मागील भागात.
"हा केदार,” विजयचा मित्र मुलाकडे बोट करून बोलला. “बिझनेस मॅनेजमेंन्ट शिकून आता त्याच्या वडिलांसोबत त्याच कंपनीत कामाला जातो आणि चांगला कमावतो. एकुलता एक आहे तर दोघांच जमलच तर दोघे राजा राणीचा संसार करतील.” तो हसतच बोलला.
विजयला मात्र केदारच काम फारस आवडलं नाही. कारण त्याला त्याच्या वडिलांच्या ओळखीवर काम मिळाल होत. त्यामुळे पुढे जाऊन जर त्याला अपयश आलच तर तो त्याला कितपत खंबीरपणे समोर जाईल याबद्दल त्याला आशांकाच वाटली. तरीदेखील फक्त एका भेटीवर ह्या निर्णयापर्यत लगेच न पोहोचता त्याने पहिले त्याच्याशी बोलायचं ठरवल.
आता पूढे.
मग त्यां सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. विजयच्या त्या कंपनीतल्या मित्राने परीच कौतुक केलच असल्याने त्यांना आता परीला बघण्याची घाई झाली होती. तस सायलीने रावीला आवाज देत परीला बाहेर घेऊन यायला सांगितलं.
सायलीच्या तोंडी परी नाव ऐकून ते जरा गोंधळले. कारण विजयच्या मित्राने तर मुलीच नाव अवनी सांगितल होत.
“तिला घरात लाडाने परी बोलतात.” विजयच्या मित्राने त्यांचा चेहऱ्यावरचा गोंधळ कमी केला.
तेवढ्यातच रावी परीला घेऊन बाहेर आली. तस सर्वांच लक्ष तिकडे गेल. गुलाबी रंगाच्या साडीत परी खूपच सुंदर दिसत होती. तिला बघायला आलेला केदार तर तिचं हे रूप बघून जागीच गोठून गेला होता. तिला किती बघू आणि किती नको अस त्याला झाल होत.
पुढच्या काही क्षणात ती समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.
पुढच्या काही क्षणात ती समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.
विजयने परीची थोडक्यात ओळख करून दिली. तर सायलीने परीच्या हाताला असलेल्या चवीची ओळख करून दिली. त्यांनतर केदारच्या आज्जीने परीला काही प्रश्न विचारले. त्यानंतर त्याच्या काकाने, मामाने आणि शेवटी त्याच्या आई वडिलांनी तिला काही प्रश्न विचारले.
त्यांची प्रश्न संपल्यावर विजयने केदारला प्रश्न विचारायला सुरवात केली. ते केदारच्या आज्जीला काही पटलेलं दिसल नव्हत. त्यांचे विचार जुने होते, ते मुलाकडचे असल्याने मुलीकडचे कसे त्यांना प्रश्न विचारू शकतात अस आज्जीच म्हणणं पडलं.
विजयला केदारच मन, विचार जाणून घ्यायचे होते. त्यासाठी तो कधी कधी काही प्रश्न फिरवून देखील विचारात होता. विजयचा परीवर किती जीव होता हे सायलीला चांगलच माहिती होत. त्यामुळे जोपर्यंत त्याच्या मनाच समाधान होत नव्हत तोपर्यंत त्याची प्रश्न चालूच रहाणार होती.
प्रश्नांची संख्या जरा वाढल्यावर केदार जरा वैतागला गेला. त्याचा चेहरा ते सगळच विजय आणि परीला सांगून गेला.
“आपल बोलण तर होतच राहील.” विजयच्या कंपनीतला मित्र मधेच बोलला. “सध्या मुला आणि मुलीला एकमेकांसोबत बोलायला वेळ देऊयात का?”
तस विजयने एकक दीर्घ श्वास घेत होकार भरला. पण केदार काही त्याच्या मनात भरला गेला नव्हता.
वरिष्ठ मंडळींची परवानगी भेटल्यावर परी आणि केदार विजयच्या खोलीत गेले. आधीच परीच्या रूपावर भाळलेला तो आता एकांतात तिच्यासोबत काय बोलाव? हा त्याला प्रश्न पडला. तो फक्त तिला बघतच राहीला होता.
मग परीनेच बोलायला सुरवात केली. त्याला काय आवडत? त्याचे भविष्यातले स्वप्न काय आहेत? हे सगळ ती त्याला विचारात होती. पण तो या प्रश्नाची वरवरची उत्तर देत राहीला. त्याची नजर फक्त परीच्या त्या गोऱ्यापान शरीरावरून फिरत होती. ते बघून परीला जरा किळस वाटली. तो त्याच्या मनाचा काहीच अंदाज देत नसल्याने परीने तिच्याबद्दल जे काही खरं होत ते सांगून दिल.
परी ही अनाथ असून ती विजयची दत्तक घेतलेली मुलगी आहे हे समजताच केदारच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले. एवढा वेळ तिच्या शरीरावर फिरणारी त्याची नजर आता परीला तिरस्काराने बघू लागली. तो रागातच उठला आणि तिला बरचं काही नको नको ते सुनावत त्या खोलीतून बाहेर पडला.
तो बाहेर पडल्यावर परीने फक्त एक मोठा सुस्कारा सोडला. जणू काही तिला त्याच्या ह्या प्रतिक्रियेची कल्पनाच होती. पण त्याच ते नको नको ते टोचून बोललेलं तिच्या मनाला खूपच टोचून गेल होत. “तुझ्या सारख्या मुलीची लायकी तरी आहे का आमच्या घरात यायची?’ हे असे काही वाक्य आठवून तिच्या डोळ्यातही आसव दाटली होती. पण तिच्या डोळ्यात पाणी बघून तिची बाहेर बसलेली दोन भावंड काय उपद्व्याप करून ठेवतील त्याची कल्पना देखील कोणी करू शकणार नव्हत. म्हणून ती लगेच तिथल्याच बाथरूममध्ये गेली आणि डोळ्यावर पाण्याचे हबकारे मारून चेहरा नीट धुवून घेतला.
इकडे केदार मात्र रागारागात जो खोलीतून निघाला तो थेट त्यांच्या बिल्डींगच्या खालीच जाऊन थांबला. त्याला अस रागात जाताना बघून विजय आणि सायलीला आत काय झाल असेल? याचा अंदाज आला होता. पण केदारच्या घरचे मात्र गोंधळून गेले होते. मग विजय त्याच्या कंपनीतल्या मित्राकडे वळला.
“तू त्यांना परीची नीट ओळख करून दिली नव्हती का?” विजय जरा कडक आवाजात बोलला.
“हो त्यांना सगळ काही सांगितलं होत ना.” विजयचा मित्र पण केदारच्या घरच्यांकडे बघत बोलला. “कदाचित त्यांनी केदारला काही सांगितलेलं दिसत नाही.”
“तस नाही म्हणजे,” केदारचे वडील आता जरा चाचारले. “तेवढा वेळच मिळाला नाही. जरा घाई झाली ना.”
“अश्या गोष्टी घाई गडबडीत करायच्या नसतात.” विजय एक दीर्घ श्वास घेत बोलला. “ठीक आहे तुम्ही येऊ शकता.”
इकडे विजयने त्यांना बघून हात जोडले. तर दुसरीकडे रावी आणि सुजय पटकन विजयच्या खोलीकडे गेले.
परीला जशी कल्पना होती त्या प्रमाणे ते दोघेही दोन मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते. तोपर्यंत परीने तिचा चेहरा स्वच्छ केला होता. त्यांना आलेलं बघून परीने त्यांच्याकडे बघून सुंदर अस स्मित केल.
“अरे हो जरा दम धरा,” परी हलकेच हसत बोलली. “लगेच काय अस विचारायला यायचं का? अजून वेळ आहे मला ह्या घरातून जायला. तुमची काही सुटका नाही माझ्यापासून एवढ्या लवकर.”
“अरे हो जरा दम धरा,” परी हलकेच हसत बोलली. “लगेच काय अस विचारायला यायचं का? अजून वेळ आहे मला ह्या घरातून जायला. तुमची काही सुटका नाही माझ्यापासून एवढ्या लवकर.”
“हे बघ दि,” रावी आता जरा चिडून बोलली. “तू काही माझी आई आणि प्रणाली मावशी नाहीयेस जी तुला त्यांच्यासारखी नौटंकी तुला जमेल.”
“तो काय बोलला?” सुजय “एवढच आम्हाला ऐकायचं आहे.”
“काही नाही रे,” परी तिच्या केसांचे क्लिप्स काढत बोलली. “जस खरं सांगितल तस त्याची नजरच बदलली आणि निघून गेला. मग अजून काय त्याने बोलायला हवं होत?”
तसा रावीने परीचा हात उचलला आणि सरळ स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि बोलली. “आता बोल तो फक्त निघून गेला ना?”
परीने रावीकडे पाहिलं आणि स्वतःचे डोळे घट्ट मिटून घेतले. ज्याची ती भीती होती तेच घडत चालल होत.
“सांगते पण तुम्हाला माझी शप्पथ आहे,” परी दोघांना रोखून बघत बोलली. “तुम्ही काहीच करणार नाही.”
तस दोघांनी त्यांची तोंड वाकडी केली.
“जाऊदे मग.” परी पण उसासा टाकत बोलली.
“सांग ना,” रावी आठ्या पाडून बोलली. “नाही काही करणार.”
तरीही परी त्या दोघांना ब्बारिक डोळे करून बघत राहिली. तस दोघांनी त्यांच्या गळ्याला त्यांचा हात लावला. मग परीने त्याने जे काही बरळलं होत ते सगळच सांगून दाखवलं. ते ऐकून दोघांच्या चेहऱ्यावर राग नाचू लागला.
सुजय तर लगेच मागे वळून त्या खोलीतून बाहेर पडणार होता पण परीने त्याला तिच्या शपथेची आठवण करून दिली. तसा तो रागातच तिथून निघून त्याच्या खोलीकडे निघून गेला.
(वर्तमान काळ.)
ते सगळच सुजयला आठवून त्याच्या रागाचा पारा परत चढायला लागला. त्याने त्याच्या बाईकचा क्लच ओढून घेत बाईक न्युट्रल केली आणि केदारकडे बघून त्याच्याकडून त्याच्या बाईकचा एस्केलेटर जोरात पिळला गेला.
त्याच्या बाईकचा इतका जोरत आलेला आवाज ऐकून सगळ्यांची नजर सुजयवर पडली. त्याचा तो रागातला चेहरा बघून काहीतरी बिनसल्याच त्यांना जाणवल. तो ज्या दिशेने बघत आहे तिकडे त्यांनी बघायला सुरवात केली. तसा त्यांना एक मुलगा बाईक चालवताना दिसला. त्यांनी परत सुजयकडे पाहिलं.
“केदार.” सुजय इतकच बोलला. मग बाकीच्यांना दुसर काही विचारायची गरज पडली नाही. कारण सुजयने त्याच्याबद्दल आधीच त्यांना सांगून दिल होत.
बाकी मुल परत त्या केदारकडे बघेपर्यंत त्यांच्यातली एक बाईक तिथून सुसाट वेगाने बिघाली सुद्धा होती. त्या सगळ्यांनी पाहिलं तर माला त्याच्यामागे सुसाट निघाली होती.
“हिला धीर नावाची गोष्ट दिली नाही का प्रणाली मावशीने?” आरुष डोक्याला खाजवत बोलला.
तसे बाकीचेही लगेच तिच्यामागे जायला निघाले. त्यांना निघून थोडा वेळ झालाही नसेल तोच त्या सगळयांना केदार एका पोलिसाच्या गाडीजवळ बसलेला दिसला. त्याची बाईक पोलिसांच्या चारचाकी गाडीच्या मागच्या बाजूला ठोकलेली दिसली. तर माला तिथेच उभी राहून पोलिसांसोबत बोलत होती. मग हे सगळेच तिथे जाऊन थांबले.
तर झाल अस की माला पूर्ण वेगात केदारच्या मागे गेली होती. तो जवळ येताना दिसताच तिने तिची बांधलेली केस एका हाताने मोकळी सोडली. त्यानंतर बाईकवरचा दुसरा हातही सोडला आणि खिशातून एक लीप बाम काढून ती ओठांना लावू लागली. ओठ पिंक रंगाचे झाल्याचे बाईकच्या आरश्यात पाहिलं आणि ती केदारला अगदीच खेटून बाईक पुढे घेऊन जाऊ लागली. सोबतच त्याला बघून एक सुंदर स्मित दिल. तसा केदारही लगेच उत्साहात आला. मग तो देखील तिच्यामागे मागे त्याची बाईक चालवू लागला. नंतर लगेचच मालाने त्याला मागे राहिला म्हणून इशारातच चिडवायला लागली. तसा केदारला अजूनच चेव आला आणि तो अजून वेगात त्याची बाईक चालवू लागला. मालाला देखील हेच हव होत. त्याला अस तिच्या मागे वेगाने येताना बघून तिने पुढे पाहिलं. तिच्या अपेक्षेप्रमाणे पुढच्या चौकावर पोलिसांची एक गाडी उभी होती. मालाने तिची बाईक अशी काही वळवली की मागे येणाऱ्या केदारला काही समजलच नाही. त्यानेही त्याची बाईक पटकन वळवली आणि तो थेट त्या पोलिसांच्या गाडीवर मागच्या बाजूने जाऊन आदळला.
त्याला पडलेलं बघून मालाच्या चेहऱ्यावर असुरी स्मित झळकल आणि ती पण त्या पोलिसांच्या गाडीजवळ येऊन थांबली. तोपर्यंत पोलिसांनी केदारला उचलून शेजारच्या फुटपाथवर बसवलं होत. सोबत त्यांच्याकडून त्याचा उद्धार देखील चालू होता. त्यात मालाने जाऊन अजून तेल ओतल.
“मी कतीतरी वेळा सांगितल की हळू चालवा म्हणून तरी माझ्यामागून पुढे जायला त्याला काय मजा यायची काय माहित?” माला चिडून बोलली.
तोपर्यंत ही बाकी मंडळी तिथे जाऊन पोहोचली. त्याची ती अवस्था बघून सुजयच्या चेहऱ्यावर पण आसुरी स्मित झळकल.
“तू सरपोतदारांचा नातू ना?” एका पोलिसाने आरुषकडे बघू विचारलं.
तस त्याने हलकेच हसत होकारात मान हलवली. “ते माझी बहिण बोलली की एक मुलगा तिच्या आजूबाजूला बाईक चालवून तिला त्रास देत आहे म्हणून मी आलो होतो. पण बर झाल तुम्हीच भेटले. बघा आता त्याच काय करायचं ते.”
तस त्याने हलकेच हसत होकारात मान हलवली. “ते माझी बहिण बोलली की एक मुलगा तिच्या आजूबाजूला बाईक चालवून तिला त्रास देत आहे म्हणून मी आलो होतो. पण बर झाल तुम्हीच भेटले. बघा आता त्याच काय करायचं ते.”
“ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही नका टेन्शन घेऊ.” पोलीस “एकतर त्याने आमच्या गाडीच नुकसान पण केल आहे.”
“फक्त माझ्या बहिणीच नाव नका मध्ये येऊ देऊ.” आरुष त्यांना विनंती करत बोलला.
त्याच अस विनंती करून बोलण त्या पोलिसांना भावून गेल. नाहीतर लांबच नात सांगून स्वतःच काम काढून घेण्यासाठी पोलिसांवर आवाज चढवणारे त्यांना खूप भेटले होते. पण आरुष त्यांना खूपच वेगळा भासला.
आता तिथे रुणवाहिका देखील येऊन पोहोचली. त्यातल्या माणसांना मदत म्हणून ह्या सगळ्यांनी त्यांना मदत देखील केली.
हा सगळा प्रकार केदार बघत राहीला होता. कारण इशारा त्या मुलीने स्वतःने केला होता आणि आता तिने सरळ तिचे शब्द फिरवले होते. एकतर त्याच्या हाता पायाला चांगलच लागल होत. त्याची ठणक तर बसतच होती. त्यात मालाचे ते फिरवलेले शब्द त्याला जास्त टोचू लागले. केदारला रुग्णवाहिकेत ठेवताना माला हळूच त्याच्या जवळ जात बोलली.
“शब्द किती टोचतात ना?” मालाचा चिडून हसत असलेला चेहरा बघून केदारचा चांगलंच घाम फुटला. त्यात त्याच रक्तही जरा वाहून गेल्याने त्याला लगेच चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला.
ती रुग्णवाहिका केदारला घेऊन निघून गेली. तिच्यामागे ती पोलिसांची गाडी पण निघून गेली. केदारची बाईक मात्र तिथेच राहिली. तिचंही बरचं नुकसान झाल होत. पोलीस आणि रुग्णवाहिका गेल्यावर त्या सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. सुजयने तर थेट मालाला मिठीच मारली. त्याच स्वप्न तिने जे पूर्ण केल होत. जरा वेळ गेला तरी त्याने काही तिची मिठी सोडली नव्हती. शेवटी मालाच बोलली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा