Login

अवनी एक प्रवास भाग १५

विजयसोबत परीला आलेलं बघून सायलीला जरा टेन्शनच आल. ती त्याच्यासोबत असेल याची तिला कल्पनाच नव्हती. नाहीतर तिने परीला इथे आणूच दिल नसत. सायली तिच्याच विचारात असताना विजय आणि परी त्या दोघांजवळ येऊन थांबले.
मागील भागात.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची रेखा नावाची मुलगी त्या बिल्डींगमध्ये राहत होती आणि त्यांना तिला भेटायला जायचं होत. पण त्या सुरक्षारक्षकाने त्या बिल्डींगमध्ये रेखा नावाची कोणतीही मुलगी राहत नसल्याचे सांगत त्यांना तिथून जायला सांगत होता. पण नाही ती माणस तिथून जायला तयार होती आणि नाही ती सुरक्षारक्षक त्या माणसांना आतमध्ये सोडायला तयार होता. त्यामुळे तिथे बघ्यांची गर्दी वाढायला सुरवात झाली. आता तर त्या बिल्डींगमधले माणस देखील तिथे येऊन उभे राहिली. कदाचित त्यांचा पत्ता चुकला असेल म्हणून त्यांना परत परत माहिती विचारत होते. अजून काही माहिती मिळते का ते विचारू लागले.

त्यानंतर मात्र त्या माणसांना ते शोधात असेलेल्या मुलीच दुसर नाव आठवल जे की त्यांनी बातम्यांना पाहिलं होत. जस ते आठवलं तस त्या महिलांपैकी एक महिला बोलली.

“हा ती अनी.” पहिली महिला

“अनी नाही,” दुसरी महिला “अन्वी.”

“तुम्हाला अवनी म्हणायचं आहे का?” त्या बिल्डींगमधला एक वयस्कर माणूस बोलला.

“हा तेच तेच.” ती माणस लगेच बोलायला सुरवात झाली.

आता पूढे.

“तरीही आम्हाला एकदा खात्री करून घ्यावी लागेल.” सुरक्षारक्षक कडक आवाजात बोलला. “त्यांच्याकडे जर कोणी येणार असेल तर ते आधीच आम्हाला सांगून ठेवतात. पण त्यांच्याकडून अशी कोणतीही माहिती मला मिळाली नाही. त्यामुळे ते येईपर्यंत तरी तुम्हाला आता सोडता येणार नाही.”

तशी ती माणस परत भांडायला लागली.

“हे बघा,” वयस्कर माणूस “असा तमाशा घालून काहीही फायदा होणार नाही. एकतर तुम्हाला कोणी इथे ओळखतही नाही. ज्यांची ओळख सांगत आहात त्याचं नाव देखील नीट सांगितल नाही. एकतर शांत बसा नाहीतर निघून जा.” वयस्कर माणूस अगदीच कडक भाषेत बोलला.

त्याच्या बोलण्याला बाकी माणसांनी दुजोरा दिला. मग मात्र त्या माणसांचा नाईलाज झाला. म्हणून ते त्या बिल्डींगच्या बाजूला असलेल्या एका बगीचामध्ये जाऊन बसले. जिथून त्या बिल्डींगमध्ये येणारे आणि जाणारे अगदी सहज दिसत होते.

ती माणस तिथून बगीच्यात गेल्यावर त्या सुरक्षारक्षकाने लगेच विजयला फोन लावला. कारण त्या माणसांनी अवनीच नाव घेतलं होत आणि विजयकडे येणारा प्रत्येक माणूस त्या सुरक्षा रक्षकाला माहिती होता. विजयच्या माणस जोडण्याच्या स्वभावाने तो सुरक्षारक्षकही त्याच्या बाबतीत खूपच सतर्क होता. म्हणून अवनीच नाव घेऊनही त्याने त्या माणसांना आत सोडलं नव्हत. असही ह्या वेळेला विजयच्या घरी कोणीही नव्हत.

विजय आणि परी दोघे बाप लेक मिळून दुपारच जेवण करत होते. त्याच वेळेस त्याचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईलवर त्याच्या सुरक्षा रक्षकाच नाव पाहिलं आणि तो जरा विचारात पडला. ह्या वेळेला त्याचा फोन येण त्याच्यासाठी अनपेक्षित होत. म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असल्याच त्याला जाणवलं आणि त्याने लगेच त्याचा फोन उचलला.

“हेलो सर.” सुरक्षा रक्षक “ते अवनी दीदीला शोधत काही माणस आली आहेत.”

मोबाईलवरचं बोलण ऐकून त्याचे हात जागीच थांबले. ज्याची त्याला भीती वाटत होती आता तेच त्याच्या पुढ्यात येऊन थांबल होत. त्याने एकवार परीकडे पाहिलं. जी पावभाजीवर ताव मारत होती.

‘ती तर त्यांना ओळखत पण नसेल,' विजय मनातच विचार करू लागला. ‘पण तरी तिला जर त्यांच्याकडे जावसं वाटलं तर? तिला थोडीच माहिती असेल की ते तिच्यासोबत कसे वागले होते.'

असे बरेचसे विचार त्याच्या मनात फेर धरू लागले. विजयला टेन्शन येऊ लागल. त्याची लाडकी परी त्याला सोडून जाईल का? हा विचार त्याला अस्वस्थ करत होता. लागलीच त्याच्या कपाळावर घाम जमा व्हायला सुरवात झाली.

एव्हाना परीच देखील विजयकडे लक्ष गेल. विजयला असा येणारा घाम बघून ती लागलीच तिच्या जागेवरून उठली आणि विजयजवळ आली.

“काय झाल बाबा?” परी विजयचा घाम पुसत बोलली. “असा का घाम येत आहे तुम्हाला?” परी आता टेन्शनमध्ये आली. त्यात विजयच अंग आता तापाने तापू लागल. तशी परी अजूनच घाबरली.

विजयने टेन्शन घेतलं की त्याला ताप भरतो हे तिला चांगलच ठावूक होत. पण आता तर नीट होते. मधेच अस काय झाल की त्यांना ताप भरला? हा विचार तिच्या मनात घुमू लागला. पण सध्या विजयला डॉक्टरकडे घेऊन जाण परीला जास्त सोयीस्कर वाटल.

“बाबा चला, डॉक्टरकडे जाऊ.” परी विजयचा हात पकडून बोलली.

“काही नाही झाल रे बच्चा.” विजय परीला प्रेमाने जवळ घेऊन बोलू लागला. तिला कवेत घेऊन अगदी घट्ट पकडून घेतलं होत.

आता मात्र परीला विजयच वागण विचित्र वाटायला लागल.

“बाबा मी इथेच आहे.” परी तिच्या वडिलांना घट्ट पकडून बोलली. “चला आधी डॉक्टरकडे जाऊयात.”

“नाही गं,” विजय हलकेच हसत बोलला. “मी ठीक आहे. बरीच काम पडली आहेत.”

“मला माहित नाही,” परी हट्टाने विजयला उठवत बोलली. “आधी डॉक्टरकडे चला.”

परीचा हट्ट बघून विजयला तिचं मन मोडण जमल नाही. मग तिथून ते थेट त्यांच्या डॉक्टरकडे गेले. परीची ती काळजी बघून डॉक्टरांना पण जरा हसूच आले. त्यांनी विजयला तपासायला आतमध्ये नेल. बाहेर परीच्या हातात विजयचा मोबाईल होता. तिने तो पहिला तर त्यात सुरक्षारक्षकाचा फोन आलेला दिसला. तिने लगेच त्या नंबरवर फोन लावून त्याने विजयला काय सांगितल ते विचारलं.

विजयचा परत आलेला फोन बघून त्या सुरक्षारक्षकाने लागलीच तो उचलला. त्यावर परी बोलतेय बघून तो जरा गोंधळात पडला. तरी त्याने परीच्या प्रश्नांची उत्तर दिली.

‘कोणती माणस भेटायला आली की बाबांना टेन्शन आल?’ परी परत विचारात पडली. ‘आणि त्यांना कोणत्या मुलीला भेटायचं आहे?’ हा विचार तिच्या डोक्यात फिरत होता. मग तिला आठवल की तिला तर आश्रमात ठेवलं होत आणि तिथून विजयने तिला घरी आणल होत. ‘म्हणजे तर मला तर नाही?’ परीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ह्या वेळेला काय करावं? काय बोलावं? तिला काहीच सुचत नव्हत. तिला फक्त एवढ समजत होत की त्यांच्यामुळे तिच्या वडिलांना टेन्शन येऊन ताप भरला होता.

ती डॉक्टर आणि विजय बाहेर येण्याची वाट बघत बसली. तेवढ्यातच विजयच्या मोबाईलवर सायलीचा फोन आला. आईचा आलेला फोन बघून परी अजून टेन्शनमध्ये आली. सायलीला खरं काय ते समजल तर ती आताच्या आता घरी जाऊन त्या माणसांना भांडायला कमी करणार नाही. इतकी खात्री परीला तर नक्कीच होती. पण फोन तर उचलावा लागणार होता. तेवढ्यातच विजय डॉक्टरांसोबत बाहेर आला. तसा परीने लागलीच मोबाईल त्याच्याकडे दिला आणि इशारातच आईचा फोन असल्याच सागितलं. विजयने ही लगेच ती घेतला आणि उचलला.

“हेलो,” विजय हलकेच हसत बोलला. “काय म्हणता...”

विजय पुढे काही बोलेल तोच सायलीने बोलयला सुरवात केली. “आता लगेच घरी या.”

“का गं?” विजय आता गोंधळात पडला. “काय झाल?”

“तुम्ही येताय की तुमच्या लेकाला आता बिल्डींगच्या बाहेर काय झाल ते सांगू?” सायली निर्वाणीच्या भाषेत बोलली. तिलाही त्यांच्या शेजारच्यांचा फोन आला होता आणि त्यांनी तिथे जे काही घडलं ते सांगून दिल होत.

सायलीच बोलण ऐकून विजयने त्याचे डोळे घट्ट मिटले. “आलोच.” एवढ बोलून त्याने फोन ठेवून दिला. सुजयपेक्षा त्याने तिथे जाण जास्त चांगल होणार होत.

“काय झाल बाबा?” परी टेन्शनमध्ये येत बोलली. विजयने घट्ट मिटलेले डोळे तिला न समजून पण बरच काही सांगून गेले होते.

“काही नाही,” विजय “आज आई पण घरी येत आहे लवकर. तर आपण तिघे मिळून आज पार्टी करू.”

“आज अचानक?” परी गोंधळून गेली.

“हो,” विजय सुस्कारा टाकत बोलला. “चल लवकर.”

मग ते दोघेही डॉक्टरांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडले. सायली देखील त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडली. तिला अस लगबगीने निघताना पाहून आराध्याने काळजीने तिला तिच्या लगबगीच कारण विचारलं.

परीचे नातेवाईक तिला शोधत सायलीच्या घरापर्यंत पोहोचलेले ऐकून आराध्या पण टेन्शनमध्ये आली. ती पण लगेच सायलीच्या सोबतच निघणार होती. पण ऑफिसमध्ये पण कोणीतरी पाहिजे म्हणून तिला ऑफिसमध्ये थांबावं लागल. असही आराध्या आणि सायली अश्या लगबगीने ऑफिसमधून बाहेर पडल्याचे त्यांच्या मुलांना समजले असते तर ते पण त्यांची काम टाकून सायलीच्या घराकडे यायला निघाले असते.

काही वेळाने सायली त्यांच्या बिल्डींगजवळ जाऊन पोहोचली. सध्या तरी तिथे शांतता नांदत होती. सायलीची गाडी गेटच्या आत शिरताच त्यांचा सुरक्षारक्षक लागलीच तिच्याजवळ जाऊन पोहोचला.

“कोण आल आहे परीला विचारत?” सायलीने सुरक्षा रक्षकाला विचारलं.

तस त्याने ती माणस बसली होती त्या दिशेला हात केला. सध्यातरी ती माणस त्यांच्याच विश्वात होती. त्यामुळे त्यांच काही ह्या बाजूला लक्ष नव्हत.

सायली आणि त्या सुरक्षा रक्षकाच बोलण चालू असताना विजय आणि परी तिथे जाऊन पोहोचले. जस जस घर जवळ येत होत तस तस विजय अस्वस्थ होऊ लागला होता. त्याच्या चेहऱ्यावर चढत चाललेलं टेन्शन परीला स्पष्ट दिसत होत. त्यातच सायली तिथल्या सुरक्षा रक्षकासोबतच बोलत उभी होती. म्हणून विजयने देखील त्याची गाडी तिथेच थांबवली.

विजयसोबत परीला आलेलं बघून सायलीला जरा टेन्शनच आल. ती त्याच्यासोबत असेल याची तिला कल्पनाच नव्हती. नाहीतर तिने परीला इथे आणूच दिल नसत. सायली तिच्याच विचारात असताना विजय आणि परी त्या दोघांजवळ येऊन थांबले.

“जा बोलव त्यांना.” विजय त्या सुरक्षा रक्षकाकडे बघून बोलला आणि परीला सायलीसोबत जायला सांगून तो त्याची गाडी लावायला निघून गेला.

“कोण आल आहे?” परीने सायलीला विचारलं.

पण सायली फक्त पुढे जायचं काम करत होती.

“आई.” परी आठ्या पाडून बोलली.

“ते आले की समजेल,” सायली “आम्ही पण आताच आली आहोत ना.”

“आई,” परी सायली सोबत चालता चालता बोलू लागली. “बाबांना टेन्शन येऊन ताप भरला होता. आता दवाखान्यातच होतो की तुझा फोन आला. मग आम्ही इथे आलो.”

विजयला ताप भरल्याचे समजताच सायलीची पावलं जागीच थबकली. ती परीकडे बघू लागली.

“फोनवर बोलून झाल्यावर बाबांच्या चेहऱ्यावर घाम यायला लागला,” परीने पुढे बोलयला सुरवात केली. “त्यांचा घाम पुसायला गेली तर त्यांच अंग गरम लागल. म्हणून लगेच त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेली. पहिले तर जायला ऐकतच नव्हते. मग जरा दम दिला तेव्हा कुठे डॉक्टरकडे आलो. डॉक्टर त्यांना तपासात असताना मग मी आपल्या सिक्युरिटी दादांना फोन लावून काय झाल ते विचारलं. तेव्हा त्यांनी मला सगळ सांगितल.”

ते ऐकून सायलीचे डोळे विस्फारले गेले आणि ती परीला पटकन घराकडे घेऊन गेली.

“काय सांगितल त्याने?” सायलीने अधिरतेने परीला विचारलं.

“तेच जे बाबांना सांगितल,” परी “मला शोधत कोणीतरी आल आहे म्हणून.”

आता सायली पण जरा घाबरली. कारण विजयचा तिच्यात किती जीव आहे हे तिला चांगलच माहिती होत. तिचा देखील परीमध्ये खूप जीव होता. आताही परी विजयला पहिले दवाखान्यात घेऊन गेली त्यावरून तिच्यासाठी विजय किती महत्वाचा आहे ते समजल होत. पण शेवटी ती आलेली माणस तिच्या हक्काच्या घरातली होती. परी अगदीच सहा महिन्याची होती तेव्हा त्यांनी परीला आश्रमात सोडलं होत. त्यामुळे त्यांच तेव्हाच वागण परीला माहितीच नव्हत. मग आता समोर आलेलं तिचं खर कुटुंब बघून परीला त्यांच्याबद्दल माया दाटून आली आणि तिने त्यांच्याकडे जायचा निर्णय घेतला तर? हा विचार आता सायलीच्याही मनात आला.

आता विजय देखील घरी येऊन पोहोचला. परीने पटकन त्याला पाणी आणून दिल. ते तिघेही आता त्या माणसांची अधिरतेने वाट बघत होते.
सायली आणि विजयला परीसोबतच त्यांच्या बाकी मुलाचं टेन्शन आल होत. त्यांना समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? हा विचार करूनच त्यांच्या अंगावर काटा येत होता. सगळ काही सरळ झाल तर ठीक. पण ती माणस उगाच वाकड्यात शिरली तर मात्र त्यांची ती मुल काय करतील? याची कल्पनाच करता येणार नव्हती.

आता त्या दोघांच लक्ष परीवर गेल. ती देखील खोल विचारात गढलेली दिसली. तिला तिच्या आई बाबांचा चेहरा बघून ती माणस नक्कीच आपल्याला शोधत आल्याचे समजले होते. याचा अर्थ एकच होता की ती माणस तिच्या खऱ्या कुटुंबाशी संबंधित होती.

इतके वर्ष ज्यांनी तिची साधी चौकशी करण्याचे देखील कष्ट घेतले नाही. तिला त्या आश्रमाच्या पायरीवर सोडताना तिचे एका क्षणासाठी देखील विचार केला नाही. ती माणस आज शोधत आले होते. त्यामागे तिच्यावरच्या प्रेमापोटी आले हे कारण असूच शकत नाही. काहीतरी वेगळच कारण असणार आणि आता तेच तिला समजून घ्यायचे होते. ज्या माणसामुळे तिला एवढ सुंदर आयुष्य मिळाल त्याला कोण्या माणसांमुळे फक्त त्रासच नाही झाला तर थेट टेन्शन येऊन ताप भरला. त्यांना तर अशी सहज सोडणार नव्हती. त्यांच आताच भेटण यावर तिने ती नंतर काय करणार? हे सोडलं होत.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all