Login

अवनी एक प्रवास भाग ४०

परीला अस शांत झालेलं बघून तुषारच्या मनात उकळ्या फुटायला लागल्या. त्याने त्याच्या मित्रांवर नजर टाकली. त्यांनी इशारातच ती माणस पळून गेल्याचे त्याला सांगितले. आता जरी ती माणस पळाली होती. तरी परीच्या जीवाचा धोका संपला नव्हता. शेवटी तिला किडनप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याने या विषयावर आरुषसोबत बोलायचे ठरवले. कारण त्यांच्या ग्रुपमध्ये तोच एक होता जो विचारी वाटत होता. नाहीतर बाकीचे म्हणजे नुसताच थयथयाट.
मागील भागात.

माला तिचं आवरून लागलीच त्यांच्या ॲकेडेमीवर पोहोचली. आज तयार होऊन आलेली माला बघून तिचे चारही बंधू चक्कर येऊन पडायला आले होते. नेहमी ट्रॅक पॅन्टवर येणारी माला आज मात्र मस्त पैकी जीन्सची पॅन्ट घालून आली होती. नेहमी बांधलेले तिचे केस आज मोकळे खेळत होते आणि सर्वात झटका देणारी गोष्ट म्हणजे तिने आज चक्क परफ्युम मारला होता.

ॲकेडेमीमध्ये असणाऱ्या एसीमुळे त्याचा सुगंध लागलीच सगळीकडे पसरला गेला.

“ही वेडी झाली.” आदेश

“तिच्या डोक्यावर परिणाम झाला वाटतं.” जय

“आज पाण्याने नाही परफ्युमने अंघोळ केली वाटत.” सुजय

“आज तर दी पण नाहीये.” आरुष “आणि तिला विचारायचं म्हणजे..” तो बोलता बोलता शांत झाला.

ह्यांच्या ह्या गप्पा चालू असेपर्यंत माला तिच्या नेहमीच्या अवतारात आली. तेव्हा कुठे ह्या चौघांच्या जीवात जीव आला होता.

काही वेळाने तुषार पण तिथे येऊन पोहोचला आणि त्याने मालाची ट्रेनिंग चालू केली. आता माला आणि परफ्युम याचा लांब लांब पर्यंत संबंध नसल्याने तुषार सारखा सारखा इकडे तिकडे बघत होता. नेमका परफ्युमचा वास कुठून येत आहे तेच त्याला समजत नव्हत.

आता पूढे.

मालाने वजन उचललं होत आणि तुषार तिला सपोर्ट करत होता. पण परफ्युमच्या वासाने त्याच लक्ष परत विचलित झाल आणि त्याचा सपोर्ट कमी पडला. तसा मालाच्या हाताला हिसका बसून ते वजन दणकन खाली आपटलं.

“काय चालू आहे सर तुमच?” मालाने जरा चिडूनच विचारलं.

“कोणी परफ्युम मारला आहे?” तुषारचा आवाज त्या ॲकेडमीमध्ये गुंजला.

तशी माला फ्रेश व्हायच्या निमित्ताने तिथून सटकली. जशी ती तिथून लांब गेली तसा परफ्युमचा वास कमी झालेला तुषारला जाणवला. मग तो देखील आ वासून जाणाऱ्या मालाला बघत राहीला. नंतर त्याने बाकी चारही जणांवर नजर टाकली. तस त्यांनी देखील त्यांचे खांदे उडविले.

काही वेळाने माला परत तिच्या सरावाचे ठिकाणी आली आणि परफ्युमचा वास परत वाढला.

“माला तू कधीपासून परफ्युम वापरु लागली?” तुषारने तिला कडक आवाजात विचारलं. “अस स्पर्धेच्या कालावधीत तुझ सगळ लक्ष फक्त स्पर्धेवर आणि सरावावर पाहिजे.”

“माझ लक्ष होत,” माला जरा चिडून बोलली. कारण तिच्या हाताला बराच जोरात हिसका बसला होता. “सपोर्ट तुम्ही लूज केलात आणि माझ्या हाताला लागल.”

मग तुषारला त्याच्या चुकीची जाणीव झाली. कारण ती तर मनापासून सराव करत होती. ते तर त्याचच लक्ष विचलित झाल होत.

“सॉरी जास्त लागल का?” तुषारने तिचा हात त्याच्या हातात घेत विचारलं.

ह्या वेळेस तुषारने तिचा हात हातात घेतल्या घेतल्या माला जरा चाचरली. तस तुषार तिला अजूनच चमकून बघू लागला आणि त्याने लगेच तिचा हात सोडला.

“त.. ते .. सॉरी.” माला देखील तुषारच्या मनात काय आल असेल याचा अंदाज आला. पण तिलाच काही सुचत नव्हत तर ती त्याला तरी काय सांगणार होती? “म.. मी जाते.” कशीतरी स्वतःला सावरत ती सरळ तिच्या बॅग ठेवलेल्या ठिकाणी गेली.

तुषारने परत बाकी चौघांकडे पाहिलं तर ते देखील मालालाच डोळे विस्फारून बघत होते. यावरून मालाच नक्कीच काहीतरी बिनसलं असल्याच त्याला जाणावल.

माला तिथून बाहेर पडायला आणि तेजश्री तिच्या डान्सच्या ग्रुप सोबत यायला एकाच वेळ झाली. आता परी पण येईल या खुशीत तुषारच्या मनातून मालाचे विचार कुठे गुप्त झाले? हे त्यालाही समजल नाही.
पण त्या ग्रुपला येऊन दहा मिनिट झाली तरी परीचा काही पत्ता नव्हता. इकडे तुषार मात्र परीचा डान्स बघायला खूपच उत्सुक होत होता. पण परी काही आली नव्हती.

शेवटी त्याच्या बहिणीला त्याची दया आली आणि पाणी पिण्याच्या निमित्ताने ती तुषारजवळ गेली.

“आज आमच्या मॅम येणार नाहीयेत.” तेजश्री तिचे डोळे मिचाकावत बोलली.

तस तुषारच तोंडच पडल. पण चेहऱ्यावर तस न दाखवता त्याने तिलाच प्रश्न केला. “मग मी काय करू? तू तुझी प्रॅक्टिस कर. तुझ झाल की आपण निघू.” एवढ बोलून तो त्या ॲकेडेमीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसला.

त्याची ती झालेली अवस्था बघून तेजश्रीची शंका आणि वास्तवात बदलत चालली होती. मग ती परत तिच्या प्रक्टिसच्या ठिकाणी गेली.
काही वेळाने तुषार पण ऑफिसमधून बाहेर आला आणि जरा वेळ बाकी चौघे जणांची काम पहिली त्यांना काही योग्य त्या सूचना केल्या आणि त्याला कंटाळा आला. मग त्याला तिथे थांबावस वाटत नव्हत. शेवटी ती तिथून जायला लागला.

तेजश्री तर कधीची याचीच वाट बघत होती. पण ती बाहेर यायच्या आधीच तुषार तिथून पटकन बाहेर पडला.

‘घरी तर येशीलच ना.’ तेजश्री जाणाऱ्या तुषारला बघून मनातच बोलली.

इकडे बाहेर पडलेला तुषार पटकन त्याची बाईक काढून घराच्या रस्त्याला लागला. आता त्याच मन खूपच नाराज झाल होत. त्यामुळेच तो आज त्याची बाईक खूपच हळू हळू चालवत होता. मग त्याला चहाची तलफ आली आणि त्याने चहाची टपरी बघून एका बाजूला त्याची बाईक थांबवली.

चहा पीत असताना त्याला त्याचे काही मित्र भेटले जे त्याच्यासोबत पूर्वी जिमला होते. काही काळ त्यांनी सोबत काम देखील केल होत आणि स्पर्धेत भाग देखील घेतला होता. आता जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला लागला असल्याने त्यांची क्वचितच भेट होत होती. आज मात्र त्याला ते तिघे जण भेटले होते.

मग काय अजून एक एक कप चहा रिचवला गेला. पण त्यांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. जवळपास तासभर गप्पा मारून ते एकमेकांचा निरोप घेऊ लागले. त्या तिघांच्या गाड्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या होत्या. त्यामुळे ते तिघे त्या बाजूला जाऊ लागले.

इकडे तुषार पण त्याच्या बाईककडे चालायला लागला. तो त्याच्या बाईककडे पोहोचतच होता की त्याला ‘ओये दगड’ असा जोरात आवाज आला. आता तो आवाज त्याला जरा ओळखीचा वाटल्याने त्याने आवाज आल्याच्या दिशेने पाहिलं तर त्याला रस्त्याच्या त्या बाजूने परी धावत येताना दिसली.

तिला अस घामाघूम होऊन धावत येताना बघून तुषार जरा गोंधळाला गेला. त्याला तिच्या कपाळाच्या बाजूला थोडफार रक्त देखील दिसलं. त्यात ती खूपच घाबरलेली जाणवली.

हे सगळ बघून तुषारच्या मनातही खूपच खळबळ उडाली. तो देखील तिच्याकडे चालू लागला. तस त्याला जाणवलं की तिच्या मागे काही माणस पण धावत होती. ती त्यांच्यापसून लांब पळते म्हणजे त्यांच्यापासून तिला धोका असल्याच त्याला जाणवलं.

परीच्या आवाजाने तुषारच्या मित्राचं लक्ष पण परिवार गेल होत. एक मुलगी तुषारकडे धावत आहे बघून त्यांना देखील जरा आश्चर्यच वाटल. त्यांनी जस तुषारला पाहिलं तस तुषारने तिच्या मागे धावणाऱ्या माणसांकडे बघून इशारा केला. तसे ते देखील पुढे सरसावले आणि त्या धावणाऱ्या माणसांच्या सामोरे जाऊन उभे राहिले.

आपल्या पुढे धिप्पाड अशी मुल उभी राहिलेली बघून परीच्या मागे धावणारी ती माणस जरा भांबावून गेली.

इकडे परी धावत येऊन तिने थेट तुषारला जाऊन मिठी मारली. तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. ती खूपच थरथरत होती.

परीला अश्या अवस्थेत बघून तुषार खूपच गोंधळून गेला होता. त्याने त्याच्या मित्रांकडे पाहिलं तर परीच्या मागे धावणारी माणस पळून गेली होती. पण त्याची ती मित्रमंडळी अजूनही तिथेच उभी होती. त्यांनी तुषारला नजरेनेच आश्वस्त केल.

परी त्याच्या मिठी जवळपास पाच मिनिटे होती. पण तुषारचे हात खालीच होते. ती घाबरली असल्याने त्याच्या मिठीत होती हे त्याला माहिती होत. म्हणून त्याने तिला स्पर्श करायचे टाळले.

“काय उंची मोजत आहेस?” तिचा काहीही आवाज न आल्याने तुषारने तिला विचारले.

तशी घाबरून त्याच्या मिठीत असलेल्या तिने पहिले हळूच मागे वळून पाहिलं. तिला तिच्या पाठी धावणारी माणस काही दिसली नाहीत. तस तिचं मन स्थिरावलं. मग तिला जाणवलं की ती अजूनही त्याच्याच मिठीत होती.

मन शांत झाल्यावर ती लगेच त्याच्या मिठीतून बाहेर आली. “काय होत हे?” परी त्यालाच चिडून विचारू लागली.

“ते तू मला सांग.” परीच चिडून विचारण बघून तो ही तिला चिडूनच विचारू लागला. “अस रस्त्यात कोणालाही मिठी मारतेस तू?”

“तोंड सांभाळून बोल.” परी खूपच रागाला येत बोलली. “ते तर ती माणस माझ्या मागे लागली होती. मला पकडण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही दिसलात म्हणून तुमच्या जवळ आली.”

“कोणती माणस?” तुषार आता खरचं गंभीर झाला. कारण परी बोलत असताना त्यासोबत फिरणाऱ्या तिच्या हातांवर त्याच लक्ष गेल. त्यावर देखील जखमा होत्या. कपाळावर तर रक्ताचा एक ओघळ आला होता. “बरचं लागल आहे तुला. चल डॉक्टरकडे जाऊ.”

तशी परी त्याला अजून आठ्या पाडून बघू लागली.

“अशी नको बघूस नाहीतर तुझी भावंड बोलावून घेईल.” तुषार कडक आवाजात बोलला.

तशी परी गप्प झाली. कारण तिची भावंड आली म्हणजे त्यांच टेन्शन वाढणार होत. वरून त्या चौघांपैकी कोणी ना कोणी तिच्यासोबत बॉडीगार्ड सारखं राहील असत.

परीला अस शांत झालेलं बघून तुषारच्या मनात उकळ्या फुटायला लागल्या. त्याने त्याच्या मित्रांवर नजर टाकली. त्यांनी इशारातच ती माणस पळून गेल्याचे त्याला सांगितले. आता जरी ती माणस पळाली होती. तरी परीच्या जीवाचा धोका संपला नव्हता. शेवटी तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याने या विषयावर आरुषसोबत बोलायचे ठरवले. कारण त्यांच्या ग्रुपमध्ये तोच एक होता जो विचारी वाटत होता. नाहीतर बाकीचे म्हणजे नुसताच थयथयाट.

“आणि तुझी स्कुटी?” तुषारला जस आठवलं तस त्याने तिला विचारलं.

“त्यांनी पाडली माझी स्कुटी,” परी तिच्या ड्रेसची बाही वर करून बोलली.

हाताच्या कोपऱ्यापासून बरचं खरचटलेलं दिसत होत.
याचा अर्थ तिला चालू स्कुटीवरून पाडण्यात आल होत. तिच्या त्या नाजूक हातावर एवढ्या जखमा बघून त्याच्या मनाला खूपच त्रास झाला. आता त्याला त्या माणसांचा खूप राग येऊ लागला.

“चल डॉक्टरकडे जाउयात.” तुषार शांतपणे बोलला.

“एका अटीवर.” परी तिचे गाल फुगवून बोलली.

तस तुषारला तिच्याकडे बघून जरा हसायलाच आल. “कोणती अट?”

“ते ह्यातलं कोणाला काही सांगू नका.” परी बारीक आवाजात बोलली.

“मग माझ सगळ बोलण तुला ऐकाव लागेल.” तुषार तोऱ्यात बोलला.

“म्हणजे?” परी चिडीला आली. “काय म्हणायचं काय आहे तुम्हाला?” ती लगेच भांडणाच्या सुरात आली.

“हे अस सारख सारख मला भांडायला यायचं नाही.” तुषार कपाळावर आठ्या आणत बोलला.

त्याच हे बोलण ऐकून तिच्या जीवात जीव आला. नाहीतर ह्या दोन क्षणात तिच्या मनात नाही नाही ते विचार येऊन गेले.

“आणि दुसर,” तुषार “मला तुझा डान्स बघायचा आहे.”

“अं?” परी गोंधळून गेली. “डान्स?”

“हो,” तुषार “खूप छान डान्स करतेस तू.”

“ही वेळ आहे का या गोष्टींची?” परी कपाळवर आठ्या आणत बोलली.

“ठीक आहे,” तुषार बाईकवर बसत बोलला. “बाकीच्या अटी नंतर सांगेल.”

तशी परी त्याच्याकडे रोखून बघू लागली.

“बस लवकर.” तुषार त्याच हेल्मेट घालत बोलला. “एकतर तुझी स्कुटी पण आता शोधावी लागेल. तिच्यासोबत तू घरी गेली नाहीस ना तर तुझ सगळच भांड फुटेल.”

आता परीला जाणवलं आणि ती पटकन त्याच्या बाईकवर बसली. “आधी स्कुटी शोधूयात?” परी त्याला विनंती करत बोलली.

“आधी तुझ्यावर उपचारांची गरज आहे.” तुषार त्याची बाईक सुरु करत बोलला. “तुझी स्कुटी माझ्या मित्रांना शोधायला लावली आहे.”

“कधी?” परीने गोंधळून विचारलं.

यावर तुषार काहीच बोलला नाही. पण परी मात्र खूपच टेन्शनमध्ये आली होती. पुढच्या काही वेळातच ते एका डॉक्टरकडे पोहोचले. तिथे तिच्यावर उपचार केले. ती इंजेक्शनला पण घाबरते ते बघून त्याला अजूनच हसू आल. तशी परी त्याला गाल फुगवून बघू लागली. आधीच ती दिसायला क्युट होती. त्यात तिचं अस गाल फुगवण तिला अजूनच क्युट बनवत होत.

तिथून ते दोघे निघतच होते तेवढ्यातच परीचा मोबाईल वाजला. तिने पाहिलं तर सुजय तिला फोन करत होता. आता त्याला काय सांगायचं? हा विचार करून ती तिची नख खाऊ लागली. पण तो उचलावा तर लागणार होताच. शेवटी मनाचा हिय्या करून तिने तो फोन उचलला.

“हेलो दी कुठे आहेस?” सुजयचा आवाज बराच घाबरलेला जाणवला.

“क.. का काय झाल?” त्याचा तो आवाज ऐकून परी अजूनच घाबरून गेली.

“आधी माझ्या प्रश्नाच उत्तर दे.” सुजय चांगलाच चिडून बोलला.

“तू सांगतोस की मी फोन ठेवू?” परी पण तितक्याच कडक आवाजात बोलली.

“तुझी स्कुटी आम्हाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडुपात पडलेली दिसली.” सुजय त्याच्या आवाजात शांतपणा ठेवत बोलला. “आता तू सांग तू तुझी स्कुटी सोडून कुठे गेली आहेस?”

“त.. ते ते ..” परी जरा चाचारली. “हा.. ते मी पडली ना त्यावरून म्हणून तिला तिथेच ठेवून मी दवाखान्यात आली आहे.”

“कुठल्या दवाखान्यात?” सुजय “आणि मला का सांगितलं नाही?”

“छोट्याश्या गोष्टीसाठी तुला का टेन्शन द्यायचं?” परी जरा चिडून बोलली. “ती स्कुटी गॅरेजवर पाठव. मी पोहोचेल घरी.”

ती फोन ठेवणार तोच तिला काहीतरी आठवल. “एक मिनिट तुम्हाला कुठे आणि कशी दिसली माझी स्कुटी?”

“कशी म्हणजे?” सुजय “तुझ्या स्कुटीमध्ये जीपीएस सिस्टीम लावली आहे त्यावरून समजल.”

परी त्याला सांगत होती आणि तो त्याच्यावर विश्वास ठेवत होता. यावरून तुषारने मनातच सुस्कारा सोडला. आता त्याने आरुषसोबत न बोलता सरळ परीच्या वडिलांसोबत बोलायचे ठरवले. एकतर त्याने त्यांची नवीन गाडी तिच्या वडिलांच्या शोरूममधूनच घेतली होती. त्यामुळे विजयसोबत तुषारची जरा ओळख होतीच.

परीच फोनवरच बोलण झाल्यावर ती तुषारच्या बाईकवर बसली आणि त्याने तिला तिच्या घरी सोडलं. परीने त्यांच्या बिल्डींगच्या खालच्या पार्किंगमध्ये पाहिलं तर तिच्या भावंडांच्या पाचही बाइक्स एका लाईनीत लागलेल्या होत्या. थोडी पुढे तर रावीची देखील बाईक तिथे उभी होती. परी स्कुटीवरून पडली हे समजताच तिची भावंड घराजवळ जमा झाली होती. तरी अजून सायली आणि विजय घरी यायचे बाकी होते.

परी तुषारच्या बाईकवरून उतरली. “थँक्स तिने तुषारकडे बघून म्हटलं.

तस तुषारला परत आश्चर्यच वाटल कारण आज पहिल्यांदाच ती एवढ प्रेमाने त्याच्याशी बोलली होती. “ते ठीक आहे, पण तुला माझ्या अटीं माहित आहे ना?” त्याने त्याच्या भुवया उंचावल्या.

“तुमच्या कुठल्या अटीं?” परी गोंधळून विचारू लागली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all