मागील भागात.
परी देखील घरी पोहोचली होती. ती फ्रेश झालीच होती की रावीच नाव तिच्या मोबाईलवर झळकल. तसा तिने तो लागलीच उचलला.
“बोला मॅडम.” परी
“दी.” रावी तोंड पडून बोलली.
“आता काय केलस?” परी टेन्शनमध्ये येत बोलली.
“मला तुझ्याशी बोलायचं आहे.” रावी गंभीर होत बोलली.
“मग घरीच आली असती ना.” परी
“घरी नको.” रावी जरा घाबरून बोलली. “आपण बाहेर भेटूया.”
“का गं?” परी “काही वेगळा विषय आहे का?” परी तिच्या मनाचा अंदाज घेत बोलली.
“तसच आहे काहीस.” रावी
“ठीक आहे,” परी “उद्या सकाळी कॉलेजला जायच्या आधी भेटूयात.”
रावीने देखील होकार देत फोन ठेवला.
रावीने देखील होकार देत फोन ठेवला.
आता पूढे.
फोनवर बोलेपर्यंत तिची केस सुकली होती. मग तिने नवे कपडे अंगावर चढवले आणि सरळ किचनमध्ये गेली. सोनाली येईपर्यंत ती जेवणाची सुरवातीची तयारी करून ठेवत होती आणि सोनाली आली की सरळ तिच्या आज्जीच नाव पुढे करत होती. तिला माहिती होत जर तिला किचनमधली काम येतात अस तिच्या आईला समजलं तर तिची आई हळू हळू किचनमधली सगळीच काम तिच्याकडून करून घ्यायला लागली असती आणि रावीला किचनमधल्या कामाचा खूप कंटाळा होता.
रुद्रची आई तर त्यांच्या खोलीतच असायच्या आणि सोनाली काही त्यांना विचारायला जायची नाही. त्यांच मन रमत नसेल म्हणून थोड्याफार प्रमाणात त्या काम करत असतील अस तिला वाटून जात होत. पण ह्याची खबर रुद्रच्या आईला लांब लांब पर्यंत नव्हती.
पण आज मात्र रावीकडून एक चूक झाली. आज तिच्याकडून मिक्सरचा वापर केला गेला जो रुद्रची आई कधीच वापरत नव्हती. रावी तिच्याच विचारात ही सगळी काम करून परत तिच्या खोलीत निघून गेली.
पण आज मात्र रावीकडून एक चूक झाली. आज तिच्याकडून मिक्सरचा वापर केला गेला जो रुद्रची आई कधीच वापरत नव्हती. रावी तिच्याच विचारात ही सगळी काम करून परत तिच्या खोलीत निघून गेली.
सोनाली आज जरा उशीरच घरी आली. आजही स्वयंपाकाची तयारी बघून तिने मनातच सुस्कारा सोडला.
“ह्यांच्यासोबत बोलावचं लागेल.” सोनाली मनातच विचार करत बोलली. नंतर तिचं लक्ष मिक्सरच्या बाजूला ठेवलेल्या भांड्याकडे गेल. त्यात वाटण तयार करून ठेवलं होत. आता मात्र सोनालीच्या मनात शंकेची चुकचुकली. “आई तर कधीच मिक्सर लावत नाहीत. मग कोणी घरी आल होत का?” ती मनातच विचार करत रुद्रच्या आईच्या खोलीत गेली.
रुद्रची आई पुस्तक वाचत बसल्या होत्या. दारात सोनालीला बघून त्यांनी तिला आत यायला सांगितलं.
“आई कोणी घरी आल होत का?” सोनाली
“नाही गं.” रुद्रची आई
“मग वाटण कोणी केल आहे?” सोनाली
“रावी घरी होती.” रुद्रची आई
“तिने कधी केल आहे?” सोनालीची आई हसतच बोलली. “ती घरी असून फायदा नाही. स्वयंपाकाची हलकी फुलकी तयारी तर तुम्हीच करून ठेवता. ती जास्तच लाडात आली आहे. आता तिलाही कामाला लावलं पाहिजे.”
“मी कधी आणि कुठली तयारी केली?” रुद्रची आई विचार करत बोलल्या. “संध्याकाळी फेरफटका मारून आली की जी खोलीत येते ते थेट जेवायलाच बाहेर येते.”
आता मात्र सोनाली गोंधळून गेली. “मग स्वयंपाकाची तयारी कोण करून ठेवत?”
ते ऐकून रुद्रची आई पण टेन्शनमध्ये आली. घरात कोणी येतही नाही, रावी कधी किचनमध्ये पाय ठेवत नाही. मग ही तयारी करत तरी कोण?
“ते मी करते हे तुला कोणी सांगितलं?” रुद्रची आई
“कोणी सांगायला कशाला पाहिजे?” सोनाली “रावी तर किचनमध्ये पाय ठेवत नाही. म्हणून म्हटलं फिरून आल्या की तुम्ही करत असाल.”
“नाही गं,” रुद्रची आई “तुमचे ते आताचे सामान मला कुठे हाताळता येतात. एक तू आहेस म्हणून ठीक, नाहीतर दुसरी कोणी असती तर मी आतापर्यंत गावाला पोहोचवली गेली असती.”
“आणि ह्यांनी तुम्हाला जाऊ दिल असत ना?” सोनाली हलकीच हसत बोलली.
“ते पण आहे म्हणा.” रुद्रची आई पण मनमुराद हसल्या. “अगं रावीलाच विचार, कारण कधी कधी तिला मी किचनमध्ये जाताना पाहिलं होत.” रुद्रची आई डोळे मिचकावत बोलली.
तसे सोनालीचे डोळे विस्फारले गेले. “खरंच?”
रुद्रची आईने होकारार्थी मान हलवली.
“जरी तिने काही केल असेल तर सरळ थोडीच कबूल करेल.” सोनाली
“तुला काही अशक्य आहे का?” रुद्रची आई खट्याळ होत बोलली.
“तुला काही अशक्य आहे का?” रुद्रची आई खट्याळ होत बोलली.
तशी सोनाली अजूनच खळखळून हसली. “बघते मग काय आता.” एवढ बोलून ती किचनकडे निघून गेली.
सोनाली किचनकडे जाता जाता मुद्दाम रावीच्या खोलीसमोरून गेली. “ह्या आईना काहीही करून ठेवतात. आता सगळ वाटण खारट करून ठेवलं आहे. नुसतच काम वाढवून ठेवतात.” सोनाली जरा मोठ्याने बोलून गेली.
हे सर्व रावीने बरोबर ऐकलं आणि ती तिच्या खोलीतून उठून सरळ किचनमध्ये आली. तिच्यामुळे तिच्या आज्जीला विनाकारण भांडलेलं तिला आवडणार नव्हत. ती वाटण करून ठेवलेल्या ठिकाणी गेली आणि त्यात चमचा टाकून किंचित वाटण उचललं. ते तिने तिच्या जिभेवर ठेवलं आणि सोनालीकडे पाहिलं.
“कुठे खारट आहे गं?” रावी जरा चिडून बोलली. “सगळ काही प्रमाणात तर टाकल आहे मी...” शेवटी शेवटी ती हळू हळू बोलत शांत झाली. कारण सोनाली गालातच हसत तिच्या हाताची घडी घालून रावीची गम्मत बघत होती.
रावीला समजून चुकल होत की सोनालीने मुद्दाम मोठ्याने बडबड केली होती ते.
“काय गं ममा,” रावी लटक्या रागात बोलली. “अस कोण करत?”
“मी करते,” सोनाली तोऱ्यात बोलली. “मेरी बिल्ली और मुझसे म्याव?”
आता रावी खुदकन हसली. कारण काही झाल तरी सोनाली तिची आई होती आणि पुढे तिच्या मुलांची नौटंकी कशी चालणार होती?
“एवढी मदत जरी केलीस ना तरी खूप झाल.” सोनाली तिचे गाल ओढत बोलली. “मी काही लगेच तुला किचनच्या कामाला जुंपणार नव्हते.” सोनाली तिला समजावत बोलली. “मी पण तर घरातली काम आवरून बाहेर कामाला पण जाते की नाही? घरात थोडी मदत मिळाली तर तेवढाच ह्या छोटुश्या जीवाला आराम मिळतो.”
आता रावी खुदकन हसली. कारण काही झाल तरी सोनाली तिची आई होती आणि पुढे तिच्या मुलांची नौटंकी कशी चालणार होती?
“एवढी मदत जरी केलीस ना तरी खूप झाल.” सोनाली तिचे गाल ओढत बोलली. “मी काही लगेच तुला किचनच्या कामाला जुंपणार नव्हते.” सोनाली तिला समजावत बोलली. “मी पण तर घरातली काम आवरून बाहेर कामाला पण जाते की नाही? घरात थोडी मदत मिळाली तर तेवढाच ह्या छोटुश्या जीवाला आराम मिळतो.”
“तुझा आणि छोटुसा जीव?” रावी तिचं हसू दाबत बोलली. “तुझ्या ह्या छोट्याश्या जीवाने तुझ्या मित्रांना रात्रभर जागवलं होत ना? ते ही तू...” बोलता बोलता रावी शांत झाली.
कारण सोनाली रावीला चिडून बघू लागली. “तुला कोणी सांगितलं?” तिला एकच भीती होती की तिच्या ह्या भूतकाळाची सावली तिच्या मुलीवर पडायला नको आणि तिची तिच्या मुलीसमोर चुकीची प्रतिमा व्हायला नको.
यावर रावीने तिचे खांदे उडविले.
“आरती मावशी?” सोनाली एकेकीच नाव घेऊ लागली. “आराध्या मावशी की सायली मामी? की मामांनी सांगितलं?"
आईचा तो चिडका स्वर ऐकून रावी शांत झाली.
“थांब मीच विचारते.” सोनाली तिचा मोबाईल शोधू लागली.
“नको कोणाला त्रास देऊस,” रावीने मोबाईल शोधणाऱ्या तिच्या आईला मागून मिठी मारली. “मला बाबाच बोलला होता आणि तू माझी बेस्ट ममा राहणार आहेस. तू कधीच चुकीच करू शकत नाहीस. प्रेमात माणूस वेडा होतो आणि होतात नकळत अश्या चुका.” रावीच्या डोळ्यासमोर राकेश फिरू लागला. तिला आता तिचं प्रेम ही चूक वाटायला लागल होत.
“म्हणजे तुला बाबांनी सगळच सांगितलं?” सोनाली बारीक आवाजात बोलली.
तस रावीने डोळे मिचकावत होकारात मान हलवली. “हा पण मामा यायच्या आधी मामीला समजून जायचं ते मात्र तुझ्याकडून समजल.”
आता सोनाली एक उसासा टाकत हसली. मग दोघीही जेवण बनवायच्या तयारीला लागल्या.
इकडे परी सुजयसमोर रुक्मिणीच्या पोजमध्ये उभी होती. तर विजय आणि सायली दोघेही त्याला रोखून बघत होते. सुजय घरी आल्या आल्या परीने तिने दुपारी पाहिलेली बातमी त्याच्यासमोर ठेवली. तरीही सुजय त्याला काहीच माहित नसल्याच बोलत होता.
“आज त्याने मला माफी मागण्यासाठी फोन केला आणि काल बर त्याच्या नावाच्या अपघाताची बातमी आली?” परी
“आता पूर्ण जगात राकेश ह्या नावाचा एकच माणूस आहे का?” सुजय त्याचे खांदे उडवत बोलला.
“माझी शपथ घेऊन बोल.” परीने तिचं शेवटच अस्त्र बाहेर काढल. मग मात्र तो शांत बसला. तसे सायली आणि विजय त्याला रोखून बघू लागले.
“त्याच्या जीवाला काही बरं वाईट झाल असत तर?” परी
“हा विचार त्याने बोलण्याआधी करायला हवा होता.” सुजय आठ्या पाडून बोलला. “असही मी काहीच केल नाही. त्याचा तो पोलिसांच्या गाडीला जाऊन धडकला.”
“तू खरचं काही केल नाहीस?” सायली बारीक डोळे करून विचारू लागली.
“नाही.” सुजय आम्ही आमच आमच येत होतो तर मला तो दिसला.” सुजयने बोलायला सुरवात केली. “तर त्याला माला दिसली आणि तो तिला टक लावून बघत बसला. मग तुम्ही मालाला चांगलच ओळखता की.”
सायली आणि विजयला त्याच म्हणण पटायला लागल. कारण मालाला ते चांगलेच ओळखत होते. तिला असही चेष्टा मस्करी आज्जीबातच आवडत नव्हती. तिची मस्करी सहन करायची मर्यादा फक्त त्यांचा हा भावंडाचा ग्रुप होता. त्यापलीकडे ती मस्करीचा म देखील सहन करत नव्हती. त्यात राकेश तिला बघत राहीला ऐकून तिच्याकडून दुसरी काही अपेक्षाही करता येणार नव्हती.
पण परी मात्र अजूनही सांशक नजरेने सुजयला बघत होती.
“हवं ती तिलाच विचार.” सुजयने त्याचा मोबाईल तिच्यासमोर धरला.
“राहूदे,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “आता ती तुझीच बाजू घेईल माहिती आहे मला.”
“राहूदे,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “आता ती तुझीच बाजू घेईल माहिती आहे मला.”
“अरे,” सुजय परीला समजावण्याचा प्रयत्न करत बोलला. “आता आपल्यात काय बोलण झाल ते थोडीच तिला माहिती असणार आहे? मग ती लगेच माझी बाजू कशी घेईल?”
“मी तुम्हाला आज ओळखत आहे का?” परी “परत जर अस काही केल तर बघा मग. मी घरीच येणार नाही.” परी दाटलेल्या गळ्याने बोलली आणि तिथून निघून गेली.
परीला इतकीच काळजी होती की तिला एवढ सुंदर आयुष्य ह्या कुटुंबामुळे मिळाल होत आणि तिच्यामुळे तिच्या ह्या कुटुंबाला काहीच होऊ नये. बाकी तिला कितीही त्रास झाला तरी ती सहन करणार होती.
“कशाला काहीही उपद्व्याप करत बसता रे?” विजय
“बोललो ना माही काहीच केल नाही म्हणून.” सुजय इवलस तोंड करत बोलला.
“बोललो ना माही काहीच केल नाही म्हणून.” सुजय इवलस तोंड करत बोलला.
“आमच्यापेक्षा तुम्ही तिच्याजवळ जास्त राहीला आहात ती तुम्हाला कधीच चुकीच ओळखू शकणार नाही.” सायली पण परी गेली त्या दिशेला जात बोलली.
इकडे सुजयने विजयकडे पाहिलं. तस विजयने त्याला देखील परीकडे जायला लावलं. मग तो ही उसासा टाकत उठला आणि परीच्या खोलीकडे जाऊ लागला.
सायली परीच्या खोलीत जाऊन पोहोचली. तिने पाहिलं तर परी बेडच्या एका कोपऱ्यात तिच्या गुडघ्यांना कवटाळून बसली होती. सायली तिच्याजवळ गेली.
“परी बाळा,” सायलीने परीला ओढून तिच्या कवेत घेतलं. “शेवटी त्यांनाही तुझीच काळजी आहे ना.”
“पण मग उद्या त्याने ह्या बावळटांविरुद्ध तक्रार केली म्हणजे?” परी कपाळावर आठ्या पाडत बोलली. “उगाच माझ्यामुळे त्यांना काहीच त्रास नको ना.”
“तू तुझ्या ह्या बावळटांना चांगलीच ओळखतेस की,” सायली हलकीशी हसत बोलली. “आमच्यापेक्षाही जास्त त्यांचा तुझ्यावर जीव आहे. ते तुला बरं काही होऊ देतील आणि स्वतःला पण काही होऊ देणार नाहीत.”
“वाह, काय उद्धार चालू आहे आमचा.” सुजय परीच्या खोलीत येत त्या बेडच्या एका कोपऱ्याला बसत बोलला. “म्हटलं दीला वाईट वाटत असेल म्हणून तिला सॉरी बोलू तर ती मलाच बावळट बोलत आहे.”
“बरोबर आहे ना मग तिचं,”सायली परीची बाजू घेत बोलली. “तुम्हाला काही झाल असत तर?”
“आम्हाला त्रास देणारा अजून पैदा व्हायचा आहे.” सुजय नाटकी आवाजात बोलला.
“तुझी बायको येईल ना तेव्हा समजेल.” परी
“आता बायकोचा विषय मध्ये आणायची गरज आहे का?” सुजय “आधी दीच लग्न नंतर माझ.”
“मला बाहेर घालवायची घाई झाली आहे का?” परी आठ्या पाडून बोलली.
“तुला हा एकच डायलॉग बोलून कंटाळा नाही येत का?” सुजय तिला बेडवरची उशी फेकून मारत बोलला.
“अरे तिला का मारतो?” सायली चिडून बोलली.
“ममा, फक्त उशीच आहे.” सुजय पण त्याच्या कपाळावर आठ्या चढवत बोलला. “तू अशी बोलत आहे जस काय दगड फेकून मारला.”
“ते काहीही असो.” सायली “तू जा बरं बाहेर.”
“म्हणजे तुम्ही आम्हाला नाव ठेवायला मोकळे ना?” सुजय
“जातो का आता?” सायली चिडून बोलली. “आणि जेवणाची तयारी कर.”
तसा सुजय त्याच तोंड वाकड करत किचनकडे गेला. त्याला किचनकडे जाताना बघून विजय पण त्याला मदत करायला गेला.
“आई,” परी “त्याला का पाठवलं? चल आपण जाऊयात.”
“एका दिवसाने काहीच होत नाही.” सायली तोऱ्यात बोलली. “तुझ्या बाबांना सवय आहे मग त्यांच्या लेकाला सवय लागायला नको?”
तशी परी अजून सावरून बसली.
तशी परी अजून सावरून बसली.
“बरं मला सांग,” सायलीने बोलायला सुरवात केली. “आता तुझ्या लग्नाचा विषय चालूच आहे तर तुझ्या मनात कोणी आहे का? म्हणजे नंतर अस नको व्हायला की आमच्यामुळे तू तुझ मन मारून जगत राहशील.”
“तुला काय वाटत तुझा लेक तस होऊ देईल का?” परी खुदकन हसत बोलली. “मला बघायला आलेला मुलगा फक्त मला काही बोलला तर त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.”
तशी सायली पण हसू लागली. “तरीही तुझ्या मनात असेल कोणी मुलगा तस सांग मला.”
“नाही गं आई,” परी “जेव्हापासून तुमच्यासोबत आली आहे ना तेव्हापासून माझ्या मनाने फक्त तुमचाच विचार केला आहे. त्यामुळे कोण्या मुलाचा विचार माझ्या मनात आला पण नव्हता. त्यात तुमचे ते सगळे बॉडीगार्ड कोण्या मुलाला माझ्या बाजूला फिरकू पण देत नव्हते.”
“बर बाई,” सायलीने तिच्यासमोर हात जोडले. “माझच चुकलं बस.”
“अशी काय गं आई?” परी लटक्या रागात बोलली.
“बरं मग सुजयची कोणी मैत्रीण?” सायली
तस परीने तिच्याकडे चमकून पाहिलं. आता आईला काय सांगाव हा प्रश्न तिला पडला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा