मागील भागात.
“अगं दी.” आरुष लागलीच तिच्याजवळ आला. “तिचं नको मनावर घेउस. ती मस्करी करत आहे फक्त.”
बोलता बोलता आरुषने आराध्याकडे बघून ‘काय केल?’ असा हलकेच इशारा केला.
तरीही तिचे डोळे वाहायचे थांबले नाहीत. “म... मी जाते.” ती उठून उभी राहिली.
“बस गप्प,” मोहिते साहेबांनी तिच्या हाताला धरून बसवलं. “चालली लगेच. तू काय तुझ्या मावश्यांना आज भेटलीस का? त्यांना ओळखत नाहीस? किती नौटंकी भरली आहे त्यांच्यात. तुला तर चांगलच माहिती आहे ना.”
“पण माझ्या मनात असा विचार कधीच आला नाही.” परी तिचे डोळे पुसत बोलली.
आता ती अगदीच लहान मुलीसारखी निरागस दिसत होती. मग काय वितळले की आजूबाजूचे. तेवढ्यातच विजय आणि सायली पण तिथे येऊन पोहोचले.
विजयला आलेलं बघून आराध्याच टेन्शन वाढल. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच मन लगेच अस्वस्थ व्हायचं.
आता पूढे.
“शांत हो,” आराध्या परीला हळूच बोलली. “नाहीतर तुझ्या बापाने तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं ना तर तो मला काही सोडणार नाही.”
तस परीने लागलीच स्वतःला सावरून घेतलं. तरी नुकत्याच आलेल्या विजयला काहीतरी गंभीर झाल्याची जाणीव झालीच. त्याची नजर परीवर गेली. तिचे ओलावलेले डोळे त्याने पाहिलं आणि लगेच तो तिच्याच जवळ बसला.
“काय गं?” विजय परीला विचारू लागला. “डोळे का भरून आले आहेत?”
इकडे आराध्याने डोक्यालाच हात लावला आणि ते सायलीने पाहिलं. मग तिला जाणवलं की काहीतरी तिने माती खाल्ली आहे.
“मी सांगतो ना,” आरुषच्या चेहऱ्यावर आसुरी स्मित झळकल. “ते काय आहे ना...” तो पुढे काही बोलणार तोच परीने त्याच्यावर डोळे वटारले. तसा तो लगेच शांत झाला .
“काही नाही ते,” मोहिते साहेब “आपल कोकरू छान डान्स करत म्हणे. तिने ते लपवलं तर तिची मावशी तिला जरा ओरडली म्हणून बाकी काही नाही.” त्यांनी एका दमात सांगून टाकल.
“खूपच हळवं आहे हे कोकरू.” सायली हलकेच हसत बोलली.
मग विजय आणि सायली दोघेही मोहिते साहेबांच्या पाया पडले. त्यांनी देखील दोघांना लागलीच उभ करून त्यांच्या कवेत घेतलं.
“अरे दाम्या गावालाच आहे का अजून?” मोहिते साहेब पहिले आराध्याकडे बघून बोलले. नंतर सायलीकडे वळले. “आणि तुझा बाप तर मला विसरूनच गेला आहे. साधा एक फोन नाही त्याचा.”
“हो अजूनही गावालाच आहेत ते.” आराध्या “तिथेही छोटीशी कंपनी चालू करता येईल का? हे बघत आहेत. जेणेकरून गावाची तेवढीच प्रगती.”
“हे बरं आहे,” मोहिते साहेब मनमुराद हसले. “लेकांच्या हाती कारभार सोपवून सामाजिक कार्याला लागले.”
“आणि बाबांना अजून माहिती नाहीये की तुम्ही आला आहात.” सायली “मागे फोन केले होते. पण आमचे मंत्री खूपच बिझी होते ना. मग आम्ही गरीब माणस काय करणार?”
“तुम्ही आणि गरीब?” मोहिते साहेब “मग तुमच्यासारखी गरिबी सर्वाना मिळो.”
यावर ते सगळेच खळखळून हसले. सायलीने लागलीच तिच्या वडिलांना फोन लावून त्यांचे मित्र आल्याचे कळवले. तसा तो फोन मोहिते साहेबांनी घेतला आणि दोघे मित्र गप्पा मारत बसले.
“आता काही ते लवकर फोन ठेवणार नाहीत.” आराध्या हलकेच हसत बोलली.
“चला माझी सुटका झाली.” आरुष पण हलकेच बोलला आणि त्याच्या खोलीकडे जायला निघाला.
त्याची दोन पावलं पडूनही झाली नसतील तोच मोहिते साहेबांनी त्याचा हात पकडून त्याला जागेवर बसायला लावलं. उगाच ते केंद्रीय मंत्री पदावर जाऊन बसले नव्हते. त्यांची आताही नजर आणि बुद्धी खूपच चौकस होती.
त्याला बसायला लावलेलं बघून बाकी सगळेच परत हसायला लागले. काही वेळ ते मोबाईलवर बोलले. तो फोन ठेवला आणि दुसरा फोन लावला. त्यावर त्यांनी दोन दिवस सुट्टी घेत असल्याचे कळवले.
ते ऐकून त्यांच्या लेकरांना खूपच आंनद झाला. पण त्यांची ती सुट्टी तर त्यांच्या मित्रांसाठी होती हे मात्र मोहिते साहेबांनी सांगायचं टाळल होत. त्यांच्या चेहऱ्यावरच हसू त्यांना कमी करायचं नव्हत.
ते ऐकून त्यांच्या लेकरांना खूपच आंनद झाला. पण त्यांची ती सुट्टी तर त्यांच्या मित्रांसाठी होती हे मात्र मोहिते साहेबांनी सांगायचं टाळल होत. त्यांच्या चेहऱ्यावरच हसू त्यांना कमी करायचं नव्हत.
फोनवर बोलून झाल्यावर त्यांनी लगेच आरुषला विचारू लागले. “मग सहा महिन्यांनी फिक्स ना?”
त्याने परीकडे पाहिलं. “मी काय सांगू? मावशीला विचार ना.” परी तोऱ्यात बोलली. “नाहीतर परत बोलायच्या की तू फक्त माझच ऐकतो म्हणून.”
तसे बाकी सगळेच परीला धक्का लागल्यासारखे बघू लागले. आराध्या तिला आठ्या पाडून बघू लागली.
“अशी का बोलत आहेस गं?” सायलीने तिला लगेच विचारलं.
“मावशी जळते आमच्यावर.” परी आता खट्याळ झाली. “आल्या आल्या आजोबांनी तिला सोडून मला कवेत घेतलं आणि त्यांनी आरुषसोबत बोलायचं म्हणून मलाही बोलावलं.”
आता आराध्या परीला आ वासून बघू लागली. ‘ही तिचं परी आहे का जी आता काही वेळापूर्वी हळवी झाली होती?’ हा प्रश्न तिच्या मनात येऊन गेला.
परीच्या बोलण्यावर बाकी मात्र खळखळून हसले होते.
“काय आगाव आहे ही.” आराध्या लटक्या रागात उठली आणि परत झाडू शोधू लागली.
“का?” परी लगेच मोहिते साहेबांजवळ जात बोलली. “माझी मस्करी केली ती चालते आणि मी केली तर लगेच झाडू शोधतेस.”
आता बाकी सर्व परीचं हे नाव रूप बघून अचंबित झाले होते. कारण तिने असा खट्याळपणा कधी कोणासमोर केलाच नव्हता ना. जेव्हापासून रावीने विजय आणि सायली समोर तिचं पितळ उघड पाडून तिला सख्ख्या मुलीसारख वागायला सांगितल होत. तेव्हापासून परी खुलत चालली होती.
“आमच कोकरू सुधारत चालल आहे.” मोहिते साहेब हसून बोलले.
आता परत आरुषचा विषय बाजूला सारला गेला आणि त्यांच्या परीवरच्या गप्पा सुरु झाल्या. त्यात त्यांना परीला आलेल्या स्थळाबद्दल देखील समजल. त्यानंतर परीचे आलेले काका यांच्याबद्दल देखील समजलं. आता मात्र बोलण्याच्या ओघात आरुषने त्यांनी परीला दिलेला त्रास देखील त्यांना सांगून दिला. तसा विजय, सायली आणि आराध्याने डोक्यालाच हात लावला. ते मुलींच्या बाबतीत किती सेन्सेटिव्ह होते ते फक्त त्यांच्या ह्या तीन लेकरांना चांगलच माहित होत आणि त्यांनी मोहिते साहेबांचा चिडलेला चेहरा पाहिला. आता त्यां सांगितल नाही म्हणून ते चांगलेच कान धरणार होते.
“एवढ सगळ झाल आणि मला साध कळवलं पण नाही?” मोहिते साहेब चिडून विचारू लागले.
“झाल ते सॉल्व्ह,” विजय “आता ते परत नाही काही बोलणार. तिच्या त्या आश्रमात सही करून पाठवली आहे की तिला त्या प्रोपर्टीमध्ये काहीही रस नाही. त्याच जे करता येईल ते करा. तिच्या काकांच्या नावावर केली तरी चालेल.”
“ठीक आहे,” मोहिते साहेब “जर जास्तच उडायला लागले तर मला सांगा.” एवढं बोलून ते विचारात पडले आणि नंतर आरुषकडे पाहिलं.
“हे तिघे कार्टे तर मला सांगणार नाहीत. पण तू नक्की सांगशील.”
तसे त्यांचे ते तिघे कार्टे त्यांची तोंड पाडून बसले. तर आरुषने त्याची कॉलर ताठ केली. तर परी सुस्कारा सोडत राहिली.
काही वेळाने आराध्या आणि सायली किचनकडे जेवणाची तयारी करायला चालल्या गेल्या. परी पण त्यांच्यामागे जायला उठली तर आराध्याने तिला जबरदस्ती थांबायला लावलं.
“माझी मस्करी करतेस ना?” आराध्या तोऱ्यात बोलली. “मग मला मदत पण नाही करायची.”
त्या तिघी बाकी जणांपासून जरा लांब गेलेल्या असल्याने त्यांच बोलण बाकी पुरुष मंडळीपर्यंत काही पोहोचत नव्हत.
आराध्याच बोलण ऐकून परीने लगेच थांबून घेतलं आणि ती मागे जायला वळली. दोन पावल पुढे जाऊन ती क्षणभर थांबली आणि परत मागे वळून बोलली. “ठीक आहे.” नंतर आराध्याला जवळ बोलवलं. “मग तुमच्या भावी सुनेबाबत पण मी काहीच नाही सांगणार.” परीने हळूच तिच्या कानात सांगितल आणि मागे जाऊन त्या सोफ्यावर रेलून बसली.
परीचं बोलण ऐकून परीच्या कानाजवळ वाकून राहीलेली आराध्या डोळे विस्फारत सरळ उभी राहिली.
सायली पण लगेच त्या आराध्याजवळ आली. “काय गं काय झाल?”
“तुझी लेक जरा जास्तच खुलत चालली आहे.” आराध्या परीला रोखून बघत बोलली आणि तिने तिच्या कानात काय सांगितल ते सायलीला सांगून दाखवलं.
“ती अशी वागते म्हणजे तू नक्कीच काहीतरी आधी केल आहेस.” सायली आराध्याकडे बारीक डोळे करून पाहिले.
तस आराध्याने बारीक तोंड करून जे ती बोलली ते तिला सांगून दाखवलं.
“हे भगवान,” सायलीने तिच्या डोक्याला हात लावला. “कशाला त्यांच्या मागे लागते? हा सीजन त्यांचा आहे. ते वरचढं असणारच ना. आता ती पण माहिती सांगायला भाव खाईल. एकतर आपल्या लेकांची खरी माहिती तिच्याकडूनच आपल्याला भेटायची.”
“आता काय करू?” आराध्याने तिचे ओठ बाहेर काढले.
“थांब मी बोलवते तिला.” सायलीने आराध्याला किचनकडे जायला सांगितलं. जशी ती किचनकडे जायला निघाली तस सायलीने परीला आवाज दिला.
पण खुललेल्या परीने मोहिते साहेबांच तेव्हा बोललेलं वाक्य तिच्या मनात पक्क धरून घेतलं होत. ‘तुझ्या मावशींच्या अंगातली नौटंकी तुला माहित नाही का?’ म्हणून आता ती पण नौटंकीच्या मूडमध्ये आली होती.
सायलीचा आवाज येऊन देखील ती काही जागची हलली नाही. आता तर ती आरुषजवळ गेली.
“ऐक ना,” परी “त्या ॲकेडेमीमध्ये कॅमेरा बसवलेला आहे ना?”
परीच्या प्रश्नाने आरुष तर पहिले गोंधळून गेला.
परीच्या प्रश्नाने आरुष तर पहिले गोंधळून गेला.
“नाही बसवलाय का?” त्याच्याकडून उत्तर आल नाही म्हणून परीने परत विचारलं.
“ह.. ण.. नाही म्हणजे हो बसवला आहे.” आता उत्तर देताना तो चांगलंच गडबडला.
“एवढं काय झाल गडबडायला?” परीने त्याला गोंधळून विचारलं. “चल मला बघायचं आहे.”
“काय बघायचं आहे?” आरुष जागीच थांबून विचारू लागला. कारण आज ते बसून त्यांचा डान्स बघत होते. ते पाहिल्यावर परी नक्कीच त्याला ओरडणार होती.
“ते तुला काय करायचं आहे?” परी त्याच्या हाताला पकडून बोलली आणि सरळ त्याला घेऊन त्याच्या खोलीकडे गेली.
जाता जाता किचनकडे एक कटाक्ष टाकून त्या दोघींसमोर तिचं नाक उडवायला विसरली नाही.
तश्या त्या दोघी आ वासून बघत राहिल्या. “ही जास्तच शेफारली आहे यार.” सायली आराध्याकडे बघू बोलली.
“बघ ना, आपल्याला अव्होईड केल?” आराध्या पण चकित होऊन बघत बोलली.
“हे ना तुझ्यामुळे झाल.” सायली “उगाच तिला चिडवत बसली.”
अगं हो,” आराध्या “पण नंतर लगेच डोळ्यात पाणी आणून एकदम निरागस पण दिसत होती.”
“तिला सोनाली किंवा प्रणाली तर नाही भेटली ना?” सायली विचार करत बोलली. “इतकी नौटंकी तर त्या दोघींमध्येच आहे.”
“काय माहिती?” आराध्या “जेवण झाल्यावर तर येईलच ना. असही तिला बसून राहाण आवडत नाही.” आराध्या असुरी स्मित करत बोलली. “आता नाही तर थोड्यावेळाने का असेना ती येईलच.”
“एवढं तर माहिती आहे ना?” सायाली “चल मग कामाला लागुयात. ती आली की तिच्याकडे बघुयात.”
एवढं बोलून त्या दोघी त्यांच्या कामाला लागल्या.
इकडे परी आणि आरुष दोघेही आरुषच्या खोलीत पोहोचले. आरुषने त्याचा लॅपटॉप चालू केला आणि त्यावरचे ॲकेडेमीमधले सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग चालू केले.
सकाळपासून चालू केलेली रेकॉर्डिंग बघून परीने डोक्यालाच हात लावला. “मला तुमच्या माकड उड्या बघायच्या नाहीयेत. आमच्या डान्सची व्हिडीओ लाव.”
तस आरुषने त्या आलेल्या वेळेची रेकॉर्डिंग चालू केली. पण त्यांच्या दिशेने असणारा कॅमेराची रेकॉर्डिंग त्याने लावली होती. कारण दुसऱ्या कॅमेरात हे चारही जण त्यांच्याकडे बघत असल्याचे स्पष्ट दिसत होते.
परी तर या मुलींचा डान्स बघण्यात व्यस्त होती. आता तिथे बसून त्याला कंटाळा येऊ लागला. काहीतरी खायला आणावं म्हणून तो त्याच्या खोलीतून निघून किचनकडे निघून गेला.
काही वेळातच परीचे ते डान्सचे व्हिडीओ बघून झाले. मग नंतर तिची ही भावंड तिथल्या मुलांना कशी ट्रेनिंग देतात? ते ती बघू लागली. त्यासाठी तिने त्या ॲकेडेमीचे बाकी कॅमेराची रेकॉर्डिंग चालू केली. काही वेळाने एका कॅमेरामध्ये तिला तिची ही चार भावंड त्यांच्या डान्सकडे बघत बसलेली तिला दिसली.
ते बघून पहिले तर तिच्या कपाळवर आठ्या आल्या. पण नंतर ते चारही जण एकेमेकानाकडे बघून नकारार्थी मान हलवत उठताना दिसले. मग तिला समजलं की ते पण तिचाच डान्स बघण्यात व्यस्त होते. ते बघता बघता तिला अजून एक चेहरा त्यांचा डान्स करताना बघत असेलला दिसला आणि तिच्या निवळलेल्या आठ्या परत जमा व्हायाला सुरवात झाली.
तिला त्या कॅमेरामध्ये तुषार दिसला होता जो फक्त तिचा डान्स चालू असताना तिला बघायचा आणि बाकी मुलीनी सुरवात केली की त्याची नजर फिरवून घ्यायचा. मग ती गोंधळात पडली.
आता तिच्या भावांच ठीक होत की त्यांचा तिच्यावर खूप जीव होता म्हणून ते फक्त तिचाच डान्स बघत राहिले होते. ‘पण मग हा दगड का बघत आहे?’ ती मनातच विचार करू लागली.
त्याच्या विचारात असताना तिने त्या ॲकेडेमीचे सर्व कॅमेरे तपासले. ज्यात तुषार दिसत होता. मालाला ट्रेनिंग देतानाचा तुषार तिला जरा वेगळा भासला. त्या रेकॉर्डिंगमध्ये आवाज सुधा रेकॉर्ड होत होता. त्यामुळे त्याच मालाला ट्रेनिंग देण हे किती मनापासून होत ते परीला सहज दिसून येत होत. मालाची कॅपेसिटी किती आहे? हे मालापेक्षा तुषारलाच जास्त माहिती असल्यासारखे वाटत होते. म्हणजे तो कामाच्या बाबतीत नक्कीच खूप गंभीर असलेला तिला जाणवला.
त्याच तिच्या भावंडांवर ओरडणं आता बरोबर वाटू लागल. कारण ते तर धिंगाणा घालत होते आणि त्याच कारण माहिती नसल्याने तो ओरडला होता. ते माहिती असत तर कदाचीत तो नसता ओरडला.
त्यांची रेकॉर्डिंग बघता बघता मधेच परीचे डोळे विस्फारले गेले. तिच्या मनाची धडधड वाढू लागली. ती आज पहिल्यांदाच अस काहीतरी बघत होती.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा