Login

अवनी एक प्रवास भाग ३५

आता ते चारही भावंड डोळे विस्फारून बघत राहिले. एवढच काय? तुषारचे डोळे देखील विस्फारले गेले होते. ज्या मुलीचा डान्स बघायला मिळावा म्हणून तो उगाच ह्या अकेडमीमध्ये विनाकारण फिरत होता. तिचा डान्स त्याने त्याच्या बहिणीसोबत दिल्लीला गेलेला असताना समोरासमोर पहिला होता.
मागील भागात.

परी फ्रेश झाली आणि ती देखील तिथल्या ऑफिसकडे आली. तेवढ्यातच तुषार देखील त्या ऑफिसमधून बाहेर पडत होता.

आतमध्ये मोबाईलला रेंज येत नसल्याने तो त्याला आलेला फोन घेण्यासाठी ऑफिसच्या बाहेर पडत होता. परी देखील त्याच वेळी आलेली असल्याने ती जाऊन सरळ तुषारला धडकली.

“आउच.” परी तिचं कपाळ चोळत जरा कळवळली. “सॉरी.” ती समोर न बघताच पटकन बोलून गेली.

नंतर जशी तिची मान वर झाली आणि तिच्या नजरेत तुषार आला. असत तिच्या कपाळवर आठ्या चढल्या. “तुम्हाला तर वरचं बघून चालायची सवय आहे वाटतं. अश्याने एखाद्या खड्ड्यात पडाल आणि तुम्हाला उचलायला जेसीबी बोलावयाला लागेल.”

“जेसीबी?” आता तुषारच्या कपाळावर आठ्या चढल्या. कारण ती त्याला सरळ सरळ जाड बोलून गेली होती.

आताही तिने तिचे वर केलेले डोळे बघून तुषारच्या त्या आठ्या त्याला न सांगता विरळत गेल्या आणि तो तिला बघत राहीला.

“ओह गॉड,” परीने वैतागून तिच्या भुवया ताणल्या.

आता पूढे.

“काही लोकांना तर सॉरी पण बोलता येत नाही.” एवढं बोलून ती त्याच्यावर नजर टाकून तिथून जायला निघाली.

तिच्या आताच्या आवाजाने तो भानावर आला आणि मग त्याच्या आठ्या परत त्याच्या कपाळवर विराजमान झाल्या. “एकतर स्वतः येऊन धडकली आणि त्याच खापर माझ्यावर फोडतेस? तू पण जरा वर बघून चालायला पण शिक.”

त्याच बोलण ऐकून पुढे जाणारी परी थांबली आणि मागे वळून त्याला रोखून बघू लागली. “पहिले मोबाईल बाजूला ठेऊन तुम्ही चालायला शिका. नंतर लोकांना शिकवा.” परी कडक आवाजात बोलून प्रॅक्टिस करत असलेल्या ठिकाणी चालली गेली.

“हिचा प्रोब्लेम काय आहे?”तुषारच्या कपाळवर आठ्या अजूनही खेळत होत्या. “असही मी पण मोबाईलमधेच होतो, जाऊदे.” तुषार एक दीर्घ श्वास घेतला. ‘आता परत त्या वाघिणीच्या गुहेसमोर जाव लागेल.’ आता तो मनातच बोलला कारण त्याला आता तिचा डान्स बघायचा होता. मग तो इकडे तिकडे घुटमळत प्रॅक्टिस चालू असलेल्या ठिकाणी जाऊ लागला. परी नाचताना दिसेल अश्या ठिकाणी जाऊन तो बसला. आता त्याचा एक डोळा त्याच्या मोबाईलमध्ये तर एक डोळा परीच्या डान्सवर होता.

परीने स्टेप्स करून दाखवल्यावर ती थांबून त्या ग्रुपचा डान्स बघत होती. तिचा डान्स थांबल्यावर तुषार त्याच्या मोबाईलमध्ये लक्ष घालत होता आणि तिने स्टेप्स करायला सुरवात केल्यावर तिच्याकडे हळूच बघत होता. डान्स करताना तिला कशाचाही भान राहत नव्हत एवढं त्याला दोन ते तीन दिवसात समजल होत.

“सर असे त्या बारीक बेंचवर का बसले आहेत?” आदेश तुषारकडे बघत आरुषला विचारू लागला.

आरुष सकट बाकी सगळ्यांनी तिकडे पाहिलं तर तुषार तिथल सामान ठेवण्यासाठी ठेवेलेल्या बेंचवर कसातरी बसला होता. तिथे त्याला बसताही येत नव्हत. तरी मागे पुढे सरकून तो त्याची एक नजर परीवर ठेवत होता.

“ते बहुतेक डान्स प्रॅक्टिस बघत आहेत.” जय विचार करत बोलला.

आता त्यांनी त्यांची नजर तुषारवरच ठेवली. मग त्यांच्या लक्षात आल की त्यांचे ते सर फक्त परीचा डान्स बघत होते. बाकी मुलींनी स्टेप्स करायला सुरवात केल्यावर ते त्यांची नजर फिरवून घेत होते.

“ते फक्त दीचा डान्स बघत आहत.” सुजय जरा चिडून बोलला. आता आपल्या बहिणीला अस कोणीतरी बघत आहे म्हटल्यावर भावाला राग येणारच की.

मग ते देखील परीचा डान्स बघू लागले. तर ते पण तिच्या डान्समध्ये हरवले. आता ते तुषारचा विषय विसरून फक्त परीला नाचताना बघत राहिले.

“दी एवढी भारी नाचते?” आरुष त्याचे डोळे फाडून बघत बोलला.

“आणि घरात राहून मलाच माहित नव्हत?” सुजय पण आ वासून बघत बोलला.

त्या चारही भावंडांनी तिथेच मांडी वाळून बसून घेतलं. परीने जश्या तिच्या स्टेप्स थांबवल्या तस तुषारने त्याची नजर फिरवून घेतली. ती नजर फिरता फिरता या चारही भावांवर येऊन थांबली. त्याने परत डान्स करणाऱ्या मुलींकडे पाहिलं. परी तर डान्स करायची थांबली होती. मग ही मुल नक्कीच त्या मुलींना बघत असतील अस त्याला वाटून गेल. त्यात त्याची बहिण पण होती. तो उठून काही बोणार तोच त्याला आठवलं की तो पण तर परीकडे बघत राहीला होता. आता त्यांना काही बोलायला गेल तर ही गोष्ट पण ते नक्कीच बाहेर काढणार. तरीही तो उठला आणि ह्या भावंडांच्या मागे येऊन उभा राहीला. जेणेकरून त्यांच बोलण त्याला ऐकू जाईल.

दुसरीकडे ही भावंड त्यांच्या दीचा डान्स सूर व्हायची वाट बघत होती.

“दी का करत नाहीये डान्स?” जयने हळूच विचारलं.

“कदाचित त्या मुलींची ती आता प्रॅक्टिस घेत आहे,” आरुष पण विचार करत बोलला. “त्यांची पुढची स्टेप्सची वेळ येईल तेव्हा ती पण डान्स करेल.”

“पण मग आता आपण का तिकडे बघत आहोत?” सुजय सहज बोलून गेला.

मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नकारार्थी मानेला झटके देत पटकन उभे राहिले. त्यांना अस मुलींकडे बघत राहाण आवडतच नव्हत. ते तर त्यांच्या दीच्या डान्सची वाट बघत राहिले होते.

आता ती गोष्ट तुषारच्या ही लक्षात आली. मग त्याला आठवलं की ही मुल तर तिनेच शिकवली आहेत. त्यांच्याकडून अशी चूक होणारच नाही. मग तो देखील गालातच हसला.

आता परीचा डान्स सुरु झाला की तुषारसोबत ही भावंड पण तिचा डान्स बघण्याची संधी सोडत नव्हते.

परी डान्सची प्रॅक्टिस घेते हे रावीच्या कानावर गेल. मग काय? पोहोचली की ती ना ॲकेडेमीवर तिच्या दीचा डान्स बघायला. आज आल्या आल्या ती प्रॅक्टिस चालू असलेली जागा शोधली आणि थेट चालू प्रॅक्टिस समोरच जाऊन बसली.

अस अचानक कोणीतरी आल म्हणून परीचा लक्ष विचलित झाल. ती लागलीच चिडून बोलणार तोच तिच्या समोर रावीचा खुललेला चेहरा दिसला. परीने तिचा डान्स थांबवला आणि आठ्या पाडून रावीकडे पाहिलं.

“का थांबलीस?” रावीने लगेच तिचं तोंड बारीक केल.

“कारण आजची प्रॅक्टिस संपली.” परी तोऱ्यात बोलली. नंतर ती त्या ग्रुपच्या मुलींकडे वळली. “एवढं घरी सुद्धा प्रक्टिस करा. आताचे स्टेप्स हे एकटीने सराव केला तरी चालेल. नंतर ग्रुपमध्ये तो बसवायला सोपा जाईल.”

सगळ्या मुलींनी त्यांच्या माना होकारात हलवल्या आणि एकदमच दम टाकून जिथे उभ्या होत्या तिथेच बसून घेतलं.

त्यांना अस दम टाकताना बघून परी त्यांना वैतागून बघू लागली. "आत्ताशी तर चार स्टेप्स झाल्या आहेत. जेव्हा पूर्ण डान्सची प्रॅक्टिस करायची वेळ येईल तेव्हा काय कराल?”

“तोपर्यंत सवय होऊन जाईल.” तेजश्री पाणी पीत बोलली. “पण मॅम तुमचा स्टामिना डेंजर आहे. तुमच्यासोबत आम्हाला मॅच करताच येत नाहीये.”

“मग मागच्या वर्षी कस केलात त्या स्पर्धेत?” परी

“ते पण नका विचारू.” सुजाता “तेव्हाही आमचा जीव बाहेर यायचा बाकी राहीला होता.”

“कोणती स्पर्धा?” सुजयचा आवाज कानावर आला.

तस सगळ्यांनी तिकडे पाहिलं तर ते चारही भावंड ह्यांच्याकडेच बघत होते. ह्या भावंडाना पण माहिती नव्हत ना त्या स्पर्धेबद्दल. आता परीच्या तोंडातून निघालेलं तर सुजयच्या कानावर गेल. मग लगेच विचारणा व्हायला सुरवात झाली.

“अरे हो तुम्हाला माहित नव्हत ना.” रावी तिचे दात दाखवत बोलली.

“काय माहित नव्हत?” आरुष

“मागच्या वर्षी आपल कॉलेज त्या डान्सच्या कॉम्पिटीशनमध्ये जिंकल होत.” रावी “ज्या डान्सरने सगळा रिझल्ट एका बाजूने फिरवला होता. नंतर एक मास्कवाल्या मुलीचा फोटो व्हायरल झाला होता. ती हीच तर होती आपली दी.”

आता ते चारही भावंड डोळे विस्फारून बघत राहिले. एवढचं काय? तुषारचे डोळे देखील विस्फारले गेले होते. ज्या मुलीचा डान्स बघायला मिळावा म्हणून तो उगाच ह्या ॲकेडेमीमध्ये विनाकारण फिरत होता. तिचा डान्स त्याने त्याच्या बहिणीसोबत दिल्लीला गेलेला असताना समोरासमोर पहिला होता.

‘तरीच काही काही स्टेप्स ओळखीच्या का वाटत होत्या?’ तो मनातच विचार करू लागला.

“झाल माझ कौतुक?” परी थोड वैतागून बोलली. “चला मी निघते आता.” एवढं बोलून ती तिची बॅग आवरू लागली.

बॅग आवरून झाल्यावर तिने ती खांद्यावर घेतली आणि तिचे डोळे घट्ट मिटून परत उघडले. “असे मख्खा सारखे उभे नका राहू. तुमची काम झाली असतील तर तुम्ही पण निघू शकता." ती तिच्या भावंडांकडे बघत बोलली.

तसे ते भानावर आले आणि त्यांच्या त्यांच्या कामाला लागले.

“अरे दादा चल.” तेजश्री पण हळूच पण जरा चिडून तुषारच्या कानाशी बोलली. कारण ती त्याच्याजवळ येऊन कधीची उभी होती पण एक तो की त्याच लक्षच नव्हत त्याच्या ह्या बहिणीकडे.

“हा चल.” तुषार लागलीच भानावर येत बोलला.

जसे ते दोघे त्यांच्या बाईककडे एका बाजूला गेले तसा तुषार परत बोलू लागला. “मागच्या वर्षी हीच तुमच्या सोबत डान्स करत होती ते तू मला का सांगितलं नाहीस?” तुषार जरा चिडून बोलला.

“ते तुला का सांगू?” तेजश्री पण त्याच सुरात बोलली. “आता एवढ्या सहज तर ती तिच्या ह्या मॅमच्या गोष्टी तिच्या भावाला सांगणार नव्हती.

ज्याच्यासोबत वाद किंवा भांडण झाली त्याचा कधची तोंड पण न बघणारा तिचा हा दादा परीसोबत भांडून देखील तिचा डान्स बघताना तिने पाहिलं होत. त्यात त्याची तिच्या मॅमची सारखी चालू असेलली चौकशी बघून तेजश्रीला तिच्या भावाच्या वागण्याच जरा आश्चर्यचं वाटत होत.

मग तिने त्याचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवलं होत. “आणि एक आमच्या मॅमचा डान्स चालू असताना त्यांना तू असा बघत नको बसत जाऊस. त्यांच्या भावांना तू चांगलाच ओळखतोस.”

“ते तू नको मला शिकवू.” तुषार लागलीच चिडून बोलला. “तुमच्या मॅमची भावंड मला घाबरतात.” तुषारच्या बोलण्यात ह्या वेळेस तेवढा आत्मविश्वास नव्हता आणि ते तेजश्रीचे लगेच ओळखलं होत. “आणि त्या चार फुट चार इंचला मी का बघू?”

“दाद्या,” तेजश्री चिडून बोलली. “आमच्या मॅमला परत जर अस बोललास ना तर आईला जाऊन सांगेल की तू त्यांना बघत बसतोस. मी तर आज तुझा व्हिडिओ पण काढला आहे.” तेजश्री सरळ त्याला धमकी देत बोलली.

“तू माझ बहिण आहेस,” तुषार त्याची बाईक चालू करत बोलला. “आणि बाजू तुझ्या मॅमची का घेत आहेस? तुझ्यासाठी घरात मी भांडतो आणि एक तू मलाच धमकी देतेस?”

“हो,” तेजश्री “कारण तुझ्या आमच्या मॅमविषयी जरा जास्तच चौकश्या चालू झाल्या आहेत. याची भनक पण त्यांच्या भावंडांना लागली ना तर आमची प्रॅक्टिस तर दूरच राहील. ते सगळच बंद करू टाकतील.”

“मग मी तुमची प्रॅक्टिस घेईल.” तुषार तोऱ्यात बोलला.

“तुला फक्त वजन उचलणं चांगल जमत,” तेजश्री “डान्स आणि तू विचार पण करू नकोस.”

यावर त्याने त्याच तोंड वाकड केल आणि त्याची बाईक चालू केली.
दुसरीकडे माला प्रसादला बघत राहिली होती. त्यांची भेट झाल्यावर माला तिच्या काही डायेटच्या गोष्टी घ्यायला तिच्या नेहमीच्या दुकानात जाणार होती. त्यांची भेट झाल्यावर त्या दुकानात जाण्यासाठी ती त्याचा निरोप घेऊ लागली. पण प्रसादही तिच्यासोबत येत असल्याचे तिला सांगितले.

प्रसादचं सोबत येण्याबद्दल ऐकून माला पहिले तर गोंधळून गेली.

“मलाही बघायचं आहे चम्पियन माणसं कुठला डायेट खातात ते,” प्रसाद जरा मिश्कील होत बोलला. “म्हणजे आम्ही पण तो खाऊन फिट राहू.”

“अस नसते ते.” माला खळखळून हसत बोलली.

प्रसाद आज पहिल्यांदाच तिला अस हसताना बघत होता. मग काय? हरवला की तो तिच्या त्या हास्यामध्ये.

“नॉट अगेन यार.” माला त्याचा चेहरा बाजूला करत बोलली. “अस बघत नको जाउस रे.”

“मग कस?” प्रसाद त्याच्याच तंद्रीत बोलून गेला.

तशी माला जरा वास्तवात आली आणि त्याला रोखून बघत राहिली.

“ते तू बोलली ना की तस नसत ते.” प्रसादने लगेच सवरून घेतलं. “म्हणून विचारल की कस असत मग?”

त्याच ते लागलीच शब्द फिरवण बघून मालाला परत हलकंच हसायला आल. “प्रत्येकाचा शरीरानुसार, वजनानुसार, वयानुसार ते वेगवेगळ असत.”

“बरं,” प्रसाद मालासोबत चालू लागला. “आज तूझ डायेट बघू.”

“हम्म चल.” माला सहज बोलून गेली.

मग ते दोघेही तिच्या नेहमीच्या दुकानात पोहोचले आणि माला तिचं नेहमीच सामान घ्यायला लागली.

पण आज तिचं नेहमीच न्युट्रिशनचा सामान तिथे नव्हत. मग ती त्याच्या पर्यायी सामान बघू लागली. तिथे ठेवलेलं जे योग्य वाटल ते तिने घ्यायला हात पुढे केला. पण प्रसादने तिला अडवलं आणि दुसर सामान तिच्या पुढ्यात धरलं. आता ती प्रसादला आठ्या पाडून बघू लागली. तिच्या कामात अस अडवलेलं तिला आवडत नव्हत.

तिचा तो आठ्या पडलेला चेहरा बघून प्रसादने तिला ते सामान आणि तिच्यासाठी योग्य असणार डायेट तिला समजवायला सुरवात केली. त्याच ते अगदीच प्रोफेशनल बोलण ऐकून मालाचे डोळे विस्फारले गेले. कारण तिच्या दृष्टीने तो फक्त खादाड होता आणि त्याच डायेटबद्दल बोलण ऐकून ती चकितच झाली होती. त्याने तिला त्या गोष्टी देखील सांगितल्या होत्या ज्या तिलाही माहिती नव्हत्या. पण तिच्या सरावासाठी, उर्जेसाठी उपयुक्त होत्या.

मग ती त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला विविध प्रश्न विचारू लागली. त्याचेही त्याने त्याला माहिती असलेले उत्तर दिले. आता मात्र ती त्याच्यावर चांगलीच प्रभावित झाली. तिच्या पोटात गुड गुड व्हायला सुरवात झाली. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी ऐकून तिला आजकाल बऱ्याच वेळा व्हायचं. आता तिला काही सुचेनास झाल आणि तिने पटकन त्याचा हात पकडून घेतला.

असा अचानक हात पकडून घेतल्याने प्रसाद पण स्तब्ध झाला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all