Login

अवनी एक प्रवास भाग ७

मग काय? रुद्र आणि रावी दोघेही रुद्रच्या आई समोर मान खाली घालून त्यांची बडबड ऐकत राहिले. रावीने हळूच सोनालीला डोळे वर करून पहिले तर तिची ती आई मस्त गालातच हसत होती. तिला जस समजल की रावी तिच्याकडेच बघत आहे. तस सोनालीने तिला तिची भुवई उंचावत चिडवल होत.
मागील भागात.

“शब्द किती टोचतात ना?” मालाचा चिडून हसत असलेला चेहरा बघून केदारचा चांगलंच घाम फुटला. त्यात त्याच रक्तही जरा वाहून गेल्याने त्याला लगेच चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला.

ती रुग्णवाहिका केदारला घेऊन निघून गेली. तिच्यामागे ती पोलिसांची गाडी पण निघून गेली. केदारची बाईक मात्र तिथेच राहिली. तिचंही बरच नुकसान झाल होत. पोलीस आणि रुग्णवाहिका गेल्यावर त्या सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. सुजयने तर थेट मालाला मिठीच मारली. त्याच स्वप्न तिने जे पूर्ण केल होत. जरा वेळ गेला तरी त्याने काही तिची मिठी सोडली नव्हती. शेवटी मालाच बोलली.

आता पूढे.

“तू अजनू जर असाच मिठीत राहिलास ना तर तुला मी कायमची मिठीत पकडून घेईल हं.” माला खट्याळ होत बोलली.

तसा तो तिच्या मिठीतून बाहेर आला. त्याचे डोळे जरा ओलावलेले होते. ते बघून मालाला अजूनच त्याची मस्करी करायची लहर आली.
“अरे लगेच काय सिरिअस झालास?” माला “भले मी कोणाला राखी बांधली नाही पण मी तुम्हा सगळ्यांना भाऊच मानते.”

“पण तुला कोण बोलल की आम्ही तुला मुलगी मानतो ते?” आदेश तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. “अरे तू तो अपना ब्रो है.”

तस मालाने आदेशला पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्याने तिच्या खांद्यावर ठेवलेला त्याचा हात तिने पटकन तिच्या हातात पकडून जोरात पिळला.

“आऽऽऽऽऽ ईग.” आदेश कळवळला. “म्हणून तुला कोणताच मुलगा पटणार नाही.”

“मला त्यात इंटरेस्ट देखील नाही.” माला तिचं तोंड वाकड करत बोलली. “घर जावई बनायला तयार असेल तर ठीक नाहीतर गेला उडत.”

“बरं तुमच झाल असेल तर निघायचं?” आरुषने जबरदस्तीच हसू आणत विचारलं.

नंतर ते ज्यांच्या त्यांच्या घराकडे निघून गेले.

आज रावी खूपच आनंदात होती. कारण आज रुद्र जेवणाच्या वेळेस तिच्यासोबत बसणार होता. सध्या त्यांच्या घरी रुद्र, सोनाली, रुद्रची आई आणि रावी इतकेच सदस्य होते. रुद्रच्या वडिलांच्या शरीरात साखरेचे प्रमाण खूपच वाढले गेल्याने त्यांच निधन झाल होत. त्यावेळेस रावी इयत्ता नववीत शिकत होती. नेमकी परीक्षेच्या कालावधीत त्याचं निधन झाल होत रावीचा त्यांच्यावर खूपच जीव होता. त्यामुळे त्यांचा जाण्याचा तिला धक्काच बसला होता. त्यावर्षी रावीला खूपच कमी मार्क मिळाले होते. तिची अवस्था सगळ्यांनाच माहिती झाली असल्याने तिच्या कमी मार्कांच कारण कोणीही तिला विचारलं नव्हत. अगदी तिच्या शाळेतही नाही. कारण ती मुळातच खूप हुशार होती.

नेहमी फक्त जेवणाच्या वेळेस खोलीच्या बाहेर पडणारी रावी आज लवकरच हॉलमध्ये येऊन बसली होती. आज रुद्र लवकर घरी येणार होता. ती दाराकडे नजर ठेवून तिच्या बाबांची वाट बघत होती. तिला नुसतच बसलेलं बघून सोनालीने तिला कामाला लावल.

आज बाबा घरी येणार म्हणून ती कोणतीही कुरकुर न करता सोनालीला तिच्या कामात मदत करत होती. रुद्रच्या आईला गोळ्या खायच्या असल्याने सोनाली त्यांना मात्र वेळेवर जेवण देत होती. अगदी त्यांनी रुद्रला उशीर होणार असेल तर सोबतच जेऊ असा हट्ट करायला लागायच्या तरी सोनाली त्यांना वेळेवर जेवायला लावायची.

आजच जेवण रावी त्यांच्या खोलीत घेऊन गेली होती. रावीचा आनंदाने झळकलेला चेहरा बघून रुद्रच्या आईला तिचा मुलगा येत असल्याची जाणीव झाली. तसा त्यांनी लगेच मुलासोबत जेवायचा हट्ट केला. पण रावीने तिच्या गोड बोलण्याने तिच्या या आज्जीला प्रेमाने स्वतःच्या हाताने भरवत जेवण खाऊ घातलं. आता नातीने जेवण स्वतःच्या हाताने भरवलं म्हटल्यावर त्यांनाही आज दोन घास जास्तीचे पोटात गेले होते.

त्याचं जेवण होईपर्यंत रुद्र घरी येऊन पोहोचला. त्याने रावी त्याच्या आईला जेवण भरवताना पाहिलं आणि तो खोलीच्या दारातच थांबला. कारण तो आत गेला असता तर त्याच्या आईने आताच जेवण थांबवून सोबत जेवायचा हट्ट केला असता. मग तो गालात हसतच त्यांच्या खोलीकडे निघून गेला.

रावी आज्जीला जेवण भरवून किचनमध्ये चालली. तसा तिला तिचे बाबा आल्याची जाणीव झाली. तशी ती पटापट चालत किचनमध्ये गेली.

“बाबा आले ना?” रावी उत्साहात येत बोलली.

“तुला काय तुझ्या मामीची हवा लागली काय?” सोनाली हलकेच हसत बोलली.

“म्हणजे?” रावीने गोंधळून विचारलं.

“तुझे मामा यायच्या आधी तुझ्या मामीला ते येत असल्याचे समजून जात असायचं.” सोनाली त्यांचे ते जुने दिवस आठवून हलकसं हसत बोलली.

“काय सांगतेस ममा तू.” रावी आश्चर्यचकित होत बोलली. “होत अस खरं खरं?”

“हममं आम्ही तर डोळ्यांनी पाहिलं आणि ऐकल.” सोनाली

“वॉव किती रोमांटिक ना?” रावी तिचे दोन्ही हात तिच्या गालावर ठेवत बोलली. “मला अस कधी होईल?”

तिचं बोलण ऐकून सोनालीचे डोळेच विस्फारले गेले. तिने तशीच रावीच्या पाठीत एक चापट मारली. “मला कधी होईल म्हणे? काय खाऊ आहे का ते?”

“तू ना खूप बोर आहेस,” रावी तिचे गाल फुगवून बोलली. “”तोंडावर पाणी पडल्याशिवाय तू कधी उठली नाही म्हणे.” रावी हे वाक्य बोलता बोलता हळूच किचनच्या दाराजवळ गेली. “मग तुला ते खाउच वाटणार ना.” आता ती हसायला विसरली नव्हती.

रावीच्या वाक्याने सोनालीच तोंडच उघड पडल. “विज्या, कशाला तिला काहीही सांगत बसतोस रे.” ती आठ्या पाडून वर बघत बोलली. नंतर ती रावीकडे वळली. “तू त्याचं बोलण मनावर घेऊ नकोस. जा बाबा आलाय तुझा त्याचं डोक खा.” सोनालीने तिला तिथून पिटाळून लावल आणि सरळ विजयला फोन लावला.

इकडे रावी पटकन हॉलमध्ये आली. रुद्र त्याच आवरून बाहेर आला होता. ती लगेच तिच्या बाबांच्या कुशीत जाऊन विसावली.

“हेय पिल्ल्या,” रुद्रने तिला मिठीत घेतल.

“पिल्ल्या काय रे बाबा?” रावी कुशीत शिरूनच गाल फुगवत बोलली. “मी मोठी झाली आहे ना आता.”

“तु कितीही मोठी हो, पण माझ्यासाठी माझा पिल्लूच.” रुद्रने तिच्या कपाळावर कीस केल.

“बाबा,” रावी लाडात येत बोलली. “ऐक ना पण.”

“काय पाहिजे आहे सांग.” रुद्र जेवणाच्या टेबलावर बसत बोलला.

“मला ना ते..” रावी पुढे काही बोलणार तोच सोनाली बाहेर येऊन बोलायला लागली.

“काही गरज नाही त्या मुलाचा नंबर तिला द्यायची.” सोनाली रुद्रकडे बघून जरा चिडून बोलली.

तसा रावीने आठ्या पाडून सोनालीला पाहिलं आणि रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला. कारण त्यालाही माहिती होत की रावी कशासाठी त्या मुलाचा नंबर मागत होती ते.

“नको काळजी करूस,” रुद्र उसासा टाकत बोलला. “पोहोचवलं त्याला हॉस्पिटलमध्ये.”

हे ऐकून रावीला जो आनंद झाला, बास रे बास. “खरं बोलत आहे बाबा तू?” तिने परत रुद्रला विचारलं.

“काय आगाऊ मुलगी आहे?” सोनाली चिडून बोलली. “कोणाला होस्पिटलमध्ये पोहोचवल्याचा इतका आनंद होतो का?”

“हो,” रावी ठसक्यात बोलली. “मला होतो. दी ला त्याने त्रास दिला, मग त्याला त्याच्या जागेवर पोहोचवायला नको?”

“हे भगवान,” सोनाली वर बघत बोलली. “कोणता अॅन्टीक आमच्या पदरात टाकलास?”

“तुम्हीच मला मागून घेतलं आहे त्याच्याकडून,” रावी डोळे मिचकावत बोलली. “तू जसा तुझ्या मित्रांना, तूझ्या आई बाबांना छळलं आहेस ना त्याचा बदला घेण्यासाठी देवाने मला तुमच्याकडे पाठवलं आहे.”

रावीच्या वाक्यावर सोनालीच्या कपाळावरच्या आठ्या खूपच गडद झाल्या. “तू ना खूप शेफारली आहेस.” सोनाली चिडून बोलली. “हे सगळ ना तुमच्या आणि विजयच्या लाडाचे परिणाम आहेत.” तिने तिचा मोर्चा रुद्रकडे वळवला. “तिला सगळच सांगत बसायची काय गरज आहे?”

“मी कुठे काय तिला सांगितलं?” रुद्रने त्याचे खांदे उडविले. “मला वेळ तरी भेटायचा का?”

“हो सगळ मीच शिकवलं आणि सांगितलं आहे तिला.” सोनाली
तेवढ्यात रुद्रची आई त्यांच्या खोलीतून बाहेर आली. “काय झाल गं अस चिडायला?”

त्यांना बाहेर आलेलं बघून जुनी सोनाली बाहेर आली. “बघा ना आई, हे दोघ बाप लेक मिळून मला किती त्रास देत आहेत. पूर्ण दिवस ह्याचं आवरा आणि नंतर पण माझचं चुकलं म्हणून मलाच ऐकवा.”
सोनालीने तिच्या डोळ्यांना रुमाल लावला.

तिच्या ह्या नौटंकीकडे रावी बघतच राहिली. रुद्रला तर याची सवय झाली होती. पण रावीसाठी तिचं हे रूप नवीनच होत. असही सोनालीने पहिल्यांदाच रावी समोर अशी नौटंकी केली होती. ज्यात सोनालीने तिचंच नाव घेतलं होत.

“कशाला रे माझ्या लेकीला त्रास देता?” रुद्रची आई आता सुरु झाली. “ती एवढी मर मर मरते तुमच्यासाठी आणि तुम्ही तिलाच चुकीच ठरवता?”

रावीच तोंडच उघड पडल होत. तिला वाटत होत की त्यांच्यात तिच्या एवढी नौटंकी कोणताच नाहीये. पण ती हे विसरली होती की तिला तो गुण देणारी तिची आईच होती आणि गुरूपुढे शिष्याच कधी चालल आहे का?

मग काय? रुद्र आणि रावी दोघेही रुद्रच्या आई समोर मान खाली घालून त्यांची बडबड ऐकत राहिले. रावीने हळूच सोनालीला डोळे वर करून पहिले तर तिची ती आई मस्त गालातच हसत होती. तिला जस समजल की रावी तिच्याकडेच बघत आहे. तस सोनालीने तिला तिची भुवई उंचावत चिडवल होत.

पुढचे पंधरा मिनिट रुद्रच्या आईने दोघा बाप लेकीला चांगलच सुनावलं होत.

तर दुसरीकडे सुजय खूपच आनंदात त्याच्या घरी पोहोचला होता. त्याची तर इच्छा होती की आईस्क्रीम पण घेऊन जाव. पण मग त्याला परीच्या प्रश्नांना सामोर जाव लागल असत. त्यामुळे तो थेट घरी पोहोचला. घरात पोहोचल्यावर त्याने फ्रेश होत त्याच पटकन आवरून घेतल आणि हॉलमध्ये विजयजवळ येऊन बसला.

“साहेब आज खूपच खुशीत दिसत आहेत.” विजय त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला विचारू लागला.

“तस काही नाही बाबा.” सुजय टीव्हीकडे बघत बोलला.

विजयने किचनमध्ये नजर टाकली. तिथे परी आणि सायली आजच्या जेवणाची तयारी करत होत्या. मग त्याने हळूच सुजयच्या कानाजवळ जात विचारलं.

“शेवटी तुमच्या मनासारखं केलतच ना?” विजय सुजयकडे बघत बोलला.

तस सुजय चमकून विजयला बघू लागला. ‘ह्यांना कस समजल?’ त्याने मनातच स्वतःला विचारलं.

“म... मी.. मी काही नाही केल.” सुजय गडबडत बोलला. “त.. ते... माला, हा मालाच्या मागे मागे चालला होता तर पोलिसांच्या गाडीला जाऊन तो धडकला. मी काहीच केल नाही. मी का करेल? मी दीने दिलेली शपथ कधी मोडतो का?”

“पण माझा विषय तो नव्हताच.” विजय हलकेच हसत सरळ होत बोलला. त्याने त्याच्या मुलावर फक्त गुगली टाकली होती. ज्यात तो सहज फसला गेला होता.

“बाबा,” सुजयने त्याच तोंड वाकड केल. “मला माहिती आहे, तुम्ही मुद्दाम अस बोलला ते. पण प्लीज दी ला काही सांगू नका.” त्याने विजयला विनंती केली.

“काय सांगू नका मला?” परी जेवणाच साहित्य हॉलमध्ये आणत बोलली.

तिच्या मागे सायली पण बाकीच सामान घेऊन आली आणि जेवणाच्या टेबलावर ताट ठेवून ते वाढू लागली.

“आमच सिक्रेट आहे ते.” विजय बोलण्याधीच सुजय बोलून मोकळा झाला.

“ठेवा तुमच्यातच मग.” परी पण त्याच तोऱ्यात बोलली. “नंतर आम्ही एकटे असलो की बाबा मला सगळ काही सांगतात.”

ते ऐकून सुजयने विजयकडे पाहिलं. त्यावर त्याने फक्त त्याचे खांदे उडविले.

“बाबा.” सुजय केविलवाण्या आवाजात बोलला.

तसा विजय अजूनच हसायला लागला. “नाही रे बाबा, मी काही सांगत नाही.”

‘म्हणजे नक्कीच काहीतरी आहे.’ परी मनातच विचार करत बोलली. ‘बोलाव लागेल बाबांसोबत.’

मग त्या सगळ्यांनीच त्यांची जेवण आटोपली आणि झोपी गेले.
दुसरा दिवस उजाडला. तशी घरात कामाला जायची गडबड चालू झाली. विजय त्याच्या कारच्या कंपनीत, सायली राहुलच्या वडिलांच्या कंपनीत, परी तिच्या कॉलेजमध्ये लेक्चरसाठी तर सुजयला जायला वेळ असल्याने तो आरामात उठणार होता. पण परी घरात असताना ते आज्जीबतच शक्य नव्हत. घरातल्या बाकी सर्वांच आवरून झाल्यावर चहासाठी ते टेबलावर जमले होते. तिथे फक्त सुजय नव्हता. ते बघून परी सरळ त्याच्या खोलीकडे निघून गेली आणि तिला नाही सायलीने अडवलं आणि नाही विजयने.

तर दुसरीकडे रावी पण आरमात उठली होती. तिच्या बाईकची चावी परीने तिच्याकडून काढून घेतल्याचे ती विसरून गेली होती. त्यामुळे उशीर जरी झाला तरी आपण बाईक फास्ट चालवत सहज कॉलेजला पोहोचू शकतो या विचारात ती आरामात बेडवर पसरून लोळत होती.
“अगं उठलीस की नाही अजून?” सोनाली तिच्या खोलीत येत बोलली. “आज तुझी बाईक नाहीये तुझ्याकडे विसरलीस का?”

तशी रावी खाडकन उठून बसली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all