Login

अवनी एक प्रवास भाग २०

राज तर अजूनही विजयने मोबाईलवर केलेल्या गोष्टीवर अडकून पडला होता. त्यामुळे प्रसादच्या बोलण्यामागचा अर्थ त्याला काही समजून आला नव्हता. पण त्यांची ती लहान बहिण आणि त्यांच्या आत्याची मुलगी त्या दोघींना मात्र प्रसादची लक्षणे काही ठीक दिसली नव्हती.
मागील भागात.

“रावी,” सायली आता जरा चिडून बोलली. “तुझा आशिक कोण? ज्या मुलाला परदेशातून हाकलून दिल त्याच्या प्रेमात?..”

“नाही नाही नाही नाही,” सायली पुढे बोलणार तोच रावीने नन्नाचा पाढा वाचून दाखवला. “तो माझ्या मागे होता. मग त्याला म्हटलं अस काही वाटत असेल तुला तर माझ्या घरच्यांसोबत बोल.”

तशी परीला भुवया उंचावून बघू लागली. कारण खरं काय ते तर तिला सगळ माहिती होत ना. मग रावीने ही नजरेनेच परीला आर्जव घातली.

“बोलली होती गं ती मला,” परीने लगेच रावीची बाजू सावरून धरली. “कॉलेजच्या गेट वर पण आला होता तिच्या मागे मागे. तेव्हा त्याला नीट समजावलं.”

“तू आणि नीट समजावलं?” सुजय चिडवत बोलला. “ते तर आऽऽऽ...” सुजय बोलता बोलता थांबला.

मग काय? वळला की मोर्चा सुजयकडे.

आता पूढे.

“काय केलत त्याला?” विजय पण आठ्या पाडून विचारू लागला.

“आम्ही काही नाही केल,” सुजय लगेच भोळा भाबडा होऊन बोलू लागला. “ते तर त्याच्या कॉलेजच्या मुलांनी ती गोष्ट मामांच्या कानावर घातली. मग मामा चिडले की माहीती आहे ना?” सुजय एक उसासा टाकत बोलला.

“त्याच सोडा ओ,” राज “तो गेला तेच बरं झाल. त्याचा रेकॉर्ड खूप खराब झाला होता. एकदाच दोन तीन मुलींसोबत डेट करण्याचा प्रयत्न करत होता. जसा सापडला तस त्या दोघींनी मिळून त्याला इतक धुतलं ना. कॉलेजने त्याला सरळ काढून टाकल.”

“पण घरी येऊन बोलला होता की त्याच शिक्षण पूर्ण झाल आहे तर इथेच त्याला एका कंपनीत जॉब लागला आहे म्हणून.” रावी गोंधळून बोलली.

“खोट बोलला तो,” राज त्याच तोंड वाकड करत बोलला. “दादा पण तिथेच होता त्याला विचार.” राज प्रसादकडे बघत बोलला.

“एवढ्या चांगल्या दिवशी त्याच कुठे नाव काढत आहात?” परीने विषय बदलला.

“मग काय तर?” राजनेही त्याचा मूड बदलला. “मी तर मामीच्या हाताची पावभाजी खायला आलो आहे.” राज ऑर्डर सोडत बोलला.

“अरे मला कामावर जायचं आहे,” सायली कपाळावर आठ्या आणत बोलली. “एकतर न कळवता आला आहेस. अस अचानक ऑफिसला नाही गेली ना तर आराध्या माझ्या डोक्यावर तांडव करेल.”

“त्याच टेन्शन तू नको घेउस,” राज तोऱ्यात बोलला. “ते मी बघतो.” एवढं बोलून त्याने त्याचा मोबाईल हातात घेतला आणि सरळ आराध्याला कॉल लावला.

तिकडे आराध्या देखील तिच्या कामावर जायची तयारी करत होती. तर राहुल आंघोळीला गेला होता. आरुष तर अजूनही बेडवर पसरलेला होता.

आपला मुलगा सकाळ उजाडूनही अजून उठलेला नाही बघून कोणत्या आईला ते सहन होत का? नाही ना? मग आराध्या देखील तिचं आवरून झाल्यावर थेट आरुषच्या खोलीत पोहोचली. नेहमीप्रमाणे त्याची खोली अस्ताव्यस्त होऊन आराध्याकडे आशेने बघायला लागली होती.

‘बाबांना काय म्हणून ह्याला राजकारणात उतरवायचं आहे? काय माहित?’ आराध्या मनातच बडबड करू लागली. ‘अजून त्याला स्वतःच आवरता येत नाही तर लोकांची काय मदत करेल?’

थोड फार त्याच्या बेडपर्यंत जागा होईल इतक तिने आवरलं आणि आरुषला मोठ्याने आवाज देत उठवायचा प्रयत्न केला. कारण तो कधीच एका आवाजात उठत नव्हता. तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला. जो तिच्या पंतच्या खिशात होता. तिने तो काढून पहिला. पहिले तर ती गोंधळलीच नंतर तिने तो लागलीच उचलला देखील.

“हेल्लो सासूबाई नंबर २.” राज त्याच्या शैलीत बोलला.

तसा तिकडे सायली आणि विजयने कपाळावर हात मारून घेतला आणि इकडे आराध्या देखील खळखळून हसली. मग तिला आरुषला उठवायची नामी युक्ती सुचली.

“बोला जावईबापू,” आराध्या मुद्दाम झोपलेल्या आरुषकडे बघून मोठ्याने बोलली. “आज कशी या सासुबाईंची आठवण आली.”

जावईबापू ऐकून राजला जरा धक्काच बसला. त्याने त्याच्या कानावरचा मोबाईल काढून एकदा पाहिलं आणि परत तो कानाला लावला. तो पुढे काही बोलणार तोच त्याला तिकडून आवाज यायला सुरवात झाली आणि राजला त्या जावईबापू या नावाची गोष्ट समजली. तसा तोही खळखळून हसला होता.

जस आराध्याने जावईबापू असा आवाज दिला होता. तसा आरुष खाडकन उठून बसला आणि त्याच्या आईकडे गोंधळून बघू लागला. स्वतःची युक्ती कमी आल्याने आराध्या विजयी मुद्रेने त्याच्या लेकाकडे बघू लागली. एक राज असा मुलगा होता जो ह्या अतरंगी भावंडांना पुरून उरायचा.

“आता कसा लगेच उठलास?” आराध्या हसतच बोलली.

“काही गरज आहे का ते शब्द बोलायची?” आरुष नाराज होत बोलला. “तिकडे जाऊन डोक्यात फरक झाला आहे त्याच्या. दी काही बोलत नाही त्याला म्हणून त्याच फावत. नाहीतर त्याला कधीच दाखवलं असत जावायची खातीर कशी असते ती.”

“हो का?” आराध्या त्याला चिडवत बोलली. “विसरलात का मागच्या वेळेस त्याने तुमच्याकडून पूर्ण घर साफ करून घेतलं होत ते?” आता मात्र आराध्याला हसायला आल. तिचं हसण ऐकून राजही तिकडे हसायला लागला.

“तुम्ही ते विसरू देणार आहात का?” आरुष बेडवरून उठत बोलला. “आणि तू हे विसरू नकोस की तू माझी मॉम आहेस.”

“हो रे माझ्या राज्या,” आराध्याने त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. “जा आवर लवकर. मला आणि तुझ्या बाबांना लवकर जायचं आहे. नंतर आजोबांना घेऊन तुला देखील यायचं आहे.”

“ठीक आहे मॉम.” आरुष आळस देत बाथरूममध्ये गेला.

“बोल रे कसा आहेस?” आराध्याने फोनवर बोलायला सुरवात केली. “कधी येणार आहेस?”

“मी ऑलरेडी माझ्या सासुरवाडीमध्ये आहे.” राज मिश्कील होत बोलला.

आता मात्र विजयने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तसा राज लागलीच शांत झाला. याचा सर्वात जास्त आंनद सुजय आणि माला या दोघांना झाला.

“मी आलो आहे परत इथे,” राज आता शहाण्या बाळासारखा बोलला. “आज म्हटलं मामींच्या हातची पावभाजी खाऊ तर तिला ऑफिसला यायचं आहे.”

“येऊ दे की मग,” आराध्या आता त्याची फिरकी घ्यायला लागली. मस्करीत बोललेला राज आता शहाणा होऊन बोलत आहे याचा अर्थ विजयने त्याला नक्कीच चिडून पाहिलं असणार याचा तिला अंदाज आला होता. “पाव भाजी तुला रात्री पण मिळू शकते.”

“अम्म रात्री आम्ही आरती मावशीच्या घरी जाणार आहे.” राज

“ती घरी आली नाहीये अजून.” आराध्या त्याला माहिती पुरवत बोलली.

“मग आज्जी आजोबांकडे जातो.” राज

“म्हणजे तुला इथे थांबायचं नाही ना,” सायलीच्या कपाळावर परत आठ्या चढल्या. “ठीक आहे. आता फक्त पावभाजी मग माझ्याकडे.” सायली त्याच्यावर रुसून जाऊ लागली.

“ठीक आहे थांबतो आज इथेच.” राज नमत घेत बोलला. “पण अश्या रुसू नका ओ मामी.” राज पूर्ण नाटकी आवाजात बोलला.

ते ऐकून आराध्या पण मनमुराद हसली. “दुपारपर्यंत आपली मिटिंग आटपून जाईल. मग जा तू परत तुझ्या जावयाचे लाड करायाला.” आराध्या हसतच बोलली.

तशी सायली पण हसली आणि तिने फोन ठेवून दिला. “आलीच मी दुपारपर्यंत.” ती सर्वांकडे बघत बोलली.

“आमच्यासाठी कधी अशी आली नाहीस.” सुजय गाल फुगवून बोलला.

तस सायलीने दीर्घ श्वास घेत नकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या खोलीत निघून गेली. मग विजय देखील त्याच आवरायला सायलीच्या मागे मागे गेला.

“हाऊ रोमांटिक ना,” राज खट्याळ होत बोलला. “आवरायला अजूनही एकमेकांना मदत करतात.”

तसा हास्याचा एक स्फोटच फुटला. तर आतल्या खोलीत जाणारे सायली आणि विजय त्यांच्या ह्या खट्याळ भाच्याला रोखून बघू लागले. तसा राज शांत झाला पण विजयने एक सुस्कारा सोडला आणि त्याचा मोबाईल उचलला. थोडावेळ त्या मोबाईलवर काहीतरी केलं आणि राजला एक आसुरी स्मित देत त्यांच्या खोलीकडे चालायला लागला.

त्याच्याकडे आलेली ही आसुरी स्मित राज त्याच्यासाठी येणारी धोक्याची घंटा जाणवून गेला. तसा त्याचा चेहराच उतरला. त्याचा उतरलेला चेहरा बघून माला आणि सुजय मात्र असुरी स्मित देत हसू लागले.

ह्यांना बघून परी आणि रावीने एक एक सुस्कारा सोडला.

“मामा नाही ना.” राज विनंतीच्या सुरात बोलू लागला.

यावरही विजयने त्याचे ओठ ताणले आणि खोलीत निघून गेला. मग राजने सर्वांकडे पाहिले. आता त्याच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे ते येणारा काळच सांगणार होता.

“आता आज्जी आजोबांकडे जा,” परीने बोलायला सुरवात केली. “रात्रीपर्यंत परत या. ते पण आज रात्री गावाला जाणार आहेत. परत लवकर भेट होणार नाही मग तुमची.”

तस प्रसाद आणि राजने एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या बहिणीने देखील सहमती दर्शवली आणि ते चौघे त्यांच्या आज्जी आजोबांकडे जायला निघाले.

“ते आपल्या दोन्ही मॉम मालाच्या वडिलांना पण राखी बांधायच्या ना?” प्रसाद विचार करत बोलला. ते विजयच्या घरातून निघून त्यांच्या बिल्डींगच्या खालच्या आवारात पोहोचले होते.

“हो रे,” राज त्याच्याच धुंदीत बोलू लागला.

“म्हणजे ते पण आपले मामा झाले?” प्रसादच्या चेहऱ्यावर चमक आली.

“हो बरोबर.” प्रसादची लहान बहिण प्रसादला बारीक डोळे करून बघू लागली. त्याच्यावर तिला जरा शंका यायला लागली.

राज तर अजूनही विजयने मोबाईलवर केलेल्या गोष्टीवर अडकून पडला होता. त्यामुळे प्रसादच्या बोलण्यामागचा अर्थ त्याला काही समजून आला नव्हता. पण त्यांची ती लहान बहिण आणि त्यांच्या आत्याची मुलगी त्या दोघींना मात्र प्रसादची लक्षणे काही ठीक दिसली नव्हती.

“आता अस नको बोलू की ती तुला आवडायला...” आत्याची मुलगी बोलता बोलता थांबली. कारण प्रसादचा चेहरा हे ऐकून चांगलंच चमकून उठला.

तिचं बोलण ऐकून राजही त्याच्या विचारातून बाहेर आला. “कोण कोणाला आवडत?”

“आपल्या दाद्याला माला आवडते.” त्यांची लहान बहिण तिचं हसू आवरत बोलली.

तसा राजने चमकून प्रसादकडे पाहिलं. त्याच्या गालावर लाजेची लाली चढलेली होती.

“ए बाबा,” राज त्याच्या खांद्याला धरून त्याला जोरात हलवत बोलला. “बरा आहेस ना तू? तिला याची भनक जरी लागली ना ती तुला कुठे उचलून फेकेल याचा तपास पण लागणार नाही.”

“का?” प्रसाद “ती पण मुलगीच आहे ना? तिलाही मन आहे. जिंकेल की मी तिचं मन.”

तसा राजने त्याच कपाळ बडवलं. “तू आज ओळखत आहेस का तिला? माला आणि प्रेम शक्यच नाही. तिला..”

“अशक्य ही शक्य करण हे आपल्या घराण्यात एकालाच जमत,” राज पुढे काही बोलणार तोच प्रसादने बोलायला सुरवात केली. “आणि तेही परफेक्ट जमत.” प्रसाद राजच्या डोळ्यात बघून बोलला.

यावरून प्रसाद त्याच्या ह्या बोलण्यावर किती गंभीर होता हे राजला चांगलच समजून चुकल.

“आजवर मला इतक्या मुलींचे प्रपोज आले,” प्रसाद गंभीर होऊन बोलला. “अगदी नको नको त्या ऑफर देखील आल्या. पण मला त्या कधीच आवडल्या नाहीत. पण आज सकाळी दारात तिला बघितल्यापासून मनाला वेगळच काहीतरी वाटत आहे. पोटात खोल खड्डा पडला जेव्हा ती आपल्याला बघत राहिली होती.”

“तुला दुसरी कोणी का भेटली नाही?” राज दीर्घ श्वास घेत बोलला.

“आता मनाला तिचं आवडली काय करू?” प्रसाद आशेने राजकडे बघू लागला.

आपल्या मोठ्या भावाला कोणीतरी मुलगी आवडली आहे ह्या गोष्टीत आनंद मानायचा की त्याला माला आवडली ह्या गोष्टीच टेन्शन घ्यायचं तेच राजला समजत नव्हत. पण त्याचा तो आशेने भरलेला चेहरा बघून राजला त्याच मन मोडण बरोबर वाटल नाही.

आजवर त्याने घेतलेले चलेंज कधीच हरला नव्हता. बुद्धीचातुर्य त्याच्या नसानसात भरलेलं होत. त्याने ठरवलं की तो नक्कीच पूर्णत्वास नेणार याची खात्रीच होती. म्हणून जेव्हा प्रसादला मालाबद्दल ह्या नव्या भावनेची जाणीव झाली त्याने लागलीच ती गोष्ट राजच्या कानावर घातली.

तर दुसरीकडे मालाला देखील प्रसादचं अस तिच्याकडे बघत रहाण वेगळच वाटून गेल. जेव्हा की त्या दोघांकडे चिडून बघत होती. पण नंतर हा तिचा झालेला भास असावा म्हणून त्याकडे तिने दुर्लक्ष केल.

सायली आणि विजय दोघेही तयार होऊन हॉलमध्ये आले. परी आणि मालाच तर आधीच आवरून झाल होत. आता रावी तिचं आवरायला गेली होती. तोपर्यंत विजय आणि सायली घराबाहेर पडले. तर सुजय परत त्याच्या खोलीत झोपायला जायच्या तयारीत होता. नंतर त्याला आठवलं की आराध्याला फोन झालेला असूनही अजून आरुषचा त्याला फोन आला नव्हता. याच त्याला जरा आश्चर्यचं वाटल. तसा तो लगेच त्याच्या खोलीत गेला आणि आरुषला फोन लावू लागला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all