Login

अवनी एक प्रवास भाग १२

“आता तुम्ही माझ ऐकणारच नाही म्हटल्यावर कशाला बोलायला पाहिजे नाही का?” परी रावीवे तिचे डोळे रोखत बोलली. मग रावीने तिचं तोंड वाकड करत काल राकेश जे काही तिच्यासोबत वागला ते सांगायला सुरवात केली. तस तस परी तिच्या कपाळाला हात लावून रावीकडे रागात बघायला लागली.
मागील भागात.

“बरं मला सांग,” सायलीने बोलायला सुरवात केली. “आता तुझ्या लग्नाचा विषय चालूच आहे तर तुझ्या मनात कोणी आहे का? म्हणजे नंतर अस नको व्हायला की आमच्यामुळे तू तुझ मन मारून जगत राहशील.”

“तुला काय वाटत तुझा लेक तस होऊ देईल का?” परी खुदकन हसत बोलली. “मला बघायला आलेला मुलगा फक्त मला काही बोलला तर त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.”

तशी सायली पण हसू लागली. “तरीही तुझ्या मनात असेल कोणी मुलगा तस सांग मला.”

“नाही गं आई,” परी “जेव्हापासून तुमच्यासोबत आली आहे ना तेव्हापासून माझ्या मनाने फक्त तुमचाच विचार केला आहे. त्यामुळे कोण्या मुलाचा विचार माझ्या मनात आला पण नव्हता. त्यात तुमचे ते सगळे बॉडीगार्ड कोण्या मुलाला माझ्या बाजूला फिरकू पण देत नव्हते.”

“बरं बाई,” सायलीने तिच्यासमोर हात जोडले. “माझचं चुकलं बस.”

“अशी काय गं आई?” परी लटक्या रागात बोलली.

“बर मग सुजयला कोणी मैत्रीण?” सायली

तस परीने तिच्याकडे चमकून पाहिलं. आता आईला काय सांगाव हा प्रश्न तिला पडला.

आता पूढे.

परी सायलीला बघतचं राहीली.

“म्हणजे आहे ना?” सायली तिचा चेहरा वाचून गेली.

“आहे नाही, होती.” परी उसासा टाकत बोलली. “ती मला काहीतरी बोलायला गेली तर तिच्यासोबत थेट ब्रेकअपच केल साहेबांनी.”

तसा सायलीने पण एक दीर्घ श्वास घेतला. “कस व्हायचं ह्याचं?”

परीने पण तिचे खांदे उडविले. मग त्या दोघी उठून हॉलमध्ये येणार तोच परीने सायलीला थांबवलं.

“काय गं काय झाल?” सायलीने गोंधळून विचारलं.

“ते आईस्क्रीम आहे का घरात?” परी खुश होत बोलली.

“आहे ना,” सायली “तुझ्या बाबांना लागते ना सारखी.”

“जेवणानंतर एक खुशखबरी सांगायची आहे.” परी आंनदाने बोलली.

“ठीक आहे आता चल ते दोघे वाट बघत असतील.” सायली परीला सोबत घेत हॉलमध्ये आली.

किचनला लागून असलेल्या जेवणाच्या टेबलावर दोघा बापलेकांनी मिळून जेवणाची सर्व तयारी करून ठेवली होती. मग त्या चौघांनी त्यांची जेवण आटपून घेतली. नंतर परीने सर्वांसाठी आईस्क्रीम आणली.

विजयने त्याच कारण विचारल्यावर परीने तिला ती शिकवत असलेल्या कॉलेजमध्ये कायम स्वरूपी जॉब लागल्याच सांगितल. मग काय? त्यांच्या आनंदाला खूपच उधाण आल. त्या तिघांनीही परीला मिठीत घेत तिचं अभिनंदन केल आणि आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले.

दुसऱ्या दिवशी रावी सकाळीच तिच्या मामांच्या घरी अवतरली. तिला परीसोबत बोलायची इतकी घरी झाली होती की तिने तिच्या घरी नाश्ता देखील केला नव्हता. म्हणून ती आल्या आल्या पहिले नाश्त्यासाठी टेबलावर बसली आणि खायला काय बनवलं आहे ते विचारू लागली.

सायलीने आज इडल्या बनवल्या होत्या. त्याही मोजून बनवल्या असल्याने त्या कमीच होत्या. मग विजयने त्याच्या वाटच्या इडल्या रावीला दिल्या आणि तो त्याच्या कामावर निघून गेला.

“काय गं आज सकाळीच उगवलीस?” सायली एक घास खात बोलली.

“ते दी ला घ्यायला आली.” रावी

“तुला पण बातमी मिळाली काय?” सायली सहज बोलून गेली. “ती तुमच्या कॉलेजला पर्मनंट झाली ते.”

इकडे रावीच तोंडच उघड पडल. कारण काल त्यांच बोलण होऊन देखील तिच्या दीने तिला सांगितल नव्हत. “मला काल काहीच बोलली नाही ती.” रावीचे गाल लगेच फुगले.

“काल तुला भेटून गेल्यावर मला ते समजलं.” परी तिचं आवरून येत बोलली. तिचा नाश्ता झाला होता. म्हणून सायली आणि विजयचा नाश्ता होईपर्यंत ती तिचं आवरायला गेली होती.

“मग काल फोन केला होता तेव्हा?” रावी

“तेव्हा तूच बोलत राहिलीस तुला काहीतरी बोलायचं आहे म्हणून.” परीच्या तोंडातून निघून गेल.

तशी रावी परील बावरून बघू लागली. तर परी त्यांना रोखून बघणाऱ्या तिच्या आईला बघत राहिली.

“झाला माझा नाश्ता,” रावी पटकन उठून बोलली. “चल दी, तुझ्या कामावरचा पहिला दिवस ना म्हणून मी तुला घ्यायला आली आहे.”

रावी काहीच न झाल्यासारखं बोलली आणि उठून हात धुवायला जाऊ लागली. परी पण तिची बॅग घ्यायला तिच्या खोलीकडे जाऊ लागली.

“पुढे एक जरी पाउल टाकलत तर खबरदार.” सायली कडक आवाजात बोलली.

तश्या दोघी एकमेकींकडे बघून उसासा सोडला आणि जागीच उभ्या राहिल्या.

“आता काय करायच्या मार्गावर आहेस?” सायली रावी रोखून बघत बोलली. “की काही केल आहे म्हणून तुझ्या दीला पुढे करून स्वतःला सेफ करणार आहेस?”

“काही नाही गं आई.” परी सायलीला समजावत बोलली. “काल तिच्या वर्गातली एक मुलगी तिला माझ्यावरून बोलली. तर मॅडमने तिचे केस मागे ओढून धरले होते. म्हणून तिच्याशी मी बोलत नव्हती. तर मला मनवण्यासाठी ती आज मला घ्यायला आली इतकचं.”

इकडे रावी परीला आठ्या पाडून बघत राहिली. कारण तिची मामी आता तिला चांगलीच भांडायच्या तयारीत दिसत होती.

“रावी बाळा,” सायली रावीच्या अपेक्षेविरुद्ध बोलली. “असं कोणासोबत ही भांडायचं नसत. ती बोलली तर तू पण तिला बोलूनच उत्तर द्यायला हव होतंस.”

रावी आता सायलीला गोंधळून बघत राहिली. कारण तिची ही आत्या तिच्याशी इतक्या प्रेमाने वागेल याची तिला कल्पनाच करवली जात नव्हती.

“अस तुला प्रेमाने बोलून काही फायदा नाही.” सायली लगेच तोंड वाकड करत तिच राहिलेलं बोलण पूर्ण करू लागली. “तुझी आई सांगते तस तुला फटकवूनच काढलं पाहिजे.”

आता रावीच्या जीवात जीव आला. “म्हणजे आत्याची तब्येत बरी आहे. तरीच म्हटलं ती कस काय इतक्या प्रेमाने मला बोलेल.” रावी तिचं हसू दाबत बोलली.

“मी तुझ्याशी प्रेमाने बोलत नाही का?” सायली चिडून बोलली. “तुझ्या इतक्या चुका तुझ्या आईपासून लपवल्या त्या.”

“त्या बदल्यात तू या भोळ्या भाबड्या मुलीकडून काम करून घेतली ते.” रावी पूर्ण नाटकी आवाजात बोलली.

“तू आणि भोळी भाबडी?” परी हसतच बोलली. “भोळ्या भाबड्या शब्दाचा अजून अपमान होण्यापेक्षा तू चल, आपण कॉलेजला जाऊ.”

आता सायली हसत सुटली होती. तर रावीचे गाल फुगले गेले होते.

“हीच नाव रावी नको पाहिजे होत.” सुजय आताशी त्याच आवरून हॉलमध्ये आला आणि त्याने रावीचे फुगलेले गाल पाहिले. “तिचं नाव सुजलेली ठेवलं पाहिजे होत.” एवढं बोलून तो देखील हसायला लागला.

“आतु,” रावी सुजयवर एक असुरी स्मित टाकून बोलायला लागली. “त्या दिवशी हा सुजय दादा मला त्या कॅफेमध्ये दिसला. कोण्या मुलीसोबत होता. मी विचारलं तर म्हणे ममाने जेवण बनवलं नव्हत म्हणून तिथे खायला गेला होता.”

एवढं बोलून रावीने परीच्या हाताला धरून दरवाजाकडे प्रस्थान केल. जाता जाता सुजयला चिडवायच ती विसरली नव्हती. तर सुजय तिला आ वासून बघत राहीला. परीला पण हसू आल होत म्हणून तिने मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला होता. त्या दोघी लागलीच घराच्या बाहेर पडल्या.

तिथे आता फक्त सायली आणि सुजय होते. सुजयने त्याच्या आईकडे पाहीले जी त्यालाच रोखून बघत होती.

“चला बाबा, ॲकेडमीमध्ये जायला उशीर झाला.” एवढं बोलून सुजय परत त्याच्या खोलीत पसार व्हायच्या तयारीत होता.

“खबरदार जर एकही पाउल पुढे टाकलस तर.” सायली कडक आवाजात बोलली.

तस खोलीकडे वळलेले पाय लागलीच गोठले आणि त्याने त्याच्या आईकडे पाहिलं.

“ममा,” सुजय विनंतीच्या सुरात बोलला. “तिच्या कुठे मागे लागते. तुला माहिती आहे ना तिला अशी आग लावायला मजा येते ते.”

“ते माहिती आहे,” सायली त्याला रोखून बघत बोलली. “पण ती तुमच्यासोबत असताना अशी कधीच आग लावत नाही. कारण ती पण तुमच्यातलीच आहे ना.”

“ममा,” सुजय “मी म्हणजे..”

“मी कधी तुला जेवण दिल नाही रे?” सायली चिडून बोलली. “स्वतःच तर बाहेर चरून येतोस आणि घरी जेवायला नाही म्हणतो. त्यांना सांगतो की मी तुला जेवण देत नाही?”

सायलीच बोलण ऐकून सुजय पहिले तर विचारात पडला. त्याने नक्की काय ऐकल हे त्याच्या मेंदूला समजावू लागला. ‘म्हणजे मी कोण्या मुलीसोबत आहे हा विषय नाहीये तर.’ मग त्याने मनातच सुस्कारा सोडला.

“अगं ममा,” सूजय सायलीजवळ गेला. “ते रावीला कटवण्यासाठी त्या दिवशी बोलवा लागल. नाहीतर ती मला त्या मुलीच्या नावाने चिडवत बसली असती.”

“कोणती मुलगी?” सायलीचे डोळे अजूनच बारीक झाले.

‘अरे देवा, मी स्वतःहून त्या विषयाला हवा तर नाही दिली ना?’ सुजय टेन्शनमध्ये आला.

“मी काय विचारत आहे?” सायली जरा चिडून बोलली. “कोणत्या मुलीसोबत गेला होता आणि का गेला होतास? तुमच काही आहे का? तस काही असेल तर आधीच सांग. म्हणजे मी तुलाही बघते आणि तिलाही बघते.”

“अगं होत जरा तुझ्या विचारांना लगाम दे.” सुजय तिला थांबवत बोलला. “अगं माझ्यामुळे त्या मुलीचा जेवणाचा डब्बा सांडला. त्याची भरपाई म्हणून तिला हॉटेलला घेऊन गेलो होतो. हवं तर दीला विचार, तिलाही माहिती आहे ते.”

“ठीक आहे.”सायलीने त्याच्यावरची रोखलेली नजर काढून ती प्रेमळ केली. कारण त्याने केलेली चुकी स्वीकारून त्याची भरपाई देखील केली होती. मग त्याच्यावरचा तो राग लगेच निवळला गेला. मग ती देखील तिचं आवरून तिच्या ऑफिसला निघून गेली.

तर इकडे सुजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि परत त्याच्या खोलीकडे आंघोळीसाठी निघून गेला.

रावी परीला घेऊन त्यांच्या राहण्याच्या आणि कॉलेजच्या जागेपासून बरीच लांब निघून आली. ते बघून परीला रावीच्या मनात असलेल्या विषयची खात्रीच झाली. काही वेळातच त्या दोघी एका छोट्याश्या कॅफेजवळ जाऊन पोहोचल्या.

“काय गं?” परी “इतक्या लांब का घेऊन आलीस?”

“ते मला बोलायचं आहे तुझ्याशी,” रावी हळूच आवाजात बोलली. “तुला नाही आवडलं आणि तू मला मारलसं तर आपल्या भागात माझी काय इज्जत राहील नाही का?”

ते ऐकून परीने कपाळावर हात मारून घेतला. “मी कधी तुला सर्वांसमोर मारलं आहे गं?” परी लटक्या रागात बोलली.

तोपर्यंत त्या दोघी त्या कॅफेमध्ये जाऊन बसल्या. परीने नेहमीप्रमाणे त्यांच्या कॉफीची ऑर्डर दिली. ती कॉफी येईपर्यंत रावी अगदीच शांत बसलेली होती. तिला कुठून सुरवात करायची? तेच समजत नव्हत. ती नुसतीच तिचा मोबाईल चाळत बसली. पण तिची नजर मात्र भलतीकडेच होती आणि परी तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव वाचत होती.

काही वेळाने कॉफी आली आणि दोघींनी ती घ्यायला सुरवात केली.

“लवकर बोल रावी,” रावी काहीच बोलत नसलेली बघून परीच बोलली. “मला आणि तुला दोघींनाही कॉलेज आहे.”

“अम्म कुठून सुरवात करू तेच समजत नाहीये.” रावी टेन्शनमध्ये येत बोलली. “कारण तू सावध करूनही मी तिचं चूक केली.”

इकडे परीने तिचे डोळे घट्ट मिटले. रावीने आधीच राकेशबद्दल परीला थोडीफार कल्पना दिली होती. पण ते फक्त मित्र आहेत इतकच तिला सांगितलं होत. ती मैत्रीपासून पुढे गेल्याच मात्र परीला सांगितलं नव्हत. त्याचवेळेस परीने त्याच्या स्वभावाबद्दल रावीला सांगितल होत. तेव्हा मात्र रावीने परीला त्या दोघांची मैत्री त्या पुढे जाणार नाही असा शब्द दिला होता. पण रावीच मन कधी त्याच्यात गुंतलं हे तिलाच समजल नव्हत. ती याबद्दल परीसोबत लवकरच बोलणार होती. तेवढ्यात राकेशने असा गोंधळ घातला होता.

“बोल लवकर.” परी आता जरा चिडून बोलली.

“पहिले प्रॉमिस कर माझ्यावर रागावणार नाहीस.” रावीने तिचा हात पुढे केला.

“हे बरं आहे,” परीचा सरू अजूनही चिडकाच होता. “चुका पण करायच्या आणि रागवायचं पण नाही.”

“पण तू रागवत नाहीस,” रावी गाल फुगवून बोलली. “तू बोलणच टाकतेस.”

“आता तुम्ही माझ ऐकणारचं नाही म्हटल्यावर कशाला बोलायला पाहिजे नाही का?” परी रावीवे तिचे डोळे रोखत बोलली.

मग रावीने तिचं तोंड वाकड करत काल राकेश जे काही तिच्यासोबत वागला ते सांगायला सुरवात केली. तस तस परी तिच्या कपाळाला हात लावून रावीकडे रागात बघायला लागली.

“ज्याचा स्पर्श देखील तुला किळसवाणा वाटला त्यात तू तुझ प्रेम शोधलस?” परीला तर रावीचा खूप राग आला होता. पण त्या दोघी बाहेर असल्याने परी रावीला जास्त काही बोलू शकत नव्हती. तेच जर त्या दोघी घरी असत्या तर आतापर्यंत रावीला दोन कानाखाली नक्कीच बसल्या असत्या. त्याचमुळे तर रावी तिला बाहेर घेऊन आली होती.

“पहिले तो नेहमी चांगल्या प्रकारे वागायचा,” रावी दाटलेल्या गळ्याने बोलू लागली. “त्याच्या वागण्यात एक आदर दिसत होता. पण काल इतक्या वर्षांनी भेटला तर पूर्ण बदललेला वाटला. त्याच्या त्या गोष्टीला नकार दिला तर इतका चिडला. आधी अस कधीच झाल नव्हतं. मग त्याला शेवटची वार्निंग दिली. जर लग्न करायचं असेल तरच मला तोंड दाखव म्हणून.”

“आणि त्याने लग्न ठरलं म्हणून त्याची ती इच्छा पुन्हा समोर ठेवली,” परी “त्याची ती इच्छा पूर्ण झाल्यावर त्याने लग्नाला नकार दिला तर?”

“दी.” रावी आता जर चिडून बोलली. “माहिती आहे मी आताची आधुनिक मुलगी आहे. पण मला माझ्या मर्यादा माहिती आहेत.”

“बावळट,” परी तिच्या हातावर चापट मारत बोलली. “तू जो त्याला पर्याय दिला आहे ना त्याबद्दल बोलत आहे मी आणि अशी मुल कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी तात्पुरती लग्नाला तयार देखील होतात.”

आता मात्र रावी शांत बसली.

“शक्यतो त्याच्यापासून लांबच रहा,” परी “त्याच्याशी बोलण देखील बंद कर.”

“तो पापड काय माझ्या अंगाला हात लावेल?” रावी चिडून बोलली.

“तुझी काळजी म्हणून नाही,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “त्याच्या काळजीपोटी बोलत आहे. नाहीतर तो पण त्या केदारसारखा हॉस्पिटलमध्ये पोहोचायचा.”

ते ऐकून रावीचे डोळेच मोठे झाले.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all