अट्टाहास कशासाठी ? भाग २

अट्टाहास कशासाठी ? भाग २
काल ज्या ठिकाणी त्यांचे आई वडील होते आज त्या ठिकाणी मूल आहेत.आई वडीलांना आपल्या मुलांना भौतिक सुविधा देणं सोप वाटतं होत मुलांना भावनिक आधार देण्यापेक्षा.

आज ती मुल मोठी झाल्यावर त्या मुलांना आई वडीलांना भौतिक सुख सुविधा पुरवण सोपं वाटतं त्यांचा वेळ देण्यापेक्षा.

आजकालच्या जगात पैसा कमावणं गरजेचं आहे. पण त्याचवेळी कुटूंब समाज यांच्यातील ताळमेळ बसवणे पण तितकंच गरजेच आहे.

ज्येष्ठ नागरिकांची मूल परदेशात जाऊन स्थायिक होतात. तेंव्हा त्या आई वडीलांना वाटणं स्वाभाविक आहे. मुलांनी त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या सोबत असावं. पण ते अट्टाहास कशासाठी करतात. जेंव्हा त्यांनी मुलांना पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी सर्व श्रेष्ठ असतात हि शिकवण दिली आहे ?

मान्य केल, त्यांना मूल त्यांच्या जवळ हवी कारण अडीअडचणीच्या काळात तिचं धावपळ करू शकतात. पण त्यावेळी आई वडीलांना फक्त त्यांची सोय महत्वाची असते.

आई वडीलांच्या नोकरीच्या काळात आई वडील मुलांकडून अपेक्षा ठेवतात मुलांनी त्यांना सपोर्ट करावा. हट्ट करू नये. आई वडील त्यांच्या सोबत कायम हवे असा. मुलांनी वाईट पण वाटून नाही घ्यावं.

जेंव्हा एखाद्या कौतुकाच्या क्षणी दुःखाच्या क्षणी आई बाबा यांना त्याच्या साठी त्या ठिकाणी यायला जमलं नाही. तर त्यांना समजुन घ्यायचं.

आज जेव्हां ते आई वडील मुलांच्या जागी आहेत. त्यांना गरज आहे म्हणून मुलाने परत यावं. हा अट्टाहास करतात. हे कितपत योग्य आहे. त्यावेळीं मुलांनी दाखवलेली समजदारी आई वडील या वेळी का नाही दाखवत.?

मनातल्या मनात विचार करत अनुराधा बाहेर बाल्कनीत उभी होती. तिचं घर पहिल्या मजल्यावर होत. खाली हर्षदा तिच्या कॅब ची वाट बघत होती. अजून कॅब आली नव्हती. तिच लक्ष सारखं समोरच्या बाल्कनी मध्ये उभ्या असलेल्या तिच्या मुलीकडे जात होत. वैदेहीला जवळ घेऊन तिची मेड ऊभी होती.

वैदेहीच्या अंगात स्वेटर होता. आता या ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात अंगात स्वेटर कोण घालणार ? आजारी व्यक्तीच घालणार ना ! या विचारा सरशी अनुराधा मनाशीच हसली.

" वैदू बच्चा मी लवकर या येत हा. औषध घे वेळेवर म्हणजे ताप पळून जाईल."

" हो आई. मी घेते माझी काळजी. तु काल थांबली होती ना माझ्यासाठी. तेंव्हा बघितलं मी तुला किती फोन येत होते. मी बिग गर्ल आहे. मी घेते माझी काळजी. लवकर ये घरी." वैदेही समजूत दार पणे म्हणाली.

अनुराधा हा संवाद तिच्या बाल्कनीत उभी राहून ऐकत होती. तिच मन भूतकाळात गेलं. तिच्या डोळ्यासमोर ती आणि नचिकेत उभे राहिले. त्यावेळीं तिला देखील तिच्या आजारी मुलाला घरी सोडून कामावर जावं लागलं होतं. जेंव्हा त्याला तिची गरज होती. कारण फक्त तिची नोकरी. तिच स्वप्न. तिच करिअर.

त्यावेळी तिचं करिअर नोकरीला प्रधान्य देणं कूठे तरी नचिकेतच्या कोवळ्या मनावर कोरल गेलं आहे. आज मला वाटतं त्याने परत भारतात याव. फक्त माझ्यासाठी. मला सोबत म्हणून.

आज त्याच्याजागी मी आहे. माझ्या जागी तो आहे. जी चुक मी केली, त्याला आर्थिक गरजा भागवण्या साठी जसं काम गरजेचं आहे. तसचं भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी कधी कधी आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते.

पण आज माझ्याकडे वेळ आहे.आज मी पुढं होऊन तिची मदत करू शकते. मनाशी काहीतरी विचार पक्का करत ती जिन्याने खाली गेली.

" हर्षदा, वैदेहीची तब्येत बरी वाटत नाही ग."

" हो काकू. दोन दिवस झाले ताप येत होता. आज जरा बरी आहे असं वाटतं होत. पण अजूनही अंग किंचित् गरम आहे. नी मला मीटिंग साठी कंपनीत जावं लागत आहे."

" हर्षदा तु वैदेहीची काळजी नको करू. तिला माझ्या घरी राहू दे. मी सांभाळते." अनुराधा म्हणाली.

एका मम्माची व्यथा एका आईला समजणारच ना !

हर्षदा आणि सार्थक दोघच राहत होते. त्याचे आई वडील दुसऱ्या शहरात राहतात.

सार्थक गेले चार महिने प्रॉजेक्ट साठी आऊट ऑफ इंडिया गेला होता. तर हर्षदाची तारांबळ उडाली होती. तिची सासू येऊ शकत नव्हती. कारण तिच्या नणंदेची नुकतीच डिलिव्हरी झाली होती. तर तिची सासू गावीच अडकली होती.

तिच्या वडीलांची नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झाली होती. तर ती पण अडकली होती. हॉस्पिटल मध्येच होते तिचे वडील. तिचा भाऊ होता सोबत. त्यामुळे चिंता नव्हती. तिची नोकरी होती. वैदेही ची शाळा, अभ्यास, परीक्षा.त्यामुळे ती आई वडीलांन कडे जाऊ शकत नव्हती.

" चालेल काकु. मी मेडला सांगितल आहे. ती आहे दुपार पर्यंत. पण मला यायला उशीर झाला तर"

" मी वैदेहीला सांभाळते." अनुराधा ने हर्षदाच वाक्य पूर्ण केलं.

हर्षदा ने तस मेडला सांगितलं. इतक्यात तिची कॅब आली. हर्षदा निश्चिंत होती. अनुराधा काकू वैदेहीची काळजी एका आजी सारख्या घेतात म्हणून.

अनुराधा ने हर्षदाची मदत करून आनंद कमावला होता. ती वैदेही मध्ये तिची नचिकेतची छोटी मुलगी शोधत होती.