मागील भागात.
सायलीचा राग अनावर झाला आणि तिचे परीच्या कानाखाली वाजवली.
“सायली.” विजय चिडून बोलला. आजवर असा तिच्यावर कधीच हात उगारला नव्हता. म्हणून आता विजयला सायलीचा राग आला.
“ती काय बोलते ऐकल नाही का तुम्ही?” सायली रागारागात बोलू लागली.
रावी तर परीकडे बघतच राहिली. तिला इतक माहिती होत की परी भावनेच्या भरात काहीही करत नाही. पण आता जे समोर चालल होत त्यावर तिलाही विश्वास बसत नव्हता. म्हणून ती आधी परीच बोलण पूर्ण ऐकून घेत होती.
“आजवर तिला इतक प्रेम दिल तरीही तिला हा प्रश्न पडतो आणि तेही आताच काही वेळापूर्वी आलेल्या माणसांमुळे.” सायली परीकडे बघत बोलली. “आजवर तुला आमच्या मुलीसारख नाही तर आमची मुलगीच म्हणून तुला वागवल ना गं, तरीही..”
आता पूढे.
सायली पुढे काही बोलणार तोच परीने दाटलेल्या गळ्याने बोलायला सुरवात केली. “मग हे बाबांनी त्यांना का ठणकावून सांगितल नाही की मी तुमचीच मुलगी आहे ते?”
आताच परीच बोलण ऐकून सायली तिला बघतच राहिली. सायलीच काय? विजय पण तिच्याकडे गोंधळून बघत राहीला.
“सांग ना आई?” परी आता हुंदके द्यायला सुरवात केली. “त्या माणसांना लगेच का हाकलून लावलं नाहीत? त्या सिक्युरिटी दादाने जेव्हा सांगितल तेव्हाच त्यांना परत पाठवून का दिल नाही? सरळ बोलले तिला विचारा म्हणून. मी शिकली सवरलेली आहे माझा निर्णय मी घेऊ शकते असे का बोलले?”
“सांग ना आई?” परी आता हुंदके द्यायला सुरवात केली. “त्या माणसांना लगेच का हाकलून लावलं नाहीत? त्या सिक्युरिटी दादाने जेव्हा सांगितल तेव्हाच त्यांना परत पाठवून का दिल नाही? सरळ बोलले तिला विचारा म्हणून. मी शिकली सवरलेली आहे माझा निर्णय मी घेऊ शकते असे का बोलले?”
आता मात्र विजय मन मुळापासून हेलावलं गेल. तो उठून परीजवळ आला. तस परीने त्याला थांबवलं.
“नाही बाबा,” परी विजयच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. “आज तुम्ही माझ मन दुखावलंत. मी तुमची मुलगी नाही हे...” ती बोलता बोलता थांबली.
“तस नाही रे बाळा,” विजयने तिचे हात त्याच्या हातात घेतले. “नंतर असो नको वाटायला की आम्ही तुला थांबवलं किंवा जाऊ दिल नाही.”
“पण मला अस का वाटेल?” परी “जाऊद्या, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये.” इतक बोलून परी तिच्या खोलीकडे निघून गेली.
विजय तर तिच्याकडे बघतच राहीला. बोलणार नाही अस तिच्या तोंडून कधीच निघालं नव्हत. ते आज निघाल होत. याचा अर्थ ती मनातून खूपच दुखावली गेली होती. हे विजय आणि सायलीला समजायला वेळ लागला नव्हता.
“पण मला अस का वाटेल?” परी “जाऊद्या, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये.” इतक बोलून परी तिच्या खोलीकडे निघून गेली.
विजय तर तिच्याकडे बघतच राहीला. बोलणार नाही अस तिच्या तोंडून कधीच निघालं नव्हत. ते आज निघाल होत. याचा अर्थ ती मनातून खूपच दुखावली गेली होती. हे विजय आणि सायलीला समजायला वेळ लागला नव्हता.
विजय देखील तिच्या मागे मागे तिच्या खोलीकडे आला. तिने तर खोलीत पोहोचल्या पोहोचल्या दार लावून घेतलं होत. तेच बंद दार विजयने वाजवलं.
“परी बाळा ऐक ना.” विजय दाटलेल्या गळ्याने बोलला. “एकदा माझ्या बाजुने तरी विचार कर ना.”
तरी आतून काहीच आवाज आला नाही. त्याच्यामागे सायलीने पण आवाज दिला. तरीही परीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी रावीच पुढे आली. तिने इशारातच विजयला गप्प राहायला सांगितलं आणि सायलीला तिच्या हो ला हो करायला लावलं.
सध्या परीच बाहेर येण जास्त महत्वाच असल्याने त्या दोघांनी रावीला परवानगी दिली.
“मामा,” रावी जवळ जवळ किंचाळलीच. तस दोघांनी स्वतःच्या कानावर हात ठेवले. “आत्तु पाणी आण लवकर. टेन्शन आल्याने बहुतेक बेशुद्ध पडले आहेत.”
रावीच बोलण पूर्ण झालच होत तेवढ्यात परीने तिच्या खोलीच दार उघडलं. रावीची तर दाराकडे पाठ होती. सायली आणि विजय दारासमोरच असल्याने त्यांना परीने दार उघडलेलं समजलं. पण रावीला काही ते समजलच नाही. ती आपली जोरजोरात तिच्या मामांच्या नावाने ओरडतच राहिली.
पण काही वेळाने तिच्या मामा मामीवर पडलेला प्रकाश आणि त्यांचा शांत झालेला चेहरा रावीच्या मनात शंकेची पाल चुकचुकवून गेला. तशी ती लागलीच शांत झाली आणि दुसऱ्याच क्षणाला ती सायलीच्या पाठी लपण्यासाठी पुढे सरसावली. तिने साध मागे वळून बघण्याचे देखील कष्ट घेतले नाही.
मग काय? झाला की पकडापकडीचा खेळ सुरु. पुढे रावी पळत होती तर तिच्या मागे परी तिच्या हातात काठी घेऊन पळत होती. तर सायली आणि विजय फक्त दोघांनी गम्मत बघत गालात हसत उभे राहिले.
“बाबांच्या नावाने अशी मस्करी करशील?” परी चांगलीच चिडून बोलली. कारण रावी तिच्या हातातच येत नव्हती. एकतर तिची उंची जास्त, सोबत जिम व्यायाम चालूच आणि दुसर म्हणजे परीचे फटके असे पडायचे की त्यांची जिम आणि व्यायाम देखील कमी पडायचे. इतके ते लागत होते.
जितकी परी चिडून बोलत होती तितकी रावी अजूनच तिला चिडवत होती. “आली मोठी म्हणे मला तुमच्याशी बोलायचं नाही. आता कशी लगेच बाहेर आलीस?” रावी खिदळत बोलली.
रावी हातात येत नाही बघून परीने हुंदके देत रडायला सुरवात केली आणि विजयकडे धावत जात त्याच्या कुशीत विसावली. “पुन्हा अस बोलले ना तर मी खरचं निघून जाईल.” परी दाटलेल्या दल्याने हुंदके देत बोलली.
तिकडे रावीने देखील जरा दम टाकला. आता परी विजयच्या कुशीत जाऊन रडत आहे म्हटल्यावर ती काही आता मारणार नाही म्हणून रावी जरा निवांत झाली. तिने बाजूच्या टेबलवरची पाण्याची बाटली उचलून त्यातल पाणी प्यायली. परीला देखील तहान लागली असेल म्हणून तिच्याकडे पाण्याची बाटली घेऊन गेली आणि तिथेच ती फसली.
रावीला तिने तिच्या टप्प्यात येऊ दिल. जशी रावी परीच्या टप्प्यात आली तस तिने रावीला पटकन पकडून घेतलं आणि तिचे कान पकडून जोरात पिळायला घेतले.
“आऊऽऽऽऽऽऽऽच.” रावी कळवली. “दी ही तर चीटिंग आहे. तुला तहान लागली असेल म्हणून मी पाणी घेऊन आली आणि तू तर... इस्स्स्सस” परीने अजून जोरात कान पिळला. “नको ना दी..”
“बाबांच्या बाबत पुन्हा अशी मस्करी केलीस ना तर याद राख.” परी खूपच कडक आवजात बोलली.
“हे बरं आहे,” रावी “तू सगळ मामांना विचारून करते ते?”
“ते बाबा आहेत माझे,” परी कपाळवर आठ्या आणत बोलली. “मग त्यांनाच विचारणार ना.”
“मग तुझ मन मारून करणार का?” रावी पण आज शांत बसणार नव्हती.
“म्हणजे?” परीने आता तिचा कान सोडला. “मी अस काहीही केल नाहीये बाबा.” परीने विजयकडे पाहिलं.
“आता का?” रावी “मामांनी त्यांना का ठणकावून सांगितलं नाही की तू त्यांची मुलगी आहे म्हणून तू मामांवर रागावून बसली. पण तू स्वतः त्यांची मुलगी म्हणून वागतेस का?”
“रावी.” सायली चिडून बोलली. “काय बरळत आहेस तू? तुला तरी कळतय का?”
“दी ला विचार ना की मी खोट बोलते का?” रावी परीकडे बघून बोलली. “आजवर फक्त तुमचचा विचार करून ती जगत आली आहे. तिच्या काही आवडीच्या गोष्टी तर तिने सोडून दिल्या आहेत.”
तस विजय आणि सायली परीकडे बघायला लागले. तर परी रावीकडे चिडून बघायला लागली.
“तस काही नाहीये आई बाबा,” परी त्या दोघांना समजावून बघायला लागली. “ही काही पण बोलत आहे. मी काही बोलण्याच्या आधी माझ्या हातात सर्व काही आणून दिल आहे. मग अजून वेगळ सांगायची काही गरजच राहिली नाहीये. तिला तिच्या मनासारखं बाईकची रेसमध्ये जाऊ देत नाहीये ना म्हणून ती असा त्याचा बदला घेत आहे.”
आता ते दोघे रावीकडे बघू लागले. तिच्या अंगात किती नाटक होती हे तर सगळ्यांनाच माहिती होत आणि परी कधी खोट बोलत नव्हती. मग आता मोर्चा रावीवर जाऊ लागला.
“अस का?” रावी एक उसासा टाकत बोलली. “चला मग मी तुम्हाला काहीतरी दाखवतेच.” रावी तोऱ्यात बोलत परीच्या खोलीकडे जाऊ लागली.
तशी परी रावीला रोखून बघू लागली. ‘हिला काही समजल तर नाही ना?’ हा विचार तिच्या मनात येऊ लागला.
“चला ना.” सायली आणि विजयला अजूनही एकाच जागी उभे राहिलेले बघून रावी बोलली.
तसे ते दोघेही एकमेकांकडे बघत रावीच्या मागे जाऊ लागले. तशी परी पण त्यांच्या मागे जाऊ लागली.
रावी परीच्या खोलीत जाऊन एका ठिकाणी थांबली. सायली आणि विजय देखील तिच्या मागे आले. त्यांना आलेलं बघून रावीने एक वस्तू उचलली आणि त्या दोघांना विचारू लागली.
“हे काय आहे?”रावी
ते बघून परीने मनातच डोक्याला हात मारून घेतला. ‘राज, तुला मी सोडणार नाही. कोणाला सांगणार नाहीस म्हणून मी तुला सांगितलं आणि तुच..’ ती मनात बडबड करत शांत झाल.
“हे परीने आणल होत दिल्लीवरून,” सायली गोंधळून बघत राहिली. “तिला लेक्चरर म्हणून इन्व्हाईट केल होत तर त्या कॉलेजने तिला ते गिफ्ट दिल होत.”
“हे अस गिफ्ट कोणत कॉलेज देत?” रावी “सांगा बरं मला.”
तोच परी पटकन पुढे झाली. “त्यासाठी वेगवेगळे कॉलेज फिरावं लागत.” परी रावीच्या हातातली ती वस्तू घ्यायचा प्रयत्न करत बोलली. ते बघून रावीने तिचा हात अजूनच उंच केला. मग परीचा हात काही तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हता. “तुला नाही समजणार ते. दे बरं मला.”
“तर तू अजूनही एक्सेप्ट कर नाहीयेस तर.” रावी आता खट्याळ हसत बोलली. “माझ्याकडे त्या कॉलेजचे तुला हे गिफ्ट देतानाचे फोटो देखील आहेत.”
तशी परी तिला बावरून बघत राहिली. मग सायली आणि विजयला परीवर जरा शंका आली.
“आता खरं काय ते नीट सांग.” सायली रावीजवळ जात बोलली.
“आई, नको तिच्या मागे लागुस.” परी “बाबा तुम्ही तरी सांगा ना..” परी विजयकडे बघत बोलली.
पण विजयला देखील रावी काय बोलते ते ऐकायचं होत. परीने तिची आवड सोडून देण हे त्याला पटलचं नव्हत. याउलट तिला ज्याच्यात आवड आहे ते करायची तिला परवानगी दिली होती. त्यातूनच तिने शिक्षकाची भूमिका स्वीकारली होती.
“बोल तू.” विजय रावीकडे बघत बोलला.
“दी ला कोरीओग्राफर व्हायचं होत.” रावीने बोलायला सुरवात केली. “एवढी भारी डान्स करते ना दी की भल्या भल्या हिरोइन्सला मागे टाकेल. हे गिफ्ट नाहीये तर स्पर्धेत जिंकलेल अवॉर्ड आहे. जे दिल्लीमध्ये डान्स कॉम्पिटीशन झाली होती. आपल्या कॉलेजची एक डान्सर ऐन वेळेस तिथे पोहोचू शकली नव्हती. तेव्हा दी देखील एका गेस्ट लेक्चरसाठी गेली होती. फक्त आपल्या कॉलेजची बदनामी होऊ नये म्हणून दी तिची ओळख लपवून ह्या स्पर्धेत उतरली आणि कॉलेजसाठी हे बक्षीस घेऊन आली.”
आता रावीने तिचा बक्षीस घेतानाचा फोटो पहिला. पण त्यात परीचा चेहरा काही नीट दिसत नव्हता. बरं त्या डान्ससाठी कपडे देखील मिनी स्कर्ट वाला ड्रेस होता. त्यामुळे कपड्यांवरून तर ती परी आहे अस समजतचं नव्हत.
“ह.. हे काय,” परी उगाच हसत बोलली. “ह्यात कुठे मी दिसत आहे? मी असे कपडे तरी घालते का?” परीचा शेवटचा अयशस्वी प्रयत्न जो रावीच्या पुढच्या फोटोने सपशेल आपटला होता. ज्यात परी सोबत असेलेल्या तिच्या एका मुलीने काढला होता. कारण परी त्यात खूपच सुंदर दिसत होती.
रावीच बोलण ऐकून दोघांना धक्काच बसला होता. त्या दोघांनी तिथल्या बेडवर बडून घेतलं. सोबतच विजयने ते बक्षीस तर सायलीने रावीच्या हातातले फोटो बघायला घेतले. आता मात्र परी मान खाली घालून उभी राहिली.
“हे बघ दी,” रावीने बोलायला सुरवात केली. “मी हे काही सांगणार नव्हती. पण जी अपेक्षा तू मामांकडून ठेवलीस ना तिचं तू पूर्ण करत नव्हतीस. फक्त आत्तु आणि मामा सांगतील तस वागत राहिलीस. इव्हन त्यांना काय आवडेल? हे स्वतःच गृहीत धरून तू तुझ करिअर निवडल आहेस. मग मला बोलावं लागलं आणि मी यासाठी काही सॉरी बोलणार नाही.” रावी ठसक्यात बोलली आणि सायलीच्या बाजूला जाऊन बसली.
थोडा वेळ शांततेत गेला. कोणी काहीही बोलत नव्हत.
“बाबा,” न राहवून परी विजयजवळ जाऊन बसली. “ऐका ना पण.”
तसा विजय उठू लागला.
“बाबा,” न राहवून परी विजयजवळ जाऊन बसली. “ऐका ना पण.”
तसा विजय उठू लागला.
“बसा गप्प,” परी चिडून हक्काने बोलली आणि विजयला हाताने खाली बसवलं. विजय पण तिला आश्चर्याने बघू लागला. आज ती त्याची लेक आहे अस वाटून गेल. नाहीतर ती नेहमीच विजयच्या हो ला हो करत राहिली होती. “ठीक आहे मी तुम्हाला गृहीत धरल आणि तुम्ही पण मला मी शिकलेली आहे म्हणून सरळ माझ्यावर ती गोष्ट सोपवली होती ना?.झाली ना फिट्टम फाट. आता झाल गेल ते सोडून द्या. मी पण सोडत आहे.”
विजयने तिच्या डोक्यावर हात ठेवला. “आम्ही तुला आजवर कोणत्या गोष्टीला मनाई केली आहे का? आम्हाला इतकं तर माहिती आहे की जे काही तू करशील ते चांगलंच करशील. मग तुझी आवड तू का सोडलीस?”
“मला वाटल ते क्षेत्र, त्याचे कपडे तुम्हाला आवडणार नाहीत.” परी बारीक आवाजात बोलली.
“तस तर प्रत्येक क्षेत्रात चांगली आणि वाईट माणस असतात,” विजय तला समजावत बोलला. “म्हणून काय जगायचं सोडणार? आपण आपल्या कलेची मनापासून पूजा करायची. मग ती कधीच आपल्याकडून वाईट गोष्ट घडू देत नाही.”
“मग मारते आम्हाला ते.” रावी आठ्या पाडून बोलली.
“लातों के भूत बातों से नहीं मानते,” सायली तिचे ओठ ताणून बोलली. “त्यांना धरून ठेचावंच लागत आणि त्यातले तुम्ही तर भूतांचे राजेच आहात.”
“लातों के भूत बातों से नहीं मानते,” सायली तिचे ओठ ताणून बोलली. “त्यांना धरून ठेचावंच लागत आणि त्यातले तुम्ही तर भूतांचे राजेच आहात.”
तशी परी आणि विजय हसायला लागले. तर रावीने तिचं तोंड वाकड केल.
बराचं वेळ गेला होता. संध्याकाळचा प्रहर आता अंधाराकडे झुकू लागला. बराच मानसिक तणाव आल्याने शरीर पण थकल्यासारखं वाटायला लागल. आताच थोड्यावेळापूर्वी चहा झाला होता. तरीही सायलीने परत चहा बनवायला घेतला. तर परी तिला मदत करत होती. विजय आणि रावी हॉलमध्ये बसून टीव्ही बघायला लागले.
आता जे काही घडून गेल त्यावरून मन वळवण्यासाठी विजय टीव्ही बघण्यात व्यस्त झाला. रावीने देखील विजयच मन दुसरीकडे वळाव म्हणून टीव्हीवर विनोदी कार्यक्रम लावला होता.
किचनमध्ये तर सध्या शांतता फिरत होती. एकमेकींना एकमेकींशी काय बोलावं? हा प्रश्न दोघींना पडला होता. काही वेळात सायलीला काहीतरी आठवलं आणि ती परीला बघू लागली.
“आता काय?” परी चहाचे कप काढत बोलली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा