मागील भागात.
जस तिला जाणवलं की परी किचनच्या दिशेने जात आहे, तशी ती तिच्या मागून निघून तिच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली.
“कुठे मॅडम?” रावी तिचे हात कमरेवर ठेवत विचारू लागली.
“कुठे म्हणजे पाणी पण पिऊ नको का?” परी तिला बाजूला करत बोलली.
“मी आणते,” रावीने तिच्या हाताला पकडत तिला हॉलच्या सोफ्यावर नेऊन बसवले. “तू इथेच बस.”
“अरे यार,” परी वैतागून बोलली. “इतकही मला लागल नाहीये.”
तरीही रावी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत किचनकडे निघून गेली. पुढच्या काही क्षणातच रावी पाणी घेऊन आली. ती परीच्या बाजूला बसणारच होती की त्यांच्या घराची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकून रावी दाराकडे निघून गेली.
इकडे परीला तुषारचं टेन्शन आल होत. तिने दाराकडे पाहिलं तर तेजश्रीसोबत पूर्ण ग्रुप आलेला होता. त्यांच्यामागे तुषार उभा होता. त्याला वाटल होत की तेजश्रीसोबत जाईल आणि परीसोबत बोलता तरी येईल. पण आता सगळा ग्रुप आल्याने त्याचा चांगलाच हिरमोड झाला होता.
तुषारचा पडलेला चेहरा बघून तिला जरा हसायलाच आल. जणू काही ती त्याच मन वाचून गेली होती.
आता पूढे.
रावी त्या सगळ्यांना घेऊन आत आली आणि त्यांच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेली. हॉलमध्ये आलेला ग्रुप लगेच त्यांच्या मॅमजवळ जाऊन त्यांचा हात बघू लागला. परी त्या सगळ्यांसोबत जरी बोलत असली तरी तिची एक नजर तुषारवरच होती. काय करता बाबा? पहिल्यांदाच त्याचा असा पडलेला चेहरा बघून तिला हसू येत होत.
तिचं ते हसू तुषारपासून पण लपल नाही. त्याने देखील परीला आठ्या पडून बघायला सुरवात केली. जस काही त्यानेही तिचा चेहरा वाचला होता.
दोघांचा चाललेला हा नजरेचा खेळ किचनमधून बाहेर येणाऱ्या रावीच्या नजरेस पडला. ती दोघांनाही आळीपाळीने गोंधळून बघू लागली. त्यांचे ते सर त्यांच्या दीला आठ्या पाडून बघतात काय? आणि दी त्यांना बघू हसते काय? हे गणितच तिला समजून येत नव्हत. ती त्याच गोंधळात पाणी घेऊन आली.
इथे त्यांच्या गप्पा चालू होत्या तर तेजश्री सोबत बसलेली सुजाता सारखी घरात इकडे तिकडे जाणार टाकत होती. ते तेजश्रीच्या लक्षात आल तसा तिने सुजाताला जोरात चिमटा काढला.
गप्पा मारण्यात गुंग असलेले सगळेच सुजाताच्या ओरडण्याने तिच्याकडे बघू लागले.
“काय गं? काय झाल” परी लगेच काळजीने विचारू लागली.
‘काही नाही,” सुजाता तिचा हात चोळत बोलली. “मुंगी चावली वाटत.”
“मुंगी?” परी गोंधळून तिथे बघू लागली.
“गेली ती.” तेजश्री उगाच हसवून दाखवू लागली.
‘ह्या मुलींच्या मागे लागूनच सर पण वेडे झालेत वाटत.’ रावी मनातच विचार करू लागली. कारण सुजाताच घरात बघणे आणि तेजश्रीने तिला चिमटा काढणे हे देखील तिच्या नजरेत आल होत. तिथे आल्यापासून ती फक्त त्या ग्रुप आणि तुषारच निरक्षणच तर करत होती. तेवढ्यातच तुषारने रावीला आवाज दिला.
तिथे तेजश्री आणि तिचा ग्रुप तर परीसोबत बोलण्यात व्यस्त होते. मग तुषारला तिथे त्याच्यासोबत बोलण्यासाठी फक्त रावीच मोकळी दिसली. कारण ती देखील तेजश्रीला इतक काही ओळखत नव्हती. फक्त एकाच कॉलेजमध्ये होत्या म्हणून तोंडादाखल ओळख होती.
तुषारच्या अचानक दिलेल्या आवाजाने रावी पहिले तर जरा दचकलीच. पण नंतर लगेच स्वतःला सावरत त्यांच्याजवळ जाऊन बसली. रावीसोबत त्याने तिच्या करिअरविषयीच्या गप्पा सुरु केल्या. कारण तिला बाईकरेस मध्ये इंटरेस्ट होता ज्यात तिला जाऊ दिल जाणार नव्हत. मग तिने एक कॉम्पुटरचा सुधारित असा हॅकिंग साठी असेलला कोर्स करणार असल्याचे तुषारला सांगितले. तिचे वडील म्हणजेच रुद्र देखील पहिले एक हॅकरच होता. त्याच काम बघून तिला त्यात आवड निर्माण झाली होती.
तुषारसोबत चालू असलेल्या गप्पांमध्ये रावीला एक गोष्ट जाणवली की तुषारची ती खेळती नजर दर दोन ते तीन मिनिटांनी परीवर जात होती. पहिले तर रावीला तिचा भास वाटला. मग तिला थोड्यावेळापूर्वीच आठवलं जेव्हा परी त्याच्याकडे बघून हसत होती आणि तो तिच्याकडे आठ्या पाडून बघत होता.
‘चालल काय आहे दोघांच?’ रावी मनात विचार करू लागली. “सर.”
रावीने जरा कडक आवाजात तुषारला आवाज दिला. “काय चालल आहे तुमचं?” तिने थेट मुद्याला हात घातला.
‘काय चालल आहे म्हणजे?” तुषार बेफिकीरपणे बोलला. “तुझ्याशीच तर बोलत आहे.”
“माझा चेहरा इकडे आहे,” रावी स्वतःच्या चेहऱ्याकडे बोट करत बोलली. “दी जवळ नाही.”
दी हा शब्द ऐकला आणि तुषार लागलीच भानावर आला. “मी हा विचार करत होतो की एवढं पडून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. तिच्याजागी दुसरी मुलगी असली असती ना तर आता फक्त बेडवर पसरून राहिली असती.”
सरांच्या तोंडातून कोण्या मूलीच कौतुक ऐकून रावीच तर तोंडच उघड पडलं. त्यांनी आजवर मालाच देखील कौतुक केल नव्हतं. मग तिला आठवलंकी परी पडली तेव्हा तुषारच तिच्या जवळ होता.
“सर.” आता रावीचा आवाज काळजीने भरलेला आला.
तस तुषारने लगेच रावीकडे काळजीने पाहिलं.
“दी फक्त पडली नाही ना?” रावी
तसा तुषारने एक दीर्घ श्वास घेतला. “हे बघ रावी, सकाळी बाकी बंधू मंडळीना पण तेच सांगितल आणि तुला पण तेच सांगतो. तुमच्या दीला एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती गोष्ट तुमच्या कामाची नाही.”
“पण सर.” रावीचे डोळे भरून आले.
“मला माहिती आहे की तुमची दी तुमचा जीव का प्राण आहे.” तुषार मंद स्मित करत बोलला. “पण तिला असलेली तुमची काळजी तुम्हाला दिसत नाही का? तुमच्या अश्या बेफिकीर वागण्याने तिला किती त्रास होत असेल तुम्हाला माहित नाही का?”
आता रावी तुषारला तिचं तोंड वाकड करत बघू लागली.
“असही ज्यांच्या कानावर ती गोष्ट घालायला हवी त्यांच्या कानावर मी घातली आहे.” तुषार “त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या दीवरच लक्ष केंद्रित करा.”
“कोणाला सांगितली?” रावीने लगेच विचारलं.
“जी गोष्ट तुम्हाला माहिती झाली आहे ती अजून जाऊन कोणाला विचारायची आहे तुला?” तुषार कडक आवाजात विचारू लागला. “तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. तुझ्या पुढच्या रेसबद्दल तुझ्या दीला सांगू?”
तस रावीचे डोळे विस्फारले गेले. “तुम्हाला कस समजलं?”
“तिकडे जायची पण काही गरज नाहीये,” तुषार तिला ऑर्डर देत बोलला. “मागच्या वेळेस तुझी बंधू मंडळी पोहोचली म्हणून तू वाचलीस समजलं ना.”
आता मात्र रावी गपगार झाली.
“आता एक काम कर,” तुषारने पुन्हा बोलायला सुरवात केली. “उद्या परत त्या डॉक्टरने बोलावलं आहे. तर तुझ्या दीला घेऊन तू तिथे जायचं. आता तू तुझ्या दीसाठी इतक तर करशीलच ना?” आताही त्याने मंद स्मित केल.
“दी ला पुन्हा बोलवलं आहे?” रावी गोंधळून विचारू लागली. “पण ती मला, मलाच काय? कोणालाही काही बोलली नाही त्याबद्दल.”
“कारण तिच्यामुळे तुम्हाला काही त्रास झालेला आवडत नाही.” तुषारच्या चेहऱ्यावर एक चमक होती.
तुषारच्या ह्या वाक्यावर रावीच तोंडच उघड पडल. ‘दीविषयी सरांना जरा जास्तच माहिती आहे अस वाटतय. तिची काळजी पण जरा जास्तच घेताना दिसत आहेत.’
“रावी.” परीचा जोरात आवाज आला.
तशी रावी दचकून परीकडे बघू लागली.
“अगं कधीची आवाज देत आहे तुला.” परी कपाळावर आठ्या पाडून बोलली. तिला ह्याच टेन्शन होत की तुषारने तिला काही सांगितलं तर नाही. “जरा चहा पाण्याच बघ.”
‘अं.. हो.” तशी रावी लगेच उठली आणि किचनकडे जाऊ लागली.
“तेजू,” तुषारने तेजश्रीला आवाज दिला. “जा तिला मदत कर.”
“नाही नको,” रावी “करेल मी.”
“एकटी किती करशील गं?” तुषार “जा गं तू.” त्याने तेजश्रीवर नजर टाकली.
तेजश्री पण भावाच्या आज्ञेला जागून लगेच उठली आणि रावीसोबत किचनकडे जाऊ लागली. आता परीला तेजश्रीसोबत बोलायची संधी मिळणार होती. परत प्रश्न होता तो रावीचा. तिच्यासमोर तर ती काहीच बोलू शकणार नव्हती. पण आता त्या दोघी किचनमध्ये चालल्या होत्या.
परी तिच्याच विचारात असताना सुजाता पण उठली आणि किचनकडे जाणाऱ्या त्या दोघींच्या मागे चालली गेली.
जाता जाता ती मुद्दाम मोठ्याने बोलू लागली. “थांबा मी पण येते मदतीला.”
मग परी तिच्याकडे बघू लागली. तिचं काय तिथे बसलेला त्यांचा ग्रुप देखील जाणाऱ्या सुजाताकडे बघत राहीला.
किचनमध्ये पोहोचलेल्या तेजश्रीने मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. तर तिच्या बाजूला असलेल्या रावीने ‘कसले नमुने आहेत यार.’ अस बोलून मनातच सुस्कारा सोडला.
आता परीला आठवलं की त्या दिवशी आभार मानायचे राहिले होते. त्यात त्याने ठेवलेल्या अटी आठवल्या मग तिच्या कपाळावर परत आठ्या चढल्या. ‘तेवढेच मानलेले आभार पुरे त्यांच्यासाठी.’ ती मनातच बडबड करत बोलली. ‘नाहीतर पुन्हा काहीतरी अट ठेवतील.’
आता हॉलमध्ये फक्त त्या मुलींचा चार जणींचा ग्रुप, तुषार आणि परी एवढे होते. तुषारच्या मनात एकच चालू होत की परीसोबत कस बोलावं? एकतर तिच्या हाताला लागल आहे तर ती डान्स करेल का? तिला डान्ससाठी नको सांगूया का? हा पण एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्या ऐवजी दुसर काहीतरी सांगू.
आता हॉलमध्ये फक्त त्या मुलींचा चार जणींचा ग्रुप, तुषार आणि परी एवढे होते. तुषारच्या मनात एकच चालू होत की परीसोबत कस बोलावं? एकतर तिच्या हाताला लागल आहे तर ती डान्स करेल का? तिला डान्ससाठी नको सांगूया का? हा पण एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्या ऐवजी दुसर काहीतरी सांगू.
हा त्याचा विचार चालू असताना त्याची नजर फक्त परीवर होती. जे परीला देखील दिसलं होत आणि अचानक तिला सुजयच्या लॅपटॉपमधला तुषार आठवला जो कमरेच्या वर पूर्ण उघडा होता. तस तिचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. काही केल्या तिच्या डोळ्यासमोरून त्या दिवशीच दृश्य जातच नव्हत. त्यात त्याची सतत तिच्यावर येणारी नजर तिला अजूनच अस्वस्थ करून जात होती.
परीने तिच्या मनात जरी अस ठरवलं होत की तिचे आई वडील सांगतील तिथे ती सुखाने जाईल. पण मनात एक प्रतिमा असते ना की तिचा होणारा नवरा कसा असावा? तशी तिच्या मनात देखील एक प्रतिमा उभी राहिली होती त्यात तुषार हा जवळ जवळ जुळला जात होता. तिची उंची कमी असल्याने तिला उंच नवरा पाहिजे होता. स्वतःच्या पायावर उभा असलेला, काळजी घेणारा.
तस तिलाही तिची काळजी घेणारा तुषार आठवला जो तिला तिचं काही न ऐकता डॉक्टरकडे घेऊन गेला होता. त्या डॉक्टरांनी पुन्हा तपासायला बोलवलं होत म्हणून तिला चार वेळा त्याची आठवण करून देणारा. हे सगळ आठवू लागल्यावर परीच्या पोटात खोल खड्डा जसा पडला आणि ती तडक उठली. तिने तुषारवर एक नजर टाकली आणि सरळ तिच्या खोलीकडे निघून गेली.
‘आता मी काय केल? जे ती मला रागात बघून गेली.’ परीच त्याच्यावर नजर टाकून जाण बघून तुषार टेन्शनमध्ये आला होता.
परी तिच्या खोलीत गेल्या गेल्या सरळ बाथरूममध्ये शिरली. तिथल्या बेसिनचा नळ चालू करून चेहऱ्यावर पाण्याचे हबकारे मारू लागली.
‘काय विचार करत होतीस तू परी?’ ती मनातच स्वतःला भांडू लागली. ‘ज्यांनी तुझ आयुष्य इतक सुंदर बनवलं आहे फक्त त्यांचा विचार कर तू. अशी भावनेच्या भरात वाहून जाऊ नकोस.’
तिने स्वतःच्या मनाला जणू तंबीच दिली होती. पण मन होत ते, त्याने आपल सरळ ऐकलं अस कधी होत का? आता तिचं मन किती तिचं ऐकणार होत ते येणारा काळच सांगणार होत. पण सध्यातरी तिने तिच्या मनाला आवरलं होत.
इकडे रावी आणि तेजश्री चहा आणि बिस्कीट घेऊन हॉलमध्ये आल्या. सुजाता तर फक्त नावालाच किचनमध्ये गेली होती. सगळी काम त्या दोघींनीच केली होती. तशी ती मद करू बघत होती. पण एकदाच रावीने सांगितल की ती करेल म्हणून. तर नंतर तिने एकही कामाला हात लावला नव्हता.
हॉलमध्ये परी दिसली नाही म्हणून रावी लगेच इकडे तिकडे बघू लागली.
“मॅम त्यांच्या खोलीत गेल्या आहेत वाटत.” तिथे बसलेल्या ग्रुप पैकी एक मुलगी बोलली.
तिचं बोलण ऐकून रावी लगेच परीच्या खोलीकडे गेली. तिचं परीच्या खोलीच्या दारात जाण आणि परीच तिच्या खोलीच दार उघडण एकाच वेळी झाल. समोर रावीला अचानक बघून परी खूपच जोरात दचकली.
“वेडी आहेस का तू?” परी यावेळेस जरा जोरातच रावीवर ओरडली.
तिचं ते ओरडण बघून रावी परीला बघतच राहिली. जणूकाही ती त्यांची दी नव्हतीच अस काही क्षण रावीला वाटून गेल.
तिचं ते ओरडण बघून रावी परीला बघतच राहिली. जणूकाही ती त्यांची दी नव्हतीच अस काही क्षण रावीला वाटून गेल.
“अशी का ओरडली दी?” रावीचा आवाज लगेच बारीक झाला.
तस परीने एक दीर्घ श्वास घेतला. “ते तोंड धुताना हाताला नळाचा फटका बसला. त्याची ठणक अजूनही आहे आणि त्याच हाताला आता परत लागल असत.”
परीच्या वाक्यावर रावीने लगेच तिचा पट्टी बांधलेला हात पहिला. “तुला डॉक्टरांनी परत बोलावलं आहे ना? सोबतच जाउयात.”
‘हिला कोणी त्याबद्दल सांगितलं?’ परी गोंधळून जात मनातच बोलली. ‘नक्कीच त्या दगडच काम असेल.’
“काय सांगते मी?” रावी
“हो माझी आई,” परी वैतागून बोलली. “जाऊयात. आता हॉलमध्ये जाऊयात?”
“आई मी नाही,” रावी तिचे दात दाखवत बोलली. “मी तर तुझी लाडकी बेबी आहे ना.”
“आता हे काय नवीन?” परी खुदकन हसत बोलली.
“मग,” रावी परीचा दुसरा हात पकडून लाडात येत बोलली. “मोठ्या बहिणीच पाहिलं मुल हे तिची लहान बहिणच असते.”
“बरं.” परी पण तिच्या गालावरून पेमाने हात फिरवून बोलली. “चल आता.” मग त्या दोघी परत हॉलमधे आल्या.
परीला अस हसत येताना बघून तुषारच्या जीवात जीव आला होता. संध्याकाळ होत आली. मग तेजश्रीने निघायची तयारी केली. तिच्या पाठी तिचा ग्रुपने देखील त्यांच्या मॅमला लवकर यायला सांगितलं. नंतर सर्वात शेवटी तुषार उठला आणि त्याला परीसोबत बोलायची संधी मिळाली. त्यानेही पुन्हा परीला डॉक्टरकडे जायची आठवण करून दिली आणि तिला काळजी घ्यायला सांगत घरातून बाहेर पडला.
आताची तुषारची काळजी बघून तिचं मन पुन्हा तिच्या हातातून सुटू लागलं. जणू काही ते स्वतःच तिला चिडवत होत.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा