Login

अवनी एक प्रवास भाग ४२

एकवेळ तर तिला वाटत होत की तिच्या त्या गावाला जावं आणि सरळ त्यांच्या नावावर ती प्रोपर्टी करून द्यावी. पण तिच्या वडिलांच्या त्या कागदपत्रात तशी कुठलीही तजवीज नव्हती. हे आठवल्यावर तिला स्वतःच जीवन संपवू का? अस वाटायला लागल. पण मग तिला जीव लावणारी माणस तिच्या डोळ्यासमोर फिरू लागली आणि तिच्यामुळे त्यांना होणारा त्रास पण तिला बघवला जात नव्हता. नक्की काय कराव? हेच तिला समजत नव्हत.
मागील भागात.

“त.. प. ते..” तेजश्री जरा चाचरली. “एखाद वेळेस डॅड तर तयार होईल पण मॉम आणि आज्जी? ते कधीच तयार होणार नाहीत.”

“त्यांच माझ्यावर सोड.” तुषार हलकेच स्मित करत बोलला.

“म्हणजे ह्यावेळेस तू खरचं मनावर घेतलं आहेस?” तेजश्रीला जरा आनंदच झाला.

यावर त्याने मंद स्मित करत होकारात मान हलवली. “पण तुला एक काम करायचं आहे.”

“कोणत?” तेजश्री लगेच उत्साहात आली.

“तुमच्या कॉलेजमध्ये आता जे फंक्शन होणार आहे त्यात तुमच्या मॅमचा पण डान्स ठेवायचा.”

“काय डोक्यावर परिणाम झाला आहे का तुझ्या?” तेजश्रीचा उत्साह लगेच मावळला गेला आणि तिच्या कपाळावर आठ्या चढल्या. “त्यांना फक्त डान्स बसवून देण्यासाठी किती पापड बेलावे लागले ते आम्हालाच माहित आणि त्या स्टेजवर डान्स करायला तयार होतील?”

“त्याची काळजी तू नको करूस.” तुषार तिच्या टपलीत मारत बोलला. “तुमची मम नक्की डान्स करेल.”

आता तर ती तिच्या दादाला ‘हा वेडा झाला का?’ या अविर्भावात बघू लागली.

आता पूढे.

आता सायली पण घरी येऊन पोहोचली होती. तिनेही परीच्या हाताला बांधलेली पट्टी आणि ती टेन्शनमध्ये आली.

“बाळा नीट बघून गाडी चालवायची ना.” सायली तिचा हात तिच्या हातात घेत बोलली.

“उद्यापासून दोन दिवस आराम. त्यानंतर मी तिला सोडायला जात जाईल.” विजय निर्वाणीच्या सुरात बोलला. “आणि जी ॲकेडेमीमध्ये प्रॅक्टिस चालते ती बंद. जे काही आहे ते कॉलेजच्या आवारात. तुमच्या प्रिन्सिपल सरांसोबत मी बोलून घेतो.”

यावर परीने देखील हळूच मान डोलावली.

तशी आरुषच्या मनात उभी राहिलेली शंका आता खात्रीत बदलत चालली. पण परी तर त्याला काही खरं सांगणार नव्हती. मग त्याला काहीतरी आठवलं.

“दी तू इथे कशी आलीस?” आरुष

परी काही बोलणार तोच विजय बोलला. “रिक्षेने आली. माझ्या पुढेच तर आली. ते मी तिला रिक्षातून उतरताना पाहिलं.” विजयला त्यांच्या ह्या लेकरांची विचार करण्याची पातळी चांगलीच माहिती होती. कोणासोबत आली हे समजलं म्हणजे तिच्यासोबत काय झाल? हे देखील त्यांना लगेच समजणार होत.

विजयच्या उत्तरावर आरुषने एक उसासा सोडला.

“थांब आता,” सायली बाकी मुलांकडे बघून बोलल्या. “जेवण करूनच जा.”

तशी परी उठणार होती पण मग सगळ्यांनीच तिला रोखून पाहिलं. मग तिने तिच्या खोलीत जायचं नाटक केल. “ते मी इकडे चालली होती. आराम करायला.”

तिच्या मागे रावी पण जाणार तोच सायलीने तिला आवाज दिला. “ती जाऊ शकते तिच्या खोलीत. तू ये किचनमध्ये. घरी लपून छपून काम करते ते बोलली तुझी ममा मला.”

‘अरे यार,” रावी मनातच सुस्कारा सोडत बोलली. ‘मॉम पण काहीही सांगत बसते.’ ती तिचे पाय ओढतच किचनकडे चालली गेली. तिची ही नौटंकी पाहून आता कुठे सर्वांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आल. आजही माला स्वतःहून किचनमध्ये आली.

विजय त्याच्या खोलीकडे चालला गेला. बाकी चारही बंधू तिथेच विचार करत बसली.

“काहीतरी लपवलं जात आहे.” आरुष विचार करत बोलला.

कशावरून?” सुजय

“काका काय बोलले ते ऐकल नाही का?” आरुष “कशाला कोणाला घाबरायचं?”

“आणि दी रिक्षातून आली,” जय “हे पण मामा दीला बोलू न देता स्वतः लगेच बोलले.”

“पण मग खरं कस कळेल?” सुजय

“दी तिच्या मित्राला तर खरं सांगेल ना?” आरुष सर्वांकडे बघत बोलला.

तस बाकीच्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकल. सुजयने लगेच राजला फोन लावला. इथे हॉलमध्ये बोलण जरा धोक्याच असल्याने ते सगळेच सुजयच्या खोलीत गेले.

इकडे विजयने सरळ आश्रमात फोन लावला आणि तिथे त्या गौतमचा कोणी खबरी आहे का ते चौकशी करायला लावली. कारण त्यांनी सही करून कागद पाठवले हे फक्त विजय आणि त्या आश्रमाच्या अधीक्षकांनाच माहिती होत. आता तिला थेट किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे त्या कागदांची माहिती त्या माणसांपर्यंत पोहोचली होती. हे विजयला समजून गेल होत.

इकडे विजय त्याच्या पद्धतीने काम करत होता. तर तिकडे परीची बंधू मंडळी त्यांच्या पद्धतीने निकाल लावायच्या तयारीत होती. तिकडे परी पण तिच्या खोलीत टेन्शनमध्ये बसली होती.

एकवेळ तर तिला वाटत होत की तिच्या त्या गावाला जावं आणि सरळ त्यांच्या नावावर ती प्रोपर्टी करून द्यावी. पण तिच्या वडिलांच्या त्या कागदपत्रात तशी कुठलीही तजवीज नव्हती. हे आठवल्यावर तिला स्वतःच जीवन संपवू का? अस वाटायला लागल. पण मग तिला जीव लावणारी माणस तिच्या डोळ्यासमोर फिरू लागली आणि तिच्यामुळे त्यांना होणारा त्रास पण तिला बघवला जात नव्हता. नक्की काय कराव? हेच तिला समजत नव्हत.

आज प्रसाद आणि राज दोघे एकत्रच घरी आले होते. आले होते म्हणजे प्रसादने राजला त्याच्यासाठी थांबायला लावलं होत. त्याने आता मालाला प्रपोज करायचं ठरवलं होत. त्यासाठीच तो राजकडून काही कल्पना मिळते का त्याची चर्चा करणार होता.

संध्याकाळी जस राजच ऑफिस सुटल तस प्रसादने त्याला त्याच्या ऑफिसच्या मार्गावर यायला सांगितलं. आज बाईक राज घेऊन आला होता. प्रसादला सोडायला आणि घ्यायला त्यांच्या कंपनीची गाडी येत होती. पण आज तो राजसोबत घरी जाणार होता.

राजचा प्रसादच्या ऑफिसजवळ यायची वेळ आणि प्रसादची ऑफिस सुटायची वेळ सारखीच झाली. त्यामुळे राजला जास्त काही वाट बघायला लागली नव्हती.

तिथून राजने बाईक काढली ती थेट एका कॅफेमध्ये नेऊन थांबवली. तिथेच प्रसादने मालाला प्रपोज करायचं असल्याच त्याला सांगितल. याचा राजला देखील आंनद झाला आणि तो लागलीच त्याच्या कल्पना प्रसादला सांगू लागला. पण राजच्या फिल्मी कल्पना प्रसादला काही आवडत नव्हत्या. कारण मालाला मुळातच फिल्मी गोष्टीची आवड नव्हती. त्याला काहीतरी वेगळ करायचं होत. बऱ्याच कल्पनांवर चर्चा झाली पण एकही ठरवता आली नव्हती. शेवटी दुसरा काहीतरी विचार करूया हे ठरवून ते दोघे त्यांच्या घरी निघून आली.

राज त्याच्या खोलीत जाऊन फ्रेशच झाला होता तोच त्याचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईलवर नाव पाहिलं तर तो फोन सुजयचा होता. त्याच नाव वाचून राज जरा विचारात पडला. कारण त्याने आजवर त्याला असा कधीच फोन केला नव्हता. जे काही होत ते परीच त्याला फोन करून सांगत होती. पण आज थेट त्याचा फोन आलेला बघून तो जरा गोंधळात पडला.

राजने आलेला फोन उचलला. फोनवरच बोलण ऐकून तो पण खूप टेन्शनमध्ये आला आणि ती कशी पडली हे सुजयलाच विचारू लागला. यावरून परीने त्याला काहीच सांगितलं नसल्याचं सुजयला जाणवलं. मंग त्याने पुढची त्यांची शंका काही त्याला बोलून दाखवली नाही. असही राजने लगेच त्याचा फोन ठेवला आणि परीला फोन लावू लागला.

परी अजूनही तिच्या खोलीत बसून होती. ती तिच्याच विचारात असताना तिचा मोबाईल वाजला. तिने पाहिलं तर राज तिला फोन करत होता. तसा तो नेहमी तिला फोन करत होता. म्हणून तिने लगेच तो उचलला. त्याला काही माहिती नसेल असच तिला वाटत होत. पण जसा तिने फोन उचलला तसा त्याने तिला काळजीने ओरडायला सुरवात केली.

‘अरे यार,’ परी मनातच सुस्कारा सोडत बोलली. ‘ह्याला कोणी सांगितलं? एकतर ह्याच्याशी खोट पण बोलता येत नाही.’

राज एकटाच बडबड करत होता आणि परी काहीच बोलत नव्हती ते बघून राजने तिला परत आवाज दिला. तेव्हा कुठे ती तिच्या विचारातून बाहेर आली.

“गेला तोल आता,” परी लटक्या रागात बोलू लागली. “समोरून गाडी अंगावर आली तर. काय करू मी?”

“समोरून?” राज गोंधळून विचारू लागला. “पण कॉलेजपासून घरापर्यंत तर डिव्हाईडर आहे ना? मग समोरून कशी आली? जरी रोंग साईडने आली असेल तरी इतक्या जोरात येत नाही की तू थेट खाली पडून घसरत जावी.”

‘अरे यार,’ परी परत मनातच बोलू लागली. ‘का हा इतक डोक लावतो? त्यापेक्षा बाकी बंधू तरी बरे, लगेच विश्वास ठेवतात.’

“मी काय विचारत आहे?” राज आता कडक आवाजात विचारू लागला. “खरं कारण सांगतेस की नाही?” राजचा निर्वाणीचा सूर लागला.

“ठीक आहे,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “उद्या घरी तर येशीलच ना. मग सांगते.”

“ठीक आहे.” राज स्वतःला शांत करत बोलला. “आलोच उद्या.”

परीने पण सुस्कारा सोडला आणि फोन ठेवून दिला. आता दोन दिवस तिला आरामाच करायचा होता. सगळ काही आता तिच्या हातात येणार होत आणि हेच तिला नको होत. पण सांगणार कोणाला? मग काय? ती बसली तशीच विचार करत.

नेहमी कामाची सवय असलेली ती, तिला कुठे स्वस्थ बसवलं जात होत? कशीतरी ती तासभर तिच्या खोलीत बसली आणि परत हॉलमध्ये आली. पण हॉलमध्ये तर कोणीच नव्हत. विजय त्याच्या खोलीत होता. सुजय त्याच्या बंधूमंडळी सोबत त्याच्या खोलीत आणि बाकी महिला मंडळ किचनमध्ये.

परीने हळूच किचनमध्ये पाहिलं तर सायली रावी आणि मालाला कशाबद्दल तरी सांगत होती. त्या दोघीही मनापासून ऐकत होत्या. तशी परी हळू हळू किचनच्या आत आली. त्या तिघी त्यांच्या कामात इतक्या मग्न होत्या की परी कधी त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली ते त्यांनाही समजल नाही.

सायलीने एक मसाला आणायला सांगितला तस परीने पटकन तो आणून दिला.

“रावी,” सायाली आश्चर्यचकित होऊन बोलली. “तू कसा काय इतक्या बरोबर आणि लवकर आणलास हा मसाला?”

“मी कधी आणला?” रावी तिच्या मोबाईलमधून बाहेर बघत बोलली. कारण सायली जेव्हा मसाल्याच सांगत होती तेव्हाच ती तिच्या मोबाईलमध्ये आलेल्या मेसेजला उत्तर देत होती.

“मग हा मसाला कोणी आणला?” सायली गोंधळून गेली आणि मालाकडे पाहिलं. तर तिनेही नकारार्थी मान हलवली.
मग त्या तिघींनी मागे पाहिलं तर परी हळू हळू चालत हॉलमध्ये चालली होती. तस ह्या तिघींनी एकमेकींकडे पाहून डोक्यालाच हात लावला.

“पुन्हा आलीस किचनमध्ये तर बघ.” सायली जरा कडक आवाजात बोलली.

“त.. ते तर मी पाणी प्यायला आली होती.” परी “तेवढ्यातच तू आवाज दिलास. आता रावीच लक्ष नव्हत म्हणून मी दिला एवढंच. असही त्या मसाल्याचा डब्बा माझ्याजवळच होता.”

परीने सरळ रावीवर ढकललं. तस सायली रावीकडे चिडून बघू लागली.

“आत्याने नाव घेतलं होत माझ?” रावी लगेच कमरेवर हाथ ठेवून बोलली. “माला दी चालली होती तोच तूच तो डब्बा घेऊन आलीस.”

तसे परी तिचे केस उडवत पटकन हॉलमध्ये निघून गेली.

इकडे त्या तिघींनी परत नकारार्थी मान हलवत त्यांची काम करायला सुरवात केली. बाहेर परीच्या मोबाईलवर बाकी बंधू मंडळीच्या आई वडिलांचे फोन यायला सुरवात झाली. त्यावर उत्तर देता देता परी वैतागून गेली.

सध्यातरी जेवणाच्या टेबलवर शांतता नांदत होती. नेहमी बडबड करणारी रावी पण आज शांत बसून जेवण करत होती. परीच्या उजव्या हातालाच पट्टी बांधलेली असल्याने आज सायलीने स्वतःच्या हाताने तिला जेवण खाऊ घातले होते. यथावकाश सगळ्यांची जेवण झाली.

घरी जाताना सर्वांनी परीला काळजी घेण्याचे सांगून तिचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी विजय सकाळीच उठला आणि त्याच आवरून सरळ त्या आश्रमात गेला. सुजय पण सकाळीच कोणालाही काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला होता. रावी येईपर्यंत सायली घरी थांबून राहिली.

परीचा आज सकाळचा चहा आणि नाश्ता पण आयताच हातात झाला होता. ती बसून बसून इतकी वैतागली होती की ती घरातल्या सर्वांवर गाल फुगवून बसली होती.

तिकडे कॉलेजमध्ये तेजश्री रावीला भेटली आणि त्यांच्या मॅमच्या तब्येतीविषयी चौकशी करू लागली. त्यावेळेस रावीला समजल की सर्वात शेवटी तुषार तिच्या दी सोबत होता आणि ही गोष्ट परीने त्यांच्यापासून लपवली होती. त्यात आरुषने ‘ती कशी घरी आली?’ हे विचारल्यावर मात्र विजयनेच पटकन उत्तर दिल होत.

आता रावीच पण डोक चालायला लागल. तिने तेजश्रीचा निरोप घेतला आणि सरळ आरुषला फोन लावला. तस तर तिला थेट ॲकेडेमीमध्येच जायचं होत. पण सायलीने तिला परीसोबत थांबायला लावलं असल्याने ती आता तिच्या मामांच्या घरी जायला निघाली. जाता जाता तिने आरुषला फोन लावून त्यांच्या सरांसोबत बोलायला लावलं.

तर दुसरीकडे राज देखील अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून त्याच्या मामाच्या घरी पोहोचला होता. परीच्या काळजीने त्याने सकाळी काही नाश्ता देखील केला नव्हता.

तिकडे ॲकेडेमीमध्ये ती पाचही भावंड त्यांच्या सरांची म्हणजेच तुषारची अस्वस्थपणे वाट बघत राहिले. त्यांनी तिथे ट्रेनिंगसाठी येणाऱ्या मुलांना आज थेट सुट्टी दिली होती.

तिकडे आश्रमात पोहोचलेला विजय त्या आश्रमच्या अधीक्षकांवर चांगलाच चिडलेला होता. त्यांना दिलेली माहिती बाहेरच्या माणसांपर्यंत कशी पोहोचली? ते विचारत होता. तिथला सगळा स्टाफ घाबरून चिडीचूप होऊन बसला होता.

आता कोणी माहिती दिली याचा सबळ पुरावा नसल्याने विजयचा पण नाईलाज झाला होता. एकवेळ त्याला वाटल की त्यांच्या मुलांच्या कानावर घालाव. ते त्यांच्या पद्धतीने बरोबर माहिती काढतील. पण त्यासाठी ते काय करतील? या भीतीपोटी त्याने तो विचार थांबवला आणि त्या अधीक्षकांना तपास करायला लावून तो त्याच्या कामावर निघून गेला.

राज त्याच्या मामाच्या घरी आला तो थेट परीच्या खोलीत जाऊन बसला. त्याच्या डोळ्यातली काळजी फक्त बाहेर यायची बाकी होती. त्याला कालचा विषय काढायचा होता. पण घरात अजूनही सायली होती. काही वेळाने रावी पण इथे येणार होती. ती यायच्या आत राजला सगळ काही जाणून घ्यायचं होत. त्यामुळे त्याने तो रावी येईपर्यंत थांबेल अस सांगून सायलीला तिच्या ऑफिसला जायला लावलं.

सायलीला देखील त्याच म्हणणं पटल आणि तिने तिचं आवरलं आणि ऑफिसला जायला निघाली.

“हे बघ,” सायली राजकडे बघून बोलली. “तिला किचनमध्ये जायला बंदी आहे. तिला काय हवं असेल तर तू आणून दे. नाहीतर ती बोलण्यात पटाईत आहे ते तर तुला चांगलच माहिती आहे.”

तस राजने त्याच्या नेहमीच्या शैलीत “जो हुकुम मेरे आका.” अस बोलत सांगितले.

परीच्या कपाळवरच्या आठ्या आज काही कमी व्हायचं नावच घेत नव्हत्या. सायलीने परीच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले.
“काळजी घे रे बाळा.”

तसे परीचे डोळे लगेच भरून आले.

सायली घराबाहेर पडली.तसा राज पाण्याची एक बाटली घेऊन परीजवळ येऊन बसला. पण परी कुठे काही बोलत होती? मग राजनेच त्याची शपथ घालून तिला काय झालं? ते सांगायला लावलं. तस तिने त्याला सांगायला सुरवात केली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all