जलद लेखान स्पर्धा
अतृप्त शाखिणी !
भाग ३
तिच्या बोलण्याने त्यांना आठवले की तिला उंचनाट्यापासून भीती होती. तिला उंचावरून खाली बघितले की चक्कर येत असतं. त्यांना ते आठवल्यामुळे ते विषय बदलत बोलू लागले,
"चला मग आता आवरून घ्या देवळात जायचं ना आपल्याला? आणि वर्षा तुला तुझ्या मैत्रिणीला देखील भेटायला जायचं आहे ना?"

त्यांच्या बोलण्यावर ती काही बोलणार इतक्यात तिची आई बोलू लागली,
"मैत्रिणीकडे जाऊद्या तिला आज मंदिरात दोन तीन दिवसांनी जाऊ ती कालच बाहेर बसली आहे ना म्हणून."
तिच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन ते होकार देत बाहेर निघून गेले.
काही वेळाने विशाखा तिची अंघोळ वगैरे आवरून वर्षाला बोलवायला म्हणून त्यांच्या खोलीत गेली. तिथे पाठमोरी केस सोडून बसलेली बघितली. तिला बघून विशाखा बोलू लागली,
"ताई चल जायचं ना आपण साक्षी ताईला भेटायला."
तिच्या बोलण्याला तिने कसलाच प्रतिसाद दिला नाही.
"ताई चल जायचं ना आपण साक्षी ताईला भेटायला."
तिच्या बोलण्याला तिने कसलाच प्रतिसाद दिला नाही.
ती पुढे काही बोलणार त्या आधी तिला बाहेरून कोणाचा तरी आवाज ऐकू आला. म्हणून तिने बाहेर जाऊन बघितले.
बाहेर वर्षाचा लहानपणीचा मित्र सुमित त्यांना भेटायला आला होता. तो बाहेर त्यांचं बाबांसोबत गप्पा मारू लागला. विशाखा बाहेर जाताच तिच्या बाबांनी तिच्याशी त्याची ओळख करून दिली.
तिला बघून तो बोलू लागला,
"किती मोठी झालीस, आम्ही खेळायचो तेव्हा किती लहान होती."
त्याच्या बोलण्यावर सगळेच हसू लागले.
"किती मोठी झालीस, आम्ही खेळायचो तेव्हा किती लहान होती."
त्याच्या बोलण्यावर सगळेच हसू लागले.
मग त्याने वर्षाबद्दल विचारले. ती आत रूममध्ये आराम करत असल्याचं त्यांनी सांगितले. त्याला तिला अभिनंदन करायचे होते म्हणून आनंदाने त्याला विशाखा सोबत आत जाऊन तिची भेट घ्यायला सांगितली.
ती गप्पा मारत त्याला आत वर्षा जवळ घेऊन गेली. आत वर्षा अजूनही तशीच बसली होती. आत तिच्या समोर जाऊन तो तिला बोलू लागला,
"काय वर्षा मॅडम? कशा आहात? लग्न ठरल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..."
तरी ती काहीच बोलली नाही.
"काय वर्षा मॅडम? कशा आहात? लग्न ठरल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..."
तरी ती काहीच बोलली नाही.
विशाखाला तिचं वागणं वेगळंच वाटू लागलं. विशाखा सुमितला पुढे बोलू लागली,
"तिला बहुतेक बरं नाही म्हणून, जाऊदे आपण नंतर भेटू तिला, चल."
तिचं ते बोलणं ऐकून तो तिला बोलू लागला,
"चालतंय ठीक आहे ती नाही पण तू तरी आहेस की. चल तुला गाव दाखवतो."
इतकं बोलून ते दोघे हसून बाहेर निघू लागले.

त्याच ते बोलणं ऐकून वर्षा अचानक मागे वळली. तिच्या चेहरा रागाने लाल बुंध झाला होता. तिचे डोळ्यांमधून जणू ज्वाला बाहेर पडत होती. तिचे मोकळे केस हवेत उडू लागले. ती उठून थेट सुमितच्या मागे गेली आणि तिने त्याच्या पाठीवर लाथ घातली. ती लाथ कोणा मनुष्याची नव्हती हे त्याला जाणवले. त्या लाथेने तो उडून थेट घराच्या अंगणात जाऊन पडला. ती दरात येऊन त्याला रागात म्हणाली,
"निघ कुत्र्या..."
तिने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण ती कोणत्या तरी शक्ती मुळे अडवली गेली आणि मग तिने घरचे दार लाऊन घेतले.
"निघ कुत्र्या..."
तिने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण ती कोणत्या तरी शक्ती मुळे अडवली गेली आणि मग तिने घरचे दार लाऊन घेतले.
विशाखा आणि सुरेखा तिच्या सोबत आत घरातच होत्या तिच्या वागण्याने त्या अतिशय घाबरून गेल्या. घाबरून त्या एका कोपऱ्यात बसल्या. वर्षाने एक नजर त्यांच्याकडे बघितले आणि आत खोलीत निघून गेली.
बाहेर अंगणात आनंदने आणि दगडुने सुमितला आधार देवून उठवले. मागच्या काहीक क्षणात काय घडले कोणालाच कळले नाही. आनंदने वर्षाच्या वागण्याची त्याच्याकडे माफी मागितली. सुमित आनंदचा निरोप घेऊन तिथून निघून गेला.
वर्षा आत खोलीत निघून गेल्यावर सुरेखाने घरचा दरवाजा उघडला. ती विशाखाला घेऊन बाहेर आली. त्या दोघी तिचं ते रूप बघून अतिशय घाबरून गेल्या होत्या.
ते सगळे एकत्र वर्षाच्या खोलीत गेले. तिथे वर्षा केस मोकळे सोडून अजूनही रागाने गुरगुरत होती. ह्यांच्या येण्याची चाहूल लागतच ती विचित्र घोगऱ्या आवाजात बोलू लागली,
"का आला आहात इथे निघून जा इथून..."
तिच्या त्या बोलण्याला सगळे घाबरले.
"का आला आहात इथे निघून जा इथून..."
तिच्या त्या बोलण्याला सगळे घाबरले.
तरी हिंमत करून आनंद तिला बोलू लागला,
"वर्षा बेटा... काय झालं? का अशी वागतेस?"
"वर्षा बेटा... काय झालं? का अशी वागतेस?"
त्याच्या त्या बोलण्यावर ती फक्त इतकेच म्हणाली,
"मी वर्षा नाही..."
"मी वर्षा नाही..."
त्याने तिला ती कोण असल्याचं विचारले. त्यावर ती काही न बोलता विचित्र आवाजात फक्त जोरजोरात हसू लागली.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा