मागील भागात.
तिचं ते बोलण तुषारला पटल आणि त्याने मुलांना आराम करायला सांगितला. परी देखील लागलीच तिथल्या ऑफिसमध्ये गेली आणि परी पिऊन लगेच जिथे डान्स प्रक्टिस चालू होती तिथे गेली.
तुषार देखील जरा वेळ त्या ॲकेडेमीच्या मागच्या बाजूला जाऊन शांत झाला आणि परत ॲकेडमीमध्ये यायला लागला. परत येताना त्याला परत परी आणि तिच्यासोबत असलेल्या ग्रुपची डान्स प्रक्टिस दिसली. तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
‘आता तरी इथून निघावं लागेल असचं वाटत,’ तुषार मनातच बोलू लागला. ‘नाहीतर ही मला वेड करून टाकेल. एकतर हिच्या बंधूमंडळी मुळे हिच्याशी भांडता देखील येत नाही.’
त्याने मनातच विचार केला आणि घरीच जायचं ठरवलं. नंतर त्याला आठवलं की तेजश्री पण तर तिथेच होती. आज काही करून तिला सोबत घेऊन जाव लागणार होत. नाहीतर तिने आजची गोष्ट घरी सांगितली तर त्याची आई इथे यायला ही कमी करणार नाही. याची पक्की जाणीव त्याला होती. शेवटी नाईलाजाने त्याला तिथे थांबाव लागल होत.
आता पूढे.
दुसरीकडे प्रसाद त्याच्या जॉबला जॉईन झाला. त्याच दिवशी राज त्याच्या जॉबच्या मुलाखतीसाठी एका कंपनीत गेला. प्रसाद आता संध्याकाळ व्हायची वाट बघू लागला. त्याने हे दोन दिवस कसे काढले? हे त्यालाच माहिती होत. हे गेलेले दोन दिवस तो फक्त मालाच्या हसण्याचा अर्थ काढत राहीला होता.
त्याचा कामाचा हा पहिलाच दिवस, दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. ते जेवण करता करता मालाला फोन करावा का? हा विचार सतत त्याच्या डोक्यात येत होता. ‘तू तर काही प्रश्नच विचारला नाही.’ तिच्या ह्या वाक्याने तिला आता थेट विचारण्याची हिम्मत तो एकवटू लागला.
पण त्याच्याकडे तर तिचा नंबरच नव्हता. मग काय करावं? ह्या विचारात त्याच्या जेवणाची वेळ संपली गेली. म्हणून त्याने आता घरी गेल्यावर आज राज सोबत बोलण्याचे पक्के ठरवले.
तिकडे ॲकेडेमीमध्ये परीने आजचा सराव थांबवला आणि त्या मुलांना उद्या यायला सांगितले. इतका वेळ परी तिथे होती म्हणून अस्वस्थ झालेला तुषार, आता परी जाणार म्हणून अजून अस्वस्थ झाला.
तिच्या डान्सने तो पुरता वेडा झाला होता. आता काहीही करून तिचा पूर्ण डान्स बघण्याची इच्छा त्याची प्रबळ झाली होती. पण तिला थेट कस विचारणार ना? की तिचा डान्स कधी होणार आहे? एकतर ती जेव्हा भेटली तेव्हा त्या दोघांची भांडण झाली होती.
आता अस थेट विचारलं तर ती नक्कीच त्याचा गळा धरणार होती. जरी तिचा हात पुरला नसता तर तिने तिच्या ह्या बंधू मंडळींना सांगितलं असत आणि ते तर तिच्या शब्दापुढे कधीच जात नव्हते. मग तेजश्रीला विचारवं तर ती आणि तिचे विचारांचे घोडे कधी उधळून लावेल? याची त्याला कल्पनाच करवली जात नव्हती.
मग त्याला आठवलं की अजून तर त्याला तेजश्रीला मनवायच बाकी होत. तुषारने देखील त्याच काम लागलीच आवरलं आणि तो तेजश्रीची वाट बघत ॲकेडेमीच्या बाहेर उभा राहीला. परीने तिच्या बंधू मंडळीचा निरोप घेतला आणि ती देखील बाहेर आली.
बाहेर तुषारला नुसतचं उभ राहिलेलं बघून परी त्याला चिडून बघू लागली. आपल्या मॅम आपल्या दादाला वेगळ काही समजू नये म्हणून तेजश्रीने बोलायला सुरवात केली.
“मॅम,” तेजश्री “ज्याला तुम्ही दुपारपासून झाडत आहात ना तो माझा मोठा भाऊ आहे.”
तिचं वाक्य ऐकून परी तर पहिले गोंधळून गेली. तिचं वाक्य पहिले तिने समजून घेतलं आणि नंतर तुषारवर नजर टाकली.
“अच्छा तुझा मोठा भाऊ आहे का?” परी त्याच्याकडे वाकड तोंड करत बोलली. “मग तुझ्या पूर्ण कुटुंबापैकी राग धरण्याचा ठेका फक्त त्यानेच घेतला आहे का? कारण तुझ्याकडे बघून मला वाटत नाही की तू कधी विनाकारण चिडत तरी असशील आणि तुझा तो भाऊ विनाकारण राग राग करत असतो. त्याला तिखटचं खायला देतात का घरी?”
तसा तुषार तिच्याकडे रागाने बघायला लागला. तर तेजश्री तिचं तोंड दाबून हसायला लागली.
“तुम्हाला कस कळल मॅम की त्याला तिखट खायला आवडत?” तेजश्री तिच हसू दाबत विचारू लागली.
“ज्याला राग सोडून दुसरी भावना माहिती नसेल त्याला दुसर काय आवडेल?” परी तोऱ्यात बोलली आणि तिच्या स्कुटीकडे निघून गेली.
तुषार तर आता विचार करू लागला. एकवेळ त्याला तिचं बोलण खरं देखील वाटायला लागल की तो फक्त तिखट खातो म्हणून त्याच्या नाकावर आग नाचतो. मग त्याला आठवलं की राग तर त्याला कधीतरीच येतो आणि आज तर त्याचा मूड खराब होता म्हणून त्याला राग आला होता.
‘मी का तिच्या मागे लागत आहे?’ तुषार मनातच चिडला.
“दादा मॅम गेल्या.” तेजश्री त्याच्याजवळ येत बोलली. “आवडल्या का मॅम तुला? मग मी बोलते त्यांच्याशी.” तेजश्री जरी वर वर हसत बोलली होती तरी तिने मनातून एक खोटी आशा लावली होती.
जर चुकून हो बोललाच तर घरात किती आनंदाचं उधाण येणार होत याची तिला कल्पना देखील करत येत नव्हती. पण खोटीच आशा होती ती जी त्याच पुढच वाक्य ऐकून धपकन खाली पडली होती.
“काय डोक्यावर पडली आहेस का?” तुषार जरा चिडून बोलला. “ती चार फुट चार इंच मला शोभेल तरी का? वरून नुसतीच चिवचिव चालू असते तिची. डोकचं दुखायला लागल माझ.”
“तरी तू मॅमला ओरडला नाहीस?” तेजश्री तिची भुवई उंचावत बोलली.
“कारण ती तुमची मॅम आहे म्हणून.” तुषार कडक आवाजात बोलला. "आणि हो, ही गोष्ट जर तू घरात सांगून दाखवलीस ना तर तुझा डान्स मी बंद करू शकतो हे माहिती आहे ना?”
“तू बंद तर करून दाखव,” तेजश्री पण तितक्याच तोऱ्यात बोलली. “तुझ तोंड बंद करायचा उपाय माझ्या सोबत आहे. त्यामुळे आता मी सांगेल ते तू ऐकायचं.”
तसे तुषारने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले.
“आणि एक जर माझ्या मॅमला परत चार फुट बोललास ना तर बघ,” तेजश्री त्याला धमकी देत बोलली. “मी घरात काय सांगून देईल ना? याची तू कल्पना पण करू शकणार नाहीस.”
तसा तुषारने तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला. “बस तू, तुला घरी गेल्यावर बघतो.”
तशी तेजश्री तिच्या ग्रुपचा निरोप घेत तुषारच्या बाईकवर बसली आणि ते दोघे त्यांच्या घराकडे निघून गेले. बाकी ग्रुप देखील ज्यांच्या त्यांच्या घराकडे निघून गेला.
इकडे ही पाचही बंधू मंडळी बाहेर आली.
“दी आता इथे येत राहील याचा आनंद मानायचा की ही दोघे किती भांडतील याच टेन्शन घ्यायचं?” आरुष बाकी जणांकडे बघत बोलला.
तसे ते पण टेन्शनमध्ये आले होते. मग त्यांनी आज त्यांची ती ॲकेडेमी लवकरच बंद केली आणि घराकडे जायची तयारी केली.
परी तिची स्कुटी चालवत असताना तिचा मोबाईल सारखा वाजत होता. पहिले तर तिने दुर्लक्ष केल. पण तो सारखा वाजत असेलला पाहून तिने एका बाजूला तिची स्कुटी थांबवली आणि तो फोन उचलला. तश्या तिच्या कपाळवर आठ्याच चढल्या.
“मला तुमच्याकडे यायचं नाहीये,” परी चिडूनच बोलली. “तुमच्या बहिणीच्या मुलाजवळ मी निरोप पोहोचवला होता.”
“अगं ऐकून तर घे.” गौतम
“पहिले मला सांगा,” परी “माझा नंबर तुम्हाला कसा मिळाला?”
“आता ते महत्वाचं नाहीये,” गौतम पुढे बोलणार तोच परीने बोलायला सुरवात केली.
“मला दुसर काही ऐकायचं देखील नाहीये.” परी “माझ्या नंबरवर पुन्हा फोन करायचा नाही. जे काही असेल ते बाबांना सांगायचं.”
“तेच बोलत आहे,” गौतमने आता न थांबता बोलायला सुरवात केली. “तुझ्या त्या बाबांनी तुझी प्रोपर्टी सरळ दान करायला परवानगी दिली आहे. ह्या गोष्टीची कल्पना त्यांनी तुला दिली का?”
“ते जे काही करतील ते योग्यच करतील.” परी कडक आवाजात बोलली. “पुन्हा त्यांच्याबद्दल बोललात तर याद राखा. मी आता सरळ त्यांच्या मुलांच्या कानावर ती गोष्ट घालेल. मग तूमचं काय होईल? याची कल्पना मी तुम्हाला देऊ शकत नाही. मी माझ्या बाबांसाठी काहीही करू शकते. अगदी माझे तत्व देखील मोडायला मागे पुढे बघणार नाही.”
आताच्या परीचा पवित्रा तिच्या बंधू मंडळीनी पहिला असता तर ते चक्करच येऊन पडले असते इतकी ती आता रागा बोलत होती. गौतम देखील क्षणभर भांबावून गेला होता. त्याला आता हरीशची झालेली हालत आठवली.
“म्हणजे आता हरीशसोबत जे काही झाल तर तूच केल होतस ना?” गौतम जरा चिडून बोलले.
“मी जर काही करायला सांगितल असत ना तर त्याला घ्यायला तुम्हाला याव लागल असत.” परी तिरकस हसत बोलली.
“मग आता सरळच सांगतो.” गौतम आता त्याच्या मूळ स्वभावावर आला. तुझ्या बापाला सांग तू मेली किंवा तुझा आमच्याशी काही संबंध नाही अस लिहून द्यायला. नाहीतर तुला आणि तुझ्या त्या कुटुंबाला असा गायब करेल ना की कुठेही तुमचा नामोनिशान रहाणार नाही.”
“पहिले तर थोबाड सांभाळून बोलायचं,” परी पण तितक्याच आवेशात गरजली. “ही तुम्हाला शेवटची वार्निंग यापुढे अस काही बोलले तर...”
ती पुढे काही बोलणार तोच तिच्या हातातला मोबाईल खेचला गेला.
तशी परी पहिले तर जरा घाबरलीच. नंतर तिने वळून पाहिलं तर तिची भीती अजूनच वाढली.
तशी परी पहिले तर जरा घाबरलीच. नंतर तिने वळून पाहिलं तर तिची भीती अजूनच वाढली.
“कोण आणि कुठून बोलत आहेस इतकच सांग.” आरुष खूपच रागाने बोलला.
“तुला काय त्याच्याशी?” गौतम “मी कुठूनही बोलेल.
“का घाबरलास का?” आरुष तिरकस हसत बोलला.
“अश्या फोन वर धमक्या देणारे ****** असतात.” गौतम खवळून बोलला.
“तरीच तू पण फोनवरच धमकी देत आहेस.” आरुष पण तितक्याच कडक आवाजात बोलला.
तसा गौतम अजूनच खवळला गेला आणि त्याने त्याच घराचा पत्ता सांगून दिला आणि समोरासोर यायची धमकी दिली.
“ठिक आहे, आता वाटच बघं.” एवढं बोलून आरुषने फोन कट केला. त्याने परीवर नजर टाकली.
ती आठ्या पाडून त्यालाच बघत होती.
“व्हॉट?” आरुषच्या कपाळावर आठ्या चढल्या. “कोणीही येऊन तुला धमक्या देईल आणि आम्ही ऐकून घेऊ का?”
मग परीची नजर त्याच्याही मागे गेली. तर तिची ती सगळी बंधू मंडळी त्याचाच मागे उभी होती. हि सगळी मंडळी त्यांच्या घराकडे जात असताना त्यांना परीचा चिडून बोलल्याचा आवाज आला. तिचा आवाज ते कुठल्याही कोपऱ्यातून आला तरी सहज ओळखू शकत होते. त्यात तिचा तो रागातला आवाज ऐकून तर एका क्षणाचाही विलंब न करता ते तिच्याजवळ पोहोचले होते.
“जाऊदे,” परी त्याला समजावत बोलली. “बाबा आणि ते बघून घेतील.”
“चल आत्ताच घरी जाऊयात.” आरुष त्याच्या बाईककडे जात बोलला.
तस बाकीच्या बंधू मंडळीनी लगेच त्यांचे हेल्मेट डोक्यावर चढवले आणि बाईकवर बसले. पण परी मात्र हाताची घडी घालून नुसतीच तिचं तोंड वाकड करून उभी राहिली. तिला वाटलं होत की तिचं हे वागण बघून बाकी थांबतील.
“तू बसतेस बाईकवर की मालाला उचलून बसवायला सांगू?” सुजय परीकडे बघून कडक आवजात बोलला.
तिकडे माला तिचं हेल्मेट काढून तिच्या बाईकवरून उतरायच्याचं तयारीत होती. तस परीच तोंड अजूनच वाकड झाल आणि ती तिच्या स्कुटीवर बसली. अश्या परिस्थितीत तिची ही बंधू मंडळी तिचंही ऐकणार नाहीत हे तिला चांगलच माहिती होत.
आता विजयच त्यांना शांत करू शकतो याची जाणीव झाल्यावर ती स्कुटीवर बसली. मग ही सगळीच पलटण परीच्या मागे मागे तिच्या घराकडे मार्गस्थ झाली.
दुसरीकडे राज त्याची मुलखात देऊन घरी परत चालला होता. जशी ती गोष्ट प्रसादला समजली तस त्याने राजला त्याच्या दुपारच्या सुट्टीत ऑफिसवर बोलावून घेतले. राजची मुलाखत देऊन झाल्याने आजचा दिवस तो निवांत होता. जसा त्याच्या मोठ्या भावाचा फोन आला तसा तो त्याच्याकडे निघाला. जाता जाता घरी यायला उशीर होईल असा फोन करायाला तो विसरला नव्हता.
पुढच्या दहा मिनिटात राज प्रसाद काम करत असलेल्या ठिकाणी पोहोचला. राज आल्याचे समजताच प्रसाद त्याच्या ऑफिसच्या बिल्डींग मधून बाहेर आला आणी ते दोघे बाजूलाच असेलेल्या एका कॅफेमध्ये गेले.
कॉफीची ऑर्डर दिल्यावर प्रसादने मालाच्या भेटीबद्दल सगळ काही त्याला सांगून दिल. त्याने दोन दिवसानंतर सांगितल म्हणून राजने त्याच्यावर लटका राग काढला. त्याच्या तोंडून मालाच बोलण ऐकून मालाची त्याला सध्या सहमती असल्याचे राजला समजून गेले. पण अजून स्पष्ट बोलन न झाल्याने राजने आताच प्रसादला काही सांगितलं नाही. तिथे थोडावेळ बोलून राज घरी तर प्रसाद त्याच्या कामावर परतला.
आज परी पहिल्यांदाच ॲकेडेमीवर गेल्याचे रावीला देखील समजले होते. पण घरात तिच्या आज्जीसोबत दुसर कोणी नव्हत म्हणून तिला ॲकेडेमीवर जायला काही जमले नव्हते. मग ती तिचा अभ्यास करत घरीच थांबली होती. कारण दोन दिवस आधी दिलेला अभ्यास तिचा अजूनही पूर्ण झाला नव्हता.
तुषार आणि तेजश्री दोघेही काही वेळातच घरी पोहोचले. घरी पोहोचेपर्यंत तुषार त्याच्या लहान्या बहिणीला तिने घरात काही सांगू नये म्हणून मनवत होता. तर त्याची ती बहिण अजूनच भाव खात होती. तिने त्याच्याकडून काही न सांगण्याच्या मोबदल्यात बऱ्याच गोष्टी मनवून घेतल्या होत्या.
रोज घरी आल्यावर आपल्या बहिणीला कामाला लावणारा भाऊ आज त्याच्या लहान्या बहिणीच ऐकत होता, तेही अगदी शांतपणे. ही गोष्ट घरतल्या कोणलाही खरचं वाटत नव्हती.
तुषारचे आई, वडील, आज्जी आणि आजच घरी आलेले त्याचे काका हे सगळेच डोळे विस्फारून बघत राहिले होते.
त्यांची ती प्रतिक्रिया बघून तेजश्रीला खूपच हसायला येत होत. तस तिला तिच्या दादाच्या वागण्याच कारण घरात सांगावस वाटल. पण अजून तिच्या आवडीच्या काही गोष्टी यायच्या होत्या. ते एकदा झाल की ती घरात सांगायला मोकळी होणार होती. तो पर्यंत स्वतःला कस आवरायचं? ह्याच टेन्शन तिला आल होत.
तुषार फ्रेश होऊन हॉलमध्ये आला. तशी त्याची आई उठली आणि त्याच्या कपाळाला हात लावून बघू लागली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा