अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 58

In marathi

शौर्यचे मित्र विराज समोर येऊन उभे रहातात..

विराज : बसु शकता तुम्ही.. आमच्या मम्माने आम्हां दोघा भावांवर चांगले संस्कार केलेत.. (विराज अस बोलताच सगळे एक मेकांकडे बघु लागतात) अतिथी देव भवो.. घरी आलेल्या पाहुण्यांना रिस्पेक्ट द्यावी आणि सेवा करावी हे शिकवलंय आम्हा दोघा भावांना.. सो तुम्ही बसु शकता इथे...तस पण मी तुमचीच वाट बघत होतो.. तुम्ही आज याल ह्याची खात्री होती मला.. म्हणुन तर ऑफीस सोडुन इथे तुमची वाट बघत बसलोय... पण उशीर झाला तुम्हांला.. मे बी फ्लाईट इस्यु असेल.. 

सगळेच विराजकडे बघतच त्याच्या समोर बसले..

तोच एक नोकर सगळ्यांसमोर पाण्याने भरलेल्या ग्लासांचा ट्रे घेऊन येतो.. सगळे त्यातुन एक एक ग्लास उचलत पाणी पितात..

विराज : तुम्ही काय घेणार?? थंडा, चहा?? जेवणार का तुम्ही लोक?? 

वृषभ : नाही नको.. आम्हांला फक्त शौर्यला भेटायचं..

विराज : अजुन काही बोलायच बाकी आहे का??

वृषभ : आम्ही त्याची माफी मागायला आलोय..

विराज : Ohhh realy?? 

रोहन : हे बघ विर.. प्लिज आम्हांला माहिती आमच्याकडून खुप मोठी चुक झालीय.. आम्हांला एकदा त्याला भेटुन सॉरी बोलु दे.. 

विराज : तु रोहन.. करेक्ट ना.. 

रोहन : अ... हो..

विराज : तुच हात उचललास ना माझ्या भावावर.. 

रोहन : मला माहिती मी चुकलोय.. म्हणुनच तर मी त्याला सॉरी बोलायला आलोय इथे.. प्लिज एकदा त्याला बोलवं आम्हांला त्याला भेटु दे..

विराज : सॉरी मी त्याला इथे नाही बोलवु शकत..

समीरा : प्लिज आम्ही रिक्वेस्ट करतोय तुला.. फक्त एकदाच..

विराज : तुला पण भेटायचं त्याला?? खरच..??

समीरा : तु अस का बोलतोयस..?? माझं प्रेम आहे त्याच्यावर.. फक्त काही गैरसमज झालेयत आमच्यात.. प्लिज एकदा मला त्याला भेटु दे..

विराज : तुझं खरच प्रेम आहे त्याच्यावर...??

समीरा : हो.. माझं खरच प्रेम आहे त्याच्यावर..

विराज : तुम्हा लोकांच झालं असेल तर तुम्ही इथुन जाऊ शकता..

राज : विर प्लिज..आम्ही तुझ्या पाय पडतो.. आम्हांला एकदाच त्याला भेटु दे.. प्लिज..

सगळेच विराजला रिक्वेस्ट करू लागले...

विराज : असाच रिक्वेस्ट माझा भाऊ तुम्हांला करत होता.. बरोबर ना..?? दिली त्याला त्याची बाजु मांडायची संधी तुम्ही?? लास्ट टाईम त्याला मी मुंबईला घेऊन आलेलो ना तेव्हा मी त्याला परत पाठवतच नव्हतो.. अक्षरशः लहान मुलासारखं रडत होता.. दिल्लीला जाण्यासाठी.. माझ्या मित्र मंडळींशीवाय मला नाही रे जमत रहायला विर.. प्लिज मला जाऊ दे.. माझी समीरा पण तिथे आहे.. खुप रिक्वेस्ट केली.. त्याला दिल्लीला मी पाठवाव म्हणुन त्याने जेवण पण सोडलेल.. एवढा तो तुमच्यात गुंतलेला.. तेव्हा सुद्धा समजवल.. एवढं नको गुंतुन जाऊस की नंतर त्यांनी तुला दुखावल्यावर त्रास होईल.. बोललो होतो त्याला मी.. पण मित्रांवर ओव्हर कॉन्फिडन्स.. इथे त्याला कश्याचीच कमी नाही.. इथे पण मित्र मंडळी खुप आहेत त्याची.. पण तुम्हां लोकांशिवाय नव्हतं जमत त्याला रहायला इथे..  लास्ट टाईम पण मी दिल्लीला आलेलोना तेव्हाच त्याला इथे घेऊन येत होतं.. कारण मला माझा भाऊ तिथे सेफ वाटत नव्हता.. त्या फैयाजला बघुनच कळत होतं की तो एखाद्या गुंडा पेक्षा कमी नाही. माझं इयर वेस्ट होतय ना विर.. प्लिज विर.. समजुन घे.. एक्साम झाल्या झाल्या तुझ्या पुढ्यात हजर रहातो.. प्रत्येक गोष्टीत हट्टीपणा.. शेवटी माझा नाईलाज झाला.. परत त्याला पाठवलं मी हॉस्टेलमध्ये.. आणि इथेच मोठी चुक केली.. तुच हात उचललास ना माझ्या भावावर रोहन?? अरे तो तुलाच वाचवायला तिथे 4th फ्लॉरवर गेलेला... त्या फैयाजच्या मित्रांनी सांगितलेल त्याला तुला 4th फ्लॉरवर कोंडुन ठेवलय.. स्वतःच्या जीवाचा विचार न करता गेला तो पळत तिथे.. माझ्या भावाला त्याच्या नकळत ड्रग्स दिले त्या फैयाजने. हे सगळं घडुन तो जवळपास 8 दिवसांनी इथे आलाय.. तरी सुद्धा पुर्ण अंगावर त्याच्या सुईने टोचल्याचे.. त्याला मार लागल्याचे निशाण होते.. म्हणजे किती त्याला टॉर्चर झालं असेल त्या रूममध्ये ह्याचा विचार करा.. तरी त्यात तो त्या मनवीला वाचवत होता.. आणि तिने पण..

वृषभ : मनवीने काय केलं ते आम्हाला माहितीय विर.. आम्ही चुकलो..आम्ही काहीही माहिती नसताना त्याला नको ते बोललो.. त्याला टॉर्चर केलं..

विराज : तुम्हांला अजुन काहीच माहिती नाही.. अजुन तर मला खुप बोलायचय.. डिप्रेशनमध्ये गेलेला माझा भाऊ.. त्याला सहन नाही झालं ना तर खुप त्रास करून घेतो तो स्वतःला..  एक तर तुम्ही लोकांनी त्याला तिथे टॉर्चर केलं.. त्याचे मित्र त्याच्यापासुन लांब गेले.. लांब गेले बोलण्यापेक्षाना तुम्ही त्याच्यावर रेपिस्ट नावाचा शिक्का लावला ते त्याला सहन होत नव्हतं .. जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा ती समीरा ती सुद्धा त्याला रेपिस्ट बोलली.. जेव्हा खरच त्याला तिची गरज होती तेव्हा ती पण त्याला सोडुन गेली.. एक्सामला त्याला बसावस वाटत होत.. पण तिथे पण त्याला बसता नाही आलं.. कारण ब्लॅकबोर्डवर पण कोणी तरी Shaury Is Repist म्हणुन लिहिलेलं.. लास्ट पेपर लिहु नाही शकला.. पुर्ण इयर वेस्ट गेलं त्याच.. त्याच एक टेंशन.. इथे येऊन त्याने काय केलं माहिती.. ड्रिंक केली त्याने.. लाईफमध्ये पहिल्यांदाच.. स्वतःच्या मर्जीने.. एकदा तुम्ही जबरदस्ती पाजलेली त्याला.. बोलला तो मला.. राज आणि रोहन तुम्ही दोघांनी मिळुन पाजली ना ड्रिंक त्याला..?? त्याच्या मना विरुद्ध.. पण माफ केले ना त्याने तुम्हांला.. it ok.. म्हणजे माझ्या भावाचा स्वभावच तसा आहे.. सो मी कुठे होतो.. हा. लाईफमध्ये पहिल्यांदाच ड्रिंक करून आलेला तो. आला नव्हता.. ज्यो आणि तिचा फियांसी त्याला घेऊन ज्योच्या घरी गेले कारण त्याला शुद्ध नव्हती आणि जर अश्या अवस्थेत घरी आला असता तर मी आणि मम्मा दोघेही त्याला ओरडु म्हणुन ते दोघे त्याला ज्यो च्या घरी घेऊन गेले.. मला जस कळलं की तो ज्योच्या घरी आहे तस मी त्याला घरी घेऊन आलो.. पण त्याने एवढी ड्रिंक केलेली की त्याला उचलुन घेऊन यावं लागलं मला.. खर तर मला खुपच राग आलेला त्याचा.. जर तो थोडा तरी शुद्धीत असताना तर त्यादिवशी त्याला माझ्यापासुन कोणीच वाचवलं नसत.. पण नशीब मी त्याचे कपडे चेंज करायला गेलो तेव्हा त्याच्या शरीरावर झालेल्या जखमा मला दिसल्या.. सकाळी जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा मला कळलं की जखमा शरीरावरच नाही तर त्याच्या मनावर पण झाल्यात.. आणि त्या तुम्ही केल्यात.. खुप रडला तो.. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच मी त्याला एवढ रडताना बघितलं.. आणि तो स्वतःहुन मला बोलला त्याला USA ला जायचय.. त्याला इथे नाही रहायच.. काहीही करून लवकरात लवकर त्याच तिकीट बुक कर.. कारण त्याला अंदाज होता तुम्ही लोक याल इथे.. त्याला मी तिकीट बुक करतो बोललो.. दिवसभर मी आणि ज्यो त्याच्यासोबत होतो.. रात्री मम्मा आली. मम्मासोबत त्याने गप्पा मारल्या.. मम्माला पण कळलं नाही की त्याच्या सोबत अस काही झालय.. मम्माशी बोलुन तो स्वतःच्या रूममध्ये गेला.. मला तर तो नॉर्मलच वाटत होता.. मी मम्मासोबत शौर्यच्या एडमिशन बाबतच बोलत होतो..  तोच ब्रूनोचा मोठं मोठ्याने भूकण्याचा आवाज आला.. वस्तु फुटल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज शौर्यच्या रूममधुन येऊ लागला.. मम्मा आणि मी पळतच शौर्यच्या रूममध्ये गेलो नि बघतो तर.. शौर्य हातात चाकू घेऊन आपल्या हाताची नस कापायला जात होता.. ब्रुनो त्याच्या हातावर उडी मारत त्याला अडवत होता.. ब्रुनोमुळे आम्ही त्याला ते सगळं करण्यापासून वाचवु शकलो.. त्या मुक्या प्राण्याला पण त्याची किंमत कळते.. पण तुम्हां लोकांना नाही कळली.. तुम्हां लोकांमुळे मी माझ्या भावाला कायमच गमवल असत.. आणि मुळात माझ्या भावाला तुम्ही त्याच्या नजरेसमोर जरी आलात तरी खुप त्रास होईल.. तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट की तुम्ही ह्यापुढे त्याच्या आयुष्यात परत येऊ नका..  आणि समीरा तु.. मगाशी मी बोललो ते नीट ऐकलस ना तु.. ज्यो आणि तिचा फियांसी रॉबिन.. रॉबिन तसा शौर्यचा पण चांगलाच मित्र आहे.. तुला सांगु समीरा ज्यो ही आम्हां दोघांची लहानपणापासूनची खुप छान मैत्रीण आहे आणि सोबत बेस्ट फ्रेंड पण.. इव्हन तिच्या फियांसीला पण शौर्य आणि ज्यो च्या नात्यावर कधी संशय नाही आला ग.. कारण त्याचा ज्यो वर जेवढा विश्वास आहे ना तेवढाच शौर्यवर विश्वास आहे.. खुप मदत केली तिने माझी आणि शौर्यची त्या दोन दिवसात.. आणि ज्योला फोन वर तु काय बोललीस हे सांगितलंय मला तिने.. तिला नको ते बोलुन तु तिला पण हर्ट केलंयस.. 

समीरा : मला माहिती मी चुकले.. पण माझं खरच शौर्यवर खुप प्रेम आहे..प्लिज एकदा मला त्याला भेटु दे प्लिज..

(समीरा रडतच विराजला रिक्वेस्ट करू लागली)

विराज : तु खरच प्रेम करतेस माझ्या भावावर?

समीरा : हो.. 

विराज : तुला कधी कळलं शौर्य निर्दोष आहे ते??

समीरा : वेडनेस डे ला रात्री.. जेव्हा वृषभने शौर्यच्या मोबाईलमध्ये शौर्य आणि मनवीच कॉल रेकॉर्ड ऐकवलं तेव्हा..

विराज : ग्रेट.. पण जर मनवीने शौर्यला फोन केलाच नसता तर.. आणि मुळात तुला तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रूफ दाखवावा लागतोय.. म्हणजे तुझा त्याच्यावर विश्वासच नाही आहे.. जिथे विश्वास नाही तिथे प्रेम नाही.. आणि अजुन एक हिला जेव्हा कळलं तेव्हाच तुम्हा लोकांना कळलं असेल ना शौर्य दिल्ली सोडुन गेलाय..

सगळेच हो बोलतात..

विराज : मी एक सिम्पल एक्साम्पल देतो तुम्हांला.. आपण शौर्यच्या जागी रोहनला गृहीत धरूया.. जर ह्या रोहनला तुम्ही रेपिस्ट म्हणुन टॉर्चर केलं असत.. रोहन दिल्ली सोडुन मुंबईला आला असता.. आणि जर शौर्यला कळलं असत की आपण रोहनची चुक नसताना त्याला एवढं अपमानास्पद वागवलं.. तर माझ्या भावाने काय केलं असत माहिती.. त्याच क्षणाला मिळेल त्या फ्लाईटने मुंबईला आला असता.. रोहनची समजुत काढली असती.. त्याला परत सोबत घेऊन दिल्लीला गेला असता.. आणि शेवटचा पेपर त्याच्या सोबत लिहिला असता.. असा आहे माझा भाऊ.. तुम्ही आज असले रडवे चेहरे घेऊन माझ्यासमोर येतायत.. तुम्हाला कोणालाच नाही वाटलं अस करावस.. स्पेसिअली समीरा तुला.. तु तर प्रेम करतेस ना त्याच्यावर.. मोजुन 3 तास लागत असतील दिल्लीवरून मुंबईला यायला.. आणि त्यात ही चार दिवसाची सुट्टी.. एक दिवस तर तुम्ही शौर्यसाठी येऊच शकले असते ना.??

कोणाकडेच विराजच्या प्रश्नाच उत्तर नसत..

विराज : समीरा प्लिज ह्याला प्रेम हे नाव नको देऊस... हे प्रेम नाही.. प्रेमाची व्याख्या खुप वेगळी आहे. प्रेम ते होत जे शौर्य तुम्हा सगळ्यांवर करायचा.. पण तुम्हा लोकांना त्याच्यावर करता आलं नाही.. शौर्य सारखा मुलगा,  शौर्य सारखा भाऊ, शौर्यसारखा मित्र, शौर्य सारखा लाईफ पार्टनर मिळायला नशीब लागत.. तुम्ही कमनशिबी आहात.. स्पेसिअली समीरा तु.. 

विराज अस बोलताच समीरा रडु लागते..

विराज : मला माझ्या भावाच्या आयुष्यात तुम्ही लोक नकोयत.. 

वृषभ : प्लिज विर एकदा त्याला भेटु दे..

विराज : जर तुम्ही वेडनेस डे रात्री किंवा थर्स डे मॉर्निंग पर्यंत इथे आला असता तर मला खरच अस वाटलं असत तुम्ही त्याचे खरे मित्र आहात.. त्यावेळेला शौर्य जरी तुम्हाला भेटायचं नाही बोलला असताना तर मी त्याची समजुत काढत तुम्हांला त्याला भेटायला दिलं असत.. पण तुम्ही प्रूफ केलंत.. You all are selfish.. So pls शौर्य ह्या पुढे शौर्य तुम्हांला दिसेल हा विचार करणं सोडुन द्या..

विराज अस बोलताच रोहन शौर्यला आवाज देऊ लागतो..

विराज : मिस्टर रोहन मी तुला मूर्ख वाटतो..?? तुम्ही लोक इथे येणार हे मला माहीत असताना मी त्याला इथे ठेवेल..?? शौर्य इथे नाही आहे आणि मुळात शौर्यला तुम्ही त्याच्या आयुष्यात नको आहे.. तो जिथे आहे तिथे खुश आहे..

समीरा : कुठे आहे तो..

विराज : जिथे त्याची डेस्टिनी त्याला घेऊन गेली.. 

वृषभ : एटलिस्ट फोनवर तरी बोलु दे त्याच्याशी..

विराज : तुम्ही त्याच्याशी कोंटेक्ट करू नये म्हणुन त्याने सोसिअल मीडियावरून एक्सिट घेतलीय.. स्वतःचा मोबाईल नंबर पण त्याने बंद केलाय. अजून नका त्याला त्रास देऊ.. प्लिज.. माझ्या भावाला काही झालं तर मला सहन नाही होणार..

काका.. ही लोक जेवून जाणार असतील तर बघा.. आणि ह्यांना काही हवं नको ते पण बघा.. (जेवण बनवणाऱ्या काकांना सूचना देत विराज बोलला).. तुम्हाला काही हवं असेल तर काकांना सांगा ते देतील आणून.. मला खुप काम आहे.. मी निघतो.. बाय.. 

विराज तिथून सरळ आपल्या रूममध्ये जाऊ लागला... 

जवळपास एक दोन तासाने विराज ऑफिस संदर्भात फोन वर बोलतच खाली येतो.. फोन ठेवतच तो जयरामला आवाज देतो.. जयराम म्हणजे त्यांच्या घरातील नोकरच..

जयराम : काय झालं साहेब..??

विराज : रूममध्ये माझ्या बेडवर जे सामान काढुन ठेवलय ते गाडीत ठेव माझ्या.. 

विराजने सांगितल्याप्रमाणे जयराम त्याच्या रूममधलं सामान गाडीत ठेवलं.. 

जेवण बनवणाऱ्या काकांना आवाज देत त्यांना पण तो बोलावतो..

विराज : मी एक दीड महिन्यासाठी कंपनीच्या कामा निमित्ताने बाहेर चाललोय.. मम्मा उद्या पर्यंत येईल.. तिची काळजी घ्या.. तिला हवं नको ते बघा..  ज्यो सकाळी ब्रुनोला बाहेर घेऊन जात जाईल.. मी बोललोय तिच्याशी.. नाही तर एक काम करतो मी सोबत घेऊन जातो त्याला आणि ज्योकडे देतो.. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा.. जयराम ब्रूनोला सोड खाली.. (विराज जोरात ओरडला)

जयराम : बर साहेब..

जयराम ब्रुनोला घेऊन येतो.. विराज त्याच्या हातातुन ब्रूनोला उचलुन घेतच घराबाहेर पडु लागला..

समीरा आणि इतर मंडळी तिथेच बसुन विराजच बोलणं ऐकत असतात... 

साहेब ते... काका शौर्यच्या मित्र मंडळींकडे बोट दाखवु लागले..

विराज : हि लोक अजुन इथेच..

विराज ब्रूनोला घेऊन त्यांच्याकडे जाऊ लागला.. ब्रुनो शौर्यच्या मित्रांच्या अंगावर जोर जोरात भुकु लागला.. तसे सगळे उभे राहिले..

विराज : ह्याला पण कळलं वाटत तुम्ही शौर्यला त्रास दिलाय ते.. (विराज तोंडावर हसु आणतच बोलला) बाय दि वे तुम्ही इथे रहाणार असाल तर राहु शकता.. काका ह्यांच्या रहाण्याची पण व्यवस्था करा..

समीरा : आम्ही इथे रहायला नाही आलोय.. आम्हांला शौर्यला भेटायचंय.. आणि तु अस नाही वागु शकत आमच्यासोबत.. आम्ही शौर्यला खुप चांगलं ओळखतो.. तो आमच्यावर एवढं नाही रागवु शकत आणि माझ्यावर तर नाहीच नाही.. तु अस नको तोडुस आम्हांला त्याच्यापासुन..प्लिज..

विराज : मिस समीरा.. माझ्यात पेशन्स खुप कमी आहेत..  मगाशी मी शांतपणे तुझ्याशी म्हणजे तुम्हां सगळ्यांशीच बोलुन सगळ्या गोष्टी आधीच क्लीअर केल्यात.. आणि आत्ता पण मी तुझ्याशी शांतपणे ह्यासाठी बोलतोय कारण तु श्री ची बहीण आहेस.. नाही तर माझ्या भावाला त्रास देणाऱ्या लोकांच मी तोंड पण बघत नाही.. बोलणं तर दुरची गोष्ट आहे..

(विराज रागातच सगळ्यांकडे बघत आपल्या डोळ्यांवर गॉगल लावत तिथुन निघाला)

वृषभ : एक मिनिट..

विराज मागे वळुन वृषभकडे बघतो..

शौर्यचा मोबाईल.. तो हॉस्टेलवर ठेवुन गेलेला.. खिश्यातुन मोबाईल काढतच तो विराजकडे देतो..

जयराम सामान ठेवलंस गाडीत??? विराज जोरात ओरडला..

जयराम : हो साहेब..

विराज : हा मोबाईल माझ्या रूममध्ये नेऊन ठेव.. मी निघतोय.. काही गरज लागली तर फोन कर.. आणि ब्रूनो परत येईल तेव्हा त्याला शौर्यच्या रूममध्ये ठेवत जा.. ओके..

जयराम : बर साहेब..

विराज आपल्या नोकर मंडळींना सूचना देऊन घराबाहेर पडला.. ब्रूनोला त्याने गाडीत ठेवलं.. आणि ब्रूनोला सोबतच घेऊन तो तिथुन निघाला..

काका : तुम्ही काही घेणार?? साहेबांनी मला फोन करून तुम्हांला विचारायला सांगितलय...

वृषभ : प्लिज शौर्य कुठेय ते सांगा.. मी पाया पडतो तुमच्या हवं तर..

काका : छोटे साहेब कुठे आहेत हे खरंच मला नाही माहीत.. ते तर मोठ्या साहेबांनाच माहिती असेल.. तुम्हांला काही हवं असेल तर सांगा..

रोहन उठुन शौर्यच्या घराबाहेर पडला.. त्याच्या मागोमाग सगळेच..

रोहन : एकदा तर भेटु शकतो ना यार तो.. परत नाही करणार अस.. 

(अस बोलत रोहन खाली घुडग्यावर बसुन रडु लागतो)

वृषभ : ए रोहन.. आपण शोधु त्याला.. तु अस नको रडुस.. आणि चल इथुन.. 

सगळे रोहनला समजवतच तिथुन निघुन समीराच्या घरी येतात.. 

राज : शौर्य खरच किती ग्रेट आहे यार.. कधीच त्याने त्याच्या श्रीमंतीचा शो ऑफ नाहीना केला आपल्याला.. एवढा मोठा अलिशान बंगला सोडुन तो परत आपल्यासाठी तिथे त्या एवढ्याश्या हॉस्टेलच्या रूममध्ये राहिला.. 

वृषभ : खुप हर्ट केलं आपण त्याला.. मला बोलत होता.. मला त्रास होतोय.. मी नाही सहन करू शकत तुमच अस वागणं.. का कळलं नाही यार आपल्याला.. ह्या मनवीने खरच खुप दगा दिला यार..

रोहम : आणि विर पण बरोबर बोलला ना.. आपण त्याच दिवशी का नाही आलो मुंबईला?? कदाचित तो भेटला असता.. तो माझ्यासाठी त्याची प्रॅक्टिकल बुक देऊ शकतो मी त्याला सोडून पेपर लिहायला कस काय बसु शकतो.. मला स्वतःचाच राग येतोय..

समीरा : झाल्या गेल्या गोष्टी सोडुन आपण काय करायच ते बघुया..

रोहन : आता कुठे असेल शौर्य?? कस शोधायच त्याला?? फेसबुक, इंस्टा व्हाट्सएप सगळं डी-एकटीव्हेट केलय त्याने.. त्याने चिट्ठीत लिहिलेलं तुम्हांला मी दिसणार नाही ह्याची काळजी घेईल मी.. आणि तसच करतोय तो..

समीरा : त्यात त्याचा भाऊ.. तो पण सांगत नाही तो कुठेय ते..

वृषभ : शौर्यची मॉम?? 

वृषभ अस बोलताच सगळे त्याच्याकडे बघु लागतात.. कदाचित हाच शेवटचा पर्याय असतो त्यांच्याकडे...

इथे विराज ब्रूनोला घेऊनच लोणावळ्याला फार्म हाऊसला जातो.. 

शौर्यचे मित्रमंडळी फार्महाऊस बाहेर असणाऱ्या स्विमिंग पुल मध्ये पाय टाकुन शांत बसले असतात.. विराज गाडी पार्क करतच उतरतो.. ब्रुनो पळतच घरात जातो..

विराज : तुम्ही असे का बसलेत?? शौर्य कुठेय??

ज्योसलीन : रूममध्ये आहे.. डोकं दुखतंय बोलतोय. तूच घेऊन ये त्याला.. आम्ही वाट बघतोय इथे त्याची..

विराज घरी येताच शौर्यला बघायला रूममध्ये जातो..

शौर्य त्याच्या मम्माच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपुन असतो.. ब्रुनो त्याला चिकटुनच त्याच्या बाजुला जाऊन बसतो..

विराज : डोकं का दुखतंय ह्याच?? औषध नाही घेतलेलं का ह्याने..???

अनिता : काहीच ऐकत नाही आहे.. तुच समजव.. मला नाही कळत मी अजुन कस समजवु ह्याला..

विराज : शौर्य.. औषध का नाही घेत तु..

शौर्य : मला काही नाही झालय.. उगाच नको ती औषध..

विराज : तु नाही घेणार औषध??

शौर्य : नाही.. 

विराज : लास्ट विचारतोय नाही घेणार ना??

शौर्य : बोललो ना नाही घेणार.. मम्मा सांग ना ह्याला..

विराज : मम्मा आण बघु ती औषध इथे.. 

विराज अस बोलताच अनिता त्याच्या हातात शौर्यची औषध देते..

विराज सगळे पॅकेट खोलून त्यातून औषध काढतो..

अनिता : विर काय करतोयस तु हे..

अनिता अस बोलताच शौर्य उठुन बसतो आणि विराजकडे बघतो.. विराज शांतपणे सगळ्या पॅकेट मधुन औषध काढतो..

शौर्य : विर काय करतोयस तु..??

विराज : तु नाही ना घेत औषध.. मिच सगळी घेऊन टाकतो.. आणि संपवतो एकदाच स्वतःला..

समोर टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास हातात घेतच तो बोलतो..

शौर्य : विर प्लिज काय वेडेपणा करतोयस.... दे ती औषध.. मी घेतो..

विराज : मी करतो ते वेडेपण आणि तु करतोस ते.. तु होऊन गेलेल्या गोष्टी होऊन गेलेल्या वेळेसारख्या विसरायला शिक ना शौर्य.. किती दिवस मनाला लावुन घेणार तु.. नेहमी मी नसणार ना शौर्य तुझ्यासोबत.. आम्ही सगळेच तुला डिप्रेशनमधुन बाहेर काढायचा प्रयत्न करतोय ना... तुझे मित्रमंडळी.. गोवा ट्रिप केन्सल करून तुझ्यासाठी इथे येऊन बसलीत.. का तर तुला त्यांना पाहिल्यासारखं बघायचंय.. त्यांना वाटत तु पहिल्यासारखी मज्जा मस्ती करावी त्यांच्यासोबत.. मम्मा आणि मी.. आम्ही पण आमचं काम.. इंपोर्टन्ट मिटिंगस सोडुन तुझ्यासाठी इथे आलोय... तुला हसताना बघायचंय.. नको ना अस वागुस.. तुझ्या दिल्लीच्या मित्रमंडळींना पण कळलंय शौर्य ते चुकेलत.. आणि मुळात तुला माहितीना तु चुक नाही केलीस.. मग तु का त्रास करून घेतोयस.. तुझ्या बाबाने खुप आवडीने तुझं नाव शौर्य ठेवलेलं अस मम्मा बोलायची मला.. काय अर्थ आहे त्या नावाचा.. शौर्य म्हणजे शूर.. पराक्रमी.. येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोर जायची ताकद ज्यात असते असा तो.. काही तरी विचार करूनच ठेवलं असेलना त्यानी तुझं ते नाव.. पण तु तुझ्यावर आलेल्या ह्या छोट्याश्या संकटालाच एवढं घाबरलायस.. आज तुझा बाबा असता तर खुप वाईट वाटलं असत त्याला आपल्या मुलाला अस घाबर बघुन.. कळतंय तुला मला काय बोलायचय ते??

विराज शौर्यच्या तोंडात औषधाची गोळी टाकतो पाण्याचा ग्लास त्याचा हातात देतो.. शौर्य औषध घेत रूमबाहेर जायला निघतो..

अनिता : कुठे चाललास..??

शौर्य : मित्रांसोबत मज्जा मस्ती करायला.. USA ला गेल्यावर नाही ना भेटणार हे सगळ करायला.. 

चेहऱ्यावर हसु आणतच तो बोलतो.. आणि रूम बाहेर निघतो.. तो बाहेर निघताच ब्रुनो पण त्याच्या मागोमाग बाहेर निघतो..

अनिता : तुझं सगळं एका शब्दात ऐकतो.. मागासपासून मी पण हेच त्याला सांगत होती.. कदाचित माझ्या पेक्षा जास्त तु त्याला ओळखतोस..

विराज : काळजी वाटते ग मम्मा शौर्यची.. म्हणुन मी पण USA ला जातोय.. तो पुर्ण तिथे सेटल झाल्यावर मी इंडियात परत येईल.. तु रहाशील ना एकटी थोडे दिवस..

अनिता : माझं टेन्शन नको घेऊस पण तु तिथे गेल्यावर तुझं इकडच काम??

विराज : ते मी करेल एडजस्ट.. आणि मम्मा त्याचे दिल्लीचे मित्रमंडळी आलेले भेटायला आज.. (विराज अनिताला घडलेला सगळा प्रसंग सांगतो). मे बी ते परत सुद्धा येतील.. त्यांना कळु नको देऊस कि शौर्य कुठे आहे ते..

अनिता : हम्मम्म.. शौर्यच एडमिशन झालंय..??

विराज : तस झालय.. बट मी अजुन एक दोन कॉलेजेस बघतोय.. जिथे त्याला हवं ते सगळं असेल.. म्हणजे तो रमुन जाईल.. लास्ट टाईम दिल्ली जवळ होती.. त्याला आठवण आली कि तो इथे येऊ शकत होता किंवा आपण जाऊन त्याला भेटु शकत होतो.. आत्ता त्याला तस नाही ना करता येणार.. चार वर्षे त्याला तिथेच रहावं लागेल..

अनिता : आपल्याला जमेल त्याच्याविना रहायला..

विराज : जमवाव लागेल ना मम्मा.. आणि तुलाच वाटत होतं ना तो USA ला जावं.. USA ला जाणच त्याच्यासाठी योग्य आहे.. मे बि तो पर्यंत शौर्य हे सगळं विसरून गेला असेल.. तस व्हेकेशनमध्ये आपण त्याला बोलवू शकतो जर त्याची इच्छा असेल तर.. 

बाहेरून मज्जा मस्ती करण्याचा आवाज येऊ लागला.. विराज रूमच्या खिडकीतुनच बघु लागला.. शौर्य मित्र मंडळींसोबत पाहिल्यासारखाच हसत खेळत होता.. त्याला खुप दिवसांनी अस नॉर्मल झालेलं बघुन विराजला आणि अनिताला बर वाटत..

अनिता : मी उद्या निघतेय इथुन.. तुला हवं तर मी थांबते..

विराज : नाही मी करेल एडजस्ट.. तु काळजी घे तुझी.. आणि प्लिज मम्मा कोणालाच शौर्यचा नंबर शेर नको करुस.. 

अनिता : नाही करत.. तु तुझी काळजी घे... ह्या चार दिवसात तु पण नीट झोपला नाहीस.. तु रूममध्ये जाऊन थोडं आराम कर.. डोळे बघ कसे झालेत तुझे..

विराज : हम्मम.

विराज रूममध्ये जाऊन आराम करणार तोच शौर्य रूम बाहेरून विराजला आवाज देतच बाहेर बोलवतो..

विराज बाहेर जाऊन तो का आवाज देते ते बघतो..

शौर्य : आम्ही व्हॉलीबॉल खेळतोय.. एक प्लेयर कमी पडतोय आमच्या टिममध्ये.. तु ये ना..

ज्योसलीन : हा विर येणं.. कस आहे तुम्हां दोघा भावांना एकत्र हरवायला  मज्जा येईल.. हो ना गाईज

येसस... ज्योसलीनच्या टिमचे सगळे एकत्रच बोलतात..

शौर्य : ए ज्यो.. तु माझ्या भावाला चॅलेंज करतेयस.. व्हॉलीबोल चॅम्पियन आहे तो..

विराज : ए शौर्य काहीही काय..??

शौर्य : अस बोलुन घाबरवायच असत रे विर.. समोरच्याचा कॉन्फिडन्स थोडा कमी होतो.. 

नैतिक : ए SD आत्ता आमचा कॉन्फिडेस कमी व्हायचा सोडुन उलटा वाढलाय बघ.. आत्ता चालु करूयात का खेळायला..??

सगळी मंडळी मज्जा मस्ती करतच व्हॉलीबॉल खेळु लागतात.. विराज व्हॉलीबॉल खेळताना अधुन मधुन शौर्यकडे बघत असतो.. शौर्य खेळण्यात अगदी तल्लीन झालेला असतो.. दुपारी जेवण, दंगा मस्ती, घराबाहेर असणाऱ्या स्विमिंग पुलमध्ये एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतच पुल मस्ती करणं.. चालु होत.. दुसऱ्यादिवशी सकाळीच अनिता जाण्यासाठी निघाली.. USA ला जाताना येईल भेटायला अस बोलुन तिने सगळ्यांचा निरोप घेतला..

इथे समीरा आणि इतर मंडळी सकाळ पासुन येऊन शौर्यच्या घराबाहेर त्याची मम्मा दिसते का ते बघतच होते..

सीमा : मला अस वाटत आत्ता घरी जाऊयात.. दोन दिवस झाले.. शौर्यची मम्मा काही दिसतच नाही.. घरचे पण वाट बघत असतील..

राज : मला पण असच वाटत..

आणि अश्यातच एक गाडी शौर्यच्या घरा बाहेर येऊन थांबलेली त्यांना दिसते.. गाडीतुन अनिता बाहेर पडते. अनिता गाडीतुन बाहेर पडताच सगळे धावतच गेटजवळ उभं राहतात..

रोहन : आंटी..

अनिता गेटजवळ बघते तर शौर्यची मित्रमंडळी गेटबाहेर उभं राहुन तिला आवाज देत असतात..

शंभु त्यांना आत सोड.. वॉचमनला ऑर्डर देतच अनिता आत निघुन जाते..

रोहन : आंटी आम्हाला माहिती आम्ही खुप मोठी चुक केली पण एकदा आम्हाला शौर्यशी बोलायला द्या..प्लिज

सगळे अनिताला रिक्वेस्ट करू लागतात..

अनिता : त्याला नाही भेटायचंय तुम्हाला.. त्याने स्वतःला तुमच्यापासून लांब करायच ठरवलंय. तुम्हांला बघुन त्याला त्रास होईल.. माझ्या मुलाला मी ज्या त्रासातून जाताना बघितलंय त्या त्रासातून जाताना मला त्याला पुन्हा नाही बघायच.. मी शौर्यची आई म्हणुन तुम्हांला रिक्वेस्ट करतेय.. माझ्या मुलाला अजुन त्रास नका देऊ.. प्लिज..

(अनिता हात दोन्ही हात जोडुन रिक्वेस्ट करू लागली)

सगळे माना खाली घालुन तिथुन जाऊ लागले.. 

अनिता फक्त त्यांना जाताना बघते.. खर तर तिला पण वाईट वाटत. पण शौर्यमुळे दुसरा पर्या उरला नसतो तिच्याकडे..

इथे शौर्य खुप दिवसांनी त्याच्या मित्रांसोबत मज्जा मस्ती करत होता.. रात्रभर गप्पा गोष्टी करणं.. सकाळी उशिरा उठणं, वेगवेगळे गेम खेळण आणि खुप काही.. अश्यातच USA ला जायचा दिवस जवळ आला.. रात्री सगळेच फार्महाऊस बाहेर रात्रीच्या अंधारात गोल करून बसले.. मधोमध शेकोटी पेटवत एकटक त्या शेकोटीकडे बघत असतात.. एवढ्या दिवस चालणाऱ्या दंगा मस्तीची जागा आता शांततेने घेतली असते..

रॉबिन : खुप मज्जा आलीना ह्या सात दिवसात.. 

नैतिक : मला तर जावस नाही वाटत यार इथुन आणि त्यात SDपण लांब चाललाय..

ज्योसलीन : तुला करमेल शौर्य तिथे..

शौर्य एक टक समोर झगझगणाऱ्या शेकोटीकडे बघत असतो.. त्याच्या शांत रहाण्याने ज्योसलीन सोबत सगळ्यांनाच उत्तर मिळाल असत..

आर्यन : SD एक गाणं होऊन जाऊ दे ना..

विराज : शौर्य मी गिटार घेऊन आलोय तुझ मुंबईवरून..

विराज आत जातच गिटार घेऊन येत शौर्यकडे देतो..

शौर्य : गाईज तुम्ही पण साथ द्या. आपल कॉलेजच्या गेदरिंग मधलं गाणं..

ओके... सगळे एकत्रच बोलले..

 सगळे गिटारच्या सुरांसोबत टाळ्यांची साथ देत शौर्यला मध्ये मध्ये साथ देतच गाणं गाऊ लागले...

हम रहे या न रहे कल,
कल याद आएँगे ये पल,
पल ये हैं प्यार के पल,
चल आ मेरे संग चल,
चल सोचें क्या छोटी सी है ज़िन्दगी,
कल मिल जाए तो होगी खुश नसीबी 
हम रहें या न रहें याद आएँगे ये पल |

श्याम का आँचल तोड़ के आई,
देखो वो रात सुहानी,
आ लिखदे हम दोनों मिल के,
अपनी ये प्रेम कहानी 
हम रहें या न रहें याद आएँगे ये पल 

 
शेवटच कडवं बोलताना मात्र शौर्यच्या डोळ्यांत पाणी येऊ लागलं... 

आने वाली सुबह जाने,
रंग क्या लाए दीवानी,
मेरी चाहत को रख लेना
जैसे कोई निशानी 
हम रहें...

शौर्य मध्येच गाणं थांबवत रडु लागला.. तसे त्याचे मित्र मंडळी पण त्याला जाऊन मिठी मारतच रडु लागले.. विराज पण थोडा इमोशनल होतो.. तो शौर्यला मित्रमंडळींसोबत तसच एकट सोडत आपल्या रूममध्ये निघुन येतो.. दिवसभर शौर्यसोबत आणि रात्ररभ लॅपटॉपमध्ये अस विराजच शेड्युल झालं असत.. रात्रीचे साडे तीन होतात.. USA ला जाणार ह्या भीतीने शौर्यला झोप येत नसते.. तो कुस बदलुन झोपण्याचा प्रयत्न करत असतो... शेवटी न राहवुन.. विराजच्या रूममध्ये झोपायला जातो.. विरची झोप मोड नको म्हणुन हळुच विराजच्या रूमचा दरवाजा तो उघडतो.. विराजला अस लॅपटॉपवर काम करताना बघुन त्याला आश्चर्य वाटत..

शौर्य : विर तु झोपला नाहीस..

विराज : तु अजुन जागा आहेस??

शौर्य : माझं सोड... तु झोपला का नाही..??

विराज : झोपलो मग काम कोण करणार..?? काही काम असतात ती मलाच करावी लागतात.. इतर कोणाला नाही देऊ शकत ना करायला.. ते झालं की झोपेल.. 

शौर्य : कधी होईल तुझ काम??

विराज : तसे 4 वाजून जातात..

शौर्य : विर माझ्यामुळे एवढं नको ना त्रास करून घेऊस तु स्वतःला.. तुला त्रास झालेला मला नाही सहन होणार.. एकदा बोलायच तरी होतंस.. जवळपास 2 आठवडे तु नीट झोपलासच नाही.. 

विराज : तुला आज झोप नाही येत?? उद्या लवकर निघायचय.. मम्मा पण येईल..

शौर्य : विर टेन्शन येतंय खुप.. मी होईलना तिथे एडजस्ट..

विराज : मी आहेना सोबत.. नको ना टेन्शन घेऊस. तुझ्या तिथे ओळखी होईपर्यंत मी राहील तुझ्यासोबत आणि तुला आवडेल ती जागा.. ते कॉलेज.. तिथे गेल्यावर तु रमशील मस्तपैकी.. टेन्शन तर मला येतंय तुझ्यापासुन एवढे वर्ष लांब रहायला..

शौर्य विरचा लॅपटॉप बाजुला ठेवत त्याच्या मांडीवर डोकं ठेवतो.. 

शौर्य : विर मी सुरुवातीलाच तुझं ऐकलं असत तर आत्ता तुझ्यासोबत राहिलो असतो ना..

विराज : नेहमी सांगतो ना मी तुला.. जे होत ते चांगल्यासाठीच होत.. एवढं लक्षात ठेव.. आणि झोप आत्ता.. मला काम आहे..

विराज शौर्यची समजुत काढत त्याला झोपायला सांगतो.

सकाळचे सात वाजत आलेले असतात..

विराज त्याला उठवत असतो... शौर्य डोळे चोळतच उठतो..फ्रेश होऊनच विराजच्या रूम बाहेर पडतो.. बाहेर बघतो तर त्याची मम्मा, विराज आणि मित्रमंडळी डायनींग टेबलवर त्याची वाट बघत असतात..

शौर्य : मम्मा.. कधी आलीस???

अनिताला मिठी मारतच तो बोलतो..

अनिता : एक तास होऊन गेला.. तुझ्यासाठी बघ काय आणलंय.. तुझे फेव्हरेट.. दहीवडे..

शौर्यच्या प्लॅटमध्ये दहीवडे देतच ती बोलली..

शौर्य चमचा हातात पकडत एकटक प्लॅटित बघत राहिला..

विराज : आपल्याला निघायचंय शौर्य.. लवकर खा..

शौर्य एक दहीवडा कसा बसा संपवतो आणि प्लॅट पुढे लोटतो..

अनिता : काय झालं?? नाही आवडले..

शौर्य : बस..

ज्योसलीन : शौर्य नको ना तोंड पाडुस.. मला जर कोणी USA ला पाठवलं असत तर मी हसत हसत गेले असते..

नैतिक : हो ना.. आणि तु व्हिडीओ कॉल करू शकतोस..

रॉबिन : व्हेकेशनमध्ये येत जा.. 

आर्यन : आणि अस तोंड पाडुन आम्हांला गुडबाय बोलणार असशील तर आम्ही एअरपोर्टवर नाही येणार तुला सोडायला..

सगळेच शौर्यला समजवु लागले.. शौर्य चेहऱ्यावर जबरदस्ती का होईना हसु आणतच प्लॅटित अनिताने वाढलेले सगळे दहीवडे संपवतो..

विराज : आपण निघुयात.. तु सगळ नीट घेतलंस ना?? 

शौर्य : हम्मम्म..

सगळेच शौर्यला सोडायला एअरपोर्टच्या दिशेने निघाले.. शौर्य ब्रूनोला अगदी घट्ट मिठी मारून गाडीत बसला असतो.. एअरपोर्ट येताच त्याच्या डोक्याला किस करत त्याला गाडीत ठेवतच तो तिथुन निघाला.. 

शौर्य : मम्मा काळजी घे... मी फोन करत जाईल... 

(अनिताला मिठी मारतच बोलला)

गाईज आय लव्ह यु सो मच.. तुम्ही माझ्यासाठी खुप केलात ह्या सात दिवसात.. खुप मिस करेल मी तुम्हांला.. ज्यो... you are my true freind.. रॉबिन ज्यो ला त्रास नको देऊस.. आणि दोघे भांडु नका.. ती तुझ्यावर खुप प्रेम करते.. USA वरून परत येईल ना तेव्हा पण दोघांना एकत्र बघायचंय मला.. नैतिक जास्त ड्रिंक करणं कमी कर मित्रा... आर्यन, रेवा, रोहन, महेश, रिंकु, प्रतीक, प्रांजल तुम्हा सगळ्यांना पण खुप थेंक्स.. खुप मिस करेल.. जाता जाता एक रिक्वेस्ट.. तिथे गेल्यावर मी नवीन सिम कार्ड घेईल.. त्यावरून तुम्हांला फोन करेल..  प्लिज कोणाला माझा कोंटेक्ट नंबर शेर करू नका.. 

सगळे शौर्यला मिठी मारतच बाय करतात..

आणि फायनली शौर्य सगळ्यांना बाय करत फ्लाईटमध्ये जाऊन बसतो..

(कस असेल शौर्यच USA मधलं कॉलेज आणि तिकडचे मित्रमंडळी..??शौर्य आणि त्याच्या दिल्लीच्या मित्र मंडळींच्या गाठी भेटी होतील पुन्हा??? हा भाग कसा वाटला ते ही नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all