला माहिती ना मी गोव्याला जातोय.. का फोर्स करतेस तु.. 

समीरा : कारण शौर्य मला अस वाटत तु माझ्यासोबत काश्मीरला यावं.. त्यात एवढ भडकण्यासारखं काय आहे??

शौर्य : मला पण वाटत की तु माझ्यासोबत कायमच मुंबईला यावं तु येतेयस..?? सांग ना येतेयस तु?? नाही ना येत.. मी तुला जबरदस्ती केली..??  केली जबरदस्ती तुला?? नाही ना केली.. मग तु का करतेस?? आणि वृषभ तु.. लास्ट पेपर झाल्या झाल्या मी मुंबईला जातोय अस तु मला काही सांगण्याआधी मी तुला अस बोललो होतो की नव्हतो..?? 

वृषभ : हा बोलला होतास..

शौर्य : मग का माझा अंत बघताय तुम्ही लोक.. आणि समीरा तुला हे सगळं महत्वाच आहे..पण मी तुझ्याकडे दोन मिनिटं मागतो ती महत्वाची नाही का तुला.. तु खरच प्रेम करतेस ना माझ्यावर... मग माझ्या फिलींग का नाही समजत तुला??

रोहन : ए शौर्य तुला काय झालं.. तु भडकतोयस का एवढं??

शौर्य : मला वाटलंच तु बोलणार.. हि तुझी मनवी.. मला बोलते मी हिला रात्रभर मेसेज करायचो.. हिच्याशी चॅटिंग करायचो.. ही माझ्या प्रेमात आहे. हिला तु आवडत नाही.. मी कधी केली हिच्याशी चॅटिंग.. काहीही का बोलते ही..

रोहन : मनवी काय आहे हे..

मनवी : रोहन हा माझ्याशी चॅटिंग करायचा.. डॅड प्रॉमिज.. मी माझ्या डॅडची खोटी शप्पथ तर नाही ना घेऊ शकत.. 

शौर्य : मनवी प्लिज स्टॉप यार.. काहीही का आरोप करते.. 

मनवी : समीराच्या भावाच्या लग्नात तु मला चैन गिफ्ट केली नव्हतीस??

शौर्य : मी तुला का चैन देऊ यार.. आणि मुळात हि चैन मला समीराने दिलीय.. जर मला खरच तुला काही द्यायच असत तर मी विकत घेऊन देईल ना हिने दिलेली का देऊ मी तुला.. तु खोटं बोलणं थांबव

मनवी : मी खोटं बोलत नाही आहे.

रोहन : एक मिनिट.. तुम्ही दोघ परत का भांडताय..

शौर्य : तुला तर सगळं हिचचं खर वाटणार.. सोड... मला जिथे ही असेल तिथे जायचंच नाही.. ही डान्समध्ये आहे म्हणुन मला डान्समध्ये पण पार्टीसिपेंट करायच नाही..

शौर्य रागातच तिथुन निघुन जाऊ लागला..

समीरा : मनवी तुझा प्रॉब्लेम काय आहे?? का सारख तु शौर्यच्या मागे मागे करत असते..

मनवी : हेच तु शौर्यला विचार ना.. 

वृषभ : तरी तो मला थांब बोलत होता.. मी थांबलो असतो तर हे सगळं झालंच नसत..

मनवी : तुला बोलायच काय आहे मी खोटं बोलतेय..

वृषभ : गॉड नॉज.. कोण खर बोलतंय नि कोण खोटं.. मी बघुन येतो शौर्यला.. तुम्ही थांबा इथेच...

3rd फ्लॉरवर हळुहळु डान्स प्रॅक्टिससाठी सगळे जमु लागले.. समीरा आणि इतर मंडळी एका बाजुला बसुन वृषभ आणि शौर्यची वाट बघु लागले..

जवळपास अर्ध्या तासाने वृषभ येतो..

समीरा : काय झालं?

वृषभ : तो नाही येणार बोलतोय.. म्हणजे त्याच म्हणणं आहे की आपण डान्स करावा. एन्युअल डे ला सगळेच डान्समध्ये असतील तर बघायला पण कोणी तरी पाहिजे ना.. आणि तो उद्यापासून कॉलेजला पण नाही येणार.. डायरेक्ट एन्युअल डे ला येईल आणि त्यानंतर एक्सामला अस पण बोलला..

सगळेच एकमेकांकडे बघु लागतात..

तोच फ्लॉरवर म्युसिक वाजु लागत तस सगळे त्यांना लागलेल्या तंद्रीतुन बाहेर येतच डान्स सरांकडे जातात.. आणि प्रॅक्टिसला लागतात..

प्रॅक्टिस पूर्ण होताच समीरा शौर्यला फोन लावतच हॉस्टेलच्या दिशेने जाते.. पण शौर्य फोन उचलत नसतो.. पुन्हा पंधरा मिनिटांनी समीरा शौर्यला फोन लावते.. तरीही शौर्य फोन उचलत नाही.. मे बी झोपला असेल असा विचार करून समीरा मोबाईल तसाच बाजुला ठेवते.. उशीवर डोकं ठेवुन जे आज घडुन गेल त्याचा विचार करते..

सीमा : मनवी खोट बोलतेय की शौर्य??

समीरा : मला नाही माहीत... शौर्य फोन पण नाही उचलत..

सीमा : शौर्यला राग खुप आहे ना..

समीरा : मला पण आजच कळलं.. म्हणजे सगळ्यांसमोर तो अस बोलला ते मला नाही आवडल..

सीमा : मनवी का खोट बोलत असेल पण..

समीरा : नाही कळत.. 

सीमा : जास्त नको विचार करुस... अभ्यास कर...

समीरा : हम्मम्म..

समीरा पुस्तक हातात घेऊन बसलेली पण अधुन मधुन ती शौर्यला फोन लावत होती.. पण शौर्य फोन काही उचलत नव्हता.. शेवटी कंटाळुन तिने वृषभला फोन लावला.. वृषभ शौर्यच्याच रूममध्ये होता.. 

समीरा : शौर्य फोन का नाही उचलत माझा???

वृषभ : त्यालाच विचार.. अस बोलत वृषभने फोन शौर्यकडे दिला..

शौर्य : काय झालं??

समीरा : काय झालं म्हणुन तु मला विचारतोस.. तु फोन का नाही उचलत..

शौर्य : असच..

समीरा : तुला काय झालंय..

शौर्य : मला आज थोडं शांत रहायचय.. प्लिज.. आपण नंतर बोलुयात..

समीराच पुढे काहीही ऐकुन न घेता शौर्यने फोन कट केला..आणि फोन वृषभकडे दिला..

वृषभ : तुला काय झालंय शौर्य.. तु एवढं रुडली का वागतोयस..

शौर्य : मग काय करू मी..?? काल ती माझी काही चुक नसताना केंटींगमधुन काहीही न सांगता रागावून गेली माझ्यावर.. मी लगेच तिला मनवायला तिच्या मागे गेलो ना वृषभ.. का तुमच्यासोबत तिथेच बसुन राहिलो.. आणि आज तिने काय केलं.. एक सादा फोन पण नाही केला यार .. तुझ्याकडुन कळलं मी ठिक आहे.. मग ओके..

वृषभ : फोन केलेला तिने तुला.. तूच उचलला नाही.. 

शौर्य : कधी केला फोन.. 4 वाजता?? 

वृषभ : इट्स ओके ना शौर्य.. एवढं नको ना पण तु भडकूस.. शांत हो.. 

शौर्य : मी शांतच आहे... 

इथे समीराची पण शौर्यच्या वागण्यावरून चीडचीड होत होती.

पण शौर्यला सुद्धा तिच्याशिवाय करमत नव्हतं.. शेवटी रात्री साडे नऊ वाजता तो तिला फोन करतो..

समीरा : शौर्य काय आहे हे?? केवढा राग आहे तुला..

शौर्य : मला अस वाटत ना समीरा तु मला समजुन नाही घेत.. 

समीरा : मी काय समजून घ्यायला हवं तुला शौर्य?? तुझं आणि मनवीच काय झालं हे मला कस माहीत असणार.. आणि तु सगळ्यांसमोर माझ्या प्रेमावर डाउट घेतोस शौर्य.. कस वाटत ते..? मला नाही आवडल तुझं हे अस वागणं.. 

शौर्य : मग काल तु जे वागलीस ते बरोबर होत समीरा?? तु पण डाऊटच घेत होतीस ना माझ्यावर.. सगळ्यांच्या पुढ्यात माझा मोबाईल चॅक केलास.. परत तिथुन पण रागात निघुन गेलीस.. मला पण कस माहिती असणार समीरा तिथे त्या फैयाजने तुला त्रास दिलाय ते.. पण तरीही मी तुझ्या पाठी तुला मनवायला आलो ना.. आणि तु मात्र आज तिथेच थांबलीस.. म्हणजे मला अस वाटलं ना की तुला त्या मनवीच बोलणं पटत होत म्हणुन तु माझ्यासोबत नाही आलीस.. हर्ट झालं यार समीरा मला..

समीरा : सॉरी..

शौर्य : समीरा मला तु सॉरी बोलावं अस नाही ग वाटत.. फक्त मला समजुन घेत जा.. 

समीरा : परत नाही होणार अस..आणि वृषभ बोलला की तु कॉलेजला नाही येणार.. का अस करतोयस??

शौर्य : मला अजुन प्रॉब्लेम नकोयत माझ्या लाईफमध्ये.. आपण सँडला प्ले हाउस जवळ भेटत जाऊ.. पण मी लेक्चरला वैगेरे नाही येणार.. 

समीरा : अस करून काय भेटणार..??

शौर्य : निदान शांत पणे एक्साम देईल ना मी... 

समीरा पण शौर्यला जास्त फोर्स नाही करत..

★★★★★

अश्यातच एन्युअलडेचा दिवस उजाडतो.. संध्याकाळी 7 वाजता एन्युअल डे च आयोजन करण्यात आलेला.. त्यामुळे सगळेच दिवसभर आपल्या डान्स प्रॅक्टिसमध्ये व्यस्त होते शिवाय शौर्य.. 6.45 झाले तसे सगळे मस्त पैकी तैयार होऊन शौर्यच्या रूममध्ये आले..

वृषभ : आज तरी येतोयस ना तु??

शौर्य : हम्मम... 

राज : ए शौर्य आमचा व्हिडिओ पण काढ हा..

शौर्य : तु नाही सांगितलं असतस तरी मी काढणार होतो..

राज : ते माहिती पण आमचा पण काढ.. नाही म्हणजे समीरा पण आहेना.. ती नाचायला लागली तर तुझ्या मोबाईलचा कॅमेरा तिच्याकडेच फ्रीज होईल.. म्हणुन म्हटलं...

(वृषभ आणि टॉनी गालातल्या गालात हसु लागतात)

शौर्य : झालं तुमच मग निघा उशीर होईल तुम्हांला..

वृषभ : तु पण चल..

शौर्य : येतो नंतर.. अजुन टाईम आहे खुप..

राज : कसला टाईम.. उशिरा निघालास मग लास्ट बसायला लागेल.. एवढ्या लांबुन मग आमचा व्हिडीओ नाही येणार नीट.. तु पण आमच्यासोबत निघतोयस..

शौर्य : नको ना यार.. एवढ्या लवकर मी तिथे एकटा बसुन काय करू. 

वृषभ : एकटा कुठे असणार तु.. आम्ही पण आहोत.. आमचा 6th डान्स आहे.. तो पर्यंत आम्ही तुझ्यासोबत बसणार..

शौर्य : तरी पण रे..

टॉनी : ए शौर्य तुला काय झालंय.. चल ना.. 

तिघेही जबरदस्ती करत शौर्यला घेऊन जातात..

कॉलेजच्या बाहेर असलेल्या मोठ्याश्या ग्राउंडमध्ये एन्युअल डेच अरेंजमेंट केलं असत.. 

चौघेही असे कॉलेज गेटजवळ येतात तस वृषभ रोहनला फोन लावतो..

शौर्य : काय झालं??

वृषभ : फोन लागतच नाही ह्याचा.. आऊट ऑफ कव्हरेज दाखवतोय..

राज : मे बी रोहन आधीच ग्राऊंडवर गेला असेल.. 

टॉनी : मला पण असच वाटत.. 

सगळे ग्राऊंडच्या दिशेने जाऊ लागतात..

शौर्य : गाईज माझं थोडं काम आहे.. तुम्ही व्हा पुढे मी येतो..

वृषभ : आत्ता तुझं काय काम आहे..??

शौर्य : फोन करायचाय घरी.. तुम्ही व्हा ना मी फोन वर बोलुन येतो.. परत तुमचा डान्स चालु असताना फोन येईल नाही तर..

राज : बर ये..

शौर्य कॉलेजच्या गेट बाहेरच उभं राहुन विराजला फोन लावतो.. पण विराज फोन उचलत नाही... तो थोडा वेळ तिथेच उभं राहुन पुन्हा विराजचा फोन येतोय का ह्याची वाट बघत असतो..

इथे मनवी सीमासोबत सेल्फी घेण्यात बिजी असते..

सीमा : बघ 7 वाजुन गेले तरी समीरा मॅडम अजुन आल्या नाहीत.. तिच्यासोबत थांबली असती तर मी पण 8 वाजताच आली असती.

मनवी : बाकीची मंडळी कुठे आहेत???

सीमा : नाही माहीत.. रोहन कुठेय??

मनवी : तो इथेच असेलना... सीमा माझ्या एकटीचा फोटो घे ना.. 

मनवी सीमाकडे आपला फोन देतच तिच्यासमोर जाऊन उभी राहते.. सीमा मनवीचा फोटो काढणार तोच शौर्यचा मेसेज येतो मनवीच्या फोनवर..

सीमा फोटो काढायच सोडुन मनवीकडे बघत रहाते..

मनवी : काढलास का फोटो???

सीमा : ते शौर्यचा मेसेज आलाय..

मनवी थोडं रागातच सीमाजवळ येत तिच्या हातातुन स्वतःचा फोन घेत तिच्यासमोरच शौर्यने केलेला मेसेज ऑपन करून सीमाच्या समोरच वाचते...

Hey Manvi, I need to speak with you on a very important topic. please don't say no, what ever happened for that i am sorry... Meet me at 4th floor for the last time.. And dont tell this to any one

मनवी : असे मेसेज करायचे.. आणि वर समीराच्या पुढ्यात नाही म्हणुन पडायच..

अस बोलत मनवी तिथुन जाऊ लागली..

सीमा : कुठे चाललीस तु??

मनवी : 4th फ्लॉरवर.. बघु तर दे काय इंपोर्टन्ट बोलायचंय त्याला ते.. 

मनवी ग्राउंडमधुन बाहेर पडतच कॉलेजच्या दिशेने जाऊ लागली.. 

सीमा ग्राऊंडवरच समीरा आणि तिच्या इतर मित्रमैत्रिणींना शोधु लागली.. एवढ्या मोठ्या ग्राउंडवर ह्या लोकांना शोधायचं कस हा तिला प्रश्न पडतो.. त्यात डान्सच्या गडबडीत मोबाईल हरवायला नको म्हणून तिने सोबत मोबाईल आणलेला नसतो.. जवळपस 15 - 20 मिनिट अशीच निघुन जातात.. ती तिच्या मित्रमंडळींना शोधत असते.. तोच तिला राज आवाज देत हात दाखव आपल्याकडे बोलावतो.. राज सोबत इतर मित्रमंडळींना बघुन सीमाच्या जीवात जीव येतो.. ती पळतच त्यांच्याकडे जाते..

सीमा : समीरा आपल्याला लगेच 4th फ्लॉरवर जायचय.. आधीच उशीर झालाय

समीरा : काय झालं??

सीमा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते.. तसे सगळे एकमेकांकडे बघत पळतच 4th फ्लॉरवर जायला निघतात..

(आत्ता पर्यंत मनवी शौर्य बद्दल बोलत होती ते खरं होत?? ते जाणुन घेण्यासाठी भेटूया पुढील भागात.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all