मागील भागात.
त्याचं जेवण होईपर्यंत परीची बारीक नजर प्रसादवर होती. मग तिला मालाच बोलन खर वाटू लागल. मालाला बघण्याव्यतिरिक्त तिला दुसरा काही त्रास होईल अस मात्र प्रसाद वागला नव्हता. ती त्याच्याजवळ गेली की तो त्याची नजर फिरवून घ्यायचा. जि काही नजरानजरी होती ती लांबूनच. हा, त्याच्या मनात एक भीती अशी पण होती की चुकून तिला राग आला तर ती त्याला तिथेच मारायला पण कमी करणार नव्हती. पण प्रसादची ती वागणूक बघून मालाला त्याच्याकडे रागात बघण्याची इच्छाच झाली नाही.
आता परी फक्त राज तिच्याजवळ याबद्दल कधी बोलतो याचीच वाट बघू लागली. आज तर ते काही शक्य नव्हत. कारण आज तिथे सगळेच होते.
आता पूढे.
काही वेळाने त्यांची जेवण आटोपली आणि बाकी मंडळी ज्यांच्या त्यांच्या घरी जायला निघाली. आता माला पण जाणार आणि पुन्हा ती कधी दिसेल? या विचारात प्रसादचं मन जरा नाराज झाल होत.
आज प्रसाद, राज आणि त्यांच्या त्या दोन्ही बहिणी तिथेच थांबणार होते.
ह्या सगळ्यांची जेवण आटोपली पण आरतीचे आई वडील काही त्यांच्या घरी येऊन पोहोचले नव्हते. विजयने त्यांना परत फोन लावला तर ते अजूनही घरीच होते. गावला तर गेले नाहीत आणि घरी पण आले नाही. मग विजयने नाराज होत लागलीच फोन कट करून दिला.
आता विजय लवकर काही फोन उचलणार नाही हे माहिती असल्याने आरतीच्या वडिलांनी सायलीला फोन लावला आणि आरती घरी येत असल्याच तिला सांगितलं. राज आणि प्रसाद घरी आलेले समजताच आरतीने घरी यायची घाई केली होती. ते तिने कोणालाही सांगायची मनाई केली होती. ती थेट सकाळीच विजयच्या घरी जाऊन उगवणार होती. पण आता विजय नाराज झाल्याने त्याला मात्र सांगाव लागल होत.
सायलीने देखील बाकी मंडळी त्यांच्या घरातून बाहेर पडल्यावर हळूच विजयच्या कानात आरती येणार असल्याच सागितलं. तेव्हा कुठे विजयने त्याचा राग सोडला होता.
तर बाकी भावंडाना निरोप द्यायला परी देखील खाली उतरून गेली होती. परी चालली म्हणून राज पण तिच्यामागे लगेचचं गेला होता. घरात तर प्रसादच्या विषयवार तिच्याशी बोलता येणार नव्हतं. आता त्यांना सोडून घरी परत येताना तो तिच्याशी बोलणार होता.
प्रसादची पण इच्छा होती की राज सोबत जाव. पण राजने सध्या त्याला मनाई केली.
प्रसादची पण इच्छा होती की राज सोबत जाव. पण राजने सध्या त्याला मनाई केली.
परीने तिच्या त्या भावंडाना निरोप दिला. नंतर जयला आठवल की त्याचे आई वडील तर बाहेर गेले आहेत. मग तो परत मागे वळला आणि परीजवळ आला. त्याला अस परत येताना बघून परी गोंधळून गेली. नंतर जस तिला जयच्या त्याला उशिरा आठवल्याबद्दल समजल तशी ती त्याच्यावर खळखळून हसली.
इकडे राजला परत टेन्शन आल. कारण आता घरी परत जाताना जय देखील सोबत असणार होता.
“जय एक काम कर,” परी जयकडे बघून बोलली. “तू पुढे जा मी आलीच.”
तसा जय राजकडे बघू लागला.
“सामान उचलायला मला लागेल तो.” परी जयला राजकडे बघत असल्याचे पाहून बोलली.
तरीही जय राजला बघतच तिथून निघून गेला.
“बोला साहेब,” परीने तिच्या हाताची घडी घातली. “काय चालू आहे तुझ्या मोठ्या भावाच?”
“अरे यार,” राजने एक सुस्कारा सोडला. “तुला कस गं समजत सगळ्यांच? मला ना आता खरच जेलेसी फील होत आहे, तू मला फक्त मैत्री ठेवायला लावल्याबद्दल.”
“त्यासाठी त्याला त्याचे डोळे नीट ठेवायला लावायचे ना,” परी हसून बोलली. “माला पण येऊन बोलली मला त्याच्याबद्दल.”
“कारण ती त्याला आवडायला लागली आहे.” राज तिच्याकडे आशेने बघत बोलला.
“खरचं?” परी विचार करत बोलली.
“हो ना.” राज
“पण तिची ती अट.” परीने तिच्या भुवया उंचावल्या. “थांबेल का तो? माझ झाल्याशिवाय तर ती काही तयार होणार नाही.”
“थांबेल तो.” राज मंद स्मित करत बोलला. “फक्त ती हो बोलली पाहिजे.”
“आणि तिला इंटरनशनल गोल्ड मेडल आणायचं आहे.” परीने पुढचा मुद्दा उपस्थित केला. “त्यात ती कोणतही कॉम्प्रमाइज करणार नाही.”
“करेल तो सपोर्ट तिला.” राज “त्याने तिची सगळीच माहिती काढली. तेही आजच्या दिवसात. खूप आवडलं त्याला. गोल्ड मेडालीस्टचा नवरा ऐकून घ्यायला त्याला खूप आवडेल. असाही तो बोलला होता.”
“तुम्ही सगळ ठरवलचं आहे ना?” परीने राजकडे बारीक डोळे करून पाहिले. कारण ती राजला चांगलीच ओळखत होत. जे काही काम हातात घेत होता ते तो पूर्ण करूनच राहत होता.
“शेवटी माझ्या भावाचा प्रश्न आहे,” राज आता जरा भावूक झाला. “आयुष्यात पहिल्यांदाच कोणी मुलगी आवडली आहे. ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसलं मला. म्हणून मी तुझ्याजवळ आलो.”
“ठीक आहे,” परी देखील मंद स्मित करत बोलली. “बोलते मी.”
एवढ बोलून ते दोघेही घराकडे जायला निघाले.
एवढ बोलून ते दोघेही घराकडे जायला निघाले.
जय परत घरी आलेला बघून सायली आणि विजय त्याला गोंधळून बघू लागले.
“ते मॉम आणि डड दोघेही बाहेर आहेत.” जय तिथल्या सोफ्यावर बसत बोलला.
“अरे हा,” विजयला आठवलं की जियाने देखील ती बाहेर असल्याचा त्याला फोन केला होता. पण कामाच्या गडबडीत तो विसरून गेला होता. “आला होता तिचा फोन.”
काही वेळाने परी आणि राज देखील घरी येऊन पोहोचले. मग ते सगळेच झोपी गेले. पण झोपण्याआधी तिने राजच बोलण सायलीच्या कानावर घालायला विसरली नाही. तसा तिला पण आनंद झाला.
कारण प्रसादला त्या सगळ्यांनी लहानाचा मोठा होताना पाहिलं होत. त्याचा स्वभाव, गुण सगळच माहिती होत. त्यांना तर आश्चर्य वाटलं होत की त्याला माला कशी काय आवडली? अस नाही की तिच्यात काही अवगुण होते. पण ती पूर्ण टोमबॉय होती. तिच्या अंगी नाजुकपणा नव्हता. ती आज्जीबातच मुलीसारखी वागत नव्हती. किचनमधला तिचा प्रवास तर अगदी नगण्य होता. तिच्या पोटापुरतीच तिला बनवता येत होत. तिच्या आयुष्यात प्रसादसारखा मुलगा येण म्हणजे एक आश्चर्यचं होत. आता सगळ काही मालाच्या हातात होत.
कारण प्रसादला त्या सगळ्यांनी लहानाचा मोठा होताना पाहिलं होत. त्याचा स्वभाव, गुण सगळच माहिती होत. त्यांना तर आश्चर्य वाटलं होत की त्याला माला कशी काय आवडली? अस नाही की तिच्यात काही अवगुण होते. पण ती पूर्ण टोमबॉय होती. तिच्या अंगी नाजुकपणा नव्हता. ती आज्जीबातच मुलीसारखी वागत नव्हती. किचनमधला तिचा प्रवास तर अगदी नगण्य होता. तिच्या पोटापुरतीच तिला बनवता येत होत. तिच्या आयुष्यात प्रसादसारखा मुलगा येण म्हणजे एक आश्चर्यचं होत. आता सगळ काही मालाच्या हातात होत.
दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे राज आणि प्रसाद लवकर उठून हॉलमध्ये आले. हॉलमध्ये येता येता ते दोघेही मोबाईलमध्ये बघत होते. काही वेळाने बसायला जागा बघायची म्हणून राजने मान केली तर त्यांना झटकाच बसला.
“माऊ,” राज आनंदाने ओरडला. “तू कधी आलीस?”
तस प्रसादने देखील वर पाहिलं. “अरे तुम्ही कधी आले?”
ते दोघेही आरती आणि संदेशच्या पाया पडले. पाया पडून झाल्यावर राजने सरळ आरतीला मिठी मारली. “बोलली असती तर तुला घ्यायला आलो असतो ना.”
“कुठे घ्यायला येशील?” आरती तिचे आनंदाश्रू पुसत बोलली. “आता गाडीत येते तुझी माऊ. तुझ्या काकांनी गाडी घेतली विसरलास का?”
“अरे हो.” राज आरतीच्या मिठीतून बाहेर येत बोलला.
“अरे हो.” राज आरतीच्या मिठीतून बाहेर येत बोलला.
आता सायली पण हॉलमध्ये आली. “भेटलास का तुझ्या माऊला?” सायली राजकडे बघून हसतच विचारू लागली. नंतर ती आरतीकडे वळली. “बरं का माऊ, तुमचे भाचे मोठे झाले आता. इतके की एकाने त्याच्यासाठी मुलगी पण बघून ठेवली आहे.” सायलीने थेट बॉम्बच टाकला.
आज सकाळीच अस काही ऐकायला मिळेल याची नाही आरतीला कल्पना होती आणि नाही ज्याने मुलगी पाहिली त्याला म्हणजे प्रसादला कल्पना होती.
तिकडे राजला पण चांगलाच धक्का बसला होता. त्याने परीला फक्त बोलायला लावल होत. ती थेट तिच्या आईला जाऊन सांगेल याची त्याला कल्पना पण नव्हती. त्यामुळे ते सगळेच एकमेकांकडे शॉक लागून बघत राहिले होते.
“कोणी पाहिली आणि कोणती पहिली?” आरती लगेच तिच्या त्या दोन्ही भाच्यांना बारीक डोळे करून बघू लागली.
तशी त्या दोघाची बोलतीच बंद झाली. आरतीला सांगण म्हणजे थेट मॉम पर्यंत गोष्ट पोहोचण याची खात्रीच होती.
“मी सांगते ना,” प्रसादची लहान बहिण लगेच बाहेर येत बोलली. तिच्यापाठी त्यांच्या आत्याची मुलगी देखील बाहेर आली. “ती नाही का सायली मामींची बहिण प्रणाली मामी, त्यांची मुलगी वेट लिफ्टिंग चॅम्पियन.”
तसे आरतीचे डोळेच विस्फारले गेले. संदेश पण जरा विचारातच पडला.
“बरा आहेस ना बाबा तू?” आरती लगेच प्रसादजवळ गेली. “अरे ती डायेट फॉलो करणारी, हेल्थसाठी कसून व्यायाम करणारी आणि तू नुसताच खादाड बोका. कस जुळेल तुमच? तिने फुक मारली तरी तू उडून जाशील.”
आरतीच्या वाक्याने तिथे एकाच हशा पिकला. कारण तिने जे काही सांगितलं ते अगदीच खर होत. प्रसादला खाण्या पिण्यात बंधन आज्जीबातच आवडत नव्हती. त्याची तब्येत अगदीच मेंटेन होती म्हणून कोणाला ते समजून यायचं नाही.
आता प्रसाद तिच्या ह्या मावशीला विचित्र नजरेने बघू लागला. “तू माझी मावशीच आहेस ना? मग माझ सोडून तिचं काय कौतुक करतेस?”
“अरे आहेच ती कौतुक करण्यासारखी.” सायली हलकेच हसत बोलली. “कालचं ती तुला मारक्या म्हशीसारखी बघत होती.”
परत ते सगळेच हसू लागले. त्यांचा तो हसण्याचा आवाज ऐकून विजय, परी आणि सुजय देखील बाहेर आले.
आता प्रसाद राजला चिडून बघू लागला. तर राजने हळूच त्याचे कान पकडले. ते परीने पाहिलं.
“आज ना उद्या हा विषय निघालाच असता,” परी प्रसादला समजावून सांगू लागली. “फक्त आवडली म्हणून चालत नाही ना. पुढच्या आयुष्याचा विचार करायला नको का? ती काय? तिच्या ह्या काकांनी सांगितलं की होईल तयार लग्नाला. पण नंतर तुमच्यात भांडण झाली आणि तिने तुला त्या वेट लिफ्टिंगसारखा उचलून कुठे फेकून दिल मग? आमची आत्या कुठे तुला शोधायला जाईल?”
आता प्रसाद परीला पण गोंधळून बघू लागला. ती त्याला समजावत होती की त्याची मस्करी करत होती तेच त्याला समजत नव्हत. जेव्हा ही मोठी मंडळी हसायला लागली. तेव्हा त्याला त्याची मस्करी चालू असल्याचे समजले.
मग प्रसाद बारीक तोंड करून बसला. ते त्याच्या भावाला बघवलं गेल नाही.
“फक्त प्रोब्लेम मालाचा आहे ना?” राज ह्या मोठया मंडळीना बघून बोलला. “ती तयार झाली तर तुमची काहीच हरकत नसेल ना?”
राजच अस निर्वाणीचं बोलण ऐकून ते सगळेच जरा गंभीर झाले. कारण त्याच अस निर्वाणीचं बोलण याचा अर्थ जे बोलेल ते तो करून दाखवेल असाच असायचा.
“आज्जीबात नाही.” विजय पण त्याला रोखून बोलला.
“ते प्रणाली आणि महेश सोबत बोलाव लागेल ना?” सायली हळूच बोलली.
“ते मी बघून घेईल.” विजय “तो पर्यंत राज आणि प्रसाद काय करतात ते बघुयात ना.”
त्यांच्या गप्पा चालूच होत्या तेवढ्यात आदेश तिथे येऊन पोहोचला आणि त्याच्या आई वडिलांना रोखून बघू लागला. कारण ते दोघ काल तिच्या आई वडिलांकडे राहिले होते आणि आज उठून पहिले इथे आले होते. आपली आई आपल्या आधी आपल्या मावशीच्या मुलाला भेटायला आलेली बघून आदेशचे गाल फुगले होते.
“अरे तू पण इथेच आलास का?” आरती उगाच हसून दाखवत बोलली आणि त्याला कवेत घेतलं.
“आता तू आधी मला न भेटता थेट इथे आलीस तर मला यावचं लागेल ना?” आदेश नाराजीच्या सुरात बोलला.
“अरे ते दोघे पाच वर्षातून आता आले आहेत,” परी आदेशला समजावत बोलली. “तू तर इथेच होतास ना?”
“गेले सात दिवस मी पण तिला भेटलो नव्हतो.” आदेश अजनूच चिडून बोलला.
“आता आईला भेटणार आहेस की असाच भांडत बसणार आहेस?” परी तिच्या हाताची घडी घालत विचारू लागली. “एकतर तू तुझ्या बाबांना पण भेटला नाहीयेस. मग ते पण रुसून बसले तर?”
“ते पण मला भेटायच्या आधी इकडे आले.” आदेश
“हा अजून लहानच आहे का रे?” प्रसादने हळूच राजच्या कानात विचारलं. तस त्याला खुदकन हसू सुटल.
“बघा ते दोघ कसे हसत आहे माझ्यावर.” आदेश दोघांकडे रागात बघत बोलला.
आता मात्र राज खळखळून हसला आणि आदेश जवळ गेला.
“तुला एक बातमी सांगितली तर तू सगळा राग विसरून जाशील.” राज हसतच बोलला.
ते ऐकून प्रसादने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. ‘ह्याला सांगून चुकी केली की काय?’ तो मनातच पुटपुटला.
इकडी आदेश अजूनही राजला चिडूनच बघत होता.
“अरे दादाला एक मुलगी आवडली आहे.” राज हसतच बोलला.
ते ऐकून आदेशने त्याचे कान बोट घालून तपासून घेतले आणि चेहऱ्यावर मोठ्ठ आश्चर्य उभं राहीलं. आदेशची ती प्रतिक्रिया बघून राजने होकारात मान हलवली. तस आदेशने प्रसादकडे पाहिलं आणि त्याच्याजवळ गेला.
“आय स्वेअर,” आदेश त्याच्याकडे बघत बोलला. “त्या मुलीला नक्कीच चांगला स्वयंपाक बनवता येत असेल. अगदी तो हवा तसा बनवून देणारी भेटली असेल.”
तशी एक हसण्याची मोठी लाटच तिथे उसळली गेली. एक आदेश आणि प्रसाद सोडला तर बाकी सगळेच हसत होते.
आदेश परत गोंधळून सर्वांना बघत राहीला.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा