Login

अतृप्त शाखिणी ! लेखक : चेतन सुरेश सकपाळ

This Is A Horror Story Of Lady Goast.
जलद लेखन स्पर्धा

अतृप्त शाखिणी !

भाग १

"बाबा आज कित्येक वर्षांनी गावी जातोय आपण. किती भारी वाटतंय. सगळं किती बदललं असेल नाही?"
वर्षा तिच्या बाबांना म्हणाली.

त्यावर तिचे बाबा तिला बोलू लागले,
"हो ना वर्षू. मी तरी कुठे सारखा येत होतो. आई बाबा गेल्यापासून त्या वाड्यात मनच लागत नाही."
ते बोलताना काहीशे हळवे झाले.

आज कित्येक वर्षांनी आनंद त्याची बायको सुरेखा आणि दोन मुलींसोबत गावी जायला निघाला. वाटेत जाता जाता त्यांच्या जुन्या आठवणींच्या गप्पा चालू होत्या.

इतक्या वर्षांनी तिथे जाण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न ठरले होते. गावच्या देवाचा आशीर्वाद घ्यायला म्हणून ते सगळे एकत्र तिथे जात होते.

"पण बाबा इतक्या वर्षांपासून वाडा बंद आहे मग आपण त्यात राहणार कसे?"
विशाखाने विचारले.
विशाखा म्हणजेच त्यांची छोटी मुलगी.

तिच्या प्रश्नावर आनंद बोलू लागला,
"बंद कुठे तो दगडू आहे की तिथे वाड्याची देखरेख करायला. त्याला मी कळवले. त्याने वाडा अगदी स्वच्छ करून ठेवला असेल."

त्याचं बोलून झाल्यावर सुरेखा त्या दोघींना बोलू लागली,
"बरं तिथे पोहोचल्यावर सर्वांना हाक द्यायची सर्वांसोबत आदराने वागायचं. गावची लोकं हे सगळं बघतात नाही तर मग नावं ठेवतात. आणि आम्हाला नाही आवडणार आमच्या इतक्या गुणी मुलींना कोणी नावं ठेवलेली."

तिच्या बोलण्याला दोघींनी स्मित करत होकार दिला. त्या शहरात वाढल्या असल्या तरी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले होते.

त्यांच्या गप्पा मस्ती अशीच चालू राहिल्या. ते सकाळी लवकर निघाले होते. प्रवास लांबचा असल्यामुळे त्यांना लवकर निघणे भाग होते. तिथे काही दिवस रहावं लागणार होतं म्हणून त्यांनी आपल्या ड्रायव्हरला सोबत घेऊन यायचं टाळलं. बघता बघता संध्याकाळ होताच त्यांनी गावात प्रवेश केला.

संध्याकाळच्या मावळत्या सूर्य प्रकाशात गाव अगदी सुंदर रंगून गेलं. वर्षा आणि विशाखा दोघी अगदी मंत्रमुग्ध होऊन गावाचं ते सुंदर रूप पाहू लागल्या. ते दृश्य मनात आणि कॅमेऱ्यात कैद करू लागल्या. त्या लहान असताना त्याच्या बाबांना शहरात चांगली सरकारी नोकरी लागल्यामुळे त्यांनी गाव सोडलं होतं. मग त्या दोघींचं त्या नंतर आज गावी येणं झालं होतं. त्यांचे बाबा गाडी चालवत त्यांना अगदी उत्सुकतेने आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींची त्यांना माहिती सांगू लागले. त्यांच्या जुन्या आठवणी सांगू लागले.

बघता बघता काही वेळातच ते त्यांच्या वाड्यासमोर पोहोचले. वाड्या समोर त्यांचा नोकर दगडू आधीपासून त्यांची वाट बघत तिथे उभा होता. त्यांची गाडी दिसताच त्यांनी पुढे जाऊन हसत त्या सगळ्यांचे स्वागत केले. आनंदाने त्याला गाडीच्या दिक्कीतून त्यांचं सामान काढायला सांगितले आणि ते सगळे पुढे निघून गेले आणि त्यांनी वाड्याच्या गेटच्या आत प्रवेश केला.

त्या दोघी आत जाऊन त्या सुंदर जुन्या वाड्याला आनंदाने मन भरून पाहू लागल्या. सुरेखा आणि आनंदच अधून मधून काही कामा निमित्त तिथं येणं होत असे पण त्या दोघींना इतक्या वर्षात तिथे येता आलं नव्हतं. अगदी आजी आजोबांच्या शेवटच्या दर्शनाला सुद्धा नाही! त्या वेळेस छोटीची १०वी ची तर मोठीची १२वी ची परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांना तिथे येता आलं नव्हतं. आणि त्यांच्या आजी आजोबांना त्यांना भेटायचे असल्यास ते त्यांना शहरातच येऊन भेटत असत.

त्या दोघी वाडा बघत असताना आनंद त्यांना म्हणाला,
"चलायचे आता आत की, इथेच राहायचे?"

त्याच्या त्या बोलण्यावर दोघी ही हसून त्यांच्या मागून आत घरात जाऊ लागल्या. आत प्रवेश करण्याआधी घरच्या अंगणात एक सुंदर तुळशी वृंदावन होते. सर्वांनी त्यांना नमस्कार करून आत निघाले.

ते आत पोहोचण्याआधी दगडूने त्याचं सगळं सामान आत आणून ठेवले. त्या दोघी आतून देखील संपूर्ण वाडा निहारू लागल्या. त्यात त्यांच्या आजीआजोबांचा वास आणि त्यांच्या आठवणी होत्या. तो वाडा फिरत असताना त्यांना त्या दोघांची आठवण झाली.

"चला आता तुम्ही फ्रेश होऊन घ्या... तो पर्यंत मी जेवणाच बघते."
सुरेखाला त्यांचं दुःख जाणवलं म्हणून तिने विषय बदलला.

क्रमश...
0

🎭 Series Post

View all