Login

अवनी एक प्रवास भाग ५

ही सगळी मंडळी बिझनेसमध्ये असताना परीने मात्र शिक्षकाची भूमिका स्वीकारली होती आणि त्यातून विद्यार्थी घडवण्याच काम ती करत राहिली. यासोबत ती तिच्या आश्रमात शिकवायला जायला आणि तिथे मदत करायला कधीच विसरली नव्हती. जस विजयने तिचं आणि प्रणालीच आयुष्य सुधारलं. तस तिलाही करायचं होत आणि त्यात ती प्रगतीची एक एक पाउल टाकत होती.
मागील भागात.

“बोलताना काही भानच ठेवत नाही तुम्ही.” सायलीने विजयवर एक रागीट कटाक्ष टाकला.

“ठीक आहे सॉरी.” परीने तिचे कान पकडले.

“आणि जो आत जाऊन फुगून बसला आहे तो?” सायली

“त्याला मनवायला जास्त वेळ नाही लागणार मला.” परी हलकेच हसत त्याच्या खोलीकडे गेली.

इकडे सायली आणि विजय दोघेही येणाऱ्या पाहुण्याबद्द्ल बोलत राहिले. परी सुजयच्या खोलीत गेली. त्याने बेडवर पसरून घेतलं होत. सोबतच मोबाईल चाळण्याच काम चालू होत. परी त्याच्या बाजूला जाऊन बसली. तसा सुजयने त्याच तोंड फिरवून घेतलं आणि तिला पाठ करून बसला.

आता पूढे.

परी उठली आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहीली.

“इतका काय तो राग?” परी प्रेमाने बोलली. “आता जे आहे ते कोणाला बदलता येणार आहे का? आणि नंतर तर समजणारच ना. तेव्हा काय करशील मग?”

तरी सुजय एकही शब्द बोलला नाही.

“त्याच्या जागी तू स्वतःला उभ कर.” परी आता जरा गंभीर होऊन बोलली. “आणि नंतर तुला समजल की तुझी बायको ही अनाथ आहे. तर तुझा तिने विश्वासघात केल्यासारखं नाही वाटणार का?”

तस सुजयने तिच्याकडे आठ्या पाडून पाहिलं. “तू आणि बाबा दोघांची फिलॉसॉफी पटवून द्यायची पद्धत भारी आहे.” तो चिडून बोलला.

“आता फुगा फोडतोस की तुझी सृजनशीलता बाबांपर्यंत पोहोचवू?” परी आता तोऱ्यात बोलली.

तस सुजयने त्याचे डोळे बारीक केले. “मी आधीही बोललो आहे आणि आताही बोलत आहे. आधी तुम्ही मग बाकी. असही मी तिच्यासोबत ब्रेकअप केल आहे.”

“का?” परी गोंधळून विचारू लागली. “एवढ्या वर्षांनी एक मुलगी तुला आवडली होती आणि तिला तू घरात ओळख करून द्यायला ही आणणार होतास ना?”

“तिने तुझ्यावरून तिचं नाक मुरडलं होत,” सुजय “मग मी नातच मुरडलं.”

ते ऐकून परी त्याला गोंधळून बघू लागली.

“म्हणजे ब्रेकअप केल दी.” सुजय तिचा गोंधळलेला चेहरा बघून बोलला.

“नशीब लवकर सांगितलस,” परी आता आठ्या पाडून बोलली. “नाहीतर आजच मी आई बाबांसोबत तिच्याबद्दल बोलणार होते.”

“आधी तुझ मग माझ.” सुजय गाल फुगवून बोलला.

“तेच गाल फुगवून तू आता आतमध्ये आला होतास.” परी त्याचे केस विस्कटत बोलली.

तसा सुजय तिच्या कुशीत शिरला. “तुला सांगायचं असेल तर सांग, पण आमच्या समोर अस काही बोलायचं नाही.”

“बरं बाबा,” परीने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. “तुमच्यासमोर नाही बोलणार.”

तेव्हा कुठे सुजयचे फुगलेले गाल फूटले गेले. नंतर ते दोघेही आपल्या खोल्यांमध्ये झोपी गेले. दोन दिवसांनी परीला बघायला ते पाहुणे आले. परीने जाणूनबुजून बाकी कोणाला घरी येऊ दिले नव्हते. त्यांच्यापैकी तिथे फक्त सुजय होता आणि रावी तर सकाळीच तिथे येऊन पोहोचली होती. बोलण्यात पटाईत असणाऱ्या तिने परीला तयार करायच्या जबाबदारीच्या नावाखाली ती येऊन पोहोचली होती.

“रावी काही आगाऊपणा केलास ना तर बघ.” परी तिला तयार करणाऱ्या रावीला समोर आरश्यात बघून दम देत बोलली. कारण काही उलट सूलट झाल तर बाकी भाऊ तिच्या शब्दाबाहेर जात नव्हते. पण रावीला आवरण खूप कठीण जात होत.

“दी,” रावी पूर्ण नाटकी आवाजात बोलली. “मी कधी तुझ्या शब्दाबाहेर गेली आहे का?” रावी खूपच गंभीर होऊन बोलली. जणू काही सज्जनतेचा पुतळाच.

“हो का?” परी आठ्या पाडून बोलली. “सांगू का आता?”

“ते काय घेऊन बसली आहेस?” रावी तिच्या समोर येत बोलली. “एकदा आरश्यात स्वतःला तर बघ.” तस परीने आरश्यात स्वतःला पहिले. “किती गोड दिसत आहे माझी दी.” रावीने बोलता बोलता तिच्या गालवर एक मुका घेतला.

“झाल असेल तर बाहेर बोलावलं आहे.” सुजय खोलीत येत बोलला.
परीला अस तयार झालेलं बघून सुजयचे डोळे आताच भरून आले.

“ये अश्रू जपून ठेवणे का मेरे भाई,” रावी नाटकी आवाजात बोलली. “ये पाठवणी के वक्त काम आयेंगे.”

“ते बघ.” सुजय खिडकीकडे बघून ओरडला.

तश्या त्या दोघी पण खिडकीकडे बघू लागल्या आणि नंतर सुजयकडे पाहिलं.

“हीच हिंदी ऐकून आताच हिंदी भाषेने खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली.” सुजय गंभीर होऊन बोलला.

तशी परी खुदकन हसली. तर रावी गाल फुगवून त्याच्याकडे बघू लागली.

“अरे झाल की नाही?” सायली पण त्या खोलीत येत बोलली. “तुम्हा बहिण भावांना बोलायला फक्त निमित्त पाहिजे.”

“झाल आहे गं आत्तु.” रावी लाडात येत बोलली. “चला राणी सरकार.” रावी कमरेतून खाली वाकत बोलली.

“ममा,” रावीची ती नाटक बघून सुजय विचार करायचं नाटक करत बोलला. तशी सायली पण त्याच्याकडे गंभीर होऊन बघू लागली. तिचं काय रावी आणि परीपण तो काय बोलणार आहे? याची वाट बघू लागल्या. “तुम्ही मामीला कस सहन केल गं?”

तशी सायली त्याला गोंधळून बघू लागली.

“हिची नाटक बघून मला मामींच्या नाटकीपणाची कल्पना येत आहे.” सुजय आता हसतच बोलला.

तशी सायली आणि परी पण हसू लागल्या. तर रावीने तिचं तोंड वाकड केल.

“चला मला किचनमध्ये मदत कर,” सायलीने रावीच्या हाताला पकडलं. “नंतर तुमची तोंड वाकडी करा.” सायली सुजयवर नजर टाकत बोलली.

तशी परी अजूनच हसायला लागली. बाकी तिघे परीच्या खोलीच्या बाहेर पडले. आता परी तिथे एकटीच होती. मग ती त्या येणाऱ्या मुलासोबत कस बोलावं? याचा विचार करू लागली. आधीच तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी खूप काही केल होत. ती रक्ताची नसून सुद्धा त्यांनी सख्या मुलीसारखा तिला जीव लावला होता. त्यामुळे जरी तिला तो मुलगा आवडणार नव्हता तरी त्याला खरं सांगून जर त्याने लग्नाला होकार दिला. तर ती पण लग्नाला तयार होणार होती.

इकडे विजय पण खूपच भावूक झाला होता. त्याला बघून सायलीने डोक्यालाच हात लावला होता. नंतर तिने सुजयवर नजर टाकली तर तो पण त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दाखवत होता.

किचनमधून बाहेर येणाऱ्या रावीने हा सगळा प्रकार पाहिला आणि तिनेही नकारार्थी मान हलवली. ती सायलीजवळ येऊन उभी राहिली.

“लग्नाचा फक्त विचार करून जर डॅडला पण इतकचं टेन्शन येणार असेल तर मी लग्नच करणार नाही.” रावी तिच्या आत्याला पाठीमागून मिठी मारत बोलली. विजयला भावूक झालेलं बघून रावीला कसतरीच होऊन आल होत.

“वेडाबाई,” सायलीने रावीच्या गालावर तिचा एक हात ठेवला. “आज ना उद्या मुलीला सासरी जावच लागत. उद्या तुझाही नंबर येईल.”

“जरी नंबर आला ना तरी त्याला मी घरजावई करून घरी आणेल.” रावी तोऱ्यात बोलली.

तसा सायलीने हसतच कपाळवर हात मारून घेतला. शेवटी ती सोनालीचीच मुलगी होती ना.

“जा आता त्यांना पण हसवं नाहीतर असेच देवदास बनून राहायचे.” सायलीने हसतच रावीला सांगितलं.

आता तिच्या आत्तुने तिला काम सांगितल म्हटल्यावर ती लगेच तिच्या कामाला लागली. तर सायली परत किचनमध्ये काही राहील तर नाही ना ते बघायला लागली. तशी त्यांच्याकडे घरकामासाठी एक मावशी येत होत्या. पण नेमकी ह्या वेळेस त्याच्या गावी काहीतरी प्रोब्लेम आला म्हणून त्या गावी गेल्या होत्या.

सायली किचनमधून सर्व बघून बाहेर येईपर्यंत रावीने तिचं काम चोख केल होत. ते तिघेही हसत खेळत गप्पा मारत होते. तेवढ्यातच त्यांच्या दाराची बेल वाजली. तसा विजय पटकन उठून दार उघडायला गेला तर दारात मुलाकडचे उभे होते. सर्वात पुढे विजय आणि त्या मुलाचे वडील या दोघांचे कॉमन मित्र उभे होते. ज्यांनी परीच स्थळ सुचवलं होत. त्यांच्या मागे मुलाचे आई वडील, काका, मामा, आत्या, आज्जी आणि तो मुलगा असा सर्व गोतावळा आलेला होता.

विजयने लागलीच त्यांना आदराने घरात बोलावले. तसे ते घरात येऊन बसले. विजयच ते प्रशस्त घर बघून त्यांचे डोळेच विस्फारले गेले. घरातलं फर्निचर, इन्टेरिअर, सर्व इलेक्ट्रोनिक सामान खूपच उच्च दर्जाचं होत. शेवटी विजय आणि सायली दोघांच्या कष्टांच फळ होत ते. आता तर परी आणि सुजय दोघेही घरखर्चाला हातभार लावत होते. त्यामुळेच तर विजय आणि सायली यांच्या दोन वेगवेगळ्या महागातल्या चारचाकी गाड्या, सुजयची महागातली स्पोर्ट्स बाईक त्या बिल्डींगच्या पार्किंगला दिमाखात उभ्या होत्या. परीसाठी पण ते मोठी चारचाकी गाडी घेणार होते. पण परीने त्यांना फक्त एका स्कूटीवर मनवल होत.

ती मुळातच हुशार होती आणि तिच्या ह्या वयातच तिचे मानसशास्त्राचे प्रबंध प्रख्यात झाले होते. त्यावर तिला विविध कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावले जात होते. यामुळे तिचा अर्धा महाराष्ट्र तर फिरून झाला होता. दोन तीन वेळेस तिला दिल्लीमधल्या मोठमोठ्या कॉलेजमधेही बोलावण आल होत.

मनातले विचार सहज वाचून जाण्याच्या कलेमुळे तिला तिची बाकी भांवड जरा घाबरतच होती. एकतर त्या सगळ्यांना लहापणापासून तिने शिकवलं होत. एकप्रकारे ती त्यांची आईच झाली होती. कारण त्यांचे सगळ्यांचे आई वडील हे त्यांच्या कामात खूप व्यस्त झाले होते. राहुलने त्यांना दिलेल्या ब्रांचचं एका कंपनीत रुपांतर झाल होत. तस त्याने त्याच्या वडिलांच्या कंपनीच्या विविध ब्रांच उघडायला घेतल्या होत्या. त्यामुळे महेश आणि प्रणाली पुण्याला जाऊन राहिले. संदेश आणि आरती औरंगाबादला तर राहुलने नाशिकची ब्रांच सांभाळायला घेतली होती. तर आराध्या आणि सायली त्यांची मुंबईमधली ब्रांच सांभाळत होत्या.

ही सगळी मंडळी बिझनेसमध्ये असताना परीने मात्र शिक्षकाची भूमिका स्वीकारली होती आणि त्यातून विद्यार्थी घडवण्याच काम ती करत राहिली. यासोबत ती तिच्या आश्रमात शिकवायला जायला आणि तिथे मदत करायला कधीच विसरली नव्हती. जस विजयने तिचं आणि प्रणालीच आयुष्य सुधारलं. तस तिलाही करायचं होत आणि त्यात ती प्रगतीची एक एक पाउल टाकत होती. यात तिच्या मदतीला तिचे बाकी भाऊ सोबत होतेच. ती विजय प्रमाणेच नम्र होती. बोलण देखील अगदीच गोड होत. लहानपणी नात्यांना मुकेलेल्या तिला "नात जप" अस कधी सांगाव लागल नव्हत. ती देखील तिच्या वडिलांप्रमाणे माणस जोडत चालली होती.

तिच्या ह्याच सर्व गुणांना बघून विजयच्या त्या मित्राने हे स्थळ त्याच्या मित्राला म्हणजेच त्या कंपनीच्या सीईओला सुचवले होते.
त्या सगळ्याचं बसल्या बसल्या पूर्ण घर न्याहाळून झाल होत. म्हणजे जेवढं डोळ्यांना दिसलं ते सगळच बघून झाल होत. मुलाचे वडील देखील त्यांच्या कंपनीचे सीईओ होते. पण त्याचं घर देखील ह्या घरापुढे त्यांना छोट वाटायला लागलं.

तोपर्यंत रावी सगळ्यांना पाणी घेऊन आली. तिला अस क्रोप टॉप आणि जीन्स पँन्टवर बघून मुलाच्या आज्जी आणि आई वडिलांना वेगळचं वाटलं. त्यांचा तो चेहरा बघून त्यांच्या मित्राने रावी ती मुलगी नाही अस हळूच मुलाच्या वडिलांच्या कानात सांगितल. कारण त्यांनाही रावीचा स्वभाव चांगलाच माहिती होता. तिच्या कानावर जरा जरी काही चुकीचं ऐकायला गेल तर ती ह्या सगळ्यांच्या कानातून धूर काढायला मागे पुढे बघणार नाही याची खात्रीच त्यांना होती.

ह्या सगळ्यांना पाणी देऊन रावी परीच्या खोलीत निघून गेली. जसा तिला आवाज येणार होता तस ती परीला घेऊन हॉलमध्ये येणार होती. तोपर्यंत विजयच्या मित्राने त्या सीईओच्या मुलाची ओळख करून द्यायला सुरवात केली.

“हा केदार,” विजयचा मित्र त्या मुलाकडे बोट करून बोलला. “बिझनेस मॅनेजमेंन्ट शिकून आता त्याच्या वडिलांसोबतच त्याच कंपनीत कामाला जातो आणि चांगला कमावतो. एकुलता एक आहे तर दोघांच जमलच तर दोघे राजा राणीचा संसार करतील.” तो हसतच बोलला.

विजयला मात्र केदारच काम फारस आवडलं नाही. कारण त्याला त्याच्या वडिलांच्या ओळखीवर काम मिळाल होत. त्यामुळे पुढे जाऊन जर त्याला अपयश आलचं तर तो त्याला कितपत खंबीरपणे समोरा जाईल? याबद्दल त्याला आशांकाच वाटली. तरीदेखील फक्त एका भेटीवर ह्या निर्णयापर्यत लगेच न पोहोचता त्याने पहिले त्याच्याशी बोलायचं ठरवलं.

क्रमशः

कषा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all