मागील भागात.
“काय विचार काय आहे?” सायली त्याच्या डोळ्यात डोळे घालून मादक आवाजात बोलली.
“अजून काय असणार?” विजय रोमांटिक आवाजात बोलला. “तुझ्यात हरवण्याशिवाय मला दुसर काय सुचणार?” त्याचे हात तिच्या पोटावरून वर सरकत तिच्या छातीवर पोहोचले आणि त्याने तिला अजूनच घट्ट पकडून स्वतःजवळ ओढले.
तशी सायली अजूनच चेतवली गेली आणि तिने तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ न्यायला सुरवात केली. तसा विजयनेही पुढाकार घेतला आणि त्यांच्या दाराची बेल वाजली. तसे एकमेकांमध्ये हरवलेले लागलीच भानावर आले.
आता पूढे.
सायलीचा तर मूडच खराब झाला. जो कोणी दार वाजवत असेल त्याला तिने मनातच खूप भांडून घेतलं. एकतर बऱ्याच दिवसांनी असा दोघांनाच निवांत वेळ मिळाला होता. ती आहे तशीच वैतागलेल्या चेहऱ्याने उठली आणि दार उघडायला गेली. विजयने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ती दाराजवळ पोहोचून तिने दार देखील उघडल होत.
तिने दारात रावीला पाहिलं आणि लगेच तिला चिडून बघू लागली. रावी तिच्या आत्त्याला बघून धाक्यातच गेली. ती डोळे विस्फारून तिच्या आत्याला बघत राहिली. तर ती फक्त बघत उभी आहे म्हणून सायली अजूनच चिडली.
“आज पण घरातून हाकलल का तुला?” सायली
“ते सोड, तू हे काय घातलं आहे आतु?” रावी आश्चर्याने बोलली. “जाम क्युट दिसत आहेस.” तिने लागलीच सायलीला घरात ओढून घेतलं.
“ते सोड, तू हे काय घातलं आहे आतु?” रावी आश्चर्याने बोलली. “जाम क्युट दिसत आहेस.” तिने लागलीच सायलीला घरात ओढून घेतलं.
तोपर्यंत सायलीची नजर तिने घातलेल्या कपड्यांवर गेली. तसा तिने डोक्यालाच हात लावला आणि पटकन त्यांच्या खोलीत पळून गेली. आज सकाळी तिला तिचे कपडे मिळत नव्हते. म्हणून तिने विजयचा शर्ट घातलेला होता. तर खाली थ्रीफोर्थ ची पँन्ट. त्यात आता भावनेत वाहवत गेलेल्या विजयने तिला घट्ट मिठीत ओढून घेतल्यानंतर त्या शर्टाचे वरचे एक बटण देखील उघडले होते. तो दुसरे उघडायला जाणार तोच ती बेल वाजली होती.
तिला अस पळत जाताना बघून रावी मात्र खूपच हसली. आजवर तिने सायलीला फक्त कुडता आणि पायजमा मध्ये बघितलं होत. जोपर्यंत नवीन नवीन लग्न होत तोपर्यंत ती टॉप आणि जीन्सची पँन्ट घालत होती. पण नंतर जस जशी संसाराची जबाबदारी आली तस तिने कुडता पायजमा आणि कार्यक्रम असेल तर साडीच घालत होती.
“मामा,” रावीने विजयला प्रेमाने आवाज दिला. “तू आतुला असे पण कपडे का घालायला सांगत नाहीस? किती गोंडस दिसत होती ती.”
“आता ती बाहेर आली ना की तुला तिचे कान्डस पण दिसेल.” विजय सुस्कारा सोडत बोलला.
तर रावी विजयच्या बोलण्याचा अर्थ लावत राहिली. तोपर्यंत सायली तिचे कपडे बदलून आली.
“तू काय करत आहेस इथे?” सायली वैतागून बोलली.
“तुमचा मोमेंट ब्रेक केला का मी?” रावी खुदकन हस्त बोलली. तिलाही त्या शर्टच वरच बटण उघड असलेल दिसलं होत. जरी ते खूपच वर होत. तरी रावी म्हणजे सोनालीचीच कॉपी होती ना. ती चिडवायची एकही संधी सोडत नव्हती.
“जास्त आगाऊपणा करू नकोस.” सायलीने तिच्या पाठीवर एक चापट मारली. “आता काय कांड करून आली आहेस ते सांग?”
“काय आत्तु?” रावीने तिचं तोंड बारीक केल. “मी तुला सहज भेटायला नाही येऊ शकत?”
“आज्जीबातच नाही,” सायल ठसक्यात बोलली. “कारण अश्या दुपारच्या वेळी तू फक्त घरात पसरलेली असतेस ते ही अजगरासारखी.”
तस रावीने तिचं तोंड वाकड केल.
“वडिलांची फक्त उंची घेतली आहे,” सायली “नाहीतर सगळचं आईच.”
“ए आईला काय बोलायचं नाही हं.” रावी
“ए आईला काय बोलायचं नाही हं.” रावी
“तुझ्या आईला आम्हाला ग्लास ग्लास भर पाणी टाकून उठवायला लागायचं,” आता विजय पण हसत बोलला. “तेव्हा ती उठायची.”
तशी रावीपण हसायला लागली. कारण तिला तर सगळ माहिती होतच.
“आत्तु भूक लागली आहे.” रावी “बनव ना काहीतरी.”
“आज मला सुट्टी असते,” सायली तोऱ्यात बोलली. “हव तर ऑर्डर कर.”
“आज मला सुट्टी असते,” सायली तोऱ्यात बोलली. “हव तर ऑर्डर कर.”
तशी ती लगेच ऑनलाईन ऑर्डर करायला बसली. नंतर सायलीने तोंड पडून विजयकडे पाहिलं. तस त्याने खट्याळ होत बेडरूमकडे इशारा केला. तसे सायलीने त्याच्यावर डोळेच वटारले.
“तुम्ही जाऊ शकता,” रावी मोबाईलमध्ये बघत बोलली. “मझी काहीच हरकत नाही. फक्त तेवढं बिल भरून द्या.” तिने वर बघत तिचे दात दाखवले.
तशी तिच्या पाठीवर खरोखरची चापट पडली.
“हे बरं आहे,” रावी अजूनच सायलीला चिडवत बोलली. “एकतर एका निरागस बालकासमोर एकमेकांना इशारे करता आणि बालकाने काही सांगितल की त्याच्यावरच राग काढता."
तस सायलीने विजयकडे आठ्या पाडून पाहिलं. त्याने फक्त त्याचे खांदे उडविले. नंतर ती रावीकडे वळून तिला रोखून बघू लागली.
“जाम डांबिस झाली आहेस तू.” सायली बाजूचा झाडू शोधत बोलली.
“आत्तु तू झाडू शोध मी तुझा हा फोटो पाठवते तुमच्या त्या ग्रुपला.” रावीने तिचा मोबाईल सायलीला दाखवला.
“आत्तु तू झाडू शोध मी तुझा हा फोटो पाठवते तुमच्या त्या ग्रुपला.” रावीने तिचा मोबाईल सायलीला दाखवला.
दार उघडल्या उघडल्या सायलीचा तो अवतार बघून रावीने कधी तिचा फोटो काढला होता ते सायलीला समजल देखील नव्हत. सायलीच तर तोंडच उघड पडलं. आता मात्र रावी सेम तू सेम सोनालीच दिसत होती.
“तुम्हीच तिला डोक्यावर बसवून ठेवली आहे.” सायली विजयकडे बघून चिडून बोलली.
“मी कुठे काय केल?” विजय
“मी कुठे काय केल?” विजय
“हा तुम्ही तर काहीच करत नाही ना.” सायली
“प्लीज यार, आता तुम्ही तरी नका एकमेकांशी भांडू.” रावी
ती पुढे काही बोलणार तोच विजयचा फोन वाजला. त्याने त्याचा मोबाईल पहिला तर परी त्याला फोन करत होती. रावीने देखील पटकन उठून मोबाईलवरच नाव वाचल आणि पटकन उठून आतल्या खोलीकडे पळून गेली.
तिला अस धावत जाताना बघून सायलीच्या मनात शंका उभी राहिली आणि तिने विजयला त्याचा फोन स्पीकरवर टाकायला लावला. तेव्हा तो विजयने उचलला.
“हेलो बाबा,” परी काळजीने बोलली. “ती कार्टी तुमच्याकडेच आली आहे ना?” आता मात्र ती चिडून बोलली.
“हो,” विजय बोलण्याआधी सायलीच बोलली. “तिने काय केल फक्त ते सांग. आज तावडीत सापडली आहे माझ्या.”
मग तिने रावीच आजच कांड त्या दोघांना सांगून दाखवल. आरुषचा फोन येऊन गेल्यानंतर परीच शिकवण्यात लक्षच लागत नव्हत. ती रावीची वाट बघत होती. पण ती काही तिथे आली नव्हती. बराच वेळ झाला तरी ती आली नाही ते बघून तिला समजून गेल की ती विजयकडेच जाणार. तसा तिने लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि तिची शंका खरी ठरली.
आता सायलीने खरोखरच काठी उचलली आणि आतल्या खोलीकडे जायला लागली. तोच विजयने तिचा हात पकडून घेतला.
“आज तुम्ही आज्जीबतच मध्ये पडायचं नाही,” सायली खूपच चिडून बोलली. “तिला समजावून सुद्धा तिला हवं तेच ती करत रहाते. एक तुमचा तिला धाक आहे तर तुम्ही तिला काहीच बोलत नाही.”
“मी बोलतो तिच्याशी.” विजय गंभीर होऊन बोलला. कारण आजचा विषयही तितकाच गंभीर होता.
त्याचा गंभीर झालेला चेहरा बघून सायली शांत झाली. तिला थांबवून विजय आतल्या खोलीकडे गेला. नेहमीप्रमाणे तिने त्या खोलीचा दरवाजा लॉक करून घेतला होता. विजयने दार वजवून रावीला आवाज दिला. लाडक्या मामांचा आवाज ऐकून तिने हळूच दार उघडलं आणि आधी तिची आत्तु आहे का ते पाहिलं. नंतरच पूर्ण दार उघडून विजयला आत घेतलं.
विजयला आलेलं बघून रावीने दीर्घ श्वास सोडत त्याला हसून दाखवल. पण तिचं आजच ते हास्य विजयचा गंभीर चेहरा बदलवू शकल नाही. आता तिच्या ह्या मामांचा राग किती भयानक आहे ते तिला चांगलच माहिती होत.
‘अय्यो, आज माझा माणूस चुकला का काय?’ रावी मनातच गोंधळून गेली. ‘एकवेळ आत्तुचा झाडू परवडला पण मामांचे ते शब्द नकोत. थेट इथे टोचतात इथे.’ तिने मनातच तिच्या हृदयावर बोट ठेवलं.
“आज तू केल आहेस ते माहिती आहे का?” विजय गंभीर आवाजात बोलला.
“सॉरी ना मामा.” रावी बारीक आवाजात बोलली. “ते मलाच समजल नाही मी कशी त्यांच्या जाळ्यात फसली.”
“तुला सावध पण केल गेल होत.” विजय कडक आवाजात बोलला.
“ह. हो.” रावीचे डोळे भरून आले.
“ह. हो.” रावीचे डोळे भरून आले.
“मग का ऐकल नाहीस?” विजय
आता तिने तिचे डोळे पुसले.
“तुला काही झाल असत तर आम्ही त्या जंगलात तुला कुठे शोधल असत?” विजय “तुला या जगात आणण्यासाठी तुझ्या आई बाबांनी किती प्रयत्न केले हे तुलाही माहिती आहे ना?”
तशी तिने होकारात मान हलवली.
“किमान त्याची तर जाण ठेव.” विजय “तू सर्वात लहान आहेस. म्हणून सर्व जण तुझी काळजी करतात. तुला जपण्याचा प्रयत्न करतात आणि तूच तुझ्या हाताने तुझी वाट लावायची संधी देतेस. आता हेच जर तुझ्या आईला समजल तर?”
तसे रावीने डोळेच मोठे झाले. “न.. नाही तिला नका काही सांगू. आत्तु तरी फक्त झाडू दाखवते. ती तर जे हातात येईल ते फेकून मारते आणि बाबा पण मध्ये पडत नाही अश्या वेळेस.”
तसा विजयने तिच्या पुढे त्याचा हात केला. ते बघून रावी गोंधळात पडली.
“बाईकची चावी.” विजय
“सॉरी ना.” रावी तिचे दोन्ही पाय हलके हलके आपटत बोलली.
“ठीक आहे मग तू घरी पोहोचण्याच्या आधी ही बातमी तुझ्या घरी पोहोचेल.” विजय त्या खोलीच्या बाहेर पडत बोलला.
त्याचा गंभीर चेहरा जे बोलला ते खरं करतो ते रावीला चांगलच माहीती होत. विजय बाहेर गेल्यावर तिने स्वतःचीच केस ओढली. “जा अजून रेस लावायला. दादा एवढ सांगत होता. पण माझ्याच अंगात मस्ती ना. भोग आता कर्माची फळ.”
मग तिला आठवलं की विजय तर खोलीच्या बाहेर गेला आहे आणि तो जास्त वेळ वाट देखील बघणार नाही. तशी ती पटकन खोलीच्या बाहेर आली तर विजयने त्याचा मोबाईल हातात घेतला होता. तशी ती अजूनच घाबरली.
“मामा,” रावी जरा मोठ्याने बोलली. “थांबा ना ही काय आलीच मी. लगेच काय मम्माला फोन लावता?”
रावीच्या तोंडून मम्मा नाव ऐकल आणी सायलीने पटकन त्याच्या हातून त्याचा मोबाईल काढून घेतला. “काही गरज नाही लगेच फोन करायची. ती बोलली ना की आली म्हणून.” सोनाली रावीला कशी मारते ते तिने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होत. लगेच स्वतःच्या भाचीची काळजी तिच्या मनात दाटून आली होती.
इकडे विजयने मनातच सुस्कारा सोडला. तोपर्यंत रावीने तिच्या बाईकची चावी त्याच्यासमोर ठेवली. ती विजयने लागलीच त्याच्या हातात घेतली आणि नंतर बोलला.
“मी तर माझ्या कामाचे मेल चेक करायला तो हातात घेतला होता.” विजय “आता ही चावी तुला परवा मिळेल. तोपर्यंत तू रिक्षेने जायचं. नाहीतर जो कोणी मोकळा असेल तो तुला सोडून येईल.”
तशी रावी तिचं तोंड वाकड करत तिथल्या सोफ्यावर बसली. तर सायली किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवायला लागली. विजयने टीव्हीकडे त्याच लक्ष वळवलं.
काही वेळातच परी घरी येऊन पोहोचणार होती. विजयने खोलीतून बाहेर आल्यावर जेव्हा त्याचा मोबाईल पहिला तेव्हा त्याने परीचा आलेला मेसेज वाचला. त्यात तिने रावीला काही सांगू नका म्हणून पण लिहिलेलं होत.
मग काय? परीच्या त्या लाडक्या बाबाने आपल्या मुलीचे शब्द काटेकोरपणे पाळले आणि काहीच न बोलता टीव्ही बघत बसून राहीला.
नेहमी घरी आल्यावर माझ्याशी गप्पा मारणारे मामा आज का शांत बसले आहेत? ह्या विचाराने रावीच डोक धावू लागल. ‘ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना?’ हे तिच्या डोक्यात वादळासारखे घोंगावू लागले. ‘वादळापूर्वीची शांताता म्हणजे दीदी तर येत नाहीये ना?’ हा विचार करूनच रावी जरा घाबरली. कारण ती चिडली की विजय पण तिच्यापुढे बोलत नव्हता. ‘भाग ले बेटा यहा से, अभी तबियत कुछ रास नाही आ राही अब.’
“मी काय म्हणते मामा,” रावी सोफ्यावरून उठत बोलली. “आई घरी वाट बघत असेल ना, तर मी घर जाते.” विजयने रावीकडे पाहिलं तर तिने त्याला उगाच दात दाखवले.
“तुझ्या घरी कोणी नाहीये आता.” विजय त्याच लक्ष परत टीव्हीमध्ये घालत बोलला.
“मग मी मावशीकडे जाते.” रावी तिची बॅग उचलत बोलली.
“ती पण घरी नाहीये.” विजय दीर्घ श्वास घेत बोलला. “ती राहुलसोबत कोल्हापूरला गेली आहे. त्यांच्या नवीन ब्रांचच्या कामासाठी.”
इकडे रावीने वर पाहिलं. ‘देवा तुला आजच सगळी फिल्डिंग लावायची होती का रे?’ तिचं हे मनात बोलून झाल ही नव्हत तेवढ्यात तिचा कान पिळला गेला.
“आऽऽऽउच” रावी जरा जोरातच कळवली. “दि नको ना.”
तिचे ओढलेले कान बघूनच मागे न वळून बघताही परी आलेली तिला समजून गेल.
“मी तुझ्यासाठी बाकी जणांसोबत भांडते आणि तूच मला तोंडावर पाडतेस.” परीने रागात बोलून तिचे कान अजूनच ओढले.
तस रावीच्या डोळ्यात टचकन पाणी उतरलं.
रावीचा तो आवाज ऐकून आता सायली पण किचनच्या बाहेर आली होती. रावीच्या डोळ्यात पाणी पाहून ती परीला ओरडायला लागली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा