Login

अवनी एक प्रवास भाग ३

“पण तुला सांगितल होत ना?” परीने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. “तरी तू तुझ्या इगोला मोठ ठेवलस. तुला काही झाल असत म्हणजे? तुझे बाबा तुझी जबाबदारी आमच्यावर त्कौन त्यांची ड्युटी करतात. त्यांना किती टेन्शन येईल? तुला तुझी आई मारू नये म्हणून आई तरी तुझ्या किती गोष्टी लपवते.” “बोलली ना आता सॉरी.” रावी
मागील भागात.

रावीने वर पाहिलं. ‘देवा तुला आजच सगळी फिल्डिंग लावायची होती का रे?’ तिचं हे मनात बोलून झाल ही नव्हत तेवढ्यात तिचा कान पिळला गेला.

“आऽऽऽउच” रावी जरा जोरात कळवली. “दि नको ना.”

तिचे ओढलेले कान बघूनच मागे न वळून बघताही परी आलेली तिला समजून गेल.

“मी तुझ्यासाठी बाकी जणांसोबत भांडते आणि तूच मला तोंडावर पाडतेस.” परीने रागात बोलून तिचे कान अजूनच ओढले.
तस रावीच्या डोळ्यात लगेच पाणी उतरलं.

रावीचा तो आवाज ऐकून आता सायली पण किचनच्या बाहेर आली होती. रावीच्या डोळ्यात पाणी पाहून ती परीला ओरडली.

आता पूढे.

“अगं सोड तिला.” सायली बोलतच रावीजवळ आली.

सायली जवळ येताच परीने रावीचा कान सोडला. जशी रावी तिच्या हातून सुटली तशी ती पटकन तिच्या आत्याच्या पाठी जाऊन लपली.

“हे बघ आई,” परी सायलीकडे बघत बोलली. “मामीने तिला तुडवायची देखील परमिशन दिली आहे. मी तरी फक्त कानच ओढले आहेत.”

“सगळे मलाच जीव लावतात ना म्हणून तुम्ही सगळी भावंड माझ्यावर जळतात.” आत्याच्या पाठी लपून रावीमध्ये पुन्हा जोश संचारला.

“मी जाऊ किचनमध्ये परत?” सायली रावीला रोखून बघत बोलली. तशी रावीने तिची जीभ चावली.

“पाहिलं किती किडे आहेत हिच्या अंगात,” परी परत चिडून बोलली. “आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून तू लगेच तिची बाजू घेत आलीस.”
तस सायलीने रावीवर तिचे डोळे वटारले.

“सॉरी ना बाबा,” रावीने अगदीच निरागस होऊन तिचे कान पकडले आणि उठा बश्या काढू लागली. “हवं तर मीच उठा बश्या काढते बघा.”
परीने हातची घडी घालून तिच्याकडे रोखून पाहिलं. नंतर तिला तिच्या हातांनी धरून थांबवलं. तशी रावी खुश झाली.

“लव्ह यु दीदी.” रावी आनंदाने परीला मिठी मारायला गेली.

पण परीने तिला तसच थांबवलं आणि तिचा उजवा हात तिच्या पुढे केला. ते बघून रावीने लहान मुलीसारखे तिचे ओठ बाहेर काढले.

“घेतली ना मामांनी.” रावी बारीक आवाजत बोलली. “आता तुला काय देऊ? एकच तर आहे एवढूशी.”

“एवढूशी म्हणजे?” सायली चिडून बोलली. “अजून किती मोठी पाहिजे?”

“रावी एकतर चावी दे नाहीतर माझ्याशी बोलू नकोस.” परी चिडून बोलली.

“बोलली ना मामांनी आधीच घेतली आहे.” रावी पण चिडून बोलली.

“मग तुझ्या खिशात ती चावी कशी गेली?” परी तिला रोखून बघत बोलली.

ते ऐक्न विजय आणि सायली गाडीची चावी बघू लागले. कारण विजयने त्याच्या हातात घेतलेली ती चावी त्याच्या समोरच्या टेबलावर ठेवली होती. जी रावीला गपचूप उचलताना परीने पहिली होती. मग काय? रावीने नाखुशीनेच ती चावी परीकडे दिली.

“दोन आठवडे तुला चावी मिळणार नाही.” परी एवढं बोलून तिच्या खोलीकडे निघून गेली.

रावी तोंड पाडून विजयकडे बघत राहिली. तस विजयने तिला जवळ घेतले. “चल आपण मस्त मुव्ही बघू.”

इकडे सायलीने ते पाहिलं आणि नराकार्थी मान हलवत किचनमध्ये निघून गेली. परीने तिच्या खोलीत गेल्यावर आरुषला फोन करून ती इकडे आल्याच त्याला संगून दिल. तोपर्यंत ते सगळेच त्यांच्या अकॅडेमीमध्ये जाऊन पोहोचले होते.

त्या सगळ्यांनी नेहमीचा नोकरीचा मार्ग सोडून हा वेगळा मार्ग निवडला होता. ज्यात चांगली कौशल्य असणाऱ्या बऱ्याच खेळाडूंचे स्वप्न पूर्ण केले जात होते. मग त्यात ऑलम्पिकमध्ये असणाऱ्या बऱ्याच खेळांचा समावेश होता. ज्या खेळात ते निपुण होते त्याचा सराव ते स्वतः घेत होते. तर बाकीच्या खेळासाठी बाहेरच्या व्यक्तींना बोलावले जात होते.

आज त्यांना बाईकच्या राईडवर जायचं होत. पण रावीच्या काळजीने त्यांनी ती रद्द केली आणि सरळ त्यांच्या अकॅडेमीवर निघून आले. सुट्टीवर गेलेल्या आपल्या सर आणि मॅडम यांना परत आलेलं बघून त्यांचे ते विद्यार्थी गोंधळात पडले. कारण ते नसल्यावर तिथल्या शिस्तीत थोडी नरमाई व्हायची. म्हणून ते आनंदात असणारे काही विद्यार्थी पुन्हा टेन्शनमध्ये आले. तर जे मनपासून शिकत होते. त्यांना मात्र भरपूर आनंद झाला होता.

इकडे रावी तिच्या मामांना म्हणजेच विजयला तिच्या बाईकची चावी परत मागण्यासाठी लाडीगोडी लावत होती. पण मुळात तिची चावी परीने घेतली असल्याने विजयला पण काहीच करता येत नव्हत. तिची ती बाईक म्हणजे जीव का प्राण होता. त्याच्याशिवाय तिचं पान देखील हलत नव्हत. कुठलाच उपाय लागू पडत नसल्याचे बघून ती सुस्कारा सोडत तशीच बसली. शेवटी वैतागून ती घरी जायला निघाली.

“अगं खाऊन तर जा.” विजयने उठलेल्या रावीला बघून सांगितल.

“नको पोट भरलं माझ.” रावी तोंड वाकड करत बोलली आणि सरळ घराबाहेर पडली.

घराच दार वाजलेल सायलीने ऐकल आणि ती पण किचनच्या बाहेर आली. “आता ही कुठे गेली?”

“आता काय?” विजय हसत बोलला. “तिच्या बाबांकडे जाऊन बसेल गाल फुगवून.”

तशी सायली पण हलकेच हसली.

इकडे परी तिच्या खोलीत बसलेली होती. रावीसोबत कडक वागताना तिलाही खूप वाईट वाटत होत. पण आज रावी वागलीच तशी होती. तिचा जीव धोक्यात आला होता. तिच्यासोबत काहीही होऊ शकल असत.

रावीने घराचा दरवाजा इतक्या जोरात आपटला होता की त्याचा आवाज परीपर्यंत आला होता. तसा तिने तिचा मोबाईल हातात घेतला आणि मेसेज टाईप करू लागली.

“याचा अर्थ असा समजू की मी तुझ्यावर विनाकारण ओरडते आणि तुझी आम्हाला काहीच काळजी नाही. अस असेल तर बोलण्यात काही अर्थच नाही ना.”

मेसेज पाठवून परी हॉलमध्ये येऊन बसली. सायलीने बनवलेला नाश्ता तिला दिला.

“थोड्यावेळाने तला बोलली असती तर ती खाऊन तरी गेली असती.” सायली परीकडे बघून बोलली.

“ती नाही जात कुठे आता येईल परत.” परी आरामात खात खात बोलली.

तसा दोघांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि थोड्याचवेळात रावी परत तिथे जाऊन पोहोचली. ती बिल्डींगच्या बाहेर पडली पण नव्हती तोच तिच्या मोबाईलवर परीचा मेसेज जाऊन धडकला. तो तिने वाचला आणि मनातच परीला भांडत ती तिथे परतली. तिने नाश्ता करत बसलेल्या परीला पाहिलं आणि सरळ तिच्या बाजूला जाऊन बसली.
परी खात होती आणि मंद स्मित करत होती. तर रावी तिला रोखून बघत होती. रावीने परीच्या हातातली नाश्त्याची प्लेट काढून घेतली.

“तुला हवं असेल तर जा किचनमध्ये आणि घे.” परी तिच्या हातातली प्लेट घेत बोलली. “तुला कोणी अडवलं आहे?”

“खूप वाईट आहेस तू.” रावी लहान मुलीसारखी तक्रार करत बोलली आणि तिच्या कुशीत शिरून बसली.

‘झाली हिची नाटक सुरु.’ विजयने मनातच सुस्कारा सोडला.

“सॉरी ना दीदी.” रावी आता खरच भावनिक झाली. “मला खरचं समजल नव्हत की माझ्या वर्गातली ती मुल बाकी मुलांना कधी सामील झाली ते.”

“पण तुला सांगितल होत ना?” परीने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. “तरी तू तुझ्या इगोला मोठ ठेवलस. तुला काही झाल असत म्हणजे? तुझे बाबा तुझी जबाबदारी आमच्यावर टाकून त्यांची ड्युटी करतात. त्यांना किती टेन्शन येईल? तुला तुझी आई मारू नये म्हणून आई तरी तुझ्या किती गोष्टी लपवते.”

“बोलली ना आता सॉरी.” रावी

“तस नाही वचन दे,” परीने तिचा हात पुढे केला. “तू कधीच जोरात बाईक चालवणार नाहीस आणि कधी रेस पण लावणार नाहीस.”

“मग बाकी दादा लोक जोरात चालवतात ते.” रावी

“ते अस उपटसुंभासारख कुठेही जात नाही.” परी कपाळवर आठ्या पाडून बोलली. “गरज लागली तरच. नाहीतर त्यांचा वेग मर्यादेत असतो.”

“ठीक आहे दिल वचन.” रावी उत्साहात येत तिच्या हातावर तिचे हात ठेवत बोलली. तिला वाटलं की आता तिला तिच्या बाईकची चावी मिळेल म्हणून ती तिचे दात दाखवत परीकडे बघू लागली.

तशी परी तिला गोंधळून बघू लागली. मग तिला जाणवलं की ती चावी मिळेल या उद्देशाने तिच्याकडे बघत आहे.

“अज्जिबात मिळणार नाही चावी.” परी रावीकडे आठ्या पाडून बोलली. “किमान दोन दिवस तरी नाही.”

“नको ना तायडू.” रावी खूपच लाडात येत बोलली.

तस परीने विजयकडे नजर टाकली. ते बघून विजयने हलकस स्मित केल आणि परीने दीर्घ श्वास घेतला. तर इकडे रावी मनातच उड्या मारायला लागली.

“उद्या सकाळी यायचं आणि चावी घेऊन जायची.” परीला रावीच्या मनात ती उड्या मारत असलेली समजून गेल होत. मग ती अशी सहज थोडीच तिला उड्या मारू देणार होती.

स्वप्नात उड्या मारणारी रावी खाडकन लादीवर आपटली.

“झाल ना आता,” सायली “आता पटकन खाऊन घ्या.”

“म्हणजे तुम्ही रोमान्स करायला मोकळे.” रावी तोच तोंड दाबत हसून बोलली.

“तुझ्यातर आता.” सायलीने रावीच्या पाठीवर जोरात धपाटा मारला.

“आऽऽऽई गंऽऽऽ.” रावीच्या डोळ्यात लागलीच अश्रू उभे राहिले. कारण आज तिला खरोखर जोरातच धपाटा बसला होता.

“सायु हळू ना.” विजय लगेच काळजीने पुढे आला. “इतक्या जोरात मारतात का?”

“तिच्या आईपेक्षा तरी कमीच मारलं आहे.” सायली चिडून बोलली. “हिला काय आज ओळखता का?”

“तरी,” विजयने तिला लागलीच त्याच्या कवेत घेतले. “बघ तर टचकन पाणी आल डोळ्यात.”

तिचा तो चेहरा बघून सायलीला ही कसतरीच झाल. ती काही बोलायला जाणार तोच रावी तिथून निघून गेली. जाताना तिने तिची बॅग देखील नेली नव्हती.

“रावी.” विजयने जाणाऱ्या रावीला थांबवून पाहिलं पण ती नाही थांबली. मग त्याने सायलीवर नजर टाकली.

“असे काय बघत आहात?” सायली विजयवरच चिडली. “तोंडाला येईल ते बडबड करते, मग तिला बोलायचं पण नाही का?”

“तू बोलली नाही गं.” विजय “तू अशी वाजवली की आज खरोखर तिला लागल.”

“असुदेत,” सायली तोऱ्यात बोलली. “माझीच भाची आहे. जाऊन जाऊन जाईल कुठे इथेचं येईल.” एवढ बोलून सायली त्यांच्या खोलीकडे जायला वळली आणि जाता जाता रावीच्या बाईकची चावी तिच्यासोबत घेऊन गेली. ‘आता कशी बोलायला येणार नाही तेच बघते.’ ती मनातच खुश होऊन बोलली.

आता हॉलमध्ये विजय आणि परी दोघेच एकमेकांकडे बघत राहिले. मग परीला पण खट्याळपणा सुचला. तिनेही तिचा मोबाईल उचलला आणि तिच्या खोलीच्या दिशेने जायला निघाली. खोलीच्या दारात पोहोचल्यावर तिने विजयकडे नजर टाकली जो परत टीव्ही बघायला बसला होता.

“बाबा.” परी गंभीर व्हायचं नाटक करत करत बोलली. तस विजयने तिच्याकडे पाहिलं. “जात नाही का खोलीत?”

पहिले तर विजयला तिचा खट्याळपणा समजलाच नाही. “आता कुठे झोपू? थोड्याचवेळात संध्याकाळ होईल.”

“मग आई तुमची वाट बघत असेल ना?” परी “तुम्ही तिचा रुसवा काढणार याची. मग जावा की तुमच्या नेहमीच्या पद्धतीने तिचा रुसवा काढा. नाहीतर आज संध्याकाळचा चहा बंद.”

“तुलाही रावीची हवा लागली आहे का?” विजय सुस्कारा सोडत बोलला आणि उठला.

“लगेच चालले तर सही,” परी हसून बोलली. “तरी भाव खायची काम करता.”

“तुलाही हवा आहे का धपाटा?” विजय त्यांच्या खोलीकडे जात बोलला.

“आधी तुम्ही खा मग मी..” एवढ बोळून्न ती पटकन तिच्या खोलीच दार लावून घेतलं.

ते बघून विजयने हसतच त्यांच्या खोलीच दार उघडलं. त्याने आता पाहिलं तर सायली त्यांच्या खोलीच्या खिडकीत उभी राहून विचारात हरवलेली होती.

“आता का विचार करत आहेस?” विजयने तिला पाठीमागून मिठीत घेत विचारलं. “जे झाल ते झाल.”

विजयने मिठीत घेतल्या घेतल्या सायलीने देखील तिची पाठ विजयच्या छातीवर टेकवली. “वाईट मलाही वाटत पण बोलण ही तितकच गरजेच होत ना.”

“हम्म जाऊ दे आता,” विजयने सायलीच्या मानेवर त्याचे ओठ टेकवले. “जे राहील होत ते पूर्ण करायच?” विजय मिश्कील होत बोलला.

“तुम्हाला वेळेच काही भान आहे का?” सायली चिडून बोलली. “आता चहा चहा बोंबलत त्याचा जप करायला सुरवात कराल. जावा गप्प पडून घ्या.”

“मी एकटा तर जाणार नाही.” विजयने सरळ तिला त्याच्या हातावर उचलून घेतलं.

“अहो काय करत आहात?” सायली तिचे पाय झाडू लागली. “आपली मुल आता लग्नाच्या वयाला आली आणि तुम्हाला काय सुचत आहे भलत्याच वेळी?”

“तू पाय झाडले की मी काय करतो माहिती आहे ना?” विजय तिला डोळा मारत बोलला.

तशी ती लगेच बावरून शांत झाली. तिने पाय झाडले की तो सरळ तिला बाथरूममध्ये घेऊन जात होता. त्यांच्या सजलेल्या पहिल्या रात्रीच्या दिवसापासून विजय तिच्यासोबत अस करत होता. मग ती निमुटपणे त्याच सगळच ऐकायची. आताही ती शांत झाली. विजयने तिला बेडवर झोपवल आणि तिच्या बाजूला तो ही पहुडला. तिच्या डोक्यावरून हात टाकत तिला आपल्या मिठीत घेत तो शांत झोपी गेला.

सायली पण त्याच्या त्या शांत चेहऱ्याकडे बघत राहिली. इतकी वर्ष तो न थकता काम करत होता. त्याने त्याच आधीच काम सोडून राहुलच्या नव्या कंपनीला जॉईन झाल्यावर त्याची धावपळ अजूनच वाढली होती. ती कार शोरूमची नवी कंपनी पूर्णतः विजयच बघत होता. त्याने त्याच्या स्किलवर तिलाही खूपच वर आणल होत.

आयुष्याचा चित्रपट आठवत कधी संध्याकाळचे सहा वाजले ते दोघांनाही समजल नव्हत. अचानक मोबाईल वाजल्याने सायली खडबडून उठली. तिने तिचा मोबाईल पहिला तर परी तिला फोन करत होती. घरातच राहून ती का फोन करत आहे? हा विचार करून तिला खूपच टेन्शन आल. तशी तिने पटकन केस बांधत तो फोन उचलला आणि बेडवरून उतरून ती दाराकडे आली.

“काय झाल गं?” सायलीने काळजीने विचारलं.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all