मागील भागात.
मालाला देखील प्रसादच अस तिच्याकडे बघत रहाण वेगळच वाटून गेल. जेव्हा की त्या दोघांकडे चिडून बघत होती. पण नंतर हा तिचा झालेला भास असावा म्हणून त्याकडे तिने दुर्लक्ष केल.
सायली आणि विजय दोघेही तयार होऊन हॉलमध्ये आले. परी आणि मालाच तर आधीच आवरून झाल होत. आता रावी तिचं आवरायला गेली होती. तोपर्यंत विजय आणि सायली घाराबाहेर पडले. तर सुजय परत त्याच्या खोलीत झोपायला जायच्या तयारीत होता. नंतर त्याला आठवलं की आराध्याला फोन झालेला असूनही अजून आरुषचा त्याला फोन आला नव्हता याच त्याला जरा आश्चर्यच वाटल. तसा तो लगेच त्याच्या खोलीत गेला आणि आरुषला फोन लावू लागला.
आता पूढे.
आरुषने त्याच आवरलं होत. आराध्या आणि राहुल तर निघून गेले होते. आता तो त्याच्या आजोबांची तयारी व्हायची वाट बघू लागला. मग तो ही त्याच्या खोलीत बसून त्याचा मोबाईल चाळू लागला. त्यात खेळाची माहिती, स्पर्धेची माहिती, त्यांच्या अकॅडेमीमध्ये अजून काही सुधारणा करता येतील का? याची माहिती, डायेटची माहिती अश्या एक ना विविध प्रकरची माहिती तो मोबाईलवर सतत चाळत राहायचा. फक्त तोच नाही तर त्याची ही बाकीची मंडळी देखील सतत काही ना काही नवीन माहिती मिळते क?ा ते बघत राहायची.
तो अशीच एक माहिती बघत असताना त्याच्या मोबाईलवर सुजयच नाव झळकल. ह्या वेळेपर्यंत तो घरात एकटा असतो हे आरुषला माहिती होत. त्यामुळे तो आता निवांत होऊन बोलायला लागला.
“अरे वा,” आरुष “आज सकाळीच चम्पियनचा फोन.”
“घरात माणस आहेत अजून.” सुजय हलक्या आवाजात बोलला.
“उप्प्स सॉरी.” आरुषही लगेच शांत झाला. “आज सकाळीच काही विशेष?”
“तुझे जिजाजी घरी आले आहेत ना, त्याची काय तयारी केली आहे? ते विचारयाचे आहे.” सुजय जरासा चिडून बोलला.
“काय सकाळीच घेतली आहे का?” आरुष बेडवर पसरत बोलला. “कोणते जिजाजी रे?”
“सकाळी मावशीला फोन आला होता तो ऐकला नाहीस का?” सुजय अजूनच चिडून बोलला.
“अच्छा त्या सो कॉल्ड जावयाचा,” आरुष अजूनही निवांत होता. “आला होता ना, माझ्या मॉमने मला उठवायला त्याचा वापर केला.” आरुष वैतागून बोलला.
“तोच जावई घरी अवतरला आहे.” सुजय
तसा बेडवर पसरलेला आरुष खाडकन उठून बसला. “व्हॉट?”
“आता अस नको बोलू की सकाळी फोन येऊनही तुला समजल नाही ते.” सुजय उसासा टाकत बोलला . कारण आरुषला खरचं समजलं नव्हत ते सुजयला समजून गेल होत.
“आपले सुखाने जगायचे दिवस संपले वाटत.” आरुष डोक्याला हात लावत बोलला.
“त्याची सुरवात तर मागेच झाली होती जेव्हा डॅडने आपल्या सर्वाना आपले फ्युचर प्लान विचारायला घेतले होते.” सुजय
“म्हणजे?” आरुष आता सावरून बसला.
“म्हणजे?” आरुष आता सावरून बसला.
“तू तुझ्या मोबाईलमध्ये नक्की काय बघतोस रे?” सुजय चिडून बोलाला. “डॅडने मेसेज केला आहे बघ.”
तसा आरुषने विजयचे मेसेज उघडले. त्यात स्पष्ट लिहील होत की दुपारी ते सगळेच त्यांच्या अकॅडेमीमध्ये पसरून बसत असल्याची माहिती राजनेच त्याला दिली होती.
तसा आरुषने विजयचे मेसेज उघडले. त्यात स्पष्ट लिहील होत की दुपारी ते सगळेच त्यांच्या अकॅडेमीमध्ये पसरून बसत असल्याची माहिती राजनेच त्याला दिली होती.
हा मेसेज वाचून आरुषने डोळे घट्ट मिटून परत उघडले. “त्याचा एक फोटो मिळाला होता ना एका मुलीसोबतअसल्याचा?”
“हो आहे ना.” सुजय उत्साहात येत बोलला.
“दे पाठवून तुझ्या आत्याला.” आरुष असुरी स्मित करत बोलला. आज पहिल्यांदाच राज त्याच्या तावडीत सापडणार होता.
“हो रे,” सुजयच्या डोळ्यात देखील चमक आली. “बघ आता ह्या जावयाची कशी खातीर होते ते.”
मग दोघेही त्यांच्या ह्या प्लॅनवर हसले आणि फोन ठेवून दिला.
तिकडे राजला मात्र ह्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. तो तर त्याच्या मोठ्या दादाच्या प्रेमाची गाडी रुळावर कशी आणायची? या कल्पनेत रममाण होता.
तिकडे राजला मात्र ह्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. तो तर त्याच्या मोठ्या दादाच्या प्रेमाची गाडी रुळावर कशी आणायची? या कल्पनेत रममाण होता.
सुजय पण आता राजची होणारी फजितीची कल्पना करून गालात हसत होता. तो खोलीत जाऊन परत झोपला तर नाही ना? ते बघायला परी त्याच्या खोलीत आली होती. तर तिला तो गालात हसताना दिसला. त्याच ते हसण परीला काही बरोबर वाटल नाही.
“आता काय करायच्या विचारात आहात भाऊराया?” परी अचानक मोठ्याने बोलली.
तसा सुजय पहिले तर दचकलाच. नंतर लगेच स्वतःला सावरत बोलू लागला. “तेच आता जे तुझा सो कॉल्ड फ्रेंड आराध्या मावशीला बोलला ना तेच आरुषला विचारात होतो. त्याच्याही कानावर घातलं ना की तुझा फ्रेंड आला आहे म्हणून.”
“तुम्ही त्याच्यावर एवढे का जळता?” परी आठ्या पाडून विचारू लागली.
“मग तुला डायरेक्ट डार्लिंग का बोलतो?” सुजय लहान मुलासारखा तोंड पाडून बोलला. “वरून तू त्याचीच बाजू घेतेस.”
“तो फक्त मस्करीत बोलतो,” परी त्याला समजावत बोलली. “त्याच्या मनात अस काही नसत आणि तुम्ही चिडता म्हणून तो जाणूनबुजून अजून बोलतो.” परी हसून बोलली.
“बघ घेतलीस ना त्याची बाजू.” सुजय
“हो,” परी “कारण तो डोक्याने चालतो आणि तुम्ही डोक्याचा वापरच करत नाही. उठले का सुटले.”
परी हसायला लागली तर सुजय त्याच्या कपाळावर आठ्या पाडून परीकडे बघू लागला.
“आवर लवकर,” परी त्याचे केस विस्कटत बोलली. “नाहीतर झोपशील परत.”
“आज कशी झोप लागेल?” सुजय काहीतरी आठवत बोलला. “आज मालासोबत ऑनलाईन गेम खेळेल ना.’
“लहान आहात का रे?” परी तिच्या भुवया ताणत बोलली.
“अगं दि,” सुजय “तू पण एकदा आमच्यासोबत प्ले स्टेशनवर खेळून बघ. खूप मजा येते.”
“गेम खेळायला मी काही लहान नाही,” परी तोऱ्यात बोलली. “म्हणून मी राजची बाजू घेते.”
तसे सुजयने त्याचे डोळे फिरवले. “मालाला जाऊन सांगशील का?” सुजय त्याचे ओठ ताणून बोलला.
“हो सांगते तिला.” परी तिचे केस उडवत त्याच्या खोलीतून बाहेर पडली.
जशी ती हॉलमध्ये आली तस तिला माला तिच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी गेम खेळताना दिसली. ते बघून परीने नकारार्थी मान हलवली.
“लग्नाच्या वयाला आले आहात,” परी तिच्याकडे बघून बोलू लागली. “तरी लहान मुलासारखे काय गेम खेळता रे?”
अचानक आलेल्या आवाजाने माला पहिले तर दचकलीच. नंतर समोर परीला पाहून तिने एक दीर्घ श्वास घेतला. “दी घाबरले ना मी.”
“तुला बघून मुल घाबरतात.” परी तिला चिडवत बोलली. “कस व्हायचं तुझ लग्न?”
“तू आहेस की माझ्यासाठी मुलगा बघायला.” माला लगेच लाडात येत तिच्या हाताला स्वतःचे हात गुम्फवत बोलली.
“मी आणि तुझ्यासाठी मुलगा बघू?” परी धक्का बसल्यासारखी बोलली. “व्हॉट अ जोक?”
“मग जोकला सुरवात कोणी केली?” माला तिच्या कपाळावर आठ्या आणत बोलली. “मी काही मॉम डॅडला सोडून जाणार नाहीये. भले घरजावई व्हायला तयार झाला तर कदचीत मी विचार करेल.”
ते ऐकून परीने तिचं कपाळ बडवलं. ‘उत्तर माहिती असून मी का यांच्या मागे लागते?’ तिने स्वतःलाच भांडून घेतले.
“बरं बरं,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “सुजय आज त्याच प्ले स्टेशन काढणार आहे. तुझ्यासोबत खेळायचं आहे म्हणे.”
“रिअली?” माला लगेच उत्साहात आली. ती तशीच उठली आणि सरळ सुजयच्या खोलीकडे धावली.
हे सगळ बोलण रावीने देखील ऐकल होत. मग ती पण मालाच्या पाठी पाठी चालली होती. ते परीने पाहिलं आणि रावीला तिने आवाज दिला.
“अय अय अय सुपर फास्ट एस्क्प्रेस,” परी कडक आवाजात बोलली. तशी रावी तिच्याकडे गोंधळून बघू लागली. “तू कुठे तिकडे चाललीस? चल कॉलेज आहे आपल्याला.”
“दी प्लीज ना?” रावी विनंतीच्या सुरात बोलली.
“नाही सांगितलं ना,” परी चिडून बोलली. “फक्त शरीराने मोठे झाले आहेत. बुद्धी मात्र लहानच आहे. चला गपचूप कॉलेजला. नाहीतर तुझ प्रोजेक्टच पुराण मामींसमोर वाचून दाखवेल.”
“अंऽऽऽऽ,” रावी अगदीच लहान मुलीसारखी वागू लागली.
ते बघून परीने तिचा मोबाईल कानाला लावला. “हा मामी, तुमची लेक...” ती पुढे काही बोलणार तोच रावीने तिचा मोबाईल तिच्या हातातून काढून घेतला.
“खडूस.” रावी तिच्या मानेला झटका देत हॉलमध्ये बसली.
“अशी बसू नकोस,” परी तिला बसताना बघून बोलली. “तुला माझ्या आधी कॉलेजला पोहोचायचं आहे.”
तशी रावी तिचे गाल फुगवून उठली आणि बॅग घेत घरातून बाहेर पडली. तिच्यामागे परी देखील घरात काही काम बाकी आहे का? ते बघून तिची बॅग घेत घराबाहेर पडली.
रावी आधीच तिची बाईक वेगात चालवायची म्हणून ती लवकरच कॉलेजला जाऊन पोहोचली. परी मात्र जपून जपून तिची स्कुटी चालवत रावीपेक्षा पाउण तास लेट कॉलेजला जाऊन पोहोचली. मग तिने तिचे दिवसभरातले लेक्चर आटोपले. रावी तिचं कॉलेज आटपून तिच्या घरी निघून गेली. परीला मात्र अजूनही काही लेक्चर बाकी असल्याने ती अजूनही कॉलेजमध्येच होती.
आज बरेच लेक्चर लाईनमध्ये असल्याने ते सर्व आटोपता आटोपता संध्याकाळ झाली. आज कामाचा बराच ताण आल्याने परी खूपच थकली होती. तिला कधी घरी जाऊन पोहोचते अस झाल होत.
जशी तिची कॉलेजमधली सगळी काम आटोपली तशी ती कॉलेजच्या पार्किंगला गेली. तिथून तिची स्कुटी काढून ती कॉलेजच्या गेटजवळ पोहोचली. ती पुढे जाणार तोच तिला तिच्या नावाने आवाज ऐकू आला. पहिले तर तिचं तिच्या स्वतःच्या नावाकडे लक्षच नव्हत. कारण तिथे तिच्या त्या नावाने हाक मारणार कोणीच नव्हत. तिचे विद्यार्थी तिला मॅम बोलत होते. तर तिची भावंड दी म्हणून हाक मारत होते. तर बाकी मंडळी तिला परी ह्याच नावाने हाक मारत होती. नंतर दुसऱ्यांदा आवाज आल्यावर तिने तिची स्कुटी थांबवून मागे पाहिलं.
आवाज देणाऱ्या त्या मुलाला बघून परीच्या कपाळावर आठ्या चढल्या. कारण तिला हरीश आवाज देत होता.
“हाय,” हरीश तिच्याजवळ जरासा धावतच पोहोचला. “सॉरी ते अस गेटजवळ तुला हाक मारली.”
त्याच ते बोलण ऐकून परीला जरास हायस वाटल. कारण त्याने अदबीने सॉरी म्हटलं होत. ‘म्हणजे जरा मनर्स आहेत म्हणायचं.’ ती मनातच पुटपुटली.
“बोला.” परी जरा नाखुशीनेच बोलली. त्याच्या तिला भेटायच्या कारणाचा तिला जरा अंदाज होताच.
“अस रस्त्यात नको,” हरीश इकडे तिकडे बघत बोलला. “तिकडे कॉफीशॉपमध्ये जाउयात?”
यावर परीने जरा विचार केला. “माझ्या तूमच्याकडे येण्याच विचारात असाल तर सॉरी. माझा निर्णय झाला आहे. मी काही तिकडे येणार नाहीये.”
परीने तिचा निर्णय सुनावला.
“ठीक आहे,” हरीश सुस्कारा सोडत बोलला. “एवढ्या लांबून आलो आहे तर दोन मिनिट तर बोलशील?” त्याने आर्जव केली.
मग परीचा नाईलाज झाला आणि तिने तिची स्कुटी त्या गेटजवळच लावली. तोपर्यंत तो पुढे जात असल्याच तिला सांगितल आणि तो त्या बाजूला जायला लागला.
परी जाणाऱ्या हरीशकडे बघत राहिली. तिला त्याच्या मनाचा अंदाजच येत नव्हता. एरवी समोरच्या व्यक्तीचा चेहरा बघून तिला तिच्या मनाचा थोडाफार अंदाज यायचा. पण हरीशचा चेहरा वाचण्यात तिला जरा अडचण येत होती. एकतर त्याने हा चांगुलपणाचा मुखवटा चढवलेला आहे किंवा तो माणूस म्हणून अगदीच चांगला आहे. तरीही ती त्याला आज दुसऱ्यांदाच भेटत होती. त्यामुळे कोण्या एका निष्कर्षापर्यंत ती लगेच पोहोचणार नव्हती.
तिने तिची स्कुटी लावली आणि तो गेलेल्या कॅफेच्या दिशेने जाऊ लागली. आजूबाजूला तिचे कोणी विद्यार्थी तर नाही ना? हे सुद्धा तिने पाहून घेतलं. ती कोण्या कॅफेमध्ये गेली म्हणून नाही तर ती कोण्या मुलासोबत कॅफेमध्ये आहे हे समजल्यावर तिची बंधू मंडळी लागलीच तिथे येणार होती.
काही क्षणातच ती त्या कॅफेमध्ये जाऊन पोहोचली. आत गेल्यावर तिने तिची नजर फिरवली आणि जिथे हरीश बसला होता तिथे ती जाऊन बसली. तिथला वेटरही लागलीच तिथे आला आणि दोघांनी ज्यांची त्यांची ऑर्डर दिली.
काही वेळ असाच शांततेच गेला. काही वेळाने त्यांची ऑर्डर देखील आली.
“हे बघा माझ्याकडे जास्त वेळ नाहीये,” परीने कॉफी घेता घेता बोलायला सुरवात केली. “अजून थोडावेळ जरी मी इथे थांबली ना तरी लगेच मला फोन यायला सुरवात होतील.”
“एवढं तुला स्ट्रीक्ट वागवतात तरी तुला त्या घरात राहायचं आहे?” हरीश लागलीच अजाणतेपणे बोलून गेला.
“का?” परी लागलीच कपाळावर आठ्या आणून बोलली. “तुम्ही घरातून न सांगता कुठे गेले तर तुम्हाला कोणी विचारात नाही का? आणि नसतील विचारात तर तुम्ही का त्या घरात राहता?”
परीच सडेतोड बोलण ऐकून त्याला जरा धक्काच बसला. कारण त्या दिवशी परी जास्त काही बोलली नव्हती आणि त्यांनी थोड तिला भावनिक केल्यावर ती भावनिक झाली देखील होती. पण आताची अवनी त्याला वेगळीच दिसायला लागली होती.
“तस नाही म्हणायचं मला,” हरीशने लगेच स्वतःला सावरल. “पण आता मोठी झाली आहेस तर थोडा फ्रीडम तरी पाहिजे ना.”
“ते मी आणि माझ कुटुंब बघून घेईल.” परीने तिची कॉफी संपवली देखील. कारण तिने कॉल्ड कॉफी घेतली होती. जेणेकरून तिला थोडीजरी शंका आली तर तिला तिथून लागलीच निघता येणार होत आणि हरीशच्या पहिल्याच वाक्यात तिला शंका आली. त्याने चांगुलपणाचा मुखवटा चढवल्याचे तिला समजून गेले.
‘अरे यार,’ हरीश मनातच बोलू लागला. ‘हिच्या मनातून ते कुटुंब लवकर आणि सहज काही निघणार नाही. काहीतरी वेगळ केल पाहिजे.’
तिच्या माझ कुटुंब ह्या शब्दाने ती तिच्या कुटुंबात किती गुंतली होती हे त्याला चांगलच समजून आल होत. ‘नाहीतर लग्नही होणार नाही आणि प्रोपर्टी पण हातातून जाईल. त्या प्रोपर्टीची माहिती ज्याने कोणी त्या आश्रमापर्यंत पोहोचवली ना तो फक्त एकदा तावडीत आला पाहिजे.’
त्याचे मनातच विचार चालू होते.
“तुमच मनात आणि स्पष्ट बोलून झाल असेल तर मी निघते.” हरीशला मनातच विचार करताना बघून परी बोलली.
तिचं बोलण ऐकून हरीशला परत झटका बसला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा