अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 59

In marathi

राज : गाईज मला अस वाटत आपण निघुयात इथुन..  शौर्यला आपल्याला भेटायची इच्छा नाही तर आपण का इथे थांबलोय.. आणि मुळात त्याला आपल्याला भेटुन त्रास होणार असेल तर मला पण नाही त्याला भेटायचंय.. आधीच खूप त्रास दिलाय मी त्याला अजुन नको..

सगळेच शांत बसलेत हे बघुन राज बोलतो..

रोहन : तुझं काय आहे रे नुसतं घरी जाऊया..घरी जाऊया.. मी शौर्यला भेटल्याशिवाय नाही जाणार.. तुला जायच असेल तर जा. मला शौर्यला भेटायचय..

टॉनी : कस भेटणार रोहन तु?? तो कुठे आहे?? काय करतो?? काहीच माहिती नाही आपल्याला.. काय करणार आपण..?? त्याचा भाऊ काय बोलला आठवत ना.. ते नाही आठवत तर त्याची आई काय बोलली ते आठव.. राज बरोबर बोलतोय.. नेहमीच आपण त्याला जबरदस्ती नाही ना करू शकत.. थोडा वेळ जाऊ दे. मग बघु.. आणि कोणताच पर्याय अजुन मला तरी दिसत नाही.. फेसबुक पण त्याने डी एक्टिव्ह केलंय..

वृषभ : शौर्यने फेसबुक डीएक्टिव्हॅट केलं पण त्याच्या मित्र मंडळींनी नाही ना केलं.. सगळ्यात आधी आपण ज्योसलीनच अकाउंट बघुयात..

समीरा : बघितलं मी.. तिने प्रायव्हेसी ठेवलीय.. फ्रेंड्स दिसत नाहीत तिचे.. 

(समीरा नाराज होतच बोलली)

रोहन : रॉबिन.. शौर्यचा भाऊ रॉबिनच बोललेला ना?? तिचा फियांसी...

राज : जगात हजारापेक्षा जास्त रॉबिन असतील.. शौर्यचा मित्र कोण ते कसं कळेल?? त्याला आपण कधी बघितलं पण नाही..

वृषभ : मला भेटला.. ज्योसलीनच्या एका फोटोला लाईक केलंय ह्याने..

वृषभ मोबाईलमध्ये बघतच बोलला.. तसे सगळे त्याच्याबाजुला जाऊन बसले..

तोच रॉबिनने शौर्यला एअरपोर्टवर सोडायला जात असताना एअरपोर्ट बाहेर एक ग्रुप सेल्फी काढलेला.. तोच फोटो नैतिकने सगळ्या मित्रमंडळींना टेग करून आपल्या फेसबुकवर नुकताच अपलोड केलेला.. 

रोहन : हा बघ.. जस्ट कोणी तरी ह्याला टेग करत फोटो अपलोड केलाय..

वृषभ फोटो झुम करून बघतो.. 

वृषभ : हा बघ ह्यात शौर्य पण आहे..

समीरा : कुठे तरी फिरायला गेलाय मित्रांसोबत.. गोवा जाणार होताना हा.. मे बी तिथेच गेला असेल.. मस्त एन्जॉय करतोय मित्रांसोबत..

वृषभ : समीरा फोटो नीट बघ.. तुला त्याच्या चेहऱ्यावरून कळत नाही का तो खुप रडला आहे ते.. रडल्यावर त्याचे डोळे आणि नाक पुर्ण लालबुंद होऊन जातात.. 

राज : हो.. 

रोहन : ए वृषभ वर्ती मेसेज बघ काय लिहिलाय.. Words cannot describe what you mean to us. So we’ll just tell you “We love you SD” – and see you again when you return to us soon. If you’re nervous on your journey, just think about us – because we all will absolutely be thinking about you. Travel safe, मेरे दोस्त... We really really Miss you U Shaury... 

वृषभच्या हातुन मोबाईलच गळुन खाली पडतो..

रोहन : तो खरच निघुन गेला USA ला..

वृषभ : आता नाही भेटु शकणार त्याला आपण.. सगळे होप्स संपलेत यार..

टॉनी : तुम्ही दोघ प्लिज अस रडु नका.. तो कायमच थोडी ना जाणार.. एक ना एक दिवस इंडियात येणार ना.. 

सगळेच तोंड पाडुन बसले.. शौर्यला मिळायसाठी जेवढ्या पण होप्स त्यांच्या होत्या त्या सगळ्या संपल्या होत्या.. 

रोहन तिथुन उठुन आपली बेग भरू लागतो..

समीरा : काय करतोयस..??

रोहन : घरी जातोय.. नशिबात असेल तर भेटेल मी परत त्याला..

(डोळे पुसतच तो बोलला.)

सगळेच आपल्या बेगा भरू लागले.. समीराला आणि तिच्या घरच्यांना निरोप देत सगळे त्याच क्षणाला आपापल्या घरी निघुन जातात...

★★★★★

इथे शौर्य एकटक विमानाच्या खिडकीबाहेर बघत इंडियाला बाय बाय करत होता..

विराज : दोन वर्षांनी येशीलना तु इथे माझ्यासाठी??

शौर्य विराजकडे थोडं चकीत होऊन बघु लागतो..

शौर्य : नक्की किती वर्षासाठी चाललोय मी विर..

विराज : 4 वर्षासाठी..

शौर्य : मग 2 वर्षांनी का येऊ..

विराज : मी लग्न करतोयना..

काय.. ??? शौर्य जोरातच ओरडतो.. तसे फ्लाईटमधले सगळे दोघा भावांकडे बघु लागतात..

हळू ना.. विराज त्याच्या तोंडावर हात ठेवतच बोलतो..

Any thing you want Sir?? एअर हॉस्टेस विराजजवळ येतच त्याला विचारते

विराज : No thanks..

शौर्य :  I want water pls...

Sure sir.. एअरहॉस्टेस शौर्यला पाणी देते आणि तिथुन निघुन जाते..

शौर्य : ए विर खरच लग्न करतोयस??

विराज : हो.. त्यात एवढ शॉक होण्यासारख काय आहे. आज ना उद्या मी करणारच होतो..

शौर्य : Good you informed me post flying नाही तर मी आत्तापासूनच तैयारीला लागलो असतो.. तु विचारच नाही करू शकत... मी खुप प्लॅन केलेत तुझ्या लग्नाबद्दल.. मला मस्त एन्जॉय करायचय तुझं लग्न... हॉल डेकोरेशनपासुन, तुझा कॉश्च्युम्स आणि सगळं काही.. म्हणजे सगळं सगळंच मी ठरवणार हा विर.. वेडिंग कार्ड पण मीच सिलेक्ट करणार.. मी ना एक दोन सरप्राईज पण तुम्हा दोघांसाठी प्लॅन केलेत..

विराज : शौर्य दोन वर्ष आहेत अजुन.. 

 (शौर्यला अस मन खोलुन बोलताना बघुन विराज हसतच त्याला बोलतो).

शौर्य : मग प्लॅन तर आत्तापासूनच करायला हवे ना.. तुझ्या वरातीत तर मी एवढा नाचेल ना.. तु बघतच रहा..  मला खुप एन्जॉय करायच तुझं लग्न विर.. अस कोणीच कोणाच्या भावाच लग्न केलं नसेल अस.. लग्नातले सगळे फंक्शन पण थोडे हटके ठेवुयात... तुझी हळदी तर मी समीराच्या भावाच्या हळदी.....

मध्येच आपण समीराच नाव घेतलं हे लक्षात आलं तस शौर्य परत शांत होतो.. तोंड पाडुन पुन्हा खिकडी बाहेर बघु लागतो.. विर त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला धीर देतो..

विराज : थोडा वेळ लागेल. पण सगळं ठिक होईल..

शौर्य : विर.. तुझं लग्न तिच्यासोबतच होतय ना जिच्यावर तु प्रेम केलंस..

विराज : हम्मम..

शौर्य : कशी आहे ती..

विराज : तु स्वतः भेट नि सांग मला.. येईल ती भेटायला उद्या एअरपोर्टवर.. तुझं एडमिशनच पण तिनेच सगळं केलंय..

शौर्य : हम्मम.. तिला उद्या भेटुन थेंक्स बोलेल.. बट विर कधी ही दोन वर्षे संपतायत अस झालय यार.. तु मला दोन वर्षांनी सांगायच ना..

विराज : फोन वरून सांगितलं असत मग तुझे हे एक्सप्रेशन कसे बघायला भेटले असते मला..

शौर्य : हम्मम..

शौर्य एकटक खिडकीबाहेर बघत रहातो.. त्याला त्याच्या मित्रमंडळींची आठवण येत असते.. समीराच्या भावाच्या लग्नात केलेली धमाल मस्ती त्याला आठवत असते.. हलकेच हसु येत असत त्याच्या ओठांवर. आणि अचानक वृषभचे शब्द, समीराच त्याच्या आयुष्यातून निघुन जान, ब्लॅकबोर्डवर लिहिले ते शब्द.. तस डोळ्यांतुन पुन्हा पाणी येऊ लागत.. आपले डोळे पुसुन तो विरकडे बघतो.. विराज झोपला असतो.. शौर्यला मात्र झोप येत नसते.. जवळपास 18 तासाच्या प्रवासात तो एक टक फक्त खिडकी बाहेर बघुन होऊन गेलेले क्षण आठवत होता..

 फायनली दोघेही USA ला पोहचतात.. एअरपोर्टवर विराजची नजर अनघाला शोधत असते..

थोडं पुढे जाताच त्याला अनघा दिसते.. 

हेय शौर्य ती बघ तिथे... विराज शौर्यला अनघा दाखवतच त्याला घेऊन तिच्याकडे जाऊ लागला.. अनघा म्हणजे सुंदर अस व्यक्तिमत्व.. दिसण्यासोबत तीच मन आणि विचार दोघेही तितकेच सुंदर.. 

विराज : खुप वेळ वाट बघावी लागली का तुला??

विराजला एवढ प्रेमाने तिच्याशी बोलताना बघुन शौर्य एक भुवई वर करतच त्याच्याकडे बघु लागतो..

अनघा : एवढं काही नाही.. मुळात तुम्ही दोघ येणार म्हणुन मीच लवकर रेडी होऊन इथे आली.. 

विराज : सॉरी मी तुम्हा दोघांची ओळख नाही करून दिली..

हाय मी शौर्य.. विरचा छोटा भाऊ.. 

(विराज काही बोलणार तोच शौर्य बोलतो)

अनघा : Nice to meet you.. अस बोलत अनघा फुलांचा बुके त्याच्या हातात देते.

शौर्य : हे माझ्यासाठी होत??

अनघा : हो.. कारण विराजला मी अस बुके वैगेरे घेऊन इथे उभं राहिलेलं नाही आवडत.. तुझ पण तसच आहे का??

शौर्य : अजिबात नाही.. मला तर खुप आवडतात फुल.. आणि थेंक्स.. 

अनघा : यु आर वेलकम..

शौर्य : एक मिनिट बुकेसाठी मी थेंक्स नाही बोलत आहे.. ते तुम्ही माझ्या एडमिशनसाठी खुप मेहनत घेतली अस मला विरकडुन कळलं त्यासाठी मी थेंक्स बोलतोय आणि बुकेसाठी तर खुप खुप थेंक्स.. तुमच्यासारखाच बुके खुप सुंदर आहे.. विर माझी होणारी वहिनी खुप खुप छान आहे.. त्याहुन छान तुम्हा दोघांची जोडी..

शौर्य अस बोलताच विराज आणि अनघा दोघेही एकमेकांकडे हसत बघतात..

अनघा : तु मला अस अहो जाओ का करतोस..?? अरे तुरे करू शकतोस.. वहिणीपेक्षा मला तुझी मैत्रीण बनून रहायला आवडेल..

ओके.. शौर्य हसतच तिला बोलतो..

विराज : आता आपण निघुयात इथुन??

अनघा : हो.. मी हॉटेल बुक केलेत तुम्हां दोघांसाठी.. फ्रेश वैगेरे होऊन मग आपण कॉलेजला जाऊयात.. कारण मला परत इथे यायला मिळणार नाही.. 

शौर्य : म्हणजे?? तु इथे नाही रहात..?

विराज : नाही.. ती वॉशिंग्टनला असते..आणि हे न्युयॉर्क आहे.. ती पण माझ्यासारखीच बिजी असते.. ति इथे शिकते पण आणि लेक्चरर पण आहे..  आणि आज ती आपल्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी खास वेळ काढुन आलीय..

शौर्य : ओहहह.. थेंक्स..

अनघा : त्यात थेंक्स बोलण्यासारखं काहीच नाही.. उलट मला तुला थेंक्स बोलावं लागेल.. तुझ्या निमीत्ताने तरी विराजला मला भेटता आलं..

अनघा विराजकडे बघतच बोलली..

सगळेच गाडीत बसुन हॉटेलवर जायला निघाले.. शौर्य ड्रायव्हरच्या बाजुला बसुन गाडी बाहेरील दृश्य बघत बसला होता.. विराज अनघासोबत मागे बसुन तिच्याशी गप्पा मारत असतो.. शौर्यला त्या दोघांना अस एकत्र बघुन समीरा आणि तो फिरायला गेलेला तो दिवस आठवतो.. तेव्हा ते दोघे सुद्धा असेच गप्पा मारत बसलेले.. मी खरच विसरू शकेल का सगळ्यांना.. शौर्य स्वतःच्याच मनाला प्रश्न करत होता.. अनघा आणि विराजला एकत्र बघुन तो खूप बैचेन होत असतो.. त्याला ह्या क्षणाला समीरा त्याच्यासोबत हवी अस वाटत असत.. तिची खूप आठवण येत असते.. डोळे अगदी घट्ट बंद करत तो त्याच डोकं शांत करण्याचा प्रयत्न करतो..

शौर्य : विर.. मला आज कॉलेज बघायला नाही यायचय.. आपण उद्या जाऊयात ना..

शौर्य अस बोलताच विराज अनघाकडे बघु लागतो..

विराज : अजिबात नाही आपण फ्रेश होऊन लगेच निघतोय.. उद्या कोण दाखवणार कॉलेज तुला..??

शौर्य : तु आज जाऊन बघुन ये ना.. आपण दोघ उद्या जाऊयात.. मला आज नाही यायच.. मी दमलोय आज..

विराज : तुला झालं काय आज?? तुझ्यासोबत मी पण ट्रॅव्हल करून आलोय.. तरी मी येतोय ना कॉलेज बघायला..

शौर्य : विर प्लिज ना... 

विराज : एक गोष्ट मी तुला दहा वेळा नाही हा सांगणार शौर्य.. आपण आजच जातोय कॉलेज बघायला..

(विराज शौर्यवर जोरातच ओरडतो)

अनघा : विराज.. कुल डाऊन.. मी बोलते त्याच्याशी.. शौर्य कॉलेज लांब नाही आहे.. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबणार ना तिथुन वोकिंग आहे.. तु प्लिज चल ना आमच्यासोबत... मला पण कळु दे ना तुला मी तुझ्यासाठी चॉईज केलेल कॉलेज आवडत का ते?? आणि मला स्वतःला तुला ते कॉलेज दाखवायला आवडेल... प्लिज.. माझ्यासाठी आजच चल..

अनघाच्या बोलण्यावर शौर्य काहीच रिएक्ट करत नाही तो शांत बसुन असतो..

गाडी एका अलिशान अश्या हॉटेलबाहेर येऊन थांबते..

अनघा : मी इथे रिसेप्शनजवळ थांबते तुमची वाट बघत.. लवकर या..

शौर्य विराजसोबत रूममध्ये जाऊ लागला..

अनघा : शौर्य.. तु येतोयस ना..???

शौर्य : विरच्या शब्दाबाहेर जस नाही तस आजपासुन तुझ्यापण नाही.. 

अस बोलुन शौर्य रूममध्ये जायला निघतो...

विराज हसतच अनघाकडे बघतो..

दोघेही रूममध्ये येऊन फ्रेश होतात..

शौर्य आरशासमोर उभं राहुन आपल्या केसांवरून हेअर ब्रश फिरवत असतो..

विराज : तुला का नाही यायच होत आज कॉलेज बघायला..

शौर्य : तुला नाही कळणार..

विराज : काय कळणार नाही..

शौर्य : चल खाली ती वाट बघत असेल..

विराज : काय होतंय शौर्य??

शौर्य विराजच्या प्रश्नाच उत्तर न देताच रूम बाहेर पडतो.. त्याच्या मागोमाग विराज पण रूम बाहेर पडतो..

थेंक्स शौर्य.. शौर्यला आलेलं बघुन अनघा त्याला बोलते..

विराज : आपण ब्रेकफास्ट करूयात आणि मग कॉलेज बघायला जाऊयात??

अनघा : सॉरी विराज पण हा लंच टाईम आहे इथे.. आणि अजुन उशीर नको ना करूयात. आपण कॉलेज बघुन झाल्यावर लंच करून घेऊयात..

विराज : ओके..

तिघेही अनघासोबत कॉलेजच्या गेट बाहेर येऊन उभ रहातात... एवढं मोठं कॉलेज विराज आणि शौर्य बघतच रहातो..

अनघा : शौर्य न्यूयॉर्क मधलं सगळ्यात मोठ कॉलेज आहे हे.. इथे तुला ज्या गोष्टी आवडतात ना त्या सगळ्या आहेत..  सध्या व्हेकेशन आहे इथे.. आणि एडमिशन चालु आहेत म्हणुन आपल्याला अस कॉलेज बघता येतंय.. नाहीतर इथे अस अलाऊड नसत.. व्हेकेशन आहे इथे तरी तुला इथे काही स्टुडंन्ट दिसत असतील.. कारण काही असतात ज्यांना काही कारणामुळे व्हेकेशनमध्ये घरी  जायला नाही जमत.. ते पण तुझ्या सारखेच लांबुन आलेले असतात.. म्हणुन ते इथेच रहातात..

शौर्य : मी व्हेकेशनमध्ये घरी जाणार.. मी नाही इथे रहाणार..

अनघा आणि विराज शौर्यला हसु लागतात..

विराज : अनघा नीट ऐक हा.. हा काय बोललोय ते.. बघु बोलतोय तस वागतो का?? आणि खरंच मुंबईला येणार तु??

शौर्य : मुंबईला नाही येणार.. लोणावळाला येऊ शकतो ना.. आय नो.. ते तुझं घर आहे.. बट व्हेकेशनसाठी तर मी राहू शकतो तिथे..

विराज : शौर्य परत सुरू झालं तुझं माझं करायला??

शौर्य : प्लिज विर माझ्या होणाऱ्या वहिनीसमोर तरी माझ्याशी थोडं नीट बोलत जा.. बघावं तेव्हा नुसता ओरडत असतो माझ्यावर.. नाही तर मारत तरी असतो..

शौर्य अस बोलताच विराज आणि अनघा दोघेही त्याला हसु लागतात..

अनघा : थोड्या दिवसांनी रमुन जाशील तु..  आता आपण तुझं कॉलेज बघुयात... अनघा शौर्य आणि विराजला संपूर्ण कॉलेज दाखवते.. 

विराज : फुटबॉल ग्राउंड पण दाखव ना ह्याला.. फुटबॉल असेल मग शौर्य मस्त राहील..

अनघा दोघांना फुटबॉल ग्राउंडवर घेऊन जाते.. मोजुन आठ नऊ मंडळी तिथे फुटबॉल खेळत असतात..

फुटबॉल ग्राउंड बघुन शौर्यच्या चेहऱ्यावर थोडं तेज येत.. 

शौर्य : विर थोडा वेळ बघुयात ना इथे उभं राहुन हे लोक कसे फुटबॉल खेळतात ते.. 

विराज : बघण्यापेक्षा खेळ जा ना..

शौर्य काही बोलणार तोच फुटबॉल ही त्याला येऊन धडकतो....

विराज : बघ फुटबॉल स्वतः आला तुला बोलवायला.. जा खेळ जा..

शौर्य : नाही नको.. राहू दे..

Hey dude can you please pass this football?? ग्राउंडवर खेळणाऱ्यांपैकी एक जण रिक्वेस्ट करत शौर्यकडे फुटबॉल मागु लागला.. 

शौर्य फुटबॉलकडे एकटक बघतच राहिला.. त्याला त्या क्षणाला रोहनची आठवण येते.. पहिल्याच दिवशी घडलेली त्याची फुटबॉलवाली भेट त्याला आठवते.. शौर्य पुन्हा जुन्या आठवणीत रमुन जातो..

विराज : Hey dude, I challenge you all, that you can’t stop my brother to strike the goal

(शौर्य काही स्वतःहुन खेळायला जाणार नाही म्हणुन विराज मुद्दामुन बोलतो)

विराज मोठ्याने ओरडतो.. तसा शौर्य जुन्या आठवणीतून बाहेर जातो...

शौर्य : ए विर काय करतोयस तु??

Are you serious.?? 

विराज : Yes I am...

Think again. We are of 9 people and your brother is alone . Will be able to strike the goal??

विराज : Ya.. ya ..I always think twice before speak.. but all of you ready to accept this challenge..??

फुटबॉल खेळणारे सगळेच एकमेकांकडे बघत आपले अंगठे दाखवतच रेडी म्हणुन सांगतात.. आणि शौर्यला हाताने इशारा करतच आपल्याकडे बोलवु लागतात..

अनघा : विराज तु सिरीयसली बोलतोयसना?? ते 9 जण त्यात हा एकटा..

(आपला हात दाखवत अनघाला मध्येच थांबवतो..)

विराज : तु बघशीलच.. माझा भाऊ कसला भारी खेळतो ते.. शौर्य एक झलक माझ्या अनघासाठी होऊन जाऊ दे....

विराज अनघाचा हात पकडत तिला बाजुला घेऊन जातो..

अनघा : Best of luck शौर्य..

थँक्स बोलतच शौर्य फुटबॉल हळुहळु किक करत पुढे जाऊ लागतो.. सगळ्यांकडे नजर फिरवत तो लांब असणाऱ्या गॉलपोस्टवर एक नजर टाकतो.. आपल्या डोळ्यांपुढे दोन बोट करत त्यांना त्याच्यापासून लांब असलेला गॉलपोस्ट दाखवतो.. जेणे करून तो त्यांना सांगत असतो की मी त्या गॉलपोस्टवर गॉल करणार आहे..

yaa ok..त्यांच्यातील एक जण एक अंगठा दाखवतच त्याला बोलतो..

कमोन शौर्य.. विराज लांबुन जोरातच ओरडतो.. 

शौर्य फुटबॉलला किक मारतच हळुहळु पुढे जाऊ लागला.. तस एक एक जण त्याच्या समोर येऊ लागले.. नेहमीप्रमाणेच आपल्या फुटबॉलवर असणाऱ्या मजबूत अश्या पकडीवर एकेकाला चकवा देतच शौर्य पुढे जातो.. आणि फायनली गोलकीपरकडे एक तेज अशी नजर फिरवत.. उजव्या पायावर फुटबॉल जगलिंग करतच हवेत उडवतच तो बायसायकील किक फुटबॉलला मारतच ग्राउंडवर पडतो.. आपली मान लगेच वर करत फुटबॉल गॉल होतो का ते बघतो.. विराज आणि अनघासोबत ग्राउंडवर खेळणारे प्रत्येक जण श्वास रोखुन गोलकीपरकडे बघतात.. गोलकीपर पण त्याचा आगळा वेगळा शॉट बघुन थोडं चकित होतो आणि गॉलकीपरचा फुटबॉल अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो.. फुटबॉल पकडण्याच्या नादात गॉलकिपर खाली पडतो आणि हा फुटबॉल तारेच्या रिंगणात..

येहहह.. शौर्य खुश होतच बोलतो..

अनघा : ग्रेट.. खरच खुपच छान खेळतो हा..

अनघा टाळ्या वाजवतच विराजला बोलते..

विराज : भाऊ कुणाचा आहे..

अनघा : माझ्या नवऱ्याचा...

(अनघा हसतच विराजला बोलते)

इथे ग्राउंडवर असलेले सगळेच त्याच्यासाठी टाळ्या वाजवत त्याच्या जवळ येत त्याला हायफाय देतात..

hey I am methiv..You are so good in playing football. I became your fan now. 

शौर्य : Thanks dude, am Shaury..

मेथीव्ह : शरया..

शौर्य : No its शौर्य..

मेथीव्ह : Hey men, It’s hard to remember your name , is there any pet name or is there any short cut of your name

शौर्य : yaa.. U can call me SD..

मेथीव्ह : SD...good it's easy for us.. what u can say guy's..

Hey Shaury your are Indian??

शौर्य : येस..

जसविंदार : ओय बल्ले बल्ले....और एक इंडियन मिल गया.. sorry i forgot to introduce my self.. My name is Jasvindar.. but u can called me Jas..and nice to meet you यार..

me too...शौर्य त्याला हात मिळवतच बोलला..

Hey ronaldo hear..

m john..

सगळेच एक एक करून शौर्यला आपली ओळख करून देऊ लागले..

शौर्य त्यांच्यासोबत फुटबॉल खेळु लागला.. तेवढाच अनघा आणि विराजला एकमेकांसाठी वेळ मिळाला.. दोघेही तिथेच बसुन शौर्यचा खेळ बघतच गप्पा मारू लागले..

जवळपास अर्ध्या एक तासाने शौर्य त्या लोकांना बाय करतच तिथुन निघाला.. तसा जसविंदार त्याला आवाज देत त्याच्या मागे आला..

जसविंदार : 1st इयर ना??

शौर्य : हा.. और तु??

जसविंदार : में भी यार.. कोणसे फ्लॉरपर हे.. 

शौर्य : मतलब??

जसविंदार : तेरा रूम यार.. हॉस्टेल में ही रहेगा ना तु??

शौर्य : नही पता.. अब तक देखा नही.. आज हि आया हुं में.. 

जसविंदार : ओहहह.. फिर चल मेरे साथ??

शौर्य : किधर??

जसविंदार : अरे और भी फ्रेंड्स हे तुझे उनसे मिलवाता हुं..

जसविंदार अस बोलताच शौर्यला तो परत एका नवीन राजला भेटतोय अस वाटलं.. दिल्लीला राजनेच त्याची सगळ्यांशी ओळख करून दिली होती..

जसविंदार पुढे निघुन गेला शौर्य तिथेच उभं राहुन विचार करू लागतो...

जसविंदार : ओय शौर्य कीठ्ठे??

(शौर्य अस एकाच ठिकाणी थांबलाय हे बघुन जसविंदार त्याला बोलतो)

शौर्य : मतलब??

जसविंदार : मतलब किधर खोया हे तु?? 

शौर्य : किधर भी तो नही..

जसविंदार : चल फिर??

शौर्य : एक मिनिट..

शौर्य विराजकडे जातो आणि त्याला सांगतो.. विराज त्याला जा म्हणुन सांगतो.. 

अनघा : शौर्य हा फोन ठेव तुझ्याजवळ.. (अनघा बेगेतुन फोन काढुन शौर्यकडे देते.. ) मी तुझ्यासाठीच घेतलाय.. हा तुझाच आहे.. 

अनघा अस बोलताच शौर्य विराजकडे बघतो..

विराज : मीच सांगितलेलं तिला तुला फोन आणि नवीन सिम कार्ड घ्यायला.. घे..

शौर्य फोन हातात घेतो..

अनघा : ह्यात माझा नंबर सेव्ह आहे.. तु आरामात फिर.. नवीन मित्र मंडळी बघ.. ओके.. जेव्हा तुला इथुन परत हॉटेलवर यायच असेल तेव्हा मला फोन कर.. आम्ही येऊ न्यायला तुला.. 

विराज : आणि पैसे ठेव.. भूक लागली तर खाऊन घे..

शौर्य : थेंक्स..

शौर्य हसतच जसविंदार सोबत जाऊ लागला..

तो रमतोय इथे हे बघुन विराज आणि अनघाला थोडं बर वाटल..

अनघा आणि विराज दोघेही तिथुन निघाले..

इथे जसविंदार त्याला एका मोठ्या अश्या डान्स फ्लॉरवर घेऊन आला.. जिथे बॉलवूड + हॉलिवूड अस मिक्स सोंगवर सगळे हिप-हॉप डान्स करत होते.. जवळपास दहा बारा जण तरी असतील तिथे..

शौर्य : कॉलेज तो बंद हे ना.. फिर ये लोग प्रॅक्टिस क्यु कर रहे हे??

जसविंदार : किसन बोला कॉलेज बंद हे.. यहापे हमेशा कोंपिटीशन होता हे..?? तुझे पार्टीसिपेंट करना हे तो कर सकता हे. पैसा, ट्रॉफी, सर्टिफिकेट  मिलेगा.. पर अगर जिता तो.. ये टाईम 20000 डॉलर प्राईज हे.. + ट्रॉफी.. पर तुझे हिप-हॉप आणा चाहीये.. ये सब लोग हिप हॉप मास्टर हे..

शौर्य : वो तो आता हे मुझे.. बट मुझे इंटरेस्ट नही हे..

जसविंदार : तुझे आता हे हिप-हॉप.?? 

(गाणं स्टॉप करतच तो शौर्यला बोलला)

शौर्य : हा..but why you stop this music.. Every one watching us. 

hey jas why you stop this music men..

सगळेच जसविंदारला बोलू लागले..

जसविंदार : Hey guys come here and meet him our new team member SD..  he is from India..

जसविंदार सगळ्यांसोबत शौर्यची ओळख करून देतो.. सोबत त्याला हिप-हॉप येतो हे ही सगळ्यांना सांगतो.. 

आर्यन : Hey I am Aryan.. from India..

शौर्य : hello..

आर्यन : मराठी बंदा करेक्ट??

शौर्य : yes..

आर्यन : हे मी पण.. कोणी तरी आहे माझ्यासोबत आता अस बोलायला आता हरकत नाही..

आर्यन : बाय दि वे.. इंडियामध्ये कुठे??

शौर्य : मुंबई आणि तु??

आर्यन : दिल्ली..

शौर्य थोडा चेहरा पाडुन त्याच्याकडे बघु लागतो..

तोच फ्लॉरवर सॉंग पुन्हा चालु होत... 

आर्यन : चल एक बेटल हिप हॉप होऊन जाऊ दे..

hey guys one battle hip-hop.. bollywood vs bollywood.. आर्यन सगळ्यांना चॅलेंज देतच बोलला..

सगळेच सर्कल करून हिपहॉप युद्ध साठी तैयार झाले.. शौर्यसाठी हे काय नवीन नव्हतं. डान्स क्लासेसमध्ये त्याने हे सगळे केलेलं.. आत्ता पुन्हा हे सगळं पाहुन मज्जा येत होती.. सगळेच एक एक करून मध्ये येत त्यांना येणार हिप हॉप्स मूव्ह दाखवत होते.. शौर्य फक्त टाळ्या वाजवत सगळ्यांना चिअरअप करत होता.. आर्यन ने तो नाचायला येत नाही हे बघुन जबरदस्ती त्याला पुढे ढकललं.. सगळेच टाळ्या वाजवत त्याला चिअरअप करत होते.. शौर्यने बॅक फ्लिप करतच.. पॉवरमुव्हस करायला चालु केलं..  नंतर एका हातावर पूर्ण शरीराचा बेलेन्स सांभाळत जम्प करतच बिट्सवर ताल पकडु लागला..

ओहहहहहह... सगळेच टाळ्या वाजवत त्याचा तो डान्स बघु लागले..

शौर्य खुप एन्जॉय करत होता हे सगळं.. डान्समध्ये खर तर त्याचा इंटरेस्ट नव्हता पण काय माहीत आज हळुहळु यायला लागला होता.. त्याने त्यांच्यासोबत त्याच दिवशी पासुन डान्स प्रॅक्टिस पण चालु केली.. सगळेच दमले तसे केंटिंगमध्ये जाऊन लंच करू लागले.. एकत्रच ग्रुप करून मज्जा मस्ती करत सगळे लंच करू लागले.. शौर्य सगळ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत होता.. त्याला एकाच दिवसातच तिकडच वातावरण आवडलेलं..

इथे विराज आणि अनघा लंच साठी एका रेस्टोरेन्टमध्ये येऊन बसतात..

विराज : शौर्यला फोन लावुन बघना?? जेवायला येतो का...?

अनघा लगेच शौर्यला फोन लावते.. रिंग होत असते पण शौर्य फोन उचलत नसतो..

अनघा परत ट्राय करते.. पण शौर्य फोन उचलत नसतो..

अनघा : मे बी बिजी असेल.. मिस कॉल बघुन करेल फोन..

विराज : पण फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे त्याला.. एक फोन उचलुन सांगुच शकतो ना जेवलो की नाही ते.. नाही तर स्वतः फोन करू शकतो ना..?

अनघा : विसरला असेलना.. तु जेव.. 

विराज आणि अनघा जेवुन घेतात.. कॉलेज बाहेर असलेल्या गार्डनमध्ये शौर्य परत कधी येतोय ह्याची वाट बघत असतात.. जवळपास 5 वाजत येतात.. पण शौर्यचा अजुन काही आता पता नसतो

अनघा : विराज माझी 6.45 ची फ्लाईट आहे... आपण एकदा कॉलेजमध्ये जाउन बघुयात..??

विराज : हा असा वागतो ना म्हणुन राग येतो मला ह्याचा..

अनघा : ह्यात रागवण्यासारखं काहीच नाही विराज.. त्याला आवडली असेल ही जागा कदाचित रमला असेल तिथे.. नाही लक्ष गेलं असणार फोनवर.. 

विराज : एक फोन करू शकतो ना पण तो.. त्याला त्रास होतोय अजुन.. पूर्ण बरा नाही झालाय तो.. त्यात औषध नाही घेतलीत त्याने सकाळपासुन. तुला माहिती ना डिप्रेशन बाबत ट्रिटमेंट चालु आहे त्याच्यावर.. म्हणुन काळजी वाटते त्याची..

दोघेही बोलत कॉलेज गेटजवळ पोहचतात.. पण कॉलेजचा गेट तर बंद झाला असतो.. अनघा वाचमेन जवळ विचारपुस करते तेव्हा तिला कळत की कॉलेजमध्ये तर कोणीच नाही..

अनघा पुन्हा शौर्यला फोन लावते.. पण शौर्य फोन उचलतच नसतो.. 

विराज आणि अनघा दोघेही कॉलेज गेटजवळच उभं राहुन त्याची वाट बघत असतात.. जवळपास 5.30 होत आले.. तरी अजुन शौर्यचा काही पता नसतो..

दोघेही आता खुप टेन्शनमध्ये येतात..

तोच शौर्य जसविंदार आणि आर्यन सोबत हॉस्टेलमधुन बाहेर पडताना विराजला दिसतो.. दोघेही त्याला बाय करून पुन्हा हॉस्टेलमध्ये जातात..

विराज त्याच्या समोर जाऊन उभा रहात आपल्या हाताची घडी घालत रागातच त्याच्याकडे बघतो..

शौर्य : तु अस रागात का बघतोयस??? काय झालं??

विराज : तुला फोन फक्त खिश्यात ठेवायला दिलेला का?? उचलता नाही येत..
(विराज जोरातच त्याच्यावर ओरडतो)

शौर्य खिश्यातून फोन काढुन बघतो.. जवळपास अनघाचे 34 मिस कॉल होते..

अनघा : कुठे होतास तु?? आम्ही तुला फोन ट्राय करत होतो.. दोघे पण घाबरून गेलेलो.. एक तर तु इथे नवीन आहेस ना म्हणुन टेन्शन आलेलं आम्हा दोघांना..

शौर्य : मला नाही कळलं फोन वाजत होता ते.. सॉरी..

विराज : स्वतः तर फोन करूच शकत होतास ना..

शौर्य : विरं मी फोन करतच होतो पण

विराज : पण काय?? वेळ नव्हता का?? नेहमी काही ना काही असतच तुझं..

शौर्य : विर प्लिज ना.. ओरडु नकोस ना अस..

विराज : अनघा चल निघुयात आपल्याला उशीर होतोय..

शौर्य : कुठे चाललीस तु..

अनघा : माझी फ्लाईट आहे 6.45 ची.. बाय दि वे.. कॉलेज कस वाटलं तुला?? आवडलं..??

शौर्य : खुप छान.. मला खुप खुप आवडलं.. म्हणजे मी आधी थोडं नर्वस होतो.. पण इथे फ्रेंड्स पण झाले माझे.. मी तर विचार करतोय रात्रीपासून इथेच रहायला यायच.. 

शौर्य विराजकडे बघत बोलतो..

विराज : रात्री कश्याला आता पासुन येऊन बस.. एक काम कर तु इथेच रहा मी तुझी बेग वैगेरे घेऊन येतो.. म्हणजे मी पण मुंबईला जायला मोकळा..

अनघा : विराज तु किती भडकतोयस त्याच्यावर..??

शौर्य : त्याला प्रेमाने बोलता कुठे येतंय माझ्याशी.. मी तर आज सकाळी पहिल्यांदाच त्याला प्रेमाने बोलताना बघितलं.. ते पण तुझ्याशी.. नाही तर हा असाच आहे.. मला सवय आहे जाऊदे.. हा पण थोडी सवय तुला पण करून घ्यावी लागेल.. तस काळजी नको करू.. तुझ्यावर नाही एवढ भडकणार हा.. नाही ना भडकणार विर..??

अनघा हसतच विराजकडे बघते..

(तिघेही केबमध्ये बसत अनघाला एअरपोर्टवर सोडायला जातात)

अजुन 45 मिनिट्स बाकी असतात.. तिघेही शांत बसुन असतात..

शौर्य : बाय दि वे.. फोनला पासवर्ड आहे.. आणि फोन सायलेंटवर पण.. म्हणून मला तुझा फोन येऊन गेला ते कळलंच नाही.. आणि तुम्हां लोकांना लावायला पण मला जमला नाही.. 

अनघा : ओहहह हा.. सो सॉरी.. थांब मी अनलोक करून देते.. ते सिक्युरिटी म्हणुन मी फोन लॉक करून ठेवलेला.. बर झालं तु मी इथुन जायच्या आधी सांगितलंस..

शौर्य अनघाकडे मोबाईल देतो.. आणि विराजकडे बघत असतो..

विराज : सॉरी..

शौर्य : तुला काही तरी बोलतोय हा.. (अनघाकडे बघतच शौर्य बोलला.. अनघा गालातल्या गालात हसतच दोघा भावांच काय चालु आहे ते ऐकत शौर्यला मोबाईल अनलोक करून देते..)

विराज : एक मिनिट मी तिला नाही तुलाच बोलतोय..

शौर्य : इट्स ओके.. मला तु अस सॉरी बोललेलं नाही आवडत माहिती ना.. तस पण माझ्यावर जेवढं भडकायच तेवढं घे भडकुन नंतर काय मी तुला दोन वर्ष तरी दिसणार नाही.. आणि विर इथे रहाण्याचा एक प्रॉफिट काय माहिती.. तु आणि मम्मा इथे अचानक येऊ शकत नाही.. नाही तर दिल्लीत असताना नेहमी मारामारी करायला गेलो की तुम्ही लोक यायचे.. माझा मुड ऑफ करायला.. नेहमी तो फैयाज तुम्हा दोघांमुळे वाचायचा.. तस इथे नाही होणार..

विराज : एक मिनिट.. तु तसले उद्योगधंदे इथे करणार पण नाहीस.. आणि नो मारामारी.. 

शौर्य : बघु..

विराज : बघु म्हणजे..??

शौर्य : बघु म्हणजे लेट्स सी..

विराज : सुधारणार नाहीस तु..

शौर्य : तुला पण असच वाटत ना??? (शौर्य हसतच विराजला बोलतो)

विराज : मी पण का तुझ्याशी बोलत बसलोय..?? जाऊदे..

अनघा : तुम्ही दोघ नेहमी असेच भांडत असता का.??

शौर्य : मी नाही भांडत.. हाच भांडत असतो नेहमी.. मगाशी पण बघितलस ना.. ऐकुणच घेत नाही समोरच्याच.. 

अनघा विराज आणि शौर्यची मस्ती एन्जॉय करत होती..

तोच अनघाच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होते...

सांभाळुन जा.. विराज तिला मिठी मारत बाय बोलतो..

अनघा : शौर्य.. तुझ्याकडे ही 4 वर्ष आहेत.. तु तुला हवं ते सगळं कर.. तुला करावीशी वाटली ना मारामारी बिनदास्त कर.. (हळुच शौर्यला बोलते)  तुला गिटार आवडत वाजवायला तु तेही करू शकतो.. फुटबॉल खेळ.. जे जे आवडत ते सगळं कर. पण त्यासोबत नीट अभ्यासपण कर.. ही स्टडी खुप डीफिकल्ट आहे.. काही डाऊट असतील तर मला कॉल करू शकतोस.. आणि कधीही काही गरज लागली तर मला सांग.. मी येईल इथे ओके.. आणि प्लिज... होऊन गेलेल्या गोष्टी विसरून जा... आता तुझ्या लाईफमध्ये सगळंच चांगलं घडेल.. पोजिटीव्ह रहा.. आपण पोजिटीव्ह राहिलो ना तर सगळं पोजिटीव्ह घडत.. परत भेटुच आपण.. काळजी घे..

शौर्य : माझ्यासाठी तुम्ही दोघ खुप करताय.. आणि ह्या क्षणाला तुम्हा दोघांना थेंक्स बोलुन मला तुम्हां दोघांना परक नाही करायचय.. होऊन गेलेल्या गोष्टी न विसरण्याचा प्रयत्न करतोय मी.. इथे राहुन जमेल अस वाटतंय मला.. आणि तु पण काळजी घे.. बाय टेक केअर..

अनघा दोघांनाही बाय करून तिथुन निघाली..

विराज ती दिसेनाशी होईपर्यंत तिला बघत रहातो. आणि शौर्य त्याच्याकडे..

शौर्य : विर प्लिज रडु नकोस आता.. 

विराज : तुझं झालं तर जाऊयात आपण..

शौर्य : हेच मी तुला आता बोलणार होतो.. सगळं कसं तुला माझ्या मनातल कळत विर.. खरच तु ग्रेट आहेस..

विराज हसतच शौर्यकडे बघतो.. शौर्य अगदी पाहिल्यासारखं मज्जा मस्ती करत असतो त्याच्यासोबत.. खर तर विराज 1 महिना रहाणार असतो.. पण शौर्य एका आठवड्यातच त्याला अगदी नॉर्मल झालाय अस वाटत.. रोज हॉटेलमध्ये येऊन तो कॉलेजमध्ये दिवसभर घडलेल्या मज्जा मस्ती विराजला सांगत असतो.. हळुहळु शौर्यही स्वतःहून आपलं एकएक सामान हॉस्टेलमध्ये नेऊन ठेवत असतो..

एक दिवस विराज रात्री आपलं सामान पेक करत होता..

शौर्य : तु एक महिना रहाणार होतास ना विर??

विराज : पण आता तुला झाली ना सवय इथे.. माझं काम खुप पेंडिंग आहे.. किती दिवस मी कामावर पण नाही गेलोय ते पण बघावं लागेल ना.. तुला हवं तर थांबतो मी इथे..

शौर्य : नाही नको जा.. 

विराज : नक्की??

शौर्य : हम्म

विराज : तुझ्या डान्सचा व्हिडीओ पाठव मला.. मला बघायचंय कस नाचतोस ते..

शौर्य : हम्मम..

विराज : आणि शौर्य पुन्हा जर कधी तु ड्रिंक केलंस तर मी आयुष्यात कधीच तुझं तोंड बघणार नाही.. कळलं तुला??

शौर्य : हम्मम.. नाही होणार परत अस..

दुसऱ्याच दिवशी विराज शौर्यचा निरोप घेऊन मुंबईला येतो..

★★★★★

शौर्य न्युयॉर्कमध्ये मस्त रमुन गेलेला.. पूर्ण दिवस त्याचा कधी निघुन जायचा हे त्याच त्यालाच कळत नव्हता.. अनघाने बोलल्याप्रमाणे त्याला इथे सगळंच करता येत होतं.. सकाळी उठुन जिममध्ये पण तो जात होता.. त्या नंतर लेक्चर अटेंडकरून तो डान्स प्रॅक्टिस.. फुटबॉल प्रॅक्टिस.. एक छोटा बेंड पण कॉलेज तर्फे होता शौर्य तिथे सुद्धा आपलं गिटार घेऊन जायचा.. खुप नवनविन मित्र मंडळी झालेले त्याचे.. आणि मुळात त्याला हवी तशी.. त्याला समजुन घेणारी.. त्याने पूर्ण लाईफ स्टाईल त्याची बदलुन टाकली होती.. ह्यातच नऊ दहा महिने कसे गेले त्याचे त्यालाच कळत नव्हतं.. 

इथे दिल्लीमधील शौर्यचे मित्र मंडळी मात्र रोज त्याची आठवण काढत होते.. फेसबुकवर जाऊन त्याच्या मित्र मंडळींच्या प्रोफाइलवर जाऊन शौर्य रिलेटेड काही फोटो वैगेरे दिसतात का ते बघायचे.. पण शौर्यविषयी त्यांना काहीच माहिती मिळत नव्हती..

आणि अश्यातच एकदा वृषभने सगळ्यांना प्ले हाऊसमध्ये बोलवुन घेतलं..

रोहन : काय झालं तु अस घाई घाईत का बोलवलंस??

वृषभ : अरे न्युजच तशी आहे..

समीरा : आत्ता रोहन पण आलाय प्लिज आत्ता तरी सांगशील.. काय झालं ते???

सगळेच वृषभकडे तो काय सांगतो ते बघत असतात..

(कोणती न्युज असेल वृषभकडे?? आता कथा पुढे काय वळण घेईल.. त्यासाठी भेटूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते ही नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all