आता पूढे.
मग त्या दोघीही मन लावून समजून घेऊ लागल्या. काही वेळाने त्यांच्या वर्गावर परी त्यांचा तास घ्यायला आली. तिला आलेल बघून रावी लगेच खाल्ली वाकून तिच्या पुढे बसलेल्या मुलीच्या आडोश्याला लपली. पण परीने मात्र मनालीला पाहिलं आणि मनालीने नजरेनेच बाजूला इशारा केला. परीने ते पाहिलं आणि लेक्चर घ्यायला सुरवात केली. रावीला वाटल की परी आता काही तिला रागावणार नाही. म्हणून ती निवांत होऊन तिचं लेक्चर ऐकायला लागली.
लेक्चर संपताना मात्र परीने तिने दिलेल्या प्रोजेक्टबद्दल वर्गातल्या मुलांना माहिती विचारयला सुरवात केली. तिच्या नंतर जे शिक्षक लेक्चर घेणार होते. ते आज काही आले नव्हते. त्यामुळे तिने तिचं लेक्चर चालूच ठेवलं.
परीचे प्रश्न ऐकून मात्र रावीने डोक्यालाच हात लावला.
आता पूढे.
कारण तिचा प्रोजेक्ट तिच्या घरी राहीला होता आणि तिने तो स्वतः बनवला नसल्याने तिला त्यात काय लिहील होत? तेच माहित नव्हत.
‘आज काही खरं नाही तुझ.” रावी उसासा टाकत मनातच बोलली. ‘आधी वाटल होत की स्वतःची दी शिक्षक असेल तर जरा सूट मिळेल. पण ही तर दुष्मनच होते. आता तुझ्या इज्जतीचा भाजीपाला फिक्स.’ ती तिच्याच विचारात होती की परीने तिचं नाव पुकारलं.
तशी रावी खडबडून उभी राहिली आणि ज्याची कल्पना रावीने केली होती तेच झाल. तिला परीच्या एकही प्रश्नाच उत्तर देता आल नव्हत. मग रावी तिची मान खाली घालून उभी राहिली.
“तू तुझ्या प्रोजेक्टचा विषय बदलायचा.” परीने तिचा निर्णय सुनावला आणि पुढच्या मुलीकडे विचारयला लागली.
इकडे रावी तिचं तोंड पाडून खाली बसली.
“नक्की तुझीच बहिण आहे ना?” रावीच्या पुढे बसणारी एक मुलगी रावीला चिडवत बोलली. “सख्खी असती तर अशी वागलीच नसती.”
त्या मुलीच्या ह्या वाक्यावर मनालीने दीर्घ उसासा सोडत डोक्यालाच हात लावला आणि दुसऱ्याच क्षणाला ती समोर बसलेली मुलगी जीवाच्या आकांताने ओरडली. रावीने त्या मुलीच केस मागून इतके जोरात ओढून घेतले होते की एक दोन केस तर तुटून रावीच्या हातावर पडले होते. त्या मुलीचे केस मागे ओढून रावीने तिची मान मागच्या बाजूने वाकवली होती. त्यामुळे त्या मुलीच्या गळ्यावर पण खूप ताण पडला होता.
त्या मुलीच्या ह्या वाक्यावर मनालीने दीर्घ उसासा सोडत डोक्यालाच हात लावला आणि दुसऱ्याच क्षणाला ती समोर बसलेली मुलगी जीवाच्या आकांताने ओरडली. रावीने त्या मुलीच केस मागून इतके जोरात ओढून घेतले होते की एक दोन केस तर तुटून रावीच्या हातावर पडले होते. त्या मुलीचे केस मागे ओढून रावीने तिची मान मागच्या बाजूने वाकवली होती. त्यामुळे त्या मुलीच्या गळ्यावर पण खूप ताण पडला होता.
पूर्ण वर्गाच लक्ष ह्या दोघींकडे गेल. रावी रागाने लाल झाली होती तर ती मुलगी रडून लाल झाली. ते बघून परी धावतच ह्या दोघींजवळ आली.
“रावी सोड तिला.” परी रागातच रावीवर ओरडली.
रावीने परीवर एक नजर टाकली आणि तिची बॅग उचलून सरळ वर्गाच्या बाहेर पडली. परीने देखील तिला काही अडवलं नाही. कारण इतक्या रागात असणारी रावी आता कोणाचच ऐकून घेणारी नव्हती.
“काय झाल?” परीने मनालीला विचारलं.
मग मनालीने त्या मुलीच वाक्य परीला सांगून दिल. तसा परीने डोक्यालाच हात लावला.
“आमच नात मी वर्गात आणते का?” परी रागाने त्या मुलीला विचारू लागली. “मग आमच्या नात्यावर तू का कमेंट केली?”
“मी तर सहज..” ती मुलगी अजूनही तिची केस आणि गळा धरून होती.
“ही अशी मस्करी?” परी जरा चिडून बोलली. “मस्करीला पण मर्यादा असते. तिने तिची मर्यादा कधी ओलांडली का?”
तस त्या मुलीने नकारात मान हलवली.
“जास्त त्रास होत असेल तर तू घरी जाऊ शकतेस.” परीने आता त्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.
तशी ती मुलगी लगेच उठणार होती. पण तिला आठवलं की रावी तर बाहेरच गेली होती. परत तिच्या तावडीत जाण्यापेक्षा तिने वर्गातच बसण सोयीस्कर समजल. मग परीने बाकी मुलांना प्रश्न विचारले आणि कसातरी तो तास संपवला.
परी वर्गातून निघून थेट त्या कॉलेजच्या कॅन्टीनला गेली. रावी तिथेच भेटणार याची तिला खात्रीच होती आणि ती परीला तिथेच दिसली. एका खुर्चीवर ती बसलेली होती. तिच्या समोरच्या टेबलावर चहाचे पाच ते सहा कप होते. ते बघुन परी हैराण झाली.
“तिला गरम गरम उकळलेला चहा दिला होता,” त्या कॅन्टीनचा मॅनेजर परीजवळ येत बोलला. “तरी तिने तो पाण्यासारखा पिला आणि वरून बोलते की चहा गरम का नाही देत म्हणून.”
परी तिच्याजवळ जाऊन बसली. तिने रावीकडे पाहिलं तर तिचे डोळे भरलेले होते. तिचे ओठ देखील त्या गरम चहाने सुजून आले होते.
“बावळट आहे का गं तू?” परी रावीच्या ओठांना बघून बोलली. “अस कोणाकोणाच तोंड बंद करणार आहेस?”
“जो जो बोलेल ना त्या प्रत्येकाच.” रावी चिडून बोलली.
“त्याने खरी परिस्थिती बदलणार आहे का?” परी तिला समजावत बोलली.
“ती मला चिडवून बोलली.” रावी “सरळ पण बोलता आल असत तिला.”
“बरं बाई तुझचं खरं.” परीने लगेच नमत घेतलं.
“मला भूक लागली आहे.” रावी गाल फुगवूनच बोलली.
तशी परी हसली आणि त्या मॅनेजरला इशारा केला. जशी तिची ऑर्डर टेबलावर आली तशी परी तिच्या पुढच्या लेक्चरसाठी निघून गेली.
तिला गेलेलं बघून रावीने समोर आलेल्या पाव भाजीवर चांगलाच ताव मारला. तोपर्यंत मनाली पण इथे येऊन पोहोचली. मनालीला आलेलं बघून रावीने तिच्यासाठी देखील पावभाजी ऑर्डर केली. त्या दोघी पाव भाजी खाण्यात मग्न झाल्या.
तिला गेलेलं बघून रावीने समोर आलेल्या पाव भाजीवर चांगलाच ताव मारला. तोपर्यंत मनाली पण इथे येऊन पोहोचली. मनालीला आलेलं बघून रावीने तिच्यासाठी देखील पावभाजी ऑर्डर केली. त्या दोघी पाव भाजी खाण्यात मग्न झाल्या.
इकडे पुढच लेक्चर घेण्यासाठी जात असलेल्या परीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. तिने तो विचार करतच उचलला.
“हेलो अवनी.” ...
“हा बोलतेय,” परी गोंधळून बोलली. “तुम्ही कोण?”
“मी केदार.” केदार जरा कण्हत बोलला.
“आता अजून काय ऐकवायच बाकी आहे?” परी आता चिडून बोलली.
“अम्म ते सॉरी बोलायचं होत.” केदार दम टाकत बोलला.
“अम्म ते सॉरी बोलायचं होत.” केदार दम टाकत बोलला.
आता मात्र परीला जरा वेगळच वाटायला लागल. त्याचा क्षीण आवाज ऐकून तिला काळजी वाटायला लागली. पण तो तिला इतक काही बोलून गेला होता की तिने त्याला अजून काही विचारलं गरजेच समजल नाही. पण त्याच अस अचानक माफी मागण तिला पचनीच पडत नव्हत.
“हेलो.” परीचा काहीच आवाज येत नव्हता म्हणून केदारने परत आवाज दिला.
“हो, ठीक आहे.” परी वैतागून बोलली. “पुन्हा कोणाला काही बोलताना भान ठेवत जा.”
एवढं बोलून तिने तिचा फोन ठेवून दिला. मग ती तिच्या पुढच्या तासाचे पुस्तक घेण्यसाठी शिक्षकांच्या खोलीत गेली. तिथे काही शिक्षक त्यांच्या तासांचे नियोजन करत होते. तर काही त्यांच्या तासांची वाट बघत होते. तिथेच परीच्या ओळखीची एक शिक्षिका मोबाईल घेऊन त्यावर काहीतरी बघत बसली होती. परीला आलेलं बघून तिने परीला स्मित हास्य दिल. परीनेही तिला तशीच प्रतिक्रिया दिली.
परी तिची पुस्तक काढतच होती की त्या शिक्षिकेला खूपच हसायला आल होत. परीने तिच्याकडे बघितलं तर तिने परीला तिच्या बाजूला बसवलं आणि बोलू लागली.
“बघ ना कशी मुल असतात,” शिक्षिका “एका मुलीच्या मागे मागे जाताना थेट पोलिसांच्या गाडीला धडकला.”
तस परीला पण हसायला आल. ती देखील त्या मोबाईलमध्ये बघू लागली. ती बातमी वाचताना त्यात केदार हे नाव तिच्या वाचनात आल आणि तिच्या डोक्यात प्रकाश पडला. केदारच्या माफी मागायचं कारण तिला आता समजलं होत. तिने मनातच एक सुस्कारा सोडला.
‘काय करू मी तुमच?; परी टेन्शनमध्ये येत बोलली. ‘जे नको बोलते तेच तुम्हाला करायला काय मजा येते काय माहित?’
तर तिकडे हॉस्पिटलमध्ये आरुष आणि माला केदारला घेरून बसले होते. तसे केदारचे ही वडील तिथे होते पण ते डॉक्टरांनी सांगितलेले औषधं आणायला गेले होते. तिचं संधी साधून ह्या दोघांनी त्याला परीला फोन लावायला सांगितला होता. वरून परीला काही सांगितलं किंवा अजून काही त्रास द्यायचा नाही असाही त्याला दम दिला. मग ते दोघेही परत त्यांच्या ॲकेडमीमध्ये निघून गेले.
आता पर्यंत हसत असणारी परी अचानक शांत का झाली? ते मात्र त्या शिक्षिकेला समजलं नाही. परीने तिला कसतरी हसून दाखवत तिथून पुस्तक आणि तिच्या नोट्स घेत बाहे पडली. ती तिच्या पुढच्या तासाकडे चालली असताना त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी तिला त्यांच्या केबिनकडे बोलावून घेतले.
आता लेक्चरलाही देखील वेळ होत चालली होती आणि सरांनी पण बोलावलं होत. शेवटी सुस्कारा सोडत ती प्रिन्सिपल सरांच्या केबिनला गेली.
“मिस अवनी,” प्रिन्सिपल सर जरा कडक आवाजात बोलले.
‘आता काय झाल यांना?’ परी मनातच टेन्शनमध्ये येत बोलली. ‘सगळे लेक्चर तर वेळेवर पूर्ण केले. आत अजून काय पाहिजे यांना?’
“तुमचे बाहेरचे लेक्चर जास्त वाढले आहेत अस नाही का वाटत तुम्हाला?” प्रिन्सिपल सर जरा गंभीर झाले.
“अस काही नाही सर.” परी जरा चाचरतच बोलली. “इथले लेक्चर पूर्ण करूनच मी बाकीचे घेत असते.”
“अहो मॅडम इतक काय टेन्शन घेत आहात?” आता ते जरा हसून बोलले. “तुम्हाला अजून एका ठिकाणी बोलावलं आहे. त्याच लेटर आपल्या कॉलेजला आलेलं आहे. तेच सांगायला तुम्हाला इथे बोलावलं आहे.”
तसा परीच्या जीवात जीव आला.
“आम्ही आमच्या संचालक मंडळाला तुमची शिफारस करणार आहोत.” प्रिन्सिपल सर हलकेच हसत बोलले. “तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये कायस्वरूपी जॉईन करायला. एवढ्या चांगल्या शिक्षिका आम्हाला आमाच्या हातातून जाऊ द्यायच्या नाहीयेत.”
आता मात्र परीचे डोळे भरून आले. हे कॉलेज महारष्ट्रामधलं सर्वात मोठ आणि नामवंत कॉलेज होत. इथे जॉब करायाच स्वप्न प्रत्येक शिक्षकाच होत. एवढंच काय? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तर हे नंदनवन होत आणि ती ह्या कॉलेजला जवळ जवळ तीन वर्ष पार्ट टाईम काम करत होती. आता तिथेच पूर्ण वेळ शिक्षिका म्हणून तिला काम करायची संधी मिळणार होती.
मोहिते साहेबांनी तर स्वतः त्या कॉलेजमध्ये त्यांचा शब्द टाकायची तयारी दाखवली होती. पण त्या वेळेस परीने त्यांना नम्रपणे नकार दिला होता. तिला तिच्या स्वतःच्या हिमतीवर इथे जॉब मिळवायचा होता आणि तो आता तिला मिळणार होता.
प्रिन्सिपल सरांनी त्यांना आलेलं परीच्या नावच लेटर तिला दिल. ते घेऊन ती केबिनच्या बाहेर पडली. ती आनंदातच तिच्या पुढच्या तासिकेसाठी निघून गेली.
इकडे रावी आणि मनालीने यथेच्छ पाव भाजीवर ताव मारला होता. पोट भरून खाल्यानंतर त्या दोघी दहा मिनिट तिथेच बसून राहिल्या. काही वेळ बसून झाल्यावर त्या दोघी उठणार तोच तिचं मुलगी रावी समोर येऊन उभी राहिली. जिचे तिने केस ओढून धरले होते.
“अम्म सॉरी ते मी जरा जास्तच बोलून गेली.” ती मुलगी तोंड पडून बोलली.
“ठीक आहे.” रावीने पण जास्त काही ते ताणल नाही आणि हलकेच हसत तिच्याशी हातमिळवणी केली.
रावीच आता परत काही लेक्चर करायची इच्छा राहिली नाही. तिने मनालीला लेक्चरला जाऊ दिल आणि ती घरी जायला निघाली. पण दुसऱ्याच क्षणाला ती थांबली. कारण एवढ्या लवकर घरी गेली तर तिची आई तिला परत लेक्चर देत बसणार होती. विजयच्या घरी जाव तर तिथे आता कोणीही नसणार होत. आता कुठे जाव? हा प्रश्न तिला पडला.
ती स्वतःच्या विचारात असताना तिच्या मोबाईलवर एक फोन आला. तिने तो पहिला तर तिला खूपच आनंद झाला. त्याच आनंदात तिने तो फोन उचलला.
“हाय मेरी जान.” ...
“हाय काय? आज आठवण आली माझी?” रावी गाल फुगवून बोलली.
“आता अभ्यासचं तितका होता त्याला मी तरी काय करु?” समोरून आवाज आला.
“आता अभ्यासचं तितका होता त्याला मी तरी काय करु?” समोरून आवाज आला.
यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
“मी घरी आलो आहे.” समोरून आवाज आला.
तशी रावीची कळी खुलली. “खरचं?”
“बघ तुझी इच्छा असेल तर भेटूया.” समोरून आवाज आला.
“आलीच मी.” रावी उत्साहात येत बोलली. फोन पटकन ठेवून दिला आणि घरी जायला निघाली.
इकडे तो थेट रवीच्या घरी जाऊन पोहोचला.
“अरे राकेश तू कधी आलास?” रुद्रची आई आनंदाने विचारू लागली.
तर हा राकेश, त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या कदम यांचा मुलगा. शिक्षणासाठी गेले तीन वर्ष तो परदेशी होता आणि आज अचानक तो इथे उगवला होता.
तर हा राकेश, त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या कदम यांचा मुलगा. शिक्षणासाठी गेले तीन वर्ष तो परदेशी होता आणि आज अचानक तो इथे उगवला होता.
“आज पहाटेच आलो होतो.” राकेश हलकेच हसत बोलला.
“आता परत जाणार की इथेच रहाणार?” रुद्रची आई
“आता इथेच आहे, तिथल झाल पूर्ण.” राकेश त्यांच घर बघत बोलला. “इथल्याच एका कंपनीत जॉब लागला आहे. परवा पासून तिथे जॉईनींग आहे.’
“बरं झाल आलास ते,” रुद्रची आई “तुझ्या आई बाबांची काळजी मिटली बघ. खूप आठवण काढत असतात तुझी.”
“तेच ना, इथली आठवण मला इथे परत घेऊन आली आहे.” राकेशच्या चेहऱ्यावर चमक आली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा