Login

अवनी एक प्रवास भाग १६

पण विजयची तिच्याकडे बघायची हिम्मत झाली नाही. तिचं ते हेलावलेलं मन बघून विजयची अस्वस्थता परत वाढू लागली. तिकडे सायली पण टेन्शनमध्ये यायला लागली. तर तकडे रावी देखील दाराला तिचे कान लावून परीच उत्तर ऐकायला अधीर झाली होती.
मागील भागात.

आता त्या दोघांच लक्ष परीवर गेल. ती देखील खोल विचारात गढलेली दिसली. तिला तिच्या आई बाबांचा चेहरा बघून ती माणस नक्कीच आपल्याला शोधत आल्याचे समजले होते. याचा अर्थ एकाच होता की ती माणस तिच्या खऱ्या कुटुंबाशी संबंधित होती.

इतके वर्ष ज्यांनी तिची साधी चौकशी करण्याचे देखील कष्ट घेतले नाही. तिला त्या आश्रमाच्या पायरीवर सोडताना तिचे एका क्षणासाठी देखील विचार केला नाही. ती माणस आज शोधत आले होते. त्यामागे तिच्यावरच्या प्रेमापोटी आले हे कारण असूच शकत नाही. काहीतरी वेगळच कारण असणार आणि आता तेच तिला समजून घ्यायचे होते. ज्या माणसामुळे तिला एवढ सुंदर आयुष्य मिळाल त्याला कोण्या माणसांमुळे फक्त त्रासच नाही झाला तर थेट टेन्शन येऊन ताप भरला. त्यांना तर अशी सहज सोडणार नव्हती. त्यांच आताच भेटण यावर तिने ती नंतर काय करणार? हे सोडलं होत.

आता पूढे.

काही वेळातच ती माणस विजयच्या घरी येऊन पोहोचली. त्यांना आलेलं बघून सायलीने त्यांना चहा पाणी आणून दिल. थोडावेळ असच शांततेत गेला. ती माणस तर विजयचा घरचं बघण्यात व्यस्त होते.

“तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये.” कोणीच बोलत नाही बघून परी बोलली.

तस सायली आणि विजयच घड्याळात लक्ष गेल. संध्याकाळ होत आली होती.

“नमस्कार मी गौतम,” आलेल्या माणसांपैकी एक माणूस परीकडे बघत बोलला. “मी तुझा लहान काका.” नंतर त्याने बाजूला बोट केल. “ही तुझी लहान काकु वंदना. ही तुझी आत्या आणि तिच्या बाजूला बसलेला तिचा मुलगा हरीश.”

“कशावरून तुम्हची तिचे काका?” सायली जरा चिडून बोलली.

मग त्यांनी परीचा एक जुना फोटो बाहेर काढला. कदाचित जेव्हा तिचं बारस केल होत तेव्हाचा तो होता. त्यात तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यापासून थोड वर दंडावर एक खूण देखील होती. नंतर त्यांनी एक वर्तमान पत्रातला फोटो दाखवला. जो परीचे मानसशास्त्राचे प्रबंध प्रख्यात झाले होते तेव्हाचा होता. त्याच फोटोमध्ये परीचा आश्रमात असतानाचा फोटो देखील टाकला गेल होता. ज्यात तशीच खुण होती.

तो फोटो घेऊन परीचे ते काका आणि आत्या परीला सोडलेल्या आश्रमात गेले. तिथल्या एका शिपायाला पैश्यांची लालूच दाखवून त्यांनी विजयचा पत्ता मिळवला होता आणि आता इथे आले होते. दूसर काही नाही परीची झालेली ती प्रगती त्यांना इथे खेचून घेऊन आली होती.

“अच्छा,” विजयने बोलायला सुरवात केली. “मग?”

“मग म्हणजे?” गौतम सहज बोलून गेला. “तिचं खर कुटुंब आता दारात आहे म्हटल्यावर आम्ही तिला घेऊन जायला आलो आहे.”

तसा विजय तिरस्कारात्मक हसला. “जेव्हा तिला दत्तक घ्यायची प्रक्रिया चालू होती. तेव्हा तर तुम्ही काहीच बोलले नाहीत. आले होते ना त्या आश्रमातली माणस तुम्हाला शोधत?”

तशी ती माणस चपापली.

“न... नाही,,” वंदन स्वतःला सावरत बोलली. “आम्हाला समजल असत तर आम्ही तिला दत्तक घेऊच दिल नसत.”

“पण आता घेतलं आहे,” विजय दिर्घ श्वास घेत बोलला. “त्याचे रीतसर कागद आमच्याकडे आहेत.”

“ते झाल तुमच म्हणणं,” परीची आत्या ठसक्यात बोलली. “आपण आमच्या रेखाला आमच्या सोबत यायचं असेल तर?”

“विचार तिला.” विजय मंद स्मित करत बोलला.

मग परीच्या आत्त्याने तिचा मोर्चा परीकडे वळवला. “येतेस ना बाळा आमच्यासोबत?”

“सॉरी,” परी निर्विकार होत बोलली. “पण मी तुम्हाला ओळखत नाही. माझे आई बाबा हेच आहेत.” परी विजयजवळ जाऊन त्याच्या कवेत शिरत बोलली. ते बघून विजयच्या अस्वस्थ मनावर जी प्रेमाची फुंकर मारली गेली ना की त्याच टेन्शन लागलीच उतरलं आणि त्याचा ताप देखील.

“अगं अशी काय करतेस?” गौतम दाटलेल्या गळ्याने बोलला. “आमची मुल तर आमच्याकडे बघतही नाहीत. आता तूच एक आहेस जी आमची शेवटची आशा आहेस.”

“तुमची मुल तुम्हाला बघत नाही हा माझा प्रोब्लेम नाही,” परी कपाळवर आठ्या आणत बोलली. “जेव्हा गरज नव्हती तेव्हा आश्रमाच्या दारात फेकून दिल आणि आता गरज आहे, माझ्याकडे पैसा आहे तर लगेच नात्याची ओळख करून द्यायला आलात?”

“ह्यांनीच तुला काहीबाही शिकवलं असेल,” परीची आत्या तावातावाने बोलली. “आमचे संस्कार असे नाहीत.”

“ती सहा महिन्याची होती तेव्हा तुम्ही तिला त्या आश्रमात सोडलं होत. त्यानंतर तुम्ही कधी तिला भेटायला आलात? हे तरी मला आठवत नाही. मग तुम्ही कधी तिला संस्कार दिले? आणि संस्काराच बोलत आहात तर तुमची मुल तुम्हाला बघत नाही ह्यात तुमचे संस्कार दिसले.” सायली ठसक्यात बोलली. “तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही आता जाऊ शकता.” सायलीने सरळ हात जोडले.

“अगं तुझ्या पैश्यांवर ते जगत आहेत,” सायलीने त्यांच तोंड बंद केल म्हणून वंदना परीला समजावण्याचा प्रयत्न करत बोलल्या. “नाहीतर तुझ आतापर्यंत लग्न लावून दिल असत. पण नाही तुला असच घरात ठेवलं आहे. तुला त्यांची मुलगी समजते असते ना...” वंदना पुढे काही बोलणार तोच दाराकडून जरात खळकन काहीतरी तुटण्याचा आवाज आला.

सगळ्याचं लक्ष दाराकडे गेल. तिथे रावी उभी होती जी सध्या खूपच रागात दिसत होती. तिने वंदनाच बोलण पूर्ण ऐकल होत.

“रावी तू आत जा.” विजय जरा कडक आवाजात बोलला. “इथे काहीच काम नाही तुझ.”

“काही काम कस नाही?” रावी चिडक्या स्वरात बोलली आणि लागलीच परीजवळ जाऊन उभी राहिली. “कोणीही ऐरागैरा येईल, तुम्हाला काहीही बोलेल आणि मी ऐकून घेईल का?”

“रावी आता जा.” आता परी स्वतः तिला रोखून बघत बोलली.
रावीला अस रागने बोलताना पाहून आलेले ते चौघेही जरा टेन्शनमधेच आले. कारण रावीच व्यक्तिमत्वच अस होत की तिला रागात बघून ती काय करेल? याचा नेम लागणार नव्हता.

“काय बाई?” वंदना तोंड वाकड कर बोलायला लागली. “आजकालच्या मुलींना शिस्तच नाही. मोठ्या माणसाचं ऐकायचं असत एवढ पण कळत नाही.”

“एक मिनिट,” आता मात्र सायली चिडून बोलली. “तिच्याबद्दल बोलायला नाही ती तुमच्या घरातली आहे आणि नाही ती तुमच्याबद्दल काही बोलली आहे. त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं.”

रावी तर तिच्या आत्याला पहिल्यांदाच अस चिडून बोलताना बघत होती. याआधी तिने सायलीचा फक्त लटका राग पहिला होता. आजची सायली बघून तिला सुजयचा राग आठवला. तोही रागाला आल्यावर स्पष्ट आणि रोकठोक बोलायचा.

“तिच्याकडून मी तुमची माफी मागतो.” गौतम नरमाईने बोलला. नंतर विजयकडे बघत बोलला. “मला थोडावेळ तिच्याशी बोलायचं आहे, एकांतात.”

“तिच्याजवळ जायचा प्रयत्न तर कर.” रावी आता चांगलीच चिडीला आली. वंदनाने तिला टोमणा जो मारला होता.

“रावी आत जा बोलली ना.” परी कडक आवाजात बोलली.

परीचा आताचा लागलेला सूर हा निर्वाणीचा सूर असायचा. त्यापलीकडे जायची हिम्मत तिची ही भांवड कधीच करत नव्हती. मग रावी रागातच तिचे पाय आपटत आतल्या खोलीत गेली. दार तर तिने जोरात आपटलं होत. पण त्याच दाराला कान लावून उभी देखील राहिली.

“तिच्याशी जे काही बोलायचं आहे ते समोरासमोर बोला.” विजय “ती सज्ञान आणि शिकली सवरलेली आहे. ती काही लहान नाही की जिला गोड बोलून भुलवता येईल.”

“किमान आई बाबांची शेवटची इच्छा म्हणून तरी तुमच्या घरी चल,” गौतम भरलेल्या आवाजात परीकडे बघून बोलला. “फक्त एकदाच.”

गौतम नंतर वंदना आणि परीची आत्या या दोघी देखील परीला विनवण्या करायला लागल्या. बोलताना दाटून आलेला गळा, भरून आलेले डोळे हे बघून परीच मन हळू हळू त्यांचा विचार करू लागल. शेवटी शेवटी वंदनाने तर परीच्या पायावर डोक ठेवायला घेतलं होत. ते बघून परीला ऑकवर्ड वाटायला लागल. तिचं मन अगदीच हेलावून गेल. मग तिने एक नजर विजयवर टाकली.

पण विजयची तिच्याकडे बघायची हिम्मत झाली नाही. तिचं ते हेलावलेलं मन बघून विजयची अस्वस्थता परत वाढू लागली. तिकडे सायली पण टेन्शनमध्ये यायला लागली. तर तकडे रावी देखील दाराला तिचे कान लावून परीच उत्तर ऐकायला अधीर झाली होती.

तर दुसरीकडे परीच डोक बधीर व्हायला लागल होत. तिला आता काहीच सुचत नव्हत. कधी तिचं मन तिच्यावर हावी व्हायचं तर कधी तिची बुद्धी तिच्यावर वर्चस्व मिळवायची.

“मला विचार करायाला वेळ पाहिजे.” परी विचार करत बोलली.

तिचं बोलण ऐकून विजय अजून अस्वस्थ झाला “ठीक आहे या तुम्ही.”

“त.. ते तिचा नंबर...” परीच्या आत्याचा मुलगा हरीश बोलता बोलता शांत झाला. कारण परीचा नंबर हे ऐकूनच सायलीचे त्याच्याकडे एक रागीट नजर टाकली होती.

“म्हणजे,” वंदनाने सावरून घेत म्हटलं. “आम्हाला कस कळेल ना की तिने काय ठरवलं म्हणजे विचार केला ते.” वंदना उगाच हसत बोलली.

“ते मी सांगेल तुम्हाला.” विजय लागलीच बोलला. “तुमचा नंबर सोडून जा इथे.” विजय गौतमकडे बघत बोलला.

मग त्या चौघांनी परीकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं आणि घरातून बाहेर पडले.

तिकडे परी तर दुसऱ्याच विचारात हरवली होती. ते आता तिच्याकडे कशाला आले होते? हे तिला चांगलच समजून आल होत. नाहीतर इतके वर्ष साध तिच्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नसताना तिचा पेपरमधला फक्त फोटो बघून ते आले होते. स्पष्ट होत की ती आता चांगली कमवायला लागली होती म्हणून तिच्यावरती आता त्यांचा जीव उतू चालला होता.

त्यांनी आता ही तिला तिच्या आई वडिलांचा फोटो देखील दाखवला नव्हता. ते जर मनापासून तिच्या खऱ्या आई वडिलांच्या नावाने घ्यायाला आले असते तर त्यांचा एक फोटो तरी त्यांनी तिला दाखवला असता. ते तर थेट आई वडिलांची शेवटची इच्छा बोलून मोकळे झाले होते. जे परीला माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता.

जस जस तिच्या भावनांचा पूर ओसरायला लागला. तस तस परीला वास्तवाची जाणीव व्हायला लागली. तसा भावनिक झालेल्या चेहऱ्यावर आता आठ्या चढल्या. तिने विजयकडे पाहिलं. तो डोळे बंद करून बसला होता. तर सायली त्याच्याच बाजूला बसून त्याचे हात पकडून बसली होती. आता रावी पण त्या खोलीतून बाहेर आली. ती पण चिडून दुसऱ्या सोफ्यावर एकटीच बसून राहिली.

परीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या खोलीत गेली. काही वेळातच एक कागद घेऊन परत हॉलमध्ये आली आणि विजयच्या समोर येऊन उभी राहिली.

तिला अस अचानक समोर आलेलं बघून रावी आणि सायली तिला बघतच राहिल्या. विजय तर डोळे बंदच करून बसलेला होता. तरी त्याला त्याच्यासमोर परी येऊन उभी राहिल्याचे समजून गेले होते. तरीही तो डोळे लावूनच बसलेला होता.

“काही गरज नाही डोळे बंद करून बसायची,” परी चिडून बोलली. “मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम डोळे बंद करून बसले आहेत ते.”

परी आज पहिल्यांदाच विजयसोबत अश्या स्वरात बोलली होती. नाहीतर तिचं विजयसोबतच बोलण नेहमीच खालच्या स्वरातल असायचं. त्यामुळे तिचा हा स्वर ऐकून सायली आणि रावी दोघी अचंबित झाल्या होत्या.

परीच बोलण ऐकून विजयने त्याचे डोळे उघडले आणि परीकडे बघू लागला. तशी परी बोलायला लागली.

“तुम्ही मला खरोखरचा जीव लावला होता ना?” परी तो कागद समोर धरत त्रासिक चेहऱ्याने बोलली.

तसे सगळेच तिच्याकडे धक्का लागून बघत राहिले.

“परी,” सायली चिडून बोलली. “काय बोलत आहेस तू? तूला तरी समजतय का?”

“सांगा ना बाबा,” परी सायलीकडे दुर्लक्ष करून हतबल होत बोलू लागली. “तुम्ही मनापासून मला तुमची मुलगी मानल होत का?”


परीचं अस बोलण ऐकून सायलीचा राग अनावर झाला आणि तिने परील तिच्याकडे वळवून परीच्या कानाखाली वाजवली.

“सायली.” परीला कानाखाली मारलेलं बघून विजय चिडून बोलला. कारण त्याने आजवर असा तिच्यावर कधीच हात उगारला नव्हता. म्हणून विजयल आता सायलीचा राग आला.

“ती काय बोलते ऐकल नाही का तुम्ही?” सायली रागारागात बोलू लागली.

रावी तर परीकडे बघतच राहिली. तिला इतक माहिती होत की परी भावनेच्या भरात काहीही करत नाही. पण आता जे समोर चालल होत त्यावर तिलाही विश्वास बसत नव्हता. म्हणून ती आधी परीच बोलण पूर्ण ऐकून घेत होती.

“आजवर तिला इतक प्रेम दिल तरीही तिला हा प्रश्न पडतो आणि तेही आताच काही वेळापूर्वी आलेल्या माणसांमुळे.” सायली परीकडे बघत रागातच बोलली. “आजवर तुला आमच्या मुलीसारख नाही तर आमची मुलगीच म्हणून तुला वागवल ना गं, तरीही..”

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all