मागील भागात.
त्याला धक्का मारून काही वेळ झाला नसेल तोच पुढच्या एका चौकात त्याला वाहतूक पोलिसांनी अडवलं. एकतर त्याच्या बाईकचा नंबर मुंवईच्या बाहेरचा होता. त्यात तो धक्का मारत ती बाईक घेऊन चालला होता. धक्का मारून त्याच अंग घामाने भिजून घेल होत. म्हणून त्याचा अवतर अजूनच विचित्र दिसायला लागला होता.
त्या वाहतूक पोलिसांनी हरीशकडे चौकशी केली. कुठून आला? कुठे चालला? गाडीला असा धक्का का मारत आहे? त्याची उत्तर हरीशने भावूक होऊन दिली. जेणेकरून त्याला सहानुभूती मिळेल.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे गाडीची कागदपत्र मागितली. आता झाली का त्याची पंचायत, कारण त्याच्याकडे त्याच्या गाडीची फक्त नोंदणीप्रमाणपत्र होत. बाकी इन्शुरन्स आणि पीयूसी संपलेली होती.
आधीच त्याचे पैसे त्या कॅफेमध्ये खर्च झाले होते. गाडीच्या चावीसाठी देखील खर्च देखील त्याच्या समोर उभा होता. आता दंडाची पावती फाडली गेली तर त्याच्याकडे तो दंड भरायला काहीच रक्कम शिल्लक नव्हती. मग तो चांगलाच रडकुंडीला आला.
आधीच त्याचे पैसे त्या कॅफेमध्ये खर्च झाले होते. गाडीच्या चावीसाठी देखील खर्च देखील त्याच्या समोर उभा होता. आता दंडाची पावती फाडली गेली तर त्याच्याकडे तो दंड भरायला काहीच रक्कम शिल्लक नव्हती. मग तो चांगलाच रडकुंडीला आला.
आता पूढे.
त्याची ती अवस्था बघून पोलिसांनी त्याच्या बाईकच्या चावीची सोय करून देत असल्याबद्दल त्याला सांगितले. पण तो दंड मात्र भरावा लागेल अस त्याला निक्षून सांगितले गेले होते.
शेवटी त्याने त्याच्या मामाला म्हणजेच गौतमला फोन लावला आणि झालेली गोष्ट त्यांना सांगून दाखवली. एकाच वेळेस इतके योगायोग घडणे शक्यच नव्हते. यामागे नक्कीच त्या मुलीचा हात आहे जी हरीशला त्या कॅफेच्या बाहेर भेटली होती. हा विचार करून नंतर गौतमने ती दंडाची रक्कम ऑनलाईन भरली. तोपर्यंत एक चावीवाला तिथे येऊन पोहोचला होता. त्याने त्या पोलिसांच्या सांगण्यावरून त्या बाईकची दुसरी चावी बनवून दिली. तेव्हा कुठे तो घरी जायला मोकळा झाला होता.
आजचा दिवस मुंबईमध्ये मुक्काम थांबून उद्या सकाळी तो गावाला जाणार होता. पण आता एवढं काही घडल्यावर त्याला तिथे थांबायची इच्छाच झाली नाही. इथे थांबलो आणि त्या मुलीने अजून पुढे काही वाढून ठेवलं असेल तर? ही धडकी त्याला भरली होती. जशी त्याने त्याच्या बाईकला किक मारली तसा तो कुठेच वळून न बघता सरळ मुंबईच्या बाहेर जायला निघाला. तो आता थेट मुंबईच्या बाहेर पडल्यावरचं थांबणार होता.
इकडे परी घरी जाऊन पोहोचली. तिला घरी आलेलं बघून सायली लागलीच तिच्या जवळ गेली.
“कुठे होतीस गं?” सायली जरा चिडून बोलली. “आणि तुझा फोन का लागत नाही? उशीर होणार असेल तर सांगून ठेवायचं ना.”
आपल्या आईची ती काळजी बघून परीच मन लागलीच भरून आल. ती तशीच सायलीच्या मिठीत शिरली. परीच ते अनपेक्षित मिठीत येण बघून सायली पहिले तर गोंधळली. तिने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला.
“काय झाल बच्चा?” सायलीने प्रेमाने विचारलं.
“काही नाही,” परी तिच्या मिठीतून बाहेर येत बोलली. “आज ते कार्टून परत मला भेटायला आल होत.”
“कोणता कार्टून?” सायली गोंधळून विचारू लागली.
मग परीने हरीश भेटल्याचं तिला सांगितल. सोबतच तिने जे त्याला सुनावलं ते देखील तिला सांगून दाखवलं. परी तिला ते सांगत होती आणि सायली मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये आली. कारण सायलीने रावीला जे पाठवलं होत परीला शोधायला.
“काय झाल आई?” परी सायलीचा चेहरा बघत बोलली. “मी त्याला सुनावलं त्याचा आंनद नाही झाला का?”
“विषय तो नाही,” सायली टेन्शनमध्ये येत बोलली. “म.. म.. मी रावीला, रावी नाही भेटली का तुला?”
“रावी?” आता परी गोंधळून गेली. “नाही, ती नाही दिसली मला आणि ती ह्या वेळेला त्या बाजूला का येईल?”
तशी सायली उगाच तिला हसवून दाखवू लागली. परी पुढे काही विचारणार तोच विजयदेखील घरी येऊन पोहोचला.
“कुठे होतीस तू?” विजय पण काळजीने ओरडून विचारू लागला. “एक फोन नाही करता येत का?”
“रीलॅक्स, बाबा.” परी विजयला शांत करत बोलली. “आज एक्स्ट्रा लेक्चर घ्याव लागल.”
नंतर तिने हरीशबद्दल देखील त्याला सांगून दाखवलं. मग तिला रावीच आठवल आणि तिच्या डोक्यात जरा प्रकाश पडला. ती सायलीकडे बघू लागली.
“आता अस नको बोलू की तू रावीला कॉलेजला मला बघायला पाठवलं होतस.” परी आशेने सायलीकडे बघू लागली.
पण सायलीच्या होकारार्थी फिरलेल्या मानेने परीची आशा धपकन खाली पडली.
सायलीने विजयकडे पाहिलं. “पहिले रावीला फोन लावा. परी येऊन पोहोचली तरी तिचा पत्ता नाही. नक्कीच काहीतरी घोळ घातला असेल तिने.”
तसा विजयने लागलीच रावीला फोन लावला. तर ती तिच्या भावंडांसोबत त्यांच्या अकॅडेमीमध्ये होती. तिच्या मोबाईलच्या स्टेटसला त्यांच्या आताच्या पार्टीचे फोटो झळकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्यांनी काहीतरी घोळ केला असल्याचं ओरडून ओरडून सांगत होता. आता त्यांनी नक्की काय केल? हे तर ते सरळ सरळ काही सांगणार नव्हते. मग काय करावं? ह्या विचारात असतानाच विजयला जियाचा फोन आला.
सुरजच्या मित्राला हरीशला आठवून आठवून त्याच हसू आवरतचं नव्हत. शेवटी त्याने सुरजला फोन करून हे सगळ सांगून दिल होत. ते ऐकून सुरजने देखील कपाळावर हात मारून घेतला आणि जियाच्या कानावर घातलं. तस तिनेही नकारार्थी मान हलवली आणि विजयला फोन लावला. कारण त्यांची मुल तर ते सगळ त्यांना स्वतःहून सांगणार नव्हती. हे तिला चांगलच माहीती होत.
ह्या वेळेला जियाचा आलेला फोन बघून विजय पहिले गोंधळून गेला. पण परीला काहीतरी आठवल.
“तो कॅफे सुरज मामाच्या मित्राचा आहे ना?” परी
तस विजय आणि सायलीच्या डोक्यात प्रकाश पडला. ह्या वेळेस आपल्या मुलांनी काय केल? हे ऐकायला मिळेल ह्या आनंदात त्याने लागलीच फोन उचलला.
“लगेच सुरवात कर.” विजयने फोन उचलल्या उचलल्या जियाला सांगायला लावलं.
तिकडून जिया पण खुदकन हसली आणि जे काही तिने सुरजकडून ऐकल ते त्याला सांगून दाखवू लागली.
जियाचा बोलण सायली आणि परीला देखील ऐकायचं असल्याने सायलीने विजयला तो फोन स्पीकरवर टाकायला लावला. जियाकडून ते सगळ ऐकून ‘काय करायचं याचं?’ असे त्या तिघांचे चेहरे झाले होते.
परीने तिचा मोबाईल हातात घेतला आणि सरळ जयला फोन लावला.
तिकडे त्यांची पार्टी जोरात जरी झाली होती. तरीही सायलीच्या हाताची पावभाजी खायला ते सगळेच त्यांच्या घरी यायला निघाले होती. ते त्यांच्या बाईक्स चालू करणार तोच जयचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर परीचा फोन होता. आता तो फोन कशासाठी केला असेल याची माहिती तर त्या सर्वाना आधीच होती.
तिकडे त्यांची पार्टी जोरात जरी झाली होती. तरीही सायलीच्या हाताची पावभाजी खायला ते सगळेच त्यांच्या घरी यायला निघाले होती. ते त्यांच्या बाईक्स चालू करणार तोच जयचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर परीचा फोन होता. आता तो फोन कशासाठी केला असेल याची माहिती तर त्या सर्वाना आधीच होती.
“आम्ही घरीच येत आहोत दी.” जयने फोन उचलल्या उचलल्या परीला सांगितलं.
“या वाटच बघत आहे.” परी जरा चिडूनच बोलली आणि फोन ठेवून दिला.
“काही गरज नाहीये त्यांना भांडायची.” परीचा अवतार बघून विजय बोलला. “बरोबर केल त्यांनी.” एवढं बोलून तो त्यांच्या खोलीकडे फ्रेश व्हायला निघून गेला.
आता मात्र सायली आणि परी दोघीजणी जाणाऱ्या विजयला बघतच राहिल्या. कारण विजयने ह्या भावंडांच्या कारनाम्यांच कधीच समर्थन केल नव्हतं आणि आज चक्क बरोबर केल अस तो बोलून गेला होता.
मग दोघी मायलेकींनी एकमेकींकडे पाहिलं.
मग दोघी मायलेकींनी एकमेकींकडे पाहिलं.
“एका बापाला त्याच्या मुलीची जास्त काळजी असते,” सायली हलकेच हसत बोलली. “मग त्यापुढे त्यांना सर्व काही योग्य वाटत.”
तसा परीने एक सुस्कारा सोडला. तेवढयातच त्यांच्या घराच्या दाराची बेल वाजली. परीने जाऊन तो उघडला तर राज, प्रसाद आणि त्यांच्या बहिणी तिथे परत आले होते.
“अरे वा,” राज हसतच बोलू लागला. “आल्या आल्या तुझ दर्शन. आजच्या दिवसाचा शेवट छान होणार.”
“जा रे तू.” परी तिच्या कपाळावर आठ्या आणत बोलली.
“बघा ना मामी,” राज नाटकी आवाजात बोलू लागला. “काही कदरच नाही माझी.”
“ते तुमचं तुम्ही दोघ बघून घ्या,” सायलीने सरळ तिचे हात वर केले. “आता भांडतील भांडतील आणि नंतर एकत्र येऊन मलाच चिडवत बसतील.” एवढ बोलून ती किचनमध्ये निघून गेली.
मग परी देखील राजला चिडून बघत किचनकडे गेली. राज, प्रसाद आणि त्यांच्या दोघी बहिणी घरात येऊन बसल्या. घरात आल्या आल्या प्रसाद लगेच घरात डोकावू लागला. त्याला वाटल की माला अजूनही घरात असेल.
“ती या घरात नाही तर तिच्या तिच्या घरी राहते.” राज सुस्कारा सोडत बोलला. “इथे ती कधी कधीच येते. माहिती आहे तुला सर्व तरी?"
तसा प्रसादने उगाच त्याला हसून दाखवलं. “बोल ना तुझ्या बेस्ट फ्रेंड सोबत.” तो राजला विनंती करू लागला.
“ठीक आहे,” राज त्याला आश्वस्त करत बोलला. “बोलतो रे, नको काळजी करूस.”
तसा प्रसाद निवांत झाला. आता विजय देखील फ्रेश होऊन हॉलमध्ये आला.
“अरे आले पण.” विजय त्या चौघांना बघून बोलला. “भेटले का आज्जी आजोबांना?”
तसे त्यांनी हसतच होकारात मान हलवली.
“ते आज्जी आजोबा पण त्यांच्या लेकीसारखेच हट्टी आहेत.” विजय सुस्कारा सोडत बोलला. “इतक्या वेळा बोललो की इथे येऊन रहा. पण नाहीच ऐकत.”
“मॉम पण सांगत होती त्यांना.” प्रसाद “तेव्हा विचार करतो अस बोलून वेळ मारून नेली होती.”
“आज गावाला चालले आहेत ना?” विजय
“हो,” राज “आज रात्रीची गाडी आहे.”
“मग आता आले असते ना घरी,” विजय त्याचा मोबाईल उचलत बोलला. “इथूनच गेले असते.”
“सांगत होती मी त्यांना,” प्रसादची बहिण “पण तेही नाही ऐकल.”
ते ऐकून विजयने त्यांना फोन लावला. “लेकी सासरी नांदू लागल्या म्हणजे लेकाला विसरायचं का?” आरतीच्या वडिलांनी फोन उचलल्या उचलल्या विजयने त्यांना सुनवायला सुरवात केली.
“तू ऐकलं का माझ?” आरतीचे वडील पण तितकेच चिडून बोलले. “नाही ना. मग मी कशाला ऐकू तुझ?”
“अहो, तुमचे वारस आहेत ना,” विजय “तुमच्या भावाची मुल. त्यांच्या नावावर करा की. त्यांचा हक्क आहे.”
“त्या हक्काच्या गोष्टी मला नको सांगूस,” आरतीचे वडील “ते काही इकडे येणार नाहीयेत. त्यांनीच मला तिकडे बोलवलं आहे. हे घर पण त्यांनीच तुझ्या नावावर करायला परवानगी दिली आहे.”
“मग एक काम करू ना..” विजय पुढे काही बोलेल तोच आरतीच्या वडिलांनी बोलायला सुरवात केली.
“मला माझ घर विकायचं नाहीये.” आरतीचे वडील चिडून बोलले.
“अहो ते नाही बोलत मी,” विजय “आरती आणि प्राजू दिला हक्काच माहेर नको का इथे?”
“त्यांनीच मला हा उपाय सांगितला आहे.” आरतीचे वडील “आता आम्ही गावाला गेलो की त्या दोघी थेट गावालाच भेटायला येतील. इथल्या घरात ही त्या दोघींच्या आणि तुझ्या आठवणी आहेत. आता त्या दोघींना सारखं सारखं इथे यायला जमणार नाहीये आणि तू त्या नीट जपशील.”
“तुमच्या नातवांना...” विजयने राज आणि प्रसादकडे पहिले.
“माझी नातव त्यांच्या आईच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत.” आरतीचे वडील विजयचे शब्द तोडत बोलले. “मी माझ मृत्यूपत्र करून ठेवलं आहे. त्यामुळे माझ्या नंतर ते तुझ्याकडेच येईल.”
“का करत आहात अस?” विजय वैतागून बोलला. “मी तुम्हाला इथे यायला बोलत आहे आणि एक तुम्ही वेगळाच विषय घेऊन बसलात. किमान दोन दिवस तर या. मग खुशाल गावाला जा.”
“अरे पण तिकीट कन्फर्म झाली आहेत.” आरतीचे वडील
“ती होतील कॅन्सल,” विजय “आपली वानरसेना येईल घरी तुम्हाला घ्यायला. त्यांना सांगून ठेवलं आहे. सरळ सांगून नाही ऐकले तर उचलून आणा.”
“अरे,” आरतीच्या वडिलांच्या कपाळावर आठ्या आल्या. त्यांची ही वानरसेना विजयने दिलेलं काम पूर्ण करूनच राहतात हे त्यांना चांगलच माहिती होत. “त्यांना का त्रास देतोस? आम्ही येत आहोत.”
त्यांच बोलण ऐकून विजयला जरा हसायलाच आल. “या, वाटच बघत आहोत.” एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला.
“अरे माकाडांनो,” विजयने राज आणि प्रसादकडे पाहिलं. “तुमचे आजोबा त्यांची प्रोपर्टी तुम्हाला सोडून माझ्या नावावर करत आहेत आणि तुम्ही खुशाल बघत बसलात?”
“इथे आम्हाला आमच्या खोल्या नीट सांभाळल्या जात नाहीत,” राज नाटकी हसत बोलला. “ती प्रोपर्टी घेऊन काय करू?”
विजय पुढे काही बोलणार तोच त्यांची वानरसेना घरी येऊन पोहोचली.
“हे आज्जी आजोबांच्या घरी नाही गेले?” त्यांना तिथे आलेलं बघून प्रसादची बहिण गोंधळात पडली. कारण त्यांच्या आजोबांसोबत नुकतच बोलण करून फोन ठेवला होता.
“त्यांना फक्त घाबरवण्यासाठी ते बोलले.” राज हसतच बोलला. त्याच बोलण ऐकून विजय पण गालातच हसला होता.
तिकडे प्रसाद मात्र मालाला बघण्यात व्यस्त झाला. ती तिच्या नेहमीच्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवर होती. तिने तिचे ते भरीव केस वर करून बांधलेले होते. जेणेकरून तिला तिचं हेल्मेट घालायला सोप जात होत. त्याच वर केलेल्या केसांतून निघालेली दोन ते तीन बटा तिच्या गालावर बागडत होत्या. त्याच चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश देखील नव्हता. तिचं ते नैसर्गिक सौंदर्य प्रसादला अगदीच खूलून दिसायाला लागल होत. त्याला इतकही भान नव्हत की तो आता कुठे बसला होता आणि त्याच्या आजूबाजूला किती जण होती.
मालाच ही एक दोन वेळेस त्याच्याकडे लक्ष गेल. पण तिने तिचं तोंड वाकड करत त्याच्याकडे दुर्लक्ष केल. पण नंतर जस त्याने त्याची नजर तिच्यावरच रोखेलेली तिला जाणवली. तसा तिच्या रागाचा पारा चढायला लागला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा