Login

अवनी एक प्रवास भाग १

“एकट्या मुलीला गाठून तुम्ही स्वतःला मर्द समजता?” रावी तुच्छतेने हसत बोलली. “काय करणार?” एक मुलगा “अशी तर तू हातात येत नाहीस.” “असही तुला मारण्यात काही रस नाहीये.” दूसरा मुलगा तिच्याकडे वासनेच्या नजरेने बघत बोलला.
"तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे." या कथेचा प्रवास तर तिथे संपला. विजय, सायली, राहूल, आराध्या, महेश, प्रणाली, संदेश आणि आरती यांची आयूष्य सूरळीत झाली.

आजपासून सूरवात होत आहे त्यांच्या नव्या पिढीची. विजय आणि सायलीने दत्तक घेतलेल्या त्या मुलीची. विजय ज्या आश्रमात शिकवायला जात होता. तिथल्याच एका सहा वर्षाच्या गोड मूलीचा त्याला लळा लागला. म्हणून त्याने सायलीच्या पूढाकाराने तिला रितसर दत्तक घेतले.

तिच्या या प्रवासात तिच्या सोबत उभे आहेत तिचे हे लहान भावंड जे आधीच्या पर्वाच्या जोडीची पुढची पिढी आहे. आजपासून सूरवात होत आहे या सगळ्यांच्या प्रवासाला.

आधीच्या प्रवासाला जसा प्रतिसाद दिलात, तसाच या प्रवासातही सोबत द्याल हीच अपेक्षा.

अवनी एक प्रवास..

रावी… रावी… रावी… रावी

असा तिच्या नावाचा त्या परीसरात मोठमोठ्याने जप चालू होता. सोबतच चार स्पोर्ट्स बाईकच्या आवाजाने तो परीसरात दणाणून गेला होता. शहरातल्या त्या नामवंत कॉलेजचे बरेच तरूण आणि तरूणी तिथे जमलेले होते.

स्थळ होत, त्या शहराबाहेर नुकत्याच बांधण्यात आलेला सहा पदरी महामार्ग. कॉलेजमधल्या एका साध्या पैजेच रूपांतर या बाईक्सच्या रेसमध्ये झाल होत. रावी तर कधीची याचीच वाट बघत होती.

***** कंपनीची तीनशे सिसी पावर असलेली, काळ्या रंगाची स्पोट्स बाईकवर बसलेली रावी. अंगावर घातलेल्या सुरक्षिततेच्या गिअर्सने ती अगदीच डॅशिंग दिसत होती. जशी पहीली शिटी वाजली तस तिने हेल्मेटची समोरची काच लावून घेतली. तिच्या सोबत अजून तिन जण तिच्यासोबत या रेसच्या स्पर्धेत उतरले होते.

दुसऱ्या शिट्टीला तिने बाईकचा पहीला गिअर टाकला. जशी तिसरी शिट्टी वाजली तश्या चारही बाईक्स हवेबरोबर गप्पा मारू लागल्या. जवळपास तिस किलोमीटरची ती रेस होती. रावीने तिचे सगळ कौशल्य पणाला लावत तिची बाईक एक नंबरवरून मागे हलूच दिली नव्हती.

बघता बघता ते चौघेही रेसच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले. रावीच पूर्ण लक्ष बाईक चालवण्यावर होत. त्यामूळे तिने आजुबाजुला काही पाहीलं नव्हतं. नंतर थोड्याचवेळात तिला एक गोष्ट लक्षात आली की आता तिच्या सोबत तीन बाईक्स ऐवजी पाच बाईक्स तिच्या बाजूला आलेल्या दिसल्या. मग तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिला पूढे काही सूचेपर्यंत त्यांची अंतिम रेषा समोर आली होती आणि पूढे रस्ताच बंद होता. मग ते सगळेच जाथे रस्ता थांबला तिथे जाऊन थांबले.

रावी थांबताच बाकी बाईक्सवाल्यांनी रावीला घेराव घालत त्यांच्या बाईक्स उभ्या केल्या. तर रावी त्या सगळ्यांनाच रोखून बघत राहीली.

आजवर रावीने त्या मुलांना ब-यापैकी प्रत्येक गोष्टीत हरवलं होत. एक दोन वेळेस तर सगळ्यां कॉलेजसमोर त्यातला एकाला कानाखाली वाजवली होती. त्याचा आता ते बदला घ्यायला तिला घेरून उभे होते.

“एकट्या मुलीला गाठून तुम्ही स्वतःला मर्द समजता?” रावी तुच्छतेने हसत बोलली.

“काय करणार?” एक मुलगा “अशी तर तू हातात येत नाहीस.”

“असही तुला मारण्यात काही रस नाहीये.” दूसरा मुलगा तिच्याकडे वासनेच्या नजरेने बघत बोलला.

तशी रावीच्या अंगात शिसारी आली. ती आतुन तर खूपच घाबरली होती. कारण तो भाग इतका सुनसान होता की कितीही आवाज दिला तरीही तो कोणापर्यंतही पोहोचू शकणार नव्हता. आता त्यांची इच्छाही रावीला समजून गेली होती. आपण किती सहज त्यांच्या जाळ्यात फसलो? हा विचार करून ती स्वतःलाच भांडू लागली. पण आता तर उशीर झाला होता.

आता जे होईल ते होईल हा विचार करून तिने बाईकला रेस द्यायला सूरवात केली. तसे बाकी सगळेच तिच्यावर हसू लागले. मग रावीने जागेवरच बाईक गोल गोल फिरवायला सूरवात केली. त्याने आजुबाजुला खूपच धूर झाला. जेव्हा तो धूर जास्तच पसरून काही दिसेनसा झाल. तेव्हाच तिने बाईकचा क्लच झटक्यात सोडून एक लॉग्न जम्प घेतली आणि त्यांनी घातलेल्या घेरावरून सहज बाहेर पडली. तिची ती कलाकारी बघून बाकी सगळेच अचंबित झाले आणि पटकन भानावर येत सावीचा पाठलाग करू लागले.

काही काळ रावी तिची बाईक पळवत राहिली. तिच्यामागे ते पाचही मुल पूर्ण वेगात तिच्याजवळ येत होते. तस तशी तिच्या मनात भीती दाटायला लागली. त्या पाचही मुलांकडे चारशे सीसीची बाईक असल्याने काही वेळातच ते रावीजवळ येऊन पोहोचले. आता ती त्यांच्या हातात येईल या आनंदाने ते तिला चिडवू लागले. तर आधी ते मुल जाणूनबुजून मागे राहिल्याचे रावीला आता समजून चुकले होते. जेणेकरून तिला पुढे जाऊन मग पकडता येईल.

त्यांच अस चिडवण बघून रावी मनातून खूपच घाबरून गेली. आता तिला सरळ मरणाला जाऊन मिठी मारावीशी वाटत होती. पण तेवढ्यातच तिच्या कानावर ते आवाज येऊ लागले. जे क्षणाक्षणाला वाढतच होते. तस तिच्या चेहऱ्यावर आसुरी स्मित झळकल.

रावीच्या बाजूला बाईक पळवताना त्या मुलाचं सगळ लक्ष रावीवर होत. पण काही वेळातच त्यांच्या आजूबाजूला किमान सात ते आठ बाईक्स पळताना त्यांना दिसायला लागल्या. त्याही महागातल्या कंपनीच्या स्पोर्ट बाईक्स आणि त्या सगळ्याच एक हजार सीसीच्या. त्यावर काळ्या रंगाचे गिअर्स घातलेले, धिप्पाड अश्या व्यक्ती त्या बाइक्स चालवत होत्या. त्यांचे आणि रावीचे कपडे आणि गिअर्स अगदीच सारखे सारखे दिसत होते. यावरून ते रावीचे सोबती असल्याचे त्या मुलांना जाणवले. एवढा वेळ रावीवर मर्दानगी दाखवणारे ते आत स्वतःच घाबरून गेले.

पुढच्या काही क्षणातच त्या सगळ्या बाईक्स थांबल्या. ती मुल अजूनही त्यांच्या मधोमध होती. मग काय? बाईक्सला अडकवलेले लोखंडाचे पाईप बाहेर निघाले आणि त्या पाचही मुलांची यथेच्छ धुलाई करायला त्यांनी सुरवात केली. तर रावी तिची बाईक मेन स्टँडला लावून त्यावर बसली आणि फक्त पुढे दिसणारी गम्मत बघत राहिली. तिच्या मनातले ते आनंदाचे तरंग उडत असताना तिला तिचीही चूक असल्याचे आता आठवले. त्यांची मार खायची पाळी झाल्यावर तिचीही ओरडा खायची पाळी येणार असल्याचे तिला समजले. ते सगळेच तिकडे व्यस्त असताना रावी मात्र हळूच तिची बाईक चालू करून तिथून पटकन पळून गेली.

इकडे त्या मुलांची यथेच्छ धुलाई झाल्यावर ते सगळेच रावीला बघू लागले. तर ती आधीच गायब झाली होती. मग त्यांनी त्यांचे हेल्मेट काढले. तोपर्यंत ती बाकीची पाचही मूल या सगळ्यांच लक्ष नाही बघून पळून गेले.

“दि,” एकाने त्याचा मोबाईल काढून त्यावर फोन लावला. “तुझा छोटा पॅकेट बराच मोठा धमाका करून तुझ्याकडे यायला निघाला आहे. आज जर तिला पाठीशी घातलस ना तर बघ.”

त्या सगळ्यांनाच माहीती होत की रावीने अश्या काही काड्या केल्या की सरळ उठून त्यांच्या लाडक्या दि कडे जात असायची.

“आता काय केल तिने?” दि टेन्शनमध्ये येत विचारू लागली.

मग त्याने आता जे घडलं ते सगळच तिला सांगीतल. तशी त्यांची दि पण टेन्शनमधे आली. “ठिक आहे मी बोलते तिच्याशी.” ती पण आता थोडे रागात बोलली.

मोबाईल ठेवल्यावर त्या सगळ्यांनीच एकमेकांकडे पाहीलं आणि दिर्घ श्वास घेत तिथून निघायला सूरवात केली.

इकडे रावी तिची बाईक खूपच फास्ट चालवत होती. कारण त्यांची ती हजार सीसीची बाईक कधीही तिच्यापर्यंत येऊन पोहोचू शकत होती. आत्तापर्यंत त्यांच्या दि ला त्यांनी फोन केला असल्याचे तिला माहीतीच होत. म्हणून ती तिच्याकडे न जाता सरळ दिच्याही वरच्या सपोर्ट सिस्टीमकडे म्हणजेच तिच्या लाडक्या मामांकडे जायला निघाली.

रावी, रंगाने तिच्या आईवर म्हणजेच सोनालीवर गेलेली. उंचीला तिच्या वडिलांप्रमाणे म्हणजेच रुद्रसारखी पावणेसहा फूटची उंची. दोघांच्या नावाला अनुसरून तिचं रावी नाव ठेवलं होत.

ज्याने त्यांच्या दि ला फोन केला तो म्हणजे आरुष, राहुल आणि आराध्याचा मुलगा. त्यांच्यात तो सर्वात मोठा. त्याच्यासोबत सुजय विजय आणि सायलीचा मुलगा, आदेश संदेश आणि आरतीचा मुलगा, माला महेश आणि प्रणालीची मुलगी, ही तर टोमबॉयच होती. तिच्यात एकही मुलीचे गुण नव्हते. तिच्याकडे फक्त तिच्या आईच सुंदर रूप होत. बाकी सगळे गुण महेशचेच होते. अरे ला लगेच का रे करणारी. जय हा सुरज आणि जियाचा मुलगा. बाकी त्यांच्यासोबत दोघ तिघे त्यांच्या रायडींग ग्रुपमधली मुल होती.

ह्या सर्वांची मोठी बहिण, सपोर्टर, मेंटोर, शिक्षिका विजय आणि सायलीने दत्तक घेतलेली मुलगी म्हणजेच परी जीच नंतर अवनी नाव ठेवण्यात आल होत. बाकी सगळे जरी उंच असले तरी ही अवनी मात्र पाच फुटाची देखील नव्हती. तरीही ह्या अवनीचा त्या सगळ्यांनाच भरपूर धाक होता. लहापणापासून त्यांची ही शिक्षिका जशी होती. हिने त्यांचे लाड केले, वेळेला कानही धरले. धपाटेदेखील मारले. हे सगळे सख्खे जरी नसले तरी मनाने घट्ट असे भाऊ बहिण झालेले होते.

त्यांच्या ग्रुपमध्ये रावी सगळ्यात लहान होती. त्यामुळे सगळीकडे तिचे जरा जास्तच लाड व्हायचे. शेंडेफळ म्हणून ती सगळ्यांच्या डोक्यावर चढून बसलेली होती. आजही तिला अशी रेस लावण्यासाठी सगळ्यांनीच नकार दिला होता. तरीही ती सगळ्यांचे डोळे चुकवत ह्या रेससाठी आली होती.

त्यांच्या कॉलेजच्या एका मुलाने आरुषला फोन लावून रावीच्या रेसबद्दल आणि ज्या मुलांनी रेस लावली त्यांच्या मनसुब्याबद्दल त्याला सांगितल होत. मग काय? जे नुकतेच बाईक राईडला चालले होते. ते थेट रेस लागलेल्या रस्त्यावर येऊन पोहोचले.

रावीच्या मागे तिला चिडवत नको ते इशारे करत चाललेल्या त्या मुलांना बघून ह्या सगळ्यांच्या भुवया आकसल्या गेल्या. त्यांना धडा शिकवल्यानंतर रावी कुठे जाणार होत ते सगळ्यांनाच माहिती होत. म्हणून अवनीला फोन ते सगळेच तिच्याकडे जायला निघाले. त्यांनी त्यांच्या बाकी रायडर मित्रांना आजची राईड रद्द केल्याचे सांगून त्यांना घरी जायला सांगितले.

आज विजयने सुट्टी टाकलेली होती. राहुलच्या वडिलांनी कारच्या क्षेत्रात त्यांचे जे पाय रोवले. ते फक्त विजयच्या भरोश्यावर ते पाउल टाकल होत. जसा राहुलच्या वडिलांनी ह्या कारच्या क्षेत्रात पाउल ठेवल तस विजयने त्याची आधीची नोकरी सोडून दिली आणि तो थेट राहुलच्या वडिलांच्या ह्या नव्या कंपनीची मदार सांभाळायला जाऊन पोहोचला. त्यांचा तो कारचा व्यवसाय विजयनेच पूर्ण सांभाळला होता. एवढच काय? विजय आधी ज्या सर्व्हिस सेंटरला काम करत होता, तिथला बराचसा स्टाफ देखील विजयाला त्यांच्या नवीन कंपनीला जॉईन झाला होता. त्यात टीना आणि मिहीर तर विजयसोबतच बाहेर पडले होते. तर बाकी स्टाफला विजयने लगेच एकदमच सोडून न येण्याबाबत सांगितले होते. कारण त्या सगळ्यांनी एकदमच तिथली नोकरी सोडली असती तर सायलीच्या वडिलांच्या कामाच्या आलेखावर त्याचा परिणाम होणार होता.

दुपारची वेळ होती विजय आणि सायली मस्तपैकी टीव्हीला लागलेली एक मुव्ही बघत बसले होते. आज घरी तर कोणीच नव्हत. त्यांचा मुलगा तर त्याच्या बाकी सोबत्यांसोबत रायडींगला गेला होता. परी तिच्या आधीच्या आश्रमात शिकवण्यासाठी गेली होती. विजय आणि सायलीची प्रथा तिने चांगलीच चालू ठेवली होती.

टीव्ही बघता बघता विजयने सायलीला त्याच्या जवळ ओढून घेतले आणि तिला स्वतःच्या मांडीवर बसवत तिच्या पोटाला विळखा मारून बसला. सायलीला विजयच्या ह्या अश्या प्रेमळ क्षणांची खूपच सवय झाली होती. सुट्टीचा दिवस हा त्यांच्या एकमेकांसाठीच असायचा. त्याचं प्रेम अजूनही इतक ताज होत की जणू काही ते नव्याने प्रेमात पडले होते. नंतर त्याने सायलीच्या खांद्यावर कीस घ्यायला सुरवात केली. तस सायलीने देखील तिच्या पोटावर असलेल्या त्याच्या हातांवर तिचे हात गुंतवून त्याच्यात हरवत चालली होती. दोघांचे श्वास उष्ण होऊन ते गरम होऊ लागले. तिच्या खांद्याच्या एका बाजूने कीस करून मन भरल्यावर त्याने तिची दुसऱ्या बाजूला असलेली केस बाजूला सरत तिथे त्याच्या ओठांची मोहोर उमटवायला सुरवात केली होती.
नंतर तर त्याचे हात तिच्या हातातून सुटून तिच्या शरीराच्या नाजूक भागांवर फिरू लागले. सायली पण त्याला तशीच प्रतिसाद देत होती.

“काय विचार काय आहे?” सायली त्याच्या डोळ्यात डोळे घालून मादक आवाजात बोलली.

“अजून काय असणार?” विजय रोमांटिक आवाजात बोलला. “तुझ्यात हरवण्याशिवाय मला दुसर काय सुचणार?” त्याचे हात तिच्या पोटावरून वर सरकत तिच्या छातीवर पोहोचले आणि त्याने तिला अजूनच घट्ट पकडून स्वतःजवळ ओढले.

तशी सायली अजूनच चेतवली गेली आणि तिने तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ न्यायला सुरवात केली. तसा विजयनेही पुढाकार घेतला आणि त्यांच्या दाराची बेल वाजली. तसे एकमेकांमध्ये हरवलेले लागलीच भानावर आले.

क्रमशः

कशी वाटली नव्या पर्वाची सूरवात? कमेंट करून नक्की सांगा.

0

🎭 Series Post

View all