मागील भागात.
तुषार आणि तेजश्री दोघेही काही वेळातच घरी पोहोचले. घरी पोहोचेपर्यंत तुषार त्याच्या लहान्या बहिणीला तिने घरात काही सांगू नये म्हणून मनवत होता. तर त्याची ती बहिण अजूनच भाव खात होती. तिने त्याच्याकडून काही न सांगण्याच्या मोबदल्यात बऱ्याच गोष्टी मनवून घेतल्या होत्या.
रोज घरी आल्यावर आपल्या बहिणीला कामाला लावणारा भाऊ आज त्याच्या लहान्या बहिणीच ऐकत होता, तेही अगदी शांतपणे. ही गोष्ट घरतल्या कोणलाही खरचं वाटत नव्हती.
तुषारचे आई, वडील, आज्जी आणि आजच घरी आलेले त्याचे काका हे सगळेच डोळे विस्फारून बघत राहिले होते.
त्यांची ती प्रतिक्रिया बघून तेजश्रीला खूपच हसायला येत होत. तस तिला तिच्या दादाच्या वागण्याच कारण घरात सांगावस वाटल. पण अजून तिच्या आवडीच्या काही गोष्टी यायच्या होत्या. ते एकदा झाल की ती घरात सांगायला मोकळी होणार होती. तो पर्यंत स्वतःला कस आवरायचं? ह्याच टेन्शन तिला आल होत.
तुषार फ्रेश होऊन हॉलमध्ये आला. तशी त्याची आई उठली आणि त्याच्या कपाळाला हात लावून बघू लागली.
आता पूढे.
“बाळा बरा आहेस ना तू?” त्याच्या आईने तेजश्रीवर नजर टाकत विचारलं.
दोघा बहिण भावांची एकमेकांवर चालूच राहणारी कुरघोडी तिला चांगलीच माहिती होती. त्यात त्यांचे मामाची, काकांची, आत्याची मुल गोळा झाली की घराचं कुरुक्षेत्रच व्हायचं.
“मी?” तुषार कपाळवर आठ्या चढवत बोलला. “मला काय झाल? मी बरा आहे.”
“आज तू चक्क तुझ्या बहिणीला कामाला न लावता चक्क तिचं काम करत आहेस?” त्याची आई
“मी चाललोच होतो ना किचनमध्ये,” तुषार वर वर तर सहज बोलत होता. पण आतून तेजश्रीला खूप भांडत होता. “तर तिच्यासाठी पण पाणी आणल. त्यात काय झाल?”
“ते ठीक आहे,” त्याचे बाबा “पण मग तिची बॅग देखील तिच्या जागेवर तू ठेवलीस? नक्की सांगा काय उद्योग करून ठेवला आहे?” त्यांनी देखील तेजश्रीवर एक कडक नजर टाकली.
“काही नाही,” तेजश्री तिचं हसू आवरत बोलली. “करू द्या की काम. नंतर मला भेटायला पण त्याला वाट बघावी लागेल.” हसता हसता तेजश्रीने तिला आलेले अश्रू हलकेच पुसले.
“म्हणजे?” तुषार चमकून विचारू लागला.
“तेजूसाठी स्थळ आल आहे.” त्याचे बाबा देखील हलकेच हसत बोलले. “तुझे काका त्यासाठीच आले आहेत.”
तस तुषारने त्याच्या काकांकडे पाहिलं. “मला का सांगितलं नाही?” तुषार आता चिडून बोलला.
“फक्त आल आहे,” बाबा त्याला समजावत बोलले. “समोरून फक्त विचारणा झाली आहे.”
“मग फोनवर देखील सांगता आल असत,” तुषार त्याची शंका उपस्थित करत बोलला. “अस थेट घरी येऊन सांगण त्याला काय समजायचं?”
“अरे त्याच्या मोठ्या भावाचं घर आहे हे,” त्याचे बाबा कडक आवाजात बोलले. “तो कधीही येऊ शकतो.”
“ते इथे येऊन राहिले तरी मला काहीच प्रोब्लेम नाही,” तुषार “मी तर म्हणतो काकूंनी पण इथे यायला हवं. तो कमलेश तर जाऊन बसला दुसऱ्या देशात. पण इथे आपण आहोत ना. कमलेश पण बोलला की तो परत येईपर्यंत इथे या म्हणून. तरी का येत नाही इथे?” त्याने त्याच्या काकांकडे चिडून पाहिले.
“मग तिकडची शेती आणि आपलं ते घर कोण बघणार?” त्याचे काका त्याला समजावत बोलले. “जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात. तिथल्या आठवणी पण जपल्या पाहिजेत ना?”
“हो,” तुषार “पण मग येऊन जाऊन रहा ना.”
“ठीक आहे बाबा,” त्याच्या काकांनी लागलीच नमतेपणा घेतला. “आधी जे महत्वाच आहे ते बोलूयात?”
तस त्याने होकारात मान हलवली.
“कस असत ना?” त्याच्या काकांनी बोलायला सुरवात केली. “अश्या गोष्टी फोनवर बोलून होत नाही. त्या समोरासमोर बसून बोलाव्या लागतात. शेवटी तो आयुष्याचा प्रश्न असतो.”
“ठीक आहे, सॉरी.” तुषार पण बारीक आवाजात बोलला.
मग त्याच्या काकांनी समोरून आलेल्या माणसांबद्दल माहिती दिली. त्या मुलाने तेजश्रीला इथे कॉलेजमधेच पाहिलं होत. तिचा तो अवखळपणा त्याला आवडला होता. तो मुलगा युनिवर्सिटीच्या मुख्यालायात काम करत होता. काही कागदांच्या निमित्ताने तो त्यांच्या कॉलेजला आला होता. त्यात कागदपत्रांमध्ये तेजश्रीचे देखील कागतपत्र होते. त्यावरून त्याला तिच्या गावाचा पत्ता मिळाला. जो की त्यांच्या गावाच्या शेजारचाच होता. मग काय? गेला फोन त्यांचा, त्याच्या गावाला.
आजूबाजूला गाव असल्याने दोन्ही गावाचे गावकरी एकमेकांच्या चांगल्याच ओळखीचे होते. त्यामुळे तुषारच्या घरच्यांशी देखील तिथल्या गाववाल्यांची ओळख निघाली. घरदार चांगल असल्याचे त्या मुलाच्या घरच्यांना समजले. मग तसाच तुषारच्या काकांच्या घरी विचारणा केली गेली होती.
तोच निरोप घेऊन तुषारचे काका इकडे आले होते.
“पण तिचं शिक्षण बाकी आहे,” तुषार परत बोलायला लागला. “तिचं करियर बाकी आहे.”
“अरे आज विचारलं म्हणजे लगेच उद्या नाही लग्न लावून देणार तुझ्या बहिणीच.” तुषारची आई त्याची मस्करी करत बोलली.
“आधी चौकशी करू,” तुषारचे वडील “मुलगा कसा आहे? घरदार कस आहे? जर चांगल वाटलच तर त्यांच्यासमोर तेजूच्या ह्या अटी ठेवू.”
मग तुषार शांत झाला. आपल्या दादाच आपल्यावर असलेल प्रेम बघून तेजश्रीला खूपच भरून आल. त्यांच्यात नोकझोक, भांडण चालूच रहात होते. अगदी घरच्यांच्या नाका तोंडात पाणी जाईल इतके ते दोघे भांडत होते. तरीही तो त्याच्या लहान बहिणीचा इतका विचार करतो ते बघून कोणत्याची बहिणीच मन भरून येईलच की. मग तिला त्यांच्या मॅम आठवल्या. त्या मॅमकडे बघत त्यांच्यात हरवलेला तिचा दादा देखील आठवला. मग एकवेळ तिला वाटल की तिच्या दादाचा देखील लवकरात लवकर संसार सुरु व्हावा. आता ती फक्त संधीची वाट बघायला लागली. जेव्हा ती आणि तिच्या घरचे तिचा दादा घरात नसताना तिला भेटतील.
आजची त्यांची चर्चा त्या मुलाची कुठून चौकशी करायची? यावरच आटोपती घेतली गेली.
तिकडे विजयच्या घरी एक चर्चासत्र चालू व्हायच्या मार्गावर होत. परी तिच्या बंधू मंडळी सोबत तिच्या घरी जाऊन पोहोचली.
आज अचानक ही सगळी एकत्र आले म्हणजे नक्कीच काहीतरी करायच्या मार्गावर असल्याची शंका सायलीला आली. आज कधी नव्हते ते ती लवकर घरी आली होती. जरा कामाच्या ताणांतून शांतता मिळेल म्हणून ती घरी येऊन जरा आराम करणार होती. पण काही वेळातच ही सगळी वानरसेना तिथे जाऊन पोहोचली होती. मग तर तिला आराम मिळण शक्यच नव्हत.
परी आणि सायली दोघींनी मिळून सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवला. तो किचनमधून हॉलमध्ये आणण्यासाठी मालाने मदत मात्र नक्की केली होती.
“आज काय केल आहे?” सायली सर्वांकडे बघत बोलली. “की काही करण्याच्या तयारीत आहात?”
“अस काय ते?” आरुष बारीक तोंड करून बोलला. “आम्ही सहज भेटायला येऊ शकत नाही का?”
“अम्म आज्जीबातच नाही.” सायली तोऱ्यात बोलली.
तस बाकीच्यांनी त्यांच तोंड वाकड केल. नंतर त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांच्या चालू असलेल्या गप्पांमध्ये देखील सायलीला त्यांच्या अश्या अचानक येण्याचा अंदाज येत नव्हता. तसे ते बोलण्यात खूप एक्स्पर्ट होते. बोलण्याच्या ओघात सायली सगळ काही काढून घेऊ शकते हे त्यांना चांगलच माहिती होत. म्हणून ते देखील तिच्या बोलण्याला भुलत नव्हते.
काही वेळ झाला तोच त्यांच्या घराची बेल वाजली. सगळ्यांना वाटल की विजय घरी आला असेल. पण तो इतक्या लवकर येण शक्यच नव्हत. बाकीच्यांचा विचार चालू असेपर्यंत सायलीने दार उघडल.
“अरे राज, प्रसाद,” सायलीने दोघांना दारात पाहिलं. “आज पुन्हा गरिबांच्या घराला पाय लावलात.” सायली खट्याळ होत बोलली. राज हलकेच हसत होता तर प्रसाद जरा टेन्शनमधेच दिसत होता. त्याला इथे जबरदस्ती आणल गेल्यासारख वाटत होत.
सायलीच्या आलेल्या आवाजाने इथे आत बसलेली ही अतरंगी मंडळीनी मालाकडे बघत तिला चिडवायला सुरवात केली. साध गणित होत, प्रसादला मालाला भेटायचं होत आणि त्याने राजला त्याच्यासोबत आणल असेल. अशी त्यांची कल्पना त्यांच्या कल्पनेत उभी देखील राहिली होती.
मालाला आता काय कराव तेच सुचत नव्हत? तिच्या या भावांवर रागवावं की प्रसादला भांडाव की राजचा जाऊन गळा धरावा? मग तिने परीकडे पाहिलं तर ती पण जरा गालात हसत होती. तस तिने तिचं तोंड बारीक केल. मग तिचा पडलेला चेहरा बघून परीने बाकीच्यांना ओरडून गप्प केल.
राज आणि प्रसाद घरात येऊन बसले. तर सायली त्या दोघांना चहा नाश्ता आणण्यासाठी किचनमध्ये गेली. आता तर माला ही परत उठून किचनमध्ये गेली. ह्यावेळेस सायली तिला किचनमध्ये बघून काही बोलली नाही. कारण प्रसाद आला म्हणून ती उठून आली हे तिला समजून गेल होत. आता जो पर्यंत ती काही सांगणार नाही तोपर्यंत सायली थेट तिला त्याबद्दल काहीच विचारणार नव्हती.
बाहेर हॉलमध्ये सर्वांची नजर राज आणि प्रसादवरचं होती. आज तो परत कश्याला आला होता? याचाच ते विचार करत होते. प्रसादला फक्त मालाला भेटायचं होत म्हणून आले होते की अजून दुसर कारण होत. पण प्रश्न असा होता की राजला कस समजलं की माला इथे घरी आली होती ते.
“बर आज कसा काय उगवला इथे?” परीने राजकडे बघून बोलायला सुरवात केली.
“माझ्या मामांच घर आहे,” राज नेहमीप्रमाणे खट्याळ होत बोलला. “मी कधीही येऊ शकतो.”
“तुझी फालतुगिरी झाली असेल तर खरं कारण सांगतोस?” परी चिडून हसत बोलली.
“थांब ना,” राज “मामींना आणि मामांना तर येउदे. एक आनंदाची बातमी आहे.” आता मात्र तो मंद स्मित करत बोलला.
मग परीला तो खरं बोलत असल्याचे समजले.
“तुझा आनंद तू एकटाच येऊन सांगितला असतास ना?” प्रसाद बाकी सर्वांची नजर बघून हळूच राजच्या कानात पुटपुटला. “मला कशाला इथे आणलस?”
“का?” राज पण हळूच बोलला. “मालाला भेटायची संधी तुला मिळाली, याबद्दल तू माझे आभार मानले पाहिजे आणि एक तू जो मलाच भांडत आहे.”
“अरे हो,” प्रसाद “पण ह्यामुळे तिच्यासमोर माझ काय इम्प्रेशन पडेल? की मी मुलीच्या मागे मागे तिच्या घरी आलो.”
“काही नाही होत.” राज त्याच तोंड वाकड करत बोलला.
“हा आनंदाची बातमी बोलला,” आदेश हळूच सुजयच्या कानाशी बोलला. “माला सोबत लग्न फिक्स केल का काय?”
“काय माहित?” सुजय ही विचार करत बोलला.
“पण मग माला तशी बोलली असती आपल्याला.” जय
“आज मालाला सराव करताना पाहिलं नाही का?” सुजय
“आधी त्याला बोलू देत.” आरुष ह्या तिघांकडे हलकेच चिडत बोलला. “उगाच तुमचे डोके कुठेही धावायला पाठवू.”
तसा बाकीच्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांचे बोलणे थांबवले.
तिकडे किचनमध्ये माला गेली तर होती पण ती नुसतीच मोबाईल चाळत बसली होती. आता तिच्याकडे चहा नाश्ता पाठवण सायलीला काही बरोबर वाटल नाही. म्हणून तिनेच तो उचलला आणि हॉलकडे निघून आली. तिकडे माला तिच्या मोबाईलमध्ये इतकी व्यस्त होती की सायाली तिथून गेली हे देखील तिला समजल नव्हत.
तिकडे किचनमध्ये माला गेली तर होती पण ती नुसतीच मोबाईल चाळत बसली होती. आता तिच्याकडे चहा नाश्ता पाठवण सायलीला काही बरोबर वाटल नाही. म्हणून तिनेच तो उचलला आणि हॉलकडे निघून आली. तिकडे माला तिच्या मोबाईलमध्ये इतकी व्यस्त होती की सायाली तिथून गेली हे देखील तिला समजल नव्हत.
सायलीला एकटीलाच हॉलमध्ये येताना बघून परी गोंधळून गेली. तिला वाटल माला आता प्रसाद अचानक घरी आला म्हणून त्याच्यावर चिडली का काय? म्हणून तिने तिचा चहा पिऊन झालेला कप ठेवायला किचनकडे चालली गेली.
“आता तरी सांग,” सायली राजकडे बघत बोलली. “असा अचानक कसा उगवलास?” बोलता बोलता सायली प्रसादवर नजर टाकायला विसरली नाही.
“मामा कधी येतील?” राज चहा घेत बोलला.
“आतापर्यंत यायला हवे होते,” सायली घड्याळ बघत बोलली. “ते निघाले तेव्हा त्यांनी मला फोन केला होता.”
“मग येऊदे त्यांना, मग सागंतो.” राजने सर्वांची उत्कंठा चांगलीच ताणून धरली.
आता विजय येईपर्यंत सर्वाना वाट बघत राहावी लागणार होती. मग सायली आणि परी जेवणाच्या तयारीसाठी किचनमध्ये गेल्या. माला अजूनही तिथेच तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त होती. आताही तिला ह्या दोघी आल्याचे समजले नव्हते.
परीने तिच्यासमोर जात तिला आवाज दिला तेव्हा ती तिच्या मोबाईलमधून बाहेर आली. “झाला चहा बनवून, द्या मी जाते.”
मालाच्या ह्या वाक्यावर सायली आणि परी दोघी तिच्याकडे विचित्र नजरेने बघायला लागल्या.
“काय आतापासून प्रक्टिस का?” परी तिला छेडत बोलली.
“कसली प्रक्टिस?” माला गोंधळून गेली.
“मग चहा घेऊन जाऊ का ते विचारू लागली ना?” सायली
“हा मग तुम्ही एकट्या होत्या ना म्हणून.” माला
“आई त्यांना चहा देऊन आली.” परी “पण तू नाश्ता झाला की त्याला पाणी देऊ शकतेस.” परीने सायलीकडे बघून डोळा मिचकावले.
आता मालाला त्या दोघींचा रोख समजून आला. तशी तिने नकारार्थी मान हलवली आणि किचनच्या बाहेर जाऊ लागली.
“अगं पाणी तर घेऊन जा.” परी जाणून मोठ्याने बोलली.
तसे मालाने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि दोन्ही हातला झटके देत तिथून पटकन पळून गेली. तिला अस पळून जाताना बघून ह्या दोन्ही मायलेकी खळखळून हसल्या.
किचनमधून बाहेर पडलेली माला हॉलमध्ये येताच प्रसादवर एक कडक कटाक्ष टाकून परीच्या खोलीकडे चालली गेली.
‘आता मी काय केल?’ प्रसाद मनातूनच जरा घाबरला. ‘उगाच ह्याच्या मागे लागून इथे आलो. त्याला तर घरी जाऊनच बघतो मी.’ त्याने मनातच ठरवलं आणि राजला तोंड वाकड करत बघू लागला.
तोपर्यंत बाकीचे ह्या दोघांच्या घरी येण्याच्या कारणावर चर्चा करत राहिले. आता ही सगळी मंडळी इथे जमा झाल्यावर रावीला तिकडे एकटीला करमेनास झाल. पण आज सोनालीला यायला उशीर होणार होता. म्हणून तिने जेवणाची तयारी करायाला घेतली. तिचं मन तर नाराज झाल होत. पण घरी तिच्या आज्जीजवळ दुसर कोणीच नव्हत.
थोडा वेळ गेल्यावर विजय घरी येऊन पोहोचला. तो देखील घरी येईपर्यंत परीसोबत त्या विषयावर कस बोलावं? याचा विचार करत होता.
पण तो विषय तर त्याच्याधीच त्याच्या घरी जाऊन पोहोचला असल्याचे त्याला माहितच नव्हत. घरी पोहोचून जेव्हा त्याने त्यांची ही बंधू मंडळीचा गट घरात बसलेला पाहिला. तसा तो गोंधळातच पडला.
“आता काय करायच्या विचारात आहात?” विजयने देखील आल्या आल्या हाच प्रश्न विचारला.
तस राजच हसूच सुटलं.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा