जलद लेखान स्पर्धा
अतृप्त शाखिणी !
भाग ५
तिच्या त्या वागण्याने गुरुजी थांबले आणि तिला बोलू लागले,
"का आली आहेस इथे परत? का धरलं आहेस ही मुलीला. तुला दरवर्षी तुझा घास मिळतोय ना मग का त्रास देत आहेस ह्यांना?"
"का आली आहेस इथे परत? का धरलं आहेस ही मुलीला. तुला दरवर्षी तुझा घास मिळतोय ना मग का त्रास देत आहेस ह्यांना?"
त्यावर ती काहीच बोलत नव्हती. ती गप्पा राहिलेली बघून गुरुजी आणखीन भडकले आणि बोलू लागले,
"सांगतेस का आता करू तुला भस्म?"
"सांगतेस का आता करू तुला भस्म?"
त्यांच्या त्या बोलण्याने ती लगेच त्यांना बोलू लागली,
"नको... सांगते मी सांगते... मी माझ्यासाठी नाही आले परत ह्या पोरीसाठी आलीय."
"नको... सांगते मी सांगते... मी माझ्यासाठी नाही आले परत ह्या पोरीसाठी आलीय."
तिच्या बोलण्यावर गुरुजी तिला विचारू लागले,
"कोणासाठी? जिच्या शरीरात आहेस त्या पोरीसाठी?"
"कोणासाठी? जिच्या शरीरात आहेस त्या पोरीसाठी?"
त्यावर ती नकारार्थी मान हलवू लागली. त्यावर मग गुरुजींनी तिला पुढे सांगायला सांगितले.
त्यावर ती बोलू लागली,
"नाही... हिच्या शरीरात मी एकटी नाही आहे माझ्या सोबत कदमांची साक्षी आहे..."
"नाही... हिच्या शरीरात मी एकटी नाही आहे माझ्या सोबत कदमांची साक्षी आहे..."
तिच्या त्या बोलण्याचा गुरुजींना धक्का बसला. ते सावरून तिला विचारू लागले,
"कदमांची साक्षी? ती तर कोणत्या मुला सोबत पळून गेली होती ना? मला नीट सांग काय बोलते आहेस तू."
"कदमांची साक्षी? ती तर कोणत्या मुला सोबत पळून गेली होती ना? मला नीट सांग काय बोलते आहेस तू."
त्यावर ती त्यांना पुढे सांगू लागली,
"ही कदमांची साक्षी... ती कुठे पळून नाही गेली तर तिचा दोन नराधमांनी तिच्या इज्जतीवर हात टाकला ह्या वाड्यात तिचे हाल हाल केले. ती शेवटी त्यांच्या हातून सुटून मागच्या दरवाजातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. मागे पळत ती विहिरीजवळ गेली आणि तिथे पाय घसरून ती विहिरीत पडली. तिथेच तिचा जीव गेला. मग त्या दोघांनी तिला बाहेर काढून तिला मागे एका कोपऱ्यात गाडली आणि ती पळून गेल्याची गावात अफवा पसरवली. मी तिथे बसून ही सगळ बघत होती. माझा जीव जळत होता पण मी काहीच करू शकले नाही. आणि आता कित्येक वर्षांनी तिची बालपणाची मैत्रीण वर्षा इतर अली तिला बघून साक्षीला आनंद झाला. आणि काल रात्री आम्हला चांगलीच संधी मिळाली तिच्यात प्रवेश मिळवायची. मला काहीच नको ह्या पोरीला न्याय मिळवून द्या मी कोणालाच त्रास द्यायला इथे आली नाही. तिला देखील न्याय मिळाला की तिला मुक्ती मिळेल..." इतकं बोलून तिने तिचं बोलणं थांबवलं.

तिच्या बोलण्याने सगळेच स्तब्ध झाले. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. ही तिच साक्षी होती जिला भेटण्यासाठी आल्यापासून वर्षा मागे लागली होती. वर्षाच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आले. ती देखील आतल्या आत रडू लागली. ती आतून साक्षीच दुःख ऐकू शकत होती.
गुरुजींना देखील तिचे वाईट वाटले. ते साक्षीला चांगलेच ओळखत होते. त्यांनी स्वतःला सावरून तिला पुढे बोलू लागले,
"साक्षी बेटा...आम्ही तुला न्याय मिळवून देऊ... आम्हाला माफ कर नको नको ते आरोप आम्ही तुझ्यावर केलेत. पण आता नाही... तू त्या नराधमांची नावे सांग आम्ही त्यांना शिक्षा मिळवून देऊ."
"साक्षी बेटा...आम्ही तुला न्याय मिळवून देऊ... आम्हाला माफ कर नको नको ते आरोप आम्ही तुझ्यावर केलेत. पण आता नाही... तू त्या नराधमांची नावे सांग आम्ही त्यांना शिक्षा मिळवून देऊ."
त्यांच्या बोलण्यावर ती त्यांना बोलू लागली,
"त्यातला एक इथेच, ह्या खोलीत उपस्थित आहे."
"त्यातला एक इथेच, ह्या खोलीत उपस्थित आहे."
इतकं बोलून तिने रागाने दगडूकडे मान फिरवली. तो तिथून पळून जाण्यासाठी दरवाजा पर्यंत पोहोचला होता. आनंदने पळत जाऊन त्याचे मानगूट आणि हात धरून त्याला मागे ओढले आणि जमिनीवर पाडले. गुरुजींसोबत आलेले दोघे देखील त्यांच्या जागेवरून उठून त्या लाथा घालून मारू लागले. मारत असताना त्याला त्या दुसऱ्या व्यक्तीच नाव विचारू लागले.
दगडू जमिनीवर पडून हात जोडून माफी मागू लागला. त्याला मारत असताना गुरुजी तिला त्या दुसऱ्या व्यक्तीच नाव विचारू लागले. तेव्हा ती त्यांना बोलू लागली,
"तो दुसरा व्यक्ती म्हणजे... पाटलांचा सुमित...".
ते नाव ऐकून सर्वांना धक्काच बसला.
"तो दुसरा व्यक्ती म्हणजे... पाटलांचा सुमित...".
ते नाव ऐकून सर्वांना धक्काच बसला.
ते ऐकून गुरुजी तिला बोलू लागले,
"ठीक आहे आम्ही त्याला पकडून देऊ पण तुझं शरीर त्यांनी कुठे पुरले आहे ती जागा तुला आम्हाला दाखवायला हवी."
त्यांच्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान हलवली.
"ठीक आहे आम्ही त्याला पकडून देऊ पण तुझं शरीर त्यांनी कुठे पुरले आहे ती जागा तुला आम्हाला दाखवायला हवी."
त्यांच्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान हलवली.
आनंदने लगेच पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलिस तिथे आले. त्यांनी साक्षीने दाखवलेली जागा खोदली. तिथे त्यानं खरच साक्षीच शरीर भेटले.
पोलिस गावात आल्यामुळे संपूर्ण गाव तिथे गोळा झाले. त्यात साक्षीचे आई वडील देखील होते. त्यानं जेव्हा ते सत्य कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांना जेव्हा कळलं की त्यांची साक्षी वर्षाच्या शरीरात आहे त्यांनी तिथे जाऊन हात जोडून तिची माफी मागू लागले. तिला देखील अश्रू आवरले नाही ती देखील त्यांना बिलगुन रडू लागली.
पोलिसांनी सगळी माहिती आणि दगडूची साक्ष लिहून घेतली आणि ते थेट सुमितच्या घरी निघून गेले. तिथे जाऊन त्यांनी त्याला अटक करून घेऊन गेले.
जाताना त्यांनी साक्षीची बॉडी तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिली. ते घेऊन गावासोबत मिळून त्यांनी तिच्यावर अंतिमसंस्कार केले. तेव्हा तिथे संपूर्ण गावाने तिची माफी मागितली.
त्यावेळेस त्या दोघींनीही वर्षाच शरीर सोडलं. आणि साक्षी आपल्यापुढच्या प्रवासाला जाऊ लागली. तिला जाताना फक्त वर्षाच बघू शकत होती. तिला जाताना बघून ती अश्रू भरल्या डोळ्यांनी तिला निरोप देऊ लागली. आणि आनंदची आत्या पुन्हा जाऊन त्या विहिरी जवळ वसली,
शाखिणी म्हणून...!
शाखिणी म्हणून...!
समाप्त...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा