मागील भागात.
आयुष्याचा चित्रपट आठवत कधी संध्याकाळचे सहा वाजले ते दोघांनाही समजल नव्हत. अचानक मोबाईल वाजल्याने सायली खडबडून उठली. तिने तिचा मोबाईल पहिला तर परी तिला फोन करत होती. घरातच राहून ती का फोन करत आहे? हा विचार करून तिला खूपच टेन्शन आल. तशी तिने पटकन केस बांधत तो फोन उचलला आणि बेडवरून उतरून ती दाराकडे आली.
“काय झाल गं?” सायलीने काळजीने विचारलं.
आता पूढे.
“काही नाही,” परी हलकीच हसत बोलली. “सहा वाजले तर चहा घेणार की बाबांच्या..”
ती पुढे बोलणार तोच सायलीने तिला रोखून पहिले. एकतर ती टेन्शन मध्ये आली होती की काय झाल म्हणून? आणि तिचं भलतच चाललेलं बघून तिला जरा रागच आला.
“अगं बाबांच्या हाताचाच चहा लागतो ना तुला,” परीने लगेच तिचे शब्द फिरवले. “म्हणून म्हटलं माझ्या हाताचा चालेल की बाबांच्या.”
“जास्त आगाऊपणा करू नकोस.” सायली फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जात बोलली. “ठेव मलाह,ी आलीच मी.”
तशी परी खुदकन हसत किचनमध्ये गेली.
इकडे विजयला पण जाग आली. बाजूला सायली नाही बघून त्याने खोलीत इतरत्र बघायला घेतलं. मग त्याला बाथरूममध्ये पाण्याचा आवाज आला. तसा तो उठला आणि बाथरूमच्या दाराजवळ गेला.
“अगं बेडचा कोपरा लागला मला.” विजय जरा काळजीने बोलला.
त्याच्या दुसऱ्या क्षणाला बाथरूमच दार उघडल गेल. तस विजय लगेच बाथरूममध्ये घुसला. सायली तर त्याला बघतच राहिली.
“अहो वेड लागल आहे का?” सायली “काय करत आहात इथे?”
“काय करतोय म्हणजे फ्रेश होत आहे.” विजय चेहऱ्यावर पाणी मारत बोलला.
“पण आधी मी आली आहे ना इथे.” सायली वैतागून बोलली.
"अरे हो तू पण आहेस ना.” विजयने परत तिला स्वतःजवळ खेचून घेतलं आणि सरळ शॉवर चालू केला.
आता मात्र सायली खूपच वैतागली गेली. “काय झाल आहे आज तुम्हाला?”
“कुठे काय?” विजय तिला त्याच्या मिठीत आवळत बोलला. “आता बायकोवर प्रेम पण करू नको का?”
“कामात बिझी होता तेव्हा कुठे जात तुमच हे प्रेम?” सायली त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत कपाळावर आठ्या पाडून विचारू लागली.
“त्याचीच तर कसर भरून काढत आहे.” विजय तितकाच मिश्कील होत बोलला.
“त्याचीच तर कसर भरून काढत आहे.” विजय तितकाच मिश्कील होत बोलला.
तर सायली स्वतःच्या कमरेवर हात ठेवत त्याला बघू लागली. तिला अस शांत झालेलं बघून विजयने परत तिच्या शरीराचा ताबा घेतला. ह्या वेळेस सायलीनेही त्याला चांगलाच प्रतिसाद दिला. पुढचा अर्धा तास ते त्यांच्या प्रेमात न्हाऊन निघत होते. ते त्यांच्याच धुंदीत असताना त्या दोघांना परीचा आवाज आला.
“आई कुठे राहिलीस?” परी थेट त्यांच्या खोलीत येत बोलली. तिने खोलीत पाहिलं तर तिला विजय पण दिसला नाही. मग ती काही तिथे थांबली नाही. “चहा झाला आहे. लवकर ये थंड होईल.” एवढ बोलून ती खोलीच्या बाहेर पडली.
“बघितलत किती वेळ गेला?” सायली चिडचिड करत बोलली.
“अशी माझ्यासमोर चिडचिड करू नकोस,” विजय तिचे दोन्ही गाल त्याच्या हातात धरत बोलला. “त्यात तू खूपच क्युट दिसतेस. मग मला राहावल जात नाही.” विजय परत तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणार तोच सायलीने तिचा टॉवेल दोघांच्या ओठांच्या मध्ये आणला.
“खूप झाल आता निघा बाहेर.” सायली आता खरोखर चिडून बोलली.
“बरं.बाबा.” विजय तोंड पाडून बोलला आणि मागे वळला.
“एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला,” सायली त्याच पडलेलं तोंड बघून बोलली. “तरी अजून मन भरत नाही का तुमच?”
“नाही ना.” विजय परत तिला पकडायला जाणार तोच तिने त्याला हसतच बाथरूमच्या बाहेर काढले.
जसा तो बाथरूमच्या बाहेर गेला तसा सायलीने सुटकेचा श्वास सोडला. एकीकडे त्याच हे प्रेम बघून तिला खूप भारी पण वाटत होत. तर दुसरीकडे त्याच उतू चाललेलं प्रेम बघून तिला वैताग पण येत होता. नंतर ती गालातच हसत पटापट तिचं आवरू लागली.
विजय त्याच आवरून हॉलमध्ये आला. त्याला आलेलं बघून परी किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी घेऊन आली.
“तुम्ही कुठे होता?” परी भाबडेपणाने विचारू लागली. “आता खोलीमध्ये आली होती तर दिसले नव्हते.”
विजय त्याच आवरून हॉलमध्ये आला. त्याला आलेलं बघून परी किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी घेऊन आली.
“तुम्ही कुठे होता?” परी भाबडेपणाने विचारू लागली. “आता खोलीमध्ये आली होती तर दिसले नव्हते.”
“बाल्कनीत होतो.” विजय चहाचा घोट घेत बोलला.
आता सायली पण तिचं आवरून बाहेर आली. ती मात्र स्वतः किचनमध्ये गेली आणि स्वतःसाठी चहा घेऊन आली. मग तिघेही चहा घेत बसले.
तर दुसरीकडे रावी तिचे पाय आपटतच तिच्या घरी जाऊन पोहोचली. तिचा तो अवतार बघून सोनालीला काहीच वेगळ वाटल नाही. कारण तिचं ते नेहमीच होत. पण आज तिच्या हातांच्या बोटात गाडीची चावी फिरताना तिला काही दिसली नाही. मग मात्र तो काळजीने पटकन रावीजवळ गेली.
“काय गं?” सोनाली “काय झाल?”
आई इतक्या काळजीने विचारू लागल्यावर रावीला लगेच भरून आल. ती पुढे काही बोलणार तोच सोनालीने बोलायला सुरवात केली.
“गाडी कुठे ठेवून आली आज?” सोनाली डोळे बारीक करून विचारू लागली. “की आज पण पाडली आणि गॅरेजला ठेवून आलीस?”
“गाडी कुठे ठेवून आली आज?” सोनाली डोळे बारीक करून विचारू लागली. “की आज पण पाडली आणि गॅरेजला ठेवून आलीस?”
तिचं बोलांन ऐकून रावीच भरून आलेलं मन लागलीच रिकाम झाल आणि ती चिडून तिच्या आईला बघू लागली. “म्हणजे माझ्यापेक्षा तुला गाडीची काळजी जास्त आहे?” रावी चिडून बोलली.
“अगं येडपट कुठे धडपडून तर नाही आलीस ना?” सोनाली पण चिडून बोलली. “म्हणून विचारलं. तू स्वतःपेक्षा तुझ्या गाडीला जास्त जपतेस ना.”
तशी ती शांत बसली. “दि ने गाडीची चावी घेतली.” ती बारीक तोंड करून बोलली.
“तू पराक्रमही तसाच केला असशील.” सोनाली तिच्या बाजूने उठत बोलली.
ते एकून रावीने तिचं तोंड वाकड केल. कारण तिला पुढे बोलूनही काही फायदा नव्हता. इतका त्यांना परीवर विश्वास होता.
नंतर
सोनाली हॉलमधलं आवरायला लागली. तिला आवरताना बघून रावीला काहीतरी आठवलं आणि ती पण तिच्या आईला मदत करण्यासाठी तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. तिला अस आलेलं बघून सोनालीने तिच्याकडे बारीक डोळे करून पाहिलं. कारण तिचं काही काम असल्याशिवाय ती अशी मदतीला येण शक्यच नव्हतं.
सोनाली हॉलमधलं आवरायला लागली. तिला आवरताना बघून रावीला काहीतरी आठवलं आणि ती पण तिच्या आईला मदत करण्यासाठी तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. तिला अस आलेलं बघून सोनालीने तिच्याकडे बारीक डोळे करून पाहिलं. कारण तिचं काही काम असल्याशिवाय ती अशी मदतीला येण शक्यच नव्हतं.
“काय पाहिजे आहे?” सोनालीने थेट मुद्याला हात घातला.
“त्या दिवशी दि ला बघायला आलेल्या मुलाचा कॉन्टक्ट नंबर.” रावीने पण तिला थेट सांगितल.
“म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवायला तू मोकळी ना.” सोनाली चिडून बोलली.
“मग तो कसा बोलला दि ला माहित नाही का तुला?” रावीच्या चेहऱ्यावर राग चढला.
“परी बोलली ना त्याला कोणीही काहीही बोलायचं नाही.” सोनाली कडक आवाजात बोलली.
“तुला काय वाटत बाकीची बंधू मंडळी शांत बसतील?” रावी तिच्या भुवया उंचावून आसुरी स्मित देत बोलली.
“ते तिचं ऐकतात तरी.” सोनाली “पण तूझ तस नाही. तुझ्या मनाला हव तेच तू करून राहतेस. म्हणून तुला कोणी काही सांगत नाही.”
“जाउदे मी डॅडलाच विचारते.” रावी नकारार्थी मान हलवत तिच्या खोलीत निघून गेली.
तर तिला बघून सोनालीने पण सुस्कारा सोडला आणि तिच्या कामाला लागली. रुद्रच प्रमोशन होऊन त्याला ऑफिसवर्क जरी भेटलं होत. तरी त्याच्या कामाच्या वेळेत काहीच फरक पडला नव्हता. जसा फोन येईल तसा तो त्याच्या कामासाठी निघून जायचा. त्यामुळे रावीला तिच्या वडिलांचा जास्त सहवास मिळाला नव्हता. जो काही मिळाला तो तिच्या मामांचा म्हणजेच विजयचा मिळाला होता. तिला तिच्या वडिलांच्या कामाची जाणीव होती. त्यामुळे तिने कधीही रुद्र जवळ नको ते हट्ट कधीच केले नाहीत. जेवढा दोघांना वेळ मिळत होता तेवढा वेळ ते मनसोक्त जगून घेत होते.
इकडे सोनालीने रावीला त्या मुलाबद्दल काहीही सांगायला मनाई जरी केली होती. तरी त्या मुलाच नशीब इतक खराब होत की आज रावीने तिच्या आईजवळ त्याचा फक्त विषय काढला आणि तो रावीच्या त्या सगळ्या भावंडाच्या नजरेस पडला. जो मुख्य रस्त्यावरून मोबाईलवर बोलत बोलत त्याची बाईक चालवत होता.
आरुष, सुजय, आदेश, माला आणि जय हे चौघेही त्यांची ती ॲकेडेमी बंद करून घराकडे निघाले होते. तर रस्त्यात सुजयला तो मुलगा दिसला. जेव्हापासून तो मुलगा त्यांच्या घरी परीला बघून गेला तेव्हापासून त्याचा चेहरा सुजयच्या मनावर कोरला गेला होता. कारण त्याच्यामुळे त्याच्या दि च्या कोमल मनाला त्रास झाला होता.
(काही दिवसांपूर्वी.)
विजय त्याच्या घरी सगळ्यांसोबत रात्रीच जेवण करत होता. त्याच्या मनात बरीच चलबिचल चालू होती. त्याचा तो चेहरा सायलीला सगळ काही सांगून गेला होता.
जशी जेवण झाली तस विजयने परीला त्याच्याजवळ बसवून घेतलं. त्याचा तो चेहरा बघून काहीतरी गंभीर असल्याच बाकी सगळ्यांना जाणवलं. मग खोलीत जाणारा सुजय पण तिथेच थांबला.
“तुझ्यासाठी स्थळ आल आहे.” विजयने तिच्या हातावर त्याचे हात ठेवले. हे बोलतानाही त्याच्या हाताची थरथर होत होती.
तर तिकडे सुजयने पण परीच्या खांद्यावर त्याचे हात ठेवले. सायलीला पण जरा धक्काच बसला. कालपर्यंत तर लहान होती आणि आता लगेच लग्नासाठी स्थळ आलेल बघून परीच लहानपण आतापासून तिच्या डोळ्यासमोरून धावू लागल.
“आपल्या सोबत काम करणाऱ्या एका कंपनीच्या सीईओचा मुलगा आहे.” विजय हळुवारपणे बोलत होता.
“पण मला घालवायची काय घाई आहे?” परी बारीक तोंड करून बोलली.
“रीत आहे ना बाळा.” विजयने तिला त्याच्या कवेत घेतलं. “आणि फक्त बघून घे. तुला लगेच थोडीच लग्नासाठी उभ करणार आहे. आधी तुझी संमती मग नंतर सगळ.”
“मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही.” परी पण समंजसपणाने बोलली. “आजवर माझ्या बाबतीतले तुमचे निर्णय कधीच चुकले नाहीत.”
“कधीच काय चुकले नाही?” सायली लटक्या रागात बोलली. “मी त्या ट्रेकिंगला नको बोलत होती तरी तू हट्ट करून तुला पाठवायला लावल. तेव्हा किती टेन्शन आल होत तू भेटत नव्हती म्हणून.”
तस बाकी तिघांनी एकमेकांकडे पाहिलं.
“ममा आता विषय काय आहे आणि तुझ काय मधेच?” सुजय हलकेच हसत बोलला. “आणि डॅड आम्ही पण त्याची परीक्षा घेणार.” तो गाल फुगवून विजयकडे बघत बोलला.
“अशी तर ती तुमच्याकडेच राहील.” सायली खुदकन हसत बोलली.
“चालेल ना,” सुजय परीला एका बाजूने मिठी मारत बोलला. “मी तर आयुष्यभर सांभाळेल तिला.”
“आणि तुझ्या बायकोला नाही चाललं तर?” परी पण सुजयला चिडवण्याच्या सुरात बोलली.
“अशी बायको मला चालणार नाही.” सुजय पण त्याच तोऱ्यात बोलला.
तसे बाकी हलकेच हसले.
“तर ते दोन दिवसांनी तुला बघायला येतील.” विजय
“पण बाबा,” ‘परी आता जरा गंभीर झाली. “त्यांना जे काही आहे तर खर खर सांगायचं. नाहीतर उगाच नंतर..” परी पुढे काही बोलणार तोच सुजय रागातच तिथून उठला.
त्याचा त्याच्या बहिणीवर इतका जीव होता की ती त्यांच्या घरातली नाही हे सुद्धा त्याला ऐकायला आवडत नव्हत आणि नेमक तिने तेच बोलल होत. तो तसाच त्याचे पाय आपटत त्याच्या खोलीकडे निघून गेला.
“किती वेळा सांगितल आहे तुला,” सायली पण आता जरा चिडून बोलली. “आम्हाला अस बोललेलं नाही आवडत तरी तू तेच करतेस.”
“तस नाही आई,” परी लगेच तिच्या गुढघ्याजवळ जाऊन बसली. “पण जो कोणी मला बघायाल येणार आहे त्याला सगळी माहिती नको का असायला? लग्नानंतर त्याला बाहेरून समजलं आणि त्याने मला परत घरी पाठवून दिल मग?”
तस सायलीने तिच्या तोंडावर हात ठेवला.
“बोलताना काही भानच ठेवत नाही तुम्ही.” सायलीने विजयवर एक रागीट कटाक्ष टाकला.
“ठीक आहे सॉरी.” परीने तिचे कान पकडले.
“बोलताना काही भानच ठेवत नाही तुम्ही.” सायलीने विजयवर एक रागीट कटाक्ष टाकला.
“ठीक आहे सॉरी.” परीने तिचे कान पकडले.
“आणि जो आत जाऊन फुगून बसला आहे तो?” सायली
“त्याला मनवायला जास्त वेळ नाही लागणार मला.” परी हलकेच हसत त्याच्या खोलीकडे गेली.
इकडे सायली आणि विजय दोघेही येणाऱ्या पाहुण्याबद्द्ल बोलत राहिले. परी सुजयच्या खोलीत गेली. त्याने बेडवर पसरून घेतलं होत. सोबतच मोबाईल चाळण्याच काम चालू होत. परी त्याच्या बाजूला जाऊन बसली. तसा सुजयने त्याच तोंड फिरवून घेतलं आणि तिला पाठ करून बसला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा