मागील भागात.
पहिले तिला पाणी पाजलं. थोड वेळाने ती जशी निवांत झाली तस तिला एनर्जी ड्रिंक प्यायला दिल. तिथे उपस्थित सर्व विद्यार्थी देखील तिच्याजवळच येऊन उभे राहिले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येत होती. काही वेळाने मालाच्या अंगात तरतरी आली आणि ती भानावर आली.
“काय चालू आहे तुझ?” आरुषने कडक आवाजात विचारलं.
“मलाच माहिती नाही.” माला सरळ बसत बोलली. “जेव्हापासून त्याला भेटली आहे ना तेव्हापासून मन अस्वस्थ झाल आहे. काहीतरी वेगळच वाटायला लागल आहे. त्याचे शब्द अजूनही माझ्या मानत नाचत आहेत.”
“काय बोलला तो असा?” आदेश लगेच चिडून बोलला. “तू फक्त सांग. लगेच त्याची जीभ हासडून त्याच्या हातात देतो.”
“तस नाही रे,” माला आता चिडून बोलली. “तो तर माझ कौतुकचं करत होता. पण मग काय कस? काहीच समजतं नाहीये मला.” ती वैतागली होती. तर बाकीचे तिला विचित्र नजरेने बघायला लागले होते.
आता पूढे.
“एक काम कर,” आरुष तिला समजावत बोलला. “तू आज घरीच जा आणि चांगला आराम कर.”
तशी माला त्याला चिडून बघू लागली. “म्हणजे तुला काय बोलायचं आहे? मी वेडी झाली?”
“तस नाही,” आरुष मनातच सुस्कारा सोडत बोलला. “एकतर तुला काय होत आहे? ते तुलाही समजत नाहीये. मग त्यात आम्ही काय करू? ते आम्हालाही समजत नाहीये. त्यापेक्षा तू घरी जाऊन आराम कर.”
तस मालाने नकारार्थी मान हलवली आणि तिथून उठली आणि सरळ त्यांच्या बाथरूमकडे निघून गेली.
तिला अस जाताना बघून तिची ही बंधू मंडळी त्यांच्या डोक्याला खाजवत विचार करू लागली. ‘आता हिला काय झाल?’
“मला तरी वाटत ना की दीच्या कानावर घातलं पाहिजे.” सुजय आरुषकडे बघत बोलला.
“हो ना.” आरुष
मग माला तिथून निघून गेल्यावर परीला फोन लावायचे ठरवून ते सगळे त्यांच्या त्यांच्या कामाला लागले.
आज परी देखील तिच्या वेळेनुसार कॉलेजला जाऊन पोहोचली. तिने तिचे नेहमीचे लेक्चर आटोपले. कॉलेजच्या फंक्शनच्या तयारीसाठी कॉलेजमधले बरेच लेक्चर कमी जास्त करण्यात आले होते. त्यात परीसाठी तर तिचे बरेच लेक्चर कमी केले होते. म्हणून ती आज लवकरच तिच्या लेक्चरपासून फ्री झाली होती. तिला आता त्या मुलींची डान्स प्रक्टिस घ्यायला जायचं होत.
परीने तिचं लेक्चरच सगळचं सामान आवरलं आणि त्या कॉलेजमध्ये असलेल्या हॉलकडे जाऊ लागली. जिथे बरीच मुल आणि मुली त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमाची तयारी करत होते.
परी जशी तिथे जाऊन पोहोचली तस तिला त्या मुली त्यांच तोंड पाडून बसलेल्या दिसल्या. परीने त्यांच्याजवळ जात त्याच कारण विचारलं.
“ते बाकीचे ग्रुप जागा आणि ओडीऑ सिस्टीम सोडत नाहीयेत. त्यांना जवळपास दोन तास झाले आहेत सराव करून. तरीही ते जायला मागत नाहीयेत.” पहिली मुलगी सुजाता
“दमले तर बसून राहत आहेत, पण जायला तयार नाहीत.” दुसरी मुलगी तेजश्री
परीने त्या हॉलमध्ये पूर्ण नजर फिरवली. तिथे बरेच ग्रुप प्रक्टिस करत होते. अश्याने त्यांचा तिथे नंबर लागण जरा मुश्कीलच होत.
“मग दुसरा हॉल बघू ना.” परी
“ते एकतर मिळत नाहीयेत,” तेजश्री “आणि मिळालेच तर त्यांचे भाडे खूप आहे.”
मग परी जरा विचारात पडली. तशी तिच्या डोक्यात एक जागा आली. पण तिला तिथे जायला कधीच आवडलं नव्हत. तिच्या बंधू मंडळींनी तिला कितीतरी वेळा तिथे बोलावलं होत. पण तिची तिथे जायची नकारघंटा वाजतच राहायची. पण आता प्रश्न ह्या मुलींच्या सरावाचा होता. आता तत्काळ स्वरुपात दुसरी जागा देखील मिळणार नव्हती. शेवटी मनातच एक दीर्घ श्वास घेतला आणि मोबाईल बाहेर काढत त्यावर एक फोन लावला.
“बोल दी.” आरुषने तो फोन उचलला. “आता तुलाच फोन लावणार होतो.”
“ऐक आधी,” परीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल. “तुमचा हॉल दुपारी किती वाजेपर्यंत रिकामा होतो.”
“आं?” आरुषला पहिले तिचा प्रश्नच समजला नाही. “काय?”
“तुमच्या ॲकेडेमीचा हॉल दुपारी किती वाजेपर्यंत रिकामा होतो?” परी आता जरा चिडून बोलली.
“एक वाजेपर्यंत.” आरुष गोंधळून बोलला. “का गं दी? काय झाल?”
“काही नाही,” परी “आलीच मी एक वाजता.” आणि तिने समोरून काही बोलेपर्यंत फोन ठेवूनही दिला.
इकडे आरुष मात्र धक्का लागल्यासारखा त्याच्या मोबाईलला बघू लागला. त्याने आत्ता फोनवर काय ऐकलं? हे समजून घेऊ लागला. त्याची ही परिस्थिती बघून बाकी जण लगेच त्याच्या जवळ येऊन थांबले.
“काय झाल?” सुजय “असा भूत पहिल्यासारखा का त्या मोबाईलला बघत आहेस?”
तस आरुषने एक नजर त्या सर्वांवर टाकली आणि मानेला झटका देत त्याच्या मोबाईलमधला परीसोबतचा रेकॉर्ड झालेला कॉल त्यांना ऐकवू लागला. ते ऐकून बाकी सगळ्यांना देखील धक्का बसला.
“याचा अर्थ दी इथे येत आहे?” जय
“दी इथे येत आहे.” आदेश आनंदाने ओरडला.
‘दी इथे येत आहे.” सुजय देखील ओरडला.
त्याच्यामागे आरुष देखील ओरडला. हाच आरडाओरडा परीला ऐकायचा नव्हता. म्हणून तिने सरळ तो फोन कट करून दिला होता.
बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेलेली माला जी नुकतीच बाहेर येत होती ती देखील ह्या चौघांचा असा ओरडण्याचा आवाज ऐकून गोंधळून गेली. आधीच ती वैतागलेली होती. त्यात ह्यांच ओरडणं ऐकून ती जरा चिडलीच.
“काय आहे?” माला चिडूनच बोलली. “लहान मुलांसारखे किंचाळायला काय झाल?”
“तसे ते चौघ एकमेकांकडे बघून जरा शांत झाले आणि नंतर एकत्रच बोलले. “दी इथे येत आहे.”
“हा मग?” माला तिच्याच तालात बोलून गेली. ती तिची बॅग घ्यायला वळली आणि तिने काय ऐकलं? ते तिला आता जाणवलं. तशी ती गरकन मागे फिरली. “दी आज इथे येत आहे?” तिने तिचे डोळे विस्फारत विचारलं.
यावर त्या चौघांनी होकारात मान हलवली. दोन क्षण तर ती शांतच राहिली आणि नंतर ह्या चौघांपेक्षा तिच जास्त ओरडायला लागली.
“इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच दी इथे येत आहे.” तिने आळीपाळीने चौघांना गोल गोल फिरवत हे वाक्य बऱ्याच वेळा बोलत राहिली.
“काय तमाशा चालू आहे?” एक कडक आवाज तिथे घुमला.
तसे ते सगळेच चिडीचूप झाले. त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं तर त्यांचे सर तिथे आले होते. ह्यांनीच तर ह्या अतरंगी भावंडाना शिस्तीत आणल होत. आता ते एका लायनीत उभे राहून मान खाली घालून उभे राहिले.
तस त्यांच्या ह्या सरांनी त्यांना जे ओरडायला घेतलं. ते फक्त ऐकत राहिले होते. शेवटी शेवटी तर त्यांच्या सरांनी ह्या मुलांना वेळेची किंमत नाही अस देखील ऐकवून दाखवलं. आधीच त्यांच्या घरी त्यांच्या लग्नावरून जरा वाजल होत. त्यात जरा मनाला शांती म्हणून ते त्यांच्या ह्या मुलांच्या अकॅडेमीमध्ये आले तर त्यांना हे पाचही मंडळी त्यांची काम सोडून फक्त धिंगाणा घालताना दिसली. मग त्यांचा राग अजूनच अनावर झाला आणि त्यांनी ह्या पाचही जणांना ओरडायला घेतलं होत.
“बास...” तिथे अजून एक आवाज कडाडला.
तसे ते सर पण जरा दचकलेच. त्या सगळ्यांनी मागे वळून पाहिलं तर परी उभी होती. तिच्याशिवाय तिच्या बंधू मंडळींवर कोणी आवाज चढवलेला तिला आवडत नव्हता. त्यात ते तिच्या भावांना इतक काही बोलून गेले होते. मग तिलाही खूप राग आला.
“ते ऐकून घेत आहेत म्हणून काहीही बोलाल का मिस्टर?” परी त्याच्याकडे रागात बघत बोलली. “त्यांची चूक नसताना ते ऐकून घेत आहेत तरी त्यांना किंमत नाही अस बोलता? बरोबर आहे. तुमचे फक्त डोळेच इकडे तिकडे फिरतात. मेंदू हलतच नाही वाटत. काय झाल? हे विचारायची तर तसदीच घेत नाही. वरून दुसऱ्यांना नाव ठेवायला मोकळे. माझी भावंड आहेत. त्यांना काही बोलाल तर याद राखा.” परीने तिचंमधलं बोट त्याच्या चेहऱ्यासमोर नाचवलं.
परी त्याला इतकी बडबड करत होती. पण तो तर तिलाच बघण्यात व्यस्त झाला होता. त्याला त्याची आणि तिची पहिली भेट आठवली. जेव्हा ती त्या कारच्या शोरूममध्ये त्याला धडकली होती. पण तेव्हा तर ती नम्रपणे बोलत होती आणि आता तिने जे काही त्याला झापलं होत त्यावरून ती त्याला वेगळीच भासली. एवढ प्रेम भावांवर? तो मनातच विचार करत राहीला. नंतर त्याला जाणवलं.
‘अरे देवा, ही ह्या अतरंगी मुलांची बहिण आहे?’ त्याने मनातच सुस्कारा सोडला.
तर दुसरीकडे ते पाचही जण त्यांचे डोळे विस्फारून दोघांना बघत राहिले. त्यांच्या नजरेसमोर पहिल्यांदाच त्यांचे सर गपचूप ऐकून घेत होते. नाहीतर ते कोणाला ऐकतील तर शप्पथ.
“अरे यार,” आरुष हळूच बोलू लागला. “ही दोघे एकमेकांसमोर म्हणजे आग आणि वादळ एकत्रच. यात भाजले फक्त आपण जाणार.”
“पण दी यांना कशी ओळखते?” माला ही हळूच बोलली.
“काय माहित?” सुजय “इथे तर पहिल्यांदाच आली आहे. तिची आणि सरांची भेट कधी झाली?”
‘पण हिची ही भांवड तिचं तर खूप कौतुक करतात की ती प्रेमळ आहे म्हणून.’ त्याचे विचार परत धावू लागले. ‘पण मला भेटल्यावर कुठे जात तिचे प्रेमळ बोलण? मागे पण भेटली होती तेव्हा ही फक्त भांडली होती आणि आताही भांडतच आहे.’
तर हा आहे तुषार. इंटरनेशनल वेट लिफ्टिंग स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करत होता. त्याने आजवर बरेच मेडल जिंकून आणले होते. त्याची स्वतःची जिम देखील होती. ह्या भावंडांच्या ॲकेडमीमध्ये तो ट्रेनिंग द्यायला सुध्दा येत होता.
ही सगळी मुल कॉलेजमध्ये शिकत असताना आंतर महाविद्यालयीन स्पर्धेदरम्यान तुषार सोबत ओळख झाली होती. त्यावेळेस ह्या सगळ्यांनी बऱ्याच स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले होते. ह्या मुलांमध्ये तुषारला काहीतरी स्पार्क जाणवला होता. म्हणून तो देखील नंतर ह्यांच्यासोबत त्यांच्या ॲकेडमीमध्ये जॉईन झाला होता. मालाला तर तो स्वतः ट्रेन करत होता.
सहा फुट उंच, व्यवस्थित सेट केलेली दाढी, गोऱ्या रंगाचा आणि धिप्पाड अशी शरीरयष्टी. कोणी पहिल्यांदा पाहिलं तर तो त्याच्याशी वाकड बोलायला देखील घाबरेलं. त्याच तुषारला ती दोन वेळेस कचाकचा भांडली होती आणि त्याने ते गपचूप ऐकून घेतलं होत.
तिची बडबड काही थांबायची नाव घेत नव्हती. शेवटी तुषार वैतागून बोलला.
तिची बडबड काही थांबायची नाव घेत नव्हती. शेवटी तुषार वैतागून बोलला.
“अय चार फुट चार इंच.” तुषार त्याच्या कपाळावर आठ्या पाडून बोलला. “जरा थांब, सिमेंटच तोंड असत तर इतक्यात तुटल असत.”
चार फुट चार इंच ऐकून परीचा राग अजूनच वाढला. “स्वतः दगडा धोंड्यासारखा वाढला आहात आणि मला चार फुट बोलत आहात?”
आता तुषार पुन्हा काही बोलेल तोच मागून आरुषचा आवाज आला आणि तेही एकदम कडक.
आता तुषार पुन्हा काही बोलेल तोच मागून आरुषचा आवाज आला आणि तेही एकदम कडक.
“सर,” तुषारने जसा आवाज दिला तस तुषारने मागे वळून पहिले तर परीची ही पाचही बंधू मंडळी जरा चिडूनच त्याच्याकडे बघत होती.
‘अरे यार,’ तुषार मनातच बोलू लागला. ‘ही ह्यांची बहिण आहे हे का मी विसरतो? जपून रहाव लागेल बाबा.’
ही बंधू मंडळीवर जरी तुषारचा वचक असला तरी जेव्हा विषय त्यांच्या ह्या लाडक्या दीचा असतो तेव्हा ते कोणासोबत देखील लढायला तयार होत होते. मग समोर यमदेव जरी आला तरी त्याच्याशी दोन हात करायची धमक ठेवत होते.
“तुमच काय आता?” परी त्यांच्यावर पण चिडली. कारण त्यांच्या धिंगाणा घालण्याच कारण तर तिला माहितच नव्हत. ती तर एक वाजता येणार होती. पण ती लवकरच तिथे येऊन पोहोचली होती.
“जावा तुमची तुमची काम करा.” नंतर तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या मागे आलेला त्या मुलींच्या ग्रुपपैकी तेजश्री खूपच हसत होती. कारण ती तुषारची लहान बहिण होती आणि आपल्या दादाची बंद झालेली बोलती बघून तिच्या मनात इतक्या उकळ्या फुटल्या होत्या की त्या आता कोणाजवळ तरी मोकळ्या झाल्याशिवाय थांबणार नव्हत्या.
“तू का दात काढत आहेस?” परीने तेजश्रीला वैतागून विचारलं.
परीच्या बोलण्याने तुषारच लक्ष तेजश्रीकडे गेल आणि त्याचे डोळे विस्फारले गेले. ‘ही काय करते इथे?’ त्याच्या मनात प्रश्न उभे राहिले. तिच्या चेहऱ्यावरून तर तिच्या डोक्यात बरेच प्लान शिजत असल्याचे त्याला लांबून देखील सहज जाणवले.
“तुमच्यासमोर बोलण्यात कोणीच जिंकू शकत नाही मॅम.” तेजश्रीने तुषारकडे बघत मॅम या शब्दावर जरा जोर दिला.
ते ऐकून त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि तो त्याला ज्या ट्रेनिंगसाठी बोलवलं होत तिथे जाऊन त्याने त्या मुलांचे ट्रेनिंग घ्यायला सुरवात केली.
“तुम्ही ऑफिसमध्ये थांबा मी आलीच.” परीने त्या मुलींच्या ग्रुपला सांगितले आणि ती मालाकडे बघायला लागली.
तस मालाला समजून गेल की तिच्या दीला तिच्यासोबत बोलायचं होत ते. मग त्या दोघी त्या ॲकेडेमीच्या मागच्या बाजूला निघून गेल्या.
आज तुषारच काही त्याच्या कामात लक्ष लागत नव्हत. ते चौघे तर तुषारचं होणाऱ्या चुकांना बघून गोंधळून गेले होते. तर तेजश्री त्याच्या मोठ्या दादाला बघून खूप हसत होती.
तिकडे तुषार खूपच टेन्शनमध्ये आला. कारण आता तेजश्रीला त्याला चिडवायला सोन्याची खाणच मिळाली होती. आता त्याच्या चिडवण्याचा ती कशी बदला घेईल? हा विचार करून त्याला टेन्शन आल होत.
तिला मनवण्यासाठी काय काय कराव लागेल? त्याच्या खिशाला कितीचा भुर्दंड बसेल हेच विचार त्याच्या मनात नाचत होते.
इकडे माला आणि परी मागच्या बाजूला येऊन बसले तर खरे. पण माला काहीच बोलायला तयार नव्हती. चेहऱ्यावरून मात्र वैतागलेली वाटली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा