मागील भागात.
"अरे राकेश तू कधी आलास?” रुद्रची आई आनंदाने विचारू लागली.
तर हा राकेश, त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या कदम यांचा मुलगा. शिक्षणासाठी गेले तीन वर्ष तो परदेशी होता आणि आज अचानक तो इथे उगवला होता.
तर हा राकेश, त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या कदम यांचा मुलगा. शिक्षणासाठी गेले तीन वर्ष तो परदेशी होता आणि आज अचानक तो इथे उगवला होता.
“आज पहाटेच आलो होतो.” राकेश हलकेच हसत बोलला.
“आता परत जाणार की इथेच रहाणार?” रुद्रची आई
“आता इथेच आहे, तिथल झाल पूर्ण.” राकेश त्यांच घर बघत बोलला. “इथल्याच एका कंपनीत जॉब लागला आहे. परवा पासून तिथे जोईनीग आहे.’
“बरं झाल आलास ते,” रुद्रची आई “तुझ्या आई बाबांची काळजी मिटली बघ. खूप आठवण काढत असतात तुझी.”
“तेच ना, इथली आठवण मला इथे परत घेऊन आली आहे.” राकेशच्या चेहऱ्यावर चमक आली.
आता पूढे.
त्याच्या चेहऱ्यावरची ती चमक रूद्रच्या आईच्या नजरेतून सूटली नाही.
ह्या दोघांच्या गप्पा होईपर्यंत रावी तिथे जाऊन पोहोचली देखील होती. ती त्याला तीन वर्षांनंतर बघत होती. असं नव्हत की ते फोनवर बोलत नव्हते. पण प्रत्यक्ष भेटायची ओढ काही वेगळीच असते ना? म्हणून आल्या आल्या पहिले त्याला तिच्या डोळ्यात साठवून घेऊ लागली. राकेशला मात्र जरा विचित्र वाटायला लागल होत. कारण तिची आजी आता समोर बसली होती.
ह्या दोघांच्या गप्पा होईपर्यंत रावी तिथे जाऊन पोहोचली देखील होती. ती त्याला तीन वर्षांनंतर बघत होती. असं नव्हत की ते फोनवर बोलत नव्हते. पण प्रत्यक्ष भेटायची ओढ काही वेगळीच असते ना? म्हणून आल्या आल्या पहिले त्याला तिच्या डोळ्यात साठवून घेऊ लागली. राकेशला मात्र जरा विचित्र वाटायला लागल होत. कारण तिची आजी आता समोर बसली होती.
“बरं झाल तू आलीस,” रुद्रची आई “जा तर त्याच्यासाठी चहा ठेव.”
“तिला येतो का?” राकेश चिडवण्याच्या सुरात बोलला.
तसे रावीचे गाल लगेच फुगले. “आला असेल घरून ढोसून. परत कशाला द्यायचा?”
“ही अजून सुधारलीच नाही वाटत.” राकेश हसत बोलला.
यावर रुद्रची आई पण हसू लागली. रावी मात्र चहा ठेवायला किचनमध्ये गेली. आता राकेशला देखील किचनमध्ये जावस वाटत होत. पण रुद्रची आई समोर असल्याने त्याने स्वतःला आवरून घेतलं.
यथावकाश त्यांचा चहा पण झाला. राकेशने त्या चहाची तारीफ पण केली. ते ऐकून रावीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. काही वेळ त्यांच्या गप्पा सुरु राहिल्या. नंतर रावीने तिच्या आज्जीला जेवण वाढून दिले आणि तिचं जेवण झाल्यावर स्वतःसाठी आणि राकेशसाठी जेवण वाढून घेतलं. राकेशला वाटल की आता रुद्रच्या आईच जेवण झाल की त्या खोलीत जातील. पण त्या काही तिथून हलायचं नाव घेत नव्हत्या. मग त्याच मन जरा नाराज झाल.
यथावकाश त्यांचा चहा पण झाला. राकेशने त्या चहाची तारीफ पण केली. ते ऐकून रावीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. काही वेळ त्यांच्या गप्पा सुरु राहिल्या. नंतर रावीने तिच्या आज्जीला जेवण वाढून दिले आणि तिचं जेवण झाल्यावर स्वतःसाठी आणि राकेशसाठी जेवण वाढून घेतलं. राकेशला वाटल की आता रुद्रच्या आईच जेवण झाल की त्या खोलीत जातील. पण त्या काही तिथून हलायचं नाव घेत नव्हत्या. मग त्याच मन जरा नाराज झाल.
राकेशच्या मनातल्या गोष्टी सोनाली आणि रुद्रपासून काही लपून राहिल्या नव्हत्या. म्हणून रावीच्या नकळतच तिच्यापासून राकेशला लांब ठेवलं होत. कारण तिच्या डोळ्यावर राकेशच्या चांगुलपणाची पट्टी बांधली गेली होती. सोनाली आणि रुद्रला समजेपर्यंत उशीर झाला होता. म्हणूनच रुद्रची आई तिथून हलायालाही मागत नव्हती.
रावीला आता तिच्या आज्जीला सोडून बाहेरदेखील जाता येत नव्हते. म्हणून आजची त्या दोघांची भेट तेवढ्यापुरताच मर्यादित राहिली. मग राकेश जरा नाराजीतच त्याच्या घरी निघून गेला. त्याला नाराज झालेलं बघून रावीच मन पण उदास झाल. ती देखील तिच्या खोलीकडे निघून गेली.
रुद्रच्या आईने लगेचच सोनालीला फोन लावून राकेश आल्याची बातमी तिला दिली. तशी ती पण तिकडे टेन्शनमध्ये आली. अस रावीला किती दिवस थांबवू शकणार होते? कधी ना कधी ती राकेशचा विषय घरात काढणार तर होतीच. एक मात्र नक्की होत की परीच्या लग्नाशिवाय ती तिचं लग्न करणार नव्हती. पण तिचं मन त्याच्यात गुंतत तर चालल होत ना. त्याचीच काळजी आता वाटायला लागली.
मग आता काय कराव? हा प्रश्न सोनालीला पडला. त्याच विचारात असताना तिला परी आठवली. रावी सर्वात पहिले परीजवळ नक्कीच हा विषय काढणार याची तिला खात्री होती. म्हणून तिने लगेचच परीला फोन लावायला घेतला.
“हाय मामी.” परी हलकसं हसत बोलली. “आज कशी आठवण आली गरीबाची?”
“ऐक ना,” सोनाली गंभीर आवाजात बोलली. “तुझ्याकडे जरा काम होत. भेटतेस का?”
पहिले तर आज चक्क काहीच मस्करी न करता सोनाली बोलली याच परीला आश्चर्यचं वाटल. तिचा तो गंभीर आवाज ऐकून तिला काहीतरी बिनसलं असल्याच जाणवलं.
“काय झाल मामी?” परी पण टेन्शनमध्ये येत बोलली. “रावीने परत काही केल का?”
“अजून तरी नाही,” सोनाली “पण कदाचीत करणार आहे.”
“काय करणार आहे?” परी
मग सोनालीने राकेशबद्दल तिला सांगून दाखवलं. “तिच्याशी जरा बोलून बघ ना.”
इकडे परी विचारात पडली. “अम्म मामी, पण तिने मला अजून त्याच्याविषयी मला काहीच सांगितलं नाहीये. आता अस अचानक मी जर तिला काही विचारलं तर ती तुम्हाला चुकीच समजेल किंवा मग तिच्या आज्जीला.”
“ते पण बरोबर आहे गं तुझ,” सोनाली “पण टेन्शन तर येतच ना. मला माहिती आहे की ती आमच्याकडे येण्याआधी तुझ्याकडे येईल. म्हणून तुझ्याशी बोलून बघावं म्हटलं.”
“नका काळजी करू मामी,” परी तिला आश्वस्त करत बोलली. “जर माझ्याकडे आलीच तर मी तिला समजावण्याचा प्रयत्न करेन.”
“प्रयत्न नकोय परी,” सोनालीचा आवाज भरून आला. “मुळात तो मुलगाच बरोबर नाहीये. पाच वर्षाचा कोर्स सोडून तो इकडे आला आहे. एवढा चांगला कोर्स आणि संधी अशी कोणी सोडून येत का बर?”
“ठीक आहे.” परी “पहिले तिला बोलू द्या. मग करूया काहीतरी.”
सोनालीने ठीक आहे बोलून फोन तर ठेवून दिला. पण आपल्या लेकीचा विचार तिला आता अस्वस्थ करत होता. आजवर तिने जे सांगितल तर तिला सहज मिळत गेल होत. नाही हा शब्दच तिने तिच्या डोक्यातून काढून टाकला होता. आता ह्यातून कस बाहेर पडावं? हा एकच प्रश्न तिच्यासमोर उभा होता. कारण जोर जबरदस्ती करून काहीच फायदा नव्हता. त्यामुळे तिची मुलगी तिच्यापासून दुरावली जाण्याची भीती होती.
इकडे रावीने खोलीत गेल्यावर परत राकेशला फोन लावला. अपेक्षेप्रमाणे त्याने काही पहिला फोन उचलला नाही. शेवटी तिसरा फोन केल्यावर त्याने तो उचलला होता.
“असा काय करतोस रे?” रावी गाल फुगवून बोलली.
“एवढ्या वर्षांनी भेटलो म्हटलं जरा एकमेकांसोबत वेळ घालावूया,” राकेश जरा चिडून बोलला. “तर तुझी आज्जी मधेच येऊन बसली.”
“ती कुठे मधेच आली?” रावी “ती तर आधीच बसलेली होती. नंतर तर मी आली.”
“अगं हो,” राकेश “पण मग तुला तुझ्या आज्जीला सांगता नाही आल की जाऊन खोलीत आराम कर.”
“तुझ्या डोक्यात फरक पडला आहे का?” आता रावी चांगलीच चिडून बोलली. “आज्जी आहे ती माझी. मी तिच्या घरात राहते. तिने कुठे बसावं आणि कुठे जावं हे तिचं ती ठरवते.”
“अगं हो,” राकेश लगेच नरमाईने बोलला. कारण तो पण तिच्या रागाला चांगलच ओळखून होता. “पण मग माझा पण विचार कर ना.”
“भेटते तुला संध्याकाळी टेरेसवर.” रावीने चिडून फोन ठेवून दिला.
राकेशने ही एक उसासा टाकत फोन ठेवला.
“भेटते तुला संध्याकाळी टेरेसवर.” रावीने चिडून फोन ठेवून दिला.
राकेशने ही एक उसासा टाकत फोन ठेवला.
परी पण तिचे लेक्चर आटपून घरी निघाली होती. एकवेळ तिला वाटलं की सरळ रावीला फोन लावावा. पण तिने स्वतःला आवरलं आणि घरी निघून गेली.
संध्याकाळी रावी तिच्या आज्जीला चहा देऊन टेरेसवर निघून गेली. राकेश तर आधीच तिथे तिची वाट बघत होता. संध्याकाळच्या वेळेस त्या बिल्डींगच्या टेरेसवर कोणीही जात आणि येत नव्हत.
रावीला आलेलं बघून राकेशने तिला एका कोपऱ्यात खेचून घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या अश्या अनपेक्षित वागण्याने रावी पहिले तर गोंधळूनच गेली. पण नंतर स्वतःला सावरत त्याच्या भोवती तिच्या हातांचा विळखा घालत त्याची मिठी अजूनच घट्ट केली. थोडा वेळ तसाच गेला तरी राकेश तिला काही सोडायला मागत नव्हता. शेवटी रावीच्या छातीवर बराच दाब पडल्याने तिचा दम गूदमरू लागला. मग तिने राकेशला मागे लोटत त्याच्या मिठीतून बाहेर यायचा प्रयत्न करू लागली. ती ऐकताच नाही म्हटल्यावर तिने त्याला जरा जोरातच लोटलं.
रावीने त्याला जोरात ढकलल्याने तो मागे हेलकांडला गेला. तो मागच्या बाजूने पडणार तोच रावीने त्याच्या हाताला पकडून घेतलं. जसा तो नीट सवरून उभा राहीला तस त्याने रावीचा हात रागात झिडकारला.
“आधी ढकलून द्यायचं,” राकेश रागत बोलला. “आणि नंतर सावरायचं नाटक करायचं.”
“तस नाही रे,” रावी त्याला समजावत बोलली. “माझा श्वास कोंडायला लागला होता.”
“की तुला दुसरा कोणी भेटला?” राकेश तिच्याकडे रोखून बघू लागला.
“दुसरा कोणी भेटला असता ना तर मी माझ लेक्चर सोडून इकडे नसती आली.” रावी पण चिडून बोलली. त्याने तिच्या प्रेमावर शंका घेतली होती. म्हणून तिला त्याचा राग आला.
“दुसरा कोणी भेटला असता ना तर मी माझ लेक्चर सोडून इकडे नसती आली.” रावी पण चिडून बोलली. त्याने तिच्या प्रेमावर शंका घेतली होती. म्हणून तिला त्याचा राग आला.
“मग ढकलायची काय गरज होती?” राकेश अजुनची त्यावरच होता.
“अरे बोलली ना माझा श्वास कोंडला होता तरी तू सोडत नव्हतास.” रावी “तुला थांबवून पण पाहिलं. पण तू ऐकताच नव्हतास.”
“आता एवढ्या दिवसांनी भेटली आहेस तू मग लगेच कस मन भरेल माझ?” राकेश परत तिच्याजवळ जात बोलला. त्याने त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरवायला सुरवात केली. तो हात फिरता फिरता सरळ खाली खाली जाऊ लागला.
आता मात्र रावीला विचित्र वाटायला लागल होत. त्याचा आताचा चालू असलेला स्पर्श तिला नकोसा वाटू लागला. ह्या स्पर्शात भेट कमी आणि वासनेची इच्छा जास्त जाणावयाला लागली. जेव्हा त्याचा हात गरजेपेक्षा खाली जाऊ लागला. तस तिने त्याला थांबवलं आणि त्याला रोखून बघू लागली.
“काय चालू आहे तुझ?” रावी हलकीशी चिडून बोलली.
“काय म्हणजे?” राकेश तिला परत त्याच्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करत बोलला. “जे इतर कपल करतात तेच करतोय ना.”
“मी तुला आधीच बोलली होती की माझ्या इच्छेशिवाय तू काहीच करणार नाहीस म्हणून.” रावी त्याला तिच्यापासून लांब करत बोलली.
“कम ऑन रावी,” राकेश तिला जवळ खेचत बोलला. “आताच्या काळात हे सगळ नॉर्मल आहे.”
“कम ऑन रावी,” राकेश तिला जवळ खेचत बोलला. “आताच्या काळात हे सगळ नॉर्मल आहे.”
तशी त्याच्या एक कानाखाली बसली.
“तुझ्यासाठी नॉर्मल असेल पण माझ्यासाठी नाही,” रावी रागात बोलली. “हे असलं काही करायचं असेल ना तर माझ्यापासून लांब राहायचं आणि लग्न करणार असशील तरच घरी यायचं.” रावीने त्याच्यासमोर तिचं बोट नाचवलं आणि सरळ घरी निघून आली.
इकडे राकेश मनातच चरफडत राहीला. तीन वर्षापूर्वीची रावी आणि आताची रावी ह्यात खूप अंतर होत. ती आता कमालीची सुंदर दिसायला लागली होती. तीन वर्ष त्याने फक्त तिच्या फोटोवर समाधान मानल होत. पण जेव्हा तिला प्रत्यक्षात पाहिलं तर त्याला त्याचच भान राहील नव्हतं.
‘माझ्यापासून लांब पळतेस,” राकेश मानतच बोलू लागला. ‘बघू किती दिवस लांब राहशील? असही तुझे नखरे झेलायची हिम्मत अजून तरी कोणामध्ये नाही. मला नकार दिल्याचा बदला तर मी घेऊनच राहील.’ एवढ बोलून तो देखील त्याच्या घरी निघून गेला.
इकडे रावीला स्वतःचाच राग आला. त्याच्या मैत्रीवर विश्वास ठेवून ती त्याच्या प्रेमात पडत चालली होती. ती जरी आधुनिक विचारसरणीची असली तरी तिला स्वतःची मर्यादा चांगलीच माहिती होती.
तिच्या आज्जीला देखील रावीच काहीतरी बिनसल्याच जाणवलं. पण ती सरळ काहीच सांगणार नाही याची त्यांना खात्री होती. मग त्यांनी तिला थोडा वेळ देऊयात म्हणून स्वतःला आवर घातला.
दुसरीकडे रावीला स्वतःवरचा राग कंट्रोलच होत नव्हता. तिला सतत त्याच तिच्या शरीरावर फिरणारे हात जाणवत होते. ती तशीच बाथरूममध्ये गेली आणि अंगावरचे सगळे कपडे भिरकावून दिले. तिने बाथरूममधला शॉवर चालू केला आणि त्याखाली उभी राहिली. तिने पुन्हा घासून पुसून आंघोळ केली. जोपर्यंत तिचा अंघोळीनंतरचा सुगंध येत नाही तोपर्यंत तिने दोन ते तीन वेळा आंघोळ केली.
जेव्हा मनाला समाधान मिळाल तेव्हाच ती बाहेर आली. सध्या घरात तिची आज्जी सोडून दुसर कोणी नसल्याने ती फक्त टॉवेल गुंडाळून बसली आणि हेअर ड्रायरने तिची केस सुकवू लागली. केस सुकवता सुकवता तिने परीला फोन लावला. ह्या परिस्थितीमध्ये फक्त परीच तिचं मन समजून घेऊ शकणार होती.
परी देखील घरी पोहोचली होती. ती फ्रेश झालीच होती की रावीच नाव तिच्या मोबाईलवर झळकलं. तसा तिने तो लागलीच उचलला.
“बोला मॅडम.” परी
“बोला मॅडम.” परी
“दी.” रावी तोंड पडून बोलली.
“आता काय केलस?” परी टेन्शनमध्ये येत बोलली.
“मला तुझ्याशी बोलायचं आहे.” रावी गंभीर होत बोलली.
“मग घरीच आली असती ना.” परी
“घरी नको.” रावी जरा घाबरून बोलली. “आपण बाहेर भेटूया.”
“का गं?” परी “काही वेगळा विषय आहे का?” परी तिच्या मनाचा अंदाज घेत बोलली.
“का गं?” परी “काही वेगळा विषय आहे का?” परी तिच्या मनाचा अंदाज घेत बोलली.
“तसच आहे काहीस.” रावी
“ठीक आहे,” परी “उद्या सकाळी कॉलेजला जायच्या आधी भेटूयात.”
रावीने देखील होकार देत फोन ठेवला.
रावीने देखील होकार देत फोन ठेवला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा