जलद कथा लेखान स्पर्धा
अतृप्त शाखिणी !
भाग २
तिच्या बोलण्या दोघींनीही होकार दिला आणि फ्रेश होण्यासाठी घरच मागच्या बाजूला निघून गेल्या. घरच्या मागच्या दरात आल्यावर त्यांना तिथे एक जुनी विहिरी दिसली. ती बघून दोघी खुश होऊन ती बघायला पुढे जाऊ लागल्या. इतक्यात त्यांना मागून आवाज आला,
"थांबा... तिथे नका जाऊ. ती विहीर खोल आणि आणि आजूबाजूला शेवाळ आणि चिकट आहे उगाच पाय घसरून पडाल."
दगडू त्यांना म्हणाला. त्याच बोलणं ऐकून त्या तिथेच थांबल्या आणि हात पाय धुवून आत घरात गेल्या.
"थांबा... तिथे नका जाऊ. ती विहीर खोल आणि आणि आजूबाजूला शेवाळ आणि चिकट आहे उगाच पाय घसरून पडाल."
दगडू त्यांना म्हणाला. त्याच बोलणं ऐकून त्या तिथेच थांबल्या आणि हात पाय धुवून आत घरात गेल्या.
सुरेखा स्वयंपाक घरात स्वयंपाकाला लागली. त्या दोघी बाहेर अंगणात बसून बाबांसोबत गप्पा मारू लागल्या. तेव्हा वर्षाला काही तरी आठवलं आणि ती बोलू लागली,
"बाबा मी जाऊन साक्षीला भेटून येते. लहानपणी आम्ही एकत्र किती खेळायचो. मला बघून तिला आनंद होईल."
ती उठून जाणार इतक्यात तिच्या बाबांनी तिला अडवलं,
"थांब... आता कुठे जातेस? अंधार पडलाय आता. सकाळी जा."
तिच्या बाबांना होकार देत ती तिथेच बसली.

काही वेळाने आईने सगळ्यांना आत जेवणासाठी बोलावले. त्यांनी तिघांनी आत जाऊन जेवण करून घेतले. आणि जेवण आटपून ते सगळे आपापल्या खोलीत झोपायला निघाले. आनंद आणि सुरेखा एका खोलीत तर त्यांच्या मुली एका खोलीत झोपायला निघाल्या. पुढेची राहिलेली सगळी कामं दगडूने आटपून घेतली.
जेऊन लवकर झोपल्यामुळे वर्षाला रात्री अचानक तहान लागल्यामुळे जाग आली. ती पाणी पिण्यासाठी म्हणून उठून स्वयंपाक घरात गेली. तिथे जाऊन तिने मठातून पाणी घेतले आणि पिऊ लागली. पाणी पिता पिता तिला हळूहळू कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. स्वयंपाक घर मागच्याच बाजूला होते आणि त्यालाच घरचा मागचा दरवाजा होता.
तिने तो आवाज ऐकला आणि हातातले ग्लास खाली ठेवून. मागचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडून ती बाहेर आली. बाहेर येताच तिला समोर ती मगासची विहीर दिसली आणि त्या विहिरीच्या कट्ट्यावर कोणी तरी मुलगी पाठमोरी बसलेली तिला दिसली. ती तिथे बसून एकटक खाली विहिरीत बघत होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते ते संपूर्ण तिच्या पाठीवर पसरले होते.
वर्षा तिथेच उभी राहून तिला एकटक बघू लागली. तेव्हा अचानक ती विहिरीवरची मुलगी हळूहळू तिची मान मागे फिरवू लागली. तिने तिची मान संपूर्ण मागे फिरवली आणि ती देखील वर्षाच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. ती आता अतिशय भयानक दिसू लागली. तिचा चेहरा विचित्र भासू लागला. चेहऱ्यावर जागोजागी घाव झालेले होते, डोळे दुधासारखे सफेद चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.
तिने अचानक तिचा हात पुढे केला आणि विचित्र प्रकारे हास्य करत ती वर्षाला स्वतः जवळ बोलावू लागली. वर्षा देखील सगळं देह भान हरपून तिच्या दिशेला चालू लागली. ती हळूहळू पाऊले टाकत विहिरीजवळ पोहोचली. तिथे पोहोचून ती देखील वाकून विहिरीत एकटक बघू लागली.
सकाळी त्यांचे बाबा लवकर उठून तोंड धुण्यासाठी म्हणून मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना वर्षा विहिरीच्या बाजूला पडलेली दिसली. त्यांनी लगेच सुरेखा आणि विशाखाला बोलावून घेतले. दगडू तेव्हा काही सामान आणायला बाजारात गेला होता.
त्यांनी वर्षाजवळ जाऊन तिला हळूच दोन्ही हातात उचलून घेतलं आणि घरात घेऊन गेले. सुरेखाला तिच्या मुलीला अशा अवस्थेत बघून रडूच कोसळले.
आत घरात आणून त्यांनी वर्षाच्या चेहऱ्यावर पाणी टाकले तेव्हा ती हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. तिला शुद्धीवर येताना बघून त्यांना आनंद झाला. ती पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्यांनी तिला पाणी प्यायला दिले.
तिचं पाणी पिऊन झाल्यावर ते तिला बोलू लागले,
"वर्षा... तू विहिरीजवळ काय करत होतीस. चक्कर येऊन तिथे कशी पडलीस?"
"वर्षा... तू विहिरीजवळ काय करत होतीस. चक्कर येऊन तिथे कशी पडलीस?"
त्यांच्या प्रश्नावर ती त्यांना बोलू लागली,
"रात्री मी पाणी पिण्यासाठी म्हणून स्वयंपाक घरात गेले. मग मला मागून कसला तरी आवाज आला म्हणून ते बघण्यासाठी म्हणून दरवाजा उघडून विहिरी जवळ जाऊन आत बघितले तर ती विहित खूप खोल भासली मला आणि काय माहित ते बघूनच मी तिथे चक्कर येऊन पडले."

क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा