Login

अवनी एक प्रवास भाग ३९

तिकडे परी आणि राज मात्र खूपच टेन्शनमध्ये होते. दोघे त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त होते. पण त्याचं लक्ष मात्र सगळ माला आणि प्रसादकडे लागून राहील होत. राजच्या मनात तर नको नको ते विचार यायला लागले होते. त्याला भेटायला आता हॉस्पिटलमध्ये तर नाही जाव लागणार ना? ह्या विचारापर्यंत त्याचे विचार जाऊन पोहोचले होते. ते पण त्याला ठीक वाटत होत. पण जेव्हा घरी जायची वेळ येईल तेव्हा मात्र त्यांच्या घरात बसलेल्या आयां त्याला किती आणि कश्या मारतील? या विचाराने त्याला घाम फुटला होता.
मागील भागात.

इकडे यांच बोलण चालू असेपर्यंत तिकडे आराध्या परीला अजूनही लाडीगोडी लावत आरुषची कोणी मैत्रीण आहे का? ते विचारत होती. पण त्यालाही त्याच्या मनात भरेल अशी एकही मुलगी भेटत नसल्याने त्याची शोधमोहीम चालूच होती. जर कोणी भेटलीच नाही तर त्याचे आई वडील सांगतील त्या मुलीसोबत तो लग्न करणार होता. त्याचच काय? त्याच्या बाकी बंधू मंडळींचं तसच ठरलं होत.

आराध्याच्या काळजीने भरलेल्या आवाजाने परीने आरुषच्या मनातली ही गोष्ट पण आराध्याला सांगून दाखवली. तस आराध्याच्या मनाला शांती मिळाली.

काही वेळाने त्यांनी त्यांची जेवण आटपून घेतली आणि सायली, विजय, परी आणि सुजय त्यांच्या घरी निघून गेले. मोहिते साहेब आता दोन दिवस तरी तिथून निघणार नव्हते. कारण त्यांचे ते दोन खास मित्र त्यांना भेटायला येणार होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी परी कॉलेजवर जात असताना परीचा मोबाईल वाजला. तिने तिच्या स्मार्ट वॉचवर पाहिलं तर त्यावर राजच नाव झळकत होत. त्याने नेहमीप्रमाणे फोन केला असेल म्हणून पहिले तर तिने तो उचललाच नाही. पण नंतर त्याचे सतत फोन यायला लागले.

ते बघून परीने देखील तिची स्कुटी बाजूला लावत जरा गोंधळूनच तो फोन उचलला. कारण ती असा विनाकारण कधीच सतत फोन करत नव्हता. फोनवरच बोलण ऐकून परीने डोक्यालाच हात लावला.

आता पूढे.

परीने तशीच तिची स्कुटी मागे फिरवली आणि ती मालाच्या घराकडे जाऊ लागली.

कालपासून मालाचे शब्द प्रसादच्या कानात घुमत होते. ‘दुसरा कोणीतरी घरी येईल.’ ह्या शब्दांनी त्याच्या मनात धुमाकूळ घातला होता. मग त्याने लागलीच त्याच्या आईला मालाचे आई वडील कधी घरी येणार आहेत हे विचारलं. पण त्यांना यायला अजून तरी वेळ होता.

मालाच्या घरी मालाचे आज्जी आणि आजोबा घरात असल्याचे त्याला समजले. मग काय? निघाली की त्याची स्वारी सकाळी सकाळी मालाच्या घरी. त्याला इतकी घरी झाली होती की त्याने घरी कोणाला काहीही सांगितलंही नव्हतं आणि तसाच तो जायला निघाला होता.

घरच्यांना वाटल की तो कामावर जात आहे. पण राजला त्याच्या कामावरची बॅग तर घरातच दिसली. म्हणून त्याने प्रसादला फोन लावला. तेव्हा भावनेच्या भरात त्याने राजला मालाच्या घरी जात असल्याचे सांगितले. तसा त्याने त्याच्या भावाला थांबवायचा खूप प्रयत्न केला. पण प्रसाद आधीच निघाला होता आणी राज फक्त फोनवर बोलत होता. त्यामुळे प्रसादला अडवायला त्याला जमतच नव्हत. मग त्याने लगेच परीला फोन लावला आणि प्रसादचा कारनामा तिला सांगून दिला.

इकडे प्रसाद मालाच्या घराजवळ येऊन थांबला. काहीसा विचार करत त्याने मालाला फोन लावला.

“ये घरी.” मालाने त्याचा फोन उचलल्या उचलल्या त्याला सांगितलं. कारण तिने देखील आताच अंघोळ केली होती आणि ती तिच्या खोलीच्या खिडकीत येऊन तिचे केस सुकवत होती. तिने त्याला आलेलं तिच्या खिडकीतून पाहिलं आणि तिच्या कालच्या बोलण्याचा इतक्या लवकर परिणाम होईल याची तिला कल्पना पण नव्हती.

त्याला आलेलं बघून तिच्या चेहऱ्यावर सुंदर अस स्मित आल.
‘वेडाच आहे,’ ती मनातच बोलू लागली. ‘काल बोलली म्हणजे आज लगेच कोणी येईल का माझा हात मागायला?’ तस तिला अजूनच हसू आल. तेवढयातच तिचा मोबाईल वाजला होता आणि तिने त्याला सरळ घरी बोलावलं होत.

आता मालानेच बोलावलं म्हणून तो देखील थाटात तिच्या घरी जाऊ लागला.

इकडे मालाने पण परीला फोन लावायला घेतला. जो स्कुटी चालवता चालवता पहिल्यांदाच परीने तो फोन उचलला. नाहीतर ती नेहमीच तिची स्कुटी एका बाजूला थांबवूनच फोन उचलत असायची.

“दी,” माला सुस्कारा दोस्त बोलली. “तो घरीच आला आहे.”

“हम्म आला होता फोन राजचा,” परी “मी पण पोहोचत आहे तिथे.”

“आता तू सोबत असली तर तो मला त्याचा प्रश्न कसा विचारणार?” माला भाबडेपणाने बोलून गेली.

तशी परीने तिची स्कुटी थांबवली. “काय बोलली तू?”

इकडे मालाने तिची जीभ चावली. “अम्म ते घरी कोणीच नाहीये. तर त्याला कधीचा तो प्रश्न विचारायचा आहे. आज विचारू देना त्याला. नाहीतर मी विचार करून वेडी होईल.”

“ओहो,” परी आता चिडवण्याचा सुरात आली. “तर मॅडमला प्रायव्हसी पाहिजे आहे तर आणि आज्जी आजोबा कुठे गेले आहेत?”

“ते नाहीयेत घरी,” माला जरा लाजतच बोलली. “आजच सकाळी त्यांच्या गावी गेले आहेत.”

“ठीक आहे,” परी “त्याला विचारू दे त्याचा प्रश्न पण मग तू लगेच तुझी वेट लिफ्टिंग त्याला दाखवू नको म्हणजे झाल.”

तशी माला गोंधळून गेली. “आता मी त्याला का उचलू?”

“काही नाही जाऊदे.” परीने नकारार्थी मान हलवली. “काय ते नंतर फोन कर.”

“ठीक आहे.” मालाने बोलून फोन ठेवून दिला.

काही क्षणातच प्रसाद मालाच्या घराच्या दरवाजाजवळ येऊन पोहोचला आणि तिच्या आज्जी आजोबांना कस विचारायचं याची उजळणी करू लागला.

इथून इथे यायला प्रसादला इतका का वेळ लागत आहे? हा विचार करून मालाने घराच्या दारात येऊन उभी राहिली. तरीही काही वेळ गेला तरी दाराची बेल वाजली नाही म्हणून ती अजूनच विचारात पडली.

‘ह्याचा विचारण्याचा विचार बदलला की काय?’ मालाने मनातच बडबड करत दार उघडले. तिने समोर पाहिलं तर तिला प्रसाद दिसला. जो डोळे बंद करून हळूच काहीतरी बडबड करत होता.

‘मी काय चुडेल आहे जो दारात उभ राहून हा हनुमान चालीसा बोलत आहे?’ मालाच्या मनात पहिला हा विचार आला. “काय दारात उभं राहून घराचा पत्ता पाठ करत आहेस का?” त्याने अजूनही डोळे उघडले नाही म्हणून मालाने त्याला मोठ्या आवाजात विचारलं.

तसा विचारात असेलला प्रसाद खाडकन भानावर आला. त्याने समोर मालाला पाहिलं जी घरातल्या कपड्यांवर होती. त्याच तोंड परत उघड पडलं. आजवर त्याने तिला फक्त बांधलेल्या केसात, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टवर पाहिलं होत. पण आज तिने तिचे ते घेरदार केस मोकळे सोडले होते. अंगावर चढवलेला ढगळ शर्ट आणि खाली असेलली गुढघ्यापर्यंतची पॅन्ट. यावर ती त्याला खूपच सुंदर दिसू लागली. तिचे हे नवनवे रूपं त्याला वेडं करत होते.

“अरे यार.” मालाने त्याला परत असच टक लावून बघताना पाहून त्याला तिच्या हाताने ओढूनच घरात घेतलं. “आता हवं तेवढ बघ.” माला भावनेच्या भरात बोलून गेली.

“काय बघू?” तिच्यात हरवलेला प्रसादही त्याच्याच तंद्रीत बोलून गेला.

तसा मालाने एक दीर्घ श्वास घेतला. “तू इथे काय बघायला आहेस?”

तसा प्रसाद त्याच्या विचाराच्या बाहेर आला. “त.. ते आज्जी आजोबा कुठे आहेत?” त्याने थेट त्याच्या कामाच विचारलं.

“ते नाहीयेत घरी,” माला सहज बोलली. “पुढे बोल.”

“नाहीयेत?” प्रसाद गोंधळाला. “कुठे गेले आणि कधी येतील?”

“तू त्यांना भेटायाला आला आहे का?” माला वैतागून बोलली.

“तू घरी असतानाच त्यांना भेटायचं होत.” प्रसाद स्वतःला शांत करत बोलला.

“का?” माला “आधी मला विचारलं का? जे तू थेट त्यांना भेटायला आलास.”

“मग ते कोणी दुसरा बघणार नाहीत ना.” प्रसाद बारीक तोंड करून बोलला.

आता मात्र मालाला खूपच हसायला आल. “अरे मग तुझ्या मनात काय आहे ते विचार लवकर आणि साध विचारण्याची साधी हिम्मत पण नसेल तर...” तिला पुढे काही बोलताच आल नाही.

कारण तिचं ते बोलन ऐकून प्रसादने तिच्या हाताला धरून त्याच्याकडे तिला ओढलं होत. ती तशीच प्रसादकडे ओढली जाऊन त्याच्या छातीवर टेकली. प्रसादकडून अश्या प्रतिक्रियेची कल्पना नसलेली ती आता त्याला बावरून बघू लागली. तिच्या पोटात खोल खड्डा पडला. तिच्या हृदयाची धडधड खूपच वाढली गेली.

मुलांपासून नेहमी लांब असणारी ती आता प्रसादच्या मिठीत होती आणि त्याचा तिला राग आला नव्हता. दोघांमध्ये फक्त दोन बोटांच अंतर होत. तिचा अर्धा चेहरा तिच्या घेरदार केसांनी लपवला होता. तिची तिचं केस त्याने त्याच्या बोटाने हलकेच मागे सारली. तसा तिचा पूर्ण चेहरा त्याच्या नजरेस आला. ती पण त्याच्यात हरवली होती. तिचा चेहरा बघता बघता त्याची नजर तिच्या ओठांवर आली. तिला लिपस्टिक वैगरे लावायची काही हौस नव्हती. ती फक्त लीप बाम लावत असायची. त्यामुळे तिचे ओठांचा नैसर्गिक रंग खुलून दिसत होता.

त्याची नजर आपल्या ओठांवर गेलेली बघून तिने तिची मान हलकेच तिरकी करून जरा पुढे आणली. ते बघून त्यानेही तिचा चेहरा त्याच्या हातात घेतला. तस मालाने तिचे डोळे बंद केले आणि त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करू लागली.

काही क्षणातच त्याचे ते नरम ओठ तिला तिच्या त्वचेवर जाणवले. तशी ती गोंधळून गेली. कारण त्याने तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले होते. तसे तिने लागलीच तिचे डोळे उघडले आणि त्याला बघत राहिली.

तिच्या नजरेतला तो गोंधळ त्याला समजून गेला. “जेव्हा हक्काने तू मला परवानगी देशील ना तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही.” त्याने तिच्या गालावर प्रेमाने थोपटले आणि त्याचे हात खाली घेतले.

त्याच बोलण ऐकून माला दीर्घ श्वास घेत तिच्या त्या वाढलेल्या श्वासांवर नियंत्रण मिळवू लागली. तिचे डोळे अजूनही त्याच्यावरचं होते. त्याने तिच्या गालावर केलेल्या स्पर्शात तिला फक्त एक प्रकारचा आदर जाणवला. तिने तशीच त्याला घट्ट मिठी मारली. तिने मिठी मारून देखील त्याचे हात अजूनही खालीच असलेले बघून तिनेच त्याचे हात उचलून तिच्या कमरेवर ठेवले.

तिच्या ह्या कृतीने प्रसादच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं. “तू अजून मला पाणी पण विचारलं नाहीयेस.” बराच वेळ ती त्याला सोडतच नसलेली बघून प्रसादने तिला विचारलं.

आता कुठे ती त्याच्या मिठीतून बाहेर आली. “तू मला अजूनही प्रपोज केल नाहीयेस.” माला त्याला खट्याळ नजरेने बघत किचनकडे चालली गेली.

तसा प्रसाद गालातच हसला. ‘ते पण करेल गं. आता तू मला काही उचलून फेकणार नाहीस याची मला खात्री झाली.’ तो मनातच बोलू लागला. ‘एकदम खास पद्धतीने तुला विचारेल.’

तोपर्यंत मालाने त्याच्यासाठी पाणी आणल. “चहा घेशील की कॉफी?”

“आता नको,” प्रसाद “मी निघतो. तू एकटीच आहेस हे माहिती असत तर असा मी आलोच नसतो.”

“मला काही प्रोब्लेम नाहीये तर तुला काय प्रोब्लेम आहे?” माला

“मला नाही बरोबर वाटत.” प्रसाद मंद स्मित करत बोलला. “आता थेट मागणी घालायलाच येईल.”

“त्याआधी तू मला प्रपोज केलस तरच तुला मी दारात उभ करेल.” माला तोऱ्यात बोलली.

यावर तो मंद स्मित करून दाराजवळ गेला. “त्याची वेळच येणार नाही.” एवढ बोलून तो तिथून चालला गेला.

माला त्याच्याकडे बघतच राहिली. जरा तो नजरेआड गेला तशी ती आहे तिथेच उड्या मारायला लागली. तिने त्याच आनंदात परीला फोन लावला. नंतर तिला आठवलं की ती तिच्या दीला सांगणार तरी काय होती? मग तिने लागलीच तो फोन कट केला.

तिकडे परी आणि राज मात्र खूपच टेन्शनमध्ये होते. दोघे त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त होते. पण त्याचं लक्ष मात्र सगळ माला आणि प्रसादकडे लागून राहील होत.

राजच्या मनात तर नको नको ते विचार यायला लागले होते. त्याला भेटायला आता हॉस्पिटलमध्ये तर नाही जाव लागणार ना? ह्या विचारापर्यंत त्याचे विचार जाऊन पोहोचले होते. ते पण त्याला ठीक वाटत होत. पण जेव्हा घरी जायची वेळ येईल तेव्हा मात्र त्यांच्या घरात बसलेल्या आयां त्याला किती आणि कश्या मारतील? या विचाराने त्याला घाम फुटला होता.

इकडे परी स्टाफरूमकडे चालली असताना तिला मालाचा मिसकॉल आलेला दिसला. तसा तिने परत मालाला फोन लावायला घेतला.

तिकडे आनंदात बागडणारी माला आज तयार व्हायला खूपच वेळ घेत होती. आज कधी नव्हते ते ती आरश्यासमोर उभी राहून तिच्यावर कोणते कपडे छान दिसतील हे बघू लागली. मोबाईलच्या आलेल्या आवाजाने ती जरा घाबरलीच. नंतर मोबाईलवर परीच नाव वाचून तिने तो नेहमीप्रमाणे लगेच उचलला आणि तिने परीच्या प्रश्नावर लागलीच जीभ चावली.

“काय झाल?” परी टेन्शनमध्ये विचारू लागली. “तो नीट गेला ना? काय बोलण झाल?”

आता मात्र मालाला टेन्शन आल की तिच्या दीला काय उत्तर द्याव. जे सांगायचं होत ते झालच नव्हत आणि जे झाल होत ते ती सांगू शकत नव्हती. ती पुरती फसली गेली होती.

“माला.” तिचा फक्त वाढलेला श्वास ऐकायला आला म्हणून परीने प्रेमाने विचारले. “प्रपोज केल वाटत.”

“अंह.” माला पुरती लाजून बोलली.

तशी परी इकडे गोंधळली. “मग तुला लाजायला काय झाल? तुझी वेट लिफ्टिंग तर नाही दाखवलीस ना?”

आता मात्र परीच्या बोलण्याचा तिला अर्थ समजला. “तुझ काही पण असत दी. आज घरात कोणी नव्हत म्हणून तो परत गेला.” एवढं बोलून तिने पटकन फोन ठेवून दिला.

तशी परी विचारात पडली. मग तिला राज आठवला आणि तिने सरळ त्याला फोन लावला. पण त्याचा फोन देखील व्यस्त लागत होता. आता नक्कीच प्रसादचा त्याला फोन असल्याच तिला समजून गेल होत.

आता तिला वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नव्हता.
माला तिचं आवरून लागलीच त्यांच्या ॲकेडेमीवर पोहोचली. आज तयार होऊन आलेली माला बघून तिचे चारही बंधू चक्कर येऊन पडायला आले होते. नेहमी ट्रॅक पॅन्टवर येणारी माला आज मात्र मस्त पैकी जीन्सची पॅन्ट घालून आली होती. नेहमी बांधलेले तिचे केस आज मोकळे खेळत होते आणि सर्वात झटका देणारी गोष्ट म्हणजे तिने आज चक्क परफ्युम मारला होता.

ॲकेडेमीमध्ये असणाऱ्या एसीमुळे त्याचा सुगंध लागलीच सगळीकडे पसरला गेला.

“ही वेडी झाली.” आदेश

“तिच्या डोक्यावर परिणाम झाला वाटतं.” जय

“आज पाण्याने नाही परफ्युमने अंघोळ केली वाटत.” सुजय

“आज तर दी पण नाहीये.” आरुष “आणि तिला विचारायचं म्हणजे..” तो बोलता बोलता शांत झाला.

ह्यांच्या ह्या गप्पा चालू असेपर्यंत माला तिच्या नेहमीच्या अवतारात आली. तेव्हा कुठे ह्या चौघांच्या जीवात जीव आला होता.

काही वेळाने तुषार पण तिथे येऊन पोहोचला आणि त्याने मालाची ट्रेनिंग चालू केली. आता माला आणि परफ्युम याचा लांब लांब पर्यंत संबंध नसल्याने तुषार सारखा सारखा इकडे तिकडे बघत होता. नेमका परफ्युमचा वास कुठून येत आहे तेच त्याला समजत नव्हत.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all