जलद लेखान स्पर्धा
अतृप्त शाखिणी !
भाग ४
तिच्या त्या भयानक हसण्याने सगळे घाबरून मागे सरकले. तसाच तिच्या खोलीचा दरवाजा बंद झाला. आणि आत तिच्या त्या भयानक हसण्याचा आवाज तसाच चालू राहिला.
आनंदने लगेच दगडूला पाठवून गावच्या गुरुजींना बोलण्याला सांगितले. दगडूने जाऊन काहीच वेळात गुरुजींना तिथे बोलावून आणले.
वाड्याच्या बाहेर बसूनच ते सगळ गुरुजींना सांगू लागले. त्यांचं सगळं बोलणं ऐकून गुरुजींनी आपले डोळे मिटले आणि मंत्र उच्चार करू लागले.
काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर निघाला,
"शाखिणी..."
"शाखिणी..."
त्यांच्या त्या बोलण्याचा अर्थ कोणालाच काही कळाला नाही. त्यांनी त्याचा अर्थ गुरुजींना विचारला. तेव्हा ते बोलू लागले,
"शाखिणीने तुमच्या मुलीला पकडले आहे... शाखिणी म्हणजे एका अविवाहित मुलीचे भूत. हिच्यामुळेच तुमच्या बाबांनी तुमच्या मुलींना इतके वर्ष ह्या गावापासून आणि ह्या घरापासून दूर ठेवले होते. पण आता शेवटी तिचं स्वप्न पूर्ण झालंच."

त्यांच्या त्या बोलण्यावर आनंद त्यांना विचारू लागला,
"ती म्हणजे कोण गुरुजी. आणि ती आमच्या मागे का लागली आहे. बाबांनी आम्हाला हे कधी का सांगितले नाही."
"ती म्हणजे कोण गुरुजी. आणि ती आमच्या मागे का लागली आहे. बाबांनी आम्हाला हे कधी का सांगितले नाही."
त्याच्या त्या प्रश्नावर गुरुजी बोलू लागले,
"ती म्हणजे तुमची आत्या. तिचं गावातील एक मुलावर प्रेम होतं. पण तो आपल्या जातीतील नसल्यामुळे तिला लग्नाला सगळ्यांनी विरोध केला. म्हणून तिने मागच्या विहिरीत उडी टाकून स्वतःला संपवलं. तेव्हा पासून तिची आत्मा तिथेच आहे घरातील लोकांना त्रास देत होती. म्हणून तुझ्या बाबांनी आणि मी मिळून तिला तिथेच विहिरी जवळ बांधून ठेवले होते. हे गावातील कोणाच माहित नव्हते. तुम्हाला देखील हे माहित पडून द्यायचे नव्हते. तुमची मुलगी तिथे मागे विहिरी जवळ गेली होती का?"

त्यावर आनंदने उदासीन होकारार्थी मान हलवली. त्याने गुरुजींच्या चेहऱ्यावरची चिंता वाढलेली त्याला दिसली. ते बसून विचार करू लागले. काही वेळाने ते उठले आणि आनंदाला म्हणाले,
"मी काही वेळातच आलो तो पर्यंत हा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवा कोणी आत जाऊ नका आणि तिला बाहेर येऊ देऊ नका."
"मी काही वेळातच आलो तो पर्यंत हा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवा कोणी आत जाऊ नका आणि तिला बाहेर येऊ देऊ नका."
इतकं बोलून ते झपाझप पाय टाकत तिथून निघून गेले. अंगणात आनंद, सुरेखा आणि विशाखा चिंता करत गुरुजींची वाट बघत बसले. दगडू देखील तिथेच खाली कट्ट्यावर डोक्याला हात लावून बसला.
काही अर्ध्या तासाने गुरुजी दोन माणसांसोबत तिथे आले. त्यांच्या हातात कसली तरी पिशवी होती. ते आनंद जवळ जाऊन बोलू लागले,
"आपण आत जाऊया पूजा मांडू, मी अशा करतो की त्या पूजेने ती तिथून नक्की जाईल. पण तिथे असणार दृश्य भयानक असेल म्हणून जर कोणाला भीती वाटत असेल तर त्यांनी आधीच बाहेर थांबा."
"आपण आत जाऊया पूजा मांडू, मी अशा करतो की त्या पूजेने ती तिथून नक्की जाईल. पण तिथे असणार दृश्य भयानक असेल म्हणून जर कोणाला भीती वाटत असेल तर त्यांनी आधीच बाहेर थांबा."
त्यावर त्या चौघांनीही नकार देत आत येण्याचं बोलू लागले. त्यांना वर्षा बरी व्हायला हवी होती. त्या सगळ्यांनीच मग गुरुजींसोबत आत घरात प्रवेश केला.
आत जाऊन त्यांनी घराच्या मध्यभागीच पूजा मांडली. ते आणि ती दोन माणसं पूजेच्या भोवती बसली. बाकी सगळे त्यांच्या पासून थोड्या अंतरावर उभे राहिले. ह्या सगळ्यामध्ये त्यांचा पूर्ण दिवस निघून गेला. बाहेर बऱ्यापैकी अंधार पसरला. बहुतेक गाव झोपायच्या तयारीत होता.
गुरुजींनी त्यांच्या माणसांनी डोळे बंद करून मंत्रोच्चार सुरू केले. मंत्र म्हणत समोर लावलेली अग्नीत आहुती टाकायला सुरुवात केली. जसजसा अग्निचा धूर सर्वत्र पसरला. तसा आतून जोरजोरात विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला. घरची मंडळी तो आवाज ऐकून घाबरून गेली.
ते हसणं ऐकून गुरुजींनी अजून जोरात मंत्रोच्चार सुरू केला. तेव्हा अचानक घरचे सगळे लाईट चालू बंद व्हायला चालू झाल्या. वर्षाच्या खोलीच्या दरात एक सावली त्यांना खोलीच्या बाहेर येताना दिसली.
काहीच क्षणात ती बाहेर आली. मोकळे सोडलेले केस. भयानक चेहरा. तिचं ते रूप बघून गुरुजी आणि त्यांची माणसे सोडून सगळे घाबरले.
ती बाहेर आल्यावर देखील हसू लागली आणि मध्येच हसू थांबवून त्यांना बोलू लागली,
"ये म्हाताऱ्या गप्पं बस... तुम्ही काहीच वाकडं करू शकणार नाही माझं. निघून जा इथून."
"ये म्हाताऱ्या गप्पं बस... तुम्ही काहीच वाकडं करू शकणार नाही माझं. निघून जा इथून."
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गुरुजी तिला मोठे डोळे करून रागाने बोलू लागले,
"गुपचूप इथे ह्या रिंगणात येऊन बस..."
समोर कुंकुवाणे काढलेल्या रिंगणाकडे बोट दाखवत ते बोलू लागले.
"गुपचूप इथे ह्या रिंगणात येऊन बस..."
समोर कुंकुवाणे काढलेल्या रिंगणाकडे बोट दाखवत ते बोलू लागले.
ती जोरजोरात नकारार्थी मान हलवू लागली. गुरुजींनी हातात छडी घेतली आणि त्यांच्या दोन माणसांकडे बघितलं. त्यांनी गुरुजींचा इशारा समजला त्या दोघांनी उठून दोन्ही बाजूने तिचे हात धरले. ती त्यांना दूर झटकू लागली जोरजोरात किंचाळू लागली. तरी त्या दोघांनी ताकतीने देवाचं नाव घेत तिला त्या रिंगणात बसवले.
त्यात बसल्यावर ती शांत झाली. ती विचित्र नजरेने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागली.
तेव्हा गुरुजींनी समोरच्या अग्नीत भस्म टाकले आणि त्या अग्निचा भडका उडाला. त्याने ती घाबरून गेली. ती त्यांची माफी मागत तिला सोडून देण्याची मागणी करू लागली.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा