मागील भागात.
संध्याकाळचा प्रहर आता अंधाराकडे झुकू लागला. बराच मानसिक तणाव आल्याने शरीर पण थकल्यासारखं वाटायला लागल. आताच थोड्यावेळापूर्वी चहा झाला होता. तरीही सायलीने परत चहा बनवायला घेतला. तर परी तिला मदत करत होती. विजय आणि रावी हॉलमध्ये बसून टीव्ही बघायला लागले.
आता जे काही घडून गेल त्यावरून मन वळवण्यासाठी विजय टीव्ही बघण्यात व्यस्त झाला. रावीने देखील विजयच मन दुसरीकडे वळाव म्हणून टीव्हीवर विनोदी कार्यक्रम लावला होता.
किचनमध्ये तर सध्या शांतता फिरत होती. एकमेकींना एकमेकंशी काय बोलाव? हा प्रश्न दोघींना पडला होता. काही वेळात सायलीला काहीतरी आठवलं आणि ती परीला बघू लागली.
“आता काय?” परी चहाचे कप काढत बोलली.
आता पूढे.
परीचा आताचा सूर बघून सायलीला ती आता कुठ त्यांचीचे टिपिकल मुलगी वाटायला लागली.
“तू दिल्लीला गेलेली असताना चेहऱ्यावर मास्क घालून व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये तूच होतीस ना?” सायली बारीक डोळे करून विचारू लागली. “तेव्हा मी तुला बरोबर ओळखलं होत. पण तूच मला वेड्यात काढलं ना?”
आता मात्र परीने गालात हसत तिची हलकेच जीभ चावली. “हम्म हो बरोबर ओळखलं होतस मला.”
“मग पुन्हा असे फालतू प्रश्न प्रश्न विचारायचे नाहीत की आम्ही तुला जीव लावतो की नाही ते?” सायली तोंड वाकड करत बोलली.
“आई परत तेच?” परी तिचे ओठ बाहेर काढून लहान मुलीसारखं बोलली. “ती गोष्ट तुम्ही त्या माणसांना सांगायला हवी होती. तरी ते आणि तुम्ही नसले ऐकले तर मी माझ्या बाकी भावांना सांगितलं असत. मग त्यांनी बरोबर त्यांच्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितल असत.”
आता मात्र परी तोऱ्यात बोलली.
“ए बाई,” सायलीने थेट तिच्यासमोर हातच जोडले. “तुझ्या भावांना लगेच नको मध्ये आणत जाऊस. एक होती ती, तिलाच सांभाळता सांभाळता नाकी नऊ आल. त्यांना तर यातलं काहीच सांगू नकोस.”
“नाही गं आई,” परी तिला आश्वस्त करत बोलली. तोपर्यंत चहा तयार झाला होता, परीने तो कपात ओतला. सायलीने चहासोबत बिस्कीट काढली आणि ते सगळ घेऊन दोघी माय लेकी हॉलमध्ये आल्या.
त्या चौघांचा चहा बिस्किटांचा कार्यक्रम चालूच होता तोपर्यंत परीची भावंड घरी येऊन धडकली. सगळ्यांचे चेहरे टेन्शनने भरलेले होते. ते सगळे ह्या चौघांकडे बघत होते तर हे चौघ त्या सगळ्यांकडे आळीपाळीने बघत राहिले.
मग सायली आणि विजयने रावीला रोखून पाहिलं. पण तिचाच चेहरा गोंधळलेला होता. तरीही विजय तिला बारीक डोळे करून बघू लागला.
“व्हॉट?” रावी तिचे खांदे उडवत बोलली. “दीने आधीच माझा मोबाईल तिच्याकडे ठेवून घेतला होता.”
तस विजयने परीकडे पाहिलं. तर परीने तिच्या हातात असेलला रावीचा मोबाईल पहिला. मग ह्यांना कोणी काय सांगितलं? हा प्रश्न त्या चौघांना पडला.
आता परी, सायली आणि विजय सरळ विचारून तर काही सांगणार नाहीत. रावीने देखील काही सांगितल नाही म्हणजे तिला ही मनाई केली असेल. मग आता चिडून, विचारून, रागावून काहीच फायदा नसल्याचे बाकीच्यांना माहिती होते. मग त्यांनी एकमेकांकडे पाहिले.
“आजचा चहा म्हटलं मावशीकडे घेऊयात.” आरुष हसतच बोलला. त्याला बाकीच्यांनी देखील दुजोरा दिला आणि ते सगळेच हसत खेळत गप्पा मारत तिथे बसले. तर परी त्यांच्यासाठी चहा बनवायला गेली. तिला किचनमध्ये गेलेलं बघून सुजय पण तिच्या मागे तिला मदतीच निमित्त करून गेला.
“कोण आल होत?” सुजयने थेट मुद्याला हात घातला.
“कुठे कोण?” परीने जणू काहीच झाल नाही अस त्यालाच विचारलं.
“दी, उगाच खोट बोलू नकोस.” सुजय जरा चिडून बोलला.
“आता तू माझ्यावर आवाज चढवणार का?” परी पण चिडून बोलली. “तुला सांगितल आहे ना की जी गोष्ट तुला सांगावीशी वाटेल किंवा सांगावी लागेल. ती गोष्ट नक्कीच तुला सांगेल. मग आता काही सागंत नाहीये याचा अर्थ ती तुझ्या कामाची नाहीये.”
तस सुजयने नकारार्थी मान हलवत एक सुस्कारा सोडला आणि गपचूप परीला मदत करू लागला. परीने काहीही सांगितलं नाही हा मेसेज बाकी ग्रुप पर्यंत सुजयने पोहोचवला. मग त्यांनी त्यांचा मोर्चा रावीकडे वळवला. तिला कस गुंडाळायचं? हे बाकी मुलांना बरोबर माहिती होत.
पुढच्या काही वेळात माला उठली आणि किचनकडे जाऊ लागली. पहिले तर कोणाच लक्ष गेल नव्हत. पण बाहेर पडलेल्या सुजयला ती जाऊन धडकली. तेव्हा कुठे सर्वजण तिच्याकडे पाहू लागले.
“कुठे चालली?” सुजयने तिला गोंधळून विचारलं.
“कुठे म्हणजे किचनमध्ये.” मला सहज बोलून गेली.
तसे बाकी जण बसलेले खाडकन जागेवरच उभे राहिले. सुजय तर त्याच्या कानात बोट घालून तपासू लागला. रावी पण पटकन माला जवळ येऊन तिच्या कपाळाला हात लाऊन बघू लागली. ह्यांची ही नाटक बघून मालाने तिच्या भुवया उंचावत नकारार्थी मान हलवली आणि सरळ किचनमध्ये परीजवळ गेली. तर रावी विचार करत परत बाकीच्यांसोबत जाऊन उभी राहिली.
परी एक एक नजर तिच्यावर टाकली आणि परत चहाकडे बघू लागली. नंतर तिला जाणवलं की तिने काही चुकीच पाहिलं आहे का? म्हणून तिने झटकन तिची मान मालाकडे वळवली आणि ती पण मालाकडे बघतच राहिली.
ते बघून मालाने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले.
“किचन माझ्यासाठी इतक पण नवीन नाहीये.” माला चिडून ओरडली.
आजवर त्यांनी तिला कधी किचनमध्ये स्वतःहून येताना पाहिलंच नव्हत. जेव्हा कधी प्रणाली घरी असताना तिला ओरडून बोलवायची तेव्हा ती कशीतरी किचनमध्ये पोहोचायची. एकदा प्रणाली पुण्याला गेली की आपल्या घरात किचन नावाची गोष्ट आहे तेच ती विसरून जायची. घरात कामासाठी मावशी यायच्या त्याचच सर्व काम करून जात होत्या. महेशची आई तिला जमेल तितकं करत राहायची. त्यात महेशचे वडील देखील मदत करायचे. हा, कोणती बाहेरची काम असली की माला एका पायावर जायला तयार व्हायची. आज तिचं माला कोणीही न सांगता थेट किचनमध्ये जाऊन पोहोचलेली बघून सगळ्यांना धक्का तर बसणारच होता.
आजवर त्यांनी तिला कधी किचनमध्ये स्वतःहून येताना पाहिलंच नव्हत. जेव्हा कधी प्रणाली घरी असताना तिला ओरडून बोलवायची तेव्हा ती कशीतरी किचनमध्ये पोहोचायची. एकदा प्रणाली पुण्याला गेली की आपल्या घरात किचन नावाची गोष्ट आहे तेच ती विसरून जायची. घरात कामासाठी मावशी यायच्या त्याचच सर्व काम करून जात होत्या. महेशची आई तिला जमेल तितकं करत राहायची. त्यात महेशचे वडील देखील मदत करायचे. हा, कोणती बाहेरची काम असली की माला एका पायावर जायला तयार व्हायची. आज तिचं माला कोणीही न सांगता थेट किचनमध्ये जाऊन पोहोचलेली बघून सगळ्यांना धक्का तर बसणारच होता.
चहा कपात ओतून झाला होता. तरी परी मालाला फक्त बघत राहिलेली बघून मालाने परत तिची मान झटकली आणि चहाचे कप घेऊन ती हॉलकडे यायला निघाली. आता तर परीला चक्करच यायची बाकी राहिली.
जशी माला हॉलमध्ये आली तस बाकीच्यांनी एकमेकांना चिमटे काढले.
“माला दीने नक्कीच काहीतरी माती खाल्ली आहे,” रावी तिचे डोळे बारीक करून बोलली. “म्हणून आता मामांना पटवायची तयारी चालू आहे.” रावीच बोलण ऐकून बाकीच्यांनी सहमती दर्शवत एकमेकांकडे पाहिले.
तिथे फक्त विजयच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव नव्हते. जणू काही त्याला काय झाल असाव? याचा अंदाज आधीच होता.
मालाने सर्वात आधी विजयला चहा दिला. ती सायलीला चहा देण्यासाठी वळणार तोच विजयने तिच्या हाताला पकडून खाली बसवलं.
“बोल काय झाल?” विजय
ते ऐकून मालाने तिचे ओठ बाहेर काढले. “मॉम नुसती माझ्या मागे लागली आहे. एकदिवस माझ्या त्या मित्राला काय घरी घेऊन गेली तर ती त्याची माहिती काढायच्या मागे लागली आहे. त्याला फेसबुकवर शोधून पण काढलं. म्हणे पुढचं तू बोलशील का मीच मेसेज करू.”
“कोणता मित्र गं?” रावी लगेच मालाजवळ जात तिची भुवई उंचावत विचारू लागली. तिला चिडवण्यासाठी फक्त निमित्त पाहिजे होत.
“अगं त्या दिवशी घरी जाताना तिची बाईक बंद पडली होती.” आरुष बोलू लागला. “तर ती शाळेत असतानाचा एक मित्र तिला रस्त्यात भेटला. ज्याच स्वतःच बाईकच गॅरेज आहे. त्याने तिची बाईक चालू करून दिली आणि ती परत रस्त्यात बंद पडली तर तिला मदत म्हणून तिच्यासोबत घरी गेला. आजवर एकही मुलगा घरी आला नाही आणि त्यात ती त्याच्याशी जरा प्रेमाने बोलत होती. त्या दिवशी नेमकी शनिवार होता. प्रणाली मावशी घरी आली होती. तर मावशी तेच धरून बसली आहे.” शेवटी शेवटी तो हसू लागला.
तसे बाकीचे पण हसू लागले आणि माला त्यांना चिडून बघू लागली. रावीचा खट्याळपण लगेच उसळून बाहेर आला तिने तिच्या खांद्याने मालाला धक्का मारला.
“अम्म्म कोण आहे तो ज्याच्याशी तू प्रेमाने बोलत होतीस?” रावी लाजण्याच नाटक करत विचारू लागली. “आं?”
“हा असा सेम धक्का मी तुला देऊ का?” माला तिचे दात दाखवत चिडून बोलली. तशी रावी तिच्यापासून चार फुट लांब जाऊन उभी राहिली.
“तुम्ही तरी तिला सांगा ना काहीतरी.” माला विजयला विनवणी करत बोलली.
“आता तिने काहीतरी बघितलं असेल ना त्या मुलामध्ये,” विजय समजुतीच्या सुरात बोलला. “असही तुझ्या लग्नाच वय होत चालल आहे. मुलगा खरचं चांगला असेल तर करायला काय हरकत आहे?”
“अरे,” माला आठ्या पाडून बोलली. “आमच फिक्स आहे आधी आमच्या दीच नंतर आमच.”
“अरे,” माला आठ्या पाडून बोलली. “आमच फिक्स आहे आधी आमच्या दीच नंतर आमच.”
“अरे माकाडांनो,” सायली मधेच बोलली. “तुम्ही तुमच्या दीला एवढी सिक्युरिटी दिलीत की तिच्यासोबत एखादा साधा मुलगा बोलू ही शकला नाही आणि तुमच्या दीला अरेंज मरेज म्हटलं की सगळ काही सांगायची खुमखुमी येते. त्यात त्या आलेल्या मुलाने एक शब्द जरी इकडे तिकडे बोलला की तुम्हीच त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवता. मग कस व्हायचं तुमच्या दीच लग्न?” सायली सर्वांकडे आठ्या पाडून बोलली.
“मग आम्ही आमच्या दीला अश्या कोणाच्याही गळ्यात थोडी मारणार?” आरुष पण थोडा चिडून बोलला.
“अरे पण तुम्हाला माझ्या लग्नाची इतकी का घाई झाली आहे?” परी आता चांगलीच चिडून बोलली. “नशिबात असेल तर होईल लग्न, नाहीतर राहीन मी माझ्या बाबांजवळ.”
तसे विजयने तिच्याकडे त्याचे हात पसरवले. ते बघून परी लगेच त्यांच्या कुशीत जाऊन विसावली.
“मी बोलतो तुझ्या आई सोबत.” विजय मालाकडे बघून बोलला. तशी तिची पण कोमेजलेली कळी खुलली.
“आता आलाच आहात तर जेवण करून जा.” सायली सर्वांकडे बघत बोलली.
तस सगळयांनी पसरून बसून घेतलं. पण बसलेली माला परत उठली आणि किचनमध्ये जाणाऱ्या सायली आणि परीच्या मागे मागे जाऊ लागली. काय करता बाबा? तिच्या आईला मनवणारा एकच माणूस तिथे होता. त्याला नाराज करण हे मालाला परवडणार नव्हत. आता माला स्वतः गेली म्हणून रावीला पण नाईलाजाने किचनमध्ये जाव लागल. इकडे बाकी पुरुष मंडळीच्या गप्पा सुरु झाल्या.
आरुषने विजयकडे पाहिलं. “आजोबा बोलत आहे की मी आता त्यांच्या सोबत राहू. अस नाही की मला राजकारणात आवड नाही. पण माझी पहिली आवड माझा खेळ आहे.”
“त्यांच्या मागे त्यांचा वारसा कोणीतरी चालवावा अशी त्यांची इच्छा आहे,” विजय “त्यात काही चुकीच नाहीये. आधी त्यांनी मलाही विचारलं होत. पण मला त्यात रसच नव्हता. तुझ तस नाहीये. तुला त्यात आवड आहे, बाकी तुझा खेळ तू सोबत करू शकतोस. असही तू आतापासून फक्त कोचिंग करत आहेस. मैदानात तर नाही आहे ना. तर तू तुझा वेळ वाटून देऊ शकतोस.”
“तुम्ही पण आम्हाला आमच्या ॲकेडेमीपासून लांब करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना?” आरुषने बारीक डोळे करून विचारलं.
“तस असत तर एवढी मोठी इन्व्हेस्टमेन्ट केली असती का?” विजय पण त्याच सुरात बोलला. “आपल्याकडे पैसा आला म्हणून आम्हाला कधी उधळपट्टी करताना पाहिलं आहे का?”
“तस नाही ओ,” आरुष “आमच्या मातोश्रींना आवडत नाही ना ते, म्हणून म्हटलं तुम्ही पण त्यांना सामील झाले का काय? अस वाटलं मला. एकतर जेव्हापासून आजोबांनी तिच्या कानावर ह्या राजकारणाबद्दल टाकल आहे तेव्हापासून ती पण माझ्या मागेच लागली आहे की ते ॲकेडेमी सोड आणि बाबांसोबत जा.”
“मी तुम्हाला बंद करायला सांगत नाहीये,” विजय “तुमची ठराविक वेळेलाच त्याची बॅच असते. बाकी वेळ तुम्ही तिथे फक्त पसरून लोळत असता. तर तो वेळ दुसऱ्या चांगल्या ठिकाणी लावा.”
आपण लोळत असतो हे ऐकून त्या सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. ती गोष्ट विजयला कशी समजली तेच त्यांना समजून येत नव्हत.
“तुमचे बाप आहोत म्हटलं,” विजय असुरी स्मित देत बोलला. “घार आकाशात कितीही उंच उडाली ना तरी तिचं लक्ष तिच्या घरट्यातल्या पिल्लांवर बरोबर असत.”
तस बाकीचे उगाच तोंड ताणून हसू लागले. पण मनात विचार मात्र एकच की ही गोष्ट विजयपर्यंत पोहोचली कशी? त्या नंतर विजयने त्यांच्यासोबत ह्या ॲकेडेमी व्यतिरिक्त त्यांना दुसर काय करता येईल? जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर होण्यास मदत होईल.
ह्या वेळेस मात्र ते सगळेच विजयसोबत गंभीरपणे बोलू लागले. एकतर त्यांच्या आई वडिलांना निवांत बसून बोलण्यासाठी वेळ मिळत नव्हता. जेव्हा कधी असा वेळ मिळायचा तेव्हा हे सगळेच बोलण्यासाठीची ही संधी सोडत नव्हते. मग ते आई वडील त्यांच्या ह्या ग्रुपपैकी कोणाचेही असो ते सगळेच एकत्र राहिले होते. त्या सगळ्यांचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी त्यांचे विचार हे जवळपास सारखेच होते.
ह्या वेळेस मात्र ते सगळेच विजयसोबत गंभीरपणे बोलू लागले. एकतर त्यांच्या आई वडिलांना निवांत बसून बोलण्यासाठी वेळ मिळत नव्हता. जेव्हा कधी असा वेळ मिळायचा तेव्हा हे सगळेच बोलण्यासाठीची ही संधी सोडत नव्हते. मग ते आई वडील त्यांच्या ह्या ग्रुपपैकी कोणाचेही असो ते सगळेच एकत्र राहिले होते. त्या सगळ्यांचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी त्यांचे विचार हे जवळपास सारखेच होते.
सुजयने विजयसोबत बोलून आधीच बाईकच्या क्षेत्रात उतरणार असल्याच सांगितल होत. जसा विजने कारच्या क्षेत्रात नाव कमावलं होत. तर सुजयला बाईकच्या क्षेत्रात त्याच नाव कमवायचं होत. अनेक ब्रांडच्या बाइक्स एकाच ठिकाणी उपलब्ध होतील अस शोरूम त्याला उभ करायचं होत. ह्याने त्याच्या दोन गोष्टी साध्य होणार होत्या. त्याला त्यांच्या ॲकेडेमीमध्ये पण जाता येणार होत आणि ते शोरूम पण सांभाळता येणार होत. काही वेळाने जशी जेवणाची तयारी झाली तस सगळ्यांनी जेवण आटपून घेतली. नंतर अजून एकत्र बसून त्यांच्या गप्पांचा फड रंगला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा