मागील भागात.
तिकडे प्रसाद मात्र मालाला बघण्यात व्यस्त झाला. ती तिच्या नेहमीच्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवर होती. तिने तिचे ते भरीव केस वर करून बांधलेले होते. जेणेकरून तिला तिचं हेल्मेट घालायला सोप जात होत. त्याच वर केलेल्या केसांतून निघालेली दोन ते तीन बटा तिच्या गालावर बागडत होत्या.त्याच चेहऱ्यावर मेकअपच लवलेश देखील नव्हता. तिचं ते नैसर्गिक सौंदर्य प्रसादला अगदीच खूलून दिसायाला लागल होत.
त्याला इतकही भान नव्हत की तो आता कुठे बसला होता आणि त्याच्या आजूबाजूला किती जण होती.
मालाच ही एक दोन वेळेस त्याच्याकडे लक्ष गेल. पण तिने तिचं तोंड वाकड करत त्याच्याकडे दुर्लक्ष केल. पण नंतर जस त्याने त्याची नजर तिच्यावरच रोखेलेली तिला जाणवली. तसा तिच्या रागाचा पारा चढायला लागला.
आता पूढे.
आता तो तिच्या दीचा बेस्टफ्रेंड आणि मामाचा मुलगा राज याचा भाऊ असल्याने तिने सध्यातरी स्वतःवर कसातरी नियंत्रण मिळवलं होत.
तिकडे प्रसादला देखील त्याच्या कमरेत एक चांगलंच चिमटा बसला होता जो त्याच्या बहिणीने काढला होता. तेव्हा कुठे तो भानावर आला आणि त्याला मालाचा चिडलेला चेहरा दिसला. तस त्याने त्याची जीभ चावत त्याची नजर पटकन फिरवून घेतली.
तोपर्यंत आलेल्या वानरसेनेने ज्यांची त्यांची जागा पकडून घेत बसून घेतलं होत. माला तर बसली एका खुर्चीवर पण तिच्या समोर नेमकी प्रसाद होता. जस तिने त्याला पाहिलं तस तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. प्रसादच तिच्याकडे लक्ष जाण्याआधी माला तिथून उठली आणि किचनकडे निघून गेली.
इकडे ह्या सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. परी आणि माला दोघी किचनमध्ये असल्याच पाहून सायलीने रावीला देखील किचनमध्ये बोलावून घेतले.
“आज पहिल्यांदा मला तुमच काम आवडलं.” विजय त्या सगळ्यांसमोर बोलला.
“तुम्ही ते आले होते त्याच दिवशी त्यांना हाकलून द्यायला हवं होत.” सुजय अजूनही जरा चिडून बोलला. कारण त्याच दिवशी त्यांना हाकललं असत तर आजचा हा दिवस आलाच नसता अस त्याच म्हणण होत. त्याच काय? त्या सगळ्याचं तेच म्हणणं होत.
आता ही घडलेली गोष्ट राजला काही माहित नव्हती. त्यामुळे तो सध्या त्या सगळ्यांकडे गोंधळून बघत होता. “काय झाल होत?”
आता बाकीच्यांना आठवलं की राजला तर त्याबद्दल काही माहितीच नव्हती. मग विजयने त्याला काय झाल ते त्याला थोडक्यात सांगितलं.
“आता त्यांच्या मेंदूमध्ये प्रकाश पडला का की त्यांना एक मुलगी पण होती म्हणून?” राज पण लागलीच चिडून बोलला. “काही गरज नाही तिला त्यांच्याकडे पाठवायची. तिलाही सांगून ठेवा.”
“जस काही ती बोलली आणि तुम्ही तिला सहज जाऊ द्याल ना?” विजय तिरकस हसत बोलला. “आताचं ऐकल नाही का त्याची काय हालत करून आले आहेत तिची ही भावंड.”
“अगदी बरोबर केलत,” राज त्या सगळ्यांकडे बघत बोलला.
“हा तुला तर त्याचं बरोबच वाटेल,” विजय एक सुस्कारा सोडत बोलला. “शेवटी विषय तुझ्या बेस्ट फ्रेंडचा नाही का?” शेवटी शेवटी ती गालातच हसला.
तिकडे किचनमध्ये आज मालाला परत आलेल पाहून रावी परत तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली. कारण तिच्यामुळेच तिला देखील किचनमध्ये यावं लागल होत. मदत पाहिजे असेल तर ती स्वतःहून करत होती पण स्वतः न सांगता जाऊन करणे म्हणजे तिच्यासाठी अवघड गोष्ट होती. आता ती अशी का वागत होती? हे तिलाही माहित नव्हत. शेवटी ती सोनालीचीच कॉपी होती. वेगळी तर असणारचं होती.
रावी आपल्याकडे बाग्घ्त असल्याच मालाला जाणवल. तस तिने रावीला सायलीकडे बघून थांबायचा इशारा केला. पण रावीला कुठे धीर धरवला जात होता. तिने लागलीच तिचा मोर्चा तिच्या आत्याकडे वळवला.
“आत्तु,” रावी अचानक मोठ्याने बोलली.
तिचा तो मोठा आवाज ऐकून सायली तिच्याकडे आठ्या पाडून बघायला लागली.
“त.. ते .. हा मामांनी तुला बोलावलं होत,” रावी “तुला सांगायची विसरली बघ.”
“तस तर त्यांनी मला तेव्हाच आवाज दिला असता,” सायली तिचं काम करत बोलली. “जेव्हा की तुला येऊन पंधरा मिनिट तरी झाली असतील. आता एवढा वेळ थोडीच तुझे मामा वाट बघतील?”
“हमम,” रावी आता परत खट्याळ झाली. “मामांना जास्त वेळ तुझ्यापासून आंब राहतच येत नाही ना? म्हणून तर ते रात्री थेट तुझ्या माहेरी येऊन पोहोचले होते ना? ते ही रात्री.” रावी खिदळत बोलली.
“हे भगवान !” सायलीच्या कपाळावरच्या आठ्या आजून गडद झाल्या. “सोनाली, तुला तर मी आता सोडतच नसते. काहीही सांगून ठेवलं आहे लेकीला.” सायली चांगलीच चिडून बोलली.
रावीच बोलण ऐकून परी आणि मालाला देखील हसायला येत होत. पण सायलीचा चिडलेला चेहरा बघून त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं.
“चल काहीही काय?” रावी अजूनच सायलीला चिडवत बोलली. “नंतर तुम्ही आमच्या घरी येऊन माझ्या मॉमला सरप्राईज देखील दिल होत.”
“अच्छा ते पण तिने सांगितलं का?” सायलीच्या डोक्यात पण आता खट्याळपण उतरला. “पण तेव्हाची तुझ्या आईची झालेली फजिती नाही सांगितली तिने?”
तसे रावीचे डोळेच मोठे झाले. आपल्या मॉमची एखादी गोष्ट तिला माहिती नाही बघून तिला लगेच ती जाणून घायची उत्सुकता लागायची. “सांग ना काय फजिती झाली होती मॉमची?”
“मी नाही सांगणार,” सायली आता तोऱ्यात बोलली. “मला चिडवते ना? मग मी नाही सांगणार.” सायली लटक्या रागात बोलली.
“अस काय करते गं आत्तु?” रावीचा निरागस चेहरा लागलीच समोर आला. “मी तर माझ्या आत्तुच सगळ काही ऐकते ना?”
“तरीही नाही,” सायली गॅस वरच भांड उतरवत बोलली. त्यात तिने पाणी गरम केल होत. जे विजय पीत असायचा. “तुझ्या मॉमला आमचे भांडे फोडायची खूप हौस आहे ना? आता तिचं भांड तिलाच विचार.”
एवढ बोलून सायलीने ते गरम केलेलं पाणी एका बाटलीत ओतल आणि विजयला द्यायला हॉलकडे निघून गेली.
जशी सायली किचनच्या बाहेर पडली. तशी रावी मालाकडे जाऊ लागली. तर माला परीजवळ जाऊन उभी राहिली.
“आता काय केलतं?” परी तिचं काम करता करता माला आणि रावीला विचारू लागली. कारण मालाच्या मागे रावी पण तिथेच येऊन उभी राहिली होती.
“नेहमी आम्हीच काही करतो अस नसतं हं.” माला तिच्या कपाळावर आठ्या चढवून बोलली.
“पण आईसमोर बोलता येत नाही म्हणून तिला बाहेर पाठवाची सोय करू माझ्याजवळ येऊन थांबण,” परीने एक पोज घेतला. “तेव्हा काय असत मग?”
“पण आताचा विषय वेगळा आहे,” मालाच्या कपाळवर अजूनही आठ्या होत्या. “उलट मलाच कोणीतरी त्रास देत आहे.”
मालाच्या तोंडून हे ऐकून परीच्या हातातलं भांड तिच्या हातातून लागलीच सटकून खाली पडलं. तर रावी पण मालाला आ वासून बघू लागली. तिने आज परत मालाच्या कपाळाला हात लावून पाहिलं.
“प्रणाली मावशीने हिच्या लग्नाच मनावर घेतल्यापासून ही बरीच बिथरली आहे वाटत.” रावी गंभीर होऊन बोलली.
“तुला आणि त्रास?” परीने रावीची नाटक टाळून मालाला विचारलं.
“हो.” माला तिचं तोंड पाडून बोलली.
आता मात्र परी गंभीर झाली. “बोल काय झाल?”
“तुझ्या आत्याच्या मुलाला सांगून ठेव,” माला जराशी चिडून बोलली. “सारखा माझ्याकडे बघत राहतोय.”
तसे रावी आणि परी दोघींचे तोंडच उघडी पडली. दोन क्षण तर परी समजून घेऊ लागली की माला नक्की काय बोलत आहे?
“आत्याचा मुलगा कोण?” परी “राज?”
‘तो नाही गं,” माला वैतागून बोलली. “त्याचा मोठा भाऊ.”
“अच्छा तो होय,” रावीच्या चेहऱ्यावर परत खट्याळपण चढला. “बाबा तुझ्यापाठी तर मुलांची लाईनच लागली आहे.”
तशी मालाने तिच्या पाठीवर एक चापट मारली. “मॉम मुळे तो मित्रच माझ्याशी बोलत नाहीये. त्याची गर्लफ्रेंड त्याला भांडत आहे. त्या दिवशी तो मित्र त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरत होता. मॉमला तो दिसला. तर सरळ त्याला विचारू लागली की तुला लग्न कोणाशी करायचं आहे म्हणून.”
ह्या वाक्यावर परी आणि रावी दोघी खळखळून हसल्या.
“बरं मला संग काय कमी आहे प्रसादमध्ये?” परी अचानक गंभीर होऊन बोलली. “चांगला कमावतो. त्याच्या आई वडिलांच्या पावलावर पाउल टाकून वागत आहे. राजकडून इतकही ऐकलं आहे की त्याने आजवर कोण्या मुलीकडे पाहिलं देखील नाहीये. हा, त्याला मुलींचे प्रपोज खूप आले. अगदी त्याच्या होकारासाठी काहीही करायला तयार झाल्या होत्या. पण तो नाही ऐकला.”
“मी काय सांगत आहे आणि तू तर त्याचचं कौतुक करायला घेतलस.” मालाने तिचे ओठ बाहेर काढले.
“अगं मागे तूच बोललीस ना की तुझ्यासाठी मुलगा बघ,” परीने तिला आठवण करून दिली. “आता मी पहिला मुलगा. बोल तुझ काय म्हणण आहे?”
“अस लगेच कस सांगू?” मालाने तिच्या भुवया ताणल्या. “मला विचार करायला वेळ तर दे.”
“तू आणि विचार करणार?” सायली तिथे येत बोलली.
तश्या बाकी तिघी दचकून गेल्या. सायलीने काही ऐकल तर नाही ना? हा प्रश्न त्या तिघींना पडला.
“अगं बोल,” कोणी काहीच बोलल नाही म्हणून सायलीने परत विचारलं. “तू कसला विचार करणार आहेस?”
“अम्म ते हा,” माला गडबडत बोलली. “तेच ते मॉमच. माझ्या त्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत पाहिलं म्हणून ती मलाच भांडत आहे. आता मी सांगितल होत का तिला. तिचं तिने मनात धरून घेतलं आणि आता मलाच भांडत आहे की कोणाशी पण मैत्री ठेवते म्हणून.”
“आईच काळीज आहे ते,” सायली मंद स्मित करत बोलली. “तुला नाही कळणार ते. असाही आज ना उद्या करायचं आहेच ना लग्न. मग एकतर आईला सांग नाहीतर तुला कोणी आवडतो का ते सांग. तस असेल तर मी बोलते तुझ्या आईसोबत.”
ते ऐकून मालाला पहिले प्रसाद आठवला. तश्या तिच्या भुवया आकसल्या गेल्या.
“तिला तर कोणी आवडत नाहीये,” परी गालातच हसत बोलली. “पण ती मात्र कोणालातरी आवडू लागली आहे वाटत.”
तश्या मालाच्या कपाळावर अजूनच आठ्या चढल्या. रावीचे डोळे पण चमकू लागले. तर सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.
“वाटत म्हणजे?” सायलीने लगेच विचारलं. “आणि कोणाबद्दल बोलत आहेस तू?”
तशी माला परीला नाही मध्ये मान हलवत बघू लागली. ते सायलीने पाहिलं.
“आता तर सांगच.” सायली परीजवळ जात बोलली.
“म्हणजे खात्री नाही,” परी आता जरा गंभीर झाली. “पण मालाच अस म्हणण आहे की प्रसाद तिला सारखं बघत आहे.”
“आणि यावरून तू तो निष्कर्ष काढलास?” सायली सुस्कारा सोडत बोलली. कारण एवढुश्या गोष्टीवरून थेट टोकावर परी पोहोचली होती. “तस काही असत ना तर आधी राज तुझ्याजवळ येऊन त्याबद्दल बोलून मोकळा झाला असता. कारण ते भाऊ एकमेकांसोबत खूप क्लोज्ड आहेत.”
“बरं,” परीने लगेच नमत घेतलं. “जर राज आलाच तो विषय घेऊन तर तुझ काय म्हणण असेल?”
“माझ काय म्हणण असेल?” सायली तिचे खांदे उडवत बोलली. “आता तो मालाला आवडला पाहिजे ना? तिचा होकार असेल तर मला नाही वाटत की प्रणाली आणि महेश यासाठी नकार देतील.”
“अरे मला तर विचारा.” माला मधेच चिडून बोलली. “तुमच्या हातात असत तर मला आत्ताच लग्नासाठी उभं केल असत. बोलली ना आधी आमच्या दीच लग्न नंतर आमचं. असचं ठरलं आहे आमच.”
“अरे हो,” सायली “तुमच्या दी साठी मुलगा तर भेटू दे.”
“भेटेल की,” रावी लगेच तिच्या दीला मागून मिठी मारत बोलली. “असा मुलगा भेटेल ना ज्याच नाव जगात गाजेल.”
“भेटेल तेव्हा भेटेल,” सायली “पण आता जे समोर आल आहे ते तर बघूया.”
तसा मालाने तिचे डोळे मिटून एक मोठा उसासा टाकला.
“मी पावभाजी बद्दल बोलत आहे.” सायली मालाकडे बघून गालात हसत बोलली.
तस मालाने तिचं तोंड वाकड केल आणि त्या चौघी ती पाव भाजी जेवणाच्या टेबलावर घेऊन जायची तयारी करू लागल्या.
त्याचं जेवण होईपर्यंत परीची बारीक नजर प्रसादवर होती. मग तिला मालाच बोलण खरं वाटू लागल. मालाला बघण्याव्यतिरिक्त तिला दुसरा काही त्रास होईल अस मात्र प्रसाद वागला नव्हता. ती त्याच्याजवळ गेली की तो त्याची नजर फिरवून घ्यायचा. जी काही नजरानजरी होती ती लांबूनच.
हा, त्याच्या मनात एक भीती अशी पण होती की चुकून तिला राग आला तर ती त्याला तिथेच मारायला पण कमी करणार नव्हती. पण प्रसादची ती वागणूक बघून मालाला त्याच्याकडे रागात बघण्याची इच्छाच झाली नाही.
आता परी फक्त राज तिच्याजवळ याबद्दल कधी बोलतो याचीच वाट बघू लागली. आज तर ते काही शक्य नव्हत. कारण आज तिथे सगळेच होते.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा