मागील भागात.
“तुम्ही ऑफिसमध्ये थांबा मी आलीच.” परीने त्या मुलींच्या ग्रुपला सांगितले आणि ती मालाकडे बघायला लागली.
तस मालाला समजून गेल की तिच्या दीला तिच्यासोबत बोलायचं होत ते. मग त्या दोघी त्या ॲकेडेमीच्या मागच्या बाजूला निघून गेल्या.
आज तुषारच काही त्याच्या कामात लक्ष लागत नव्हत. ते चौघे तर तुषारचं होणाऱ्या चुकांना बघून गोंधळून गेले होते. तर तेजश्री त्याच्या मोठ्या दादाला बघून खूप हसत होती.
तिकडे तुषार खूपच टेन्शनमध्ये आला. कारण आता तेजश्रीला त्याला चिडवायला सोन्याची खाणच मिळाली होती. आता त्याच्या चिडवण्याचा ती कशी बदला घेईल? हा विचार करून त्याला टेन्शन आल होत.
तिला मनवण्यासाठी काय काय कराव लागेल? त्याच्या खिशाला कितीचा भुर्दंड बसेल हेच विचार त्याच्या मनात नाचत होते.
इकडे माला आणि परी मागच्या बाजूला येऊन बसले तर खरे. पण माला काहीच बोलायला तयार नव्हती. चेहऱ्यावरून मात्र वैतागलेली वाटली.
आता पूढे.
“काय झाल माला?” परीने प्रेमाने विचारलं.
“मी ठीक होते ना गं दि माझ्या माझ्या आयुष्यात,” माला अगदीच लहान मुलीसारखी बोलायला लागली. “माझ्या माझ्या विचारात मस्त जगत होते.”
“मग आता काय झाल?” परी “तुला कोणी काही बोलल का?”
“काय झाल म्हणजे?” माला तिचे गाल फुगवून बोलली. “का त्या प्रसादचं माझ्या डोक्यात टाकलस? आता नुसतचं त्याचा विचार करून करून डोक दुखायला लागल माझ.”
“पण तू का त्याचा इतका विचार करत आहेस?” परीने गोंधळून विचारलं.
मग मालाने प्रसाद भेटल्याचे तिला सांगितलं आणि तेव्हा जे जे काही बोलला ते ते तिला सांगून दाखवलं. “आता त्याचे ते बोलण माझ्या डोक्यातून जातच नाहीये काय करू मी?”
तिचे चेहऱ्यावरचे ते भाव बघून परीला जरा तिच्यावर हसायलाच आल. तसे मालाचे गाल अजूनच फुगले गेले.
“आता त्याने काही प्रश्न विचारला नाही म्हणून तू उत्तर दिल नाहीस अस ही बोलते.” परी “आता त्याचे विचार डोक्यातून जात नाहीये म्हणून वैतागली देखील आहेस. मग नेमकी तुझ्या मनाला काय हवं आहे? ते तू विचार केलास का?”
“तेच तर समजत नाहीये.” मालाने तिचे ओठ बाहेर काढले.
“मग अजून एक दोन वेळेस भेट त्याला.” परी
“आणि अजून डोक खराब करून घेऊ?” माला तिचं तोंड वाकड करत बोलली.
“ते तू स्वतः करून घेत आहेस.” परी तिला समजावत बोलली.
“पहिल्या भेटीतच त्याचा चांगुलपणा तुला भावाला. मग त्याला तू अजून समजून घेतलंस तर कदाचित तुझ मन तुला नीट काय ते उत्तर देईल.”
तशी माला विचार करायाला लागली. “ठीक आहे.” नंतर तिला आठवलं आणि लगेच ती उत्साहात आली आणि ओरडून बोलली. “दी.”
तिचं ते ओरडण बघून परी पहिले तर दचकलीच. “काय झाल?” तिने लगेच काळजीने विचारलं.
“अगं दी,” तिने परीला तिच्या हाताने धरून उठवलं आणि तिला गोल गोल फिरवू लागली. “आज तू पहिल्यांदाच आमच्या ॲकेडेमीला पाय लावलास. चल तुला आमची पूर्ण ॲकेडेमी दाखवते.” आता माला परीच काही उत्तर येण्याआधीच तिच्या हाताला पकडून घेऊन गेली.
तिचं ते बालिश वागण बघून परीने तिचा दुसरा हात डोक्यालाच लावला.
तिचं ते बालिश वागण बघून परीने तिचा दुसरा हात डोक्यालाच लावला.
तर दुसरीकडे विजय त्याच्या कामात असताना त्याला आश्रमातून फोन आला. पहिले तर तो खूपच व्यस्त असल्याने त्याने त्यांचे येणारे फोन काही उचलले नव्हते. त्यांना कधी कधी कुठल्या वस्तूची तात्काळ गरज असेल तर ते विजयला फोन लावत होते. आताही तसच काही असेल अस त्याला वाटलं आणि त्याने सरळ त्याच्या मॅनेजरला फोन करून त्यांच काय म्हणणं आहे ते बघायला लावलं. काही हवं असेल तर तात्काळ त्यांना पोहोचविण्याची व्यवस्था करायाला लावली.
थोडा वेळ झाला नसेल तोच मॅनेजरचा त्याला परत फोन आला. त्या आश्रमाचे मुख्य अधीक्षक थेट त्याला भेटायला आले होते. आता मात्र विजय जरा विचारात पडला. कारण ते असे कधीच त्याला न सांगता भेटायला येत नव्हते. आता ते आले आहेत तर त्यांना भेटावं तर लागणार होतच. मग विजयने त्याच्या मॅनेजरला त्या अधीक्षकाला थोडा वेळ वाट पाहायला सांगायला लावलं.
विजयने त्याच हातातली काम आटोपली आणि राहिलेली काम जरा वेळासाठी पुढे ढकलली आणि तो त्या आश्रमाच्या अधीक्षकाला भेटायला आला.
“सॉरी ते जरा कामात होतो.” विजय अदबीने बोलला.
“खरं तर सॉरी मीच बोललो पाहिजे,” अधीक्षक “अस थेट भेटायला आलो. माझ्यामुळे तुमची काम जरा थांबली. पण तितकचं महत्वाच होत. म्हणून याव लागल.”
मग विजय जरा गंभीर झाला. पण परीच्या त्या सो कॉल्ड काकाने काही केल तर नाही ना? अशी शंका त्याच्या मनात येऊ लागली.
“चहा की कॉफी?” विजय “काय घेणार?”
“चहा की कॉफी?” विजय “काय घेणार?”
“झाल चहा पाणी.” अधीक्षक “हे कागद बघा.” त्याने काही कागद विजयसमोर धरली.
विजयने ती कागद घेऊन वाचायला सुरवात केली. जस जसे ती कागद तो वाचत होता तसतस त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटू लागले. ती कागद वाचून झाल्यावर त्याने अधिक्षाकडे प्रश्नार्थक पाहिलं.
“काय आहे हे?” विजय “हे तर कोण्या रेखा नावाच्या मुलीच आहे.”
“तिचं रेखा,” अधीक्षक “जीला तुम्ही परी बोलता आणि तिचं दुसर नाव अवनी ठेवलत.”
“हे बघा,” विजय “तिच्या रेखा या नावाशी काहीही संबंध नाहीये. तश्या प्रकारचा काही पुरावा आम्ही ठेवलाच नाहीये. तिने देखील तिचं अवनी नावाचं अस्तीत्व हेच खरं मानल आहे. तिला रेखा या नावशी आता चीड आहे. त्यामुळे त्या कागदाचं काय करायचं तुम्ही ठरवा. माझी लेक माझ्या जवळच राहील.” विजय आता अगदीच कडक आवाजात बोलला. त्या दिवशीच परीच बोलण त्याच्या मनात उठून आल.
‘मी तुमचीच मुलगी आहे.’ ह्या परीच्या वाक्याने त्याला आताच बोलण बोलायला बळ दिल होत.
“विषय तो नाहीये,” अधीक्षक “ती त्यांच्या गावातल्या पाटलांची मुलगी होती. जस तिच्या आई वडिलांचं अपघाती निधन झाल. तस तिच्या काका आणि आत्याने तिची प्रोपर्टी त्यांच्या नावावर होण्यासाठी तिला आश्रमात सोडलं होत. तिच्या वय वर्ष २५ नंतर ती सगळी प्रोपर्टी तिच्या नावावर होणार होती. त्यामुळे तिला दूरच्या एका होस्टेलमध्ये ठेवलं असल्याचे त्यांनी त्याच्या गावाला पसरवले. आता पंचवीस वय उलटून गेल्यावरही जवळपास सात वर्ष होत आली तरी तिचा काहीच पत्ता न लागल्याने ती सगळी प्रोपर्टी तिच्या लहान्या काकांच्या आणि आत्याच्या नावावर होणार होती. पण कोणीतरी ती मुलगी आमच्या आश्रमांत जिवंत असल्याचे पुरावे तिथल्या नगर पंचायतीमध्ये दिले. मग त्यांच्या नावावर ती प्रोपर्टी काही झाली नाही. आता त्या मुलीच्या नावाची चौकशी करण्यासाठी त्या नगरपंचायतने आम्हाला ती कागद पाठवून त्या संबंधी उत्तर द्यायला लावले आहे.”
“मग आता काय म्हणण आहे तुमच?” विजय
“परीला एकदा तिच्या गावाला जाव लागेल.” अधीक्षक “तिथे जाऊन ती प्रोपर्टी तिच्या नाववर झाली की त्याच काय करायचं ते ती ठरवेल. मग आम्ही मोकळे.”
आता विजयला परीचे काका तिला शोधत यायचं कारण समजल होत. तिचं तिच्या आत्याच्या मुलासोबत लग्न लावून सगळी प्रोपर्टी घ्यायचा डाव असलायचे विजयला समजले.
“पण तिला त्या प्रोपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये.” विजय “त्यामुळे ती प्रोपर्टी होऊदे तिच्या त्या काकाच्या नावे.”
“इतक सोप असतं तर मला इथे यावचं लागल नसत.” अधीक्षक “जसे तिच्या आई वडिलांचे शत्रू त्यांच्या घरात होते तसे त्यांचे काही हितचिंतक देखील आहेत. ज्यांनी तिथे त्या गावात राहून तिच्या काकांच्या मनसुब्यांना उधळून लावलं होत. बरं तिची ती आत्या खरी आहे का? हा देखील एक चौकशीचा भाग झालेला आहे. कारण परीच्या बाबांना फक्त एक लहान भाऊ होता. आता त्याने त्याची ही कुठून बहिण आणली काय माहित? लांबची आहे म्हणे. कदाचित हा देखील त्याचाच एक डाव असावा. त्या आत्याचा मुलगा परीला भेटून देखील गेला आहे वाटत. काहीतरी मोठा डाव रचायचा प्रयत्न चालू आहे.”
“हो आला होता ना.” विजय तिरकस हसत बोलला. “तिच्या भावंडांनी त्याची जी परीस्थिती करून त्याला परत पाठवलं ना. मला नाहीत वाटत ते परत परीच्या मागे लागतील.”
“ते ठीक आहे,” अधीक्षक “पण आम्हाला तर तिकडे रिपोर्ट पाठवावा लागेल ना?”
“पाठवा की,” विजय “ती काही तिकडे येणार नाही. बाकी तिच्या प्रोपर्टीच काय करता येईल? त्याचा त्यात उल्लेख असेलच की.”
“आहे ना, तो ही आहे.” अधीक्षक “तिने जर नकार दिला तर ती प्रोपर्टी सरकार जमा होईल आणि तिचा वापर फक्त आश्रमासाठीच केला जाईल.”
“होऊदे की तस.” विजय त्याचे खांदे उडवत बोलला. “तुम्हाला काही त्यांनी त्रास दिल तर फक्त मला फोन करा. त्याचं काय करायचं? ते मी बघून घेईल.”
तसे अधीक्षक हलकसं हसले. आतच्या विजयची पोहोच कुठपर्यंत वाढली होती ते त्यांना चांगलच माहिती होत. मग अधीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे विजयने कागद तयार करून त्यावर त्याची अवनीचे वडील म्हणून थाटात सही केली. तिच्या नकळत तो हे सगळ करत असला तरी त्याची परी, त्याची लेक ती त्याला समजून घेईल याची त्याला खात्रीच होती. तरी आज घरी गेल्यावर ही गोष्ट तिच्या कानावर घालायचं त्याने ठरवलं होत.
“पण तिची देखील सही लागेल.” अधीक्षक
“ठीक आहे,” विजय “देऊन ठेवा तो कागद. उद्या पाठवतो सही करून.”
मग तो अधीक्षक तिथून चालला गेला. विजय परत त्याच्या विचारात हरवला. तिच्या नावावर इतकी प्रोपर्टी आहे ही गोष्ट बाहेर येण्यापासून लपवण्याचे त्याने ठरवले होते. नाहीतर पैश्यांसाठी मुखवटे चढवून फसवणारी माणसे पावला पावलावर भेटतील हे तर एक शास्त्र होत.
तिकडे ॲकेडेमीवर परीने त्या ग्रुपची डान्स प्रॅक्टिस घ्यायला सुरवात केली. सुरवातीला ती त्या स्टेप्स करून दाखवायची आणि नंतर त्या ग्रुपला ती स्टेप कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगत होती. त्या स्टेप्स देखील त्या ग्रुपला करायला सोप्या आणि त्यांच्या शैलीवर उठून दिसतील अश्या होत्या. त्यामुळे त्यांचा तो साधा डान्स देखील खूपच भारी वाटायला लागला होता.
तिच्या डान्स मधल्या त्या नजाकत बघून तुषारची मात्र अवस्था बिकट झाली होती. इतके दिवस मुलींकडे साधी तिरकी नजर ही न टाकणाऱ्या तुषारला आज परीकडे बघितल्याशिवाय चैनच पडत नव्हत. तरी ती सध्या फक्त स्टेप्स दाखवत होती. तिचा पूर्ण डान्स कसा असेल? हा विचार त्याच्या मनात घोळू लागला. घोळू काय लागला? तिचा पूर्ण डान्स बघण्यासाठी तो उतावीळ झाला होता. पण तिचा डान्स पूर्ण बघणे तर त्याच्या नशिबात नव्हत. कारण तेजश्रीचा भाऊ म्हणून जरी त्याला कॉलेजमधल्या कार्यक्रमात प्रवेश मिळणार होता तरी तिथे डान्स तर तेजश्री आणि तिचा ग्रुपच करणार होता. मग तर तो अजूनच उदास झाला. त्याच त्याच्या कामात आता लक्षच लागत नव्हत. म्हणून तो आता चिडचिड करायला लागला. त्याच तो राग तिथल्या मुलांवर निघू लागला.
इकडे परीने त्या ग्रुपला चार ते पाच स्टेप्सचा सराव करायला सांगून ती पाणी प्यायला त्या ॲकेडेमीच्या ऑफिसकडे जात होती. तिकडे जाता जाता तिने तुषारला मुलांवर छोट्याश्या गोष्टीवरून चिडताना पाहिलं. तशी ती परत त्याच्याजवळ गेली.
तिला तुषारजवळ जाताना बघून तिच्या बंधू मंडळींना टेन्शन आल.
“आता काय झाल?” आरुष हळूच बोलला.
“काय माहित?” माला “पण लागलीच तिथे पोहोचायची तयारी ठेवा.”
या वाक्यावर सर्वांनी सहमती दर्शवली आणि त्यांची एक नजर तुषार आणि त्यांच्या दीवरच ठेवली.
या वाक्यावर सर्वांनी सहमती दर्शवली आणि त्यांची एक नजर तुषार आणि त्यांच्या दीवरच ठेवली.
“तुम्हाला राग सोडून दुसरी भावना नाही का?” परी कपाळावर आठ्या पाडून विचारू लागली. “मुल आहे ती आणि तुम्ही शिक्षक. काहीतरी फरक आहे ना? नाहीतर त्यांनी त्यांच त्यांच नसत शिकले का? तुम्हाला पण जन्माला आल्या आल्या सर्व काही येत होत?”
“हे बघ..” तुषार भावनेच्या भारत चार फुट बोलायला जाणार होता. पण मग त्याला आठवलं की तो तिच्या बंधू मंडळीच्या ॲकेडमीमध्ये होता. म्हणून लगेच स्वतःला सावरत तो बोलायला लागला. “माझ काम मला नको शिकवूस.”
“शिक्षक आहे मी, ती पण हाडाची.” परी तोऱ्यात बोलली. “जिथे कोणी चुकत असेल तर मी बोलायला घाबरत नाही. भले हा माझा प्रांत नाही. पण एक शिक्षक म्हणून आता तुम्ही चुकत आहात.”
“व्हॉट प्रांत?” तुषारला तो शब्दच समजला नाही.
त्याच्या ह्या प्रश्नावर तिची बंधू मंडळी हलकीच हसली. पण बाकी उपस्थित गोंधळून गेले होते.
“तिकडे नका लक्ष देऊ,” परीने त्याचा तो प्रश्नच टाळला. “मनावर दुसर काही ओझ असेल तर थोड फिरून मनाला शांत करा. मग नंतर मुलांना शिकवायला जास्त ताण येणार नाही.” आता मात्र ती नरमाईने बोलली होती.
तिचं ते बोलण तुषारला पटल आणि त्याने मुलांना आराम करायला सांगितला. परी देखील लागलीच तिथल्या ऑफिसमध्ये गेली आणि परी पिऊन लगेच जिथे डान्स प्रक्टिस चालू होती तिथे गेली.
तुषार देखील जरा वेळ त्या ॲकेडेमीच्या मागच्या बाजूला जाऊन शांत झाला आणि परत ॲकेडमीमध्ये यायला लागला. परत येताना त्याला परत परी आणि तिच्यासोबत असलेल्या ग्रुपची डान्स प्रक्टिस दिसली. तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
‘आता तरी इथून निघावं लागेल असचं वाटत,’ तुषार मनातच बोलू लागला. ‘नाहीतर ही मला वेड करून टाकेल. एकतर हिच्या बंधूमंडळी मुळे हिच्याशी भांडता देखील येत नाही.’
त्याने मनातच विचार केला आणि घरीच जायचं ठरवलं. नंतर त्याला आठवलं की तेजश्री पण तर तिथेच होती. आज काही करून तिला सोबत घेऊन जाव लागणार होत. नाहीतर तिने आजची गोष्ट घरी सांगितली तर त्याची आई इथे यायला ही कमी करणार नाही. याची पक्की जाणीव त्याला होती. शेवटी नाईलाजाने त्याला तिथे थांबाव लागल होत.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा