अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 56

In marathi

सगळेच पळत कॉलेजच्या दिशेने जातात... 4th फ्लॉरवर जाऊन बघतात तर मनवीचे अंगावरचे कपडे अगदी चित्र विचित्र अश्या अवस्थेत असतात.. शौर्य पासुन आपले हात सोडवण्याचा जणु ती प्रयत्न करत होती अस दिसत होतं.. 

रोहन : शौर्य... (रोहन जोरातच ओरडला..)

तस मनवीने जोरात शौर्यला खाली ढकललं आणि रोहनजवळ धावत गेली..

वृषभ : शौर्य काय करत होतास तु??

शौर्य डोकं धरतच उठतो..

शौर्य : हिला विचार ही काय करत होती ते..

रोहन मनवीला बाजुला करतो आणि रागातच जात शौर्यच्या कानाखाली मारतो.. तस शौर्य पुन्हा खाली पडतो..

मी तुला आज सोडणार नाही.. अस बोलत त्याला मारायला लागतो..

वृषभ आणि टॉनी मिळुन रोहनला धरतात..

शौर्य : मी काही नाही केलय रोहन.. हे सगळं हिने केलंय..

वृषभ : शौर्य खोटं बोलणं थांबव.. 

रोहन : मला अस वाटत आपण पोलिस कंप्लॅन्ट करावी..

मनवी : नाही नको.. त्याच्या चुकीची शिक्षा मला मिळेल.. लोक मला कसल्या नजरेने बघतील रोहन.... घरातुन बाहेर पडण माझं मुश्किल होऊन जाईल माझं.. 

रोहन : तुझ्याकडे का बघतील लोक.. चुक तर ह्याची आहे.. आणि मी आहे ना सोबत तुझ्या.. तु का घाबरतेस??

मनवी : मी नाही घाबरत रोहन.. पण माझा डॅड.. तो तर घाबरेल ना.. त्यात डॅडला हार्टचा प्रॉब्लेम आहे.. त्याला हे सहनच नाही होणार..

(मनवी रडतच सांगु लागली)

शौर्य : मनवी खोटं बोलणं थांबव.. आणि मी काय केलंय तुला??

मनवी : शौर्य तुच मला मेसेज करून इथे बोलवलंस हे पण खोटं आहे..

(मनवी रडतच शौर्यला बोलु लागली)

शौर्य : मी नाही तुला मेसेज केला.. हे तुला पण चांगलं माहितीय..

समीरा : शौर्य तु खोटं बोलणं थांबव.. प्लिज.. 

शौर्य : समीरा मी खोटं नाही बोलत ही खोट बोलतेय..

रोहन : तुझा मोबाईल दाखव..

शौर्यच्या खिश्यातुन जबरदस्ती त्याचा मोबाईल काढतच रोहन त्याला त्याने केलेले मेसेज दाखवतो.. 

काय आहे हे???  बोलणं.. काय आहे हे..

(रोहन शौर्यची कॉलर धरतच त्याला त्याच्या मोबाईल वरून त्याने मनवीला केलेलं मेसेज दाखवत बोलला)

शौर्य : हा मेसेज मी नाही केलाय यार.. तो...

मनवी : शौर्य स्टॉप.. पुन्हा तु खोटे आरोप करतोयस माझ्यावर.. मला इथे थांबायचंच नाही.. रोहन प्लिज चल इथुन मी नाही थांबु शकत इथे जास्त.. आणि तु समीरा.. विश्वास आत्ता तरी बसला ना तुझा??

(शौर्य पुढे काही बोलणार तोच मनवी रोहनचा हात धरत त्याला तिथुन घेऊन जाऊ लागली.)

शौर्य : समीरा एकदा मला एक्सप्लॅन करायला दे.. प्लिज.. 

समीरा : तु काय एक्सप्लॅन करणार शौर्य.. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय.. आणि एवढ सगळं होऊन सुद्धा तुझ्याकडे एक्सप्लॅनेशन आहे..?? नशीब आम्ही वेळेवर पोहचलो नाही तर तु काय केलं असतस हिच.. मला तर विचारच करवत नाही.. तुझ्यासारख्या रेपिस्ट मुलाच्या मी प्रेमात पडली हिच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुक.. ह्यापुढे माझ्या नजरेसमोर कधीच येऊ नकोस तु शौर्य.. 

समीरा मनवीला पकडत तिथुन घेऊन जाऊ लागली..

शौर्य : समीरा अस नको ना बोलुस.. ती खोटं बोलतेय यार..

(शौर्य आपलं डोकं धरतच सगळ्यांना रिक्वेस्ट करत होता.. पण कोणी त्याच बोलणं ऐकून घेत नव्हतं..सगळे रागातच तिथुन निघाले)

शौर्य तिथुन निघुन सरळ आपल्या रूममध्ये येतो.. डोकं धरतच तो बेडवर आडवा होतो..

वृषभ : मला विश्वासच नाही बसत शौर्य अस काही करेल.. 

रोहन : लास्ट टाईम तो मुंबईला असताना रात्री 12 नंतर त्याला आपण व्हिडीओ कॉल केलेला तेव्हा तो त्या ज्योसलीनच्या बेडरूममध्ये होता.. तेव्हाच आपल्याला कळायला हवं होत तो कसा आहे ते..

(रोहन अस बोलताच समीरा त्याच्याकडे बघतच रहाते..)

वृषभ : पण तो बोलला होता की..

रोहन : तो काहीही रिजन देईल वृषभ.. तुला पटलं ह्याचा अर्थ असा नाही की मला पण पटेल.. आणि मुळात तु त्याची वकिलीगिरी करणं बंद कर वृषभ.. 

वृषभ : ए रोहन तु माझ्यावर का भडकतोयस.. मला पण नाही पटलं यार त्याच वागणं..

रोहन : म्हणुन तर त्याला मारताना तु मला अडवत होतास.. मला जर तु आज धरलं नसत तर आज माझ्या हातुन खरच त्याच बर वाईट झालं असत..

वृषभ : काही होऊ नये म्हणुनच मी तुला धरलं.. आणि प्लिज तु जरा शांत हो..

(समीरा दोन्ही हात आपल्या तोंडावर ठेवुन रडत होती..)

सीमा : समीरा ह्यात तुझी काहीच चुक नाही ग.. तु का रडतेस.. ते पण असल्या रेपिस्ट मुलासाठी...

राज : समीरा नको ना रडुस अस..

सगळेच शांत बसतात.. थोड्या वेळाने समीरा डोळे पुसुन शांत बसुन रहाते..

राज : आर यु ओके??

समीरा : हम्मम्म..

वृषभ : गाईज मला अस वाटत हे सगळं आपण आपल्यातच ठेवुयात?? म्हणजे कॉलेजमध्ये गॉसिप नको ह्या विषयावर.. मनवीलाच त्रास होईल ह्या गोष्टीने..

टॉनी : मला पण असच वाटत.. तस पण आपणच होतो तिथे.. आपल्या शिवाय कोणाला काही कळणार पण नाही..

सगळेच आत्ता मनवी आणि रोहनच्या बाजुने होते.. तिला धीर देत आणि सोबतच शौर्यबद्दल डिस्कशन करत तिथेच बसुन होते.. मनवी सोबत अस झाल्यामुळे एन्युअल फंक्शन कोणीच अटेंड केलं नाही.. 

★★★★★

दुसऱ्यादिवशी सकाळी शौर्य उठतो.. काल घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोरून अगदी जसाच्या तसा येऊ लागतो. हातात मोबाईल घेत तो समीराला फोन लावतो..

फोनची एक रिंग होते आणि फोन कट होतो.. शौर्य वारंवार समीराला फोन लावतो पण.. प्रत्येक वेळेला एक रिंग होते आणि फोन कट होत असतो.. कारण समीराने त्याचा फोन ब्लॉकवर टाकलेला.. तो लगेच रोहनला फोन लावतो.. रोहनच्या बाबतीत पण असच होत असत.. एक रिंग होते आणि फोन कट होतो.. मोबाईल तसाच बेडवर आपटत डोक्याला हात लावुन विचार करू लागतो.. आणि तसाच रूमबाहेर पडत वृषभच्या रुमचा दरवाजा ठोकतो..

वृषभ दरवाजा उघडुन रागातच त्याच्याकडे बघतो..

शौर्य : वृषभ मी काहीच नाही केलंय रे.. ते सगळं मनवी आणि त्या फैयाजने मिळुन केलंय. प्लिज माझ्यावर विश्वास ठेव..

वृषभ : तुला स्टोरी बनवायला पण उत्तम जमत शौर्य.. तुझं झालं असेल तर जाऊ शकतोस.. आणि ह्यापुढे आमच्याशी बोलत जाऊ नकोस.. तुझ्यासारखा रेपिस्ट मुलासोबत आम्ही फ्रेंडशिप नाही ठेवु शकत..

शौर्य : वृषभ तुला फ्रेंडशिप नाही ठेवायची तर नको ठेवुस पण अस रेपिस्ट नकोना बोलुस.. 

वृषभ: तु रेपिस्टच आहेस शौर्य.. आणि प्लिज जा इथुन..

वृषभ धाड करून शौर्यच्या तोंडावर दरवाज लावुन घेतो..

शौर्य : वृषभ प्लिज माझं ऐकुन घे.. फक्त एकदाच..

(शौर्य वृषभचा दरवाजा जोर जोरात ठोकतच बोलला)

राज आणि टॉनी बाहेर येऊन बघतात.. शौर्यच लक्ष त्या दोघांकडे जात.. आणि तो त्याच्याकडे जाणार तस ते लोक पण दरवाजा बंद करून घेतात..

आजु बाजुला असणारे इतर स्टुडंन्ट पण बाहेर येऊन काय चालु असत ते बघत असतात.. शौर्य डोळ्यात येणार पाणी पुसतच आपल्या रूममध्ये जातो..  दुसऱ्यादिवशी पासुन एक्साम चालु होणार असते.. शौर्यला अस वाटत असत की समीरा आपल्यावर विश्वास ठेवेल.. उद्या तिच्याशी बोलुन काल जे घडलं ते तिला सांगाव..

इथे समीरा काल घडलेला संपुर्ण प्रसंग विसरून पुस्तकात डोकं घालुन अभ्यास करते..

सीमा : समीरा..तु खरच ठिक आहेस ना??

समीरा : हम्मम्म.. 

सीमा : ओके.. अभ्यास झाला तुझा..??

समीरा : हम्मम थोडा फार..

सीमा : शौर्यबाबत काय ठरवलंयस?? 

समीरा : ठरवायच काय सीमा त्यात... मला नकोय तो माझ्या लाईफमध्ये परत.. आणि प्लिज परत शौर्यच नाव नकोय मला.. 

सीमावर थोडं भडकतच समीरा बोलली..

दुसऱ्यादिवशी शौर्य समीराची वाट बघत कॉलेजच्या गेटजवळच उभा रहातो.. समीरा येताना दिसताच तो तिच्या जवळ जात तिच्याशी बोलण्याचा प्रयन्त करतो..

शौर्य : समीरा मला तुझ्याशी बोलायचंय.. प्लिज.. 

समीरा : सीमा आपल्याला आधी क्लासरूम बघावा लागेल.. लास्ट टाईम सारखाच आला तर खुप बर होईल..

सीमा : हो न..

शौर्य : समीरा मी तुझ्याशी काही तरी बोलतोय.. तु अस का वागतेस..??

समीरा नोटीसबोर्डवर तिचा क्लासरूम ह्या वेळेला कुठे आलाय ते पाहु लागली..

वृषभ : एवढं नको बघुस.. लास्ट टाईमसारखच सिटिंग अरेंजमेंट आहे..

वृषभ मागे येऊनच समीराला बोलला..

समीरा : बर झालं.. बाय दि वे बेस्ट ऑफ लक.. 

वृषभ : सेम टु यु.. 

शौर्य : समीरा मला त्रास होतोय तुझ्या अश्या वागण्याचा.. तुम्ही लोक माझं काहीही ऐकुन न घेता माझ्यासोबत अस कस वागु शकता..??

समीरा : पाच मिनिटं उरलेत. मी माझ्या क्लासरूममध्ये जाऊन बसते.. बाय...

समीरा सोबत सगळेच शौर्यकडे न बघताच आपापल्या क्लासरूममध्ये निघुन जातात..

हे शौर्य... बेस्ट ऑफ लक... मागुन फैयाज येतच शौर्यला बोलतो...

फैयाजला बघुन शौर्य सरळ आपल्या क्लासरूमध्ये जाऊन बसतो... फैयाज पण त्याच्या मागे मागे जातो.. पण तोच बेल वाजते..

फैयाज : ए शौर्य.. बादमे मिलता हु तुझे.. 

(फैयाज तिथुन निघून जातो)

शौर्य फैयाजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपल्या डेस्कवर जाऊन बसतो.. तो क्लासरूमध्ये येताच रोहन त्याच्याकडे रागात बघत असतो.. पण शौर्यच क्लासरूममध्ये कोणाकडेच लक्ष नसत.. डोक्यावर हात ठेवुन तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो..

कॉलेजची बेल होताच सर क्लासरूममध्ये क्वेशन पेपर आणि सोबतच अन्सर शीट डिस्ट्रिब्युट करतात.. पेपर हातात येताच रोहनला गेल्या वेळेला शौर्यने त्याला कशी मदत केली ते आठवु लागत.. तशी त्याची नजर शौर्यकडे जाते.. शौर्य डोक्याला हात लावुन बसला असतो.. जवळपास अर्धा तास होऊन जातो तरी शौर्य तसाच बसुन असतो.. रोहन स्वतःचा पेपर लिहितच अधुन मधुन एक नजर त्याच्याकडे फिरवत असतो..

सर फेरी मारत असताना त्यांचं लक्ष शौर्यकडे जात.

आर यु ओके... त्याच्या खांद्यावर हात ठेवतच ते विचारतात..

अचानक कोणी तरी येऊन हात ठेवल्याने शौर्य थोडं घाबरतो.. 

सर : Are you ok??

शौर्य मानेनेच हो बोलतो.. आणि पेपर लिहायला सुरुवात करतो.. अर्धा तास पेपर लिहुन तो जागेवरच उठुन उभं रहातो..

नाटकी... रोहन मनातल्या मनात बोलतो.. त्याला अस वाटत असत की शौर्य पुन्हा नवीन अन्सरशीट मागण्यासाठी उभा आहे.. पण शौर्य उठुन उभं रहातो.. डेस्कवर ठेवलेलं त्याच पेन उचलुन आपल्या जीन्सच्या खिश्यात ठेवतो आणि सरळ समोर चेअर घेऊन बसलेल्या सरांकडे आपला पेपर सबमिट करतो.. आणि तिथुन निघुन जातो..

रोहन सकट संपुर्ण क्लास त्याच्याकडे एकदम चकित होऊन बघु लागतो.. रोहन मनवीकडे आपली नजर फिरवतो.. मनवीच संपुर्ण लक्ष शौर्यकडेच असत.. शौर्य पेपर देऊन जसा बाहेर पडतो तस त्याच्या मागोमाग मनवी पण पेपर सबमिट करते.. आणि क्लासरूम बाहेर पडते.. ती शौर्यला शोधतच कॉलेजच्या गेटबाहेर पडते..पण शौर्य कुठे दिसत नसतो..

शट गेला वाटत हा हॉस्टेलमध्ये.. अस बोलत नाराज होतच ती पुन्हा मागे फिरते तस रोहन तिच्या मागे उभा असतो..

रोहन : तु लवकर का बाहेर आलीस??

रोहनला अस अचानक मागे बघुन मनवी थोडं घाबरते..

मनवी : मला काही येतच नव्हतं.. मग बसुन काय करू??

रोहन : शौर्य निघाल्यावर लगेच बाहेर यायची काय गरज होती तुला..

मनवी : उद्याच्या पेपरची तैयारी नको का करायला.

रोहन : तु तो गेल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी पण बाहेर पडु शकत होतीस ना.. तुझ्यामुळे मी माझा पेपर सोडून आलोय मनवी..

मनवी : पण तुला बाहेर यायची काय गरज होती.. आणि प्लिज माझ्यावर ओरडणं थांबव.. मला नाही आवडत माझ्यावर कोणी ओरडलेलं..

रोहन : मी ओरडत नाही मनवी.. मी सांगतोय तुला.. 

मनवी : मी घरी जाऊ?? उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचाय..

रोहन : मी सोडतो तुला..

रोहनला मनवीच वागणं थोडं फार खटकत होत पण तो जास्त विचार न करता तिला घरी सोडतो.. 

रूमवर येऊन लॅपटॉप उघडुन त्यात डोकं घालून बसतो.. पण आज लॅपटॉपमध्ये पण त्याच मन रमत नसत..

दुपारी लंचसाठी तो रूममधुन बाहेर पडतो.. आपल जेवण ताटात घेऊन एका टेबलवर एऊन बसतो.. तस त्याच लक्ष समोर बसलेल्या त्याच्या मित्रांकडे जात.. तिघेही रागात त्याच्याकडे बघत तिथुन उठून दुसऱ्या टेबलवर जाऊन बसतात.. शौर्य शांतपणे ताटात घेतलेलं जेवण संपवतो आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसतो..

रात्री विरचा फोन येतो.. त्याच्यासमोर तो अगदी नॉर्मल आहे अस दाखवतो... अभ्यासाच कारण देऊन तो त्याच्याशी जास्त न बोलता फोन ठेवुन देतो..

सलग चार पेपर असेच जातात.. शौर्य आपल्या मित्र मंडळींची समजुत काढण्यासाठी त्यांच्या मागे मागे जात असतो.. पण त्याच कोणीही काहीही ऐकत नसतात.. तो आपल्याला दिसतच नाही असे सगळे वावरत असतात.. 

तोच अचानक रात्री मनवी त्याला फोन करते.. शौर्य तिचा फोन उचलतो..

शौर्य : अजुन काय हवंय तुला??

मनवी : त्यादिवशी तर बोलले मी तुला.. मला तु हवा आहेस..

शौर्य : मनवी तुला कळत तु काय वागलीस ते... तुला हृदय नावाचा प्रकार आहे का ग?? एवढं कठोर एखादी मुलगी कशी काय वागु शकते..? हे मला खरच समजत नाही.. 

मनवी : मला जी गोष्ट हवी असते ती मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते..

शौर्य : आय नो मनवी... तु खरच काहीही करू शकते.. मला स्टेरकेजवरून पाडू शकते.. समीरात आणि माझ्यात मिसअंडरस्टेंडिंग क्रिएट करू शकते.. तु आणलेलं शर्ट मी घालावं म्हणुन मुद्दामुन कपड्यांवर ड्रिंक पाडुन मला ते घालायला लावु शकतेस.. यु नो..मी आत्ता तुझ्याबद्दल जर सांगायला लागलो ना तर कदाचित सकाळ होईल.. एवढं तु वाईट वागत आलीस मनवी.. तु अशी वागूच कशी शकतेस...

मनवी : सुरुवातीला मला रोहन आवडायचं शौर्य.. आणि तो तुझ्या पुढे जावा म्हणुन मी ते जाणुन बुजून स्टेरकेजवरून तुला पाडल..पण मी सॉरी पण बोलली ना शौर्य.. आणि त्यानंतर जे मी वागली ते फक्त तुझ्यासाठी.. मला तु आवडतोस शौर्य..

शौर्य : मनवी बस कर.. तो फैयाज तुझ्याशी फिजिकली होतोय हे बघून मी तुला वाचवत होतो आणि तु माझ्यावरच खोटा आळ घेतलास.. तुला अस वागताना जरा पण काहीच कस नाही वाटलं ग.. 

मनवी : जर तस नसत केलं मग समीरा तुझ्यापासुन दूर कशी गेली असती शौर्य.. तु का नाही समजत आहेस माझं प्रेम.. आय रिअली लव्ह यु..

शौर्य : आय हॅट यु.. मला तर तु कधीच आवडली नव्हतीस.. आत्ता तर अजिबातच आवडत नाहीस आणि ह्यापुढे कधीच आवडणार पण नाहीस.. पुर्ण लाईफ खराब केलीस तु माझी.. आयुष्यभर रेपिस्ट म्हणुन मला जगावं लागेल ते ही तुझ्या चुकीमुळे.. आणि मुळात मलाच नाही कळत मी माझं पुढच आयुष्य जगेल का.. आणि प्लिज मला फोन नको करुस.. गेट लॉस्ट..

मनवीच पुढच बोलणं ऐकून न घेता शौर्यने फोन कट केला.. मनवी वारंवार शौर्यला फोन लावत असते पण शौर्य तिचा फोन उचलतच नसतो..

अश्यातच सेकंड लास्ट पेपर दिवस उजाडतो..  शौर्य गेटवर उभं राहुन समीराची वाट बघत उभा असतो.. समीरा आजही त्याला इग्नोर करत तिथुन निघुन जाते.. शौर्य सरळ तिच्या समोर जाऊन उभं राहतो.

शौर्य : समीरा तु एवढं कठोर का वागतेय माझ्यासोबत..

समीरा : रेपिस्ट सोबत असच वागतात शौर्य..

शौर्य : समीरा मी रेपिस्ट नाही आहे.. आणि हे सगळं माझ्या सहन शक्ती पलीकडे चाललंय.. एवढं पण नको ना वाईट वागुस समीरा माझ्यासोबत.. तु माझ्या आयुष्यात नाही हे सहन नाही होणार ग मला.. तु का नाही समजत माझ्या फिलींग.. तुला खरच अस वाटतंय मी अस काही करेल..?? 

समीरा : हो.. मी माझ्या डोळ्यानी बघितलंय शौर्य.. आणि प्लिज नको येऊस माझ्या नजरेसमोर.. तु माझ्या नजरेसमोर आलास की त्रास होतो मला.. 

समीरा शौर्यला बाजूला करतच तिथुन जाऊ लागली.. 

समीरा : शौर्य... 

समीराचा आवाज ऐकुन शौर्य मागे वळुन बघतो..

समीरा आपल्या हातातल शौर्यने दिलेलं ब्रेसलेट त्याला परत देण्यासाठी आपला हात पुढे करते.. शौर्य फ़क्त बघतच रहातो.. तुझ्या ज्योसलीन ला दे.. तिच्या हातात हे छान दिसेल हे... अस बोलत समीरा त्याचा हात पुढे करत त्यावर ब्रेसलेट ठेवुन तिथुन निघुन जाते.. शौर्य तिला फक्त आपल्या नजरेसमोरून अस जाताना बघत रहातो.. 

तिथुन तो वॉशरूममध्ये जातो.. तोंडावर पाणी मारतच थोडं फ्रेश होतो.. मिररमध्ये स्वतःचा चेहरा बघतो.. गळयात समीराने दिलेली चैन असते आणि त्यात लटकत असलेलं अर्ध हृदय.. एक खोल श्वास घेत तो ती चैन काढतो आणि खिश्यात ठेवुन देतो.. वॉशरूम मधुन बाहेर पडणार तोच फैयाज त्याला जोरात आत ढकलतो..

फैयाज : अरे सॉरी मेने देखा नही.. 

शौर्य त्याच्याशी काहीही न बोलता जाऊ लागला..

फैयाज : बोला था ना 4th फ्लॉर याद रखं.. तु भुल कैसे गया यार.. पर फिर भी मानना पडेगा तुझे.. रोहन को बचाने के लिये भागते भागते तु 4th फ्लॉरपर आ गया.. बाय दि वे पहली बार नशा किया ना तुने.. मजा आया तुझे..?? मुझे तो तुझे उस हालत में देखकर बहोत मजा आया.. ज्यादा मजा तो मनवी के साथ.. 

शौर्य : प्लॅनिंग बहोत अच्छा था तेरा..पर आज तेरे पे गुस्सा नही आ रहा मुझे.. उलटा में तुझे थेंक्स बोलूंगा.. यु नो व्हॉट.. अगर तु ये गेम खेलता नही तो मुझे पता ही नही चलता की समीरा मेरे पे ट्रस्टही नही करती.. ऐसी लडकी मुझे मेरे लाईफ में चाहीये भी नही जो मुझे समझ कर ही ना ले.. और ना ऐसे दोस्त.. प्यार में विश्वास भी जरुरी हे ना.. समीरा ने वही नही किया..इट्स ओके.. में उसको ब्लेम नही करुंगा.. और अभि कर भी नही सकता ना.. जाने दे.. मेरा भाई बोलता हे हमेशा जो होता हे वो अच्छे के लिये.. शायद आज समझमें आ रहा हे मुझे.. शायद अब कुछ ज्यादा अच्छा होगा मेरे लाईफ में.. 

बाय दि वे.. ये अपनी लास्ट मुलाकात रहेगी.. बट जाते जाते एक सजेशन जरूर दुगा तुझे फैयाज,  प्लिज किसी और के साथ ऐसा गंदा गेम मत खेल.. नही सेह सखेगा कोई.. एन्ड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर..

शौर्य एक स्माईल त्याला देऊन तिथुन निघुन जायला वजातो.. फैयाज त्याच्याकडे बघतच रहातो.. शौर्य वॉशरूमच्या दरवाजा जवळ जाऊन बघतो तर राज असतो.. राज ने सगळं बोलणं ऐकलं असत..

राज : शौर्य..

शौर्य राजकडे न बघताच तिथुन बाहेर पडतो...आणि आपल्या क्लासरूममध्ये येतो.. शौर्य आत येताच सगळे त्याच्याकडे बघत त्याच्या पाठी असणाऱ्या ब्लॅकबोर्डकडे बघतात आणि आपापसात चर्चा करू लागतात.. शौर्य ब्लॅकबोर्डकडे बघतो.. तस त्याच्या डोळ्यांतुन पाणी येऊ लागत.. ~SHAURY IS REPIST...~ अस मोठ्या अक्षरात कोणी तरी लिहिलेलं असत.. शौर्य डोळ्यातल पाणी पुसतच तो आपल्या डेस्कवर येऊन बसतो.. थोड्याच वेळात रोहन आणि मनवी क्लासरूममध्ये  येतात.. रोहनच लक्ष पण ब्लॅकबोर्डजवळ जात तस तो तिथे उभं राहूनच शौर्यकडे बघतो.. शौर्य डेस्कवर डोकं ठेवुन बसला असतो.. रोहन आणि मनवी आपापल्या जागेवर जाऊन बसतात.. सर क्लासरूममध्ये येतात.. ब्लॅकबोर्डकडे बघतच शौर्यकडे नजर फिरवतात आणि डस्टर घेऊन ब्लॅकबोर्डवर जे लिहिलं ते पुसुन टाकतात.. नेहमी सारखच शौर्य अर्धा तास पेपर लिहितो आणि तिथुन जायला निघतो.. त्याच्या मागोमाग मनवीसुद्धा क्लासरूममधुन निघते.. रोहनला आत्ता मात्र मनवीवर खूप राग येत असतो.. त्यादिवशी एवढं सांगुन ही परत अस का करतेय.. तो पण लगेच पेपर सबमिट करतो आणि पळतच मनवीच्या मागे जातो.. मनवी शौर्यला आवाज देऊन थांबवणार तोच रोहन तिला आवाज देतो.. 

रोहन : मनवी काय चालू आहे तुझं?? तु तो निघाल्यावर लगेच का निघतेस??

मनवी : तुझं काय चालु आहे. मी बाहेर निघाल्यावर तुला लगेच बाहेर यायची काय गरज आहे..

रोहन : गरज काय म्हणजे..?? त्यादिवशी काय झालंय तुझ्यासोबत माहिती ना?? काळजी वाटते तुझी..

मनवी : झालं तुझं मी निघु??

रोहन : मनवी तु बरी आहेस ना??

मनवी : मी बरी आहे.. पण मला अस वाटत तु बरा नाहीस.. तुला अस का वाटत की शौर्य निघाल्यावरच मी निघते.. कोईनसिडेंट पण असु शकतो ना.. आणि मी उठून उभी राहिली तेव्हा मला तो निघालाय ते दिसलं.. आणि प्लिज रोहन मी अस निघाल्यावर तुला लगेच निघुन बाहेर यायची काहीही गरज नाही..

रोहन : मला तुझ्याशी कस बोलाव ना तेच कळत नाही.. 

मनवीला बाजुला करत तो बाईकवर जाऊन बसला.. तुला सोडु का मी जाऊ??

मनवी : मी लायब्ररीत जातेय मला बुक घ्यायचीय.. 

रोहन : मी थांबतो इथे तु जाऊन ये..

इथे वृषभ पण आपला पेपर देऊन क्लासरूम बाहेर पडतो.. 

मनवी 3rd फ्लॉरच्या स्टेरकेज जवळ फैयाजसोबत बोलत होती.. वृषभला तिला अस त्याच्यासोबत बोलताना बघुन थोडं आश्चर्य वाटत.. त्या दोघांच काही बोलणं ऐकु येत का हे बघायला वृषभ थोडं पुढे जातो.. पण त्याला दोघांच बोलणं काही ऐकु येत नसत.. फक्त त्यांच काय चालु असत ते तो बघत असतो..

फैयाज : प्रिंसिपल को लेकर आने तक तो वहापे रुक सकती थी ना । पुरा प्लॅन तुने बिघाड दिया..।  में प्रिंसिपल को लेकरं वहापे पोहचने ही वाला था ।

मनवी हाताची घडी घालुन फक्त त्याच्याकडे रागात बघत असते..

फैयाज : अकेले में बात करने के किये में पागल नही हुं समझी.. तेरे से बात कर रहा हुं में..

फैयाज अस बोलताच मनवी जोरातच एक कानाखाली त्याला मारते.. 

मनवी : फस्ट अ फॉल तेरी हिंमत कैसे हुई उस दिन मुझे हात लगाने की.. प्लॅन तुने बिघाडा मेने नही.. समझा... आईंदा से येह अपनी गंदी शकलं मेरे सामने मत लेकर आ..

मनवी रागातच त्याला बोलुन लायब्ररीच्या दिशेने येऊ लागली.. तस वृषभ तिला दिसतो.. वृषभला अस अचानक समोर बघुन ती घाबरते..

मनवी : कसा होता पेपर??

वृषभ : तु फैयाजसोबत काय बोलत होतीस..

मनवी : ते.. तो मला त्यादिवशी काय घडलं ते विचारत होता.. बट मी केलं मॅनेज..

वृषभ मनवीसोबत काहीही न बोलता तिथुन निघतो..

मनवी वृषभला अस जाताना बघते पण जास्त विचार न करता सरळ लायब्ररीत जाते.. खुप वेळ झाला मनवी अजुन आली ना म्हणुन रोहन बाईक स्टॅंडवर लावतो आणि पुन्हा कॉलेजमध्ये जायला निघतो.. तोच त्याला वृषभ कॉलेजमधुन बाहेर पडताना दिसतो..

रोहन : कसा होता पेपर..??

वृषभ : होता कसातरी..

रोहन : काय झालं?? कठीण गेला का पेपर??

वृषभ : मनवीसोबत अस काही झालं हे फैयाजला कस कळलं?? हे तर आपल्या लोकांनाच माहीत होतं ना.. 

रोहन : तु काय बोलतोयस..??

वृषभ : मला अस वाटत मनवी आपल्यापासुन काही तरी लपवतेय..

रोहन : तुला अजुन पण तुझ्या शौर्यचा पुळका आहे का.. तर निघ इथुन..

रोहन त्याला बाजुला ढकलतच लायब्ररीच्या दिशेने जातो..

वृषभ हॉस्टेलमध्ये येऊन बघतो तर शौर्यच्या रूमला बाहेरून कडी लावलेली असते..

हा अजुन एक्साम देत असेल अस त्याला वाटत.. तो रूममध्ये जाऊन थोडं विचार करू लागतो..

थोड्याच वेळांत राज आणि टॉनी पण येतात रूममध्ये.. 

राज रूमवर आल्या आल्या टॉनीला घेऊन वृषभच्या रूममध्ये येतो.. आणि त्यांना सकाळी वॉशरूममध्ये जे त्याने ऐकलं ते सांगतो..

वृषभ : पण तिथे फैयाज कुठे होता??

राज : मला नाही माहीत पण मी त्या दोघांच बोलणं ऐकलं.. 

टॉनी : मला अस वाटत आपण शौर्यला काय बोलायच होत ते ऐकून घ्यायला हवं होतं..  बट जाऊ दे आत्ता जाऊन विचारुयात त्याला..

राज : तो अजुन रूमवर नाही आलाय.. कडी आहे त्याच्या डॉरला बाहेरून.. तिघेही अधुनमधुन बाहेर येऊन शौर्यची रूम बघतात.. दुपारचे 2 वाजुन जातात पण शौर्यचा काही पत्ता नसतो.. वृषभ त्याचा नंबर ब्लॉक वरून काढुन टाकत त्याला फोन लावतो... पण शौर्यचा फोन स्विच ऑफ येत असतो..

★★★★★


इथे शौर्य दिल्लीला बाय करत कायमचा मुंबईला आला असतो...

ए शौर्य.... तु खरंच आलायस??? ज्योसलीन आपली स्कुटी स्टॅंडवर लावत धावतच शौर्यजवळ येत बोलली..

शौर्य : आत्ता दिसतोय ना तुला इथे.. मग आलोच असेल..

जोसलीन : कधी आलायस??

शौर्य : ज्यो तुला माझ्या हातात बेग दिसतेय?? 

ज्योसलीन : हा दिसतेय.. म्हणजे आत्ताच आलास का??

शौर्य : हो...

ज्योसलीन : पण तुझी एक्साम तर मंडेला संपणार होती.. आज तर वेडनेस  डे आहे...

शौर्य : तुला नाही आवडल का मी अस लवकर आलेलो??

ज्योसलीन : मला का नाही आवडणार.. उलट बर झालस तु आलास.. आमची एक्साम आजच संपली.. आम्ही आज डिस्कोमध्ये जातोय.. आत्ता तुला पण घेऊन जाऊ डिस्कॉत.. बी रेडी शार्प 7 PM..

शौर्य : मी नाही येत कुठे.. तुम्ही एन्जॉय करा.. आणि बेस्ट ऑफ लक.. एक्सामला जायला उशीर होत असेल तुला.. आपण नंतर बोलूयात.. बाय...

ज्योसलीन : ए मेड मी कॉलेजमधुन आलीय जस्ट..

शौर्य : ज्यो आपण प्लिज थोड्या वेळाने बोलूयात ना.. मी नंतर येतो तुला भेटायला हवं तर..

शौर्य ज्योसलीन पुढे काय बोलते हे ऐकायला न थांबता सरळ आपल्या घरात शिरला..

असा काय हा?? ज्योसलीन स्वतःच्याच मनाला प्रश्न करू लागली..बहुतेक दमुन आला असेल म्हणुन पण असेल.. स्वतःच्या प्रश्नाच उत्तर स्वतःच देत ती तिथुन आपल्या घरी निघते.

अरे छोटे साहेब तुम्ही.. शौर्यला अचानक आलेलं बघुन घरात काम करणारे त्याच्या ओळखीचे काका विचारू लागले..

शौर्य : मम्मा??

मॅडम तर कुठे तरी मिटिंगसाठी गेलेत.. उद्या रात्री येणार..

शौर्य : आणि विर??

ते तर सकाळीच कामावर निघुन गेलेत..

शौर्य : बर... 

पुढे काहीही न बोलता शौर्य सरळ आपल्या रूममध्ये निघुन येतो.. तोच त्याला ब्रुनोच्या भूकण्याचा आवाज येऊ लागतो.. जणु ब्रूनोला पण कळलं असत कि शौर्य आलाय.. तो बेग तशीच बेडवर टाकतो आणि ब्रूनोचा आवाज जिथुन येतो त्या दिशेने जातो.. ब्रुनोचा आवाज त्याला विरच्या रूममधुन येत असतो.. रूम उघडताच ब्रुनो शौर्यच्या अंगावर उडी मारत मोठं मोठ्याने त्याच्यावर भुकु लागतो. शौर्य त्याला एक घट्ट मिठी मारत आपल्या रूममध्ये घेऊन येतो.. रूमच्या गेलरीत बसुन ब्रुनोला कुशीत घेत तो रडु लागतो..

साधारण संध्याकाळ होते.. ज्यो आणि इतर मित्रमंडळी शौर्यला आवाज देत असतात.. पण तो खिडकीत येत नाही हे बघुन सगळे त्याच्या रूममध्ये येतात..

शौर्य झोपला असतो..

सगळेच त्याला उठवु लागतात.. शौर्य डोळे चोळतच उठतो..

शौर्य : तुम्ही.. काय झालं??

रॉबिन : आपण डिस्कॉमध्ये जातोय.. चल ना.. 

शौर्य : मला झोप येतेय यार.. प्लिज नको ना.. तुम्ही जावा..

नैतिक : ए SD यार.. संध्याकाळचे सात वाजलेत आत्ता कुठे झोपतोयस तु.. उठ बघु.. आणि तु येतोयस हा.. आम्हाला काही माहीत नाही..

सगळेच जबरदस्ती करत त्याला तैयार करत आपल्या सोबत घेऊन डिस्कॉमध्ये जायला निघाले..

रॉबिनने स्वतःची कार आणलेली.. सगळे जाऊन रॉबिनच्या गाडीत बसले..  गाडीत दंगा मस्ती चालु होता.. पण शौर्यच मात्र कश्यातच लक्ष लागत नव्हत.. त्याला तो पहिल्यांदा रोहनच्या गाडीत बसुन डिस्कॉला जात असतानाचा दिवस आठवतो.. त्यात त्याने समीरासाठी गायलेलं गाणं.. आणि त्या वेळेला त्याची चाललेली दंगा मस्ती..

ज्योसलीन : शौर्य तु शांत शांत का आहेस?? काही प्रॉब्लेम आहे का??

शौर्यच ज्योसलीच्या बोलण्याकडे लक्षच नसत..

रॉबिन गाडी जवळच असलेल्या डिस्कॉजवळ पार्क करतो..

सगळे गाडीतुन उतरतात..

शौर्य काय झालंय?? ज्योसलीन शौर्यजवळ जात पुन्हा त्याला विचारते.. 

शौर्य : कुठे काय?? ते थोडं झोप मोड झाली ना... म्हणुन डोकं दुखतंय..

ज्योसलीन : नक्की ना शौर्य?? काही दुसरा प्रॉब्लेम नाही ना..

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

सगळे आत डिस्कॉमध्ये शिरतात. आत शिरताच डीस्कॉमध्ये वाजणाऱ्या गाण्यावर डान्स करायला लागतात.. जबरदस्ती शौर्यचा हात पकडतच त्याला नाचायला लागतात.. शौर्यपण त्यांच मन मोडत नाही.. तो त्यांच्यासोबत थोडं नाचतो.. आणि बाजुला जाऊन बसतो.. त्याला समीरा आणि इतर मित्र मंडळीच त्यांच्यासोबतच वागणं आठवत असत.. अक्षरशः दोन्ही कान घट्ट बंद करत तो थोडा वेळ तसाच बसुन रहातो.. पण तरीही डोकं त्याच शांत अस होत नसत.. खुप रडु येत असत त्याला... स्वतःवर कंट्रोल त्याच राहिलेलं नसत.. कारण तो पुन्हा डिप्रेशनमध्ये जात असतो.. 

नैतिक आणि रॉबिन त्याच्याजवळ येऊन बसतात.. दोघे स्वतःसाठी ड्रिंक ऑर्डर करतात..

रॉबिन : आज तर मी खुप पिणार.. एक्साम मुळे डोकं खुप आऊट झालेलं माझं.. 

नैतिक : माझं पण यार.. मी पण आज डोकं शांत करणार माझं..

शौर्य त्यांच बोलणं ऐकत असतो..

शौर्य : मला पण डोकं शांत करायचं माझं..

शौर्य अस बोलताच दोघेही त्याच्याकडे बघु लागतात.. 

नैतिक : तु दिल्लीत जाऊन ड्रिंक करायला लागला का?? ग्रेट.. 

नैतिक त्याच्यासाठी पण ड्रिंक ऑर्डर करतो..

शौर्य पहिल्यांदाच स्वतःच्या मर्जीने ड्रिंक करत असतो.. अजुन एक अजुन एक अस करत खुप सारे ड्रिंकने भरलेले ग्लास तो पित असतो..

रॉबिन : हे शौर्य बस यार.. खुप घेतोयस तु.. 

शौर्य : डोकं शांत नाही होत यार माझं.. मला अजुन हवंय...

नैतिक : तुला झालं काय आहे?? चल इथून..

शौर्य रागातच हातातील ग्लास खाली आपटतो.. फ्लॉर पुर्ण शांत होत.. शौर्यचे मित्रमंडळी त्याच्याजवळ येतात..

ज्योसलीन : काय चाललंय?? शौर्य तु ड्रिंक केलंस??

शौर्य : मी बोललो ना मला अजुन हवं आहे.. माझं डोकं शांत नाही होत आहे.. 

ज्योसलीन : रॉबिन तु ह्याला ड्रिंक पकलस.

रॉबिन : मी नाही पाजलं.. तो स्वतः घेत होता.. आम्हाला वाटलं की तो घेत असेल..

शौर्यच डोकं पुर्ण गरगरत होत... तोल जाऊन तो पडणार तोच त्याच्या मित्रांनी त्याला सावरलं.. आणि चेअरवर बसवलं.. डोकं टेकुन तो तिथेच बसतो...

ज्योसलीन : आत्ता काय करायच.. ?? ह्याला अश्या अवस्थेत बघुन ह्याची मम्मा ह्याला काही जिवंत सोडणार नाही आज..

सगळेच आत्ता करायच ह्या बाबत विचार करू लागले.. 

रॉबिन : मी माझ्या घरी घेऊन जातो ह्याला..

ज्योसलीन : तुझ्या घरचे ओरडणार नाहीत का?? आणि ह्याच्या घरी काय सांगायच.. त्यापेक्षा मी माझ्या घरी घेऊन जाते.. डॅडला सांगते मी सगळं.. डॅड करेल मॅनेज.. आणि शौर्य नॉर्मली असतो माझ्या घरी हे त्याच्या मम्माला पण माहिती असत.. तीला डाऊट पण येणार नाही..

रॉबिन, ज्योसलीन आणि नैतिक शौर्यला घेऊन गाडीत बसतात.. आणि ज्योसलीनच्या घरी जायला निघतात..

ज्योसलीन : तरी मला तो सॅड सॅड वाटत होता.. काही तरी झालय नक्की.. 

रॉबिन : हा मंडेला येणार होता ना?? आज का आला??

ज्योसलीन : ए शौर्य काय झालंय तुला??

शौर्य काही बोलतच नसतो.. 

ज्योसलीन : मी समीराला फोन करून बघते..

(समीराच नाव ऐकताच शौर्य डोळे उघडतो)..

शौर्य : आय हॅट समीरा.. शी डोन्ट लव्ह मी यार.. आय वॉन्ट टु डाय मेन.. आय रिअली वॉन्ट टु डाय..

(शौर्य रडतच बोलत होता)

नैतिक : ए SD अस काहीही काय बोलतोयस..

रॉबिन : तो शुद्धीत नाही आहे..

रॉबिन ज्योसलीनच्या घरी गाडी पार्क करतो.. ज्योसलीनने तिच्या डॅडला आधीच ह्या गोष्टीची कल्पना दिली असते.. तिघे मिळुन त्याला एका रूममध्ये झोपवतात.. ज्योसलीन बाहेर येऊन समीराला फोन लावते.. ज्योसलीनचा नंबर आपल्या मोबाईलवर बघुन समीराला जास्त राग येतो..

समीरा : तु का फोन करतेयस??

ज्योसलीन : समीरा काय झालंय?? शौर्य रडतोय अग.. तुम्ही लोक भांडलात का? हे बघ त्याला खुप त्रास होतोय..

समीरा : ओहहह.. तो रडतोय हे तुला कस कळलं??

ज्योसलीन : मला दिसतंय समीरा..माझ्या पुढ्यातच तर

समीरा : एक मिनिट...(समीरा ज्योसलीनलामध्ये तोडतच बोलली).. मी विसरलेच.. व्हिडीओ कॉल केला असेल ना त्याने तुला.. नाहीतर तु तरी त्याला केला असणार.. बरोबर ना.. कारण दोघांना करमतच नाही एकमेकांशिवाय.. आणि मुळात मला त्याच्याशी बोलायच नाही आहे आणि तुझ्याशी पण.. तो तुझा फियांसी आहे.. त्याला काय झालं हे तुला माहिती हवं.. मला कस माहिती असणार??

ज्योसलीन : आर यु मॅड.. तु काय बोलतेस कळतंय तुला??

समीरा : एक मिनिट.. मॅड तु आणि तुझा शौर्य असेल.. मी नाही.. ओके.. आणि परत मला फोन नको करत जाऊस..

(ज्योसलीनच काहीही ऐकुन न घेता समीरा रागातच फोन कट करते)

रात्रीचे साडे नऊ सहज वाजुन गेले.. वृषभला त्याची काळजी वाटु लागली..

राज : तो नॉर्मली कॉलेजला जाताना रूम लॉक करून जातोना..  मग आज फक्त अशी कडी का लावुन गेला..

वृषभ : काय माहीत.. फोन पण स्विच ऑफ येत आहे त्याचा.. 

तुघेही त्याच्या रूमजवळ जातात.. 

टॉनी : अजुन आला नाही..

वृषभ दरवाजाची कडी उघडतो..

राज : काय करतोयस??

वृषभ : आत बघतोय.. कोणी चुकुन बाहेरून कडी लावली असेल तर..

शौर्यच्या रूमचा दरवाजा उघडुन तिघेही आत जातात.. आत जाताच समोरच दृश्य बघुन तिघेही एकमेकांकडे बघु लागतात..

इथे विराज सकाळपासुन शौर्यला फोन लावून कंटाळला असतो.. डायनींग टेबलवर बसुन जेवणाच ताट समोर ठेवतच तो शौर्यला फोन लावत असतो..

शौर्यचा फोन का नाही लागत.. फोन बाजुला ठेवतच तो बोलतो..

छोटे साहेब ते मित्र मंडळींसोबत बाहेर गेलेत..

जेवण वाढणारे काका असे बोलताच विराज त्यांच्याकडे बघु लागतो..

विराज : शौर्य इथे आलाय??

हो दुपारीच आलेत ते.. बाजुच्या मॅडम येतात ना.. त्या आणि अजुन खुप सारे मित्र मंडळी होते.. त्यांच्यासोबत ते बाहेर गेलेत..

विराज : ज्यो सोबत...

विराज लगेच ज्योसलीनला फोन लावतो..

विराजचा फोन बघुन ज्योसलीन घाबरते.. घाबरतच ती फोन उचलते..

विराज : शौर्य कुठेय??

ज्योसलीन : इथेच माझ्या घरी??

विराज : त्याला फोन दे..

ज्योसलीन : तो ते.. झोपलाय जस्ट..

विराज : काय?? उठव आणि फोन दे त्याला..

ज्योसलीन : विर तु नंतर बोलणं त्याच्याशी.. झोपु दे त्याला..

विराज : तु त्याला फोन देतेस का मी तिथे येऊ..

(ज्योसलीन थोडा वेळ तशीच थांबते.. )

ज्योसलीन : विर.. तो नाही फोन घेत आहे.. तो झोपलाय.. तो उद्या येईल घरी.. प्लिज तु काळजी नको करुस.. ओके.. बाय..

विराजच पुढच बोलणं ऐकुन न घेता ज्योसलीन फोन ठेवुन देते..

विराज रागात जेवणावरून उठुन ज्योसलीनच्या घरी जायला निघतो...

(आत्ता पूढे काय?? मनवीच खर रूप सगळ्यांना कळल्यावर सगळे कसे रिएक्ट होतील?? त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all