Login

अवनी एक प्रवास भाग ८

रावी परीच्या खोलीत गेली. तिथे तिला समजल की तिच्या बाईकची चावी तर तिच्या मामीने घेतली होती. जिच्यावर ती काल चिडून निघून गेली होती. मग काय? ती परीच्या खोलीतून बाहेर पडली आणि मामीच्या खोलीकडे जायला निघाली. तिच्या खोलीच्या दाराजवळ जाऊन तिने दार लोटून पहिला तर तो उघडाच होता. मग तिने तिची लांब मान हळूच आत टाकली आणि तिच्या मामीचा अंदाज घेऊ लागली.
मागील भागात.

दूसरा दिवस उजाडला. तशी घरात कामाला जायची गडबड चालू झाली. विजय त्याच्या कारच्या कंपनीत, सायली राहुलच्या वडिलांच्या कंपनीत, परी तिच्या कॉलेजमध्ये लेक्चरसाठी तर सुजयला जायला वेळ असल्याने तो आरामात उठणार होता. पण परी घरात असताना ते अज्जीबतच शक्य नव्हत. घरातल्या बाकी सर्व्नच अव्व्रून झाल्यावर चहासाठी ते टेबलावर जमले होते. तिथे फक्त सुजय नव्हता. ते बघून परी सरळ त्याच्या खोलीकडे निघून गेली आणि तिला नाही सायलीने अडवलं आणि नाही विजयने.

तर दुसरीकडे रावी पण आरमात उठली होती. तिच्या बाईकची चावी परीने तिच्याकडून काढून घेतल्याचे ती विसरून गेली होती. त्यामुळे उशीर जरी झाला तरी आपण बाईक फास्ट चालवत सहज कॉलेजला पोहोचू शकतो या विचारात ती आरामात बेडवर पसरून लोळत होती.
“अगं उठलीस की नाही अजून?” सोनाली तिच्या खोलीत येत बोलली. “आज तुझी बाईक नाहीये तुझ्याकडे विसरलीस का?”

तशी रावी खाडकन उठून बसली.

आता पूढे.

काल रात्री पडलेल्या स्वप्नाच्या धुंदीत ती कालच सगळच विसरून गेली होती. अजून तर तिला तिची बाईक घ्यायला विजयच्या घरी जायचं होत. मग ती पटकन उठली आणि घाईघाईत सर्व तिचं आवरू लागली. तिचं आवरेपर्यंत सोनालीने रावीची खोली आवरून घेतली.

इकडे रुद्र पण त्याच आवरून त्याच्या कामावर जायच्या तयारीत होता. सध्या दोन दिवस त्याला जास्त काही काम नसल्याने तो आज जरा आरामात त्याच्या कामावर चालला होता. पण रावी अजून त्याला भेटली नसल्याने तो थांबून होता.

पुढच्या काही क्षणातच रावी तिचं आवरून हॉलमध्ये आली. आल्या आल्या पहिले तिच्या बाबांना बिलगली. कारण तो परत कधी असा सकाळी तिला भेटेल? ते सांगताच येत नव्हत. आपल्या लेकीला भेटून रुद्र त्याच्या कामावर निघून गेला.

इकडे सोनालीने रावीसाठ आधची चहा नाश्ता बनवून ठेवल होता. तिलाही कामावर जायची घाई होती. रुद्रच्या आईसाठी जेवण तयार करून मगच ती जाणार होती. राहुल सध्या कोल्हापूरला गेला असल्याने सोनाली राहुलच्या कंपनीची वाशीची ब्रांच सांभाळत होती. सोनाली आता ठाणेमध्येच राहायला आल्याने तिला वाशी जवळ देखील पडत होत आणि रावीच कॉलेज पण त्यांच्या घराच्या जवळ होत. त्यामुळे रुद्रच्या आईला काही गरज लागलीच तर रावी पटकन घरी पोहोचत होती.

रावी पटापट मोठ मोठे घास तोंडात कोंबत होती.

“म्हणून सांगते लवकर उठायचं असत.” रुद्रची आई हॉलमध्ये येत बोलली. “नाहीतर असं बकासुरासारख खाव लागत.”

सोनालीला तर हलकच हसायला आल होत. तर रावीने फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित केल होत. तिने पटकन कसातरी चहा नाश्ता संपवला आणि तिची बॅग उचलत सरळ घराबाहेर पडली.

“अगदी तुझ्यासारखी आहे,” रुद्रची आई जाणाऱ्या रावीला बघून बोलली. “पायाला भिंगरी आणि बोलायला गोजिरी.”

“मग तिला इतक्या का भांडता?” सोनालीने पण हलकसं हसत विचारलं.

“त्याशिवाय ती ऐकतच नाही ना.” रुद्रची आई सुस्कारा सोडत बोलल्या.

तश्या दोघी सासू सुना हसायला लागल्या.

तिकडे सुजय पण खडबडून जागा झाला होता. परीने दोन वेळा आवाज देऊन तिसऱ्या वेळा सरळ त्याच्या तोंडावर पाणी टाकून त्याला उठवलं होत.

“काय गं दिदू?” सुजय लहान मुलासारखा बोलला. “झोपू देना. काल एकतर तुझ इतक भारी काम केल मी.”

“माझ काय काम केलस?” परीने गोंधळून जात कडक आवाजात विचारलं.

तसा झोपेत असणारा सुजय लागलीच भानावर आला. “ते माझ एक काम भारी झाल अस.” एवढ बोलून तो सरळ बाथरूममध्ये पळाला.

‘नक्कीच काहीतरी कांड केल आहे याने.’ परी विचार करत बोलली आणि हॉलमध्ये येऊन बसली.

मग ते तिघेही चहा घेत बसले. त्यांचा नाश्ता संपायला आला होता तेव्हा कुठे सुजय चहासाठी तिथे जाऊन पोहोचला. मग परी आणि सायलीने बाकीच्यांच्या प्लेट्स उचलल्या आणि किचनमध्ये गेल्या. सायली किचनमधलं आवरू लागली तर परी सुजयसाठी चहा नाश्ता घेऊन आली.

विजयने त्याच आवरलं होत म्हणून तो त्याच्या कामावर जायला निघाला. त्या बिल्डींगच्या पार्किंगला तो पोहोचला. तेव्हा त्याला त्याची आधीची गाडी दिसली जी मोहिते साहेब आणि बाकी मंडळीनी त्याला गिफ्टच्या नावाखाली दिली होती. ती त्याने अजूनही जपून ठेवली होती. त्या गाडीची तो नियमित देखभाल करत रहायचा. कधी कधी तर सुट्टीच्या दिवशी त्या गाडीतून एक चक्कर देखील मारून यायचा. आता तर त्याच्याकडे एक महागडी लक्झरी कार होती. तो तिनेच ऑफिसला यायचा आणि जायचा. आताही त्याने त्याच्या गिफ्ट मिळालेल्या गाडीवरून हात फिरवला आणि त्याच गाडीच्या बाजूला असलेल्या त्या लक्झरी कारने तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.

इकडे सायलीच देखील आवरून झाल होत. परी देखील तिच्या कामावर जायची तयारी करत होती. तोच रावी तिथे जाऊन पोहोचली. दार देखील सुजयनेच उघडलं होत. दारात सुजयला बघताच तिला काल रात्रीचे रुद्रचे शब्द आठवले आणि तिने सरळ सुजयला मिठीच मारली.

“एकदम भारी काम केतात काल.” रावी हळूच बोलली. कारण परी घरातच असल्याचे तिला माहिती होते. यावर सुजयने देखील तिला उचलून गोल फिरवले.

“मग काय असच थोडीच सोडणार होतो.” सुजय हसतच बोलला. नंतर त्याला रावीचा पराक्रम आठवला आणि त्याने सरळ तिला खाली सोडलं.

अचानक सुजयने तिला सोडल्याने रावी थेट खालीच पडली.

“आउच,” रावी आठ्या पाडून सुजयकडे बघू लागली. “वेडा आहेस का? मला का पाडलस?”

“आणि काल तू जे रेस लावायला उडत उडत जेली होतीस त्याच काय?” सुजय तिला रोखून बघत बोलला.

“बस ना रे दादा,” रावी तिचा चेहरा अगदीच निरागस करत बोलली. “मामा आणि दी ने मिळून माझे कान पिकवले आहेत आणि आता तू नको परत सुरु करूस.”

“अच्छा तर लेक्चर मिळाल आहे तर.” सुजय हलकसं हसत बोलला.

“मग काय?” रावी तिचं तोंड वाकड करत बोलली. “काल बाईकची चावी पण घेतली आहे. तिचं घ्यायला आली आहे. कुठे आहे दी?”

“अरे वा छानच की.” सुजय हसतच बोलला. “ती तिच्या खोलीत आहे.”

मग रावी परीच्या खोलीत गेली. तिथे तिला समजल की तिच्या बाईकची चावी तर तिच्या मामीने घेतली होती. जिच्यावर ती काल चिडून निघून गेली होती. मग काय? ती परीच्या खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या मामीच्या खोलीकडे जायला निघाली. तिच्या खोलीच्या दाराजवळ जाऊन तिन हलकेचे दार लोटून पाहीलं तर तो उघडाच होता. मग तिने तिची लांब मान हळूच आत टाकली आणि तिच्या मामीचा अंदाज घेऊ लागली.

सायली आतमध्ये तिचे कामावर जायचे नेहमीचे कपडे घालत होती. सोबत तिचं गालात हसण चालू होत. आंघोळ करताना सुद्धा विजयच्या प्रेमात ती न्हाऊन निघाली होती आणि तेव्हाचे तेच क्षण आताही आठवून तिचे गाल गुलाबी झाले होते. कपडे घालून झाल्यावर सायली तिच्या ड्रेसिंग टेबलला असलेल्या आरश्यासमोर जाऊन उभी राहिली आणी तिचे केस विंचरू लागली.

मामीचा आताचा मूड खूपच छान असल्याचे पाहून रावी हळूच सायलीच्या खोलीत शिरली आणि हलक्या पावलांनी सायलीजवळ जाऊ लागली.

“बाईकची चावी पाहिजे असेल तर किचनमधली राहिलेली भांडी घासून घे.” सायली मागे न बघताच बोलली.

आता मात्र रावीच तोंड उघडचं पडलं. तिला थेट तिच्या आईचे शब्द आठवले. ‘मामीला मामा यायच्या आधीच ते यायची जाणीव व्हायची.’
“तुला कस समजल की मी आली आहे ते?” रावी सायलीच्या मागे जाऊन उभी राहिली.

“तू ज्या परफ्युममध्ये अंघोळ करून आली आहेस ना तो मीच तुला दिला आहे.” सायली तिचा हलकासा मेकअप करत बोलली.

इकडे रावीने तिची जीभ चावली. “पण मग मामा पण अश्याच परफ्युमने अंघोळ करायचे का? म्हणजे ते यायचे ते पण तुला आधीच समजायचं अस मला माझ्या आईकडून समजलं.”

रावीच्या या प्रश्नावर सायलीला हसूच आले. “ते मनाचा खेळ असतो. ज्याच्याशी जुळतो त्याच जवळ येण मनाला आधीच समजून जात.”

“अय्या किती रोमांटिक ना,” रावी उत्साहात येत बोलली. “काश मेरे को भी ऐसा प्यार करनेवाला मी जाये.” तिने सायलीला मागून मिठी मारली.

“कितीही लाडात आलीस तरी तुला तुझ्या बाईकची चावी किचनमधलं आवराल्यावरच मिळेल.” सायली रावीच्या मिठीतून बाहेर येत बोलली.

“अशी काय करतेस गं?” रावी अजून लाडात आली. “किचन आणि माझा संबंध लांब लांब पर्यंत नाहीये. माहिती आहे ना तुला?”

“मग तुला तुझ प्रेम कस मिळेल?” सायली “मी तर आधी माझ्या हाताच्या चवीने त्यांना माझ्या प्रेमात पाडलं होत.”

“हो तुझा तो फोटो आराध्या मावशीने अजून जपून ठेवला आहे.” रावी तिचे हात स्वतःच्या तोंडावर ठेवून तिचं हसू लपवण्याचा प्रयत्न करू लागली. “केसात कोथंबीर, कांद्याची साल, गालाला बटरचे ठसे आणी डोळ्यात भरलेलं पाणी.”

हे ऐकून सायलीने रावीला रोखून पाहिलं. “हे सगळ तू कधी आणि कोणाकडून ऐकलस गं?”

“मी का सांगू?” रावी तोऱ्यात बोलली. “मला तर हे पण माहिती आहे की तू तुमच्या लग्नाआधी आराध्या मावशीला पहाटे कशी उठवायची ते.” आता मात्र ती जोरजोरात हसू लागली.

“आरु तुझ्या तर आता.” सायलीने आराध्याच्या नावाने खडे फोडले.

सायलीला बघून रावीच हसू अजूनच उसळून बाहेर आल. रावी तिचं हसण थांबवतच नाही ते बघून सायलीने तिचा मोबाईल उचलला आणि त्यावर तिची बोट फिरवली. रावी तिचं हसू आवरत घेत होती. मग तिने सायलीकडे पाहिलं तर सायलीच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होत. ज्यातून रावीला नकारात्मक गोष्ट जाणवू लागली. ती सायलीकडे बघत असताना सायलीने तिला तिच्या बाईकची चावी दिली.

“घे आता तुला गरज लागेल.” सायलीने तोऱ्यात तिला बाईकची चावी दिली आणि सरळ तिच्या खोलीतून बाहेर पडली.

रावी पण तिच्या मागे मागे आली. “मामी काय केल आता तू?” रावी केविलवाण्या आवाजात विचारू लागली.

“जास्त काही नाही,” सायली तिच्या कामाची बॅग भरत बोलली. “तुझ्या प्रोजेक्ट साठी तू मला कस ब्लॅकमेल केलस ते तुझ्या दीला पाठवून दिल. आता ती तूमच्या कॉलेजकडे निघून गेली असल्याने ती तिथेच तुझी मनापासून वाट बघेल.”

तस रावीच तोंड परत उघडं पडलं. यावर सायलीने तिच्याकडे एक सुंदर स्माईल फेकली आणि सरळ घराबाहेर निघून गेली.

हा बाहेरचा गोंधळ ऐकून खोलीत गेलेला सुजय परत हॉलमध्ये आला.

“दादू मोठा गेम झाला यार.” रावी तिचे ओठ बाहेर काढून सुजयला बोलली. “आता दी काही मला सोडत नसते.”

“मग असे कांड करायचेच नाहीत ना.” सुजय तिला दिलासा देत बोलला.

“चल ना माझ्यासोबत.” रावी सुजयला लाडीगोडी लावून बघत होती. जी सपशेल आपटली होती. कारण सुजयने देखील तिला स्मित देत त्याची खोली गाठली होती.

मग काय? रावीने बाईकची चावी घेतली आणि वाघिणीच्या गुहेत जायला निघाली. ‘देवा आज मला वाचव रे. मी तुला एकशे एकवीस मोदकांचा नैवद्य दाखवेल.’ मनातच बाप्पाची मनधरणी करत ती तिच्या कॉलेजकडे निघून गेली.

तर दुसरीकडे परी तिचे कॉलेजमधले लेक्चर घेत होती. त्यामुळे आतातरी तिचं तिच्या मोबाईलकडे लक्ष नव्हत. तोपर्यंत रावी तिच्या वर्गात जाऊन बसली होती. तिच्यासोबत रेस लावणारे तिच्या वर्गातले मुल आज काही तिला तिच्या वर्गात दिसले नाहीत. मग ती गोंधळात पडली.

‘एवढं मारल काय त्यांना दादांनी?’ रावी मनातच विचार करत बोलली. ती मागे वळून मागच्या बेंचकडे बघत होती. ‘हॉस्पिटलमध्ये ॲडमीट झाले की काय ते?’

“कॉलेजमधून रेस्टीगेट केल त्यांना.” मनाली तिची वर्गातली मैत्रीण रावीचा चेहरा बघून बोलली.

“नक्कीच आजोबांचं काम आहे ते,” रावी उसासा टाकत बोलली. “आरुष दादाने त्याच्या आजोबांना सांगितलं असेल.”

“आता त्याचे आजोबा कोण आहेत?” मनाली गोंधळून विचारू लागली.

“ते मोहिते साहेब नाही का?” रावी “तेच त्याचे आजोबा आहेत.”

“काय?” मनालीला आश्चर्यचं वाटल. “तुझा दादा त्यांचा नातू आहे? तरीच त्या मुलांना लगेच काढून टाकल ते. म्हणजे तुझ्यापासून आम्हाला जपूनचं रहाव लागेल वाटत.” ती रावीची मक्सरी करत बोलली.

“काहीही काय गं?” रावीने तिचा एक हात मनालीच्या हातात गुंफवला. “तू तो जान हे मेरी.”

“नौटंकी.” मनाली हसतच बोलली.

मग त्यांचे कॉलेजचे तास सुरु झाले. मग त्या दोघीही मन लावून समजून घेऊ लागल्या. काही वेळाने त्यांच्या वर्गावर परी तिचा तास घ्यायला आली. तिला आलेलं बघून रावी लगेच खाली वाकून तिच्या पुढे बसलेल्या मुलीच्या आडोश्याला लपली. पण परीने मात्र मनालीला पाहिलं आणि मनालीने नजरेनेच बाजूला इशारा केला. परीने ते पाहिलं आणि लेक्चर घ्यायला सुरवात केली. रावीला वाटलं की परी आता काही तिला रागावणार नाही. म्हणून ती निवांत होऊन तिचं लेक्चर ऐकायला लागली.

लेक्चर संपताना मात्र परीने तिने दिलेल्या प्रोजेक्टबद्दल वर्गातल्या मुलांना माहिती विचारयला सुरवात केली. तिच्या नंतर जे शिक्षक लेक्चर घेणार होते. ते आज काही आले नव्हते. त्यामुळे तिने तिचं लेक्चर चालूच ठेवलं.

परीचे प्रश्न ऐकून रावीने आता मात्र डोक्यालाच हात लावला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all