मागील भागात.
"ते मी आणि माझ कुटुंब बघून घेईल.” परीने तिची कॉफी संपवली देखील. कारण तिने कॉल्ड कॉफी घेतली होती. जेणेकरून तिला थोडीजरी शंका आली तर तिला तिथून लागलीच निघता येणार होत आणि हरीशच्या पहिल्याच वाक्यात तिला शंका आली. त्याने चांगुलपणाचा मुखवटा चढवल्याचे तिला समजून गेले.
‘अरे यार,’ हरीश मनातच बोलू लागला. ‘हिच्या मनातून ते कुटुंब लवकर आणि सहज काही निघणार नाही. काहीतरी वेगळ केल पाहिजे.’ तिच्या माझ कुटुंब ह्या शब्दाने ती तिच्या कुटुंबात किती गुंतली होती हे त्याला चांगलच समजून आल होत. ‘नाहीतर लग्नही होणार नाही आणि प्रोपर्टी पण हातातून जाईल. त्या प्रोपर्टीची माहिती ज्याने कोणी त्या आश्रमापर्यंत पोहोचवली ना तो फक्त एकदा तावडीत आला पाहिजे.’
“तुमच मनात आणि स्पष्ट बोलून झाल असेल तर मी निघते.” हरीशला मनातच विचार करताना बघून परी बोलली.
तिचं बोलण ऐकून हरीशला परत झटका बसला.
आता पूढे.
‘हिला काय मनातल पण ऐकू येत काय?’ तो परत मनातच विचार करू लागला.
“ओके,” तो काहीच बोलला नाही म्हणून परी तिथून उठत बोलली. “मला निघायला हवं आणि कॉफी साठी थँक्स.” एवढं बोलून ती तिथून जायला निघाली.
ती चालली आहे हे बघून हरीश त्याच्या विचारातून बाहेर आला. “अगं लगेच कुठे चाललीस? मुंबईमध्ये ही वेळ तर बाहेर पडायची असते ना.”
“ते घरात असणाऱ्या माणसांसाठी,” परी “मला घरी जायचं आहे अजून. बाय.” परी पुढे चालायला लागली.
‘अरे यार,” हरीश मनातच चरफडला. तो तिच्याशी लगेच मुख्य विषयावर बोलू देखील शकत नव्हता. त्याने त्याचे प्रयत्न चालू ठेवायचे ठरवलं होत. नाहीतर ते सरळ रस्त्यावर येणार होते.
“अगं आम्ही पण तुझीच माणस आहोत ना,” हरीश विनंतीच्या सुरात बोलला. “मग अशी परक्यासारखी का वागत आहेस?”
पुढे जाणारी परी थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं. “माझी माणसं माझी घरी वाट बघत आहेत आणि परके असणाऱ्या माणसांनी मला माझ्या माणसांची गरज असताना रस्त्यावर फेकलं होत.” परी अगदीच कराऱ्या आवाजात बोलली. “आय होप तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. सो आता पुन्हा माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या मध्ये येऊ नकोस.” एवढं बोलून परी त्या कॅफेमधून सरळ बाहेर पडली.
हरीश तर जाणाऱ्या परीला बघतच राहीला. काही वेळाने तिथल्या वेटरने बिलसाठी आवाज दिल्यावर तो भानावर आला. त्याने लगेच ते बिल हातात घेतलं आणि त्याला झटकाच बसला. कारण ते बिल जवळ जवळ दहा हजारच झाल होत.
“अरे दोन कॉफीचे दहा हजार?” हरीश चांगलाच चिडून बोलला. “अशी कितीला आहे कॉफी इथे?”
“कॉफी तर ऐंशी रुपायालाच आहे,” वेटर गालातच हसत बोलला.
“आणि ही बाकीची नाश्तायची ऑर्डर माझी नाही.” हरीश बिलमध्ये बघून बोलला. तो चांगलाच गोंधळून गेला होता.
“अस काय करता सर?” वेटर अदबीन बोलला. “आता काही वेळापूर्वी त्या मॅडम असताना मी तुम्हाला विचारयलाचं येत होतो तर तुम्ही मलाच इशारा करून ओके म्हटलं ना.”
“अरे मी बोललो की आताच नको येऊ म्हणून.” हरीशच्या कपाळावर आठ्या चढल्या.
“सर, माझ्या बाजूला उभा असणाऱ्या माणसाकडे बोट करून देखील तुम्हाला इशारा केला की तो तुमचा माणूस आहे का? तर तेव्हा देखील तुम्ही हातवारे करून त्याला जायला लावलतं.”
“हे भगवान,” हरीश आता चांगलाच चिडीला आला. “पण तुला काही अक्कल आहे की नाही. फक्त इशाऱ्यावर काहीही ठवरून मोकळा होतोस?”
“सर आता तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करत आहात.” वेटर ही आता कडक आवाजात बोलला. “तुम्हाला हे बिल भाराव तर लागेलच.”
“अरे जे माझ नाही ते मी का भरू?” हरीश खूपच गोंधळून गेला होता. त्याला परीसोबत बोलता याव म्हणून तो वेटरला इशारा करून जवळ यायला नको सांगत होता. पण त्याचा अस काही परिणाम होईल याची त्याला कल्पनाही नव्हती.
“सर,” वेटर “तुमच ऐकून मी त्यांना ऑर्डर दिली. एकतर तुम्ही मला तुम्हाला विचारायाला जवळ देखील येऊ दिल नाहीत. मी तीन वेळा इशारा केला, त्यावर तुम्हीच चिडून ‘जा’ अस बोलले.”
त्यांचा गोंधळ ऐकून त्या कॅफेचा मॅनेजर देखील तिथे येऊन पोहोचला. त्याला आलेलं बघून वेटरने जे काही घडल ते त्या मॅनेजरला सांगून दाखवलं.
हरीशने देखील त्याची बाजू समजावून सांगायचा प्रयत्न केला. बरं सीसीटीव्हीची फुटेज पहिली तर त्यात हरीशच ओके बोलत आहे अस स्पष्ट दिसत होत.
“सॉरी सर,” मॅनेजर अदबीन बोलला. “तुम्हाला हे बिल भरावचं लागेल. तुम्हीच आमच्या वेटरला तस सांगताना दिसत आहात.”
“नाही भरणार मी,” हरीश रागात बोलू लागला. “जे मी खाल्ल नाही ते मी का भरू?”
“हे तुम्ही सांगायच्या आधी विचार करायला हवा होता.” मनेजर पण रागाला येत बोलला. “एकतर तुम्ही बिल भरा नाहीतर मला नाईलाजाने पोलिसांना बोलवावं लागेल.”
पोलीस नाव ऐकूनच हरीशची बोलती बंद झाली. एकतर तो ह्या शहरातला नव्हता. त्यात त्याची इथे कोणासोबतही ओळख नव्हती. शेवटी नाईलाजाने त्याने ती बिलाची सर्व रक्कम त्याच्या मनावर दगड ठेवून भरली. नंतरच त्या मॅनेजरने हरीशला तिथून जाऊ दिल होत. तसा हरीश मनातच स्वतःला शिव्या घालत तिथून बाहेर पडला.
हरीश बाहेर गेल्यावर त्या मॅनेजरने एक फोन लावला. “झाल रे तुझ काम.”
हरीश बाहेर गेल्यावर त्या मॅनेजरने एक फोन लावला. “झाल रे तुझ काम.”
इकडे हरीश जसा बाहेर पडला तसा त्याला परत धक्का बसला, कारण त्याच्या समोर रावी तिच्या बाईकवर बसलेली त्याला दिसली, जी त्यालाच बघून हसत होती. तिचा तो चेहरा बघून आता जे काही झाल त्यात हिचा तर हात नाही ना? हा विचार त्याच्या मनात फेर धरू लागला.
परीला आज घरी यायला जास्तच उशीर झाल्याने सायलीने रावीला परीच्या कॉलेजवर जायला लावलं होत. कारण परीचा मोबाईल पण बंद लागत होता आणि परीला नेहमीपेक्षा जास्तच उशीर होत चाललेला बघून सायलीने रावीला त्यांच्या कॉलेजला जायला लावलं होत. तशी ती पण तिच्या आत्याच्या घरीच यायला निघाली होती. आज सायली पावभाजी जे बनवणार होती. मग ती सगळीच मुल आज सायलीच्या घरी जमणार होती.
परी अजून घरी पोहोचली नाही म्हणून रावी पण लगेच तिच्या काळजीने लागलीच कॉलेजजवळ जाऊन पोहोचली होती. कॉलेजच्या गेटवर तिला परीची स्कुटी लावलेली दिसली. तशी रावी गोंधळून गेली. स्कुटी इथे आहे म्हणजे परी देखील इथेच असणार होती. हा तिने अंदाज बांधला. मग तिने आजुबाजूला बघायला सुरवात केली.
कॉलेजच्या आजूबाजूला तर परी तिला काही दिसली नाही. नंतर तिने तिची नजर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवली. समोरच असलेल्या कॅफेमध्ये तिला परी दिसली.
परीला कॅफेमध्ये बघून रावी पहिले तर गोंधळली. कारण ती कधीच अशी विनाकारण कॅफेमध्ये जात नव्हती. मग रावी पण रस्ता क्रॉस करून त्या कॅफेजवळ आली. तिने त्या कॅफेच्या काचेतून पाहिलं तर परी सोबत त्या दिवशी त्या माणसांसोबत आलेला तो मुलगा दिसला. तिची दी त्या मुलासोबत बसलेली बघून रावीला पहिले तिच्या दीचाच राग आला. पण पहिले ती त्याच्यासोबत काय करत आहे? ते बघू लागली. तर तिला ते फक्त शांतच बसलेले दिसले.
आता त्या काचेतून आवाज तर बाहेर काही येणार नव्हता. मग रावीला एक कल्पना सुचली. तिने सरळ जयला फोन लावला. कारण तो कॅफे सुरजच्या मित्राचा होता आणि तो सुरजच्या मुलाला म्हणजेच जयला देखील चांगलाच ओळखत होता.
खरं म्हणजे सुरजनेच त्याच्या मुलावर आणि बाकीच्यांवर लक्ष ठेवायला त्याला सांगितल होत. पण ही मुल म्हणजे अति प्रगतीशील होती. त्यांनी ह्या सुरज काकांच्या मित्रालाच त्यांच्या बाजूने वळवून घेतलं होत. आता तो सुरजचा मित्र सुरजपेक्षा ह्या मुलांच्या जास्त जवळ होता.
जयला फोन गेल्यावर रावी हळूच त्या कॅफेमध्ये शिरली. जयने आधीच फोन करून दिला असल्याने सुरजच्या मित्राने देखील तिला लपवतचं आतमध्ये घेतलं आणि जिथून परी आणि त्या मुलाच बोलण ऐकू येईल अश्या ठिकाणी तिला नेऊन बसवलं. त्यांच पूर्ण बोलण ऐकून रावी चांगलीच चिडीला आली. ती तशीच गपचूप उठली आणि एका बाजूला जात परत जयला फोन लावला.
“आज माझ्याकडून पार्टी,” रावी चेहऱ्यावर असुरी स्मित आणत बोलली. “काय हवंय? ते बिनधास्त सांगा. कारण बिल कोण भरेल हे वेगळ सांगायला नको.”
मोबाईल स्पीकरवर असल्याने ते सर्वानीच ऐकल. असही ते त्यांची ॲकेडेमी बंद करत होते. जी काही मुल शेवटी होती त्यांनाही आरुषने थांबायला लावलं. आता आजच्या दिवसाचा शेवट पार्टीने होत असेल तर कोणाला आवडणार नाही? नाही का?
फोन ठेवण्याआधी जयने त्याच्या वडिलांच्या मित्राला फोन द्यायला लावला. आजच्या सो कॉल्ड रावीच्या पार्टीच बिल त्याने त्या मुलाच्या माथी मारायला सांगितल. तसा सुरजच्या मित्राने एक दीर्घ श्वास घेतला आणि ठीक आहे बोलून फोन ठेवून दिला.
त्यानंतर त्याने त्याच्या मॅनेजरला बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि किचनमध्ये जात त्या कॅफेमध्ये असलेल्या महागातलं जेवण रावीकडे द्यायला लावलं. ते जेवण घेऊन रावी बाहेर आली. पण ती लगेच जायला निघाली नाही. पहिले तर तिने परीची बाहेर जायची वाट पाहिली. ती जाईपर्यंत ती लपून राहिली आणि जशी परी निघून गेली तशी ती बाहेर आली आणि हरीशच्या यायची वाट बघू लागली.
रावीने बाहेर आलेल्या हरीशकडे तुच्छतेने पाहिलं. ते बघून हरीश रागातच तिच्याजवळ आला. तो तिला काही रागात बोलणार तोच रावी बोलू लागली.
“आमच्या ग्रुपमध्ये फक्त आमची दीच प्रेमाने बोलते.” रावी तोऱ्यात बोलली. “त्यामुळे आमच्यासोबत बोलताना भान ठेवायचं. आज फक्त सगळ बिल भरायला लावलं आहे. यापुढे माझ्या दिला काही त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तुला कुठे नेऊन सोडून देऊ? ते तुलाही समजणार नाही. माइंड इट.” रावीने तिच्या बोटांची चुटकी त्याच्या चेहऱ्यासमोर वाजवत बोलली आणि तिची स्कुटी चालू करून तिथून चालली गेली.
तसा हरीश अजूनच रागाला आला. जाणाऱ्या रावीला बघून तो मनातच भांडू लागला. त्याच्या मनात बदला घेण्याची भावना फुटू लागली. त्या रागातच तो त्याच्या खिशात हात घालून बाईकची चावी शोधायला लागला. पण ती देखील त्याला त्याच्या खिशात मिळत नव्हती. त्याने दुसऱ्या खिशात हात घातला. तर त्यातही ती नव्हती. तसा तो गोंधळला गेला. मग तो त्याने सोबत आणलेल्या बॅगेत ती चावी शोधू लागला. पण त्यातही ती नव्हती.
आता मात्र तो घाबरला आणि परत त्या कॅफेमध्ये गेला. तिथल्या मॅनेजरला, वेटरला त्याच्या बाईकची चावी दिसली का? ते विचारू लागला. त्यांनी देखील पहिली नसल्याचे त्याला सांगताच त्याने तिथला सीसीटीव्ही बघायाला लावला. त्या सीसीटीव्ही मध्ये तर त्याने त्याच्या गाडीची चावी त्याच्याच खिशात घातलेली दिसली. यावरून त्या मॅनेजरने त्याला चांगलच सुनावलं.
आता तो चरफडतच त्या कॅफेच्या बाहेर पडला आणि तिथल्या जागेवर त्याच्या बाईकची चावी पडली का? ते पाहू लागला.
हा सगळा प्रकार सुरजचा मित्र त्या कॅफेच्या खिडकीतून बघत होता. ते बघून त्याने डोक्याला हातच मारून घेतला. कारण रावीचं त्याच्या चेहऱ्यासमोर तिचं बोट नाचवून झाल्यावर जेव्हा ती त्याच्याच बाजूने तिची स्कुटी घेऊन जात होती. तेव्हा त्याच तिच्याकडे अस बघण पाहून रावीनेच त्याच्या खिशातली अर्धवट बाहेर निघालेली बाईकची चावी काढून घेतली होती. हरीश फक्त तिच्याकडे बघत राहीला असल्याने तिने कधी त्याच्या खिशातून चावी काढून घेतली ते त्यालाही समजलं नव्हत.
‘ही मुल ना कोणालाच सुखाने जगू देणार नाही.’ सुरजचा मित्र गालातच हसत त्याच्या कामाला लागला.
दुसरा काहीच उपाय नसल्याने हरीश त्याच्या बाईकला धक्का मारत घेऊन जाऊ लागला. ‘दिवसच खराब आहे आजचा.’ तो मनातच बडबड करू लागला. ‘आता तरी काही प्रोब्लेम नको येउदे रे देवा.’ त्याने मनातच साकड घातलं आणि बाईकला धक्का मारत घेऊन जाऊ लागला.
ज्यांच्या नशिबावर ह्या अतरंगी भावंडांची वक्र दृष्टी पडली त्यांची अशी सहज सुटका कधीच होणार नव्हती.
त्याला धक्का मारून काही वेळ झाला नसेल तोच पुढच्या एका चौकात त्याला वाहतूक पोलिसांनी अडवलं. एकतर त्याच्या बाईकचा नंबर मुंबईच्या बाहेरचा होता. त्यात तो धक्का मारत ती बाईक घेऊन चालला होता. धक्का मारून त्याच अंग घामाने भिजून गेल होत. म्हणून त्याचा अवतार अजूनच विचित्र दिसायला लागला होता.
त्या वाहतूक पोलिसांनी हरीशकडे चौकशी केली. कुठून आला? कुठे चालला? गाडीला असा धक्का का मारत आहे? त्याची उत्तर हरीशने भावूक होऊन दिली. जेणेकरून त्याला सहानुभूती मिळेल.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे त्याच्या गाडीची कागदपत्र मागितली. आता झाली का त्याची पंचायत, कारण त्याच्याकडे त्याच्या गाडीची फक्त नोंदणीप्रमाणपत्र होत. बाकी इन्शुरन्स आणि पीयूसी संपलेली होती.
आधीच त्याचे पैसे त्या कॅफेमध्ये खर्च झाले होते. गाडीच्या चावीसाठी देखील खर्च देखील त्याच्या समोर उभा होता. आता दंडाची पावती फाडली गेली तर त्याच्याकडे तो दंड भरायला काहीच रक्कम शिल्लक नव्हती. मग तो चांगलाच रडकुंडीला आला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा