Login

अवनी एक प्रवास भाग २६

परी देखील तिच्या कॉलेजमध्ये जाऊन पोहोचली. गेल्या गेल्या तिने तिचे लेक्चर घ्यायला सुरवात केली. जसे तिचे दोन लेक्चर संपून तिसर लेक्चर घ्यायची वेळ आली तस तिला परत प्रिन्सिपल सरांनी बोलावल्याचा निरोप मिळाला. आता काय झाल? हा विचार करत पुढच्या लेक्चर असलेल्या वर्गात जाऊन त्यांना थोडफार वाचन करायला लावून ती त्यांच्या प्रिन्सिपल सरांच्या केबिनला निघून गेली.
मागील भागात.

“तुला एक बातमी सांगितली तर तू सगळा राग विसरून जाशील.” राज हसतच बोलला.

ते ऐकून प्रसादने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. ‘ह्याला सांगून चुकी केली की काय?’ तो मनातच पुटपुटला.

इकडी आदेश अजूनही राजला चिडूनच बघत होता.

“अरे दादाला एक मुलगी आवडली आहे.” राज हसतच बोलला.

ते ऐकून आदेशने त्याचे कान बोट घालून तपासून घेतले आणि चेहऱ्यावर मोठ्ठ आश्चर्य उभं राहील. आदेशची ती प्रतिक्रिया बघून राजने होकारात मान हलवली. तस आदेशने प्रसादकडे पाहिलं आणि त्याच्याजवळ गेला.

“आय स्वेअर,” आदेश त्याच्याकडे बघत बोलला. “त्या मुलीला नक्कीच चांगला स्वयंपाक बनवता येत असेल. अगदी तो हवा तसा बनवून देणारी भेटली असेल.”

तशी एक हसण्याची मोठी लाटच तिथे उसळली गेली. एक आदेश आणि प्रसाद सोडला तर बाकी सगळेच हसत होते.

आदेश परत गोंधळून सर्वांना बघत राहीला.

आता पूढे.

“मग काय मॅगी बनवणारी भेटली का त्याला?” आदेश गोंधळून विचारू लागला.

“असच काहीस,” प्रसादची बहिण हसतच बोलली.

“आता मलाचं मावशीचं टेन्शन येत आहे,” आदेश बारीक डोळे करून बघू लागला. “अशी कोण शोधलीआहे?”

“तेच मालाच शोधली आहे.” राज

“तुला शोधली आहे?” आदेश अजूनच गोंधळून गेला.

“बरोबर आहे,” विजय त्याचा प्रश्न ऐकून विजय बोलू लागला. “पूर्ण बापावर गेला आहे. त्यालाही कधी लवकर समजायचं नाही.” विजय संदेशकडे बघून हसत बोलला.

तस संदेशने त्याच तोंड वाकड केल.

“अरे बाबा,” राजने त्याच्या खांद्याला पकडून जोरात हलवलं. “तुमच्या टीममधली टोमबॉय माला. ती आवडली आहे त्याला.”

तसा आदेश दोन क्षण ब्लँक झाला. त्याने नक्की काय ऐकल? याचा विचार करू लागला. नंतर तो जोरात ओरडला. “व्हॉट? आमचा डॉन आवडला?”

ह्यांचे बोलणे, प्रतिक्रिया ऐकून प्रसादचा संयम सुटला आणि तो भडभडा बोलू लागला.

“थांबा.” तो जरा जोरातच बोलला. “हो आवडली आहे मला ती आणि ज्या अवतारात तिला पाहिलं त्याच अवतारात अवतारात मला. किमान मेक अपचा थर लावून खोटा मुखवटा तर नाही घेत ती. तिला तिच्या आयुष्यात काय करायचं आहे? ते तिला माहिती आहे. हा तिच्या भावंडांसोबत जास्त राहिली असल्याने तिच वागण मुलांसारख आहे. ह्यांनी तिला कधी ती मुलगी आहे अस भासुच दिल नाही. ती पण मुलगी आहे यार, तिला पण मन असेल ना? त्याला सांभाळायला तिने असा रागाचा मुखवटा चढवून घेतला आहे.”

“तू आत्ताच बोलला ना की तिने खोटा मुखवटा चढवला नाहीये.” विजयने त्याला शब्दात पकडलं. “आणि आता त्याच्या उलट बोलत आहेस.”

ते ऐकून प्रसादने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले. “तुम्ही तिला चांगलेच ओळखता आणि एक मी जो तुम्हालाच तिच्या क्वालिटी सांगत बसलोय.” प्रसाद एक दीर्घ श्वास घेत बोलला.

“खूप लवकर समजलं.” सुजय त्याच तोंड वाकड करत बोलला.

“हे बघ परी,” आरती परीजवळ जात बोलली. आता ती जरा गंभीर झाली. “माझ्या लेकाला ती आवडली आहे. हे दोन्ही मुल तुझ्यासमोर आणि जास्त करून तूच सांभाळलेली आहेस. त्यामुळे ह्या दोघांना तू जास्त चांगली ओळखतेस. तुला जर खरचं वाटत असेल की मालासाठी हा माझा लेक चांगला आहे. तर तू मालाला समजावशील.”

“तू तिला इमोशनल ब्लकमेल करत आहेस.” सायली हलकेच हसत बोलली.

“माझा लाडका लेक आहे तो.” आरती तोऱ्यात बोलली.

“म्हणजे मला पण जी आवडेल तिच्याशी माझ लग्न लावून देशील?” आदेश त्याचे डोळे बारीक करून विचारू लागला.

“आधी तुझ्याशी लग्न करायला कोणी तयार झाल पाहिजे ना?” आरती हळूच हसत बोलली.

“मला वाटत आधी मावशीसोबत तुम्ही बोलायला हवं.” परी त्यांच बोलण तोडत बोलली. “कारण तिच्याबाबतीत निर्णय घ्यायचा पहिला अधिकार त्यांचा आहे ना.”

“आम्ही बोलू तिच्याशी.” आरती लागलीच बोलली.

“अगं,” विजय मधेच बोलला. “आधी प्राजू ताईसोबत तर बोल. नाहीतर ती चिडली तर काही खरं नाही तुमच.”

“तिच्याशी पण बोलेन मी.” आरती “हवं तर आत्ताच फोन करते.” एवढं बोलून तिने तिचा मोबाईल काढून त्यावर फोन सुद्धा लावलं होता.

“मावशी काय करतेस?” प्रसाद घाबरूनच बोलू लागला. “इथे येऊन फक्त एक दिवस झाला आहे. दोन दिवस तर प्रेमाने राहूदे.”

“बघा हाच तर घाबरत आहे,” परी प्रसादकडे बघून बोलली. “मग मी तरी मालाला कस समजावणार होते? हे अस घाबरलेलं बघून माला तर आज्जीबातच तयार होणार नाही.”

“का?” प्रसाद चिडून बोलला. “ती तिच्या मॉमला घाबरत नाही का?”

“नाही,” विजय “ती फक्त तिच्या ह्या दीला घाबरते. तिथे तर ती डोक्यावर बसवून ठेवली आहे. तिच्याआई वडिलांना तिच्याकडून काही करून घ्यायचं असेल तर ते ही परीलाच सांगतात.” विजय हसतच बोलला.

मग काय? राजच थंड पडलेलं डोक धावायला लागल. त्याच्या चेहऱ्यावर आसुरी स्मित आल.

“हेलो ताई.” आरतीने लावलेला फोन उचलला गेला होता.

आता प्रसाद मनातच प्रार्थना करू लागला.

“आली आहे मी इकडे,” आरती हलकेच हसत बोलली. “आता दोघांना भेटली आहे. संध्याकाळी तिकडेच येईल.”

“ठीक आहे,” प्राजक्ता “त्या चौघांना घेऊनच ये.”

“त्या दोघी तर लगेच येतील,” आरती गालातच हसत बोलू लागली. “पण तुझा लेक यायला जरा घाबरत आहे.”

“का गं?” प्राजक्ता लगेच टेन्शनमध्ये आली. “काही झाल का विजयच्या घरी?”

“हो खूप मोठा गोंधळ घालून ठेवला आहे त्याने.” आरती

“काय झाल?” प्राजक्ता “विजयकडे फोन दे. तो काही त्याला त्रास होईल अस वागणार नाही. तू नाहीतर सायली दोघींनीच काहीतरी गोंधळ घालून ठेवला असेल.”

“अरे !” सायली मधेच आठ्या पाडून बोलली. “ताई आधी ऐकून तर घे ना. लगेच आमच्यासारख्या गरिबावर आरोप नको लावूस.”

“तुमची गरिबी पहिली आहे मी.” आता राधिका मधेच बोलली. ती पण तर होती बाजूला. मग तिकडचा फोन स्पीकरवर गेला होता. “ती परी होती म्हणून ठीक. नाहीतर आतापर्यंत तुमच्या लेकांनी तुमच्या डोक्यावर मि-या वाटल्या असत्या.” आता ती खळखळून हसली.

“काय ग, ताई?” सायली लटक्या रागात बोलली.

“बरं काय झाल ते आता? ते नीट सांग.” प्राजक्ता

आता बहिणी बहिणीचा फोन सुरु झाल्यावर तो काही लवकर ठेवला जाणार नव्हता. ते बघून विजय आणि संदेश त्यांच आवरून विजयच्या कामावर निघून गेले. आज संदेश राहुलला भेटणार होता. तिथूनच तो त्याच्या घरी जाणार होता.

तर आरती सायली तिच्या कामावर जायला निघाली की तिच्यासोबतच ती निघणार होती. त्यांच्या ऑफिसला आराध्याला भेटून मग ती तिच्या सासरच्या घरी जाणार होती आणि संध्याकाळी ते दोघे प्राजक्ताच्या घरी जाणार होते.

नंतर आरतीने मालाबद्दल सांगून दाखवलं. तस प्राजक्ता आणि राधिका दोघींना देखील माला आवडली होती. पण त्यांनाही एकच प्रश्न होता. तो म्हणजे माला त्याला होकार देईल का? तिने जर मनापासून होकार दिला तरच ते प्रसादला लग्नासाठी होकार देणार होते.

ह्याचं फोनवर बोलन चालू असेपर्यंत राजच्या डोक्यात त्याचा प्लान शिजून तयार झाला होता.

बाकी इतक्या दिवसानंतर झालेली भेट बघून गप्पा काही संपणार नव्हत्या. म्हणून आरती आणि सायलीने त्यांच्या गप्पा आवरत्या घेतल्या. परीची तर आधीच तयारी झाली होती. मग ती देखील तिच्या कॉलेजला निघून गेली. आरती आणि सायली देखील सायलीच्या ऑफिसवर निघून गेल्या. तर प्रसाद, राज आणि त्यांच्या बहिणी त्याच्या घराकडे निघून गेले. आता घरात फक्त आदेश आणि सुजय दोघेच होते.

“तुला काय वाटत?” सुजय “मालासाठी प्रसाद चांगला मुलगा आहे?”

“तसा चांगला मुलगा आहे रे तो,” आदेश “म्हणजे बोलायला शांत, विनाकारण राग येत नाही. आला तरी समोरच्या माणसाच्या मनाचा विचार करतो. हा, त्याला खायला मात्र तो अगदीच फुडी आहे. सगळ्यांना वाटत की तो बाहेरच खूप खातो. पण तस नाहीये, त्याला वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला खूप आवडत. इतकच काय? तो ते स्वतः बनवतो देखील. ते खायची मर्यादा त्याला माहिती आहे. म्हणून तर त्याची तब्येत अजूनही सुटली नाहीये. तरी बाकीच्यांना तो फक्त खादाड वाटतो.” आता आदेश हलकेच हसत बोलला.

“ते ठीक आहे पण आपल्या मालासाठी?” सुजय

“तिने जर होकार दिला तर नक्कीच,” आदेश मंद स्मित करत बोलला. “त्याला डायेटच्या पण इतक्या डिशेश माहिती आहेत ना की तिच्या हेल्थसाठी खूप फायद्याच्या ठरतील.”

“हा तिकडे जाऊन हॉटेल मॅनेजमेंट करून आला आहे का?” सुजयच्या डोक्यात हा वेगळाच प्रश्न आला.

“तेच तर आम्हाला समजत नाही,” आदेश “तो त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिकत असताना हे सगळ कधी शिकला?”

“म्हणजे तसा हुशार आहे तो,” सुजय “म्हणजे आता मालाला मनवायला लागेल ना?”

“ती आणि आपल्याकडून मनवली जाईल?” आदेशने त्याच्या भुवया उंचावल्या.

“ते पण आहे,” सुजय पण सुस्कारा सोडत बोलला. “आपण दीला सांगुयात ना.”

“हम्म तो पण एक पर्याय आहे.” आदेश विचार करत बोलला. “पण आत्ताच तिच्यासमोर हा विषय नको काढूस. नाहीतर ती..” तो बोलता बोलता थांबला.

ते ऐकून सुजयने देखील ओकेचा इशारा केला आणि ते दोघे सुजयच्या खोलीत गेम खेळायला निघून गेले.

परी तिच्या कॉलेजला जात असताना राजचे तिला सतत मेसेज चालू होते. मालाला मनवण्यासाठी तो तिला विनंती करत होता. शेवटी परीने वैतागून त्याला फोनच लावला.

“अरे माकडा,” परी चिडली की त्याला अशीच कोणत्याही प्राण्याच्या नावाने त्याला हाक मारायची. “प्रेम मागून नाही मिळत रे, ते मेहनत करून मिळवाव लागत. त्याला सांग जरा प्रयत्न कर तिला मिळवण्यासाठी. तिनेच नकार दिला तर कोणीही त्याच तिच्याशी लग्न लावू शकणार नाही. मी तर करेलच रे मदत.”

एवढं बोलून तिने तिचा फोन ठेवून देखील दिला. प्रसाद आणि राज तर त्याच्या मोबाईलकडे बघतच राहिले.

“ती पण बरोबर बोलत आहे रे,” राज प्रसादकडे बघत बोलला. “तू स्वतः प्रयत्न केले नाहीत तर बाकीच्यांनी होकार देऊन सुद्धा ती लग्नाला तयार होणार नाही. तू एक पाउल टाक बाकी मी आहेच तुझ्यासोबत.” राजने प्रसादला आश्वस्त केल.

तर दुसरीकडे आराध्याला भेटून आरतीला खूपच आनंद झाला होता. आता त्यांनी परत एका त्यांच गेटटुगेदर करायचं ठरवलं होत. संदेश देखील विजयच्या ऑफिसमधून निघून राहुलच्या ब्रांचमध्ये त्याला भेटायला गेला. त्याच्याकडे असणारे त्याच्या ब्रांचचे अपडेट्स आणि कागदपत्र त्याच्या हवाली केले. तिथे राहुलसोबत गप्पा मारल्यावर संदेश त्याच्या घरी निघून गेला.

परी देखील तिच्या कॉलेजमध्ये जाऊन पोहोचली. गेल्या गेल्या तिने तिचे लेक्चर घ्यायला सुरवात केली. जसे तिचे दोन लेक्चर संपून तिसर लेक्चर घ्यायची वेळ आली तस तिला परत प्रिन्सिपल सरांनी बोलावल्याचा निरोप मिळाला. आता काय झाल? हा विचार करत पुढच्या लेक्चर असलेल्या वर्गात जाऊन त्यांना थोडफार वाचन करायला लावून ती त्यांच्या प्रिन्सिपल सरांच्या केबिनला निघून गेली.

तिचा हा पुढचा तास रावीच्या वर्गातला होता. तिच्या दिला परत केबिनला बोलवलं गेल्याच बघून ती विचारात पडली आणि सरळ ती देखील त्या केबिनकडे जायला निघाली.

तिला अस जाताना बघून मनालीने तिला अडवायचा देखील प्रयत्न केला. पण तिला तिच्या दीच्या पुढे काहीच दिवस नव्हत. तिने मनाली देखील सोबत घेतलं.

“अगं मी तुला अडवायला आली आणि तू मला तुझ्यासोबत का घेऊन जात आहेस?” मनाली तिच्या मागे मागे जात, म्हणजे रावी तिला खेचतच घेऊन जात असल्याने ती रावीच्या मागे मागे जात बोलली.

“मी एकटीच पनीशमेन्ट करताना चांगली दिसणार नाही ना,” रावी पुढे बघत बोलली.

“रिअली?” मनालीच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या.

“चालते का गप्प?” रावी जरा चिडून बोलली.

तोपर्यंत त्या त्यांच्या प्रिन्सिपल सरांच्या केबिनजवळ जाऊन पोहोचल्या. त्या केबिनच्या काचेतून आतमध्ये परीसोबत अजून दोन मुली उभ्या होत्या. त्या दोघी, परी आणि प्रिन्सिपल सर काहीतरी चर्चा करताना दिसले. सध्या जे काही दिसत होत त्यावरून तिथे काही गंभीर नसल्याचं रावीला जाणवलं.

बोलता बोलता परीला रावी लपून बघत असल्याच समजलं. तसा तिने मनातच डोक्याला हात लावला.

“प्लीज ना मॅम,” त्या दोघींपैकी एक मुलगी परीला खूपच विनवण्या करू लागली. “मागच्या वेळेस तूम्ही कॉलेजसाठीच केल होत ना? आताही कॉलेजसाठीच करायचं आहे. असही तूम्हाला थोडीच डान्स करायचा आहे. फक्त बसवून द्यायचा आहे.”

आता परी त्यांच्या प्रिन्सिपल सरांकडे बघू लागली. कारण याचा परिणाम तिच्या लेक्चरवर होणार होता.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all