Login

अवनी एक प्रवास भाग ३४

परी येणार असल्याच तुषारला माहिती होत. तिच्या डान्सने त्याला चांगलच वेड केल होत. आता तिचा डान्स बघणे दुसरीकडे तर शक्यच नव्हत आणि ती असे डान्सचे कार्यक्रम करत देखील नव्हती. तिला ह्या प्रक्टिससाठी किती विनवण्या केल्या होत्या ते तेजश्रीने त्यला आधीच सांगून दिल होत. मग आताची ही तिचा डान्स बघण्याची संधी तो सोडूच शकत नव्हता. त्यात तेजश्रीने जाणून त्याच्यासमोर तिच्या ह्या मॅमच केलेलं कौतुक ह्याच्या मनात परीबद्द्ल विचार करायला भाग पाडलं होत.
मागील भागात.

किचनमधून बाहेर पडलेली माला हॉलमध्ये येताच प्रसादवर एक कडक कटाक्ष टाकून परीच्या खोलीकडे चालली गेली.

‘आता मी काय केल?’ प्रसाद मनातूनच जरा घाबरला. ‘उगाच ह्याच्या मागे लागून इथे आलो. त्याला तर घरी जाऊनच बघतो मी.’ त्याने मनातच ठरवलं आणि राजला तोंड वाकड करत बघू लागला.

तोपर्यंत बाकीचे ह्या दोघांच्या घरी येण्याच्या कारणावर चर्चा करत राहिले. आता ही सगळी मंडळी इथे जमा झाल्यावर रावीला तिकडे एकटीला करमेनास झाल. पण आज सोनालीला यायला उशीर होणार होता. म्हणून तिने जेवणाची तयारी करायाला घेतली. तिचं मन तर नाराज झाल होत. पण घरी तिच्या आज्जीजवळ दुसर कोणीच नव्हत.

थोडा वेळ गेल्यावर विजय घरी येऊन पोहोचला. तो देखील घरी येईपर्यंत परीसोबत त्या विषयावर कस बोलावं? याचा विचार करत होता.

पण तो विषय तर त्याच्याधीच त्याच्या घरी जाऊन पोहोचला असल्याचे त्याला माहितच नव्हत. घरी पोहोचून जेव्हा त्याने त्यांची ही बंधू मंडळीचा गट घरात बसलेला पाहिला. तसा तो गोंधळातच पडला.

“आता काय करायच्या विचारात आहात?” विजयने देखील आल्या आल्या हाच प्रश्न विचारला.

तस राजच हसूच सुटलं.

आता पूढे.

“डॅड,” सुजय जरा वैतागून बोलला. “आम्ही एकत्र आलो म्हणजे काहीतरी करायच्या मार्गावरच असतो का?”

“हो.” विजय पण हो या शब्दाला सूर लावत बोलला.

तसा सोफ्यावर बसलेला राज आता उठूनचं हसायला लागला. प्रसादला पण हसू येत होत. पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं होत. कारण त्याच्या प्रेमाची नाव ह्या बंधू मंडळींवर अवलंबून होती ना. त्यांना काही बोललेलं मालाला आज्जीबातच आवडणार नव्हत ते त्याला चांगलच माहिती होत.

“सिरीअसली काका?” आरुषच्या चेहऱ्यावर पण प्रश्न उभा राहीला.

“गम्मत केली रे.” बिजय हलकेच हसत बोलला. “बस तोवर मी आलोच फ्रेश होऊन.”

तसा त्या बंधूमंडळीनी सुस्कारा सोडला.

“तू जरा जास्तच हसत होता अस नाही का वाटत?” सुजय त्याचे दात दाखवत राजला विचारू लागला.

तशी राजने नकारार्थी मान हलवली. “आता तुम्ही कांडच असे करता मग ते बिचारे तरी काय समजतील नाही का?”

“तुझा एक फोटो घरी पोहोचवला होता विसरू नकोस.” आरुष त्याच तोंड वाकड करत बोलला.

ते ऐकून राज अजूनच हसू लागला. “तुम्ही फोटोचं काय घेऊन बसला आहात? मी तर तिच्याशी समोरासमोर ओळख करून दिली होती आई आणि मोठ्या काकूंची. ज्या ड्रामाचा तो फोटो होता ना तो ड्रामा बघायाला त्या दोघी आल्या होत्या.”

आता ह्या बंधूमंडळींचे चेहरे बघण्यासारखे झाले. कारण त्यांचा डाव सपशेल आपटला होता. आता विजय देखील त्याच आवरून हॉलमध्ये आला.

विजयला आलेलं बघून राजने त्याच्या मामीला देखील आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून सायली देखील हॉलमध्ये आली. तिच्या मागे परी देखील बाहेर आली.

सगळे हॉलमध्ये जमल्यावर राजने त्याच्या बॅगेतून मिठाईचा बॉक्स बाहेर काढला. “आज मी ऑफिशियली जॉबला जॉईन झालो.” तो आनंदाने बोलला.

“अरे वा.” विजयने राजला हलकेच मिठी मारली. “अभिनंदन.”

“अभिनंदन राज.” सायली देखील पुढे येऊन त्याच्या हातमिळवणी करत बोलली.

“तस तर आधीच हा जॉब फिक्स होता,” राज “आज फॉरमॅलिटी म्हणून इंटरव्ह्यू घेतला होता आणि सिलेक्शन झाल.”

“आधीच फिक्स होता तर उगाच इंटरव्ह्यू का?” सुजय तोंड वाकड करत बोलला. “नुसतीच शायनिंग.”

“नाहीतर काय?” जयने देखील त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

ह्यांची बडबड मात्र हळूच चालू होती. कारण राजला काही बोलले तर त्यांचे आई वडील आणि दी त्यांनाच भांडत बसत होते.

“आता सांगा तुम्ही कसे इथे?” सायली परत मुळ मुद्यावर आली.

“तो दीचा आलेला सो कॉल्ड काका त्याने परत फोन केला होता दीला.” आरुष चिडून बोलला. “तिचा नंबर त्याच्याकडे कसा गेला काय महित. पण दीला धमकी देत होता.”

आरुषच बोलण ऐकून विजय गोंधळात पडला. कारण त्याने त्या अधीक्षकांना आजच सही करून कागद दिला होता आणि अजून एका कागदावर परीची सही घ्यायला लावली होती. ही गोष्ट फक्त त्या दोघांमध्येच होती. त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? हेच विजयला समजल नव्हत.

“आज त्या आश्रमातले अधीक्षक आले होते,” विजयने अधीक्षकांनी सांगितलेली माहिती त्यांना सांगायला सुरवात केली. “परी त्यांच्या गावातल्या पाटलांची मुलगी. जस तिच्या आई वडिलांचं अपघाती निधन झाल. तस तिच्या काकाने तिची प्रोपर्टी त्यांच्या नावावर होण्यासाठी तिला आश्रमात सोडलं होत. तिच्या वय वर्ष २५ नंतर ती सगळी प्रोपर्टी तिच्या नावावर होणार होती. त्यामुळे तिला दूरच्या एका होस्टेलमध्ये ठेवलं असल्याचे त्यांनी त्याच्या गावाला पसरवले. आता पंचवीस वय उलटून गेल्यावरही जवळपास सात वर्ष होत आली तरी तिचा काहीच पत्ता न लागल्याने ती सगळी प्रोपर्टी तिच्या लहान्या काकांच्या आणि आत्याच्या नावावर होणार होती. पण कोणीतरी ती मुलगी त्यांच्या आश्रमांत जिवंत असल्याचे पुरावे तिथल्या नगर पंचायतीमध्ये दिले. मग त्यांच्या नावावर ती प्रोपर्टी काही झाली नाही. आता त्या मुलीच्या नावाची चौकशी करण्यासाठी त्या नगरपंचायतने आम्हाला ती कागद पाठवून त्या संबंधी उत्तर द्यायला लावले आहे. त्यासाठी ते आले होते. परी तिचं मुलगी असून तिला त्या संपत्तीची काही गरज नाही अस लिहून दिल आहे.”

हे शेवटच वाक्य विजय जरा चाचरत बोलला.

“बरोबर केल मग.” परीने विजयचे हात तिचं हातात घेत त्याला आश्वस्त केल. “पण मग त्यांना ही गोष्ट कशी कळली? की थेट मला फोन आला.”

“आता ते त्या अश्रामातूनच समजेल.” सुजय विचार करत बोलला. “उद्याच जाऊयात तिथे. एकेकाला विचरू.” आता तो जरा चिडून बोलला.

“हा आणि ते सरळ तुम्हाला काय ते सांगतील ना?” राज तिरकस हसत बोलला.

तशी ही बंधू मंडळी चिडून राजला बघू लागली.

“तुम्हाला यात पडायची काही गरज नाही.” विजयने त्या सगळ्यांना निक्षून सांगितले. “जे काही आहे ते मी पाहून घेईल.”

विचार करून काही करणे हा त्यांचा गुणधर्मच नव्हता ना. एकदा रागाला आले की त्यांची विचार करायची शक्ती कुठेतरी जाऊन लपून बसत होती. उगाच काहीतरी व्याप वाढण्यापेक्षा विजयने त्याला शांत राहायला सांगितले.

“फक्त दीला याचा काही त्रास होऊ दे.” आरुष चिडून बोलला आणि सरळ तिथून उठला.

तसे बाकी जणही उठले. सुजय त्याच्या खोलीकडे निघून गेला तर बाकी त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले.

प्रसाद तर हे सगळ भांबावून बघत राहीला. आपल्या बहिणीसाठी इतके वेडे भाऊ तो त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.

“मी काय म्हणते बाबा,” परी आता काळजीने बोलू लागली. “मी जाऊन सही करून येते. जाऊ दे, होऊ दे ना त्यांच्या नावावर काय आहे ती प्रोपर्टी.”

“इतकं सोप नसत ते बाळा.” विजय दीर्घ श्वास घेत बोलला. “कदाचित तुझ्या त्या आई वडिलांना त्यांच्या घरातल्या शत्रूंची आधीच आधीच जाणीव झाली असावी. कारण त्या कागदांमध्ये अश्या काही अटी आहेत की ती प्रोपर्टी तू असेपर्यंत फक्त तुझ्याच नावावर राहील आणि तुझ्यानंतर दान केली जाणार. म्हणून तू त्यांना हवी आहेस.”

एवढं बोलून त्याने एक कागद तिच्यासमोर ठेवला. “हा कागद वाच. हा कागद तुझी सही झाली की तुमच्या त्या गावाच्या नगरपंचायतमध्ये जमा होईल. तुला हवं तर तू ती संपत्ती तुझ्या नावावर करायाला नकार देऊन ती संपत्ती आश्रमाच्या नावावर केली जाईल.”

परीने तो कागद घेतला आणि सरळ त्यावर सही केली.

“अगं वाचून तर घे.” विजय

“मला त्याची गरज नाही वाटली.” परी हलकेच हसत बोलली.

“मामा,” राजने नाटकी आवाज काढला. तसे ते राजकडे बघू लागले.
“मॉमच लग्न किमान सात वर्ष तरी आधी का नाही लावून दिल?” राज लटकेच रुसून बोलू लागला.

“म्हणजे?” विजय गोंधळून गेला. “म्हणजे का अस?”

“एवढी चांगली मुलगी हातातून गेली ना माझ्या.” राजची नौटंकी.

दोन क्षण तर ते सगळेच राजला बघतच राहिले. परीने तिच्या भुवया वर ताणल्या आणि सरळ किचनकडे निघून गेली.

“सुधार रे, सुधार जरा.” विजय राजच्या टपलीत मारत बोलला. अशी परी सगळ्यांच्याच नशिबात नसते. तुझ्यासाठी आपण दुसरी छान छान प्रिन्सेस शोधू.”

तसा राजने परत एक मोठा उसासा टाकला आणि विजयवर एक नजर टाकली. त्यानेही राजकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला दोघेही खळखळून हसू लागले.

‘ह्याच्यामुळे एक दिवस नक्की मार खायला लागणार आहे.’ प्रसाद पण मनातच सुस्कारा सोडत बोलला.

काही वेळाने ते दोघे देखील त्यांच्या घरी निघून गेले. रोजचा दिनक्रम चालू होता. या दरम्यान परीने माला आणि प्रसादची परत भेट घडवून आणली होती. त्या दिवशी पण माला नेहमीप्रमाणे तिच्या ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टवर आली होती आणि त्यातच ती प्रसादला वेड करून सोडायची. तरी परीने तिला घरून येताना जरा नीट आवरून यायला सांगितलं होत. पण ती तुषारसोबत त्यांच्या ॲकेडेमीमध्ये सरावात इतकी मग्न झाली होती की तिला परीने भेटायला बोलावलं होत तेच ती विसरून गेली होती. मग माला तिथे पोहोचल्या पोहोचल्या परीने डोक्यालाच हात लावला होता.

तिने तिची नजर प्रसादवर टाकली तर साहेब तिलाच बघण्यात मग्न झाले होते. ते बघून मालाने मनातच सुस्कारा सोडला. मग परीने त्या दोघांना एकट सोडून ती तिच्या डान्सच्या सरावाला निघून गेली.

तिकडे माला ॲकेडेमीमधून निघून गेल्यावर देखील तुषार मात्र तिथेच उगाच घुटमळत राहीला. मधेच अकेडमीची तपासणी करू लागला. त्याच ते वागण बघून बाकी चौघेजण त्यांच्या ह्या सरांना विचित्र नजरेने बघू लागले. कारण ही ॲकेडेमी तपासण हे त्यांच्या अधिकारात नव्हत, ते फक्त सजेशन देणारे होते. तेच त्यांच्यात ठरलं होत आणि आता उगाच इकडे तिकडे बडबड करत भटकताना बघून हे चौघे चांगलेच गोंधळात पडले होते.

परी येणार असल्याच तुषारला माहिती होत. तिच्या डान्सने त्याला चांगलच वेड केल होत. आता तिचा डान्स बघणे दुसरीकडे तर शक्यच नव्हत आणि ती असे डान्सचे कार्यक्रम करत देखील नव्हती. तिला ह्या प्रॅक्टिससाठी किती विनवण्या केल्या होत्या ते तेजश्रीने त्याला आधीच सांगून दिल होत. मग आताची ही तिचा डान्स बघण्याची संधी तो सोडूच शकत नव्हता. त्यात तेजश्रीने जाणून त्याच्यासमोर तिच्या ह्या मॅमच केलेलं कौतुक ह्याच्या मनात परीबद्द्ल विचार करायला भाग पाडलं होत.

तेजश्री पण तिच्या ग्रुपसोबत तिथे येऊन पोहोचली होती. तिने पण तिच्या भावाला अस विचित्र वागताना बघून डोक्यालाच हात लावला होता.

तिला आलेलं बघून आरुषने तिला त्याच्याजवळ बोलावलं. अस अचानक त्याने बोलावल्याने तेजश्री पहिले तर गोंधळून गेली. पण नंतर तिलाच बोलावल्याची खात्री झाल्यवर ती त्याच्याजवळ गेली.

आरुष आणि त्याची भावंड एक नजर तुषारवर तर एक नजर तेजश्रीवर टाकत होते. मग तेजश्रीला त्याच्या बोलवण्याचा जरा अंदाज आला. पुढच्या क्षणाला तेजश्री आरुषजवळ पोहोचली.

“तुझा दादा सकाळी वेगळ काही खाऊन आला आहे का?” आरुष तेजश्रीकडे प्रश्नार्थक बघत बोलला.

तिचा अंदाज खरा आल्याने तिने तुषारवर नजर टाकून हलकेच सुस्कारा सोडला. “मी तर आताच कॉलेजमधून आली आहे. त्यामुळे त्याने घरातून निघताना काय खाल्लं ते नाही माहित.” तिनेही तिचे हात वर केले.

पण मनातच तिच्या दादाच्या मनाची परिस्थिती तिला आता समजायला लागली होती. कारण आता परीने त्या ॲकेडेमीमध्ये प्रवेश केला होता आणि तुषार तिला बघण्यात गुंग होऊन गेला होता.

आता बाकीच्यांचं लक्ष ही परीवर गेल. तुषार जरा एका बाजूला असल्याने तो परीकडे बघत असल्याच ह्या चारही जणांना समजलचं नव्हत. पण परीला आलेलं बघून त्यांनी लागलीच त्यांचा पसारा आवरायला घेतला. जो नेहमी ॲकेडेमी बंद करताना तो आवरत होते. जेव्हापासून परी यायला लागली तेव्हापासून ती ॲकेडेमी दुपारी पण स्वच्छ दिसायला लागली होती.

“सर,” जयने तुषारला आवाज दिला. “हे ठेवू द्या मला.”

आता त्याच लक्ष जयवर गेल आणि तो त्याच्या विचारातून खाडकन बाहेर आला. ‘अरे यार, ह्यांनी पाहिलं तर नाही ना मला त्यांच्या दीकडे बघताना.’ तो मनातच विचार करू लागला. मग त्याचच लक्ष तेजश्रीवर गेल. जी त्याला जरा चिडून बघत होती.

“सर.” जयने आता जरा जोरातच आवाज दिला.

आता सर्वांच लक्ष तुषार आणि जयकडे वळलं गेल. परीची पण नजर त्याच्यावर गेली.

‘हा दगड गेला नाही अजून?’ ती मनातच नकळत बोलून गेली. तो सध्या मालाला शिकवायला येत होता हे तिला माहिती होत. आज माला लवकर गेली म्हणून हा देखील लवकर जाईल अस तिला वाटलं होत. पण त्याला तिथेच बघून ती गोंधळात पडली.

‘दादा,’ तेजश्रीने मनातच बडबड केली. ‘माझी इज्जत घालवायची काम करू नकोस रे. आता ह्याला घरीच बघावं लागेल.’ ती तुषारला मनातच भांडू लागली.

“चला प्रक्टिसला.” परीने तेजश्री आणि त्यांच्या ग्रुपला सूचना केली.
तेजश्री आणि तिचा तो ग्रुप त्यांच्या ठरलेल्या जागेवर चालला गेल्या. तर परी तिथल्या बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. तुषार देखील तिथल्या ऑफिसमध्ये गेला.

बाकी बंधू मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाला लागली.

परी फ्रेश झाली आणि ती देखील तिथल्या ऑफिसकडे आली. तेवढ्यातच तुषार देखील त्या ऑफिसमधून बाहेर पडत होता.

आतमध्ये मोबाईलला रेंज येत नसल्याने तो त्याला आलेला फोन घेण्यासाठी ऑफिसच्या बाहेर पडत होता. परी देखील त्याच वेळी आलेली असल्याने ती जाऊन सरळ तुषारला धडकली.

“आउच.” परी तिचं कपाळ चोळत जरा कळवळली. “सॉरी.” ती समोर न बघताच पटकन बोलून गेली.

नंतर जशी तिची मान वर झाली आणि तिच्या नजरेत तुषार आला. असत तिच्या कपाळवर आठ्या चढल्या. “तुम्हाला तर वरचं बघून चालायची सवय आहे वाटतं. अश्याने एखाद्या खड्ड्यात पडाल आणि तुम्हाला उचलायला जेसीबी बोलावयाला लागेल.”

“जेसीबी?” आता तुषारच्या कपाळावर आठ्या चढल्या. कारण ती त्याला सरळ सरळ जाड बोलून गेली होती.

आताही तिने तिचे वर केलेले डोळे बघून तुषारच्या त्या आठ्या त्याला न सांगता विरळत गेल्या आणि तो तिला बघत राहीला.

“ओह गॉड,” परीने वैतागून तिच्या भुवया ताणल्या.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all