Login

अवनी एक प्रवास भाग ४४

“आणि एक,” तुषार कडक आवाजात बोलला. “तुम्हाला ही गोष्ट समजली आहे हे जर तुम्ही तुमच्या दीला जाऊन विचारलं. तर तुमचे जे काही गपचूप चालणारे कारभार आहेत ते पण तुमच्या दीपर्यंत पोहोचतील. त्यामुळे तुमच्या दीला ह्या गोष्टीचा काही त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल.” हलकसं हसणारे आता तुषारला आ वासून बघू लागले. तुषारच आताच वागण त्यांच्या डोक्यावरून गेल.
मागील भागात.

“काही नाही होणार मला.” तुषार “पण मला तिचं आवडली आहे आणि करेल लग्न तर तिच्याशीच.”

“असा वेडा हट्ट चांगला नाही रे,” तुषारचे वडील त्याला समजावत बोलले. “आणि तिच्या घरचे नाही ऐकले तर काय करशील?”

“ते पुढंच पुढे बघू,” तुषार “पण तुम्ही आई आणि आज्जीला तयार करायची तयारी करा.”

“म्हणजे मी तयार आहे अस तुला वाटत का?” तुषारचे वडील त्याच्याकडे बारीक डोळे करून बोलले.

“तयार नसते तर इतका वेळ माझ्याशी प्रेमाने बोललेच नसते,” तुषार हलकेच हसत बोलला. “सरळ आईला सांगून माझी धुलाई केली असती.”

तस त्याचे वडील खळखळून हसले. “ठीक आहे. आधी तेजूच निस्तरू. मग बघुयात.”

मग दोघेही परत घरी आले. ते दोघे असे अचानक कुठे गेले गेले म्हणून तुषारच्या आईने दोघांना जरा दटावलं आणि त्यांना चहा नाश्ता आणून दिला.

आता पूढे.

तुषारने पटकन तो घेतला आणि त्याच्या जिमकडे जायला निघाला. तो गेल्यावर त्याच्या वडिलांनी तेजश्रीला कधी सुट्टी असते ते विचारलं. जेणेकरून त्यांना गावाला जायची तारीख काढता येणार होती. पण तेजश्रीने त्याचं फंक्शन झाल्यावरच जाऊयात अस तिच्या वडिलांना सांगितल. मग त्यांनी देखील गावाला तस कळवून दिल.

इकडे तुषार त्याच्या जिममध्ये जाऊन पोहोचला. तशी त्याची जिम तर पहाटेच चालू व्हायची. तिथे ठेवलेला ट्रेनर तो ती जिम सकाळी उघडायचा. तेव्हा नियमित व्यायाम करणारे येऊन त्यांचा व्यायाम करायचे. पण जे स्पर्धेसाठी यायचे त्यांची ट्रेनिंग तुषार स्वतः घेत होता.

तुषार त्याच्या कामात असताना त्याला बाईक्सचा आवाज आला. जो त्याचे विद्यार्थी तिथे आले असल्याचे त्याला सांगून गेला होता.

‘ही वानरसेना सकाळी कशी काय इथे?’ त्याने मनातच विचार केला.
तो त्याच विचारात त्याच्या जिमच्या बाहेर आला. तो पर्यंत ते सगळेच त्यांची बाईक पार्किंगला लावून आतमध्ये येत होते. त्यांना येताना बघून तुषार त्याच्या जिमच्या ऑफिसमध्ये गेला.

मग ते सगळेच तुषारच्या मागे त्या जिमच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले.

“काल दी फक्त पडली नव्हती,”आरुषने बोलायला सुरवात केली. “तिच्यासोबत अजून काहीतरी होणार होत ते तुम्ही वाचवलत.”

“मग?” तुषार कडक आवाजात बोलला.

“मग ते आम्हाला का नाही सांगितल?” सुजय कपळावर आठ्या पाडून विचारू लागला.

“तुमच्या दीने तुम्हाला काही सांगितलं?” तुषारने सर्वांवर नजर टाकून विचारलं.

तस त्यांनी नकारार्थी मान हलवली.

“ह्याचा अर्थ तुमच्या कामाची ती गोष्ट नाही.” तुषार

“आता तुम्ही पण दीची भाषा बोलू लागले.” माला हलकीशी चिडून बोलली.

“ती जे काही करते ते तुम्हाला योग्यच वाटत,” तुषार “हो की नाही?”
तशी त्यांनी होकारात मान हलवली.

“मग तिने काही सांगितलं नाही याचा अर्थ पण तिला काहीतरी त्यात योग्यच वाटल असेल ना?” तुषार

“म्हणजे तिच्यासोबत काहीही झाल तरी आम्ही शांत बसायचं?” आरुष

“ज्यांच्या कानावर गोष्ट घालायची होती त्यांच्या कानावर मी घातली आहे.” त्यांचा आवेश बघून तुषार बोलला. “आता जे काही करायचं आहे ते करतील. तुम्ही निर्धास्त राहा."

“म्हणजे तुम्ही आम्हाला काहीच सांगणार नाही,” आदेश “आम्हाला काय झाल ते माहिती असून देखील?”

“हो,” तुषार एक दीर्घ श्वास घेत बोलला. “कारण तुमच्या दीची ती जड मराठी भाषा माझ्या डोक्यावरून जाते. त्यात तिची बडबड ऐकायची हिम्मत माझ्यात नाही.” शेवटी त्याने एक सुस्कारा सोडला.

आता मात्र त्यांना हलकसं हसू आलं.

“आणि एक,” तुषार कडक आवाजात बोलला. “तुम्हाला ही गोष्ट समजली आहे हे जर तुम्ही तुमच्या दीला जाऊन विचारलं. तर तुमचे जे काही गपचूप चालणारे कारभार आहेत ते पण तुमच्या दीपर्यंत पोहोचतील. त्यामुळे तुमच्या दीला ह्या गोष्टीचा काही त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल.”

हलकसं हसणारे आता तुषारला आ वासून बघू लागले. तुषारचं आताच वागण त्यांच्या डोक्यावरून गेल.

‘सरांना काहीपासून दीची काळजी?’ असेच भाव त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर होते.

“तुमच्या ॲकेडमीची वेळ झाली आहे.” तुषार खुर्चीवरून उठत बोलला. “तुम्ही निघालात तरी चालेल.”

तसे ते सगळे त्यांच्याच विचारात तिथून उठले आणि पार्किंगजवळ आले.

“काल दी सोबत सर पण डोक्यावर पडले का?” जय विचार करत बोलला.

“बघा ना,” माला पण विचार करत बोलली. “एरवी मुलींकडे बघत पण नव्हते. मला ट्रेनिंग द्यायला त्यांच्या हाता पाया पडले तेव्हा ते तयार झाले.”

“आणि आता चक्क इतकी काळजी?” आदेश

“पण आता दीला एकटीला कुठेही जाऊ द्यायचं नाही.” आरुष

सगळ्यांनी त्यांच्या माना हलवल्या आणि ते तिथून निघून गेले.
त्यांना जाताना बघून तुषारने तेजश्रीला फोन लावला. तेजश्री पण तिच्या कॉलेजला गेली होती. त्यांच्या कॉलेजमध्ये फंक्शनची तयारी चालू असल्याने लेक्चरला तर सुट्टी होती. त्यामुळे तिला आलेला फोन तेजश्रीने लगेच उचलला.

“आजची डान्स प्रॅक्टिस कन्सल कर,” तुषार ऑर्डर सोडत बोलला. “आणि तुमच्या मॅमला बघायला त्यांच्या घरी जात आहोत.”

तुषारच्या ह्या वाक्यावर तेजश्रीच तोंडच उघडं पडल. “दादा तू बरा आहेस ना?”

“का गं काय झाल?” तुषार “तुमची दी एवढी पडली गाडीवरून तर तिला बघायला जाणार नाही का?”

“दी?” तेजश्री गोंधळून गेली. तिचा दादा आता कामातून गेला का काय? अस तिला वाटू लागलं. "अरे दादा, त्या मॅम आहेत आमच्या, दी कुठे?”

तस इकडे तुषारने त्याचे डोळे घट्ट मिटले. ‘त्या बंधू मंडळीच्या नादात मी पण तिला दी का बोलत आहे?’ त्याने मनातच स्वतःला भांडून घेतलं. “हा तेच ते. कॉलेजमधून निघाली का सरळ इथे ये. मग इथून जाऊ.”

ते ऐकून तेजश्रीने कपाळवर हातच मारून घेतला. तिने तिच्या बाजूला असलेल्या सुजाताकडे पाहिलं. “दादा वेडा झाला.” तश्या त्या दोघी पण खळखळून हसल्या.

“आता काय?” सुजाता नाटकी आवाजात बोलली. “लाव फोन तुझ्या होणाऱ्या...” ती पुढे काही बोलणार तोच तेजश्रीने तिचं तोंड दाबून धरल.

“वेडी आहेस का?” तेजाष्टी आजूबाजूला बघत बोलली. “मॅमचे खबरी आजूबाजूला असतात. त्यांना कळल ना तर पहिले आपल्याला आणि नंतर दादाला असे ओरडतील ना. त्यात त्यांचे बंधू तर बघायलाच नको.”

“ऐक ना पण,” सुजाता जरा लाजत बोलली. “मॅमचा तो भाऊ मला खूप आवडतो. बघ ना जरा काही सेटिंग होते का?”

“मी काय सेटिंग लावणारी वाटली का तुला?” तेजश्रीच्या कपाळावर आठ्या आल्या.

“आता आपल्या बेस्ट फ्रेंडसही इतक पण नाही करणार का?” सुजाता बारीक तोंड करून बोलली.

“हे भगवान,” तेजश्री वर बघून बोलली. “कोण कोणाला माझ्या आयुष्यात पाठवलं आहेस? जे मला फक्त सेटिंग लावायला सांगत आहेत.”

ते बघून सुजाता जोरात हसायला लागली. “चल आधी तुझ्या.. सॉरी सॉरी आपल्या मॅमला फोन लाव. त्या घरी आहेत का ते बघ.”

तस तेजश्री तिला बारीक डोळे करून बघू लागली आणि फोन लावायला घेतला.

परी आणि रावी तर घरात बसून बसून खूपच कंटाळल्या होत्या. टीव्ही तरी किती बघणार ना? त्यांना काही खायला हवं ते त्या ऑर्डर करत होत्या. बरं रावी तर परीला दुसर काही काम देखील करू देत नव्हती.
मग त्यांनी सुजयच्या खोलीत जाऊन त्याचा गेम बाहेर काढला आणि तो रावीच्या मदतीने परी खेळू लागली. हाताला पट्टी असल्याने परीला रावीइतक फास्ट खेळता येत नव्हत. म्हणून ती सारखी हारत होती. शेवटी रावीने परीला खेळायला जमेल असा गेम चालू केला. मग मात्र परी उत्साहात खेळू लागली.

त्या दोघी गेम खेळण्यात खूपच व्यस्त होत्या. तेवढयातच परीचा मोबाईल वाजला. आता मोबाईल जरा लांब असल्याने तो रावीने तिच्याजवळ आणून दिला.

मोबाईलवर तेजश्रीचा नाव बघून परी जरा विचारात पडली आणि त्याच विचारात तिने तो फोन उचलला.

“हा तेजश्री बोल.” परी एका बाजूला खेळत होती आणि एका बाजूला मोबाईलवर बोलू लागली.

“तुमचा हात कसा आहे आता?” तेजश्रीने बोलायला सुरवात केली.

“बरा आहे,” परी “परवा मी येईल. तोपर्यंत तुमचा प्रॅक्टिस चालू ठेवा.”

“आज घरी आहात ना?” तेजश्री

“मग जातेय कुठे?” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “बसवलं आहे मला घरात.”

“ठीक आहे मग आलोच आम्ही.” तेजश्री खुश होत बोलली.

“कशाला?” परी तिच्याच तंद्रीत बोलून गेली.

“कशाला म्हणजे?” तेजश्री गोंधळून बोलली. “तुम्हाला बघायला.”

“मी काय पर्यटन स्थळ आहे का?” परीच्या कपाळावर आठ्या चढल्या. “मी धडधाकट आहे. गप्प घरी जाऊन अभ्यास करा.”

परीच बोलण ऐकून तेजश्रीला टेन्शन आल. “त.. ते .. म्हणजे..”

“बोल लवकर.” तेजश्रीच ततपप बघून परी जरा वैतागून बोलली.

“खरं तर दादाला भेटायला यायचं आहे.” तेजश्रीने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. जस काही परी तिच्यासमोरच उभी होती.

दादा हा शब्द ऐकून परी तर पहिले गोंधळूनच गेली. “दादा?”

“त.. ते तुमच्या भावांचे सर.” तेजश्री

“तो दगड?” परी भावनेच्या भरात बोलून गेली. ती इतकी जोरात बोलली की रावीला पण टेन्शन आल आणि त्या दोघींचा खेळ थांबला गेला.

“दगड?” तेजश्रीच्या कपाळवर आठ्या आल्या. “सिरीअली मॅम?”

“अम्म सॉरी,” परीने लगेच तिची जीभ चावली. “ते चुकून तोंडातून निघाल.”

“माझ्या दादाने तुमच्यासाठी इतक केल आणि तुम्ही त्याला दगड बोलता?” तेजश्री आता जरा चिडून बोलली.

“आणि तुझा दादा मला चार फुट चार इंच चिडवतो ते.” परी पण चिडून बोलली.

ह्या दोघींचं अस बोलण ऐकून रावी तर पूर्ण गोंधळून गेली होती. नक्की काय विषय होता? फोन कशासाठी केला होता? आणि ह्या दोघी भांडत कशाबद्दल होत्या? तिला काहीच समजत नव्हत.

“ते मी बोलली त्याला की आमच्या मॅमला चिडवल तर त्याच्या मनातलं घरी सांगून देईल.” आता तेजश्री भावनेच्या भरात बोलून गेली.

“त्याच्या मनातलं काय?” परी पण गोंधळून विचारू लागली.

तर इकडे तेजश्रीने जीभ चावली. “काही नाही ते असचं. आमच नेहमी काही ना काही घरात चालूच असत.” आता मात्र ती हसून बोलली.

“ठीक आहे या.” परी पण हसतच बोलली.

“ते माझ्या दादाला आणू ना?” तेजश्रीने खात्री करण्यासाठी परत विचारले.

“हो गं,” परी “त्या दिवशी त्याचे आभार मानायचे राहिले.”

परी तर आता बोलून गेली आणि नंतर तिला लगेच तुषारच्या अटी आठवल्या. “तुम्ही एकत्र येणार की मागे पुढे?”

“अम्म एकत्रच येऊ.” तेजश्री

“ठीक आहे.” परीने उसासा टाकत फोन ठेवून दिला.

“कोण होत गं?” रावी लगेच उत्सुकतेने विचारू लागली.

“तिचं जी डान्स प्रॅक्टिसला अकेडेमीमध्ये येते ती.” परी परत गेम खेळायला सुरवात करत बोलली.

“मग दगड कोण?” रावी

“कोणी नाही.” परी वैतागून बोलली. “चल खेळूया आता.” रावीच्या प्रश्नाला बगल देत तिने रावीला खेळायला लावलं.

मग रावी पण विचार करत खेळायला लागली. तर दुसरीकडे परी खेळत तर होती पण तिचं मन सारख तुषार कशाला येत आहे? याकडे लागल होत. किमान तेजश्री आधी आली असती तर तिला त्या अटींबद्दल सांगून तरी दिल असत. जेणेकरून त्यापासून काहीतरी सुटका करता येईल. पण ते दोघेही नेमके एकत्रच येणार होते.

काही वेळातच तेजश्री तिच्या ग्रुप आणि तुषारसोबत तिथे येऊन पोहोचली. तुषारला देखील आलेलं बघून तेजश्रीचा ग्रुप जरा विचारात पडला होता. तर त्या ग्रूपला देखील आलेलं बघून तुषार विचारात पडला. ह्या सगळ्यांना अस विचारात पडलेलं बघून तेजश्री आणि सुजाता मनातच सुस्कारा सोडत राहिल्या.

“दादा चल.” तेजश्री त्याच्या हाताला पकडत बोलली.

तसा तुषार त्याच्या विचारातून बाहेर आला आणि तेजश्रीच्या मागे मागे जाऊ लागला. जसे ते त्या बिल्डींगच्या एका विंगजवळ आले तसे त्या विंगच्या भिंतीवर लावलेल्या नावाच्या फलकाला बघत राहिले. कारण परी कोणत्या मजल्यावर? कोणत्या विंगमध्ये रहाते ते तर माहितीच नव्हत ना. एका विंगवरचं नावच फलक वाचून झाल्यावर ते दुसऱ्या विंगकडे जाणार तोच तिथला सुरक्षा रक्षक त्यांच्याजवळ आला.

“कोणाकडे जायचं आहे?” सुरक्षा रक्षक

“अम्म ते अवनी मॅमकडे.” तेजश्री

“त्या होय,” सुरक्षारक्षक “त्या इकडच्या विंगमध्ये राहतात.” त्याने एका बाजूला बोट केल.

तसे ते सगळे त्या बाजूला जाणार तोच सुरक्षारक्षकाने त्यांना अडवलं.

“थांबा जरा, मला कन्फर्म करू द्या.” एवढ बोलून त्याने परीला फोन लावला.

तिकडून परीने परवानगी दिल्यावर सुरक्षारक्षकाने त्या सगळ्यांना जाऊ दिल.

ही सगळी मंडळी पोहोचल्याचे परीला समजताच तिने तो गेम खेळण बंद केल. तशी रावी तिच्याकडे गाल फुगवून बघू लागली. कारण तिला असा तो गेम खेळायला कधीच मिळायचा नाही. आज परीने काढला म्हणून तो खेळायला मिळाला होता. त्यात तिने लगेच तो ठेवून दिल्याने ती जरा नाराज झाली.

“लहान आहेस का?” परी तिला आठ्या पाडून विचारू लागली. “आता बाहेरून कोणी आल तर तू खेळत बसणार का?”

तोपर्यंत परीने तो गेम आवरून ठेवूनही दिला. “चल बाहेर.” रावीकडे बघून ती बोलली.

तशी रावी नाटकी करत परीच्या मागे मागे जाऊ लागली. जस तिला जाणवलं की परी किचनच्या दिशेने जात आहे, तशी ती तिच्या मागून निघून तिच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली.

“कुठे मॅडम?” रावी तिचे हात कमरेवर ठेवत विचारू लागली.

“कुठे म्हणजे पाणी पण पिऊ नको का?” परी तिला बाजूला करत बोलली.

“मी आणते,” रावीने तिच्या हाताला पकडत तिला हॉलच्या सोफ्यावर नेऊन बसवले. “तू इथेच बस.”

“अरे यार,” परी वैतागून बोलली. “इतकही मला लागल नाहीये.”

तरीही रावी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत किचनकडे निघून गेली. पुढच्या काही क्षणातच रावी पाणी घेऊन आली. ती परीच्या बाजूला बसणारच होती की त्यांच्या घराची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकून रावी दाराकडे निघून गेली.

इकडे परीला तुषारचं टेन्शन आल होत. तिने दाराकडे पाहिलं तर तेजश्रीसोबत पूर्ण ग्रुप आलेला होता. त्यांच्यामागे तुषार उभा होता. त्याला वाटल होत की तेजश्रीसोबत जाईल आणि परीसोबत बोलता तरी येईल. पण आता सगळा ग्रुप आल्याने त्याचा चांगलाच हिरमोड झाला होता.

तुषारचा पडलेला चेहरा बघून तिला जरा हसायलाच आल. जणू काही ती त्याच मन वाचून गेली होती.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all