Login

अवनी एक प्रवास भाग ४७

आता त्याने त्याच्या बाकी बंधू मंडळीना पाहिलं आणि डोक्याला खाजवत त्यांच्याकडे हळू हळू जायला लागला. चेहऱ्यावर तर जरा लाज चढली होतीच. जे व्हायचं होत ते झाल होत आता जे काही समोर येणार होत ते त्याला सहन करावं तर लागणार होत.
मागील भागात.

तिचा आताचा चाललेला खेळ आणि तिच्या नावाने दुमदुमत असणार ते कॉलेज बघून मनालीच्या आई वडिलांना आता जरा वाईट वाटायला लागल होत. ती तिच्या शाळेत असताना शाळेकडून बऱ्याच वेळा बाहेर जाऊन जिंकून आलेली होती. पण तिचं स्पर्धा लांब असली की तिला ते पाठवतच नव्हते. तेव्हा तर तिला खेळू दिल असत तर कदाचित ती आज खूपच पुढे गेली असती याची जाणीव त्यांना आता झाली होती.

डोळे फाडून मनालीचा खेळ बघणाऱ्यामध्ये रावीची ती बंधू मंडळी पण होती. त्यात मनालीने खेळाडू बाद करण्यासाठी मारलेले सूर कधी त्यातल्या एकाचा हृदयाचा ठाव घेऊ गेले जे त्यालाही समजलं नव्हत. तो त्याच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप देखील करत नव्हता. न जाणो तिचा खेळ खेळताना तिची एखादी अदा त्या उघडझाप केल्यामुळे बघता येणार नाही.

आता त्यांचा खेळ अंतिम क्षणाकडे पोहोचला होता. मनालीला जिंकण्यासाठी एक खेळाडू बाद करायचा होता. घड्याळाचा काटा अंतिम क्षणाकडे पळत होता आणि मनाली त्या एका खेळाडूच्या मागे पळत होती. दोन्ही जवळ जवळ येत होते. एका सेकंदाला मनालीने एक जोरात सूर मारला आणि समोर धावणाऱ्या खेळाडूच्या पायाचा वेध घेतला आणि दुसरीकडे वेळ संपल्याची घंटा वाजली.

आता पूढे.

तसे समोरच्या टीममधले काही खेळाडू मनालीने फक्त बुटाला स्पर्श केला या आधारावर त्यांना विजेता घोषित करण्यासाठी जोर धरला. तर काही खेळाडूंनी मनालीने सूरवातीला जाणूनबुजून खेळ हळू केला म्हणून टेकनिकल आधारावर विजयी घोषित करायला लागले. ते बघून मनालीची टीम देखील त्यांना विजयी घोषित करायला त्यांची बाजू मांडायला लागले.

ह्या गडबडीत मनालीकडे कोणाचाही लक्ष गेल नव्हत. तिने सूर मारल्यामुळे तिच्या हाताला खूपच खरचटलं गेल होत. म्हणून ती तशी बसून राहिली होती. तिच्या डोळ्यात पाणी आल होत. ती तिच्या हाताला धरून बसली तोच एक हात तिच्यासमोर आला. मनालीने वर पाहिलं तर तो चेहरा ओळखीचा होता.

तिच्या हाताला लागलेलं बघून तो लगेच तिच्याजवळ धावला होता आणि तिच्यासमोर त्याचा हात केला होता.

तिने तिचे डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्याचा हात पकडून उभी राहिली. ती देखील त्याच्या डोळ्यात हरवली गेली होती. कदाचित त्याच्या डोळ्यातली काळजी तिला आवडून गेली होती.

तिकडे स्टेट लेव्हलच्या खेळाडूंच्या प्रेशरमुळे त्यांना विजयी तर घोषित केल होत तरी त्यांचा स्वतःचा वर्ग सोडून त्यांच्यासाठी दुसऱ्या कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. कारण त्यांनी भांडून भांडून स्वतःला विजयी घोषित करायला लावलं होत.

पण जशी मनाली उठून उभी राहिली तस तिच्यासाठी टाळ्यांचा गजर व्हायला लागला होता. तेव्हा कुठे रावी, परी आणि बाकी बंधू मंडळीच लक्ष मनाली आणि त्याच्याकडे गेल. तसे ते सगळेच त्याच्याकडे आ वासून बघू लागले. तो आणि कोण्या मुलीसोबत उभा आहे. हेच त्यांना त्यांच्या आकलनापलीकडे होत.

त्यानंतर रावीच लक्ष मनालीच्या हातावर आलेल्या लाल रंगाकडे गेल. तशी ती देखील तिच्याकडे धावली. रावी जवळ येताच त्याने तिचा हात सोडला. त्याने हात सोडताच मनालीने त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं.
जणू काही त्याने का सोडला? हे त्याला विचारून बघत होती.

“मनु हे कस झाल?” रावी काळजीने विचारू लागली. तस मनालीच लक्ष रावीवर गेल.

“तुला आता दिसली का मी?” मनाली जरा चिडून बोलली.

“सॉरी ना बेबी.” रावी तिचा हात स्वतःच्या हातात घेत बोलली. “चल फर्स्ट एड करू.” रावी तिला सोबत घेऊन जाऊ लागली.

रावीच्या हातात मनालीचा हात असल्याने ती देखील रावीच्या मागे मागे जाऊ लागली. पण तिच्यामागे जाता जाता मनालीने त्याच्यावर नजर टाकायला विसरली नव्हती.

आता त्याने त्याच्या बाकी बंधू मंडळीना पाहिलं आणि डोक्याला खाजवत त्यांच्याकडे हळू हळू जायला लागला. चेहऱ्यावर तर जरा लाज चढली होतीच. जे व्हायचं होत ते झाल होत आता जे काही समोर येणार होत ते त्याला सहन करावं तर लागणार होत.

“बोला साहेब,” माला चिडवण्याच्या सुरात बोलली. “काय होत ते?”

“तू तर मावशीला आवडेल त्या मुलीसोबत लग्न करणार आहेस ना?” सुजयच पण तोच सूर.

“ती तर खूप अल्लड आहे,” जयचा पण तोच सूर लागला. “जेव्हा रावी आणि ती मस्करीच्या मूडमध्ये असतात तेव्हा. असाच बोलला होतास ना तू.”

“आपण प्रेम नाही करणार रे.” आदेशचा पण सारखाच सूर. “अस आमच्यासोबत बोलत होता.”

“अगदी काकांवर गेला आहे,” परी पण तिकडून येत बोलली. जी रावीच्या मागे मनालीला बघायला गेली होती. “त्यांनी पण अश्या गडबड गोंधळातच मावशीचा हात पकडला होता.” परी तिचं हसू दाबत बोलली.

तो काही बोलणार तोच मागून रावीचा आवाज आला. आता तो आवाज देखील खट्याळ नसता तर अजूनच नवल होत.

“आरुष दादा,” रावीच्या अंगात प्रचंड उत्साह भरभरून वाहायच्या तयारीत होता.

तिच्या आवाजाने सगळे रावीकडे लागले. रावी उभी तर होतीच पण तिच्या पाठी मनाली देखील उभी होती. जी रावीने दादा बोलल्यावर तिला चिमटा काढत होती.

“हिला तुझे आभार मानायचे आहे बरं.” रावी पूर्ण नाटकी आवाजात बोलली.

तिचा तो सूर बघून मनालीने तिचा हात झटकला आणि तिथून पळून गेली. ते बघून रावी खूपच हसायला लागली. तिकडे आरुष पण सरळ त्याच्या बाईककडे जायला निघाला.

“सरळ ॲकेडेमीवर जायचं.” परी जाणाऱ्या आरुषकडे बघत बोलली.

तसे सगळेच हसायला लागले. मग परीने त्यांच्यावर पण नजर टाकली तसे ते सुद्धा आरुषच्या मागे गेले. तिथे आता फक्त रावी आणि तिचं उभी होती. खो खो च्या स्पर्धा संपली असल्याने बाकी मुल देखील चालू असलेल्या इतर खेळांकडे वळली.

“जा तिला घेऊन ये,” परी रावीकडे बघत बोलली. “मला तिच्याशी बोलायचं आहे.”

तशी रावी तिचं हसू दाबत पटकन मनालीला शोधायला पळाली. मग परी पण हलकेच हसत तिच्या बाकी कामांकडे गेली.

रावी मनालीला शोधत शोधत त्यांच्या क्लासरूमकडे आली. तर मनाली तिची बॅग आवरत होती. तिला त्यांच्या वर्गात येईपर्यंत जो भेटेल तो तिचे अभिनंदन करत होता. त्यामुळे तिला वर्गात यायला उशीर झाला. म्हणून ती तिची बॅग पटापट आवरायचा प्रयत्न करत होती. पण हाताला लागल असल्याने तिला ते जमतच नव्हत. म्हणून ती जरा वैतागली होती.

“मी मदत करू का?” रावी परत आधीच्या सुरात अवतरली.

तस मनालीने तिला आठ्या पाडून पाहिलं. “तू बोलूच नको माझ्याशी.” मनाली वैतागून बोलली.

“का बरं?” रावी “मी काय केल?”

“काय केल?” मनाली “कशी बोलली सगळ्यांसमोर?”

“कशी म्हणजे?” रावी खूपच निरागस होऊन बोलली. “जे तू बोलायला सांगितलं तेच बोलली.”

“हो, पण त्याचा सूर वेगळा होता अस नाही वाटत का तुला?” मनाली “काय वाटलं असेल त्यांना?”

“त्यांना?” रावीचे डोळे विस्फारले गेले.

रावीचा रोख कुठे जाऊन पोहोचला ते मनालीला लगेचच समजलं. “मग तिथे सगळेच होते ना.”

“अच्छा तस होय.” रावी उगाच तिचे दात दाखवून हसली.

ते बघून मनालीने तिचं तोंड वाकड केल आणि स्वतःची बॅग उचलली. रावीला रोखून बघतच ती जाऊ लागली. तर रावीला तिच्यावर अजूनच हसू यायला लागलं.

“आता दात काढायला काय झाल?” मनालीच्या कपाळवर आठ्या नाचायला लागल्या. “येतेस की मी जाऊ?”

“अशी जाणार आहेस घरी?” रावी तिच्या कपड्यांकडे बघत बोलली.

आता मनालीने तिचे कपडे पहिले तर ती अजूनही तिच्या स्पोर्ट्सच्या कपड्यांवर होती. अंगावर घातलेला टीशर्ट आणि शॉर्ट पॅन्ट यावरच ती होती. तिने कपडे बदललेच नव्हते. ते बघून तिने तिचे डोळे घट्ट मिटले. तिला आता समजून चुकलं की रावी आता तिला यावरून पण चांगलीच चिडवणार. एकतर तिच्या डोळ्या समोरून आरुषने पुढे केलेला हात काही केल्या जात नव्हता.

ते बोलतात ना की एका क्षणात प्रेमात पडता येत का? आता ते मनाली स्वतः अनुभवत होती. पण रावीसमोर ती स्वीकारत नव्हती.

“हो,” मनाली ठसक्यात बोलली. “मी अशीच घरी जाणार आहे.” आणि ती पूढे जाऊ लागली.

“ते आरुष दादा तुझी बाहेर वाट बघत आहे.” रावी मुद्दाम बोलली.

तशी पुढे जाणारी मनाली पटकन पळत मागे आली आणि रावीच्या पाठी येऊन लपली. “का? का नाही गेला तो अजून?” तिने दाराकडे बघत विचारलं.

“मी म्हटलं वाट बघत आहे,” रावी “इथे येत आहे अस नाही बोलली मी?”

तेव्हा कुठे मनालीला तिचं बोलण समजल. सोप्या भाषेत तिने परत तिला वेड्यात काढलं होत. मग ती रावीकडे परत गाल फुगवून बघू लागली.

“अशीच घरी जाणार म्हणे.” रावी तिच्या आवाजाची नक्कल करत बोलली. “चल अवर लवकर, दीने बोलावलं आहे.”

“दी?” मनाली परत गोंधळून गेली.

“हे भगवान.” रावीने डोक्यालाच हात लावला. स्वतःच्या नाही तर मनालीच्या. कारण तिचं मन तर अस्थिर झाल होत ना, म्हणजे रावीच्या त्या खट्याळपणाने झाल होत. त्यामुळे तिला लवकर काहीच सुचत नव्हत. “तुमची मॅम आणि माझी दी.”

“तिने का बोलावलं?” मनाली भावनेच्या भरात बोलून गेली.

आता मात्र रावीला तिचं हसू आवरता आल नाही आणि ती पोट धरून हसू लागली.

“आता काय झाल?” मनाली चिडून बोलली.

“तू तुझ्या मॅमला एकेरी नावाने बोललीस?” रावी हसतच बोलली.

तसे मनालीचे तिचे हात झटकले आणि सरळ बाथरूमकडे पळाली. तशी रावी पण तिच्यामागे हसतच जाऊ लागली.

तर दुसरीकडे आरुष आणि बाकी मंडळी ॲकेडेमीमध्ये जाऊन पोहोचली. आज त्यांनी ॲकेडेमीला सुट्टी दिली होती. त्यामुळे तिथे आज कोणीही दुसरी मुल नव्हती. हे मागचे काही दिवस परी डान्सची प्रॅक्टिस घ्यायला आली नव्हती म्हणून तुषार देखील मालाचा सराव घेऊन त्याच्या जिमवर निघून जात होता. पण आज तोही आला नव्हता. कारण माला पण कॉलेजमध्ये रावीचा खेळ बघायला गेली होती.

आता ते पाचही जण निवांत बसले होते आणि आरुष त्या चौघांच्या मध्यभागी बसला होता.

“बोला कसा काय साक्षात्कार झाला?” सुजय उत्साहात येत विचारू लागला.

“आधी जेव्हा कधी रावीसोबत तिला बघायचो ना तेव्हा ती एकदम नाजूक जाणवली होती.” आरूषने बोलायला सुरवात केली. “अस वाटायचं की रावीच्या सपोर्ट शिवाय ती काहीच करू शकत नाही. पण जसा तिचा खो खो चा पहिल्यांदा गेम पहिला ना. बस तेव्हाच काहीतरी मनात हुरहूर झाली. रावी बोलत होती की तिला मागे हटायला लावलं होत. तरी तिने खेळायची तयारी दाखवली म्हणून काही जण तिच्यावर हसले देखील. तिला म्हणे घरातून लांब कधी पाठवलं नाही. त्य सर्वांना तिने काहीच न बोलता फक्त खेळून अस काही उत्तर दिल आहे ना की जे कोणी हसले असतील ना तिच्यावर त्यांना तिच्याशी बोलायला पण लाज वाटेल.”

आरुषच बोलण ऐकून ते चारही जण डोळे फाडून आरुषला बघू लागले.

“आणि तो शेवटचा गेम तर,” आरुषच्या डोळ्यासमोर अजूनही तिचा तो सूर जश्याच्या तसा तरळत होता. “एवढ्या लांबची डाय कोण्या मुलीने मारण खूपच रेअर आहे. तिला तिचा बूट पूर्ण पण पकडता आला असता. पण ती मुलगी तोंडावर पडली असती म्हणून तिने फक्त त्या मुलीच्या बुटाला टच केल.”

“तिला एवढ ओळखायला लागला?” आदेश

“तुमची भेट आधीची तर नाही?” जय बारीक डोळे करून बघू लागला.

“तुझ्यावर विजय काकांची सावली पडली आहे का?” माला विचार करत बोलली. “कारण पहिल्याच भेटीत इतक ओळखणं फक्त विजयकाकांनच जमत.”

“नाही राहुल काकांवर गेला आहे,” सुजय “दी बोलली नाही का ती त्यांनी पण अश्याच गडबड गोंधळात..” सुजय त्याच हसू दाबत बोलला.

तसे ते सगळेच हसायला लागले.

तिकडे कॉलेजमध्ये मनाली आणि रावी त्यांच्या माना खाली घालून उभ्या होत्या. त्यांच्यासमोर परी तिच्या हाताची घडी घालून उभी होती. त्या तिघी कॉलेजमध्ये असणाऱ्या एका मोकळ्या कोपऱ्यात उभ्या होत्या.

मनाली तिचे कपडे बदलून बाथरूमच्या बाहेर पडली तस रावी तिला सोबत घेत परीकडे जायला निघाली. आताही त्या दोघी जात असताना बऱ्याच मुली मनालीचे अभिनंदन करत होत्या. त्याच वेळेला विजयी घोषित केलेल्या टीमच्या मुली देखील बाजूलाच उभ्या होत्या. त्यांच्याकडे मात्र कोणाच लक्ष नव्हत. ते बघून त्या मुलींचा अहंकार दुखावला गेला. त्यांनी जाणाऱ्या मनालीकडे बघून बोलायला सुरवात केली.

“गेम हरली तरी काही माणस कसे काय अभिनंदन स्वीकारतात काय माहित?” पहिली मुलगी तिरस्काराने बोलली.

“पाहिलं नाही का?” दुसरी मुलगी कुत्सित हसत बोलली. “कशी त्या मुलासमोर शायनिंग मारायला उडी मारली.”

“आणि त्यानेही लगेच तिला उचलायला हात पुढे केला.” तिसरी मुलग

“बहुतेक त्याचं काही असावं.” चौथी मुलगी

“किती दिवसांच असावं?” पहिली मुलगी जाणून मोठ्याने बोलली.

पहिल्या तीन गोष्टी ऐकून रावी तर काही बोलली नाही. पण चौथी आणि पाचवी गोष्ट ऐकून पुढे जाणारी रावी जागीच थांबली. तसा मनालीच्या पोटात गोळा आला.

“रावी जाऊ दे,” मनाली रावीला आवरत बोलली. “चल इथून.”

पण रावी परत त्या मुलींजवळ आली आणि चिडून हसत बोलली.

“जिंकल्यावर देखील कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत. तरी जिंकल्याचा भाव आणून वर तोंड करून बोलायला काही लोकांना कस जमत काय माहित? ते ही इतकी इन्सल्ट झाल्यावर?”

“ए थोबाड सांभाळून बोल.” पहिली मुलगी रागाला येत बोलली.

“का?” रावी तिरकस हसत बोलली. “मिरची लागली ना? खरं बोलली तर.”

“जास्तीच बोलायची काही गरज नाही,” दुसरी मुलगी “जिंकला नाहीत ना मग निघा आता.”

“आम्ही चाललोच होतो,” रावी “ते काही लोकांना काहीतरी सांगायचं होत.”

तश्या त्या मुली रावीला अजून रागात बघू लागल्या. यावर रावी हलकीच हसत जाऊ लागली.

“युझलेस,” पहिली मुलगी चिडून बोलली. “सावत्र बहिणीच्या जीवावर उडते फक्त.”

तशी पुढे जाणारी परत जागीच थांबली. ते बघून मनालीने परत डोळे मिटून घेत एक दीर्घ श्वास घेतला.

“गप ना,” पाचवी मुलगी “कशाला तिच्या मागे लागते. एकतर तिला आणि तिच्या भावांना डोक कमी आहे.”

बास, हे वाक्य जस तिच्या कानावर गेल तस तिने बाजूला असलेली बादली उचलली आणि सरळ त्या उभ्या असणाऱ्या मुलींच्या अंगावर टाकली.

त्या बादलीमध्ये सिमेंट आणि माती एकत्र करून कालवलेल मिक्स्चर होत. ते सगळ त्यां मुलींच्या अंगावर आणि केसांवर उडाल.

हे सगळ रावी पण डोळे विस्फारून बघत राहिली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all