Login

अवनी एक प्रवास भाग ३८

खर बघायला गेल तर तिच्या नजरेसमोरून सीसीटीव्हीमधला तुषार काही केल्या जातच नव्हता. त्यामुळे तिचं मन काही स्थिर होतच नव्हत. त्यासाठी ती तिचं मन वळवायला ह्या दोघींना छळत होती. तरी त्याचा विचार त्याच्या डोक्यातून जाणार नव्हता तर तिला मात्र कोणासोबत तरी बोलाव लागणार होत आणि ते तिला नको होत. ती कोणाचा विचार करू लागली आहे याची भनक जरी कोणाला लागली तरी तिच्या घरच्यांचे आणि भावंडांचे मनसुबे खूप लांबपर्यंत पोहोचणार होते.
मागील भागात.

तिला त्या कॅमेरामध्ये तुषार दिसला होता जो फक्त तिचा डान्स चालू असताना तिला बघायचा आणि बाकी मुलीनी सुरवात केली की त्याची नजर फिरवून घ्यायचा. मग ती गोंधळात पडली.

आता तिच्या भावांच ठीक होत की त्यांचा तिच्यावर खूप जीव होता म्हणून ते फक्त तिचाच डान्स बघत राहिले होते. ‘पण मग हा दगड का बघत आहे?’ ती मनातच विचार करू लागली.

त्याच्या विचारात असताना तिने त्या ॲकेडेमीचे सर्व कॅमेरे तपासले. ज्यात तुषार दिसत होता. मालाला ट्रेनिंग देतानाचा तुषार तिला जरा वेगळा भासला. त्या रेकॉर्डिंगमध्ये आवाज सुधा रेकॉर्ड होत होता. त्यामुळे त्याच मालाला ट्रेनिंग देण हे किती मनापासून होत ते परीला सहज दिसून येत होत. मालाची कॅपेसिटी किती आहे? हे मालापेक्षा तुषारलाच जास्त माहिती असल्यासारखे वाटत होते. म्हणजे तो कामाच्या बाबतीत नक्कीच खूप गंभीर असलेला तिला जाणवला.

त्याच तिच्या भावंडांवर ओरडणं आता बरोबर वाटू लागल. कारण ते तर धिंगाणा घालत होते आणि त्याच कारण माहिती नसल्याने तो ओरडला होता. ते माहिती असत तर कदाचीत तो नसता ओरडला.

त्यांची रेकॉर्डिंग बघता बघता मधेच परीचे डोळे विस्फारले गेले. तिच्या मनाची धडधड वाढू लागली. ती आज पहिल्यांदाच अस काहीतरी बघत होती.

आता पूढे.

माला परत गेल्यावर त्या बाजूला तो एकटाच उभा असलेला तिला दिसला. त्याने देखील तिथल्या सामानावर थोडाफार सराव केला. त्याला चांगलाच घाम आल्याने त्याने त्याचा तो टी शर्ट काढून ठेवला. आतमध्ये घातलेली बनियन पण त्या टी शर्ट सोबत बाहेर आली होती.

आधीच तो अगदीच फिट होता. त्याची शरीरयष्टी चांगलीच मजबूत होती. त्याचे ते फुगून आलेले मसल्स, पोटाच्या भागावर स्पष्ट दिसणारे सहा ॲब्स. थोडक्यात त्याची ती उघडी बॉडी बघून परीची धडधड वाढली गेली होती. आताच तिच्या मनाने मालाच्या बाबतीत त्याच कौतुक केल होत.

ती इतकी बिथरली होती की ते बंद कराव हे देखील तिच्या डोक्यात येत नव्हते. ती फक्त तुषारला बघत राहिली होती. अस नव्हत की तिने तिच्या ह्या भावांची बॉडी पहिली नव्हती. पण तुषारमध्ये तिला वेगळच काहीतरी जाणवल होत. शेवटी तुषार त्यांचा कोच होता. तो चार पावलं त्याच्या विद्यार्थ्याच्या पुढे असणारच की.

काही वेळाने परीला काही सुचेनास झाल आणि तिने पटकन तो लॅपटॉप बंद केला. ‘उगाच इथे आली.’ तिने मनातच स्वतःला भांडून घेतलं. ‘जाऊदे किचनमध्ये जाते.’ हा विचार करून ती सरळ आरुषच्या खोलीतून बाहेर जायला निघाली.

कधीचा किचनमध्ये गेलेला आरुष अजून कसा आला नाही? हा विचार करत ती किचनकडे चालली असताना तिची नजर हॉलमध्ये बसलेल्या आरुषकडे गेली. तो त्याच्या वडिलांसोबत म्हणजेच राहुलसोबत बसला होता. मोहिते साहेबांनी इथे येण्याआधी त्यालाही फोन केला होता. म्हणून तो देखील इकडे निघून आला होता.

आपल्या वडिलांना आलेलं बघून किचनकडे जाणारा आरुष लगेच इथे जाऊन बसला होता. आतमध्ये काम करणाऱ्या आराध्याला मात्र त्याची काहीच खबर नव्हती.

परी देखील लगेच राहुलजवळ जात त्याच्या पाया पडत त्याला भेटली.

“हे अस पाया पण पडायचं असत.” विजय आरुषकडे बघून हसतच बोलला.

“काय करता काका,” आरुष पण नाटकी आवाजात बोलला. “ती एकच तर तुमच्या सगळ्यांची लाडकी आहे. मग आम्हाला पण तिलाच तुमच्यासमोर उभ कराव लागत.”

“आता आहे तर आहे,” राहुल “ती आमच सगळ ऐकते.”

“तेच ती फक्त तुमचंच ऐकते.” आरुष गूढ होऊन बोलला.

तस परीने तिच्या भुवया ताणल्या आणि सरळ उठून किचनकडे प्रस्थान केल. तिला अस अचानक जाताना बघून राहुल गोंधळून गेला आणि आरुषमुळे ती गेली म्हणून त्याला चिडून बघू लागला.

“ऐका आधी.” राहुलला आपल्याकडे चिडून बघताना पाहून आरुष लगेच कपाळावर आठ्या पाडून बोलू लागला आणि त्याने परत परीच्या डान्सबद्दलची कॅसेट वाजवून दाखवली. याची परीला आधीच कल्पना आल्याने ती तिथून उठून गेली होती.

“कधी बोलली नाही का ती?” राहुल पण आश्चर्याने विचारू लागला.

“आधी बोलली असती तर आता ती एक कोरिओग्राफर असती.” आरुष कपाळवर आठ्या पाडून बोलला.

“असही ती आता कोरिओग्राफरच आहे ना तुमची.” मोहिते साहेब हलकेच हसत बोलले.

तसे बाकी तिघे त्यांना गोंधळून बघू लागले.

“ह्या सगळ्यांना ती बरोबर तिच्या तालावर नाचवते ना म्हणून.” मोहिते साहेब खळखळून हसत बोलले.

तसे विजय आणि राहुल पण हसायला लागले. काही क्षण आरुष अजुनची कपाळावर आठ्या धरून राहीला आणि पुढच्या क्षणाला तो ही हसू लागला. कारण त्याचं बोलण तर खरं होत ना.

इकडे परी हळूच किचनमध्ये गेली. त्या दोघींची पाठ परीकडे होती. त्यामुळे परी आलेली त्यांना काही समजलच नाही. अस परीला वाटल. मग ती हळू हळू त्यांच्या मागे जाऊन उभी राहिली आणि त्या दोघींना भो करून ती घाबरवणारच होती. तोच सायलीचा आवाज आला.

“तुला घाबरायला आम्ही काही तुझी बंधू मंडळी नाही आहोत.” सायली मागे न बघतच बोलली.

“हे काय गं आई?” परी सायलीला पाठीमागून मिठी मारत बोलली. “कस समजत तुला आम्ही आलेलं? रावीच ठीक आहे. ती परफ्युममध्ये अंघोळच करते. पण मला कस काय ओळखलस?”

“ते तर आम्हाला पण समजल नाहीये.” आराध्या सुस्कारा सोडत बोलली.

“तरीच काका आले तरी मावशीला काहीच कळल नाही.” परी नाटकी आवाजात बोलली. “आणि एक माझी आई ती झोपेत जरी असली तरी तिला आम्ही आलेलं तिला समजत.”

काका आले हे ऐकून आराध्याचे डोळेच मोठे झाले. “हे आले?” एवढं बोलून ती हॉलकडे निघून गेली. तिच्यापाठी सायली पण गेली. आता तिथी परी एकटीच होती. मग काय? लागली की ती कामाला. ‘मला कामाला मदत करू देणार नव्हत्या काय?’ ती मनातच हसत काम आवरू लागली.

“काय घरी आले ते सांगितलं नाही मला?” आराध्या जराशी चिडून बोलली. “आज येणार होते ते पण नाही सांगितलं.”

“मला वाटल तुला माहित असेल.” राहुल एवढं बोलून सरळ फ्रेश व्हायला निघून गेला.

त्याला अस पटकन गेलेलं बघून आराध्या पण त्याच्या मागे मागे निघाली.

“लवकर ये बरं,” सायली आता खट्याळ झाली. “जेवण बनावयाच बाकी आहे अजून आणि मी एकटी नाही बनवणार.”

तस आराध्याने तिला मागे वळून डोळे वटारून पाहिलं.

“परी आहे किचनमध्ये.” सायली सूचक बोलली.

तस आराध्या पण आठवलं आणि पाचच मिनिटात आली अस बोलून परत जायला निघाली.

“एवढ्या दिवसांची कसर राहुल पाच मिनिटात काढेल काय?” विजय गंभीर व्हायचं नाटक करत बोलला.

विजयच बोलण पूर्ण होईपर्यंत आराध्याच्या बाजूला असलेल्या सोफ्यावरची उशी आराध्याने त्याला फेकून मारली होती. तसे बाकीचे खूपच हसायला लागले.

आता सायली परत किचनमध्ये गेली. तिथे पोहोचल्या पोहोचल्या तिने परीला सुनबाईबद्दल विचारलं. पण परीने तिची आराध्या मावशी आली की सांगेल अस सांगून तात्पुरती उत्तर द्यायचं टाळल.

पाचचं मिनिटात येते अस सांगून गेलेली आराध्या अर्धा तास झाला तरी परत यायचं नाव घेत नव्हती. तिकडे त्यांच्या खोलीत मात्र राहुलने आराध्याला पकडूनच ठेवलं होत. इतक्या दिवसांनतर ती भेटली होती. तो तिला अस सहज थोडीच सोडणार होता. शेवटी कसतरी त्याच्यापासून सुटका करून घेत ती किचनमध्ये परतली.

“तुझे पाच मिनिट किती तासाचे असतात गं?” सायली आराध्याकडे डोळे मिचकावत बोलली.

तस आराध्याने लटक्या रागात तिच्या पोटात स्वतःच्या हाताचा कोपरा मारला आणि परीकडे इशारा केला. तस सायलीच्या प्रश्नांवर तिला पण हसायला येत होत. पण मोठ्या माणसांच्या गोष्टीत का पडाव? नाही का? असा विचार करून ती तिचं काम करत राहिली.

आता त्या दोघींनी त्यांचा मोर्चा परीकडे वळवला. आराध्याने परीच्या हातात असलेलं काम काढून घेतलं. अस अचानक हातातून काढून घेतल्याने परी आराध्याला गोंधळून बघत राहिली.

“आता काय केल मी?” परी तिचे ओठ बाहेर काढत बोलली. “तुमच्या मस्करीत काही बोलले पण नाही. माझी माझी काम करत होती ना?”

परीला रोखून बघणाऱ्या सायली आणि आराध्या पुढे आल्या आणि परीच्या कपाळाला, गालाला, गळ्याला हात लावून बघू लागल्या.

“काय करत आहात?” परी गोंधळून गेली.

“ही आमची परी नाही.” आराध्या टेन्शनमध्ये येत बोलली.

“हा ना,” सायलीने पण आराध्याचीच री ओढली. “कोण आहेस तू? आमची भोळी भाबडी परी कुठे आहे?”

“आत्ता?” परीच्या कपाळावर आठ्या चढल्या. “तुम्हीच तर बोलले ना की खुलून वागत जा. आता तस वागल तर माझ कपाळ बडवत आहात.” परी तिच्या कपाळाला हात लावत बोलली.

“बडवत?” आराध्याच्या कपाळवर आता आठ्या आल्या.
“सिरीअसली?”

तशी परी खुदकन हसली. मग तिच्यापाठी बाकी दोघी पण हसायला लागल्या.

“ते जाउदे आता ते सुनबाई बद्दल काय सांगत होतीस ते सांग.” आराध्या अधिरतेने विचारू लागली.

“हेच की,” परीने एक मोठा पोज घेतला. “की त्याला एखादी मुलगी आवडली की सांगेन तुम्हाला.” परी नाटकी आवाजात बोलली.

परीच बोलण ऐकून आराध्या आणि सायली एकमेकींकडे तोंड पाडून बघू लागल्या. परीने तिच्या अधीरतेला सुरुंग जो लावला होता.

“सायु तुझ्या लेकीला सांगून ठेव नाहीतर बघ मग.” आराध्या तिचं तोंड वाकड करत बोलली.

इकडे परी खळखळून हसायला लागली. खरं बघायला गेल तर तिच्या नजरेसमोरून सीसीटीव्हीमधला तुषार काही केल्या जातच नव्हता. त्यामुळे तिचं मन काही स्थिर होतचं नव्हत. त्यासाठी ती तिचं मन वळवायला ह्या दोघींना छळत होती. जर त्याचा विचार तिच्या डोक्यातून जाणार नव्हता तर तिला मात्र कोणासोबत तरी बोलावं लागणार होत आणि ते तिला नको होत.

ती कोणाचा विचार करू लागली आहे याची भनक जरी कोणाला लागली तरी तिच्या घरच्यांचे आणि भावंडांचे मनसुबे खूप लांबपर्यंत पोहोचणार होते.

परी आणि आईं बाबांची घरी यायची वेळ झाली तरी ते अजून आले नाहीत. हा विचार करून सुजयचं डोक दुखायची वेळ आली होती. कारण ते दोघ तर थेट त्यांच्या ऑफिसवरून आले होते. तर परी ॲकेडेमीवरून घरी चालली असताना तिला मोहिते साहेबांचा फोन आला होता. मग ती पण घरी न जाता आराध्याच्या घरी आली होती.
अजून कोणीही घरी न आलेलं बघून सुजयने सायलीला फोन करायाला घेतला.

सायली तर आराध्यासोबत मस्त गप्पा मारत काम करत होती. जस तिच्या वाजणाऱ्या फोनकडे तिचं लक्ष गेल तसा तिचा हसणारा चेहरा लगेच गंभीर झाला.

“अरे यार,” सायली कपाळाला हात लावत बोलली. “इकडे यायच्या नादात सुजयला फोन करायचा राहून गेला.”

“मग आता?” आराध्या पण टेन्शनमध्ये आली. “बोलावून घे त्याला इकडेच.”

“प्रोब्लेम तो नाही,” सायली “प्रोब्लेम हा आहे की त्याला सांगितलं नाही. आता लगेच गाल फुगवून बसेल.”

“दे की त्यांच्या लाडक्या दी कडे.” आराध्या हलकेच हसत बोलली.

तसा सायलीचा चेहरा खुलला. ती लगेच परीजवळ जाऊन काही बोलणार तोच परीने बोलायला सुरवात केली. “एकाच अटीवर त्याच्याशी बोलेन.”

“म्हणजे तू आता आम्हाला ब्लॅकमेल करणार?” सायली बारीक तोंड करून बोलली.

“हो,” परी पण तितक्याच ठसक्यात बोलली. “त्याला एका स्पर्धेसाठी गोव्याला जायचं आहे. त्याची परवानगी पाहिजे.”

“हे त्याने मला सांगायला हवं ना,” सायली कपाळावर आठ्या आणत बोलली. “तुला विचारायला लावलं म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे.”

“तस काही नाही.” परी “मग डन समजू?” परी तिच्या भुवया उंचावत विचारू लागली.

“हिला नक्की हिच्या भावंडांची हवा लागली आहे,” आराध्या “ते तिला ब्लॅकमेल करतात आणि ही आपल्याला.”

“त्यापेक्षा मी स्वतः बोलते त्याच्याशी.” एवढं बोलून सायलीने आलेला फोन उचलला.

“कुठे आहेस मॉम?” सुजय काळजीने विचारू लागला. “डॅडची पण यायची वेळ होऊन गेली तरी कोणाचा पत्ता नाही.”

“एक काम कर ना,” सायली “इकडे आराध्या मावशीच्या घरी ये.”

“तिकडे?” सुजय गोंधळून गेला. नंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. “म्हणजे तुम्ही तिकडे गेले आणि मला सांगितल पण नाही.” आता तो थोडा चिडून बोलला.

“अरे हो,” सायली त्याला समजावत बोलली. “ते आरुचे बाबा घरी आले आहेत ना. तर त्यांना भेटायला आम्ही इकडे आलो.”

“एक मिनिट,” सुजय “आम्ही म्हणजे?”

“तुझे बाबा आणि दी पण तिथेच आहे.” सायली “तुझ्या दीने तुला सांगितलं नाही?” आता ती जरा खट्याळ झाली.

“तिचं सोड,” सुजय “तू का नाही सांगितलस?”

“हे बरं आहे,” सायली तिचं तोंड वाकड करत बोलली. “तिने सांगितल नाही ते चालत आणि माझ्याशी मात्र भांडत आहेस.”

“तिचा मेसेज आला होता की ती तिकडे चालली आहे.” सुजय “तुम्ही पण तिथे येणार आहत ते तिलाही माहित नव्हत. म्हणून फक्त तुला विचारत आहे. किमान दीला माझी आठवण तरी आली.”

“सॉरी बाबा,” सायलीने लगेच नमत घेतलं. कारण ती तर खरोखर विसरली होती आणि त्यांनी तिथे जाणार असल्याचे बाकी कोणाला सांगितल पण नव्हत. “आत इकडेच ये. जेवण करून मग घरी जाऊयात.”

इकडे यांच बोलण चालू असेपर्यंत तिकडे आराध्या परीला अजूनही लाडीगोडी लावत आरुषची कोणी मैत्रीण आहे का? ते विचारत होती. पण त्यालाही त्याच्या मनात भरेल अशी एकही मुलगी भेटत नसल्याने त्याची शोधमोहीम चालूच होती. जर कोणी भेटलीच नाही तर त्याचे आई वडील सांगतील त्या मुलीसोबत तो लग्न करणार होता. त्याचच काय? त्याच्या बाकी बंधू मंडळींचं तसच ठरलं होत.

आराध्याच्या काळजीने भरलेल्या आवाजाने परीने आरुषच्या मनातली ही गोष्ट पण आराध्याला सांगून दाखवली. तस आराध्याच्या मनाला शांती मिळाली.

काही वेळाने त्यांनी त्यांची जेवण आटपून घेतली आणि सायली, विजय, परी आणि सुजय त्यांच्या घरी निघून गेले. मोहिते साहेब आता दोन दिवस तरी तिथून निघणार नव्हते. कारण त्यांचे ते दोन खास मित्र त्यांना भेटायला येणार होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी परी कॉलेजवर जात असताना परीचा मोबाईल वाजला. तिने तिच्या स्मार्ट वॉचवर पाहिलं तर त्यावर राजच नाव झळकत होत. त्याने नेहमीप्रमाणे फोन केला असेल म्हणून पहिले तर तिने तो उचललाच नाही. पण नंतर त्याचे सतत फोन यायला लागले.

ते बघून परीने देखील तिची स्कुटी बाजूला लावत जरा गोंधळूनच तो फोन उचलला. कारण ती असा विनाकारण कधीच सतत फोन करत नव्हता. फोनवरच बोलण ऐकून परीने डोक्यालाच हात लावला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all